शनिवार, ६ जुलै, २०१३

धन्यवाद आबा पाटीलगडचिरोली जिल्ह्यातील मुलांसाठी पुणे म्हणजे स्वप्नातलं शहर. आमच्या रानातल्या लोकाना पुण्याच्या शिक्षणाचं कौतुक अन कुतुहल तर आहेच पण ईथली संस्कृती  अन जिवनमान याचंही प्रचंड आकर्षण आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्या रानात येऊन बसलेल्या आमटे नावाच्या डॉक्टर दांपत्याकडॆ येणारे पुणेकर. नुसतं येत नाहीत तर कित्तेक पुणेकर तिथे कायमचे वास्तव्यास आहेत. मग या सगळ्याना पाहून आमच्या रानतल्याना पुण्याची मोहनी पडली नसती तर नवलं. मी स्वत: लहान असताना या सगळ्याना पाहून सारखं वाटायचं आपल्याला कधी पुण्यात जाता येईल का? आजच्या अनेक मुलानाही असंच वाटतं.  कित्येक मुलाचं स्वप्न असतं पुण्यात येऊन शिकण्याचं. पण त्या रानातून बाहेर पडून पुण्या पर्यंत येण्याचं सगळ्यांच्या नशीबी(?) नसतं. कित्येक मुलांची ही स्वप्नं आहे तिथेच विरुन जातात. कित्येकाना तर पुण्याचं स्वप्नही पडत नसावं. असं हे स्वप्नाच्याही पलिकडचं शहर. पण आबा पाटलाणी मात्र किमान काही पोरांसाठी तरी ते सत्यात आणून दाखवलं.
आबा पाटील गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यानी ईथल्या ५४ मुलाना पुण्यात शिकण्यासाठी धाडायचे ठरविले. मुलांची निवड करण्यासाठी परिक्षा घेण्यात आल्या व पुर्ण जिल्ह्यातुन ५४ मुला मुलींची निवड करुन पुण्यात पाठविण्यात आले. आता ही मुलं पुण्यात शिकत असून त्यांचे पालक आबा बाटलांचे आभार मानत आहेत. त्याच बरोबर गडचिरोली सारख्या दूर्गम भागातील मुलाना पुण्या सारख्या शहरात शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे ही मुलही खूष आहेत. इथून शिकून ही मुलं जेंव्हा गावाकडॆ जातील तेंव्हा नव्या पिढीला इकडच्या शिक्षणाचा वा एकंदरीत जिवनमानाचा अनुभव सांगतील. त्यातुन नव्या पिढीचा तरुण पुण्याकडे(किंवा शहरात) येण्याचा विचार करेल. रानातल्या वनवासातून व वनवासातून हळू हळू मुक्त होत हा वनवासी तरूण शहरात येऊन रोजगाराची संधी शोधू लागेल. त्यासाठी ही आधीची पिढी मार्गदर्शक ठरावी नि यांना आदर्श मानत पुढची पिढी शिक्षणाची व शहराची वाट धरावी  या हेतूने आबा पाटलानी हा उपक्रम राबविला.
आबा पाटलांच्या या उदात्त  कार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा