शनिवार, ५ मार्च, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १६ (महाड सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन)

समाज समता संघ:
सप्टे १९२७ ला समाज समता संघाची स्थापना झाली. हिंदु धर्माती अस्पृश्य वर्गाला वेदमंत्रांचा अधिकार बहाल करण्यासाठी या संघानी काम चालू केले. यातून महारांचे वेदीक मंत्रानी लग्न लावण्याचे काम झपाट्याने सुरु झाले. या संघाची लोकं वेद मंत्रानी महारांच्या विधी उरकायचा सपाटा लावला. जिकडे तिकडे महारांमधे उत्साहाचे वितावरण दिसू लागले. या संघाचे सभासद आळीपाळीने एक दुस-या अस्पृश्य व स्पृश्य सभासदांकडे सहभोजन घडवुन आणत.  महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार श्री. भा. वि. वरेकर यानी या कामासाठी स्वत:ला झोकुन दिले अन समतेचा धार्मिक नि वेदिक मंत्र-पुजा आघाडीचा धुरा आपल्या खांद्यावर घेऊन अस्पृश्यनिवारणाच्या कार्यात उडी घेतली.
तिकडे अमरावतीला गवई यानी याच वर्षी म्हणजे १९२७ च्या ऑगष्ट महिन्यापासुन अंबादेवी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह चालविला होता. काही झाले तरी मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे अशा हट्टाने ते पेटले होते. त्या आधी बाबासाहेबानी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यापासुन खेड्या पाड्यातिल लोकं पेटुन उठलित होतीच. अस्पृश्य अधिकाराची मागणी करण्यासाठी तर संवर्ण वर्चस्व कायम ठेवण्यासाठी एकमेकां सामोरे उभे ठाकले. एकंदरीत समाजातिल दोन्ही गट शोषित व शोषक हे पेटुन उटले. पण या वेळेस अस्पृश्य आपला अधिकार मिळवुनच दम घेणार असा एकूण पवित्रा होता. इंग्रजांच्या मेहरबानीमुळे सनातन्यांच्या अमानुष छळाच्या विरोधात किमान आवाज उठविण्याची तरी संधी मिळाली होती. इंग्रज नसते तर आजही परिस्थीती तशीच असती. मंदिरांच्या प्रवेशाची विश्वस्तांकडे विनंती करणारे बरेच पत्र व निवेदन देऊन झाले होते. आता सत्याग्रहाद्वारे मंदिरात प्रवेश केल्यावरच दम घेणार असेही कळविण्यात आले. अमरावतीला अस्पृश्यांची परिषद भरविण्यात आली. बाबासाहेब या परिषदेचे  अध्यक्ष होते. याच दरम्याना बाबासाहेबांचे जेष्ठ बंधुंचे निधन झाले. परिषदेत काही महत्वाचे ठराव पास करण्यात येतात व पुढे महाडचा सत्याग्रह उभा ठाकला असल्याने हे सत्याग्रह तीन महिन्यासाठी स्थगीत करण्याचा ठराव पास करण्यात आला. थोडक्यात महाड पेटवायचे होते म्हणून अंबाबाईला विश्रांती देण्यात आली.
तिकडे महाड्मधे सत्याग्रहाची जोरदार तयारी चालली होती. सनातन्यांचे धाबे दणाणले होते. अस्पृश्य समाज आजवर आपल्या अधिकारांचा बळी देत अंगभूत कर्तबरीला धर्माच्या नावाने विसर्जीत करुन जगत होता. ही माणूस म्हणून एका अर्थाने विटंबाना होती तर त्याचा दुसरा अर्थ साही होता की इथला जातीयवादी नि मनुवादी समाज आपल्याच भावंडाच्या उपजत गुणाचा मारेकरू बनला होता. पण आता मात्र तोच अस्पृश्य जागा होताना दिसत होता.  धर्म नि मनुवाद विसर्जीत करुन नवा इतिहास लिहण्याच्या दिशेन पाऊल टाकत होता. त्याचा पहिला संग्राम महाडात लढला जाणार होता. महाड व आसपासच्या भागात जिकडे तिकडे सत्याग्रहाचे वारे वाहु लागले. सत्याग्रहाची तारीख २५ व २६ डिसेंबर १९२७ जससशी जवळ येत होती तसतसे सनातन्यांची धुसफुस सुरु झाली.
१७ नोव्हे. १९२७ रोजी सनातन्यानी सत्याग्रहाचे तीन तेरा वाजविण्यासाठी वीरेश्वर मंदिरात सभा घेतली. ही बातमी कानावर येताच सुरभा टिपणीस व बापु जोशी या कार्यकर्त्यानी आपले  भीम सैनिक घेऊन थेट सभेवर धडक मारली. समोर भिमसैनिकांचा ताफा बघुन सनातन्यांची बोबळी बसली. एकेकाला चांगलाच चोप देत भीम सैनिकानी सनातन्यांची सभा उधळुन लावली. पुण्यातील हिंदु सभेच्या कार्यकर्त्यानी महाडच्या सनातन्यांची समजूत काढण्यासाठी महाडला येऊन बरेच प्रयत्न केले पण ऐकतील ते कसले मनुवादी, त्यानी एक नाही ऐकलं अन आपला रेटा तसाच ठेवला.
या सनातन्यानी जिल्ह्याधिका-याला मध्यस्ती बनवुन महाड सत्याग्रहावर चर्चा घडवून आणली. कुठल्याही परिस्थीतीत सत्याग्रह होऊ नये अशी भुमिका घेतली. सत्याग्रहावर जिल्हाधिका-याने बंधी घालावी अशी विनवणी केली. पण जिल्हाधिका-याने तसे करण्यास साफ ईनकार केला.
आता मात्र सनातन्यांचे सगळे मार्ग बंद झाले कुठल्याही परिस्थीतीत हा सत्याग्रह होणे अटळ होते. काही झाले तरी सत्याग्रह होऊ दयायचा नाही. महाराना तळे बाटवु दयायचे नाही असा चंग बांधण्यात आलेला होता. त्यासाठी सनातन्याना एक युक्ती सुचली ती अशी....
१२ डिसेंबर १९२७ रोजी १) नरहरी वैद्य २) पांडुरंग धारण ३) नारायण देशपांडे अन यांचे इतर सोबती अशा एकुण ९ जणानी बाबासाहेबांवर दिवाणी न्यायालयात खटला भरला. एक महार जातीचा वकील आमच्या चवदार तळ्यातील पाणी बाटविण्यासाठी सत्याग्रह करतो आहे. जेंव्हा की महाड नगरपालिकेने खुद्द हे तळे अस्पृश्यांसाठी बंद केले असता असा दळभद्रिपणा करणा-या आंबेडकरांवर कारवाई करावी अन आमचे धर्माचे रक्षण करावे. 
एवढच करुन हे सनातनी थांबले नाही, तर त्यानी महाड येथील दुय्यम न्यायालयात दुसरा दावा केला. कुठल्याही परिस्थीतीत तळ्य़ाला हात लावु देणार नाही असा पवित्रा घेतला होता.
१४ डिसेंबर १९२७ रोजी या दुय्यम न्यायालयाचा निकाल लागला. न्या. वैद्य यानी अस्पृश्यानी न्यायलयाचे दुसरे आज्ञापत्र येईस्तोवर वाट बघावी, असा निर्वाळा दिला. ईथे मात्र आंबेडकरांपुढे खरा न्यायालयीन पेच उभा ठाकला. ते स्वत: कायद्याचे जानकार असल्यामुळे कुठे काय करावं नि काय न करावं याची त्यांना जाण होती. आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी की ११ व्या दिवशी होणारी सभा घ्यावी ते या पेचात पडले. आता सत्याग्रह रद्द करणे अवघड होते. अन न्यायालयात खटला प्रलंबित असताना जर काही कमी जास्त घडले तर ते सरकारची आज्ञा मोडल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता होती. पण बाकी सगळी तयारी तर झाली होती. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन शेवटी काही झाले तरी सत्याग्रह करायचाच असे ठरले. इकडे सगळे डोळे लावून वाट पाहात होते की बाबासाहेब काय निर्णय घेतात ते... पण अखेर बाबासाहेबांनी जाहीर केले की ठरल्या प्रमाणे सत्याग्रह होणार व त्यासाठी कार्यकर्त्याना जोमाने कामाला लागण्याची आज्ञा दिली. झालं... सर्वत्र एकच जल्लोष उडाला.
आता मात्र तिकडे सनातनी चवताळून उठले. सरकारही आता नविन अडचणीस तोंड देण्यासाठी सज्ज होणार होते. गांधी नावाच्या माणसाने राजकीय हक्कासाठी स्वातंत्र्य नावाची बोगस चळवळ उभी करुन सरकारला वेठीस धरलेच होते. बहुसंख्य हिंदुंच्या बळावर सरकारला घाम फुटेल असे सत्याग्रहस्वरुप सनातनी कारवाया चालु ठेवल्या होत्या. त्यामुळे बिचारी इंग्रज मायबाप सरकार ज्यानी आम्हाला समतेचा विचार मांडण्याची मोकळीक दिली अशा सरकारची जिकडे तिकडे फजिती केली जात होती, अन या सगळ्या कार्यक्रमाचा सुत्रधार होता गांधी.
महाडमधे अवध्या दहा दिवसात परिषद भरणार होती पण कुणीच जागा देईना. अशावेळी सदा माणुसकीसाठी जागणारा पण आजच्या आधुनिक सनातन्यानी आतंकवादी म्हणून हिनविल्या जाणा-या मुस्लीम समाजातील त्या काळचे एक महान विभुती मो. फत्तेखान यानी परिषदेसाठी आपली जागा देण्यासाठी पुढाकार घेतला. फत्तेखान यानी आपण अस्पृश्य परिषदेसाठी जागा देणार असे जाहीर करताच सनातन्यांच्या चेह-यांवरील विजयाचे भाव क्षणात ओसरले. जागेच्या प्रश्नावरुन अस्पृश्याना अडचणीत आणण्याचा त्यांचा डाव एका मुस्लीम बांधवानी पद्धतशीरपणे हानुन पाडला होता.
जागा मिळाली, परिषदेसाठी भव्य मंडप टाकण्याचे काम चालु झाले. पण आता सनातन्यांकडे दुसरे व शेवट्चे हत्यार होते ते उपसले गेले. परिषदेस येणा-या अस्पृश्याना गावातील कुठल्याच व्यापा-याने वस्तू विकायच्या नाही असा निर्णय घेण्यात सनातन्यांद्वारे घेण्यात आला. एकूण काय तर येणा-या सत्याग्रहींची कोंडी करणे हा एकमेव उद्देश होता. कारण काय तर ते पाणी पिणार होते. तळ्याला हात लावणार होते. हा असा पण्याचा लढा सुरु होण्या आधीच दाण्याचा लढा आड येणार होता. पण अनंतराव चित्रेनी हाही डाव हाणुन पाडला. दुस-या गावातुन अन्न धान्य मागविण्याची सोय लावली. त्यामुळे जर कुणाचे नुकसान झालेच असेल तर त्या व्यापा-यांचेच झाले. अशा प्रकारे जागा व दाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात आला. बघता बघता ही परिषद एका दिवसावर येऊन ठेपली. तिकडे महाडमधे अस्पृश्यानी पाठीवर शिदो-या बांधून महाडच्या दिशेनी कूच केली. बाबासाहेबांच्या एका हाकेवर हजारोंच्या संखेनी लोकं महाडात उतरू लागली. सत्याग्रहाची जंगी तयारी सुरु झाली व ईकडे बाबासाहेब मुंबईहुन महाडला निघण्याची तयारी करत होते.
