रविवार, २० फेब्रुवारी, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकारिणी सभा)

आता शिक्षण संपले. अस्पृश्यांची सेवा हा मुख्य हेतु पण सोबतच अर्थार्जनाची सोय करणेही गरजेचे होते. वकिली व्यवसाय करण्याचे ठरले. पण वकिलीची सनद मिळविण्यासाठी जवळ पैसे नव्हते. पैशाची अडचण आली की नवल भथेना जिंदाबाद. मोर्चा नवलभाईकडे वळला. नेहमीप्रमाणे त्यानी याहीवेळेस पैशाची मदत केली अन एकदाची वकिलीची सनद मिळाली. जुलै १९२३ मधे बाबासाहेबानी वकिलीचा व्यवसाय सुरु केला.
मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात बॅरिस्टर म्हणुन कामाची सुरुवात केली, पण नेहमी सारखं ईथेही हजार अडचणी उभ्या होत्या. सॉलिसिटरकडुन सहकार्य मिळवुनच कर्तुत्व सिध्द होत असे. अन हे काही बाबासाहेबाना जमणारं नव्हतं. याही पुढे काही अडचणी होत्या. त्या काळात बहुतेक न्यायालयात इंग्रज अधिकारीच न्यायाधिश म्हणुन होते अन गो-या वकिलांशि त्यांचं चांगलं जमे. एकंदरीत बुद्धीच्या चमके पेक्शा कातडीची चमकच चुणूक दाखवुन जाई. त्यामुळे लोकांचा गो-या वकिलालाच वकिल पत्र देण्याचा कल असे. वरुन या व्यवसायात ते नवखे होते, जातिने अस्पृश्य अन आजु बाजुला सगळ्याच आघाड्याव्र असहकार अशा अनेक अडचणीना तोंड देता देता त्यांची पार दमछाक होत असे.  या सगळ्या भोंगळ कारभारामुळे बॅरिस्टर भिमराव आंबेडकर यांच्या वाट्याला परत एकदा हार आली. त्यानी आपला व्यवसायाचं क्षेत्र उच्च न्यायालयातुन उपनगर किंवा जिल्ह्या न्यायालयाकडे हलविलं.
प्रत्येक वकिलाला सुरुवातीला फार स्ट्रगल करावं लागतं अगदी तसचं बाबासाहेबाना सुद्धा स्ट्रगल करावं लागलं. पण ते हार मानणारे नव्हतेच. याच क्षेत्रात यश संपादीत करण्याचं ठरवुन टाकलं. नुसतं यशस्वी वकील नाही तर एक दिवस मी न्यायाधिश बनुन दाखविन अस ते म्हणत असतं. पुढे त्याना तशी संधिही आली पण समाजाचा डोलारा पेलायचा होता म्हणुन त्यानी हि संधी नकारली.
मुंबईच्या विधिमंडळावर नेमुन दिलेले अस्पृश्याचे पहिले प्रतिनिधी श्री. नामदेव घोलप यानी अस्पृश्यांच्या प्रश्नांचा भडीमार चालु केला. वेळोवेळी सरकारला कोंडीत पकडले अन सरकारला अस्पृश्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास भाड पाडु लागले. अस्पृश्याचे दुसरे प्रतिनिधी श्री. आनंदराव सुर्वे ह्या भंडारी जातीच्या सदस्याने ठाणे जिल्ह्यात कसे अस्पृश्याना सार्वजनी वाहनात घेत नाही याचा पुराव्यानिशी खुलासा केला अन विधिमंडळ गदागदा हालवुन सोडलं. अशा प्रकारे विधिमंडळातील अस्पृश्यांचे प्रतिनिधी जोमाने कामाला लागले होते.
४ ऑगस्ट १९२३ रोजी थोर समाजसेवक रावबहाद्दुर श्री सिताराम केशव बोले यानी विधिमंडळात एक क्रांतिकारी ठराव मांडला. अस्पृश्याच्या विकासासाठी मनातुन तळमळ असलेले हे महान समाजसेक फार दुर्दशी वृत्तीचे व समतेचे पुरस्कर्ते होते.  त्यानी ठरावत मांडले की,  सार्वजनीक पाणवठे, महाविद्यालये, शाळा अन न्यायालयात अस्पृश्याना मुक्त संचार असावा. या ठरावावर संवर्णानी नेहमी प्रमाणे टिका केली पण शेवटी तो ठराव मंजुर झालं अन सरकारने एक पत्रक काढुन हा ठराव कृतीत आणन्याचे आदेश दिले. मुंबईतील अस्पृश्यानी सी. के. बोले यांचा सत्कार केला अन त्याना सन्मानाने सुवर्णपदक अर्पण केले.
१९२४ भारतातिल इतिहासात तिन मह्तवाच्या शक्तींचा उदय याच वर्षात झाला.
स्वा. सावरकर यांची दि. ६ जाने. १९२४ साली येरवडा कारागृहातुन मुक्तता करण्यात आली, अन त्याना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. भारतातिल राजकिय कार्यात हस्तक्षेप करण्यास मज्जाव होता. त्यामुळे त्यानी सर्व शक्ति एकवटुन समतेवर आधारीत हिंदु धर्माची पुनर्बांधणी करण्याचा संकल्प सोडला. त्यानी रत्नागिरीत राहुन सहभोजन सारखे काही लहान सहान कामं केलेत.
मोहनदास गांधी नावाचा आजुन एक इसम येरवडा कारागृहात होता. पण प्रकृती बिघडल्यामुळे ११ फेब्रुवारी १९२४ रोजी त्यांची सुटका झाली अन त्यानी सुद्धा अस्पृश्य निवारण चळवळ हाती घेतली. अस्पृश्याना हरिजन म्हणून संबोधणारा हाच तो माणुस होय. पुढे पुणे करारात बाबासाहेबाना अडचणीत आणुन दलितांचं नुकसान करणारा हा माणुस. याला भारतातील लोक महात्मा वगैरे संबोधत. पुढे पुणे करारावर लिहेन तेंव्हा या माणसाबद्दल सविस्तर लिहणार आहे. तुर्तास ईथे यांच्या बद्दल एवढेच सांगण्यासारखे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर ठाकरसी सभागृह परळ येथे अस्पृश्यांची सभा बोलविली. महाराष्ट्राच्या काना कोप-यातुन सगळे अस्पृश्यांचे कार्यकर्ते हजर झाले. सभागृह तुडूंब भरुन गेले. आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी एका संस्थेची स्थापना करणे गरजेचं आहे अन लवकरात लवकर अशी संस्था स्थापन करुन समाज सेवीची गती वाढविण्याचं ठरलं.  या सभेत तसा ठराव पास करण्यात आला. या ठरावाच्या अनुषंगाने २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाची संस्था उदयास आली.
संस्थेचे ध्येय खालिल प्रमाणे होते.
  1.        शिक्षणाचा प्रसार, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे तयार करणे.
  2.      बहिष्कृत समाजात उच्च संस्कृतीची वुद्दी करण्यासाठी वाचनालये उघडणे, प्रबोधन करणे.
  3.      बहिष्कृत समाजाची सांपत्तिक स्थीती सुधारण्यासाठी शेतीविषयक व औद्योगीक प्रशिक्षण देणे.
या सभेचे अध्यक्ष सर चिमणलाल सेटलवाड होते. अन या संस्थेत मोठ्या प्रमाणात हिंदु संवर्णांचा समावेश होता. हिंदु संवर्णांच्या समावेशामुळे अस्पृश्य लोकांच्या मनात खदखदत होतं. सगळ्यानी तसं बाबासाहेबांकडे बोलु दाखविलं. ब्राह्मण लोकांच्या शिरकावामुळे नाराज असलेले कार्यकर्ते वेळोवेळी आपल्या कृतीतुन हा विरोध प्रकट करत. बाबासाहेंबाचे या सगळ्या हालचालिंवर अगदी बारिक लक्ष होते. त्यानी या सभेची वार्षिक प्रतिवृत्तामधे याचा खुलासा केला.
अस्पृश्य लोकांच्या विकासासाठी आम्हाल सगळ्य़ा अस्पृश्य कार्यकर्त्यांची गरज आहे, त्यांच्या सहकार्या शिवाय ही चळवळ उभी राहुच शकत नाही. पण रंजल्या गांगल्या माझ्या बांधवांचा विकास करायचा म्हटल्यावर सबळ व धनिक लोकांचीही गरज भासतेच. आज माझ्या समाजातिल कार्यकर्त्यांमधे समाज सेवीची जरी उत्कट ईच्छा असली तरी त्याला पैशाचीही जोड लागतेच, नाहीतर हि चळवळ कोलमळून पडेल. म्हणुन वरिष्ठ वर्गातील सधन आणि सहानुभुती बाळगणा-या लोकांचे सहाय्य घेतल्या खेरीज अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीचा कार्यक्रम सफल होणार नाही. तसे न केल्यास उलट आपले नुकसानच होईल.
काय तो द्रष्टेपणा, बाबासाहेब सगळे डावपेच अचुक मांड्त. संवर्णांच्या छळाला बळी पडलेला साधारण माणुस पेटुन उठला होता पण बाबासाहेब मात्र फार पुढचा विचार करत. अन ते खरही होतं. रागाच्या भारात संवर्णांची मदत नाकारल्यास काय होईल याचा आमच्या कार्यकर्त्याना अंदाज येत नव्हता, पण बाबासाहेबानी एकंदरीत परिस्थीती बरोबर हेरली होती. सहानुभूती बाळगणा-या लोकांचा मिळेत तितका आधार घ्यायचा अन आपल्या लोकांचा  उद्धार करायाचा अशीच निती अवलंबली होती. अशा प्रकारे आता  बहिष्कृत हितकारिणी सभा या छताखाली अस्पृश्य निवारणाच्या लढ्याची तय्यारी केली जात होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा