गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

त्रिपिटकाचं शुद्धिकरण

भगवान बुद्धांचा बुद्ध धम्म या मातितील व मुळ भारतिय धम्म आहे. जो पुर्णत: सम्यकतेचं समर्थन करणारं आणि निरिश्वरवादी आहे. पुढे बाबासाहेबानी सुद्धा हा धम्म दलितांच्या उद्धाराचा एकमवे धार्मिक पर्याय म्हणुन निवडला आणि आज भारताच्या कानाकोप-यात अगदी खेडयापाडयात पोहचलाय. खरं तर दोन हजार वर्षापुर्वी सुद्धा हा धर्म भारताच्या कानाकोप-यात पोहचलेला होताच पण नंतर काही कारणास्तव हा धर्म भारतातुन हद्दपार झाला. बाबासाहेबानी या धम्माला भारतात पुनरुज्जीवित करुन आमच्या पुढे एक जगण्याची आदर्श पद्धती उपलब्ध करुन दिली त्या बद्दल त्यांचे आभार. पण या धम्माच मूळ धर्मग्रंथ त्रिपिटक वाचल्यावर काही प्रश्न उपस्थीत होतात. ते असे... 
बुद्ध धम्म पुर्णत: निरिश्वरवादी आहे का?  
:- याचं उत्तर मिळतं नाही(त्रिपिटकाच्या आधारे). 
या धम्मात पुनरजन्माला मान्यता आहे का? 
:- होय... त्रिपिटका प्रमाणे आहे. 
त्रिपिटकात अनेक ठिकानी तसे लिहलेले आहे. आणि त्रिपिटक हा बुद्ध धर्माचा मुख्य ग्रंथ असल्यामुळे या गोष्टिला खुप महत्व प्राप्त होतं आणि ईथुनच सगळी गोची होतात. पुनर्जन्मामुळे ईथे अनेक प्रश्न निर्माण होतात. पुनर्जन्माला मान्यता देताना बुद्धानी कुठेच हे स्पष्ट केलेलं नाही की त्याची प्रोसेस काय आहे? किंवा पुनर्जन्म होतो म्हणजे नेमकं कोणाचं होतं? आत्म्याचं की मनाचं की आजुन कोणाचं?  हा सर्व घोळ होतो त्रिपिटक वाचल्यावर लक्षात येतो. मनाचं व बुद्धिचं समाधान होत नाही. हा सगळा घोळ पाहता एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे त्रिपिटकात भरपूर विपर्यास झालेला आहे. त्यामुळे बौद्ध धम्माचं वाचन केल्यास त्रिपिटकात प्रचंड विसंगती सापडते नि बौद्धिक समाधान होत नाही. बुद्ध धर्मात भगवंतानी आत्मा साफ नकारला आहे. म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचं होतं नाही हे स्पष्ट आहे. पण पुनर्जन्म मात्र होतो, मग तो होतो कुणाचा हे सांगितले नाही. संपुर्ण त्रिपिटकात कुठेच  या संबंधित खुलासा केलेला नाही. मी या विषयावर ब-याच धम्म अभ्यासकाना विचारणा केली. माझ्या वाचण्यातुन तो उतारा सुटलेला असु शकतो हे मी गृहीत धरुन ब-याच धम्मचा-यांजवळ या बद्दल चौकशी केल्यावर वेगवेगळी उत्तरं मिळाली. काहिनी मिलिंद प्रश्न वाचण्याचा सल्ला दिला. काहीनी पुनर्जन्म म्हणजे अगदी हिंदु धर्माच्या पुनर्जन्मासारखं नसुन ते बुद्धानी मनाच्य अवस्थांबद्दल सांगितलय असं म्हटलं. पण मनाच्या अवस्था आणि पुनर्जन्म या दोन गोष्टी एकच नसुन भिन्न असल्याचं त्रिपिटकात स्पष्ट लिहलं आहे. मग मी मिलिंद प्रश्न वाचुन काढला. तिथे तर सुरुवातिलाच दिलं आहे की, राजा मिलंद व नागसेन हे आधल्या जन्मापासुनचे परस्पर संबंधातुन या जन्मी आलेत.  आधल्या जन्माचा या जन्मात कसा संबंध आहे याची ईत्थ्यंभुत माहीती अगदी सुरुवातीलाच दिली आहे. म्हणजे पुनर्जन्मानी मिलिंद प्रश्नात अगदी सुरुवातीलाच घोळ घातला. परत मला दुसरे सदर्भ शोधावे लागले.
बुद्ध धर्मात देवांचं अस्तित्व (त्रिपिटका प्रमाणे) सुद्धा आहे, आकाशातुन फुलांचा वर्षाव करणारे देव काय, तर बुद्धाना तपस्याच्या ठिकाणी येऊन नमस्कार करणारे देव काय. अशा वेगवेगळ्या देवांचं अस्तित्वसुद्धा बुद्ध धर्मातील धर्मग्रंथात मिळतो.
आता काही संदर्भ पाहुया.
संदर्भ: त्रिपिटक या मुख्य बुद्ध ग्रंथातिल सुत्तपिटक मधिल काही उदाहरण खाली देतोय
१) अंगुत्तर निकाय, एक्क-निपात: एकदत्त वग्ग
याच्यात भगवान बुद्ध म्हणतात. भद्राकापिलायनी (एक बुद्ध भिक्षुणी) ही पुनर्जन्माची अनुस्मृती करण्यामधे अग्र आहे.

२) खुद्दकनिकाय, मेत्तसुत्त मधे भगवान बुद्ध म्हणतात. मी एक वेळा महाब्रह्मा आणी ३६ वेळा देवराज इंद्रच्या रुपात शक्र बनलो आहे. शेकडोवेळा चक्रवती बनलो आहे.
३) खुद्दकनिकाय, जरा वग्ग: यात बुद्ध म्हणतात. मी अनेक जन्म घेतले आहेत.
४) पठमपीठ विमानवत्थु, इत्थिविमान: मधे मोग्गलायन देविला प्रश्न विचारतो तेंव्हा पुनरजन्माचं फळ म्हणुन आज तेजोनीधी देवी झाल्याचा दाखला आहे.
५) गौतम बुद्ध जेंव्हा शेवटच्या घटीका मोजत असतात तेंव्हा ते स्वत: म्हणतात की मी एके जन्मी या लहानशा नगराचा राजा होतो म्हणुन मला आज ईथे देह ठेवायचे आहे.
६)मुचलिन्द वग्ग: नागाचा चमत्कार, बुद्धत्व प्राप्त होते तेंव्हा ब्रम्हाची भेट.
बुद्ध धर्म असा धर्म आहे जो पुनरजन्म मानतो पण आत्मा मानत नाही. पुनर्जन्माची प्रोसेस मात्र उलगडता ना आल्याने ब-याच गोष्टी तर्कावर सुटत नाहित.  देव मात्र बुद्ध धर्मात आहेत, चमत्कार आहेत, पाप पुण्य सुद्धा आहे.  कर्माचं फळ पुनर्जन्मावर प्रभाव टाकतो हे ही आहे. एकंदरित हिंदु धर्मातील यज्ञ सोडल्यास सगळच बुद्ध धर्मात आहे. हा झाला त्रिपिटका प्रमाणे उपलब्ध बौद्ध धम्म.
-----------------------------------------------

वरील बाबी बौद्ध बांधवाना बुचकळ्यात टाकणा-या आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. बाबासाहेबानी वरील सर्व प्रश्न निकाली काढले आहेत. त्रिपिटक वाचल्यावर मनाची त्रेधा उडाणार व आज ना उद्या आंबेडकरी समाज सवाल खडा करणार हे जाणून बाबासाहेबानी आधीच सोय केली आहे. वरील सर्व प्रश्नाना उत्तर देणारं, अत्यंत महत्वाचं ग्रंथ बाबासाहेबानी लिहून काढला आहे. त्रिपिटकातील विपर्यस्त सर्व लिखान काढून फेकण्याचं पवित्र काम बाबासाहेबानी केलं. बौद्ध धम्माच्या पतनानंतर घुसडलेले सर्व लिखान बाबासाहेबानी बाद ठरविलं अन त्रिपिटकाला चाळणी लावून एक नवीन ग्रंथ लिहून काढला त्या ग्रंथाचं नाव आहे The Bhuddha & His Dhamma. या ग्रंथात बाबासाहेबानी प्रत्येक गोष्टीला बुद्धीच्या कसोटीवर तपासून अगदी शुद्ध रुपात मांडलं आहे.
या ग्रंथात पान नं. २९० (लाईन नं. ७) मध्ये बाबासाहेब आत्म्याचं पुनर्जन्म नाकारतात व घटक पदार्थ म्हणजेच अ) पृथ्वी आ) आव इ) तेज ई) वायू यांचं विघटन व पुनर्बांधनीच विश्लेषण देऊन पुनर्जन्माचा प्रश्न निकाली काढतात.
या ग्रंथात पान नं. २१५ (लाईन नं. ५२) मधे बाबसाहेब मोक्ष नकारतात. या पानावर बाबासाहेबानी मोक्ष नाकारताना निब्बाण सांगितला. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन होय असे बाबासाहेबानी विशद केले.  पान नं. २३५ (लाईन नं. ३३) मधे आत्मा व ईश्वर दोघानाही नाकारले. पान नं. २४१ मधे सर्व पानभर विश्लेषण दिले आहे की काल्पनिक अनुमानाना धम्मात स्थान नाही
अशा प्रकारे बाबासाहेब त्रिपिटकाचं शुद्धिकरण करतात व नवीन ग्रंथ लिहून काढतात. त्या ग्रंथाचं नाव आहे The Buddha & His Dhamma. ज्याना कुणाला त्रिपटक वाचून अनेक प्रश्न पडले असतील. बुद्धाच्या मूळ सिद्धांताशी मेळ खाणारे तत्व वा परस्पर विरोधी वाक्यं दिसली असतील त्यानी बाबासाहेबांचं वरील ग्रंथ नक्की वाचावं.

जयभीम.
***६ टिप्पण्या:

 1. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे - साने गुरुजी

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. तुम्ही लिहिलेल्या मुद्द्यांचे सम्यकतेने खंडन करतो..


  भगवान बुद्धांचा बुद्ध धम्म या मातितील व मुळ भारतिय धम्म आहे. जो पुर्णत: सम्यकतेचं समर्थन करणारं आणि निरिश्वरवादी आहे.

  ...................................................


  • धम्माच मूळ धर्मग्रंथ त्रिपिटक वाचल्यावर काही प्रश्न उपस्थीत होतात. सगळ्य़ात पहिला प्रश्न असा की, बुद्ध धम्म पुर्णत: निरिश्वरवादी आहे का? याचं उत्तर मिळतं नाही(त्रिपिटकाच्या आधारे).


  ►►►अगदी चुक,,,, भगवान बुद्धांचा धम्म हा निरिश्वरवादी आहे,, आणि याचे उत्तर त्रिपिटकातच सापडते,,


  सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवा ती!

  प्राणीमात्रांनी, मनुष्यांनी व देवांनी सुद्धा तथागतास भगवान म्हटले आहे. अशा शुद्ध-संयमी भगवान बुद्धाने पट्ठान मध्ये केला आहे. ती अत्यंत सखोलनयाने परिपुर्ण देशना आहे. अभिद्धम्मपिटकातील सातवा ग्रंथ पट्ठान ह्या ग्रंथाबद्दल बुद्धघोष म्हणतात..

  "हीच ती महत्त्वपुर्ण बुद्ध तत्वज्ञानाची खरी कसोटी आहे ज्यामुळे नित्यावाद, नित्य, ध्रुव पदार्थाचे ग्वेषक ह्या नित्यवादाचा साथ सोडतात. कारण भगवान बुद्धाने आपल्या धम्मात ईश्वरासाठी कोणतेच आणि कुठलेच स्थान ठेवले नाही, आणि न आत्म्यासाठी, तरी तो पुनर्जन्म आणि कुशल, अकुशल कर्माच्या विपाकाला मानतो, ह्या मान्यतेच्या मुळात बुद्ध धम्माचा 'प्रतित्य समुत्पाद' धम्माचा मुख्य सिद्धांत आहे."

  तथागताला ह्या सत्याचे ज्ञान सम्यक संबोधीप्राप्तीच्या वेळीच झाले होते. ह्याचे प्रमाण त्रिपिटकात बरेच आहे.


  कोणता आहे तो नियम, ज्याचे ज्ञान भगवंतांनी सम्यक संबोधी प्राप्तीच्या वेळी जाणुन घेतले?

  प्रतित्य समुत्पाद हा तो सखोल आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे एकमेव सुत्र अहे. हा कोरा दार्शनिक सिद्धांत नाही. ही सम्यक सम्बुद्धाचे प्रत्यक्ष अनुभुती आहे. जर हा कोरा दार्शनिक सिद्धांतच असता तर तथागताला उपदेश करण्याची आवश्यका नव्हती. जर तसे असते तर तथागत सुद्धा अरस्तु, शेखर, नागार्जुन ह्यांच्याच समकोटीचे दार्शनिक असते. ते करूणेचे करूणाकार झाले नसते. त्यांच्या रूपाने मानवतेला आधार मिळाला आहे. खरोखरच तथागतांच्या करूणेचे ज्ञानमय परिणाम प्रतित्य समुत्पादच आहे.....

  होय खरोखरच आत्मा, ईश्वर व नित्य ह्या मनु सिद्धांताला शाश्वत करणार्या बुद्धाच्या वैज्ञानिक रहस्यपुर्ण सिद्धांताचा संग्रह म्हणजे अभिधम्मपिटक.....

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. • दुसरा प्रश्न असा की, या धम्मात पुनरजन्माला मान्यता आहे का? होय... त्रिपिटका प्रमाणे आहे.


  ►►►हो आहे,,, बौद्ध धम्मात पुनर्जन्माला स्थान आहे, दि बुद्धा अॅण्ड हिज धम्म मध्ये पण बाबासाहेबांनी तसे नमुद केले आहे,,,


  बौद्ध धम्म आत्मा मानत नाही पण पुनर्जन्म मानतो? कशाचा? बौद्ध धम्म दोन प्रकारचे पुनर्जन्म मानतो,,

  1. मनाचं पुनर्जन्म (जो व्यक्ती जिवंत असतानाच याच जीवनात असंख्य वेळा त्याच्या कर्मानुसार होत असतो.)


  आपल्या मनाचं पुनर्जन्म सहा प्रकारच्या लोकात होतं , 1. मनुष्य लोक, 2. पशू लोक, 3. नरक लोक, 4. यक्ष लोक 5. देवलोक , आणि 6. असुर लोक  आणि ह्या सहा प्रकारच्या लोकांचे अस्तित्व इतर धर्मियांच्या संकल्पनेप्रमाणे पृथ्वीबाहेरचा स्वर्ग किंवा पृथ्वीबाहेरचा नरक ज्यामध्ये मनुष्य मेल्यानंतर जातो...यापेक्षा खुप वेगळे आहे..


  असुर व देवलोकांची विभागणी तीन प्रकारच्या लोकांमध्ये होते... कामलोक, रुप लोक व अरुप लोक जे 31 लोकांत विभागले गेले आहेत

  काम लोक

  1. नरक
  2. प्राणीयोनी
  3. प्रेतलोक (भुते)
  4. असुर


  सुगती

  5. मनुष्य लोक
  6. चतुमहाराजिक लोक
  7. तवतिंस लोक (33 देव)
  8. यम देवलोक
  9. तुषित देवलोक
  10. निम्मनारती देवलोक
  11. परनिम्मित वसवंती देवलोक


  रुप लोक

  12. ब्रह्मपरिसज्ज देवलोक
  13. ब्रह्मपुरोहीत देवलोक (ब्रह्मांचा मंत्री)
  14. महाब्रह्मा
  15. परित्तभ देवलोक
  16. अप्पमानभ देवलोक
  17. अभस्सार देवलोक
  18. परित्तसुभ देवलोक
  19. अप्पमानसुभ देवलोक
  20. सुभकिन्न देवलोक
  21. वेहप्पाल देवलोक
  22. आसनसत्ता
  23. अविह देवलोक
  24. अतप्प देवलोक
  25. सुदस्स देवलोक
  26. सुदस्सी देवलोक
  27. अकनित्थ देवलोक


  अरुप लोक

  28. आकाशनांच्यतनुपाग देवलोक
  29. विनानांच्यतनुपाग देवलोक
  30. अकिंचन्नयतनुपाग देवलोक
  31. नेवाशनांस्यनातनुपाग देवलोक


  (टीप : यामध्ये काही मिस्टेक असु शकतात)


  हि सर्व देवलोक आणि नरक लोकांचे प्रकार आहेत,, यामध्ये इंद्र आणि ब्रह्मलोक पण आहेत, पण फक्त शब्दसाम्यामुळे याचा संबंध हिंदुंच्या स्वर्ग-नरकाशी संबंध जोडणे खुप चुकीचे आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. ► दुसर्या प्रकारचे पुनर्जन्म म्हणजे मनुष्याच्या शरीराचे,, यामध्ये कोणी आत्मा एक शरीर सोडुन दुसरीकडे जात नाही तर मनुष्याच्या शरीरातील 1. पृथ्वी, 2. आप, 3. तेज, 4. वायु या घटकांचे होते...

  ........................................................


  • बौद्ध धम्माचं वाचन केल्यास त्रिपिटक बौद्धिक समाधान करण्यात असमर्थ आहे.  ►►► त्रिपिटक आपलं बौद्धीक समाधान करण्यास समर्थ आहे, फक्त त्यातील गोष्टींचा अर्थ हिंदुंसारखा घेवु नये,,, जमल्यास अठ्ठकथा वाचाव्यात...
  अरहंत, बुद्ध ह्या एकतीस प्रकारच्या असुर, ब्रह्मा देवलोक यांच्यापेक्षा खुप वरच्या पातळीचे आहेत.... म्हणुनच भगवान बुद्धांना देव व मनुष्यांचा शास्ता असे म्हणतात.  • ५) गौतम बुद्ध जेंव्हा शेवटच्या घटीका मोजत असतात तेंव्हा ते स्वत: म्हणतात की मी एके जन्मी या लहानशा नगराचा राजा होतो म्हणुन मला आज ईथे देह ठेवायचे आहे.

  ►►► तुम्ही नक्की कोणता त्रिपिटक वाचला आहे,? महपरिनिब्बाण सुत्तामध्ये,,

  आनंद म्हणाला "भगवन्, या लहानशा शहरांत आपले परिनिर्वाण होणे मला इष्ट वाटत नाही. चंपा, राजगृह, श्रावस्ति, साकेत, कौशांबी, आणि वाराणसी, या मोठ्या शहरांपैकीं एकाद्या शहरी तथागताचे परिनिर्वाण व्हावे, अशी माझी इच्छा आहे.''

  बुद्ध म्हणाला "आनंद, हे लहान शहर आहे, असे समजू नको. सध्या जरी याची लहान शहरात गणना होते, तरी पूर्वी एका काळी सुदर्शन नावाच्या प्रख्यात राजाची ही राजधानी होती. त्या वेळीं याला कुशावती असे म्हणत, व देवांच्या राजधानींची तिला उपमा देण्यात येत असे.  • ६)मुचलिन्द वग्ग: नागाचा चमत्कार, बुद्धत्व प्राप्त होते तेंव्हा ब्रम्हाची भेट.


  ►►►सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्ती झाल्यावर भेटायला येणारा ब्रह्मा हा जो वैदिक धर्मानुसार सृष्टीनिर्मात होय? तसे काही नाही, स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा उल्लेख येथे केला आहे, याचा अर्थ काय? बुद्धत्व प्राप्ती नंतर भेटायला येणारा ब्रह्मा (ब्रह्म सहंपती) म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्या तथागतांच्या मनात निर्माण झालेल्या भावना होत...

  ************************************************************************

  बाकी प्रश्नांची उत्तरे मिळालीच असणार अशी आशा आहे....... जय भीम

  मला येथे भेटा :

  1. buddhistsofindia.blogspot.in
  2. buddhistsofindia@gmail.com
  3. http://Facebook.com/thebuddhistindia

  ****************************************************************

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. ...चार आर्य सत्य यांचा बुद्धांच्या मुळ शिकवणुकीत त्यांचा अंतर्भाव होता काय ? हे सूत्र बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात घालते , जीवन हे जर दुःख्ख आहे , मृत्यु हे जर दुःख्ख आहे , अणि पुनर्जन्म हे जर दुःख्ख आहे तर सर्व काहि संपलेच म्हणायचे या जगात सुख प्राप्तिसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही...

  ---- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  (सन्दर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म ,परिचय / प्रस्तावना)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. ...चार आर्य सत्य यांचा बुद्धांच्या मुळ शिकवणुकीत त्यांचा अंतर्भाव होता काय ? हे सूत्र बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात घालते , जीवन हे जर दुःख्ख आहे , मृत्यु हे जर दुःख्ख आहे , अणि पुनर्जन्म हे जर दुःख्ख आहे तर सर्व काहि संपलेच म्हणायचे या जगात सुख प्राप्तिसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही...

  ---- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  (सन्दर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म ,परिचय / प्रस्तावना)

  प्रत्युत्तर द्याहटवा