गुरुवार, ४ मार्च, २०१०

आशा भोसले-मराठीवर भाष्य

काल सगळ्या हिंदी चॅनल्स्वर आशाबाईचा कौतुक सोहळा चालु होता. म्हणे मी कुठेही जाऊन काम करुन जगेन.सगळ्याना सगळ्याच ठिकाणी जाऊन राहण्याचा अधिकार आहे. आणि त्या लब्बाड कॅमेरामॅनने लगेच राज साहेबांचा पडलेला चेहरा दाखविला. या बाईना एवढचं उत्तेरच कौतुक आहे, तर मग गेल्या का नाही या राजस्तान किंवा बिहारमधे गाण्याचं काम शोधायला. वरुन कष्ट करेल त्याला यश मिळतं. मराठी माणुस कष्ट करत नाही असं म्हणायचं होतं का त्याना ?
बरं हे मंगेशकर घरानं कलाकार म्हणुन खुप महान आहेत पण व्यक्ती म्हणुन खुपच लहान आहेत. त्या लताबाईनी तर खासदार निधी सुद्धा लोकांच्या कामी लावला नाही असं हे मंगेशकर घरानं. बरं या आशाबाईला काय कळतं राजकारणातलं आणि कळत असेल तर मग गाण सोडुन जावं त्या बिहारमधे आणि राजकारण कराव कोणी अडवलं याना. वरुन मराठीचा मुद्धा सध्या किती धगधगतोय त्यात परत तेल ओतायची काही गरज होती का? या बाईची बौद्धीक पातळी काय आहे मला माहित नाही, पण ती एक अशिक्षीत बाई आहे. निसर्गाने तिच्यात कला दिली पण इतर गोष्टींचा अभ्यास समज या गोष्टी आशाबाईत आहेत कि नाही याची शंका उपस्थीत करण्यासाठी कालची वागणुक पुरे.
यानी त्या कोलकत्याला जाऊन म्हणाव कि कोलकाता सगळ्यांचा आहे, किंवा त्या चेन्नईत जाउन बोलाव हे शहर सगळ्यांचं आहे, ती लोक असं बदडुन काढतील कि परत केंव्हा असल्या फंदात पडणार नाही. पण मराठीच्या विरोधात बोलायला मात्र यांच्या जिभेत कुठुन बळ येतं माहीत नाही, जो तो ऊठुन वाट्टेल ते बोलुन जातो. मला नेहमी प्रश्न पडतो कि हि बोलणारी लोकं माजलीत कि आम्ही निर्लज्ज आहोत?.
मी लता मंगेशकर पेक्षा आशाताईंचा खुप मोठा पंखा आहे, पण आज आशाताईनी या पंख्याची हवाच काढली.