मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

पुण्यातिल राजकारण्यांचे शिक्षण

आज सकाळी पेपर हातात घेतला व वाचता वाचता पुण्यातिल विधानसभेसाठी उभे असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वाचुन प्रश्नच पडला, की सरकार एवढ्या मोठ्या पदासाठी (आमदार, मंत्री) किमान शैक्षणिक पात्रता का ठरवुन देत नाही. खरतर किमान पदवी पर्यंत शिक्षण अनिवार्य असायलाच पाहीजे, ज्यांच्यावर आपण राज्याचा कारभार चालविन्याची जबाबदारी देणार आहोत त्यांचे किमान शिक्षण निदान पदवी पर्यंत तरी झाले नसावे का ?आता बघा ना आपल्या पुण्यातुन कसे उमेदवार उभे आहेत.

कसबा :
१) भाजपः गिरिश बापट (बी. कॉम)
२) काँग्रेसः रोहित टिळक ( एम. कॉम, एम. जे)
३) मनसे: रविंद्र धंगेकर ( ८ वी पास)

शिवाजी नगर :
१) भाजपः विकास मठकरी(एम. कॉम, एम. ए.)
२) काँग्रेसः विनायक निम्हन ( १२वी)
३) मनसे: रणजीत शिरोळे (बि.ए.)
४) रिपाई: परशुराम वाडेकर ( ७वी)

पर्वती :
१) भाजपः माधुरी मिसाळ (बी. कॉम)
२) रा.काँग्रेसः सचिन तावरे ( बी. कॉम)
३) मनसे: शिवाजी गदादे (७वी)
४) रिपाई: किरण मोघे( बी. ए. ,एम. एससी)

खडकवासला:
१) भाजपः मुरली मोहोळ (बी. ए.)
२) रा.काँग्रेसः विकास दांगट (१०वी)
३) मनसे: रमेश वांजळे (१०वी)

कोथरुड :
१) सेना: चंद्रकांत मोकाटे (१० वी)
२) रा.काँग्रेसः अण्णा जोशी ( एम. एससी)
३) मनसे: किशोर शींदे (एल. एल. बी.)
४) अपक्ष: दिपक मानकर ( ११ वी.)

कॅटोनमेंट :
१) सेना: सदानंद शेट्टी (१० वी)
२) काँग्रेसः रमेश बागवे( बी.ए.)
३) मनसे: उमेदवार नाही.
४) रिपाई: रोहिदास गायकवाड (बी.ए.)

हडपसर :
१) सेना: महादेव बाबर (१० वी)
२) काँग्रेसः चंद्रकांत शिवरकर( बी.ए.)
३) मनसे: वसंत मोरे (एस. वाय. बी. कॉम)

वडगावशेरी :
१) सेना: अजय भोसले (१० वी.)
२) रा.काँग्रेसः बापु पठारे( ९वी.)
३) मनसे: रविंद्र एंडल (१०वी.)
४) रिपाई: सय्यद अफसर (९वी.)

आता हे १०वी वाले समजा गेलेचे विधानसभेत, तर विचार करा, ते काय कामं करतील.
Website to find education of your member:
http://220.225.73.214/pdff/affi.htm
विनायक निम्हण
http://pune.nic.in/election/affidavits/209-%20Shivajinagar/VinayakNimhan...
दिपक मानकर
http://pune.nic.in/election/affidavits/210-%20Kothrud/deepak%20madhav%20...

आनंदराज आंबेडकर यांची माहिती ईथे पाहा

http://eci.nic.in/Sep2004_AFFIDAVITS/SE/S13/51/AnandrajAmbedkar/AnandrajAmbedkar_SC1.htm

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा