बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

पुस्तक परिचय - आणि पानिपत

पुस्तक : ....आणि पानिपत
लेखक: सजय सोनवणी
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन
किंमत: ४०० रुपये
पाने: ४७२

आज पर्यंत मराठे, निजाम व मोघलांच्या युद्धा संबंधी हजारो कादंबर-या आल्या असतील अन गेल्या असतील पण एकही कादबंरीचा हिरो महार नव्हता. यामुळे एकंदरीत लोकाना असे वाटु लागले की महार म्हणजे फक्त गाव महारकी करुनच जगाणारी जात होय. प्रत्येक लेखकानी इतिहास लिहताना प्रस्थापितांचे गुणगाण करणारे लिखाने केले. याच इतिहासकारांच्या लिखानातील लढवय्या महारांचा संग्रहीत लिखान म्हणजे हि कादंबरी. पण या सगळ्या लिखानात मग ती कादंबरी असो व बखर असो यात महारांची थोरवी, त्यांचा लढवय्येपण हे नेहमी कुठल्यातरी कोप-याद दडपुन टाकण्याचे काम करण्यात आले. पण संजय सोनवणी नावाच्या या महान लेखकाने हे सगळे दडपलेले, गाढलेले पुरावे एकत्र गोळा केले. विविध कादंब-यात आपला महत्व हरपुन बसलेल्या या बहुजन नायकाना ज्यांचा वास्तवात छळ झाला अन शेकडो वर्षापासुन पुस्तकात किंवा लिखानात सुद्धा बगल देऊन एक प्रकारे छळच झाला होता त्यांना नविन ओळख दिली. त्या बद्दल मी श्री. संजय सोनवणी यांचा आभारी आहे.

...आणि पानिपत
पुणे जिल्ह्यातील शिरुर जवळ वरुडे नावाचं गाव आहे. तिथे महारवडयात भिमनाक नावाचा महार राहात होता. त्याला तिन मुलं त्यापैकी रायनाक अन येळनाक या दोन मुलांच्या वंशाची हि कहानी आहे. येळनाक हा राजगडावर नोकरीला असतो. दरम्यान तिथे मुघलानी हल्ला केला. मुघलाच्या सैन्याशी लढाई करताना रायनाकचे सगळेच साथीदार मारले जातात. पण हा पडला महार गडी याने हार मानलीच नाही. सगळे गारद झाले तरी याची तलवार तडफत होती. एकटाच सगळ्याना पाणि पाजत होता. त्याचं हे शौर्य बघुन मुघलांचा सरदार खुष होतो. येळनाकाला जिवंत पकडण्याचा आदेश देतो. येळनाकाला जिवंत धरुन सरदारच्या पुढे उभं केल्या जातो. सरदाराचं नाव असतं अशरफिखान. या अशरिफिखानाची बुद्धी फार तल्लख. येळनाकाचं शौर्य त्याच्या डोळ्यात भरतं अन येळनाकला ईस्लाम स्विकारण्यास व ५० स्वारचा म्होरक्या होण्याची ऑफर देतो. सुरवातीला येळनाक हा प्रस्ताव अमान्य करतो, पण अशरफीखान फार हुशार. त्यानी येळनाक महार असल्याचं ओळखलं होतं. महार म्हणुन त्याची त्याच्याच समाजबांधवातर्फे जो छळ चाललेला असतो या बद्दल अशरफीखान चांगलाच जाणकार  असतो.  याच मुद्याला धरुन येळनाकचा मेलेला आत्मसन्मान जागरुक केला जातो. जातीच्या नावाखाली पायाखाली तुळवुन घेण्यापेक्षा ईस्लाम स्विकारल्यास तुला माणुस म्हणुन स्विकारलं जाईल. तु आज ज्या हिंदु धर्मात आहेस तिथे तुझ्या जातीवरुन तुझं स्थान ठरतं. पण माझ्या धर्मात आलास तर तुझं स्थान तुझ्या कर्तुत्वावरुन ठरेल. तेंव्हा तुच विचार कर तुला कुठला धर्म योग्य वाटतो. हे मात्र पटण्यासारखं होतं. हिंदु बनुन संवर्णांच्या पायी तुळविल्या जाण्यापेक्षा आपल्या कला गुणाना जिथे वाव आहे त्या धर्मात जाणे कधिही बेहत्तर. अन शेवटी येळनाक ईस्लाम स्विकारतो व हसन अली हे नाव धारण करतो. आता हसन अली सरदार अशरफिखान सोबत कित्येक लढाया फत्ते करु लागला. प्रत्येक विजया नंतर त्याच्या शौर्याची कदर होऊ लागली. पाहता पाहता हसन अली हा एक महार म्हणुन लाथा खाणा-या अस्पृश्या पासुन ५०० स्वारांचा म्होरक्या बनतो. ईस्लाममधे जातीभेद नसल्यामुळे त्याच्या दर्जाला शोभेल अशी बायकोही मिळते, बख्तियार नावाचा मुलगा होतो अन शाही थाटात जगु लागतो. दरम्यान काळात त्याने कित्येक लढाया फत्ते करुन अशरफीखानच्या सैन्यातील एक महत्वाचा व्यक्ती म्हणुन स्थान पटकावतो.
ईकडे त्याचा भाऊ रायनाक संताजीच्या सैन्यात भरती होतो नंतर धनाजी जाधवाच्या सैन्याकडुन लढु लागतो पण धनाजी जाधवानी शाहुशी संधान बांधल्यावर व याच दरम्यान गावातील पाटलाचा बळी गेल्यामुळे नाराज होऊन परत केंव्हाच तिकडे न फिरकण्याचा निश्चय कारतो. याला सिदनाक नावाचा मुलगा होतो. भिमनाकाचे दोन मुल एक मुसलमान बनतो अन शाही जिवन जगु लागतो. दुसरा महारकी करत वरुड्यात हिंदुच्या लाथा खात, फेकलेल्या तुकड्यांवर गुजारा करत असतो. तिकडे भिमनाकाचा नातु बख्तियार शानो शौकतिने वाढत असतो तर ईकडे दुसरा नातु सिदनाक मात्र फेकलेल्या तुकड्यावर कसं बसं जगत असतो. एक स्वाभिमान, आत्मसन्मानाने वाढत असतो तर दुसरा गुलाम, हिंदुंची चाकरी करणारा अस्पृश्य म्हणुन वाढत असतो. दोघांच्या अंगात रक्त भिमनाकाच पण धर्माचे संस्कार वेगळे. ईस्लाम मधे माणसाला माणुस म्हणुन वागणुक मिळत असते परिणामत: त्याच्या कलागुणांचा विकास होतो. दुसराही त्याच घराण्यातील पण हिंदु संस्काराच्या अस्पृश्यतेचा बळी चढलेला हा सिदनाका गुलामिच्या वेढ्यात अडकुन आयुष्याची होळी होताना भ्र शब्द न उच्चारता या नालायक व्यवस्थेशी ईमान राखत जगतो. पुढे या सिदनाकचं लग्न होतं. त्याला मुलगा होतो, रायनाकला आपला बाप भिमनाकच पोराच्या पोटी जन्माला आला असे वाटते अन त्याचं नाव रायनाक आपल्या बापाच्या नावावरुन भिमनाक असे ठेवतो.

दिल्लीचा तख्त पलटविणारा महार
आज पासुन ३०० वर्षा पुर्वी औरंगजेबाच्या दिल्लीत जाऊन तख्त पलटविण्याचा इतिहासात महाराचा मोठा वाटा आहे. ते सगळ् या पुस्तकात पुराव्यानिशी मांडलेलं आहे. औरंगजेबानंतर आलमगिरी आजमशहा दिल्लीच्या गादीवर बसतो. अशरफीखान हसन अली सकट दिल्लीच्या दिशेन कुच करतो. आजमशहाचा भाऊ मुअज्जमने भावाच्या विरोधात बंड केला. अशरफीखान सोबत हसन अली मुअज्जमला जाऊन मिळतात. आजमशहाचा पराभव करुन मुअज्जम तख्तनशिन होतो. आपल्या नावाची द्वाही फिरवुन बहाद्दरशहा हे नाव धारण करतो. या सगळया तख्ता पालटामधे हसन अली महत्वाची भुमिका वटवित असतो. दिल्लीतील राजकारणात महत्वाची भुमिका वट्वुन अशरफिखान अन हसन अली दोघेही अशरफीखानच्या जहागिरीत चिताहगड ला रवाना होतात.
