सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)

महाड सत्याग्रहानंतर देशातील सगळे संवर्ण चवताळुन उठले. जिकडे तिकडे आंबेडकरांच्या नावानी संवर्णांची आरडा ओरड चालु झाली. पण काही संवर्ण मात्र बाबासाहेबांच्या या कार्याने सुखावले होते. अशा संवर्णानी मुंबईतील दामोदर सभागृहात सभा भरविली. ब्राह्मण-ब्राह्मणेतर पाक्षिकाचे संपादक श्री. देवराव नाईक अन श्री. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या भाषणातुन संवर्णांचा चांगलाच समाचार घेतला. सनातन्यानी अशीच मुजोरी चालु ठेवल्यास एक दिवस हा देश व धर्म शेजारच्या अरबी समुद्रात उडी मारुन आत्महत्या करेल अशी टिका झाली.
पण आजुनही महाराना ठाकरेंवर शंकाच होती. बामण बोलतात एक अन करतात एक. ठाकरेना जरी मनातुन अस्पृश्यांविषयी कळकळ होती पण यांनी मात्र ठाकरेंची व नाईकांची सत्व परिक्षा घेण्याचे ठरविले. तुम्ही आमच्या बद्द्ल ईतकी आत्मियता दाखविता खरे, मग आमच्या हातचे पाणि सुध्दा प्यावे. प्रबोधनकार मुखवटे वाले व्यक्ती नव्हते. तत्वाला पटणारं बोलणारे अन तसे वागणारे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यानी महारांच्या हातुन पाणि पिऊन आपण परिवर्तनवादी आहोत हे सिद्ध केले. या नंतर मात्र प्रबोधनकारांकडे केंव्हाच शंकेच्या नजरेनी पाहिले गेले नाही. पुढे कित्येक चळवळीत ते सदैव अस्पृश्यांच्या बाजुने लढताना दिसले.
महाड सत्याग्रहात जे काही झाले त्याची चौकशी करण्यासाथी एक समिती नेमण्याचे ठरले अन श्रीपाद महादेव माटे या अस्पृश्य पुढा-याने शेटजी भटजींची बाजु घेतली. खरंतर हे अस्पृश्य चळवळीचे एक खंदे कार्यकर्ते. पण ही चुक त्याना चांगलीच भोवली. एका चुकिमुळे आयुष्यभरातील सेवा मातीत मिसळली अन ते कायमचे अस्पृश्य चळवळीच्या नजरेतुन उतरले. कर्मवीर शिंद्यानीही अशिच एक चुक नागपुरच्या परिषदेत केली अन त्यांचंही असच झालं. महार हा चळवळी बद्दल अत्यंत जागरुक व संवेदन शिल आहे. इतर समाजाच्या तुलनेत हा समाज फार दयाळू व तेवढाच कणखर सुद्धा आहे. याची ही दुसरी प्रचिती होती.
सावरकर नावाच्या रत्नागिरीतील एका हिंदु पुढा-याने मात्र महाड सत्याग्रहाला आपला पाठिंबा असल्याचे श्रद्धानंद जाहिर केले. मलातरी ती हिंदु पुढा-याने अस्पृश्याच्या बाजुने फोडलेली डरकाळीच वाटते. आपल्याच धर्माच्या माणसाच्या स्पर्शाने पाणि बाटते  अन गायीचे मुत्र शिंपडल्याने ते पाणि शुद्ध होतेच कसे? हा कसला शास्त्र आहे? असे शास्त्र, धर्मशास्त्र मला मान्य नाही. आपल्याच धर्मातिल बांधवाना अशी हीन वागणुक दिल्या जाते पण गोमास खाणा-या यवनाना पाणि घेण्याची परवागनी आहे हा नुसता दळभद्रिपणा आहे.  सनातन्यानी आधुनिक विचारांचा अवलंब करुन जातिभेद मिटविण्यास सज्ज व्हावे. आंबेडकरांचा लढा न्यायाचा लढा असुन  माझा या लढ्यास पुर्ण पाठिंबा आहे असे घोषीत केले." पण शेवटी आंबेडकरानी धर्मांतराच्या फंदात पडु नये असा एक बामणी टोमणा मारलाच. म्हणुन मला सावरकरांची निती केंव्हाच पटली नाही. तरी त्यांची वेळीवेळी आंबेडकराना आपला पाठिंबा दर्शविण्याची जिगरबाजी, सनातन्याना खडसावण्याची रोखठोक पद्धत, अन जाहिरपणे अस्पृश्यांच्या बाजुने उभे ठाकण्याच्या धाडसीपणाचं कौतुक करावं तेवढं कमीच. कदाचित स्थानबद्दता नसती तरी ते बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लाऊन रणांगणात उतरलेही असते.
सावरकरानी डरकाळी फोडली एवढा एक अपवाद वगळता हिंदु सनातनवाद्यानी सर्वत्र देशभरातील वृत्तपत्रातुन बाबासाहेबांवर टिकेची झोड उठविली. प्रत्येक पेपरात रोज बाबासाहेबांविरुधा आगा ओकली जात होती. हजारो वर्षाच्या मनुवादी संस्काराना मुठमाती देणारा किंबहुना मनात खोलवर रुजलेल्या अनिष्ठ व संवर्णहितांच्या प्रथाना उपटुन फेकणा-या महाबलीचा पहिला वार इतका अचुक व प्रभावी बसला की सगळ्या सनातन्याना दिवसा तारे दिसु लागले. एकंदरीत जिकडे तिकडे बाबासाहेबांवर टिका होत असतानाच अस्पृश्यांमधे मात्र बाबासाहेबांची लोकप्रियता वा-याच्या वेगाने वाढत होती. पण होणा-या टिकेला प्रतिउत्तर देणेही अपरिहार्य होते.
३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत भारत नावाचा नवा पाक्षिक काढण्यात आला. काय समर्पक नाव उचललं बाबासाहेबानी बघा. बहिष्कृ, कोण तर आम्ही. अन कुठे तर भारतात. दोन वेगळे शब्द दोघांचे अर्थही वेगळी. या आधिचा पाक्षिक मूकनायक. शब्दांची अशी अचुक निवड करायचे कि सगळा सार त्यातुन ओझरत असे. भारतातील बहिष्कृतांची व्यथा सांगणारा हा जोडीदार आता बाबासाहेबांच्या साथीला उभा झाला होता. याच्या माध्यमातुन आता भारत देश गदागदा हलवुन सोडायचा होता. सर्वत्र होणा-या टिकेचा परामर्श घेणारा पहिला लेख झडकला.
जो पर्यंत आम्ही हिंदु आहोत तो पर्यंत देवळात जाणे हा आमचा हक्क आहे. देवाचे दर्शन घेणे आमचा हक्क आहे. खरंतर देवळात गेल्यावाचुन आमचं काहिही अडत नाही. आम्ही स्वत:चा बळावर आयुष्याला कलाटणी देऊ शकतो पण आमचा अधिकार बजाण्यात मागे राहणे आम्हाला मान्य नाही. काही झाले तरी तो आम्ही बजाविणारच. ईथे प्रश्न देवाच्या श्रद्धेचा नाहिच मुळी. प्रश्न आहे हक्काचा. श्रद्धा आहे की नाही ते कोणालाच तपासुन पाहता येणार नाही. तसेच देव सुद्धा आहे की नाही हे ही सिद्ध करता येणार नाही. पण देवाच्या नावाने जो मंदीर बांधण्यात येतो तिथे जाण्याचा आमचा अधिकार, हक्क कुणीच हिरावु शकणार नाही. फार लवकर सामुहिकरित्या देवळात धडकण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. तळे झाले, देवळे राहिले. अन आतातरी सनातन्यानी आपला हेका सोडुन दयावा अन अस्पृश्याना त्यांचा अधिकार बहाल करावा. वेळ आलीच तर अशा धर्मावर पाणिही सोडायला आम्ही माग पुढे पाहणार नाही. पण जोवर आम्ही हिंदु म्हणुन आहोत तोवर आमचा अधिकार बजाविण्यासाठी आम्ही सर्व आघाड्यांव संपुर्ण ताकत लावुन लढु.
अशा प्रकारचा सडेतोड अग्रलेख झडकताच सारे सनातनी परत एकदा खळबळुन जागे झाले. बाबासाहेबांवर तुटुप पडले. देशातिल सारे वृत्तपत्र आग ओकत होते. संवर्णानी सगळी शक्ती एकवटुन बाबासाहेबांच्या विरोधात दंड थोपटले.
बाबासाहेब नुसतं संवर्णांचा समाचार घेत असे नाही. आपल्या अस्पृश्यांमधे स्वाभिमान जागे करण्यासाठी ते सतत लिखान करित.
बळी बक-याचा दिल्या जातो, सिंहाचा नाही. तुम्ही बक-यासारखे वागता म्हणुन हे सनातनी तुमचा जागो जागी बळी देत आहेत. अरे तुमची राश कोंबड्या, बक-याची किंवा गायीची नाही. तुम्ही सगळे सिंह राशिचे वीर आहात. खर्डाची लढाई गाजविणारा सिदनाक महार हा तुमचाच पुर्वज आहे. रायगडचा किल्ला लढविणारा रायनाक महार हा सुद्धा तुमचाच पुर्वज आहे. अशा निधड्या छातीच्या शुर महारांची जात तुमची. तुम्ही लढवय्या जातिचे पराक्रमी पुरुष आहात. हि गुलामी झटकुन टाका. सगळे बंध तोडुन टाका अन स्वाभिमानाने जगायला शिका. मेलेल्या गायीचे मांस खाणे बंद करा. ईज्जतीने जगायला शिका. अशा प्रकारे स्वाभिमान चेतविणारे लिखान सुरु झाले अन आता बाबासाहेबांच्या जोडीला आलेल्या या नव्या सोबत्याच्या (बहिष्कृत भारत) सहय्याने चळवळ अत्यंत वेगाने पसरु लागली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा