गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

आरक्षण – वॉकर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी, मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी व सामाजीक समतोल साधण्यासाठी आरक्षणाची घटनात्मक तरतूद केली. त्याचा परिणाम आज आपल्याला बघता येईल. दलित समाजातिल ही तीसरी पिढी शिक्षण घेत आहे व अगदी दोन पिढ्यांच्या अत्यल्प कालावधित दलितानी ब-याच आघाडयांवर अत्यंत प्रभावी नि तडाखेबंद मुसंडी मारली.  शिक्षणाच्या जोरावर अन आरक्शण्याच्या जोडीने प्रत्येक क्षेत्रातील दलितांचं अस्तीत्व दिवसेंदिवस वाढत आहे.  या मूळे समाजात रुंदावलेली दरी मिटविण्याचं पुण्यकार्य तर होतच आहे, त्याच बरोबर समतेची मुल्यं रुजताना एक नवीन समाज व्यवस्था जन्म घेत आहे. नवी सामाजीक मुल्य़ रुजताना दिसत आहेत, याचा एकंदरीत परिणाम हा देशाच्या हिताचा तर आहेच पण लवकरच महाशक्ती बनण्याचे स्वप्न रंगविणा-या या नव्या पिढीच्या उत्कर्षाला अत्यंत हितकारक नि अनुकूल परिस्थीती निर्माण करण्याचं कार्य सामाजीक दरीच्या निर्मूलनातून उभं होत आहे. अन या महान कार्यात सामाजिक असमतोलता सर्वात मोठा धोका होता, आधी सामाजिक सलोखा तयार करुनच हे कार्य सिद्धिस जाऊ शकतं, त्यासाठी तळगळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणने अत्यंत गरजेचे होते. या तळागळातल्या लोकाना मुख्य प्रवाहात आणून देशाचे हित साधण्यात सर्वात महत्वाची भूमिका जर कुणी बजावत असेल तर ती म्हणजे आरक्षण होय. आरक्षणाशिवाय या देशातील वंचिताना मुख्य प्रवाहात सामावून घेणे अशक्यप्राय गोष्ट होती व यावर दिलेला रामबाण उपाय म्हणजे आरक्षण.  मी स्वत: ज्या आयटी कंपनीत आहे तिथे सुद्धा दलित बांधव चांगल्या पदावर काम करत आहेत. इनफोसिस, ओरॅकल, विप्रो ते सिडॅक पर्यंत सगळीकडे बौद्धिक कसोट्यावर आपला लोहा मनवून मोठ्या डौलात अधिकारी पदावर विराजमान दलित बांधव बघुन मन समाधान पावतं. अत्यल्प काळात केलली ही यशस्वी वाटचाल, विना आरक्षण क्षेत्रात दलितानी केलेली विजय घोडदौड पाहता अंगावर मुठभर मांस  चढतं. हे सर्व शक्य झालं त्या आरक्षणामूळेच. आरक्षणामूळे आम्हाला विद्यार्जनाच्या वाटा खुलल्या जी प्रगतीच्या नि विकासाच्या मार्गातील मुलभूत गरज आहे. ईतर सर्व यश हे कष्टाने पादाक्रांत करता येतात पण त्या रणांगणात शिरण्याचा कार्ड ज्या मूळे मिळतो ती विद्या. अन विद्यासंपन्न होण्यास आम्हाला आरक्षणाची निकडीची गरज होती ती बाबासाहेबानी घटनेच्या माध्यमातून दिली.
कुबडयांचा आधार
माझ्याशी ब-याच लोकानी आरक्षणाबद्दल नकारात्मक चर्चा केल्या. दलितेत्तरांमधिल सगळ्याच लोकांचं (शिवधर्मवाले सोडुन) मत आहे की तुम्हाला आरक्षण देऊन आज ५० वर्षे उलटलीत. आता आरक्षणाशिवाय पुढे जायला शिका. आजुन किती दिवस या आरक्षणाच्या कुबडया धरुन चालणार? पुढे पुढे तुम्हाला या कुबड्यांची ईतकी सवय होईल की तुम्ही कुबड्यांशिवाय चालुच शकणार नाही. किंवा भारत सरकार कुबडयांच्या आधारानी चालणारा एक मोठा समाज तयार करतोय ज्या मुळे पुढे चालुन देशाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे जर असच चाललं तर काही वर्षानी भारतातील मोठा समाज कुबडयांमुळे दुबळा झालेला असेल व त्याचा ताण ईतर सुद्रुढ समाजावर पडेल. मग यांचा(दलितांचा) भार परत एकदा सुदृढ समाजाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करेल आणि आपल्या देशात एक अंतर्गत क्लेश, अधोगती, जातीय़वाद व ना ना प्रकारच्या समस्या नुसत्या या कुबडयांमुळे पहावयास मिळतील. म्हणून सरकारनी लवकरात लवकर आरक्षण उठवावे आणि सगळयाना फक्त बुद्धीमत्तेच्या कसोटिवर संधी मिळावी.
काही लोकानी तर इतर प्रगत देशांची उदा. दिलीत. अमुक तमुक देश सुद्धा गरीब होता पण आज त्यांच्या दैदिप्यमान प्रगतीत कुठल्याच आरक्षाचा वाटा नाही नुसतं कष्टाच्या बळावर ते सगळं घडुन आलं. म्हणून दलितानी कष्ट करुन स्वत:ची प्रगती करावी. अमेरीकेत सुद्धा काळे-गोरे वाद होते, तिथे आजही काही प्रमाणात तो वाद आहेच. पण काळ्य़ा लोकानी आज जे काही मिळविलं ते ईच्छाशक्तीच्या  व कष्टाच्या जोरावर. त्या तुलनेत दलितानी काहीच मिळविलेलं नाही, कारण त्याना आयतं मिळवायची सवय झालिये. हे आरक्षण जर असच चालु राहीलं तर भविष्यात सरकारवर आरक्षणा पासुन कसं दुर राहता येईलयावर एक मानसोपचार पोजेक्ट राबविण्याची वेळ येईल इथपर्यंत लोकांनी तारे तोडले.
यावर माझं मत
खर तर ही सुरुवात आहे, आत्ताशी कुठे आम्ही उभं राहायला शिकतोय. प्रत्येक गोष्टीचा परिणाम मिळायला काही कालावधी जावा लागतो. आणि तो परिणाम जर समाज या घटकाशी संबंधित असल्यास मात्र नियोजीत वेळेपेक्षा बराच काळ मागे पुढे होऊ शकतो. आज ५० वर्षात दलितांमधे जो बदल घडून आलाय तो अगदिच निराशाजनक नाही, उलट मोठ्या अभिमानाने सांगावं ईतकी प्रगती झाली आहे.  अगदीच प्रोजेक्ट फेल गेला म्हणून बोंबा मारणारे आमचं मानसिक खच्चिकरण करण्याच्या उद्देशाने व दूराग्रह भावनेने असा अपप्रचार करित आहेत. दलित आणि दलितेत्तर विदयार्थ्याना एकाच परिमाणाने मोजने म्हणजे तालिमीत खुराक खाऊन तयार झालेल्या पैलवाना समोर कुपोषित बाळाला उभे करण्यासारखे होईल. दलित हा आजही बौद्धिक दृष्ट्या पुर्ण सक्षम नाहीच, कारण आमच्या जीन्समधुन आलेला बौद्धिक अधूपणा हा हजारो वर्षाच्या ज्ञानवियोगाचा परिणाम आहे. हा वियोग कोणी घडवून आणला हे जगजाहिर आहे. आज पर्यंत आम्हाला बुद्धी वापरण्याची, ज्ञानार्जनाची सामाजीक व धार्मिक बंदी होती, त्यामूळे बुद्धीचा विकास झालाच नाही. आताकुठे आम्ही बुद्धीचा वापर करायला लागलो. ज्या ज्ञानक्षेत्रात आम्हाला कधीच प्रवेश नव्हता तिथे नुकताच प्रवेश मिळाला, पण तिथे टिकण्यासाठी लागणारा सराव तर व्हायला हवा ना. सवर्णाची पिढी पिढ्यान-पिढ्याच्या सरावानी अत्यंत निपून बनली आहे तर आम्ही नुकतेच विना-सराव तिथे प्रवेशलो आहोत. हा सराव घडावा म्हणून आरक्शण.  सवर्णानी लादलेलं नैराश्य घालवायला आजून किमान १५० वर्षे जावी लागतील. बुद्धिच्या मैदानात आम्ही उतरलो, तिथे आधिच उभा असलेला सवर्ण हा त्या मैदानातला जुना खेळाडू आहे. त्यानी प्रत्यक्ष सराव तर केलाच पण कित्येक पिढ्याच्या जणूकांमधूनही त्याला सरावाचा वारसा मिळाला आहे. त्यामूळे तो आमचा प्रतिस्पर्धी नाहीच मुळी. कुस्तीच्या मैदानात खाऊन पिऊन, आखाड्यात शरीर कमावून उभा असलेला पैलवान अन नुकताच प्रेक्षकांमधून उतरलेला एक सामान्य नागरीक याच्यात लढत केल्यास त्याला स्पर्धा म्हणता येणार नाही. कारण दोन स्पर्धकांची स्पर्धेसाठीची तयारी ही समान नाही. पैलवान हा त्यासाठी खास प्रशिक्षित असून तो दुसरा नागरी प्रशिक्षित नाही. म्हणून पैलवान व तो नागरीक जरी आमने सामने कुस्तीच्या मैदानात उतरले तरी ते बरोबरीचे स्पर्धक ठरणार नाही. जर या दोघात लढत करावयाचीच असेल तर मग त्या नागरीकाला पैलावानाला मिळणा-या सा-या सोयी देऊन तशी तयारी करवून घ्यावी लागले. मधेच तो पैलवान सवलतीच्या विरुद्ध बोंब मारून लढण्यास या म्हटल्यास तसे करता येणार नाही. पैलवानानी घेतलेल्या सर्व सोयी आधी या नागरीकाला देणे गरजेचे ठरेल. पैलवानानी केलेली तयारी करण्यास लागणारा वेळही देणे गरजेचे ठरेल. अधे मधे पैलवान दंड थोपटून लढ्याचा आव आणून आपल्याला आव्हान देऊन आपल्या दुर्बल्याचा उपहास करेलही.  अगदी याच धर्तीवर सवर्णानी पुर्वतय्यारी केली आहे. आम्ही नुकतेच त्या मैदानात उतरलो आहोत. आता आम्हाला पैलवानाच्या बरोबरीत उभं राहण्यासाठी सराव करायचा आहे. त्यासाठी घेतलेल्या सवलती म्हणजे आरक्शण होय.
हजारो वर्षाचा शैक्षणीक वारसा लाभलेल्या लोकांनी वाट्टेल ते बोलायला सुरुवात केली आहे. किंबहुना ५० वर्षातिल प्रगतीमुळे त्याना अंदाज आला असावा की, त्यांच्याकडे बौद्धिक वारसा जरी असला तरी आता दलितानी या क्षेत्रात उडी घेतलीय. लवकरच वेगवेगळ्य़ा आघाड्यातील सुत्र दलितांकडे जातील ला भीती मुळे परत एकदा दलितांची बौद्धिक आघाडिवर घेराबंदी करण्याचा हा प्रयत्न आहे.
बघा मुळात दलित हा हजारो वर्षापासुन शिक्षणापासुन व इतर बौद्धिक विकासाला प्रेरणा देणा-या सर्व गोष्टिंपासुन वंचित असल्यामुळे तो आज सवर्णांपेक्षा डावाच आहे. कारण बुद्धिमत्तेचा संस्कार हा जिन्समधुन सुद्धा येत असतोच. तिव्र ईच्छा शक्तिने सगळं बदलता येतं, पण सगळ्य़ानाच ईच्छाशक्तीचा तो टोक गाठता येणे शक्य नाही. आज जे संवर्ण बुद्दीचे बाता करताना दिसतात त्या मागे एक मोठा इतिहास आहे.
१) त्याचे पालक शिकलेले आहेत.
२) त्याच्या घरी शैक्षणीक जागृती झालेली आहे.
३) बुद्धीमत्तेचा वारसा जीन्स मधुन आलेला आहे.
४) ते जिथे राहतात तिथे शिक्षणासाठी अनुकुल असं वातावरण आहे.
५) एकंदरी बौद्धिक विकासासाठी लागणा-या सर्व गोष्टी त्याना जन्मजात उपलब्ध आहेत.
आणि दलितांचं बघा.
१) त्यांचे पालक शिकलेले नाहीत.
२) त्यांच्या घरी शैक्षणीक जागृती नाही.
३) जीन्स मधुन जे आलं ते नैराश्य, भीती व चाकरी शिकवते.
४) दलित आजही मोठ्या प्रमाणात झोपडयांत राहतो. अभ्यासाची गोडी निर्माण होत नाही.
५) बौद्धिक विकासासाठी काहीच अनुकूल नसतं. त्यानी विकास साधला त्यानी मोठा झगडा करुन ते मिळविलं आहे.
आता कुणीतरी उठुन म्हणेल कि, आमच्या ओळखितला अमुत तमुक माणुस उच्च पदावर असुन सुद्धा त्यानी मुलाना आरक्षणातुन इंजीनिअरिंगला प्रवेश मिळवुन दिलाय किंवा त्यांची मुलं फारशी शिकलेली नाहिये. हि असली एक दोन उदाहरणं घेऊन नियम सिद्ध करता यायचा नाही, याला अपवाद म्हणुन सोडुन दयावे. वरील सर्व घडामोडींचा, परिस्थीतीचा व इतिहासाचा संदर्भ पाहता दलिताना,  वंचिताना या देशाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे म्ह्टल्यास त्याना आरक्षणे देणे अनिवार्य आहे. आरक्षणामूळे सामाजिक असमतोल निर्मूलनास मोठी मदत होईल. याचा देशाच्या विकासावर सकारात्म परिणाम होऊन आमचा देश प्रगतीच्या मार्गावर गती धरेल. देशातील समाजीक सलोखा विकासा साठी पूरक असतो व तो अत्यंत गरजेचा आहे. त्यामूळे या देशातील उपेक्शिताना आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व देशाचे हित साधण्यासाठी बाबासाहेबानी तशी घटनात्मक तरतूद करुन देशावर उपकारच केले.
काय मिळवले, काय गमावले
खरी परिस्थीती काय आहे तर आजही दलित हा खूप मागासलेला आहे. आर्थीक परिस्थीती जेमतेम आहे. शिक्षणाचं महत्व नुकतच कळायला लागलं. पोरानी शिकावं हे आत्ता कुठे पालकांच्या लक्षात येतय. आरक्षणाने फक्त शिक्षण मिळतं इतर सगळ्या गोष्टी स्पर्धेनेच मिळविल्या जातात याचा नव्या पिढीला स्वानूभवातून साक्षात्कार  झाला. मागच्या दोन दशकात झपाट्याने वाढणारं खाजगी क्षेत्र व तिथल्या नौकरीच्या संध्या फक्त गुणवत्तेच्या बळावर मिळतात हे समजू लागलय. आत्ता कुठे गुलामी सोडून उभं राहण्याची तय्यारी करत होतो तोचं खाजगी क्षेत्राचं भूत बुद्ध म्हणून उभं ठाकलं. आता आम्हाला एकाच वेळी दोन आघाड्यावर लढायची वेळ आली. एकतर सामाजीक आघाताच्या दास्यातून स्वत:ची मुक्तता करणे, व दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्राच्या सैतानाशी दोन हात करणे. अजिबात खचून न जाता दोन्ही आघाड्यावर लढण्यास सिद्ध झालो हे सर्वात महत्वाचं. बघता बघता या दोन दशकात दलित मुलानी त्या दिशेनी पाऊल टाकायला सुरुवात केली. नुसतं आरक्षणावर अवलंबुन राहणारी आम्ही माणसं नाही हे सिद्ध करुन दाखविताना अनेक मल्टिनॅशनल कंपन्या पादाक्रांत करण्या पासून थेट अमेरीके पर्यंतची गरूड झेप घेऊन जगाला चकीत केलं. आज खाजगी क्षेत्रातील प्रत्येक मोठ्या कंपनीपासून लहानात लहान कंपनीत दलित मुलं आपली चुणूक दाखवित आहेत. आयटी सारखं बुद्धिमत्तेचं क्षेत्र असो, अटोमोबाईल सारखं कष्टाचं व जिकरीचं क्षेत्र असो वा बॅंकींग सारखं अत्यंत महत्वाचं क्षेत्र असो या सर्व खाजगी क्षेत्रात दलितांची दैदिप्यमान कारकिर्द सुरु झाली. आज आम्ही या विना-आरक्षीत क्षेत्रातही नविन अध्यायाला सुरुवात केली आहे. हे सर्व साध्य करताना आरक्षणाचा थेट संबंध नसला तरी या पदास सिद्ध होण्याच्या मुळाशी आरक्षणाची देण आहे.  
सरकार दरबारी मात्र आजही आरक्षण कोट्यातुन दलितांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तरी कित्येक शाळा व कॉलेजेस मधे दलितांच्या रिक्त जागा भरल्याच जात नाही. हा एक नवीन प्रकारचा जातीयवाद जन्मास आला आहे. कित्येक ठिकाणी तर कुठल्यातरी लोकल वृत्तपत्रात एक लहानशी नाममात्र जाहिरात दिली जाते, जी दलित लोकांच्या वाचन्यातच येत नाही. हा प्रकार मुद्दामहून केला जातो.   जाणीवपूर्वक अशी वृत्तपत्रं निवडली जातात त्यांचा खप अगदी जेमतेम असतो वा लोकं वाचत नाहीत अन नोकरीची जाहिरात दिली जाते. त्यामूळे नोकरीच्या जागांबद्दल दलिताना कळतच नाही.  अशा प्रकारे दलितांच्या जागांवर संस्थेच्या मर्जीतल्या लोकांची नियुक्ती केली जाते. हे सगळं दलिताना डावलण्याचं काम ब-याच संस्थांमधुन होत आहे. थोडक्यात आम्ही आरक्षणामूळे सावरतो ना सावरतो तोच अनेक अडचणी उभ्या ठाकल्या. जातीयवादाचे नवनवी प्रकार जन्मास आले, डावलण्याचे अनेक समिकरण तयार झाले. जागतीकीकरणाचं भूत भारतावर उभा ठाकला. दुहेरी लढा अनिवार्य झाला.  तरी सुद्धा अनेक  आघाड्यावर लढण्यास हा दलित समाज मोठ्या धैर्याने उतरला, अन एक एक टप्पा पादाक्रांत करत पुढे सरसावू लागला.
दलित उद्योजक
आज डिक्की नावाची संस्था दलित उदयोजकांची नवी फडी तयार करते आहे. याच वर्षी पुण्यात भरलेल्या दलित उद्योजकांच्या एक्स्पोला भरभरुन प्रतिसाद मिळाला. मी त्यावर मागे एक लेखही टाकाला होता म्हणून ईथे जास्त लिहत नाही.
बाबासाहेबानी संविधानात घटनात्मक तरतूद करताना अत्यंत जागरुकपणे लिहले आहे की, आरक्षण म्हणजे पुरेसं प्रतिनिधीत्व न मिळालेल्या समाजाला देण्यात येणारं हे प्रतिनिधित्व होय. आरक्षण म्हणजे राजकीय, सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात दिल्या गेलंला संविधानीक प्रतिनिधीत्व होय. हे प्रतिनिधित्व गरजेचं आहे का? होय आहे,कारण आम्हाला आजवर कुठे प्रतिनिधीत्व मिळालच नाही. त्यामूळे समाजीक असमतोल निर्मान झाला, देशाचं वाटोळं झालं. ज्या देशात गृह कलह असतो त्याचा विकास होत नाही.  हे टाळन्यासाठी त्या देशातील सर्व नागरीकाना समान प्रतिनिधीत्व मिळणे अनिवार्य असते. पण या देशातील व्यवस्था समान प्रतिनिधीत्व नाकारणारी होती. त्यामूळे विकास थांबला होता, एक गट विकसीत होत चालला होता तर दुसरा दुबळा होत चालला होता. या दुबळ्या गटाला संविधानिक, प्रतिनिधीत्व देऊन मुख्य प्रवाहात आणणे क्रमप्राप्त होते व त्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून वंचिताना प्रतिनिधीत्व बहाल करण्यात आलं.
आजून सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यास आरक्षण आमचं वॉकर आहे. जसं लहान बाळाला चालायचा निट सराव होईस्तोवर आपण त्याला वॉकरची मदत घ्यायला लावतो. त्या वॉकरच्या मदतीने तो चालायला शिकतो व एकदा पायात बळ आलं की ते मूल वॉकर टाकून स्वबळावर धावतं. आमचं अगदी तसच आहे, आम्ही कित्येक कारणामूळे चालणेच विसरुन गेलो होतो किंवा आम्हाला चालता येते हेच माहीत नव्हत. पण आरक्षण नावाच्या वॉकरच्या मदतीने आम्हाला प्रगतीच्या दिशेनी काही पाऊलं टाकायची संधी मिळाली. कित्येकजण त्या वॉकरच्या सहाय्याने चालायला शिकलेत व आज सुसाट धावत आहेत. म्हणून हा आरक्षणाचा वॉकर आम्हाला हवाच आहे. कित्येकाना आजून त्याच्या मदतीने उभं राहायचं आहे, कित्येकाना चालायला शिकायचं आहे. गतीची कास धरायची आहे. नवा इतिहास घडवायचा आहे. अन याचि सुरुवात होते आरक्षणापासून म्हणून त्याला कुबड्या हे नाव शोभणार नाही, ते आहे वॉकर.
आज या वॉकरमुळे दलितांचा विकास होताना दिसतोय, दलित बांधवात शैक्षणीक जागृती होते आहे. तसेच वॉकरच्या पुढची पायरी म्हणजे स्वत:च्या पायावर उभं राहुन चालणे. अन हे आम्हाला निट जमू लागलय.  पण आमच्या गतीने ज्यांच्या हृदयात धडकी भरली त्यानी धसका घेतलाय. हिनकस शेरे मारणे सुरु केले, मनाचं खच्चीकरण करणे सुरु केले. आरक्षणाच्या नावानी नुसत्या बोंबा सुरु झाल्यात. पण  त्यानी या वॉकरवर उगीच टिका टिप्पणी न करता सहकार्य न जमल्यास निदान विरोध तरी करुन नये व सामाजीक समतोल राखण्यास मुख्य भूमिका बजावणा-या आरक्षणाचं समर्थन करावं. प्रतिनिधित्व नाकारल्यामूळे पंगू झालेली अवाढव्य लोकसंख्या जोवर या देशात असेल तोवर विकास अशक्यप्राय आहे. देशाचा विकास साधावयाचा असल्यास वंचित वर्गाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याना आरक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विनाअट झाले पाहिजे. असे न केल्यास वंचित वर्गातील असंतोष कधीतरी बंड करुन उठेल, ईथे यादवी उसळेल. हे सर्व टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वंचिताना प्रतिनिधीत्व देऊन मुख्य प्रवाहाचा भाग बनविणे व देशाचं हित साधणे. या देशाच्या सार्वभौमत्वासाठी, आर्थिक प्राबल्यासाठी ईथला समाज सशक्त करणे अत्यावश्यक आहे व त्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरक्षण, ते असालयाच पाहिजे.
आरक्षण जिंदाबाद.

रविवार, १२ सप्टेंबर, २०१०

महात्मा रावण


महात्मा रावण एक खुप चांगलं पुस्तक बाजारात आलय। आपण आता पर्यंत रामा बद्दल वाचताना रावण हा एक अतिदृष्ट राजा असल्याचं रंगवुन सांगण्यात आलं किंवा विष्णुच्या अवताराला प्रमोट करण्याच्या उद्देशाने रावणावर चिखलफेक केली गेली।

पण रावण एक महान राजा होता व त्यावर हिंदु लेखकानी सतत शिंतोळेच उडविले नाही तर स्त्री ला पळ्वुन नेणारा एक राक्षसांचा राजा म्हणुन अत्यंत हिन दर्जाच साहित्य हजारो वर्षे भारतात वाचलं व लिहलं गेलं।

पण आता मात्र वेळ आली आहे मुळ रावणाला जाणून घेण्याची। रामायणाच्या बाहेर पडुन रावणाची दुसरी बाजु समजावुन घेण्याची।

रावण बहुगूणी राजा होता। तो एक ज्ञानी व शुर विर मुलनिवासी होता। रावणाला वेदिक लोकानी नुसतं बदनाम करुन ठेवलय।
पण आज मुलनिवासी लोकं शिकुन पुढे येऊ लागले। ब-याच गोष्टी तर्कावर तपासुन बघु लागेले, व ज्या गोष्टी थोतांड आहेत असे वाटते त्यावर संशोधन करुन नविन, सुधारित व खरा ईतिहास दाखविणारं साहित्य आपल्या पुढं ठेऊ लागलेत।
याचाच परिणाम म्हणुन डॉ. वि. भि. कोलते यांचं हे पुस्तक आपल्यापुढे नविन ईतिहास म्हणन्यापेक्षा ईतिहासातिल डावललेली पानं आपल्या समोर सादर करित आहे।

गणेश उत्सव-एक कावा


दोन दिवस झाले पुण्यात गणेश उत्सवाची सगळीकडे धुमधाम चालु आहे. जिकडे तिकडे लोकं गणपतीच्या मुर्त्या घेऊन जाताना दिसतायेत. गल्लो-गल्लीतील मंडळानी सार्वजनिक गणपती स्थापन करुन ध्वनी प्रदुषण करायला सुरुवात केली आहे. ऊभा महाराष्ट्र हा सण साजरा करतोय. सर्व स्थरातून गणेशाला विद्येची व बुद्धीची देवता म्हणुन पुजण्याचा महाकाय असा कार्यक्रम चालू झाला. या कार्यक्रमामूळे होणारी लोकांची गैरसोय हा वेगळा विषय आहे. या उत्सवानी लोकांच्या नाकी नऊ आणून ठेवले तरी हिंदूवादी लोकाना याचं काही देणं घेणं नाही.
गणेश उत्सवाचा ईतिहास:
गणेश उत्सवाचा ईतिहास सगळ्य़ा जगाला माहित आहे. इंग्रजांच्या काळात देशवासी बांधवाना एकत्र आणण्यासाठी टिळकाना एक Plat Form ची गरज होती व त्यानी गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले. हा धार्मिक platform वापरुन इंग्रजांविरुद्ध चळवळीला बळ देता येईल असा त्यांचा उद्देश होता म्हणे. असा इतिहासातील पुराव्यांचा कल आहे.
आता माझं मत
जर तसे असते तर मग इंग्रज गेल्या गेल्या हा उत्सव बंद व्हायला पाहिजे होता.  पण तिळकानी तशी केलीच नाही. म्हणजे गणेश उस्तव म्हणजे टिळकानी आपल्या जात बांधवांसाठी तयार केलेली राजगार हमी योजना होती.  स्वातंत्र्याच्या नावाखाली बामणांसाठी रोजगार मिळवुन देण्याचा हा एक हेतु होता व तसेच भारतातिल बहुजनांच्या डोक्यात हा गणेश घुसवून धार्मिक गुलामगिरी लादण्याची ही एक प्रोसेस होती. जी आज खरच तसा निकाल दाखवित आहे. आज सगळा बहुजन समाज गणपतीच्या आहारी गेला आहे. दारु व अफुची नशा एकवेळ सोडविता येईल पण टिळकानी जी नशा बहुजनाना लावुन दिली ती सहजासहजी सोडविता येणे शक्य नाही.
बरं भारतिय संविधानात धार्मिक उत्स्वाना स्थान आहे. भारतात हिंदु व्यतिरिक्त पारसी, जैन, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या समाजातील लोकंपण सण साजरे करतात. वरिल सगळ्या धर्मात सुद्धा धार्मिक उत्सव आहेत. पण हा समाज धार्मिक उत्सव साजरा करताना इतर लोकाना त्रास होणार नाही याची काळजी घेतो. उत्सव साजरा करताना जबाबदारी न विसरता नियमाचे उल्लंघन न करता सगळे उत्सव शिस्तीत व लोकांच्या स्वातंत्र्याला गदा न पोहचविता पार पाडतो. भारतातीलच काय जगातील सर्व समाजात आपले सणं साजरा करताना इतराना त्रास होणार नाही याची दखल घेण्याची मानसिकतात, नितमत्ता दिसून येते. याच्या अगदी उलट हिंदू मात्र नितीमत्तेला धाब्यावर बसवून उस्तव साजरा करतो. यांचा उत्सव हा उद्दामपणाचा प्रतिबिंब असतो. गणेश चतुर्थीला गल्लो गल्ली स्टेज ठोकुन रस्ते अडविले जातात. येणा-या जाणा-यांची गैरसोय केली जाते. आणि १० दिवस नुसता धिंगाणा चालु असतो. या टागरपणामूळे कित्येक गणेशमंडळांविरुद्ध दर वर्षी गुन्हे दाखल होतात. हिंदू सणांच्या व्यतिरिक्त कुठल्याच सणाला असा गालबोट लगत नाही. सर्वात जास्त पोलिस केसेस नोंदविल्या जातात ते हिंदूच्या सणानाच, त्यातल्या त्यात या बाबतीत गणपतीचा मान सर्वात मोठा. गणपती उत्सवात सर्वात जास्त तक्रारी दाखल होतात व वेळ प्रसंगी पोलिसांचा सौम्य, तरी कधी तीव्र असा लाठीमारही होतो. एकंदरीत या सर्व घटनांचा आढावा घेतल्यास गणेश उत्सव कसा असंवेदनशील व उद्दामपनाचा प्रतिध्वनी आहे हे सिद्ध होते.
वरुन गणेश कोण तर बुद्धिचा देवता म्हणे।
पण या देवतेनी दलिताना शिक्षणाची सोय दिली का ? त्या साठी इंग्रजाना यावं लागलं. तोवर हा देवता कुठे होता ?
आणि इंग्रज आले नसते तर आजही शिक्षण हे फक्त बामणांसाठीच आरक्षीत असतं. हजारो वर्ष शिक्षण बामणांसाठी राखुन ठेवण्यात हातभार लावणारा हा गणेश किंवा दलिताना शिक्षणांपासुन वंचित ठेवणारा गणपती बामणेत्तरांचा देव आहे का? अजिबात नाही. तो देव आहे बामणांचा, कारण गणेशाच्या कृपेने फक्त बामणाना शिक्षणाची सोय व्हायची अन आजही होते. अशा गणेशाला टिळकानी अगदी शिताफिने बहुजानांच्या गळ्यात मारलं. भोळी जनता गणेशाला देव मानून पूजू लागली व आज ती प्रथा काटेकोर पणे पाळली जात आहे. हे खरच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

रामायण-मला पडलेले काही प्रश्न

रामायण हे भारतीयांच्या आवडीचा विषय आहे, किंबहुन मागचे दोन हजार वर्षात ईथल्या बुद्धीजिवी वर्गानी, साहित्यिकानी व साधू संतानी जमेल त्या मार्गाने रामायणाचा प्रचारच केला. त्यातुन अनेक गोष्टी समाज हिताच्या म्हणून रुजविण्याचा आजही सातत्याने प्रयत्न केला जातो. अगदी गुणी पुत्र, पतिव्रता बायको, चांगला भाऊ, जिव ओवळणारा सेवक असे अनेक पात्र रामायणात रंगविलेले असून ती पात्र आपल्या आयुष्यात निर्माण व्हावीत वा किमान त्याचा आदर्श जपावा असा एकुण प्रयत्न असतो. पण त्या पलिकडे जाऊन आपण रामायणाला तर्काच्या कसोटयात घालण्याचे प्रयत्न करु या...

१) रामायण भविष्यात घडणारे असते असे एक लिहलेले आहे. तर मग भविष्य काळातील घटानांमधे रामायणाचा कवी वाल्मिकी हजर राहु शकला नसता. किंवा स्वत:ला हजर दाखवु शकला नसता. वाल्मिकी हा गरोदर सितेचे संगोपन करतो व तिने जन्म दिलेल्या लव-कुशाचा सांभाळ करतो, त्याना विद्या शिकवितोहे सगळं आपण वाचलेलं आहे. मग प्रश्न हा पडतो की जर रामायण आधीच लिहले गेले तर अशा अनेक प्रसंगी भविष्य काळातिल रामायणात हा वाल्मिकी खुद्द कसा काय हजर आहे?


श्लोक
"कर्ता सर्वस्व लोकस्य श्रेष्ठो ज्ञानविदां विभु:।

उपेक्षसे देवगण सीता पतन्तीं हव्यवाहने।
कथं देवगण श्रेष्ठमात्मानं नाबुद्धयसे॥ (संदर्भ. वाल्मिकी रामायण ६-११६-६)

या श्लोकावरुन हे लक्षात येते कि हिंदुंची ईश्वराचे अवतार मानन्याची कल्पना बाळसे धरु लागली होती. पण या श्लोकात बुद्धाची उपमा मागाहुन येणा-या रामास देण्यात आली हे स्पष्ट होते.
म्हणजे रामायण बुद्धाच्या नंतर लिहण्यात आले.

२) अयोधे जवळ सरयु ऐवजी घोगरा नदी कशी: अयोद्धेच्या १.५ योजन (१९किमि ) अंतरावरुन सरयुनदी वाहत होती असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. या सरयुतच राम-लक्षमण आणि संपुर्ण अयोध्येने जलसमाधी घेतली होती असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. पण आता तेथे सरयु नदी आपले पात्र बदलुन १०० किमी वरुन वाहते. आणि अयोध्येत मात्र घोगरा नदी नांदताना दिसते, हा काय प्रकार आहे? म्हणजे जो कोणी लेखक या रामायणाची निर्मीती करतो त्यानी अयोध्या नगरी पाहिली नव्हती हेच सिद्ध होते.  सगळं लिखाण कुठेतरी दूर बसून ऐकीव माहितीवर केलं असं दिसते म्हणून  हा घोळ झालाय ही एक शक्यता. व दुसरी शक्यता अशी की  मिस्त्र मधे सिरादीया नावाची नदी तेंव्हाही होती व आजही आहे, जी रामेशु राजाच्या राजधानीजवळूनच वाहते. म्हणजे रामायण नावाचं महाकाव्य जिथे कुठे बसून लिहण्यात आलं तिथल्या माणसाना अयोध्येची नेमकी भौगोलीक माहिती नव्हती हेच सिद्ध होते.

आपण रामायण वाचुन तर्कावर विचार केल्यास ते एक थोतांड आहे हे सिद्धच होते।

३) हो रावण हा बौद्ध राजा होता व लंकेत रावण नावाचा राजा केंव्हा झालाच नाही.
उलट श्रिलंकेचा पहिला राजा विजयसिंह हा गुजरात मधिल लाट देशाचा राजा होता. त्याने बोटिमधे ७०० सैनिक घेतले व भरुच ते लंका असा प्रवास केला. तेथे त्यानी इ.स. पुर्व ४८३ ला आपले राज्य स्थापन केले.
विजयसिंह हा लंकेचा पहिला राजा.

आता आपन लंकेचे अंतर मोजु या.

श्लोक:

“इतो द्वीपे समुद्रस्य सम्पुर्णे शतयोजने।
तास्मिल्लक्ङा पुरी रम्या निर्मिता विशकर्मणा”
(संदर्भ: वाल्मिकी रामायण ४-५८-२०)
संम्पती माहिती देतो कि लंका चारही बाजुंनी समुद्रानी वेढलेली आहे. पुर्ण १०० योजन समुद्र पार करुन त्याच्या दक्षीन तटावर लंका आहे.
(१०० योजन म्हणजे १२८०कि.मी. अंतर.) आता भारत व श्रिलंकेचे अंतर किती आहे ? फक्त ५०कि. मी. आता बोला.

अलाहबाद ते चित्रकुटचे अंतर सडक मार्गाने ८० मैल (१२८कि.मी आहे)

आता थोडी मजा बघा.

१) चित्रकुट ते विराध वध स्थळ-०३.००कि.मी. (वा. रा. ३-४-२८)
२) विराध वध स्थळ ते शरभंग आश्रम-१९.००कि.मी(वा.रा. ३-४-२०,२१)
३) शरभंग-सुतीक्ष आश्रम ते अग्निजिव्हा आश्रम-५५कि.मी.(वा.रा. ३-११-३७)
४) अग्नीजिव्हा ते अगस्त्य आश्रम-१३ कि.मी. (वा.रा.३-११-४१)
५) अगस्त्य आश्रम ते पंचवटी आश्रम-२६ कि.मी. (वा.रा. ३-१३-१३)

चित्रकुट ते पंचवटी एकुण अंतर ११६ कि.मी.

पंचवटी (मैहर) ते लंका (अमरकंटक)
ऋष्यमुक पर्वताचे दक्षिणेला महासागर (पंपा सरोवर) होते. हे पंपा सरोवर म्हणजे दलदलिचा प्रदेश. हा फक्त १ योजनचा म्हणजे १२.८ कि.मी.चा होता. आणी त्याचे दक्षीणेला लगतच अमरकंटाकवरील लंका होती. म्हणजे पंपासरोवर धरुन लंकेचे अंतर २५कि.मी पेक्षा जास्त नाही. यावरुन अयोध्या ते लंकेपर्यंतच्या चारही भागांची बेरीज होईल १५० किं.मी.+१२८+११६+२५=४१९ किलोमिटर. वाल्मिकिच्या काल्पनिक रामायणाचा त्या काळातिल पायदळ रस्त्याने हे अंतर ४१९ कि.मी. च्या आसपास आहे.

वाल्मिकी रामायणातील योजन च्या मोजमापा प्रमाने अंतर मोजल्यास ते विंध्य पर्वताच्या उत्तर भागात किष्किंधा, ऋश्यमुकपर्वत, प्रसवण गिरी, पंपासरोवर, अगस्त्य आश्रम, पंचवटी(मैहर) आणि लंका ह्या ४१९ किमी च्या आवाक्यात आहेत. ती सर्व अयोध्या ते लंका ह्या ४१९ किमी च्या आवाक्यात दाखविली आहेत. पण काहीही औचित्य नसताना महाराष्ट्रातील नाशिक जवळ पंचवटी सांगितली जाते. ती अयोध्येपासुन सुमारे १२००किमी (अंदाजे) अंतरावर आहे. मग अयोध्येपासुन रामायणाप्रमाणे फक्त ४००किमी च्या जवळपास असलेली विंध्यच्या उत्तर भागातील पंचवटी, विधच्या दक्षिणेला अयोध्येपासुन १२०० किमी सांगण्याचे कारण वाल्मिकी रामायणात मात्र सापडु शकत नाही. आनि असे खोटे करण्याचे कारण काय ? याचे उत्तरही कुणी श्रद्धाळू देऊ शकेल याची खात्री देता येत नाही.

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

बोधिसत्व रावण

बोधिसत्व रावण
ग्रीसचा .. पुर्व व्या शतकात झालेला महाकविहोमरच्याइलियदओदिसीया जागतिक किर्तिच्या महाकाव्याप्रमाणे आपणही एक महाकाव्य लिहुन अमर व्हावे या महत्वाकांक्षेने प्रेरी होऊन वाल्मिकिने नारदाकडुन ऐकलेल्या रामेस्यु राजाच्या भुतकाळी कथेला मध्यवर्ती ठेवुन आपले रामायण प्रचंड कल्पनाशक्तिच्या जोरावर लिहले. प्रत्यक्ष रामेसु (राम) आणि हिटाईट(रावण) हे नायक खलनायक मुळात विदेशीच. विदेशी आर्यांचे आचरणही प्रामानीकपणा नीतिच्या विरुद्दच होते, जसे आपल्या रामायणात वाल्मीकीने रामाल चित्रित केल. अशा विदेशी राम या नायकाचा खलनायक दाखविला आपलाच देसी, सदगुणाचा शौर्याचा आणि विद्वत्तेचा पुतळा मुलनिवासी रावण. अत्यंत शिताफिने या रावणाला वाल्मिकीने कागदावर खलनायक म्हणुन उतरविले, सर्व शक्ती पणाला लावून एका असूर वीराला कल्पनाशक्तीचा बळी बनविला आणि आज सगळं जग त्याला खरोखरिचा खलनायक समजतो. असा हा रावण नक्की कोण होता व कसा होता हे आपण बघु या.
प्रत्यक्ष बुद्धाचा समकालीन बोधिसत्व रावणाच्या जीवनात सीताहरण, आणि रामाशी युद्ध अशा घट्नाच नाहीत. पण रामेसुच्या बायकोचे अपहरण करणारा हिटाईट, रावणच्या रुपाने खलनायक दाखविणे अपरिहार्य होते हा मुळात वेदिक लोकांचा कावा होता. मुलनिवासी लोकाना टाकुन बोलणे कमी लेखण्याच्या उद्देशाने रावणाला वाल्मिकीने तसे कागदावर उतरविले. किंवा रामाची ख्याती वाढवून दाखविण्यासाठी तोलामोलाचा महान असूर निवडणे अपरिहार्य होते. अन त्या वेळी रावणापेक्षा मोठी हस्ती कोणीच न सापडल्याने अन बौद्ध लोकांबद्दल मनात आकस असल्याने जाणिवपूर्वक रावणाची निवड करण्यात आली. असा हा तोलामोलाचा रावण होय. खरं तर रावण वाईट नव्हता. उलट रामाला मोठं करण्यासाठी रावणाची महती उपयोगी आणण्याची ही एक चाल होती. मुळात रावण अत्यंत शूर, वीर, धैर्यशाली, सुंदर होता याचे पुरावे रामायणात सापडतात. ते खालील काही श्लोकातून सिद्ध होते.

रावण सुंदर होता
आहे रुपमहो धैर्यमहो सत्त्वमहो द्युति:
अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणय्क्तता” (संदर्भ: वाल्मिकी रामायण -४९-१७)

आहाहा, या राक्षस राजाचे रुप किती अदभुत आहे. हा किती अनोखा धैर्यवान आहे. याच्यामधे कशी अनुपम शक्ती आहे. याचे तेज कसे आश्चर्य जनक आहे. याचे संपुर्ण राजोचित लक्षणांनी युक्त असणे किती आश्चर्याची गोष्ट आहे.

रावण स्त्रियाना पळवुन नेत नसे
बहिणीच्या अपमानाचा बद्ला घेण्यासाठी रावणाने सीतेचे अपहरण केले होते सन्मानाने आपल्या अशोक वाटिकेत ठेवले होते. ( नंतर तुलसी रामायणात आजुन काही श्लोक घुसडवुन सितेचा छळ झाल्याचे दाखविल्या गेले). हनुमानाने म्हटले होते किराजर्षी, ब्रहर्षी, दैत्य, गंधर्व आणि राक्षसांच्या कन्या काम वासनेने मोहित होऊन रावणाच्या मागे लागत. रावणाकडून शारिरीक सुख मिळविण्यासाठी स्त्रीया अक्षरश:  तुटून पळत. आपली शाररीक वासना मिटविन्यासाठी रावणापेक्षा सर्वोत्तम पुरूष नाही याची खात्री झाल्याने अनेक देवांच्या स्त्रीया रावणाच्या  बायका बनल्या होत्या. कामवासना मिटविण्यासाठी त्या कशा रावणावर मोहून गेल्या होत्या हे दाखविणारे श्लोक रामायणातच आहेत. खालील श्लोक बघा.
श्लोक:
राजर्षिविप्रदैत्यांना गन्धर्वाणांच योषित:
रक्षसां चाभवन कन्यास्तस्य कामवशंगता (संदर्भ: वा.रा.--६८)

यावरुन सिद्ध होते कि रावण स्त्री लंपट नसून देवांच्या स्त्रीयाच रावणाच्या (बोधिसत्वा राजाच्या) मागे लागत. पण वाल्मिकीने  जाणुनबुजुन महात्मा रावणाला बदनाम केले. वेदिक स्त्रीयांचा लंपट पणा वरील श्लोकातील प्रत्येक शब्दात दडलेला आहे.


लंकावतार सुत्तामधिल बोधिसत्व रावण
लंकावतार सुत्त(सुत्र) नामक महान ग्रंथ महायान बौद्ध धम्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असुन तो विज्ञानवादाची मान्यता होय. या महान ग्रंथाचे नाव लंकाधी रावणाच्या नावाने असणे, स्वत: रावणद्वारा भगवान बुद्धाशी प्रश्नोत्तर करण्यावरुन यात कोणतीही शंका उरत नाही कि, रावण अहिंसा धर्म परायण, दार्शनिक, विदवान आणि बोधिसत्व होता. रावण गौतम बुद्धाचा समकालीन राजा होता. त्याने स्वत: गौतम बुद्धाकडुन उपदेश ग्रहण केला होता.

लंकावतार सुत्त या ग्रंथाचे चिनी भाषेत तीन भाषांतरे झालेत. .सन. ४३३ मधेय गुणभद्राने, .सन ५१३ मध्ये बोधिरुचीने आणि .सन ७०० ते ७०४ मधे शिक्षानंदाने भाषांतर केले.

लंकावतार सुत्तचा अर्थ आहे. “लंकाधिश रावणाला बुद्धा उपदेश

हा विशाल ग्रंथ १० मोठ्या भागात विभक्त आहे. याला परिवर्त म्हणतात. यात १०८ प्रश्नाची चर्चा आहे.


बुद्धाची लंकेला भेट
महावंश या लंकेच्या इतिहासाच्या पद्यात्मक ग्रंथामध्ये तथागत गौतम बुद्धाने लंकेला वेळा भेट दिल्याची नोंद आहे. पहिली भेट बुद्धत्व प्राप्तिनंतर महिन्यानी, दुसरी वर्षानी आणि तिसरी वर्षानी. आणि हा काळ होता ..पुर्व ५२८ ते ५१९. ह्या भेटी महेंद्रनी श्रीलंकेला भेट देण्या आधी सुमारे २७२ वर्षा पुर्विच्या आहेत. म्हणुन बुद्धाच्या भेटि श्रीलंकेच्या नसुन भारतातच असलेल्या रावणाच्या लंकेच्या होत्या. कारण महेंद्रच्या अगोदर श्रीलंकेत बौद्ध धर्म गेलाच नव्हता. मग या भेटी विंध्य पर्वताच्या अमरकंटक (मलय) शिखरावर असलेल्या लंकेला होत्या. याचे उत्तरलंकावतार सुत्तया ग्रंथात आहे.


बुद्धाची लंकेच्या मलय पर्वतावर धम्मदेशना

लंकावतार सुत्तया ग्रंथात तथागत बुद्धाने रावणाच्या मलय प्र्वतावरील लंकेला दिलेल्या भेटीचे वर्णन पुढिल प्रमाणे आहे.

तथागत बुद्ध एक वेळा लंकेच्या दुर्गमधे थांबले, दुर्ग महासागरात मलय पर्वताच्या शिखरावर स्थित आहे. त्यावेळी तथागत (जे सागरनागराजच्या भवनात उपदेश देत होते) सात दिवसांच्या समाप्तीनंतर बाहेर आले. नागकन्यांद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यानी मलय पर्वतावर वसलेल्या लंकेला पाहुन स्मित केले आणि म्हणाले कि, मी ईथे रावणासाठी धम्म देशना करेन.

तथागताच्या आध्यात्मिक शक्तिने प्रेरित होऊन रावणाने म्हटले कि, “मी जाऊन तथागताना लंकेत येण्याची विनंती करेन”.

ते बुद्धाकडे जाऊन आपली ईच्छा व्यक्त करतात बुद्ध त्यांचे निमंत्रण स्विकारुन लंकेत प्रवचन देण्यास रावणासोबत निघुन जातात.

आणिलंकावतार सुत्तया ग्रंथाल बुद्धानी रावणाला दिलेला धम्म संदेशाचि संपुर्ण चर्चा आहे. १०८ गहन प्रश्नाची चर्चा करणारा रावण किती प्रचंड बुद्धिचा महामानव (बोधिसत्व) होता.

त्याची लंका म्हणजे श्रीलंका नव्हेच. ती लंका विंध्य प्रवताच्या अमरकंटक पहाडावर होती. एकंदरित वाल्मिकी रामायण हे रुपांतरीत केलेले काव्य असले तरी रावण हा ऐतिहासिक महापुरुष होता हे नाकारता येत नाही.