शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १

रत्नागिरी जिल्ह्यातिल मंडणगडापासुन चाप मैलावर आंबडवे नावाचे एक खेडे आहे. हेच ते गाव जिथे बाबासाहेबांचे पुर्वज रहात होते. बाबासाहेबांच्या घराण्याचे कुलनाव सपकाळ अन त्यांची कुलदेवता भवानी माता असं म्हणतात. भारतातील सा-या अस्पृश्य जातीत महार जात हाडाने कणखर, लढवय्ये, शुर, अन धन्याशी ईमानी राहण्यात त्यांची ख्याती होती. रणांगणात राजासाठी जीव देण्याची वेळ असो वा गावाच्या वेशीवर पाहारा देताना दरोडे खोरांपासुन ते चोरांपर्यंत सगळ्याशी दोन हात करण्याची वेळ असो. सगळ्या ठिकाणी महार हा स्वामीनिष्ठेच्या कसोटीत खरा उतरणा-या बहाद्दर जातीचा देशभर डंका वाजला होता. अशा शुर व स्वामीनिष्ठ अन ईमानी जातीची ख्याती ईंग्रजापर्यंत पोहचली. ईस्ट ईंडिया कंपनीने महारांचे हे गुण हेरले, आपल्या सैन्यात असे लढवय्ये अन ईमानी लोकांची नितांत गरज आहे व या वर सर्वोत्त पर्याय हे महारा शिवाय आजुन कोणी होऊच शकत नाही हे ईंग्राजानी जाणलं अन बॉंम्बे आर्मी ह्या कंपनीच्या सेना विभागासाठी महारांची पथके उभारली. हा इंग्रजांचा निर्णय कसा योग्य होता याची पावती देणारा कोरेगावभिमा च्या लढाईच्या निकाल पार कलकत्या पर्यंत महारांची ख्याती घेऊन गेला. आता महार जाती ही ईंग्रज सैन्यातील एक अती महत्वाची सेना होती.
बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सपकाळ हे याचं ईंग्रजी सेनेत नोकरीला होते. रामजी नावाचा मुलगा व मीराबाई नावाची मुलगी होती. रामजींची जडणघडण सैन्याच्या छावणीत झाली. रामजींवर सैन्याचा फार प्रभाव होता. पुढे तेही इंग्रजांच्या सेनेत भर्ती झाले.
अगदी नजीकच्या काळात आयुष्यात फार मोठा बदल होणार होता याची त्याना जाणही नव्हती. नविन आयुष्य त्यांच्या स्वागतासाठी तिकडे सज्ज होत होतं. या अमुलाग्र बदलाची नांदी देणारी एक घटना घडली. रामजी ज्या पथकात होते त्या पथकात एक नविन सुभेदार नुकताच बदली होऊन येतो. हे सुभेदार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावचे महार जातीच अत्यंत नामवंत इसम. त्यांचे नाव सुभेदार मेजर धर्मा मुरबाडकर. अत्यंत सुखवस्तु कुटुंबातील हे मुरबाडकर. त्याची ७ हि भाऊ सैन्यात नोकरीस होते. घरी वैभावाचा पुर वाहत असे. सगळ्या महार जातील त्यांचा रुतबा अगदी वेगळा होता. हे कुटुंब अत्यंत धार्मिक होतं. महार वस्तीत त्यांचा फार मान सन्मान व्हायचा. पुढे हे कुटुंब पनवेलला स्थायीक झालेलं होतं.  अशा या कुटुंबाचा एक सदस्य आज रामजीच्या पथकात दाखल होतो अन ईथेच त्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार होता.
सपकाळ व सुभेदार यांचं चांगलं पटु लागलं. आपल्या जातितील माणुस म्हटल्यावर मुळातच आपुलकी वाटाते. वरुन सपकाळ हे तडफदार व्यक्तिमत्व, बाणेदरपणा, अभ्यासु अन अत्यंत निष्ठावान अशा सपकाळांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वाची सुभेदाराना भुरळ पडली. आपली कन्या भीमाबाईला हीला सपकाळ हे पती म्हणुन लाभले तर आयुष्याचं सार्थक होईल असं सुभेदाराना सारखं वाटु लागे. एकदिवस त्यानी सपकाळांकडे तसं बोलुन दाखविलं. सपकाळानी आपला होकार कळविला पण  त्यांच्यात स्टेटस ईश्यु उभा ठाकला. सुभेदाराच्या तुलनेत सपकाळांचा आर्थिक दर्जा खालचा होता. सुभेदारांच्या घरच्यांचा या विवाहाला  कडक विरोध होता, पण सपकाळानाच मुलगी देईन या गोष्टीवर सुभेदार अडुन बसले. घरी बरीच चर्चा झाली.  वाद विवाद झाले, अखेर सुभेदाराच्या थोरल्या मुलानी या लग्नास सम्मती दिली अन इतरानी नाकं मुरडत का होईना हे स्थळ स्विकारलं.
१८६५ साली  वयाच्या २१ व्या वर्षी रामजी सपकाळ यांचा भिमाबाईशी विवाह झाला. धर्माजी मुरबाडकर आज धन्य झाले. भिमाबाई दिसायला अत्यंत सुंदर, लाघवी स्वभावाची अन धार्मिक वृत्तीची स्त्री होती. पुढेच याच महामायेच्या पोटी कोटी कोटी कुळे उद्धारणारा महासुर्य जन्मास येणार होता. अशी सर्वगुण संपन्न पत्नी लाभल्यामुळे रामजी कृतार्थ झाले. पण अनेक अडचणी पुढे उभ्या ठाकल्या होत्या. माहेरची लोकं भिमाबाईचा अपमान करु लागली. त्यांच्या बरिबरीचा नवरा मिळाला नाही असं एकंदरीत मत होतं. आज पर्यंत ज्या घरात ती वावरली त्याच घरात सासरच्या स्टेटस्वरुन भिमाबाईचा पदोपदी अपमान होऊ लागला. आपल्याच घरच्यांकडुन अशी वागणुक मिळाल्यावर मन विदिर्ण झालं. माहेर नकोस झालं होतं. आज मात्र भिमाबाईनी माहेरच्या लोकांच्या या वागणुकीमुळे एक प्रतिज्ञा केली. जो पर्यंत दागीने वेशीवर वाळत घालण्याची हैसियत होणार नाही तो पर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याची शपथ घेतली.
महामानवाच्या आईवर अशी विचित्र वेळ यावी अन तेही आपल्याच माहेरच्यांकडुन या पेक्षा मोठं दुर्दैव नाही. पण आता माईनी हे चित्र पालटुन दाखविण्याच मनाशी ठरवलं होतं. लाख झालं तरी मागे वळुन बघायचं नव्हतं. मनाशी निश्चच केला होता. माहेरच्यांपेक्षा जास्त श्रीमंत, मान व सन्मान मिळवुन दाखवायचं होतं. अन त्या दिशेनी जोमाने कामाला सुरुवात झाली.
रामजी सपकाळ उद्योगी, फार कष्टाळु व अभ्यासु व्यक्ती. अत्यंत महत्वाकांक्षी, शुर, बाणेदार, स्वाभिमानी अन चिकाटीनी काम कारणारे दिर्गोद्योगी व्यक्ती होते. अशा व्यक्तीना प्रतिष्ठा लाभतेच. किंबहुना प्रतिष्ठा त्यांच्या पायाशी लोळते हेच सत्य आहे. या व्यतिरीक्त ते मैदानी खेळात अत्यंत तरबेज व चपळ होते. विशेष करुन क्रिकेट आणि फुटबॉलमधे त्यांच्या विशेष प्राविण्य होतं. फुटबॉलच्या मैदानात रामजी उतरल्यावर भल्या भल्याना धुळ चाटत. क्रिकेट मधे तरी चौकार व षटकारांचा वर्षाव होई. हे सगळं बघुन छावणीतील इंग्रज अधिकारी थक्क होत. एक महार इतका प्रविण, इतका चांगला  खेळाडु याचं त्याना फार कौतुक वाटे. रामजी सपकाळांच्या अष्टपैलु खेळाची ख्याती सा-या ईंग्रज अधिका-यांमधे पोहचली. अधिका-यांशी त्यांची वयक्तिक ओळख वाढु लागली. जेंव्हा हे अधिकारी रामजीना प्रत्यक्श भेटत तेंव्हा ते अजुनच चक्रावुन जात असतं. कारण रामजीचं व्यक्तीमत्व अत्यंत प्रभावी  होतं. भाषा प्रभुत्व, बोलण्याची शैली अन त्याच्या जोडीला ज्ञान. हे सगळे कॉंबिनेशनच एकाच व्यक्तीत आल्यामुळे ते पुढच्या व्यक्तीवर काही क्षणात असा  काही प्रभाव पाडत की ते आयुष्यभर आठवणित राहणारं व्यक्तिमत्व बनत असे. त्याना एकदा भेटलेला माणुस आयुष्यभर विसरत नसे. अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वानी एक वरिष्ठ इंग्रज अधिकारी प्रभावित होतो अन पुण्याच्या पंतोजी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी रामजींची शिफारस करतो. ईथे शिक्षण घेऊन छावण्यातील शाळांमधे मुख्यध्यापक बनता येत असे. रामजींसाठी ही एक सुवर्ण संधी  चालुन आली होती.  त्याचं ते सोनं करणार हे निश्चित होतं, अन त्यांची खरी जागा अशा ज्ञानाच्या ठिकाणीच होती.
रामजींची निवड होते अन ते पुण्याला रवाना होतात. ईथे शिक्षण घेत असताना जो काही पगार मिळत असे त्यातील अर्धा पगार आपल्या पत्नीला पाठवित असत अन उरलेल्या अर्ध्या पगारात निभावुन घेत. बघा  आपल्या बाबासाहेबांमधे जी अभ्यासु वृत्ती आली तीची मुळं ईथे रोवली होती. अत्यंत बिकट परिस्थीतीतही न डगमगता अभ्यास करुन परिस्थीतीवर मात करणे हा वारसा वडिलांकडुन बाबासाहेबाना मिळाला होता. वेतनातील अर्धा भाग मुंबईस नित्य नियमाने भिमाबाईसाठी पाठवुनही ते पैसे घर चालवायला अपुरे पडत. पण प्रतिज्ञा पुर्ण करायची होती. वाटेल ते कष्ट करण्याची तयारी होती. सांताकृझच्या छावनीत रस्त्यावर खडी टाकण्याचे काम करुन भिमाबाईनी घर चालविले. पण त्या भोगत असलेल्या हाल अपेष्टा रामजीना कळू दिल्या नाही. माईचं एकच ध्येय होतं. खुप शिकायचं अन पुढे जायचं.  कष्टाचे दिवस फार काळ राहणार नाही याची जाणिव होती. तिकडे रामजी मन लावुन अभ्याक करु लागले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे रामजी चांगल्या प्रकारे जाणुन होते. परिक्षेच्या वेळी दहा दहा तास अभ्यास केला अन परिक्षा उत्तिर्ण झाले.
आता रामजी सपकाळ हे छावणी शाळेतील मुख्य अध्यापक बनले. या बढ्तीमुळे त्यांच्या पगारात तर वाढ झालीच पण हा नुसता पगार व मान सन्माचा मुद्दा नव्हता. गावत महारकी करुन लोकांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणा-या महार जातीच्या लोकांत अत्मसन्मान जागृत करण्याच्या दिशेनी टाकलेलं हे एक क्रांतीकारी पाऊल होतं. छावणितील शाळेत एक महार माणुस मुख्य अध्यापक बनतो ही गोष्ट कित्येक उच्च वर्णियाना खटकणारी होती. संधि मिळाल्यास महारकी करणारे महार विद्येच्या बळावर काय गाठु शकतो हे दाखवुन देणारी व महारांच्या बौद्धिक क्षमतेची पावती देणारी हि एक मह्त्वाची घटना होती. यामुळे महारांमधे नवचैतन्य निर्माण होणार होतं. आपणही विद्येच्या क्षेत्रात नाव कमवु शकतो हा संदेश महारांमधे पोहचविणारी एक अत्यंत मह्त्वाची घटना होय. महाराना  गावबंधी, शिक्षणबंधी करुन कुजवत ठेवणा-या यंत्रणेला खिंडार पाडणारी एक नांदी होती. ओळखणा-यानी तेंव्हाच ओळखायला हवं होतं की महार काय करु शकतो. पण माझ्याच मातितील लोकानी माझ्या पुर्वजांच्या कार्यक्षमताना धार्मिक यंत्रणेच्या आधाराने निष्क्रिय केलं. पण आता आमच्या मदतीला पार युरुपातुन इंग्रजांच्या रुपात हे गोरे आले होते. आता महाराना बौद्धिक चुणूक दाखविण्याची संधी मिळणार होती. आमचं राख रांगोळी झालेल्या आयुष्याची पुनर्बांधनी करण्याची संधी मिळणार होती. अन लवकरच ह्या भुतलावर एक महामानव उगवणार होता.
आता रामजी सपकाळ सुभेदार-मेजर पदापर्यंत पोहचले होते. सैनिक छावणित त्यांचा मान सन्मान कित्येक पट्टिने वाढला होता. घरात भरपुर प्रमाणत पैसा खेळु लागला. येणा-या जाणा-यांची रोज वर्णी लागलेली असे. भिमाबाईनी सोन्या नाण्याची सगळी हौस पुर्ण करुन घेतली. अशा प्रकारे आज भिमाबाईची प्रतिज्षा पुर्ण झाली. एक दिवस खरोखरच भिमाबाई आंगभर सोन लेवुन माहेरी गेली अन आंघोळी नंतर अंगातलं सगळं सोनं दाराच्या वेशीवर वाळत घातलं. आज माहेरचे लोकं या वैभवाने भारावुन गेले अन भिमाबाईचा मान सन्मान परत आला.
आता रामजी सपकाळांच्या राहनीमानात अमुलाग्र बदल झाला. होणारच, आता ते सुभेदार-मेजर होते. त्यांच्या रुतब्याला शोभेल असं एकंदरित वागणुकीत बदलाव आला. जातिबांधवांची नित्य बैठक वाढली. आता कशालाही काही कमी नव्हतं. १८९० पर्यंत सुभेदाराना १३ अपत्ये झालीत. त्यापैकी बाळाराम, गंगा, रमाबाई, आनंदराव, मंजुळा व तुळसा हे वाचले. इतर सगळे अपत्य लहानपणीचे वारले. बाळारामानी सातार पोलिस दलात नोकरी स्विकारली व तो कायमचा वेगळा झाला. सुभेदारानी सगळ्या मुलींचे सैनिकी मुलांसोबत मोठ्या थाटामाटात लग्न लावुन दिले. या सगळ्या काळात सततच्या बदल्या अन इतर दगदगीमुळे भिमाबाईची तब्बेत खालावु लागली. दरम्यानच्या काळात सुभेदारांची बदली मध्यभारतातील (मध्यप्रदेश) येथील महु गावच्या लष्करी छावणीत झाली. या छावणीतील शाळेत सुभेदार स्थिरावले. आता भिमाबाईनी उपास तापाक वाढविले. एक जनकल्याणकारी महापुरुषाची आई बनण्याची जशी प्रत्यक स्त्रिची ईच्छा असते अगदी तसं भिमाबाईला वाटे. असा समाजोद्धारक पुत्र आपल्या पोटी जन्मास यावा म्हणुन भिमाबाई पुजा पाट व व्रतवैकल्ये नित्य करु लागली. अन गर्भ राहिला.
एका महामानवाच्या स्वागतासाठी ही महामाया व त्यांचं कुटुंब सज्ज होऊ लागलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा