गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

श्रम संस्कार शिबिर - हेमलकसा

मागील ४२ वर्षांपासुन बाबा आमटेंच्या सोमनाथ येथील प्रकल्पात तरूणांचा श्रमसंस्कार शिबिर भरत आलेला आहे. या वर्षी हा शिबिर प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे दि. १५ ते २२ मे दरम्यान भरणार आहे.

या शिबिरात संपुर्ण भारतातुन तरुण मंडळी हजेरी लावत असतात. आधी कसलाच गाजावाजा नसुन सुद्धा लोकांची प्रचंड गर्दी होत असे. पण आज विविध वाहिण्यामुळे आमटेंच्या प्रकल्पाबद्दल फार सांगायची गरज पड्त नाही. प्रत्येकाला त्यांच्या कार्याबद्दल थोडीफार तरी माहीती आहेच.

आपल्या सगळ्यासंमोर एका महान व्यक्तीच्या प्रकल्पात जाऊन एक आठवडा श्रम संस्कार शिबिराच्या नावाखाली बरेच नविन अनुभव घेण्याची संधी चालुन आली आहे. जर तुमच्या पैकी कुणाला या शिबीराला जायचे असल्यास आजच आपले नाव नोंदवुन घ्या.

संपर्क:
अनिकेत प्रकाश आमटे
लोक बिरादरी प्रकल्प
मु. हेमलकसा. पो. ता. भामरागड
जि. गडचिरोली. (महाराष्ट्र) -४४२७१०
Email: hemalkasacamp@gmail.com
Mob: 9423646185, 9403300503, 9421729386.