मधल्या काळात बहाद्दुरशहासाठी मोठ्या मोहीमा जिंकुन देण्याचे काम अशरफीखान अन हसन अली यानी चोखपणे पार पाडले. प्रत्येक मोहिम जिंकुन दिली. एक महार दिल्लीच्या राजकारणात केवढा प्रभावी व्यक्तिमत्व बनला होता. ईकडे पेशव्याना मात्र याची भणकही नव्हती. फरक एवढाच होता की त्या महारानी हिंदूंची चाकरी सोडुन ईस्लाम स्विकारला होता अन अंगी असलेल्या उपजत गुणांचा डंका दाही दिशा वाजु लागला. अंगभुत गुणांचा विकास होण्यासाठी पोषक  वातावरन मिळताच एक महाराच्या क्षमतेच्या कक्षा ईतक्या विस्तारल्या की तो दिल्लीच्या तख्तमधिल प्रत्येक महत्वाचा कामात  नुसता सहभागी होत नाही तर दिल्लीच्या गादीवर कोण बसणार याचा निर्णयही (अशरफीखानच्या सोबतीने) तोच घेतो. दरम्यान बहाद्दुरशहाचा मृत्यु होतो अन त्याचा मुलगा जहांदरशहा दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी पाठिंबा मिळावा म्हणुन अशरफीखानची मदत मागतो. पण अशरफीखानला जहांदरशहाचा अय्याशी व उधळेपणाचा तिरस्कार असतो. म्हणुन अशरफीखान तटस्थ राहुन सगळं बघत असतो. तिकडे दोन महिन्याच्या डावपेचा नंतर जहांदरशहा आपल्या तिन्ही दावेदार भावांची हत्त्या करुन तख्तनशीन बनतो. आता अशरफीखानची जहागिरी जप्त करण्याचा खलिता पाठवितो. पण अशरफीखानच्या सोबतीला एक खंदा महार होता. अशरफीखाननी दिल्लीचा बादशहा जहांदरशहालाचा पायऊतार करण्याचं ठरवुन टाकतो अन हसन अलिच्या सोबतीनं इलाहाबादकडे कुच करतो. इलाहाबादला संय्यद बंधुशी संधान बांधुन दिल्लीच्या बादशहाचा तख्ता पालट करण्याचा आराखडा तयार केला जातो. बंगालचा सुभेदार फर्रुकसियर हा औरंगजेबाचा नातु. जहांदरशहाला बाद करुन फर्रुकसियरला गादीवर बसविण्याच ठरतं अन त्याला पाचारण करण्यात येतं.  फर्रुकसियर येताचा जहांदरशहाला बेतख्त होण्याचा हुकुम सोडण्यात येतो. त्यानी नकार दिल्यावर चढाई होते. चढाईमधे सगळ्यात महत्वाची आघाडी सांभाळणार लढवय्या हसन अलीच असतो. बादशहाला सळो की पळो करणारा हसन अली वजीराच्या आघाडीवर तुटुन पडतो. पराक्रमाची शर्थ करतो. जहांदरशहाच्या कित्येक आघाड्या उध्वस्त करतो. वजीर झुल्फिकारखान एक खंदा व धुर्त लढवय्या. पण हसन अलीच्या शौर्यापुढे त्याचाही टिकाव लागत नाही. वजीराला पळता भुई कमी करतो अन शेवटी जमिनीवर लोळवतो. नंतर वजीराचं डोकं कलम करुन फर्रुकसियर याना पेश करतो. या शौर्यावर खुष होऊन फर्रुकसियरने हसन अलीला सिपाहसालर या खिताबाने नवाजतो.
आता दिल्लीचा बादशहा फर्रुकसियर हा हसन अली व अशरफीखानच्या मर्जीतला असतो. अशा प्रकारे दिल्लीतील तख्ता पालट करणारा हसन अली हा पुणे जिल्ह्यातील वरुडे गावचा एक महार होय. 

पानिपतचा हिरो -  बख्तियार (एक महार)
ईकडे मात्र हसनचा भाऊ रायनाक लोकांची चाकरी करुन जगतो असतो. हसनने रायनाकला ईस्लाम स्विकारुन स्वत:चा उद्दार करण्याचे अनेक संदेश पाठविले पण तो नकार देतो. एकदा गावचा भट आजारी पडतो म्हणुन रायनाकचा मुलगा सिदनाक पुण्याला भटाच्या मुलाना खबर देण्यासाठी जातो. पण पुण्यात राज्य पेशव्यांच. महाराची सावलीही पडु नये असा नियम. सिदनाकाला या नियमाची तेवढी जाण नसते. त्याची सावली एका भटावर पडत अन तिथल्या तिथे पेशव्यांच्या सिपायाने सिदनाकचा सर कलम केला. सिदनाक शनिवार वाड्याच्या जवळच मारल्या जातो. दोष काय तर बामणावर सावली पाडली. तिकडे याच सिदनाकचा चुलत भाऊ बख्तियार मात्र पेशव्यांचे राज्य मोडुन काढण्याची अफाट शक्ती अंगी बाळगुन असतो. तसा बाजीरावाशी लढण्याचा योग येतो पण बाजीराव चोर वाटेने येऊन पळुन जातो अन बख्तियारचं स्वप्त स्वप्नच राहतं. नाहितर पानिपतच्या आधिच पेशवा बाजीरावचा सर कलम केल्या गेला असता अन तेही एक महाराच्या हाताने पण बाजीराव थोडक्यात बचावतो.
सिदनाकची हत्या झाल्यावर त्याचा मुलगा भिमनाक पोरका होता. तेंव्हा मात्र आजोबा रायनाकला आपल्या भावाची म्हणजे हसन अलीची गोष्ट पट्ते. या पेशव्यांशी बदला घ्यायचा असल्यास काकाकडे जाऊन ईस्लाम स्विकार असा सल्ला देतो अन भिमनाक पेशव्यांशी बदला घेण्यासाठी काकाच्या आश्रयाला उत्तरेस निघतो. याच दरम्यान सदाशिवराव भाऊ पानिपतच्या लढाईसाठी पुण्याहुन रवाना होतो. भिमनाक त्याच जथ्यात सामिल होऊन उत्तरेस निघतो. बापाच्या खुनामुळे खवळलेला भिमनाक पेशव्याचा सिर कलम करण्याचा मनसुबा बाळगुन असतो. वाटेत एकदा तसा योगही येतो पण बख्तियार काकाच्या आगमनाने ती संधी जाते.
पानिपतची लढाई तोंडावर येते. या लढाईत पेशव्याना शिकस्त देण्यासाठी नजीमखान अन बख्तियार (पुर्वाश्रमीचा महार) एकत्र येतात. लढाईच्या काळात भिमनाकचा काका अब्दालीच्या सैन्यात असतो तर भिमनाक ईकडे भाऊच्या सैन्यात. एक रणांगणात लढण्यासाठी असतो तर दुसरा चाकरी करण्यासाठी. एक मर्दुमकी गाजवत असतो तर दुसरा लाचारीचे जीवन जगत असतो. हा फरक आहे त्या हिंदूच्या जातियवादाचा, हा परिणाम आहे आहे गुणवत्तेला डावलण्या-या ब्राह्मणी व्यवस्थेचा,  अन पेशव्यांच्या काळात या जातीयवादाने कळस गाठला होता. हे दोघे बहाद्दुर अब्दालीला बरीच आमीश दाखवुन लढाईसाठी ईथे थांबवुन ठेवतात. अब्दाली मधेच उठुन परत जाण्याचा हट्ट धरे पण पेशव्याना पाणि पाजण्यासाठी त्याची नितांत गरज होते हे ओळखु असलेले हे दोन महारथी त्याला कुठल्याही किमतीत जाऊ देत नव्हते. शेवटी यांच्या मनासारखंअच होतं,  पेशव्यांशी आमना सामना होतो. बख्तियारने सगळी ताकत झोकुन दिली. कुठल्याही किमतीत पेशव्यांचा नायनाट करायचा असतो. आपल्या अंगातील मर्दुमकी दाखविण्याची ही आगळी वेगळी संधी असते अन पेशव्याना तलवारीने पाणि पाजण्यात येते. पेशव्यांच्या चिंध्या चिंध्या करणारा अब्दालीचा उजवा हात नजीमखान असतो तर डावा हात बख्तियार असतो. पेशव्यांचा नायनाट करणार शुर सरदार बख्तियार हा वरुड्याचा महार होय. पेशव्यांच्या सैन्याची दानादान उडते, बख्तियारचं सैन्य पेशव्याच्या सैन्याला उभं गवत कापावं तसं कापत सुटते,  विश्वासराव  धारातिर्थी पड्तो ईकडे भाऊही कोसळतो. हे सगळं पाहुन पेशव्यांचा सिर कलम करण्याची ईच्छा बाळगणा-या  भिमनाकाचं हृदय द्रवतं, कारण आम्ही दयावान माणसं. सगळे वैर विसरुन दया दाखविण्याची आमची जात. भिमनाकाला भाऊची दया येते, अन मैदानात मरणावस्थेत पडलेल्या भाऊला उचलुन नदिच्या पल्ल्याड नेऊन जीवनदान देणाराही त्याच वरुड्याचा महार भिमनाक असतो. अशा या शुर महारांच्या शौर्याची कथा उलगडण्याचं सोनवणी साहेबांचा हतखंडा फार निराळा. त्यानी एक एक घटना जिवंत उभ्या केल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीचित्रण अचुक टिपलय. आजच्या बौद्धाना अभिमान वाटावं असा हा इतिहास या कादंबरीने उलगडाला आहे. प्रत्येक बौद्धाच्या (पुर्वाश्रमीच्या महाराच्या) घरी संग्रही ठेवावी अशी ही महाराची वीर गाथा म्हणजे ........आणि पानिपत.
एकदा नक्की वाचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा