सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)

महाड सत्याग्रहानंतर देशातील सगळे संवर्ण चवताळुन उठले. जिकडे तिकडे आंबेडकरांच्या नावानी संवर्णांची आरडा ओरड चालु झाली. पण काही संवर्ण मात्र बाबासाहेबांच्या या कार्याने सुखावले होते. अशा संवर्णानी मुंबईतील दामोदर सभागृहात सभा भरविली. ब्राह्मण-ब्राह्मणेतर पाक्षिकाचे संपादक श्री. देवराव नाईक अन श्री. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या भाषणातुन संवर्णांचा चांगलाच समाचार घेतला. सनातन्यानी अशीच मुजोरी चालु ठेवल्यास एक दिवस हा देश व धर्म शेजारच्या अरबी समुद्रात उडी मारुन आत्महत्या करेल अशी टिका झाली.
पण आजुनही महाराना ठाकरेंवर शंकाच होती. बामण बोलतात एक अन करतात एक. ठाकरेना जरी मनातुन अस्पृश्यांविषयी कळकळ होती पण यांनी मात्र ठाकरेंची व नाईकांची सत्व परिक्षा घेण्याचे ठरविले. तुम्ही आमच्या बद्द्ल ईतकी आत्मियता दाखविता खरे, मग आमच्या हातचे पाणि सुध्दा प्यावे. प्रबोधनकार मुखवटे वाले व्यक्ती नव्हते. तत्वाला पटणारं बोलणारे अन तसे वागणारे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यानी महारांच्या हातुन पाणि पिऊन आपण परिवर्तनवादी आहोत हे सिद्ध केले. या नंतर मात्र प्रबोधनकारांकडे केंव्हाच शंकेच्या नजरेनी पाहिले गेले नाही. पुढे कित्येक चळवळीत ते सदैव अस्पृश्यांच्या बाजुने लढताना दिसले.
महाड सत्याग्रहात जे काही झाले त्याची चौकशी करण्यासाथी एक समिती नेमण्याचे ठरले अन श्रीपाद महादेव माटे या अस्पृश्य पुढा-याने शेटजी भटजींची बाजु घेतली. खरंतर हे अस्पृश्य चळवळीचे एक खंदे कार्यकर्ते. पण ही चुक त्याना चांगलीच भोवली. एका चुकिमुळे आयुष्यभरातील सेवा मातीत मिसळली अन ते कायमचे अस्पृश्य चळवळीच्या नजरेतुन उतरले. कर्मवीर शिंद्यानीही अशिच एक चुक नागपुरच्या परिषदेत केली अन त्यांचंही असच झालं. महार हा चळवळी बद्दल अत्यंत जागरुक व संवेदन शिल आहे. इतर समाजाच्या तुलनेत हा समाज फार दयाळू व तेवढाच कणखर सुद्धा आहे. याची ही दुसरी प्रचिती होती.
सावरकर नावाच्या रत्नागिरीतील एका हिंदु पुढा-याने मात्र महाड सत्याग्रहाला आपला पाठिंबा असल्याचे श्रद्धानंद जाहिर केले. मलातरी ती हिंदु पुढा-याने अस्पृश्याच्या बाजुने फोडलेली डरकाळीच वाटते. आपल्याच धर्माच्या माणसाच्या स्पर्शाने पाणि बाटते  अन गायीचे मुत्र शिंपडल्याने ते पाणि शुद्ध होतेच कसे? हा कसला शास्त्र आहे? असे शास्त्र, धर्मशास्त्र मला मान्य नाही. आपल्याच धर्मातिल बांधवाना अशी हीन वागणुक दिल्या जाते पण गोमास खाणा-या यवनाना पाणि घेण्याची परवागनी आहे हा नुसता दळभद्रिपणा आहे.  सनातन्यानी आधुनिक विचारांचा अवलंब करुन जातिभेद मिटविण्यास सज्ज व्हावे. आंबेडकरांचा लढा न्यायाचा लढा असुन  माझा या लढ्यास पुर्ण पाठिंबा आहे असे घोषीत केले." पण शेवटी आंबेडकरानी धर्मांतराच्या फंदात पडु नये असा एक बामणी टोमणा मारलाच. म्हणुन मला सावरकरांची निती केंव्हाच पटली नाही. तरी त्यांची वेळीवेळी आंबेडकराना आपला पाठिंबा दर्शविण्याची जिगरबाजी, सनातन्याना खडसावण्याची रोखठोक पद्धत, अन जाहिरपणे अस्पृश्यांच्या बाजुने उभे ठाकण्याच्या धाडसीपणाचं कौतुक करावं तेवढं कमीच. कदाचित स्थानबद्दता नसती तरी ते बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लाऊन रणांगणात उतरलेही असते.
सावरकरानी डरकाळी फोडली एवढा एक अपवाद वगळता हिंदु सनातनवाद्यानी सर्वत्र देशभरातील वृत्तपत्रातुन बाबासाहेबांवर टिकेची झोड उठविली. प्रत्येक पेपरात रोज बाबासाहेबांविरुधा आगा ओकली जात होती. हजारो वर्षाच्या मनुवादी संस्काराना मुठमाती देणारा किंबहुना मनात खोलवर रुजलेल्या अनिष्ठ व संवर्णहितांच्या प्रथाना उपटुन फेकणा-या महाबलीचा पहिला वार इतका अचुक व प्रभावी बसला की सगळ्या सनातन्याना दिवसा तारे दिसु लागले. एकंदरीत जिकडे तिकडे बाबासाहेबांवर टिका होत असतानाच अस्पृश्यांमधे मात्र बाबासाहेबांची लोकप्रियता वा-याच्या वेगाने वाढत होती. पण होणा-या टिकेला प्रतिउत्तर देणेही अपरिहार्य होते.
३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत भारत नावाचा नवा पाक्षिक काढण्यात आला. काय समर्पक नाव उचललं बाबासाहेबानी बघा. बहिष्कृ, कोण तर आम्ही. अन कुठे तर भारतात. दोन वेगळे शब्द दोघांचे अर्थही वेगळी. या आधिचा पाक्षिक मूकनायक. शब्दांची अशी अचुक निवड करायचे कि सगळा सार त्यातुन ओझरत असे. भारतातील बहिष्कृतांची व्यथा सांगणारा हा जोडीदार आता बाबासाहेबांच्या साथीला उभा झाला होता. याच्या माध्यमातुन आता भारत देश गदागदा हलवुन सोडायचा होता. सर्वत्र होणा-या टिकेचा परामर्श घेणारा पहिला लेख झडकला.
जो पर्यंत आम्ही हिंदु आहोत तो पर्यंत देवळात जाणे हा आमचा हक्क आहे. देवाचे दर्शन घेणे आमचा हक्क आहे. खरंतर देवळात गेल्यावाचुन आमचं काहिही अडत नाही. आम्ही स्वत:चा बळावर आयुष्याला कलाटणी देऊ शकतो पण आमचा अधिकार बजाण्यात मागे राहणे आम्हाला मान्य नाही. काही झाले तरी तो आम्ही बजाविणारच. ईथे प्रश्न देवाच्या श्रद्धेचा नाहिच मुळी. प्रश्न आहे हक्काचा. श्रद्धा आहे की नाही ते कोणालाच तपासुन पाहता येणार नाही. तसेच देव सुद्धा आहे की नाही हे ही सिद्ध करता येणार नाही. पण देवाच्या नावाने जो मंदीर बांधण्यात येतो तिथे जाण्याचा आमचा अधिकार, हक्क कुणीच हिरावु शकणार नाही. फार लवकर सामुहिकरित्या देवळात धडकण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. तळे झाले, देवळे राहिले. अन आतातरी सनातन्यानी आपला हेका सोडुन दयावा अन अस्पृश्याना त्यांचा अधिकार बहाल करावा. वेळ आलीच तर अशा धर्मावर पाणिही सोडायला आम्ही माग पुढे पाहणार नाही. पण जोवर आम्ही हिंदु म्हणुन आहोत तोवर आमचा अधिकार बजाविण्यासाठी आम्ही सर्व आघाड्यांव संपुर्ण ताकत लावुन लढु.
अशा प्रकारचा सडेतोड अग्रलेख झडकताच सारे सनातनी परत एकदा खळबळुन जागे झाले. बाबासाहेबांवर तुटुप पडले. देशातिल सारे वृत्तपत्र आग ओकत होते. संवर्णानी सगळी शक्ती एकवटुन बाबासाहेबांच्या विरोधात दंड थोपटले.
बाबासाहेब नुसतं संवर्णांचा समाचार घेत असे नाही. आपल्या अस्पृश्यांमधे स्वाभिमान जागे करण्यासाठी ते सतत लिखान करित.
बळी बक-याचा दिल्या जातो, सिंहाचा नाही. तुम्ही बक-यासारखे वागता म्हणुन हे सनातनी तुमचा जागो जागी बळी देत आहेत. अरे तुमची राश कोंबड्या, बक-याची किंवा गायीची नाही. तुम्ही सगळे सिंह राशिचे वीर आहात. खर्डाची लढाई गाजविणारा सिदनाक महार हा तुमचाच पुर्वज आहे. रायगडचा किल्ला लढविणारा रायनाक महार हा सुद्धा तुमचाच पुर्वज आहे. अशा निधड्या छातीच्या शुर महारांची जात तुमची. तुम्ही लढवय्या जातिचे पराक्रमी पुरुष आहात. हि गुलामी झटकुन टाका. सगळे बंध तोडुन टाका अन स्वाभिमानाने जगायला शिका. मेलेल्या गायीचे मांस खाणे बंद करा. ईज्जतीने जगायला शिका. अशा प्रकारे स्वाभिमान चेतविणारे लिखान सुरु झाले अन आता बाबासाहेबांच्या जोडीला आलेल्या या नव्या सोबत्याच्या (बहिष्कृत भारत) सहय्याने चळवळ अत्यंत वेगाने पसरु लागली.

आंबेडकर चळवळ आणि संभ्रम.

मुळात प्रश्न हा आहे की, आंबेडकर चळवळ म्हणजे नेमकं काय?
लोकाना हा प्रश्न विचारल्यावर त्यांची पार धांदल उड्ते. ही चळवळ म्हणजे नेमकं काय हे कुणालाही सोप्या भाषेत सांगता येत नाही. याचं मुख्य कारण आहे आजचा मिडीया. कारण या मिडीयानी तसं चित्र उभं करुन आंबेडकरी लोकांची दिशाभुल केली आहे. आंबेडकर चळवळीतील राजकीय आघाडीलाच आंबेडकर चळवळ म्हणुन नेहमी संबोधल्या जाते. उरलेल्या दोन सामाजीक व धार्मिक आघाडीचा साधा उल्लेखही होत नाही. त्यामुळे कुणालाही आंबेडकर चळवळ म्हटलं की एकच नाव दिसतं, बास... ते म्हणजे रामदास आठवले. अन फार फार तर प्रकाश आंबेडकर अन गवई. यांच्यापलिकडे कुणी जातच नाही. म्हणुन लोकाना असे वाटु लागले की आंबेडकर चळवळ म्हणजे आजुन काही नसुन आठवले, आंबेडकर किंवा गवई. अशा प्रकारे दोन चार फुटक्या राजकिय नेत्यांच्या दावणीला आंबेडकर चळवळ बांधण्य़ाचं फसवं चित्र उभ करणा-या मिडीयाचा तिव्र निषेध.
जेंव्हा आठवले निवड्नुकीत पड्तात तेंव्हा ही अशी अर्धवट टाळक्याची मिडीया आंबेडकर चळवळीची कशी यातायात झाली किंवा उभ्या महाराष्ट्रात आंबेडकर चळवळीची दानदान उडाली म्हणुन मोठठाले पानं भरुन बातमी छापते. यामुळे आंबेडकरी जनतेला खरच आपली दानादान होत आहे की काय, असे वाटु लागते. पण याच धरतीवर सेनेचा किंवा कॉंग्रेसचा एखादा नेता हारल्यास हिंदुंची किंवा संवर्णांची दानादान झाली अशी बातमी येत नाही. तिथे बातमी येते की अमुक तमुक नावाचा/पक्षाचा माणुस हारलाय. पण RPI किंवा तत्सम नेत्यांबद्दल असं होतं नाही. या नेत्याची हार म्हणजे अख्ख्या आंबेडकरी जनतेची हार असाच सुर काढला जातो जो मुळात चुकीचा आहे.
आंबेडकरी जनतेचा राजकीय सहभाग सर्व पक्षात आहे.
आंबेडकरी जनता म्हणजे आर.पी.आय. अन आर. पी. आय. म्हणजे आंबेडकरी जनता असे आभासी समिकरण तयार झाले आहे. जेंव्हा की आंबेडकरी माणुस या व्यतिरीक्त इतरही पक्षात सक्रिय आहे. नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे अशी वेगवेगळी आंबेडकरी माणसं ईतर पक्षात असताना उगीच आम्हाला आर. पी. आय. च्या मोजपट्टीनी मोजले जाते.  बळजबरीने सरसकट सगळ्याना आठवलेच्या दावणीला बांधले जाते. खरे तर आमचे अस्तित्व आर. पी. आय. च्या कक्षा ओलांडुन इतरही पक्षात स्थिरावलेले आहे, सिद्ध झालेले आहे. म्हणुन आर. पी. आय. ची हार म्हणजे आंबेडकरींची हार असे नाहिच मुळी. पण मिडिया मात्र सर्रास पणे तसा अर्थ लावुन आमच्या बांधवांचं उगीच खच्चिकरण करीत असते.  
आंबेडकर चळवळ म्हणजे आठवले का? आंबेडकर चळवळ म्हणजे ढसाळ का? आंबेडकर चळवळ म्हणजे RPI का? उत्तर नक्कीच नाही असेच असणार. कारण आंबेडकर चळवळ ही फार व्यापक चळवळ आहे. आंबेडकर चळवळीचे तिन प्रमुख आघाड्या आहेत.
१) राजकिय़ आघाडी २) सामाजीक आघाडी ३) धार्मिक आघाडी.

१)  राजकिय़ आघाडी : आंबेडकर चळवळीची हि एक आघाडी आहे. या आघाडीद्वारे आंबेडाकरी जनता राजकीय क्षेत्रात उतरविली जाते (ईतरही पक्षात उतरते हे ही तेवढेच खरे)  गावो गावी आंबेडकरी चळवळीचे राजकीय आघाडिवर काम करणारे कार्यकर्ते पसरलेले असुन दिवस रात्र या विविध आंबेडकरी पक्षाना यश मिळवुन देण्याच्या हेतुने गाव पातळी पासुन ते अगदी शहरा पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता झट्ताना दिसतो. पण या आघाडीत येणारे बहुतेक कार्यकर्ते हे समाजाच्या तळमळीपेक्षा स्वत:चं उखळ पांढर करण्यासाठी आलेले असल्यामुळे आज आंबेड्कर चळवळीची राजकीय आघाडी फार बदनाम झालेली आहे. सगळ्या बाबतीत या आघाडीचे तिन तेरा वाजले आहे. पण मिडीयाने एकमेव याच आघाडीला उचलुन धरल्यामुळे सगळ्या चळवळीची वाताहत झाल्याचा संदेश जातो.
२)     सामाजीक आघाडी: या आघाडी द्वारे समाजातील लोकांचे जिवनमान कसे उंचविता येईल, मुख्यत: यावर भर दिला जातो. समाजाचे जिवनमान उंचविण्याची प्रक्रिया सुरु होते विद्यादानापासुन. म्हणुन या आघाडीने विविध ठिकाणी वसतीगृहे बांधुन समाजातील गरिब मुलांची शिक्षणाची सोय केली आहे. शिक्षणामुळे आयुष्यात मुलभुत फरक पडतो अन पुढीळ सगळ्या समस्या सोडविताना फार अडचणी येत नाहीत. विविध सामाजीक संस्थां मार्फत अगदी पहिली पासुन ते पदवी पर्यंत शिक्षणाची सोय केली जात आहे. याही पुढे जाऊन MPSC UPSC च्या परिक्षेसाठी मोफत वर्ग चालविले जात आहेत. अशा प्रकारे समाजाच्या विचारसरणीत मुलभुत बदल घडविणारा महत्वाचा घटक म्हणजेच शिक्षण  प्रबोधनात्म काम या सामाजीक आघाडीने चालविले आहे. बॅंक, पतसस्था, को-ओपरेटीव गृहसंस्था अशी विविध कामे या आघाडी द्वारे चालविली जातात.
आज आमच्या समाजातील लोकं प्रत्येक ठिकाणी पोहचलेली आहेत. हा सामाजीक बदलाचाच तर प्रतिबिंब आहे. सरकारी नोक-यामधे साध्या चपराश्या पासुन ते अगदी सनदी अधिका-या पर्यंतच्या जागा पटकावुन बसणारा हा बदल कशामुळे झाला? ही सामाजीक आघाडीच्या कार्याची पावती आहे. पुण्याच्या दापोळीच्या प्रशिक्षण केंद्रात दर वर्षी सनदी अधिकारी येऊन फुकटात मार्गदर्शन करतात. आपल्या समाजातिल मुलानी प्रशासकीय सेवेत यावे या साठी ब-याच ठिकाणी अभ्यासक्रम चालु करण्यात आले. आज खाजगी क्षेत्रातही आम्ही उतरलो आहे. उत्पादन कंपन्यांपासुन ते आयटी पर्यंत सगळीकडे आमची लोकं आपली चुणुक दाखवित आहेत. हे सगळं सामाजीक आघाडीमुळे शक्य झालं आहे.

मला कुणीतरी म्ह्टलं होतं की हे सगळ आरक्षणामुळे होत आहे.
त्यावर माझं उत्तर असं आहे की, आरक्षणाचा सर्वोत्तम उपयोग करण्यासाठी जी जागरुकता लागते ती या आघाडीमुळे मिळते. अन्यथा तुम्ही जर जागरुकच नसाल तर मिळालेल्या आरक्षणाला मातीत मिसळण्यास वेळ लागत नाही. आज इतर लोकानाही आरक्शण आहे पण आम्ही तुलनेने जास्त जागरुक असल्यामुळे त्या आरक्षणाचं चिज करुन दाखवित आहोत. पण याच्या अगदी उलट ज्या समाजाची सामाजीक आघाडी सक्रिय नाही त्याना आरक्षन मिळुन सुद्धा फारशी प्रगती करता आली नाही. आरक्षण हे डोंगराचा कडा चढण्यासाठी लागणा-या दोरी सारखं आहे. त्या दोरीनी कडा चढता येतो. पण चढण्यासाठी जे बळ लागते ते तुम्हाला मिळालेल्या खुराखातुन तयार होते. अगदी याच धर्तिवर मिळालेल्या आरक्षणाच्या दोरीचा सर्वोत्तम वापर तोच करेल ज्याचा सामाजीक पातळीवर जास्तीत जास्त जागरुकीकरण झालं आहे. अन आज माझा समाज जे काही पादाक्रांत करत आहे त्याला आरक्षणाएवढीच जागरुकतेची जोड आहे. अन हि जोड लाभते सामाजीक आघाडीच्या सक्रियतेतुन.

३)     धार्मिक आघाडी: आंबेडकर चळवळीचा मुख्य कणा खरंतर धार्मिक आघाडीच असायला हवी होती. पण ईथे तसं होताना दिसत नाही. बुद्ध धर्म हा जगातिल सर्वोत्तम धर्म आहे अन या धर्माच्या तत्वानुसार वागल्यास माणसाचा सर्वांगिन विकास तर होणारच पण माणुस सगळ्या भौतिक दु:खापासुन मुक्त होऊन एक दर्जेदार जीवन जगु शकतो. आंबेडकर चळवळीची धार्मिक आघाडी जोमाने काम करत आहे. दर वर्षे शेकडो नविन बुद्ध विहारांची भर पडत आहे. आज काल लोकं अभिमानाने मी बौद्ध आहे असे सांगु लागले. या जणगणनेत तर कित्येकानी आपली जात लिहलीच नाही. धर्म बौद्ध लिहुन पुढचे रकाने खाली सोडले ही आहे धार्मिक प्रगती. पण आजुन या आघाडीने बराच पल्ला गाठायचा आहे. पण या आघाडीच्या कामाची दखल करणारं एकही लेख मिडिया छापत नाही. म्हणुन एकंदरीत होणारी प्रगती लोकाना दिसत नाही. मिडीया ईथे दुटप्पीपणा करते. म्हणुन लोकांमधे सुद्धा संभ्रम आहे, उदासिनता आहे. आज जरी मिडीयानी या आघाडीवर फोकस नाही केला तरी हळु हळु का होईना धार्मिक विचार, बौद्ध विचार प्रत्येक आंबेडकरी माणसाच्या घरी पोहचत आहेत. त्याचा परिणाम लवकरच केंद्र सरकार  जणगणना पुर्ण झाल्यावर घोषीत करेलच.
माणसाला जगण्यासाठी धर्म हा लागतोच लागतो असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं. म्हणुन त्यानी आम्हाला एक चांगला धर्म देण्याचा निश्चय केला व एक सर्वोत्तम धर्माची दिक्शा दिली. आज बुद्ध धर्माच्या छत्रछायेत वाढणारा बौद्ध समाज, फार सामंजस्य आहे, संयमी आहे, कष्टाळू आहे. ईमान आणि प्रामाणिकपणा हा तर आमचा स्थायी गुण अन या गुणामुळे दिवसेंदिवस आमची प्रगतीच होत आहे. याचाच परिणाम आज प्रत्येक ठिकाणी बौद्ध बांधव नोकरी व व्यवसायात दिसतो. या पलिकडे जाऊन दर रविवारी जागो जागो बुद्ध वंदना घेऊन धम्माचेही पालन करीत आहे. खरं तर आमचे आई वडील हे हिंदु म्हणुनच जगले. आमच्यावर संमिश्र संस्कार झाले. आम्ही अर्धे हिंदु व अर्धे बौद्ध अशा अवस्थेत वाढलो. नंतर बौद्ध बनलो, बनलो कसले मी व माझ्या वयाच्या सगळ्यानी स्वत:ला जाणिवपुर्वक बौद्ध करुन घेतले. म्हणुन माझ्या पिढी पर्यंततरी हिंदु धर्मानी आमच्या पिच्छा केलाच. पण खरी बुद्ध धर्माच्या छायेत वाढ्णारी पिढी आहे आमची मुलं. त्यांची जडण घडण ही शुद्ध बुद्ध धर्मात होत आहे. अन बुद्धाच्या तत्वातील ताकत परिणाम दाखवुनच दम घेईल. म्हणुन हि पिढी आजुन जास्त परिणामकारक निकाल देईल यावर दुमत नाही.

हि आहे वरिल तिन आघाड्यांची वास्तविकता.
 -------------------------------------------------------

पण यातिल वरिल दोन आघाड्यांच्या कार्याला मिडीयानी नेहमीच बगल दिली. आज आपण सगळे फक्त एकाच आघाडीला फार फोकस करतो आहेत.  इतर दोन आघाड्या दिवस रात्र आंबेडकर चळवळ चालवित आहेत त्यांच सबलीकरण होणे जास्त गरजेचं अन परिणामकारकही राहील. त्या दोन आघाड्या जर सशक्त झाल्या तर राजकीय आघाडीवर वचक बसविणे सोपे जाईल. नाहीतर हि राजकीय आघाडी अशीच सैरावैरा भटकेल. आज भाजपवर जसा RSS चा जसा वचक आहे. तसा राजकीय नेत्यांवर वचक ठेवायचा म्हटल्यास ईतर दोन आघाड्या बळकट होणे अपरिहार्य आहे. म्हणुन सगळ्य़ानी उठ सुठ राजकारणावर बोलण्यापेक्षा या दोन आघाड्यांवर लक्श केंद्रीत केल्यास तिसरी आघाडी मुठीत असेल.
मुळात आपलं समिकरणच आजवर चुकल बरं का! कारण कुठलीही राजकीय आघाडी ही त्याच्या सामाजीक आघाडीच्या बलस्थानावर उभी असते. जेवढी सामाजीक आघाडी बलवान तेवढं राजकीय अस्तित्व स्थीर. आज आपलं समीकरण उलट दिशेन मांडल्या जातं. आधि राजकी बळ प्राप्त झाल्यास सामाजीक बळ मिळेल असा समज झाला अन उठला सुठला कोणीही राजकारणावर बोलु लागला. पण वास्तविकता तशी नाहीये. ज्या समाजाचा पाया खंबिर त्या समाजाचं राजकीय अस्तित्व मोठं, टिकाऊन अन स्थीर. आज आपल्याला जर राजकीय वैभव प्राप्त करुन घ्यावयाचा असल्यास आधि सामाजीक आघाडीवर लढणे गरजेचं आहे. समाजामधे मुलभुत फरक घडवुन आणावा लागले. लोकांमधे वैचारिक क्रांती घडवुन आणने गरजेचं आहे. हे सगळं घडायला अविश्रांत कष्ट घ्यावे लागतील. एकदा  समाजाचं सबलीकरण करणारी कणखर यंत्रणा उभी झाली की मग त्या यंत्रणेतुन राजकीय दबदबा तयार होतो. हे सगळ करण्यासाठी संयम, दिर्गोद्योग व चिकाटी लागते. ती आधी तपासुन पहावी लागेल.
बाबासाहेबानी धर्मांतर घडवुन आणण्यामागे त्यांचा मुख्य हेतु असा असावा की, बुद्ध धर्म हा तर्कावर तपासुन बुद्धीला पटणा-या गोष्टिंचा स्विकार करणारा धर्म होय. यामुळे लोकांमधे जागृती निर्माण होईल. प्रत्येक गोष्टीला बुद्धीच्या कसोटीवर तपासण्याची सवय जडल्यामुळे इतर गोष्टींचा शिरकाव होणार नाही. त्यामुळे आपल्या हिताचं व अहिताचं काय आहे हे लोकाना अचुकपणे पकडता येईल असा हा एकंदरीत ढोबळ विचार असावा. आपल्या दैनंदीन जिवनात बुद्धाच्या तत्वाचा अवलंब केल्यास ही तत्वे माणसाचा विकास केल्या शिवाय थांबणार नाही हे बाबासाहेबानी अचुक हेरलं होतं. ज्या ज्या लोकानी बुद्धाच्या तत्वाचा काटेकोरपणे पालन केलं ते आज खुप पुढे निघुन गेलेत. पण ज्यानी बाहेर बौद्ध असल्याचा सोंग केला पण मुळात हिंदुत्वाला चिकटुनच राहिले ते जरी आर्थिक प्राबल्य मिळवुन बसलेही असतील पण मुळात नितिमत्तेला सोडुन जगल्यामुळे  ना त्यांचा हवा तसा विकास होत आहे ना धार्मिक परिवर्तन होत आहे. उलट या लोकांमुळे धर्माची प्रतीमा मलिन होते आहे.  किंवा बुद्ध तत्वज्ञानाचे फायदे ज्या प्रमाणात मिळायला हवे होते, जो निकाल बाबासाहेबाना अपेक्षित होता तो न येण्याचं मुख्य कारण तत्वांशी केलेला खेळखंडोबा होय. आजही वेळ गेली नाही. आजही बुद्धाच्या तत्वाचे निट पालने केल्यास आपला उद्धार झाल्यावाचुन राहणार नाही.
एक चांगला समाज हा राजकारण्यांद्वारे केंव्हाच घडविला जात नाही. कारण राजकारणात नजिकच्या काळातिल फायद्यांचा विचार केला जातो. जसे की पुढच्या निवडनुकीत आपल्याला यश मिळवायचे असल्यास कोणत्या वर्गाला जवळ करावे? काय काय नविन आमिष दाखविता येईल?  अशा प्रकारचे अगदीच पाच वर्षाच्या आतिल गोश्टिना डोळ्यापुढे ठेऊन राजकीय डावपेच मांडले जातात. २०११ मधे एखादा राजकीय पक्ष २०२५ ची स्थीती डोळ्यापुढे ठेऊन कार्यक्रम आखत नाही. तो तयार समाजाच्या आजच्या समजुतींवर आपली पोळी कशी भाजता येईल हे पाहतो. अन सामाजीक संस्था मात्र आज पासुन २५ वर्षानी या समाजाची एकंदरीत विचार सरनी अशी अशी असावी असे ध्येय ठेवून काम करते. सामाजीक पातळीवर बदल घडवायचे म्ह्टल्यास किमान एका पिढीचा विचार करुन धोरणं ठरविली जातात. जेंव्हा की राजकारणात एक टर्म जी ५ वर्षाची असते त्या नुसार हे गणित मांडले जाते. आज आमच्या बाबतीत हिच गल्लत झाली आहे. कोणिही उठतो व राजकीय मार्गाने काही करता येईल का याची चाचपणी करतो. मला तर यातही शंका येते. पैसे व नाव कमविण्याचा सोपा मार्ग म्हणुन राजकारणात शिरकाव होतो माझं असं स्पष्ट मत आहे. ज्याना खरच या शोषीत बांधवांचा विकास करायचा आहे त्यानी सामाजीक यंत्रणेच्या माध्यमातुन विकासाची कामं हातात घ्यावी. आता सामाजीक विकास म्हटल्यावर काही लोकं उगीच सरकारच्या अनुदानावर गळा काढतात. पण अनुदाना शिवायही सामाजीक विकास साधता येतो. पण त्या साठी लागते खरी तळमळ, आतुन आलेली समाज सेवेची कळ. पण लोभामुळे आलेली कळ मधेच विरते.

माझ्या समाजाचं आजचं चित्र हे केवळ राजकिय पट्टीनेच मोजुन ठरविल्या जात आहे. आर. पी. आय.लाच आमचा चेहरा समजल्या जात आहे. समाजाचा उद्धार करण्यासाठी लोकाना राजकारण हा एकमेव मार्गच दिसतो आहे. पण राजकीय अस्तित्वाला स्थैर्य देणारा बहुमोल घटक हा नेहमी समाज असतो  व हा समाज मजबुत असावा हे सुत्र सगळे विसरतात. त्याचा फक्त वापर करण्यापुर्तीच आजवर विचार झालेला दिसतो. त्याच्यात मुलभुत बदल घडवुन आणण्यात किमान राजकीय पुढा-याना तरी रस नाही. उपलब्ध सामाजीक स्थीतीचा महत्त्म फायदा मिळविण्याचे खेळ खेळले जातात. किंवा आयत्या समाजावर डल्ला मारणे चालु आहे. त्यासाठी फार कष्ट पडत नाही. ज्या समाजाला मोहात पाडायचे आहे त्याचा आजचा थोडासा अभ्यास करुन लगेच आपल्याकडे ओढता येते. याच धर्तिवर आंबेडकराच नाव घेऊन विविध राजकीय पक्ष आपली पोळी शेकत आहेत. पण कळस म्हणजे आठवले सारखे लोकं सगळी आंबेडकरी जनता म्हणजे माझी वयक्तीक संपत्ती आहे अशा गोड गुमान स्वप्नातच रंगलेली दिसते.  आता समाजानेही आपली कुस बदलली आहे. तो इतर पक्षातिल उमेदवाराना आपलं मत देऊ लागला आहे. आर. पी. आय. ही समाजाची बांधिल पार्टी नाही हे वेळोवेळी स्वत:ला गहान ठेवणा-या नेत्यांमुळे साबित झालं आहे. आजवर आंबेडकर चळवळीची राजकीय आघाडी वेळोवेळी गहान पडली. याचे मुख्य कारण या पक्षावर वचक ठेवणारी बौद्ध समाजाची एखादी सामाजीक संस्था नाही. आता गरज आहे अशा सामाजीक संस्थेची जीचा या समाजावर सामाजीक वर्चस्व असेल अन या सामाजीक सस्थेद्वारे राजकीय आघाडीला वेसन घालता येईल.  पुढेतरी मिडीयानी राजकीय आघाडी म्हणजे आंबेडकर चळवळ असा आज पर्यंतचा घोळ बाजुला सारुन वास्तविकता बघावी. आंबेडकर चळवळ आणि चळवळीतील एक आघाडी यातिल गल्लत टाळावी.

जयभिम.

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)

१९२७ उजडला, मागील वर्षी जे अस्पृश्यता निवारनाचे वारे देशभर वाहू लागले होते त्याचं आता वादळात रुपांतर होण्यास सुरुवात झाली होती. जे संवर्ण या काळात गाफिल होते त्यांची झोप उडविणाच्या दिशेनी वाटचालु सुरु झाली. आता मनुच्या भिंतीना हादरे देणा-या अस्पृश्यांच्या सभाना उधान आले होते. जिकडे तिकडे एकच नाव, बाबासाहेब आंबेडकर. अन अशातच नविन वर्षाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील महारांच्या विजयस्तंभाला सलामी देऊन, अस्पृश्यांची एक मोठी सभा घेत नव्या दमाने चलवळीची सुरुवात करण्यात आली. या सभेत बाबासाहेबानी इंग्रजांवर ताशेरे ओढतांना त्यांच्या दुटप्पी धोरणावर तुफान बरसले होते. ज्या ब्रिटिशाना पेशव्यांच्या विरोधात लढाईत विजयी मिळवुन देण्यासाठी महार सैन्यानी रक्त सांडले होते त्या महाराना लष्करभर्ती बंदी घातल्याचा निषेध नोंदविण्यात आला. ब्रिटीशानी लगेच लषकरभर्ती बंदी उठविली नाही तर त्यासाठी वेगळा सत्याग्रह करण्याचा संकेतही देऊन टाकला.
बाबासाहेबांचा प्रभाव भारतीय राजकारणात वाढू लागला होता. संपुर्ण अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा होता. लोकं त्यांच्या सांगण्यावरुन शेकडो मैलचा प्रवास करुन सभाना हजेरी लावत होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ प्रचंड वेगाने पसरत होती. एकंदरीत त्यांचा वाढता प्रभाव बघून ब्रिटिश सरकारनी बाबासाहेबांची विधिमंडळात सदस्य (आजच्या भाषेत आमदार) म्हणून नेमणुक केली. या निमित्ताने फेब्रुवारी १९२७ ला अस्पृश्य समाजातील शिक्षकानी त्यांचा सत्कार करण्यासाठी मुंबईत एक सभा भरविली अन बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. आता असे अनेक सत्कार समारंभ होऊ लागले. जिकडे तिकडे आंबेडकर नाव दुमदुमु लागले. याच सभेत कार्यकर्त्यानी बाबासाहेबाना पैशाची थैली अर्पण केली होती, अन ती थैली बाबासाहेबानी तशीच बहिष्कृत हितकारिनी सभेला अर्पण केली.
बाबासाहेबांच्या चळवळीमुळे आता अस्पृश्यांचा आत्मसन्मान हळू हळून जागा होऊ लागला होता. लोकं रस्त्यानी चालताना मान वर करुन चालु लागली. या भुमीत हजारो वर्षानी हे पहिल्यांदाच घडत होतं. संवर्णांपेक्षा आपण कणभरही कमी नाही याची काही लोकाना जाणीव झाली अन ते जागृतीचं काम करत फिरु लागले. प्रत्येकाला आता गुलामगिरीची जाणीव होऊ लागली. आता सगळा समाज गुलामगिरी झटकून टाकायच्या तयारीला लागला होता. स्वत:च्या कार्यक्षमतेचा साक्षात्कार होऊ लागला. आता बंडखोर वृत्ती गुलामगिरीची जागा घेऊ लागली. या व्यवस्थेचा जनसामान्याना तिटकारा वाटू लागला. असे वाटणे परिवर्तनाची प्राथमिक अवस्था असते. एकूण अस्पृश्य समाज या अवस्थेला येऊन पोहचला होता. आता नवि क्रांती घडणे अटळ होते. पण ही सामाजिक क्रांती एकही रक्ताचा थेंब न सांडता घडावा यासाठी बाबासाहेबांनी चळवळीवर करडी नजर नि आंबेडकरी शिस्त या दोन्ही गोष्टींचा प्रभावी पहारा लावला होता. 
याच दरम्यान महाड नगरपालिकेनी सिताराम केशव बोले यानी विधिमंडळात पास करुन घेतलेल्या ठरावाची अमलबजावनी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णया प्रमाणे महाड नगरपालिने आपल्या अधिकारातील चवदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आल्याची घोषणा केली. ही घोषणा होताच अस्पृश्यांचा वस्तीत जल्लोष उडाला. आता चवदार तळ्याचे पाणी चाखता येईला या आनंदाने लोकांनी जणू उत्सव साजरा केला. कायद्याने बहाल केलेला अधिकार बजाविण्यासाठी महार वाड्यातुन बायका पोरी मडकी, हंडे घेऊन तळ्यावर पोहचली. पण मनुचे प्रतिनिधी फार कर्मठ. त्यानी महाराना तळ्यावरील पाणी घेण्यास मज्जाव केला. बिचा-या पिडित अस्पृश्यांमधे एवढा हिंमत कुठे होता की ठणकावून आपले हक्क बजावतील. संवर्णांची शिवीगाळ खाऊन माना खाली घालुन तमाम लोकं पाणि न घेताच परतली. झालेल्या प्रकारामुळे सगळा गाव खदखदत होता. ईकडे अस्पृश्य हक्क न मिळाल्यामुळे तर तिकडे संवर्ण अस्पृश्य माजलेत म्हणून धुसफुसत होते. आग दोन्हिकडे लागली होती. एका बाजूला अधिकारासाठी तर दुसरी मनुवादी वर्चस्व टिकविण्यासाठी. अन हा हा म्हणता ही बातमी बाबासाहेबांच्या कानावर पडली. बाबासाहेब अत्यंत विशिण्ण मनस्थीतीने सगळा प्रकार ऐकला. मन विदिर्ण झाले. हा संवर्णांचा घोर अपराध होता. ज्या तळ्यातील पाणी गुरा ढोरांसाठी उघडे होते, मुसलमान व ख्रीश्चनांसाठी उघडे होते. प्राण्या पक्ष्यांसाठी उघडे होते पण आपल्याच समाजातील अस्पृश्य बांधवाना मात्र हे पाणी नाकरण्यात आले होते. संवर्णांद्वारे अस्पृश्यांना तिथे अटकाव घालण्यात आला होता. हे सगळं ऐकून बाबासाहेब फार संतापले. आज कायद्यानी तो अधिकार दिल्यावर मनुवाद्यानी अटकाव करण्याचे काहीच कारण नव्हते. तरी वर्चस्वाची मस्ती इतकी होती की त्यातून यांनी हे प्रताप केले होते. या सगळ्या प्रकाराणे संतापलेल्या बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला व त्या अनुषंगाणे घोषण केली. चवदार तळ्याचे पानी चाखणे हा अस्पृश्याना कायद्याने दिलेला अधिकार आहे व तो आपण कुठल्याही किमतीत बजावायचाच. आपण १९ व २० मार्च १९२७ ला महाडला चवदार तळ्याचे पाणी चाखण्यासाठी सत्यग्रह करणार असून, ते स्वत: तिथे जातीने हजर राहून आपला अधिकार बजाविणार अशी भीम गर्जना केली.
या भीम गर्जनेची डरकाळी देशभर गेली. लाखो लोकांच्या अंगात वीज चमकून जावी अन त्याला प्रतिसाद म्हणून देशभरातून भीम लाट उसळावी असा तो प्रकर होता. बाबासाहेब स्वत: तळ्याच्या सत्याग्रहात उतरताहेत म्हटल्यावर काना कोप-यातून कार्यकर्तेही उसळणार होते. या घोषणेतून तमाम कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुनीत झाला. जिकडे तिकडे लोकानी या चळवळीत भाग घेण्यासाठी तय्यारी चालविली. सुरभा टिपणीस, सुभेदार सवादकर, संभाजी गायकवाड, शिवराम जाधव, अनंतराव चित्रे, रामचंद्र मोरे या अस्पृश्य पुढा-यानी आपली सगळी ताकत एकवटुन गावोगावी प्रचार चालविला. लोकाना दोन दिवस महाड सत्याग्रहास हजेरी लावण्याचे सांगण्यात येऊ लागले. तमाम जनतेत बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे एक जल्लोष उडाला होता. आज आपल्या महान नेत्याने पुकारलेल्या पहिल्या वहिल्या जाहीर लढाईत भाग घेण्याची संधी कोणीच गमवायला तयार नव्हता. बघता बघता १९ मार्च हा दिवस जवळ येऊ लागला. ही दरिद्र्यांची, पिचलेल्या, दबलेल्या लोकांची सभा होती. इतर कोणत्याही सभेपेक्षा ही सभा सर्वार्थाने वेगळी होती. येणारी लोकं हजारो वर्षाच्या काळोखात जिवन व्यथीत करुन स्वाभिमान हरविलेली, दिशाहीन, विद्याहीन, परिस्थीतीने दीन तर सामाजातील स्थानी अत्यंत हीन या सगळ्या अवस्थांतून जाणारी ही माणसं महाडात जमणार होती. येण्यासाठी हातात पैसे नव्हते म्हणून एक आठवडा आधीच पायी निघालेली कित्येक लोकं हळू हळू महाडला उतरत होती. बघता बघता १९ मार्च उजाडला अन हजारोच्या संखेनी पाठीवर भाकरीची शिदोरी बांधुन अस्पृश्यानी महाडला हजेरी लावली होती.
चवदार तळ्यापासून दोन फर्लांग अंतरावर एक विराट असे मंडप उभारण्यात आले होते. येथेच आमच्या अस्पृश्य बांधवांचा मुक्काम होता अन परिषदही ईथेच भरणार होती. गावातील संवर्णांमधे धुसफुस सुरु होतीच. अस्पृश्यांच्या अफाट लोकसमुदायाच्या लाटा बघुन त्यांचे धाबे दणाणले होते. ही चळवळ फसावी म्हणून तिथल्या संवर्णानी असहकार करायचे ठरविले होते. ईतक्या लोकाना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणणू लागली. ईतर वेळी मंदीरांच्या पुजेत किंवा इतर समाज कार्यात सढळ हातानी दाण करुन पुण्य कमविणारे संवर्ण आपल्याच बांधवांना मात्र पैशानीही पाणी देण्यास तयार नव्हते. शेवटी बरीच खटपट करुन ४० रुपये खर्ची घालुन पाणी घेण्यात आले. आलेल्यांची पाण्याची गरज भागली अन या सत्याग्रहाचा पहिला दिवस सुरु झाला. तो दिवस म्हणजे १९ मार्च १९२७ होता. या दिवशी महाड सत्याग्रहाची सभा नियोजित तंबुत सुरु झाली.
श्री. संभाजी गायकवाड हे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या भाषणाने परिषदेची सुरुवात झाली. पुढे बसलेली जनता ही फाटक्या कपड्याची, दारिद्र्यानी पछाडलेली व आत्मसन्मान गमावलेली होती. पण आज या परिषदेत हजेरी लावुन हे सगळं झिटाकरण्याची तयारी असल्याचा व माणूस म्हणून जगण्याचा निर्धार केल्याचा पुरावा देत होती. अशा या गरीब व शोषित बांधवांच्या सभेत सुरुवातीची काही भाषणं झाल्यावर बाबासाहेब भाषणास उभे राहतात. पांढरा शुभ्र बंगाली धोतर, सदरा व कोट असा त्यांचा पेहराव होता. बाबासाहेब उभं राहताच टाळ्यांच्या कडकडाटाने अख्खं मंडप दुमदुमलं. बाबासाहेबानी आपले भाषण चालु केले.
आम्ही सरकारला नेहमी अनुकुल असतो म्हणुन आमची उपेक्षा होते. आपण नेहमी झुकतं माप घेतल्यामुळे आमचा कोणी विचारच करित नाहीत. महाराना लष्करभर्ती बंदी याचाच एक नमुना आहे. आपल्यावरील ही बंदी जरी ईथल्या संवर्णांच्या सांगण्यावरुन लादली असली तरी इंग्रजानी असं डोकं गहाण ठेवण्याचं मुख्य कारण ते नाही, तर आम्हीच आहोत. आपण आपल्या अधिकारासाठी केंव्हाच ठणकावून उभे रहात नाही म्हणून आपल्यवर आज ही वेळ आली आहे. सरकार जरी इंग्रजांच असलं तरी अधिकारीवर्ग मुख्य भुमिका बजावत असतो. तुम्ही आता शिक्षणाची कास धरा. सरकार दरबारी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून जा. अन आपल्या अधिकारांची अमलबजावणी करा. या महाडमधेच बघा ना, आज नगरपालिकेनी हे तळे आपल्यासाठी जरी खुले केले तरी आज आपल्याला ईथे अटकाव होतो. तेच जर आपले अधिकारी येथे वरिष्ठस्थानी बसलेले असते तर ही वेळ आलीच नसती. म्हणून आपला माणूस सरकार दरबारी वरिष्ठ पदावर असणे गरजेचे आहे. ४ थी शिकलेल्या ४० जणांपेक्षा बी. ए. झालेला एक माणुस मला जास्त महत्वाचा वाट्तो. म्हणून सगळ्यानी जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा निर्धार करावा. मृत जनावरांचे मांस खाणे आता सोडुन दया. महाराना गावात इज्जत नाही कारण आपल्यात स्वाभिमान नाही. स्वाभिमानाने जगायला शिका अन पोरा बाळाना शाळेत धाडा. महारानी आता वतनाचा लोभ सोडुन दयावा अन शेतीकडे वळावे. जंगलातील शेती मिळवावी अन स्वत: पिकविणारा अन्नदाता बनावे. अशा प्रकारचं महारांमधे नवचैतन्य भरणारं एक जबरदस्त भाषण देऊन त्या दिवसाची सभा संपली.
त्या रात्री बाबासाहेब व इतर कार्यकर्ते टिपणीसांच्या घरी बसून दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवित होते. दुस-या दिवशी गावातील काही पुढारी जे स्वत:ला पुरोगामी समजतात ते परिषदेस हजेरी लावणार होते. या पुढा-यांच्या मदतीने ऐन वेळेवर तळ्याचे पाणी चाखण्याचा प्रस्ताव पुढे करुन तळ्यातील पाणी पिण्याचं ठरलं. महाड नगरपालिकेच्या ठरावाला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा एकंदरीत आराखडा तयार झाला.
दुस-या दिवशी परिषद सुरु झाली. गावातिल पुरोगामी पुढारीही ठरल्या प्रमाणे आलेत. त्याना मोठया तो-यात भाषणही ठोकही. आम्ही कसे सुधारनेला पांठिंबा देत आहोत हे त्यानी आपल्या भाषणात ठणकावुन सांगितले. पण काही तासांतच त्याना प्रत्यक्ष कृतीतुन हे सिद्ध करण्याचं आव्हान पुढे उभं ठाकेल याचा अंदाज नव्हता. आपला भोपळा ईथेच फुटणार याची जाणिव नसल्यामुळे वाट्टेल ते ठोकम ठाक चालू होतं. दुपार पर्यंत सगळ्यांची भाषणे संपली अन त्या अनुषंगाने आजुन नविन ४ ठराव या परिषदेत पास करुन घेण्यात आलेत. अन आता परिषदेचे कामकाज संपणार अशी घोषणा होत असतानाच ठरल्या प्रमाणे व पुर्व संकेतानी अनंतरव चित्रे ताडकन उठुन आपण महाड नगरपालिकेचा ठराव अमलात आणू या अशी गुगली टाकली. हे वाक्य ऐकुन परिषदेस कोसो दुरचा पायी अंतर कापून आलेला प्रत्येक अस्पृश्य सुखावला अन टाळ्यांचा कडकडाट झाला.
याच्या अगदी उलटं स्पृश्य नेत्यांचे मात्र धाबे दणाणले. त्यानी या प्रत्यक्ष कृतीस नकार दिला. यामुळे संवर्णाचा रोष ओढवुन घेण्याची त्यांची तयारी नव्हती. लोकांच्या मताच्या विरोधात जाऊन काहिही करण्याची त्यांची तयारी नव्हती. महारानी तळ्याला हात लावल्यास संवर्ण उठाव करतील याचा त्याना अंदाज होता. त्यानी वेळ साधुन मागच्या दारातुन पळ काढला व आता काहीवेळापुर्वी भाषणातुन अस्पृश्य निवारणाच्या ज्या बढाया मारल्या त्या उघड पडल्या. परत एकदा अस्पृश्यांच्या प्रश्ना बद्दल पुरोगामी म्हणविणा-या लोकांमध्ये असलेले ढोंग बाहेर पडले. अगदी असेच ढोंगी तिकडे गांधीच्या ऐसपैस गोळा होऊन येणा-या काळात हरिजन चळवळ उभी करतात व तमाम अस्पृश्यांची दिशाभूल करतात. म्हणून बाबासाहेब नेमहीच म्हणायचे की दाईच्या हाताचा व आईचा हाताचा स्पर्श वेगळा असतो. 
तर पुरोगामित्वाचा आव आणणारी तमाम मंडळी धूम ठोकल्यावर ठरल्या प्रमाणे वरील सगळी सत्याग्रही मंडळी बाबासाहेबांसोबत तळ्याच्या दिशेन कूच करतात. त्यांच्या मागून अस्पृश्य समाजाचा जनसमुदायही तळ्याच्या काठावर येतो. बाबासाहेब पुढे होऊन तळयातील पाणी ओंजळीत धरतात. तेंव्हा ते ओंजळीतले पाणी पाहुन त्यांचे डोळे पानावले. ओंजळभर पाणी घेऊन बाबासाहेब म्हणतात "हे तेच पाणी...., जे सगळ्या प्राणिमात्रांना, कुत्र्या मांजराना व गुरा ढोराना उघड आहे पण मला व माझ्या बांधवाना याचा स्पर्श एवढे वर्ष वर्ज होता. मात्र मी याला नुसता स्पर्श करणार नाही तर हे प्राशन करतो" असे म्हणत त्यानी ओंजळीतले पाणी प्राशन केले. अन आपल्या समस्त बांधवांसाठी हे तळे आजपासुन खुले आहे, तो आपला अधिकार आहे सगळ्यानी पाणी प्यावा असे आवाहन करताच लोकानी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली अन आज चवदार तळ्याचे पाणी चाखले. हा पाणी चाखण्याचा दिवस होता २० मार्च १९२७.... हा खरा खुरा सोन्याचा दिवस होता. म्हणायला जरी ही पाण्याची गोष्ट असली तरी पाणीशी काही देणेघेणे नव्हते. हा आत्मसन्मानाचा प्रश्न होता. गायी ढोरांपेक्षा खालचा दर्जा समाजानी लादला तो झुगारण्याचा लढा होता. माणूस म्हणून स्वत:चं अस्तित्व दाखविण्याचा लढा होता. तो लढा आजवर कधीच लढला गेला नव्हता. कारण त्याची जाण करवून देणारा पैदा व्हायचा होता. आज मात्र तो भीम ईथे लढा उभारायला जातीने आला होता व ईथून पुढे निळ्या क्रांतीचा नवा इतिहास घडणार होता. येणा-या निळ्या चळवळीची ही पहिली डरकाळी होती. ती अशी सुरु झाली.
तर... तळ्याती पाणी पिल्यावर परिषद संपल्याची व यशस्वी झाल्याची घोषण होते अन सगळे अस्पृश्य आपापल्या गावाच्या दिशेने निघतात. बाबासाहेब दोन दिवसापासुन सरकारी डॉक हाऊस मधे मुक्कामी होते. बरीच लोकं मिळेल त्या वाहनानी गावाकडे निघाले. कित्येक लोकंतर पायीच निघाली. पण ज्यांचा दुरचा प्रवास होता किंवा सायंकाळी वगैरे गाडी धरायची होती अशी लोकं आजुन त्या तंबुतच होती. 
इकडे मात्र महारानी तळे बाटविल्याची बातमी गावात विस्तवासारखी पसरली. महार नुसतं तळे बाटवून शांत बसणार नाहीत तर ते आता गावातील वीरेश्वर मंदीरातही प्रवेश करणार अशी अफवा पसरविण्यात आली. चहुकडे धर्मावर घाला घातल्याची वार्ता पसरत होती. आंबेडकरानी धर्मावर घाला घातल्याच्या बातमिने सगळा संवर्ण समाज पेटुन उठला. लाठ्या काठ्या घेऊन हिंदु लोकं तळ्याकाठच्या मंडपात धडकले. आता तशिही मंडपात फारशी लोकं नव्हतीच. होते ते निघून गेले होते. उरले सुरले लोकं गावत गेले होते. बायका व मुलं फक्त मंडपात होती व जोडीला काही पुरुष मंडली होती. निघायच्या तयारीत असणारा बांधव आवराआवरी करत होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निहत्ता होता. पण याच्या अगदी उलट बाटविल्याचा बदला घेण्यासाठी आलेला संवर्ण सामाज मात्र खवळलेला तर होताच पण मारापिटी करण्याच्या जय्यत तयारीनेच आला होता. निहेत्ते लोकांना पाहून त्याला अजुन जोर चढला व तंबूत बसलेल्या अस्पृश्यांना बेदम मारहाण सुरु झाली. दिसेल त्याला फोडून काढले जाऊ लागले. मुला बायकांच्या किंकाळ्या गुंजू लागल्या. सगळ्याना पळपळू मारणे सुरु झाले. पुरुषांना तर मातीत लोळवू लोळवू मारायला लागले. लाथा बुक्या व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाणी सुरु झाली.   तिथे उपस्थीत पुरुषांची डोकी फुटोस्त्वर मारण्यात आले. सभा मंडपात जिकडे तिकडे अस्पृश्यलोकांची दाणादाण उडविण्यात आली. शिजत असलेल्या अन्नात वाळु मिसळण्यात आली. तळ्याच्या शेजारी रक्ताचा लोट वाहु लागला. चवदार तळ्याचे पाण्य आता महारांच्या रक्ताने लाल होऊ लागले. कित्येक लोकानी मुसलमान बांधवांच्या घरात शिरुन त्यांची मदत घेतली व आपला जीव वाचविला. अशा प्रकारे अमानुष मारहाण करुन संर्वर्णानी पळ काढला.
तिकडे बाबासाहेब डॉक बंगल्यात या सगळ्या घटनेपासुन अनभिज्ञ, परिषद सफल झाल्याच्या आनंदात होते. पण काही क्षणातच ईथे घडलेला सगळा प्रकार बाबासाहेबाना कळविण्यात आला. बाबासाहेबानी कार्यकर्त्यासकट थेट सभा मंडपात धाव घेतली. बघतात काय तर, जिकडे तिकडे घायाळ अवस्थेत पडलेले आपले बांधव दु:खानी किंचाळत होते. हे सगळं दृश्य पाहुन बाबासाहेब अत्यंत संतापले. पण ही वेळ रागावण्यात घाविण्याची नव्हती. जखमिना दवाखान्यात नेण्यात आले. बाबासाहेबानी स्वत: २० घायाळाना दवाखान्यात दाखल केले. तिथेही संवर्णच होते. हे संवर्ण डॉक्टर त्यांच्य पेशाला न शोभणारे शेरे मारत होते. पाणी हवे होते, घ्या आता इंजेक्शन. खुप माजलात तुम्ही त्या आंबेडकरांमुळे असले टोमणे व  हिणकस शेरे मारत उपचार केला.
बाबासाहेबाना त्याच सायंकाळी डॉक बंगला खाली करुन दयायचा होता. त्यातच ही हाणामारी व अनेक जण जखमी झाल्यामुळे त्यानी आजुन दोन दिवस ईथेच थांबुन आपल्या बांधवांची काळजी घेण्याचे ठरविले. सायंकाळी मामलेदर व पोलिस अधिकारी डॉक बंगल्यावर बाबासाहेबांची भेट घेतली. झालेल्या प्रकरणा बद्दल दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब मुद्दा पेटवतील की कसे याचा अंदाज येत नव्हता. त्यांनी तशी चिंता व्यक्त करुन दाखविली. तेंव्हाचे बाबासाहेबांचे वाक्य आहेत “मला झगडा पेटवायचा नाही. तुम्ही इतराना आवरा, मी माझी माणसे आवरतो.ही प्रगल्भता, ही समयसुचकता व दाखविलेला  संयम बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्वाचं दर्शन घडविणारं तर होताच. पण येणारा लढा मैदाना हातघाईने नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाने देशव्यापी होणार नि नव्या क्रांतीची पहाट होईस्तोवर लढल्या जाणारा याचाही संकेत होता. स्वभावातील काही गोष्टी भविष्याची नांदी देत असतात. इथे बाबासाहेबांनी दाखविलेला संयम अधीच जोमाने लढण्याचा संकेत सोडून गेला.
ईकडे डॉक बंगल्यावर लोकांची गर्दी वाढु लागली. हजारोनी गावाच्या दिशेनी जायला निघालेली पाऊले बातमी कळताच महाडच्या दिशेनी परत फिरली. महारांनी आज उभ्या महाडला मनगटातील पाणी पाजण्याचा निर्धार केला होता. अख्या संवर्णाना महाराच्या बाहुंचा बळ काय असतो ते दाखविण्याची तयारी होऊ लागली. सभा मंडपात मोठा विस्फोट आकार घेऊ लागला. एक छोटासा अविवेक महाडला भस्म करु शकत होता. पण बाबासाहेब मात्र फार संयमी. खरंतर बाबासाहेब स्वभावाने प्रचंड तापट व्यक्ती होते, पण ते अविवेकी नव्हते. शिघ्रकोपी असणे नि विवेकी असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. अन बाबासाहेबांत त्या दोन्ही गोष्टी होत्या. विवेक नेहमीच तापटापणाला नियंत्रणात ठेवत असतो. ईथे आज अटीतटीची वेळ निर्माण झाली होती व अख्या महाडला राख करण्यासाठी भीमसेना सज्ज होती. पण बाबासाहेबांनी अत्यंत विवेकाने वागत सगळ्या कार्यर्त्याना धीर धरण्याचा व संयमाने वागण्याचा सल्ला दिला. भडकलेले कार्यकर्ते मात्र त्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करतात. आज आपण संखेने अधिक आहोत व काही मिनटात संवर्णानी पाणी पाजण्याची तय्यारी आहे तेंव्हा तुम्ही तशी परवानगी का नाकाराता? असे काही कार्यकर्यानी विचारले तेंव्हा बाबासाहेबांमधील दुर्दर्शी व संयमी पुरुष बोलतो.
ते म्हणतात "तुम्ही नुसतं महाडवर तुटून पडण्याचं बोलताय, मी उभ्या भारतावर तुटून पडण्याचा कार्यक्रम आखलाय. तुम्ही त्या परीने तयारीला लागा. राहिला प्रश्न ईथल्या हल्लेखोरांचा. त्याना आपण कायद्यानी धडा शिकवूया. काही लढाया जग्यावर लढल्याच पाहिजे हे जरुरी नसते. त्या देशव्यापी करत नेऊन अशा पद्धतिने लढायच्या असतात की शत्रूला माघार घ्यायला जागा उरायला नको. नुसतं एका तळ्याचा लढा नाहीये. हा लढा आता इतका व्यापक करत न्यायचा आहे की सारी भारत-भू च एक तळे बनायला हवे. निव्वड महाड्च्या संवर्णाना धडा शिकवायचा नाही तर तमाम भारतीय संवर्णाना आता आमचा अधिकार मान्य करायला भाग पाडायचे आहे" असं म्हणून बाबासाहेबांनी भडकलेल्या समाजबांधवांची समजूत काढली व त्यांना शांत केले. यानंतर लोकं शांत होतात अन एकदाचं मोठं संकट टळलं.
आता कार्यकर्त्यानी परत एकदा महाड सोडण्यास सुरुवात केली. पण बाबासाहेब मात्र महाड सोडून जात नाहीत. त्यांची डॉक बंगल्याची मुदत संपल्यामुळे ते टिपणिसांकडे मुक्काम हलवितात. अन सगळा मामला शमवून नि मार्गी लावून २३ मार्च १९२७ ला मुंबईस परत येतात.
दरम्यान तमाम हल्लेखोरांवर खटले भरण्यात येतात व केस चालविली जाते. या खटल्यात ८ जातियवादी गुंडावर आरोप सिध्द होतो. ६ जुन १९२७ ला न्यायालयाचा निकाल येतो, अन त्या प्रमाणे वरील सर्व आरोपिना प्रत्येकी ४ महिन्यांचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात येते. परत एकदा अस्पृश्यांच्या वस्तित जल्लोष होतो.

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)

आता बहिष्कृत हितकारिनी सभा जोमाने कामाला लागली. सगळे कार्यकर्ते उत्साहाने समाज कार्यांत गुंतुन गेली. जाने-१९२५ ला सोलापुरात ब.हि.स. चे पहिले वहिले वसतीगृह चालु झाले.  जीवप्पा सुभाना कांबळी हे या वसतीगृहाचे पर्यविक्षक म्हणुन नेमण्यात आले. आता सोलापुरच जिल्ह्यातिल बहिष्कृत मुलांचा अंशता का होईना पण शिक्षणाचा प्रश्न सुटला होता.
सरस्वती विलास:
याच दरम्यान ब. हि. स. नी एक मासिक काढलं, त्या मासिकाचं नाव होतं सरस्वती विलास या वेळेस बाबासाहेब हिंदु होते. ते स्वत:ला हिंदु मानत. त्यांचा विरोध जातियवादाला होता. आजुन तरी ते हिंदु धर्माचाच भाग होते. ते फार धार्मिक वृत्तीचे होते अन हिंदु देव देवतांचा त्यांच्यावर जरी प्रभाव नसला तरी संस्कृतीचा प्रभाव होता. त्याचाच प्रतिबिंब म्हणुन ब.हि.स. च्या मासिकाचे नाव देवीच्या नावावर असल्याचे दिसते. या मासिका द्वारे तरुणांमधे जागॄतीचे व अभ्यासाची गोडी वाढविण्याचे काम केल्या जाई. सामाजिक व राजकिय जागृतीचा प्रासार करण्यासाठी हे मासिक अत्यंत महत्वाचं काम बजावत होतं. त्याच बरोबर तरुण व प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा अन वाचनालये सुरु करण्याचं काम ब.हि.स. नी चालविले होते.
महारांचा हॉकी क्लब:
महार ही एक अशी जात होती की ज्यांच्या अंगी विविध कला गुण लोटांगण घालत. महार शुर होते. रणांगणात महारासारखी मर्दुमकी कुणीच गाजवित नसे. तसेच शिक्शणात सुद्धा महार अत्यंत बुद्धीवान म्हणुन वेळोवेळि आपली प्रतिभा दाखविली पण जातियवादी यंत्रणेने नेहमीच महारांचा धर्माच्या नावाने बळी घेतला. अन याच प्रमाणे क्रिडा क्षेत्रातही महार अत्यंत निपुन होते हे बाबासाहेब चांगले ओळखुन होते. महारांच्या मुलांतील क्रिडा प्रतिभा खुलावी म्हणुन बाबासाहेबाना महारांचा हॉकी क्लब स्थापन केला. आता मात्र महारांची मुलं हॉकी खेळ खेळू लागली. दिवसभर ईकडे तिकडे टवाळक्या करत हिंडणा-या रिकाम टेकड्या मुलांची संख्या हॉकीच्या मैदानात सराव करताना दिसू लागली. रात्री बे रात्री नाक्यावर बसुन चकाट्या पिटणारी पोरं आता हॉकीच्या गप्पा करु लागली. एकंदरीत टुकारपणा कमी झाला. महारांच्या पोराना आता नवि दिशा मिळाल्याने त्यांचा इतर ठिकाणचा वावर कमी झाल अन क्रिडा विश्वात ते रमु लागले.
आता जिल्ह्या पातळीवर जागो जागी ब.हि.स. च्या सभा भरु लागल्या. लोकांचा प्रचंड प्रतिसाद असायचा. खेडया पाड्यातुन लोकं या सभाना हजेरी लावत असत. बाबासाहेबांचा नाव आता बहिष्कृत लोकांशी कधी न तुटणारी नाड बनुन जुडत होता. लोकांच्या हृदयावर आंबेडकर हे नाव युगा युगांसांठी कोरलं जाऊ लागलं. एकंदरीत अस्पृश्यांमधे नवचैतन्याचे वारे वाहु लागले. जिल्हा पातळीवरच्या सभा आता तालुका पातळीवर येऊन धडकु लागल्या. ज्याना जिल्हा पातळीच्या सभाना जायला जमत नसे अशाच लोकांची संख्या जास्त होती. याचा परिणाम तालुका पातळीवरच्या सभाना तोबा गर्दी होत असे. जिकडे तिकडे अस्पृश्यांच्याच चळवळीचा डंका वाजत होता. अशा प्रकारे बहिस्कृत हितकारिनी सभा आपल्या कामाच्या कक्षा तुफान गतिने विस्तारत होती.
रॉयल कमिशन समोर साक्षी:
१५ डिसेंबर १९२५ रोजी रॉयल कमिशनने बाबासाहेबाना साक्षी देण्यासाठी बोलावले होते. बाबासाहेबांचा आधिपासुनच इंग्रजी चलन पद्धतिवर रोष होता. त्यानी इंग्लडला सादर केलेल्या आपल्या प्रबंधातुन तसा विरोधही दर्शविला होता. आज पुन्हा एकदा त्याना ईथे साक्षी देण्यासाठी बोलविण्यात आले होते. ईथेही बाबासाहेबानी आपला विरोध दर्शविला. ब्रिटीश चलन पद्धतीमुळे भारतिय सुवर्णसाठ्यावर जो परिणाम होतो त्या बद्दल बाबासाहेब फार चिंतीत होते. बाबासाहेबानी सुवर्णपरिमाणाला कडाडुन विरोध केला. इंग्रचांना याचं फारसं नवल वाट्लं नाही. आता पर्यंतचा बाबासाहेबांचा इंग्रजांविरोधचा रोख बघता त्याना या पेक्षा फार वेगळं अपेक्शित नव्हतं. ईथे आज इंग्रजांशी बोलणारा विद्वान हा असुपृश्यांचा नेता नव्हतात. आज या कमिशनपुढे बोलणारा हा माणुस या भुतलावरील एक महान विद्वान होता. विद्वानाशी एकरुप झालेला देशभक्त इंग्रजांअर गरजुन बाहेर पडला.
याच दरम्यान भारताच्या काना कोप-या पर्यंत खडबळ माजवुन देणा-या दोन अत्यंत महत्वाचा घट्ना दक्षीणेत तेंव्हाच्या मद्रास प्रांतात घडल्या. आज बाबासाहेबांची चळवळ ईकडे नावा रुपाला येत होती. अस्पृश्यांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करुन देण्यात बाबासाहेब अत्यंत वेगने प्रगती करत होते. महाराष्ट्रातुन अस्पृश्य निवारणाचे जे वारे वाहु लागले ते पार भारताच्या सगळ्यात खालच्या राज्यात मद्रास पर्यंत जाऊन धडकले होते. प्रत्येक अस्पृश्यानी आता मोकळा श्वास घेण्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली होती. अस्पृश्यांना आता नविन स्वप्ने पडु लागली होती. प्रत्येकाच्या स्वप्नाचा नायक आंबेडकर नावाचा महान विद्वानच असायचा. याच धामधुमीत मद्रास राज्यातिल अस्पृश्यानी ब्राह्मणांच्या विरोधात जाहिरपणे दंड थोपटुन रणांगणात उडी घेतली.
त्रावणकोर संस्थानातील वायकोम ह्या गावातील मुख्य रस्त्यांवर ब्राह्मणांची घरे होती. या गावातील अस्पृश्याना मुख्य रस्त्यातुन माण्यास मज्जाव होता. अस्पृश्यानी आजवर हे सगळं नियतीची करणी म्हणुन स्विकारलं होतं. देवानीच आपल्याला अशा निच जातित जन्मास घालुन हि शिक्षा ठोठावली आहे अन ती आपण मुकाट्यानी सहन करायची, आपला तो अधिकारच नाही. त्या मुख्य रस्त्यावर ब्राह्मणांचाच अधिकार आहे हे मान्य करुन जगण्यातच धन्यता मनली जाई. पण आता मात्र देवाचं अस्तित्व नाकारणारा महामानव या भुतलावर धुडगुस घालत होता. संस्कृतीच्या भिंतीची विट न विट वाजविणारा महाबली ईथे अस्पृश्यांच्या बाजुने उभा ठाकलेला होता. तुम्ही गुलाम नाही सलामाचे मानकरी आहात हि भावना एक एक माणसा मधे पक्की रुजविण्याचे काम करण्यात येत होते. अन यातुनच वायकोम येथील अस्पृश्यानी हा मुख्य रस्ता खुला करण्यासाठी श्री. रामास्वामी नायकर यांच्या नेतृत्वाखाली या सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले. देशभरातील संवर्ण मात्र खडबळुन जागे झाले. अस्पृश्यानी गावातिल मुख्य रस्त्याची मागणी करणे हे संवर्णांना अमान्य होते. देशाच्या कानाकोप-यातील संवर्णानी याचा विरोध केला. मद्रासला जाऊन अस्पृश्यांचे हाल करता येईना, पण याचा सुड जवळच्या अस्पृश्यांवर उगविला जाऊ लागला. देशात जिकडे तिकडे अस्पृश्यांचे हाल बेहाल चालु होते. जे संवर्ण मोठ्या मनानी मेहरबानी म्हणुन पाणवठयावर अस्पृश्याना पाणि भरण्याची परवानी देली होती अशा कित्येक पाणवठ्यांवर परत बंदी घालण्यात आली. अस्पृश्य समाजाला माज आल्याच्या गोष्टी होऊ लागल्या. बंडखोरी कुठल्याही परिस्थीतीत खपुन न घेता अस्पृश्याना त्यांची जागा दाखविली जावे असा एकंदरीत सुर येत होता.
देशभर अस्पृश्यांच्या विरोधात संवर्णानी सुद्धा दंड थोपटले. सगळ्या जिवनावश्यक यंत्रणेचा स्वामी हा संवर्णच असल्यामुळे अस्पृश्यांचे जिकडे तिकडे हाल बेहाल सुरु झाले. श्री. रामास्वामी नायकर वर सत्याग्रह मागे घेण्याचा दबाव वाढविण्यात आला. पण ते रामास्वामी होते त्यानी कुठल्याच दबावाला न जुमानता सत्याग्रह चालु ठेवला. आता पावसाळा सुरु झाला. जिकडे तिकडे पाणिच पाणि. नद्या नाले भरुन वाहु लागले. पावसानी अधिक जोर वाढविला अन गावात पुर आले. आता तरी हा सत्याग्रहाचा बट्ट्याबोळ होईल म्हणुन संवर्ण सुखावला पण पुढे उभा ठाकलेला अस्पृश्य अशा लहान सहान अडचणिना सहज झेलण्याची क्षमता बाळगणारा समाज होता. सत्याग्रच चालुच होते. या सत्याग्रहाचा डंका महाराष्ट्रात वाजु लागला. अस्पृश्यांच्या सत्याग्रहात भावनांचा उद्रेक असा काही झाला की, तिथुन हजारो कोस दुर बाबासाहेबांच्या भुमीतील दोन समाज सेवक कर्मवीर शिंदे अन आचार्य भावे हे वायकोमला जाऊन पोहचले. आता सत्याग्रहाला आजुन दोन महान लोकांची साथ लाभताच अधिक जोर चढला अन शेवटी अस्पृश्यांचा विजय झाला. गावातिल मुख्य वाट अस्पृश्यांसाठी उघडण्यात आली. ब्राह्मणांच्या घराच्या बाजुनी असणा-या या वाटुवरुन आता अस्पृश्य निशंकोच चालु लागला अन अशा प्रकारे देशातील एक महत्वाची अस्पृश्य चळवळ आपली ताकद सिद्ध करुन विजयाच्या सिंहासनावर विराजमान झाली. आता हा सिंहासन देशभर भ्रमण करणार होता.
दुसरी घटना सुद्धा याच मद्रास प्रांतातील आहे. मद्रास हे त्या काळातिल सनातनवाद्यांचे रोम होते. रोम जसे कट्टरवादयांचे प्रतिक आहे अगदी तसेच मद्रासचे होय. या प्रांतातील संवर्ण हे फार कट्टर अन जातियवादी. ईथे संवर्णानी हजारो वर्षांपासुन लोकांचा नुसता छळ चालविलेला नव्हता तर अत्यंत अमानुष वागणुक दिली होती. पण बाबासाहेबांचे परिवर्तनाचे वारे ईथे येऊन नुसते धडकलेच नव्हते तर तरुणाना गदागदा हलवुन या व्यवस्थेविरोधात बंड करुन उठण्यास प्रवृत्त करत होते. याचाच एक नमुना उभ्या भारतानी बघितला. मुर्गेसन नावाच्या एका तरुणानी सारे जातिय निर्बंध तोडुन थेट एका हिंदु मंदिरात प्रवेश केला. अस्पृश्याना आज पहिल्यांदाच संवर्णांच्या देवाचे दर्शन घेतले अन आपण असल्या नालायक जातिय निर्बंधाना मानत नाही असे जाहिर केले. पण सनातन्यानी मात्र याच्या विरोधात दंड थोपटले. त्याला थेट न्यायालयात खेचण्यात आले अन समस्त मानवी जीवनाला लाजविणारा न्यायालयीन निर्वाळा येतो व उभा देश हादरतो. मुर्गेशनला न्यायालयाने दोषी ठरविले अन शासन केले. हि बातमी भारतातील प्रत्येक अस्पृश्याला चवताळुन उठण्याचा व बंड करण्याचा आदेश देणारा संदेश घेऊन आली होती. आता आजुन वाट न बघता संवर्णांशी दोन हात करण्यास प्रत्येकानी पेटुन उठावे असा संदेश उभ्या भारतातील अस्पृश्यांच्या रक्तात क्रांतीची फुंकर घालत देशभर  पसरत होता.
याच दरम्यान बाबासाहेबांकडे एक गोड बातमी होती, त्याना पुत्ररत्न झाला. त्याचे नाव राजरत्न ठेवण्यात आले. बाबासाहेब व माई फार आनंदी होती. घरी अगदी सगळीकडे याचा धुडघुस असे. हा मुलगा जसजसा मोठा होत गेला तसा त्याचा खट्ट्याळपणाही वाढला. पण बाबासाहेबाना मात्र याच्यावर अत्यंत प्रेम होते. बाबासाहेब आता कामावरुन लवकर घरी परतु लागले. एकदा विचारल्यावर ते राजरत्नसाठी घरी लवकर आल्याचं सांगतात. एकंदरीत या मुलामधे त्यांचा खुप जीव होता. पण नियतीने परत एकदा त्यांच्या डोक्यात डोंगर घालावा तसा वार केला. राजरत्नचा मृत्यु झाला. आता मात्र बाबासाहेब मनातुन खचुन गेले. १९ ऑगस्ट १९२६ ला आपले परम मित्र दत्तोपंत पवार (कोल्हापुरचे) याना या संदर्भात बाबासाहेबानी एक पत्र लिहले. त्यात ते म्हणतात की आजवर तिन मुले व एक मुलगी गमावलो. पण यावेळेस मात्र आम्ही दोघेही नवरा बायको पार खचुन गेलो. राजरत्नच्या जाण्यामुळे मला सुद्धा कशातच मन लागत नाही. हे जीवन आता निरस झाले आहे. असा त्यांचा पत्र आहे.
वकिली अन पहिले यश:
राजरत्नच्या जाण्याचे दु:ख फार दिवस करता येणार नव्हते. बाबासाहेबानी परत उठुन काम सुरु केले. आता अस्पृश्य निवारनाचे वारे जिकडे तिकडे वाहु लागले. कार्यकर्त्यांमधे उत्साह ओसंडुन वाहत होता. प्रत्येक तरुण अस्पृश्य निवारनाच्या स्वप्नानी झपाटलेला होता. आजची आंबेडकर चळवळ ही त्या वेळच्या चळवळीशी कधीच बरोबरी करु शकणार नाही. तेंव्हा आमच्या बांधवांच्या मुलभुत हक्कावर मनुने अटकाव घातला होता. अन जिथे अटकाव आहे तिथे क्रांती फार वेगाने होते. या काळात म्हणुनच चळवळ अत्यंत वेगाने उभी झाली.
ऑक्टो-१९२६ पुण्यातिल बागडे, जेधे अन जवळकर या तिन ब्राह्मणेत्तर समाज सेवकाने ब्राह्मणांचे वाभाळे काढणारे एक महान क्रांतिकारक पुस्तक लिहल्यामुळे त्यांच्या विरोधात  पुण्यातील ब्राह्मणानी न्यायलयात दावा ठोकला. या तिघानी देशाचे दुश्मन नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. त्या पुस्तकामधे देशाची हानी करण्याचे सगळे कारस्थान ब्राह्मणानी केले व ब्राह्मणांमुळे या देशाची नेहमी विविध आघाड्यांवर पिछेहाट तर झालीच पण गुलामीही लादली गेली असा निष्कर्ष काढण्यात आला होता. या पुस्तकामुळे ब्राह्मणांच्या विरोधात इतरांची मोर्चेबांधणी बळकट होऊ लागली. त्यामुळे ब्राह्मणानी या तिंघावर सुड उगविण्यासाठी त्यांच्यावर खटला दाखल केला.
फिर्यादी पक्षाचे वकिल होते पुण्यातील नामवंत विधितज्ञ ल. भ. भोपटकर. भोपटकरांचा विधीक्षेत्रातील दरारा पाहता कोणी त्यांच्या पुढे उभा राहण्याची हिम्मत करीत नसे. आता या तिघांची पंचायत झाली होती. अन त्याना कळले की मुंबईत एक तरुण राहतो ज्याचे नाव आहे भीमराव आंबेडकर. तोच या भोपटकराला सडेतो उत्तर देऊ शकेल असे कानी पडले अन हे तिघे बाबासाहेबाना शोधत मुंबत आले.
जेंव्हा त्यानी बाबासाहेबाना बघितलं तेंव्हा हा तरुण मुलगा आपली केस जिंकणार की नाही याची शंका आली पण त्यांच्याशी प्रत्येक्ष बोलल्या नंतर जवळकरांचं मतपरिवर्तन झालं. बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दातुन ओसंडुन वाहणारे ज्ञानचे हजारो झरे व बुद्धीमत्तेचे कारंजे अन बाबासाहेबांच्या एकुन हालचालितुन घडणारा तो ज्ञानोत्सव बघुन योग्य व्यक्ती गाठल्याची खात्री झाली अन त्यानी लगेच बाबासाहेबाना आपले वकिल पत्र दिले.
आता बाबासाहेबांपुढे भोपटकराना हरवुन आमली अमिट छाप विधीच्या दुनियेत सोडायची एक संधी होती. पण भोपटकर मात्र या मैदानातील एक महान खिलाडी होता.  सहजासहजी पराभव खाणारा तो माणुस नव्हतात. बाबासाहेबानी सर्व शक्ती पणाला लावुन कुठल्याही किमतीत हि केस जिंकायचीच असा निर्धार केला अन शेवटी भोपटकराला चित करुन विजय मिळविला. या विजयानी बाबासाहेबांच्या वकिली व्यवसायाला एक वेगळे वळण मिळाले. आता ते एक दमदार वकिल म्हणुन नावा रुपाला आले.