बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

रामायण-मला पडलेले काही प्रश्न

रामायण हे भारतीयांच्या आवडीचा विषय आहे, किंबहुन मागचे दोन हजार वर्षात ईथल्या बुद्धीजिवी वर्गानी, साहित्यिकानी व साधू संतानी जमेल त्या मार्गाने रामायणाचा प्रचारच केला. त्यातुन अनेक गोष्टी समाज हिताच्या म्हणून रुजविण्याचा आजही सातत्याने प्रयत्न केला जातो. अगदी गुणी पुत्र, पतिव्रता बायको, चांगला भाऊ, जिव ओवळणारा सेवक असे अनेक पात्र रामायणात रंगविलेले असून ती पात्र आपल्या आयुष्यात निर्माण व्हावीत वा किमान त्याचा आदर्श जपावा असा एकुण प्रयत्न असतो. पण त्या पलिकडे जाऊन आपण रामायणाला तर्काच्या कसोटयात घालण्याचे प्रयत्न करु या...

१) रामायण भविष्यात घडणारे असते असे एक लिहलेले आहे. तर मग भविष्य काळातील घटानांमधे रामायणाचा कवी वाल्मिकी हजर राहु शकला नसता. किंवा स्वत:ला हजर दाखवु शकला नसता. वाल्मिकी हा गरोदर सितेचे संगोपन करतो व तिने जन्म दिलेल्या लव-कुशाचा सांभाळ करतो, त्याना विद्या शिकवितोहे सगळं आपण वाचलेलं आहे. मग प्रश्न हा पडतो की जर रामायण आधीच लिहले गेले तर अशा अनेक प्रसंगी भविष्य काळातिल रामायणात हा वाल्मिकी खुद्द कसा काय हजर आहे?


श्लोक
"कर्ता सर्वस्व लोकस्य श्रेष्ठो ज्ञानविदां विभु:।

उपेक्षसे देवगण सीता पतन्तीं हव्यवाहने।
कथं देवगण श्रेष्ठमात्मानं नाबुद्धयसे॥ (संदर्भ. वाल्मिकी रामायण ६-११६-६)

या श्लोकावरुन हे लक्षात येते कि हिंदुंची ईश्वराचे अवतार मानन्याची कल्पना बाळसे धरु लागली होती. पण या श्लोकात बुद्धाची उपमा मागाहुन येणा-या रामास देण्यात आली हे स्पष्ट होते.
म्हणजे रामायण बुद्धाच्या नंतर लिहण्यात आले.

२) अयोधे जवळ सरयु ऐवजी घोगरा नदी कशी: अयोद्धेच्या १.५ योजन (१९किमि ) अंतरावरुन सरयुनदी वाहत होती असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. या सरयुतच राम-लक्षमण आणि संपुर्ण अयोध्येने जलसमाधी घेतली होती असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. पण आता तेथे सरयु नदी आपले पात्र बदलुन १०० किमी वरुन वाहते. आणि अयोध्येत मात्र घोगरा नदी नांदताना दिसते, हा काय प्रकार आहे? म्हणजे जो कोणी लेखक या रामायणाची निर्मीती करतो त्यानी अयोध्या नगरी पाहिली नव्हती हेच सिद्ध होते.  सगळं लिखाण कुठेतरी दूर बसून ऐकीव माहितीवर केलं असं दिसते म्हणून  हा घोळ झालाय ही एक शक्यता. व दुसरी शक्यता अशी की  मिस्त्र मधे सिरादीया नावाची नदी तेंव्हाही होती व आजही आहे, जी रामेशु राजाच्या राजधानीजवळूनच वाहते. म्हणजे रामायण नावाचं महाकाव्य जिथे कुठे बसून लिहण्यात आलं तिथल्या माणसाना अयोध्येची नेमकी भौगोलीक माहिती नव्हती हेच सिद्ध होते.

आपण रामायण वाचुन तर्कावर विचार केल्यास ते एक थोतांड आहे हे सिद्धच होते।

३) हो रावण हा बौद्ध राजा होता व लंकेत रावण नावाचा राजा केंव्हा झालाच नाही.
उलट श्रिलंकेचा पहिला राजा विजयसिंह हा गुजरात मधिल लाट देशाचा राजा होता. त्याने बोटिमधे ७०० सैनिक घेतले व भरुच ते लंका असा प्रवास केला. तेथे त्यानी इ.स. पुर्व ४८३ ला आपले राज्य स्थापन केले.
विजयसिंह हा लंकेचा पहिला राजा.

आता आपन लंकेचे अंतर मोजु या.

श्लोक:

“इतो द्वीपे समुद्रस्य सम्पुर्णे शतयोजने।
तास्मिल्लक्ङा पुरी रम्या निर्मिता विशकर्मणा”
(संदर्भ: वाल्मिकी रामायण ४-५८-२०)
संम्पती माहिती देतो कि लंका चारही बाजुंनी समुद्रानी वेढलेली आहे. पुर्ण १०० योजन समुद्र पार करुन त्याच्या दक्षीन तटावर लंका आहे.
(१०० योजन म्हणजे १२८०कि.मी. अंतर.) आता भारत व श्रिलंकेचे अंतर किती आहे ? फक्त ५०कि. मी. आता बोला.

अलाहबाद ते चित्रकुटचे अंतर सडक मार्गाने ८० मैल (१२८कि.मी आहे)

आता थोडी मजा बघा.

१) चित्रकुट ते विराध वध स्थळ-०३.००कि.मी. (वा. रा. ३-४-२८)
२) विराध वध स्थळ ते शरभंग आश्रम-१९.००कि.मी(वा.रा. ३-४-२०,२१)
३) शरभंग-सुतीक्ष आश्रम ते अग्निजिव्हा आश्रम-५५कि.मी.(वा.रा. ३-११-३७)
४) अग्नीजिव्हा ते अगस्त्य आश्रम-१३ कि.मी. (वा.रा.३-११-४१)
५) अगस्त्य आश्रम ते पंचवटी आश्रम-२६ कि.मी. (वा.रा. ३-१३-१३)

चित्रकुट ते पंचवटी एकुण अंतर ११६ कि.मी.

पंचवटी (मैहर) ते लंका (अमरकंटक)
ऋष्यमुक पर्वताचे दक्षिणेला महासागर (पंपा सरोवर) होते. हे पंपा सरोवर म्हणजे दलदलिचा प्रदेश. हा फक्त १ योजनचा म्हणजे १२.८ कि.मी.चा होता. आणी त्याचे दक्षीणेला लगतच अमरकंटाकवरील लंका होती. म्हणजे पंपासरोवर धरुन लंकेचे अंतर २५कि.मी पेक्षा जास्त नाही. यावरुन अयोध्या ते लंकेपर्यंतच्या चारही भागांची बेरीज होईल १५० किं.मी.+१२८+११६+२५=४१९ किलोमिटर. वाल्मिकिच्या काल्पनिक रामायणाचा त्या काळातिल पायदळ रस्त्याने हे अंतर ४१९ कि.मी. च्या आसपास आहे.

वाल्मिकी रामायणातील योजन च्या मोजमापा प्रमाने अंतर मोजल्यास ते विंध्य पर्वताच्या उत्तर भागात किष्किंधा, ऋश्यमुकपर्वत, प्रसवण गिरी, पंपासरोवर, अगस्त्य आश्रम, पंचवटी(मैहर) आणि लंका ह्या ४१९ किमी च्या आवाक्यात आहेत. ती सर्व अयोध्या ते लंका ह्या ४१९ किमी च्या आवाक्यात दाखविली आहेत. पण काहीही औचित्य नसताना महाराष्ट्रातील नाशिक जवळ पंचवटी सांगितली जाते. ती अयोध्येपासुन सुमारे १२००किमी (अंदाजे) अंतरावर आहे. मग अयोध्येपासुन रामायणाप्रमाणे फक्त ४००किमी च्या जवळपास असलेली विंध्यच्या उत्तर भागातील पंचवटी, विधच्या दक्षिणेला अयोध्येपासुन १२०० किमी सांगण्याचे कारण वाल्मिकी रामायणात मात्र सापडु शकत नाही. आनि असे खोटे करण्याचे कारण काय ? याचे उत्तरही कुणी श्रद्धाळू देऊ शकेल याची खात्री देता येत नाही.

३ टिप्पण्या:

 1. १) (संदर्भ. वाल्मिकी रामायण ६-११६-६) :- श्री रामटेके , तुमच्या सारख्या माणसान चक्क चक्क खोटे संदर्भ आणि खोटे पुरावे दयावेत ? न तथास्मि महाबाहो यथा त्वमवगच्छसि |
  प्रत्ययं गच्छ मे स्वेन चारित्रेणैव ते शपे || ६-११६-६
  तुम्हीच अस करू लागला तर आपल्यात आणि ब्रिगेड मध्ये काय फरक हो ?
  २) पण या श्लोकात बुद्धाची उपमा मागाहुन येणा-या रामास देण्यात आली हे स्पष्ट होते.:- बुद्ध शब्दाचे १७ अर्थ , ते सुद्धा बुद्धाच काही खर नाव नाही . आणि बुद्धाच नाव म्हणून संस्कृत शब्द आमच्या लोकांनी वापरायला कि तुम्हाला गौतम बुद्ध दिसणार . जरा थोड संस्कृत शिका नाव आहे का विशेषण ते तरी वाचा कि आधी .
  ३) राम-लक्षमण आणि संपुर्ण अयोध्येने जलसमाधी घेतली होती. असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. :- परत खोट ? अहो महाशय तुमच्या माहिती साठी ,वाल्मिकी रामायण श्री राम आयोध्येत परत आल्यावर संपत . त्यांच्या जलसमाधीचा आणि वाल्मिकी रामायण
  ाचा काय संबंध ?
  ४) हो रावण हा बौद्ध राजा होता व लंकेत रावण नावाचा राजा केंव्हा झालाच नाही. :- मी या विषयावर कधीही चर्चेला तयार आहे , कृपया पुरावे आपण स्पष्ट दिलेले नाहीत ते द्या (वरील प्रमाणे चुकीचे देवू नका)
  ५) चित्रकुट ते विराध वध स्थळ-०३.००कि.मी. (वा. रा. ३-४-२८) :- तम् मुक्त कण्ठम् उत्क्षिप्य शङ्कु कर्णम् महास्वनम् |
  विराधम् प्राक्षिपत् श्वभ्रे नदन्तम् भैरव स्वनम् || ३-४-२८ या पूर्ण श्लोकात अंतराचा उल्लेख तरी आहे का महाशय ?
  ६) तुमचा मूळ भर तुम्ही योजन परिमाणाच्या आधारावर रचलेला आहे पण कदाचित आपल्या माहितीतून "निसटलेली" गोष्ट मलाच लक्षात आणून द्यावी लागेल . अनेक काळात योजन परिमाण बदलले गेले होते . आपल्या कड वेगवेगळ्या काळात वेगवेळी योजन परिमाण होती हि सुद्धा सिद्ध गोष्ट आहे आर्याभट्ट आणि परमेश्वरा नम्बुदरी यातील योजन फरक स्पष्ट आहे मग रामायण काळात ते अंतर १२.८ किमी होते हे खात्रीन आपण कस सांगू शकता ?

  उत्तर द्याहटवा
 2. आर्यभट्ट का जन्म कलयुग में पांचवी सदी में हुआ था फिर
  उसने 0 खोजा
  .
  तो द्वापर में 100 कौरव और त्रेता में रावण के 10 सर की
  गिनती किसने की?~😂😃😜

  उत्तर द्याहटवा
 3. आस्था तर्काच्या कसोट्यावर जोखायची नसते ।
  तर्कवितर्क करून दावा जिंकता येतो , आस्था नाहि ,आदर्शचा अवमान करू नका ,

  उत्तर द्याहटवा