२४ डिसेंबर १९२७ रोजी सकाळी पद्मावती नावाच्या आगबोटीने आपले कार्यकर्ते भाऊराव गायकवाड, राजभोज, शिवतरकर, सहस्त्रबुद्धे व प्रधान बंधु इ. फौजफाटा घेऊन हा अस्पृश्यांचा सेनापती महाडच्या दिशेनी कूच करतो. आज बाबासाहेब अत्यंत महत्वाच्या मोहिमेवर निघाले होते. मोहीम फत्ते करण्यात ब-याच अडचणी होत्या. मधेच न्यायालयाचा पिल्लु निघाल्यामुळे ते अस्वस्थही होते. पण ही वेळ माघार घेण्याची नव्हती. आता गरज पडली तर सरकारच्या विरोधातही दंड थोपटावे लागतील अन तशी तयारी करुनच ते महाडच्या दिशेनी वा-याच्या वेगाने सुटतात. सकाळी ९ वाजता निघालेला हा महाबली सायंकाळी ५.३० च्या दरम्यान हरेश्वरला पोहचतो. प्रवासात प्रत्येक बंदरात या सेनापतीची सेना स्वागतास उभी होती. बंदरात उभे असलेले भीम सैनिक आपल्या सेनापतील महाडच्या दिशेने जाताना बघून दुरुनच सलाम करत होती व भीम गर्जनानी आकाश दुमदुमवूण सोडत होती. हरेश्वर ते दासगाव प्रवासासाठी  बोट बदलण्यात आली. बाबासाहेब अंबा नावाच्या बोटीवर चढतात अन पुढे महाडच्या दिशेनी रवाना होतात. निरोप देणार-या सैनिकांचे डोळे पानावत होते तर स्वागत करणा-यांमधे जल्लोश होता. बाबासाहेबांच्या पावन पावलांच्या स्पर्शाने समुद्रकिना-यावरील प्रत्येक दलीत उद्धारुन गेला होता. दुरुनच का होईना पण त्याना बाबासाहेबांचे प्रत्यक्ष दर्शन घडत होते. आपला नेता या मार्गाने गेला या घटनेनी आंबेडकरी जनता भारावून जात होती. तसं प्रत्येक घरातून किमान एक माणूस आधिच महाडला जाऊन पोहचला होता पण ज्याना जाता आले नाही ते जागो जागी बंदरावर गर्दी करुन बाबासाहेबाना सलामी देत होते.  
२५ डिसेंबर १९२७ ला दुपारी १२.३० ला ही सेना दासगावला धडकली. तिथे ३५०० हजार भीम सैनिक आधिपासुनच  सेनापतिची वाट पाहात होते. बाबासाहेबांचं जंगी स्वागत झालं. सत्याग्रहांचा जयजयकार गगनला जाऊन भिडतो.
बाबासाहेबांना घेण्यासाठी पोलिसांची गाडी उभी होतीच. आपल्या कार्यकर्त्याना पाच पाच च्या रांगा करुन शिस्तीने चालण्याची आज्ञा करुन बाबासाहेब पोलिसांच्या गाडीत बसतात व जिल्हाधिका-याला भेटण्यासाठी निघतात. बॅंड बाजाच्या वाज्या गाज्यात हे सत्याग्रही  परिषदेच्या दिशेनी निघतात.
हर हर महादेव, बाबासाहेब आंबेडकरकी जय, अशा घोषणा देत दासगाव ते महाड हे ५ मैलाचा अंतर कापत सत्याग्रही दुपारी २.३० च्या दरम्यान परिषदेच्या मंडपात पोहचतात. या मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी श्री अनंतराव चित्रे पुढे येतात. कार्यकर्त्यांचं स्वागत करताना ते रायगडकडे बोट दाखवून इशारा करतात. आपल्या उदात्त कार्यात यश यावे म्हणून समतेचा आदर्श घडविणा-या महाराजांच्या नावाने घोषणा देणे सुरु होते. त्याच बरोबर शिवाजी नावाचा समतेचा राजा घडविणा-या वीर मातेच्या नावानेही घोषणा सुरु होतात. हे सगळं करतांना, महाराना पाटिलकी ते किल्लेदार पदापर्यंत नेमणा-या शिवाजी महाराजांच्या भुमीत आज आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागत आहे याचे दु:खही होत होते. पण आज तो लढा लढावाच लागणार होता. शिवाजी महाराज व जिजाऊच्या घोषणा देत जमाव पुढे सरकला. 
अख्या मंडपात विविध सुचनांची फलकं, शुभविचाराच्या पाट्या लावण्यात आलेल्या होत्या. संपुर्ण मंडपात एकच एक फोटो लावलेला होता अन तो फोटो होता मोहनदास क. गांधी यांचा. या फोटोलावण्यामागची भुमिका काय असावी याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तसं गांधी हे केंव्हाच दलितांचे नेते नव्हते ना बाबासाहेब त्याना आदर्श मानीत, तरी त्यांचाच एकमेव फोटो तिथे का लावला याचं गुपित कायम गुपितच राहीलं. १९२७ मध्ये बाबासाहेबांची उंची आजून अधोरेखीत व्हायची होती असे म्हणा किंवा गांधीचा दलित द्वेष आजून जगा सामोर यायचा होता असे म्हणा. कारण काहिही असो, पण महाड सत्याग्रहात बाबासाहेब व अस्पृश्यांनी गांधीना मान देण्याचा मोठेपणा जरुर दाखविला होता. पुढे गांधीनी तो जपला नाही ती गोष्ट वेगळी.
तोवर जिल्हा आधिका-याला भेटुन बाबासाहेब थेट मंडपात आले. भोजनाची वेळ झाली होती. त्यानी स्वत:साठी वेगळे अन्न नाकारले अन समस्त सत्याग्राह्यांसाठी जे अन्न शिजविले होते तेच अन्न खाऊन पुढच्या कामाला लागले.
एकंदरीत परिस्थीती चिघडेल की काय अशी सरकारला धाकधुक होतीच. एवढामोठा जनसमुदाय पेटून उठल्यास आवरणे अवघड होईल याची सरकारला जाण होतीच. हिंदु सनातनी संघटनांचा सरकारवर दबाव होताच. सनातनीही धुसफुसत होतेच. एकंदरीत परिस्थीती पाहता सरकारची गोची झाली होती.  काही अनर्थ होऊ नये म्हणून तळयाच्या आसपासच्या भागात धारा १४४ लागू करण्यात आली. म्हणजे माणसांना तिकडे फिरकता येणार नाही याची सोय लावली गेली.
पहिले दिवस: २५ डिसेंबर १९२७
सायंकाळी ४.३० वाजता अखेर परिषद सुरु झाली. स्वागताध्यक्षाने भाषण दिले व नंतर अध्यक्षीय भाषणासाठी बाबासाहेब उभे झाले. ते उभे राहताच संपूर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट झालाबाबासाहेब आंबेडकरकी जय, अशा घोषणा झाल्या अन बाबासाहेबानी माईक हातात घेऊन व भाषणास सुरुवात केली.  आता मात्र सगळया मंडपात एकदम शांतता पसरली. बाबासाहेब बोलु लागले व सत्याग्रही त्यांचा एक शब्द कानात साठवु लागले....
सनातन्यानी अमानुषपणाचा कळस गाठला आहे. गुरा ढोराना जे पाणी मिळते त्याला स्पर्श करण्याचा आम्हाला अधिकार नाही, ही अस्पृश्यता आता आपणच धुवुन काढायची आहे. खरंतर या चवदार तळ्याचे पाणी न प्याल्याने आम्ही मरणार नाही. आज पर्यंत आमचे अडले नाही किंवा अडणारही नाही. ते पाणि पिऊन आम्हाला अमरत्व प्राप्त होईल असेही नाही. पण आम्हाला तिथे अटकाव घालण्यात येतो तो अटकाव तोडायचा आहे. आमच्या मूलभूत अधिकारावर जी गदा आली ती घालवायची व हक्क बजावायचा म्हणून ही सगळी धडपड चालु आहे. या लोकानी आम्हाला माणूस म्हणून स्विकारावे व तळ्याचे पाणि आम्हास खुले करावे हीच आमची मुख्य मागणी आहे. ही सभा समतेची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी बोलावली आहे. आता समतेचे वारे देशाच्या काना कोप-यातुन वाहू लागले आहेत. जिकडे तिकडे अस्पृश्य बांधव पेटुन उठले आहेत. आम्हाला फार दिवस अटकाव करता येणार नाही. अटकावाच्या विरोधात जी शक्ती एकवटु लागली आहे त्याचा अंदाज घेतला आहे. ही शक्ती अटकावाचे सगळे बांध तोडुन सा-या बेळ्यांना व गुलामीला गंगेत नेऊन मिसळारी आहे. प्रवाहाचा वेग, अन भावनांचा उद्रेक असा खळखळत निघणार की सा-या सनातनी प्रथा या महापुरात बुडुन दम तोडतील. महाड नगरपालिकेनी मणुष्य जातीला काळीमा फासणारा ठराव पास करुन एक लज्जास्पद निर्णय घेतला आहे. आता याच भूमित सनातनी आत्याचार परतवून लावण्याची शपथ घेऊया अन कुठल्याही किमतीत आपला मूलभूत अधिकार मिळवुनच दम घेणार असा निर्धार करु या......” अशा प्रकारे बाबासाहेबांच भाषण झालं व सगळा समाज पार न्हाऊन निघाला होता. नव्या दिशा दिसू लागल्या होत्या. आता अंधारातुन बाहेर पडण्याची आशा जागी झाली होती. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याच्या दिशेनी मार्गक्रमन चालु झाले होते. भविष्यातील आंदोलनाच्या उग्रतेची ही नांदी होती.
त्यानंतर मणुष्य जातिला काळीमा फासणारी व असमतेचा पुरस्कार करणारी हिंदु समाजाची धर्मचोपडी मनुस्मृती याचा निकाल लावण्याची कुजबुज सुरु झाली. या मनुस्मृतीने आमच्या समाजाच्या कित्तेक पिढ्या भस्म केल्या होत्या. आज मनुस्मृतीला भस्म करण्याचा मानस काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. मग श्री. सहस्त्रबुद्धे यानी पुढाकार घेत मनुस्मृती नावाचा सनातन्यांचा ग्रंथ दहन करण्याचा ठराव मांडला. राजभोज यानी या ठरावाला आपला पाठिंबा दर्शविला. मनुस्मृती बद्दल आपल्या समाजात एक रोष होता. तो इथे व्यक्त होणार होता. त्यासाठी या ठरावाला संमती द्यावी म्हणून कार्यकर्ते मोठ्या त्वेषाने घोषणा देऊ लागले. व एकदाचं बहुमताने मनुस्मृती दहनाची ठराव संमत झाला.
ठराव पास झाल्यावर आता प्रत्यक्ष मनूला गाडण्याचा कार्यक्रम उरकायचा होता. मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिषद मंडपाच्या पुढे एक खड्डा खोदण्यात आला. लोकानी मनुस्मृतीच्या काही प्रती गावातुन विकत आणल्या. कित्येकाना याची आधीच माहिती मिळाल्यामुळे कांहिनी प्रती सोबत आणलेल्या होत्याच. शेवटी रात्री ९ वाजता मनुस्मृतीच्या प्रती खड्ड्यात टाकण्यात आल्या व एका बैराग्याच्या हाताने मनुला आग देण्यात आली. मनुस्मृतीला पेटविल्यावर जोरात घोषणा सुरु झाल्या. अख्या मंडमात जल्लोष झाला. हजारो वर्ष ज्या तत्वज्ञानाने धर्माच्या आडून आम्हाला गाडले आज त्याची प्रत गाडण्यात आली. अशा प्रकारे मनुचे जाहीर दहन करुन अस्पृश्यानी आपण समतेची कास धरली आहे याचा संदेश उभ्या भारताला दिला. खरं तर १९२६ मधे एक वर्षा आधी मद्रास प्रांतामधील ब्राह्मणेत्तर नेत्यानी मनुचे जाहीर दहन केले होते. पण त्या दहनात अन या दहनात बराच फरक होता. ईथे थेट समाजाच्या सगळ्यात उपेक्षीत व मनुने ज्यांच्यावर अमानुष अत्याचार केला त्या वर्गाने, अस्पृश्याने थेट मनुवर परतुन वार केला होता. मनुवाद्यांसाठी ही घट्ना फार मोठी होती. हा प्रतिकार आकाशाला भोक पाडण्याच्या मनोबलाने  फेकलेल्या दगडागत होता. अस्पृश्यांचा निश्चय, निर्धार व आत्मबलाचा जाहीर शक्तिप्रदर्शन करणारा हा दिवस होता. नव्या लढ्यास सज्ज असल्याची ही घोषणा होती. या घोषणेनी देशातील सनातनी पेटुन उठले. दिसेल त्या अस्पृशाला जमेल तशा पद्धतिने ठेचण्याचे काम चालु होणार होते. पण आता मात्र अस्पृश्य नुसता प्रतिकार करणार नव्हता तर प्रतिहल्ला चढविण्याच्या वळणावर येऊन ठेपला होता. गुलामीची जाणीव झाली होती. ती झिटकारण्याची व त्या साठी दोन हात करण्याची सगळी पुर्व तय्यारी झाली होती. महाडची परिषद म्हणजे स्वातंत्र्याच्या पुर्वसंधेची घोषणा होती. आता गुलामगिरी एकदाची घालवुनच दम घेण्याचा निर्धार पक्का झाला होता. अशा प्रकारे मनुस्मृतीच्या दहन कार्याने परिषदेचा पहिला दिवस संपन्न झाला.
दुसरा दिवस: २६ डिसेंबर १९२७
हा परिषदेचा दुसरा दिवस होता. बाबासाहेबाना एकंदरीत परिस्थीतीची जाण होती. सनातन्यानी चवदारतळ्याचे प्रकरण न्यायालयात दाखल करुन तात्पुर्ती अडचण उभी केली होती. आता सनातनी व अस्पृश्य या मधे सरकारले पडणे अपरिहार्य होते. सरकारनी बाबासाहेबाना सत्याग्रह करु नये किंवा केल्यास सरकारला अडचण होणार नाही या पद्धतिने तो सत्यग्रह चालवावा अशी विनंती केली. जिल्हाधिका-याने स्वत: बाबासाहेबांकडे तशी विनंती केली. कुठलाही अनर्थ घडू नये म्हणून पोलिस यंत्रणा सज्ज झाली होती. चवदार तळे व परिसरात १४४ धारा लागु केली होती. बाबासाहेब ही सगळी परिस्थीती बघुन लोकांच्या मनाचे वेध घेण्याचे ठरवितात. ते म्हणतात....
प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल येईस्तोवर वाट बघणे व नंतर जो काय निर्णय घ्यायचा तो घेणे असा एक पर्याय आहे. किंवा सरकारची तमा न बाळगता सत्याग्रह करणे व तळे अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी लढा उभारणे असा दुसरा मार्ग आहे. आपण जर सरकारला न जुमानता नियमांचं उल्लंघन करुन सत्याग्रह केला तर सरकारचा रोष ओढवुन घ्यावा लागेल. आज या इंग्रज सरकारच्या मेहरबानीमुळे आपण किमान सनातन्यांच्या विरोधात आवाज तरी उठवु शकतो. आपल्या हक्काची मागणी करु शकतो. पण सरकारच्याच विरोधात गेल्यास कार्याची गती मंदावेल. मी स्वत: बद्दल बोलायचे झाल्यास सरकारचे नियम मोडल्यामुळे माझी वकिलीची सनद काढुन घेतली जाऊ शकेल. पण मी त्याला घाबरत नाही. माझी सत्याग्रहाची तयारी आहे. आता मला तुमचे मत आजमावायचे आहे. तुमची मनातुन तयारी आहे का? सत्याग्रह केल्यास तुरुंगात जावे लागेल हे मात्र नक्की. तुरुंगात जाण्याची तय्यारी ठेवा. तुरुंगात घातल्यावर माफी मागु नका. हाल अपेष्टा सहन करणार पण समतेचा लढा मागे घेणार नाही असा निर्धार करा.  मी सांगतो म्हणुन तुरुंगात जाणारे मला नको आहेत. तर तुरुंगात जाईन पण अस्पृश्यता घलवीन असे म्हणणारे मला पाहिजेत. अशा प्रकारे भाषण देऊन बाबासाहेबानी सत्याग्रहाचा ठराव मांडला तो म्हणजे "सत्याग्रह करायचेच" असा होता. ठरावाच्या बाजुन १२ मते पडली तर विरोधात ८ मते पडली. याचा अर्थ काही झाले तरी लढू असा ठराव संमत झाला. पण काही अस्पृश्य पुढा-यांचं मत मात्र वेगळं होतं. न्यायालयाचा निकाल येईस्तोवर वाट पाहणे जास्त सोयीचं असेल अशा मताचे ते होते.
अशा प्रकारे दुपारचं काम संपेस्तोवर पुण्यातील ब्राह्मणेत्तर नेते जेधे-जवळकर महाडच्या परिषदेत दाखल झाले. मंडपात त्यांचं जंगी स्वागत झालं. याच जोडीने महाड सत्याग्रहात ब्राह्मण लोकांचा समावेश नको अशी अट बाबासाहेबांकडे घातली होती. पण अस्पृश्य निवारण कार्यात ब्राह्मणांच्या सहकार्याची गरज तर होतीच पण माझा लढा जातीचा नसून नितीचा आहे असे सांगून बाबासाहेबांनी ती अट अमान्य केली होती. आता मात्र जेधे-जवळकर विना अट परिषदेस हजर झाले होते. बाबासाहेबांच्या मनात खरी करुना होती. सुरुवातीला त्यानीही आवेशात येऊन सत्याग्रह करायचाच असा ठरावाला पाठिंबा दिला. अजून त्याना एकंदरीत न्यायिक परिस्थीतीची जाण नव्हती. सत्याग्रह करायचे ठरले व प्रत्यक्ष कृतीत भाग घेणा-यांची नाव नोंदणी सुरु झाली. कारण तळ्याच्या परिसरात १४४ लागु असल्यामुळे तिथे गेल्यावर गोळीबार किंवा लाठिमार होणार इतके पक्के होते. त्यासाठी ख-या लढवय्यांची गरज होती. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुरुंगवास भोगायची तयारी असणे गरजेचे होते. बघता बघता सत्याग्रहाच्या प्रत्यक्ष कृतीत उतरणा-यांची यादी लांबत गेली. ४००० पेक्षा जास्त लोकानी प्रत्यक्ष कृतीसाठी आपली नावं नोंदविली. एवढा मोठा जनसमुदाय तळ्याच्या आवारात घुसून तळ्यावर तुटून पडण्याच्या मनसुब्यात होता. नुसतं बाबासाहेबांची एक हाक पुरे होती. पण बाबासाहेबानी एकंदरीत परिस्थीती ताळली. यात कित्येक लोकांवर लाठ्या काठ्या पडणार होत्या. त्याही पुढे जाऊन गोळीबार झालाच तर काहीना जीवास मुकावे लागणार होते. मागच्या वेळेस सनातन्यानी आपल्या बांधवांचं रक्त सांडविलं होतं, आता सरकरसुद्धा हेच करणार होते. परिस्थीतीचा एकूण आढावा घेता आततायीपणा करण्यापेक्षा न्यायालयाच्या निकालाची वाट बघणे हा पर्याय योग्य वाटू लागला.
या सर्व बाबींवर सखोल चर्चा झाली व काहिनी सत्याग्रह तहकुब करण्याचे सुचविले. यावर ठरावाच्या बाजुने असलेल्या लोकानी वाद घातला. चर्चा रंगत गेली. तिढा सुटेना. अशा प्रकारे सत्याग्राच्या बाजुने आणि विरोधात असणा-या लोकांची ही चर्चा दुस-या दिवशी अर्धवटच राहिली. चर्चा तहकुब करुन आता तिस-या दिवशी परत चर्चा करण्याचे जाहिर झाले.
तिकडे कार्यकर्ते मात्र तळ्याच्या आवारात तुटुन पडण्याची तयारी करीत होते. ईकडे नेते मंडळींमधे सत्याग्रह कराव की नाही हेच ठरत नव्हते. एकूण परिस्थीती फार नाजूक होत चालली होती. नुसतं बाबासाहेबांनी ’हं...’ म्ह्टलं तरी वादळा सारखे सगळे तुटून पडणार होते. पण असला प्रकार करणे किती योग्य याचा विचार करण्याचा विवेक बाबासाहेबांकडे होता. हे मार्ग प्रश्न सोडविण्याचे योग्य मार्ग नाहीत हे बाबासाहेब जाणून होते.

दिसरा दिवस: २७ डिसे. १९२७
आता तिसरा दिवस उगवला. रात्रभर खूप चिंतन मनन करुन बाबासाहेबांनी जरा वेगळा विचार केला होता. तिस-या दिवशी बाबासाहेबानी सत्याग्रह तहकुबीचा ठराव मांडला. परत भरपुर चर्चा झाली व शेवटी सत्याग्रह तहकुबीचा निर्णय घेण्यात आला. सत्याग्रह तहकूब करण्याचा ठराव संमत झाल्याचे मंडपात जाहीर करण्यात आले. हे ऐकुन मंडपातील कार्यकर्ते मात्र नाराज झाले. मंडपात एकच शांतता पसरली. वीरांचा हिरमोड झाला होता. सगळा उत्साह विरुन गेला होता. लढण्याचा आवेग रोखून धरल्याने मनं खिन्न झाली होती. बाबासाहेबांच्या या निर्णयाने तमाम अनुयायी नाराज झाले. कित्येक लोकानी ही जंग फत्ते करण्याच्या नुसत्या विचारानेच सुखावुन जात होते. अन हताश होऊन सगळे भीम सैनिक मंड्पात बसले व बाबासाहेबांचे भाषण सुरु झाले. बाबासाहेब म्हणतात....
सत्याग्रह तहकुब केल्यामुळे नाराज होऊ नका. मी हा निर्णय फार विचारपुर्वक घेतला आहे. मी सरकारला घाबरत नाही. पण आजची वेळ कायद्याच्या दृष्टिने पेचात पाडणारी आहे. हा निर्णय मी तडीस नेल्याशिवाय शांत बसणार नाही. फक्त तो दिवस आज नाही एवढेच लक्षात ठेवा. आपण जे काही करतोय ते कायद्याच्या चौकटी राहून करतो आहे. कायदा हातात घेतल्यास व सरकारच्या विरोधात गेल्यास जे मिळायचे तेही मिळणार नाही. म्हणून आपला लढा आडमुठेपणाचा नसाव तर कायदेशीर मार्गाचा असावा. याच कारणास्तव आपण हा सत्याग्रह तहकुब केला आहे. अशा प्रकारे बाबासाहेबानी अनुयायांची समजूत काढली व हा लढा पुढे पद्धतशीरपणे व कायदयाच्या चौकटीत राहून लढण्याचे जाहीर केले.
ठरल्या प्रमाणे अनुयायांची मिरवणूक निघाली. शांततेत तळ्याला वळसा घालून मिरवणूक सभा मंडपात आली व विसर्जित झाली. भिमसैनीक आपापल्या गावाच्या दिशेनी निघाले.
याच दिवशी रात्री चांभारवाड्यात सभा घेतली. चांभारानी दाखविलेली उदासिनता व निष्क्रियता त्याना एक दिवस भोवणार व त्यांची गुलामगिरीतुन केंव्हाच मुक्तता होणार नाही. तेंव्हा समस्त चांभार बांधवानी आता या अस्पृश्यांच्या लढाईत सक्रिय भाग घ्यावा अन आपल्यावरील कलंक धुवुन काढावे असे आवाहन केले.
त्यानंतर बाबासाहेब बुद्ध लेनी बघायला गेले व महाडवरुन आपला मोर्चा रायगडाकडे वळविला. बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांसकट रायगडावर मुक्कामी गेले. रायगडावर मुक्काम करुन नंतर मुंबईस रवाना झाले.
रायगडावर मुक्कामी गेल्यावर भिमसैनिकांच्या कानावर एक बातमी आली की सनातन्यानी रायगडावर जाऊन बाबासाहेबांना मारण्याचे ठरविले आहे. ही बातमी वा-यासारखी पसरली. तिकडे गडावर अस्पृश्यांचा राजा या कटकारस्थानापासून अनभिज्ञ होता. पण ते भीम सैनीक होते, शांत थोडीच बसणार होते. बाबासाहेबांवर जीव ओवाळुन टाकणारे कार्यकर्ते गावो गावी जमले व गडाला वेढा दिला. कित्येक शतकानंतर आज रायगडाला वेढा पडला होता. पण त्या अन आजच्या वेढ्यात बराच फरक होता. आज याच मातितील आपल्याच समाजातील शत्रुपासून अस्पृश्यांच्या राज्याच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी महार मावळे गडाकडे धावले व रात्रभर जागत खडा पहारा दिला. रात्रभर खालून भिमसैनिक ओरडून ओरडून वरील आपल्या सेनापतिला संदेश देत होते. जीवाला जपा, धोका आहे... आम्ही ईकडे पाहा-यावर आहोत तरी जिवाला जपा शत्रू आजून कोणत्या मार्गाने पोहचलाच तरी सावध रहा... वगैरे आवाज खालून येत होता. बाबासाहेबाना मात्र या वाक्याचा नीट अर्थ लागेना. गडाखालुन आवाज देणारे नेमके कोण? शत्रु की अनुयायी हेच कळेना.
शेवटी रात्र गुजरली व सकाळी त्याना कळले की आपल्या रक्षणार्थ भिमसैनिकानी रात्रभर उभ्या गडावर पहारा लावला होता. अखेर सकाळी कळलं की रात्रभर एकमेकांना आवाज देत जागे असलेले आपले भीम सैनिक पहा-यावर होते व बाबा साहेबांची खुशाली जपत होते. शेवटी अशा प्रकारे हा सत्याग्रह संपला व बाबासाहेब परतीला निघाले.

मंगळवार, १ मार्च, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १५ (महाड सत्याग्रहाची तयारी)

जुन १९२७ मंदिर प्रवेशाचा विचार विनिमय सुरु झाला. पेपर मधुन तशा बातम्या सोडण्यात आल्या. त्यामुळे लोकांचा एकंदरीत कल काय आहे तो आजमावण्याचा हा डाव होता. बाबासाहेबानी लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेण्याचे जाहिर करताच सनातन्यानी सडकून टिका चालू केली. आतातर धमक्याही येऊ लागल्या होत्या. अस्पृश्यानी नसले उद्योग करु नये अन्यथा त्याना धडा शिकविण्यात येईल अशी सर्वत्र चर्चा चालु झाली. बाबासाहेबाना जे हवं होतं ते मिळालं. सनातन्यांचा रोख काय आहे याचा त्याना अचूक अंदाज आला. आता त्या अनुषंगाने तेवढाच सशक्त लढा उभारणे गरजेचे होते. नुकतीच महाडची मोहीम फत्ते झाल्याचा आनंद होताच. आता मंदिर प्रवेशाची मोहिम हाती घ्यावयाची होती.
याच दरम्यान पेपरात एक क्रांतिकारी बातमी आली. मुंबईतील ठाकुरदास येथील नविन मंदीर सगळ्यांसाठी खुले आहे असे मंदिरांच्या संचालकानी जाहिर केले. हे वाचुन बाबासाहेब फार सुखावले. आपल्या कार्यकर्त्याना बातमीची खात्री करायला सांगितले. खात्री पटल्यावर संचालकांशी संवाद साधुन मंदिरात जाण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे बाबासाहेब सीताराम शिवतरकर व काही कार्यकर्त्याना सोबत घेऊन मंदिरात पोहचले. बाबासाहेबाना बघुन सनातन्यानी एकच गिल्ला केला. महार मंदिर बाटविण्यासाठी येथेही आला असा ओरडा करुन गुंडांच्या मदतिने दमदाटी सुरु झाली. बाबासाहेबानी धिटपणे त्याना उत्तर दिले की, मी संचालकांच्या आग्रहाने ईथे आलो आहे त्यांच्याच सांगण्याने परत फिरेन तुमच्या नाही. मग या सनातनी गुंडानी संचालकांशी बाचाबाची केली, त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली, दमदाटिही केली. संचालकांनी नमतं घेऊन बाबासाहेबाना प्रवेश न देताच परत जाण्याची विनंती केली. ईथे परत एकदा बाबासाहेबांचा पराजय झाला. सनातनी विजयी झाले. या घटनेने बाबासाहेब फार दुखावले.
इतर धर्मियांचे प्रचारक आमचा देव सगळ्यांसाठी खुला आहे, सगळ्यानी ईकडे यावे असे आवाहन करत असताना हिंदु मात्र आपला देव आपल्याच बांधवांपासुन बंदिस्त करते होते. आपल्याच लोकांपासुन देवाला दूर नेत होते. इतर प्रचारक बोलावत होते, हिंदु मात्र हाकलत होते. हा मूलभूत फरक होता. 
जुलै १९२७ पुण्यातील मांगवाड्यात अस्पृश्यांची सभा भरली. बाबासाहेब सभेस हजर होते. चांभारानी बाबासाहेबांवर टिका केली. तुम्ही फक्त महारांचच हीत बघता म्हणून तक्रार केली. आम्हिही अस्पृश्य आहोत, आमच्याकडे तुमचं लक्ष नसतं वगैरे बरच काही सुनावलं. यावर बाबासाहेबानी त्यांना झणझणीत उत्तर देताना म्हटलं की "मी जी वसतीगृह चालवित आहे ती सगळ्या अस्पृश्यांसाठी खुली आहेत. माझ्या घरी मांगाच्या पोराला शिक्षणासाठी ठेवलं आहे. पी. बाळु या चांभाराला मुंबई नगरपालीकेच्या सदस्यस्थानी नेमले आहे. तेंव्हा तुम्ही उगीच गैरसमज करुन घेण्यापेक्षा माझ्या कार्याकडे डोळसपणे पहावे. हिंदु संघटनांचे प्रेम मायावी आहे. मुसलमानाच्या धाकापायी हे तुमच्याशी गोड बोलतात. यांचा डाव ओळखून वागायला शिका. असे सडेतोड उत्तर देऊन चांभारांची कानऊघडणी केली व सभा संपली.
तिकडे महाडला सनातन्यानी चवदार तळे शुद्ध करण्याचा चंग बांधला. महारांच्या स्पर्शानी बाटलेले तळे गोमुत्र शिंपडुन  शुद्द करण्यात आले. हे ऐकुन बाबासाहेब फार संतापले. आता तळे परत शुद्ध झाल्यामुळे दलिताना मज्जाव होता. याच दरम्यान मंदिर प्रवेशाची बातमी अधे मधे येत असे. बाबासाहेब म्हणत की, आज पर्यंत अस्पृश्यता ही हिंदु धर्मावरिल कलंक आहे असा समज होता. पण आता कळले की तो या धर्मावरील कलंक नसुन आमच्या देहावरिल कलंक आहे. म्हणुन याची सफाई धर्माकडुन होणार नसुन आता ती आम्हीच करणार आहोत. आमच्या देहावरचा कलंक आता धर्माने पुसण्याची गरज नाही आम्ही तो स्वत: पुसु." धर्माचा अधिकार नाकारुन मानवी अधिकार निर्माण करण्याचा व आत्मसन्मानाने जगण्याचा तो नवा संकेत होता. माझ्या आयुष्याचं मुल्य कोण्या धर्मानी ठरवावं हे तत्वज्ञान नाकारण्याची सुरुवात ईथून झालेली दिसते. ती काही वर्षानी पुढे येवल्यातील घोषणेनी पुर्णत्वास येते. तर....
४ ऑगस्ट १९२७ रोजी महाड नगरपालिकेने आपला पुर्विचा निर्णय फिरविला अन तळ्यावर बंदी घालणारा नविन ठराव पास करुन घेतला. केवढा हा नालायकपणा. अस्पृश्याना आजवर सनातन्यानी अटकाव केला होता पण आता नगरपालिकेने ठराव पास करुन सनातन्यांच्या पाठिशी राहण्याचे ठरविले. आपलाच पुर्विचा निर्णय फिरविताना थोडीही लाज वाटली नाही.
आता उठाव अधिक तीव्र होणार हे जाहीर होते. परत एकदा चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याची बाबासाहेबानी भीम गर्जना केली.
पुण्यातील ब्राह्मणेत्तर पुढारी जेधे-जवळकरानी या सत्याग्रहास पांठिंबा देण्याचे जाहिर केले. पण त्यानी बाबासाहेबांपुढे एक अट ठेवली की या चळवतील सगळ्या ब्राह्मण कार्यकर्त्यास व पुढा-यास बाहेरचा रस्ता दाखवावे. बाबासाहेबानी ही अट नाकारली. तेंव्हा ते असं म्हणतात की ब्राह्मण आमचे शत्रु नाही, आमचा शत्रु आहे ब्राह्मण्य. अन ब्राह्मण्य हा कोणा एक अमुक तमुक जातीत नसून तो सर्वच उच्च वर्णिय समजल्या जाणा-या जातीत मोठ्या प्रमाणात आहे. माझे भांडण तत्वासाठी आहे. या पवित्र कार्यास तत्वनिष्ठेनी पुढे येणा-या प्रत्येकाचं स्वागत आहे. सत्याग्रहासाठी सभासदांची नाव नोंदणी सुरु झाली. जिकडे तिकडे लोकानी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी नावं नोंदविली. भारताच्या कानाकोप-यातुन पुढा-यानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे कळविले. ठराव फिरविल्याने आता धुगधुगणा-या आगिचे भडक्यात रुपांतर झाले होते. अन २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाडला सत्याग्रह करण्याची भिम गर्जना झाली व सा-या देशात ती दुमदुमु लागली.
बाबासाहेबानी या चळवळीचे परिणाम व तिव्रता याची लोकाना जाणिव करुन देण्यास सुरुवात केली.
या सत्याग्रहात शांतताभंग झाल्यास सरकार मधे पडणार हे निश्चित होते. कार्यकर्त्यानी कारागृहात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपली जबाबदारी ओळखुनच काम हातात घ्यावे. शांतता व कायदा सुव्यवस्था हातात घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपली जनता आतून पेटलेली आहे. मूलभूत अधिकार फिरविल्यामुळे आमच्या गालावर थापड मारल्या सारखे झाले. आता मात्र आम्ही हे सहन करणार नाही. सरकार मात्र आपल्यावर दबाव आणनार हे निश्चित होते. अन आपण हूकूम मोडीत काढला नि भावनांचा उद्रेक बाहेर पडल्यास तुरुंगात जावे लागणार हेही पक्के होते. त्यामुळे आता होणा-या महाड सत्याग्रहात सगळ्यानी तुरुंगात जाण्याची तय्यारी ठेवावी अशी बाबासाहेबांची भुमीका होती व ती इतरांना नीट समजावून सागंण्याचे काम चालू झाले. आपण हक्कासाठी लढा देणार आहोत तेंव्हा घाबरण्याचे कारण नाही. १०० वर्षे कुजत जगण्यापेक्षा घटकाभराचा पराक्रम मोलाचा असतो. आता महाडला पराक्रम गाजविण्याची वेळ आली आहे वगैरे विविध लेखनांतून व भाषणातून बाबासाहेब बोलू लागले. यामगचे कारण एकच, की येणा-या लढ्यात आपण कशाचा सामना करणार आहोत याची आपल्या बांधवाना नीट कल्पना असावी, एवढच. अशा प्रकारे आपल्या लोकांत नवचैतन्य भरण्याचे काम युद्धाची पुर्वतय्यारी म्हणून केले जात होते.
याच काळात पुण्यात एक अत्यंत महत्वाची घटना घडली. पुण्याचे ब्राह्मणी व भटाळलेले जातियवादी नेते टिळक यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांच्याशी बाबासाहेबांचा परिचय झाला होता. श्रीधरपतं अत्यंत पुरोगामी विचाराचे होते. त्यांचा जातियवादाला कडाडून विरोध होता. बाबासाहेबांच्या कार्यानी ते भारावून गेले होते. ते फार थोड्या अवधित बाबासाहेबांचे चांगले स्नेही बनले. अस्पृश्यांसाठी काहितरी विधायक काम करावं अन त्याना त्यांचा अधिकार बहाल करावा ते या मताचे होते. १९२७ च्या गणेशऊत्सवात केसरी तर्फे होणा-या कार्यक्रमामधे अस्पृश्यांना आमंत्रित करण्याचे त्यांनी ठरविले. केसरीच्या संचालकानी श्रीधरपंताना कडाडुन विरोध केला. पवित्र गायकवाड वाड्यात (आजचा टिळक वाडा) अस्पृश्याना बोलाविण्याच्या विचाराचा कडक विरोध झाला. सगळ्या संचालकानी श्रीधरपंताना धारेवर धरले. पण ऐकतील ते श्रीधरपंत कसले. समस्त संचालकांच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य कार्यकर्ता श्री. राजभोज यांचा श्रीकृष्ण मेळाव्याचे कार्यक्रम गायकवाड वाड्यात ठेवण्यात आले. मेळाव्यात अस्पृश्यांचे आगमन होताच सगळे ब्राह्मण चवताळले. कार्यक्रमात अस्पृश्याना धक्काबुक्की करण्यात आली. पण शेवटी श्रीधरपंतने हा कार्यक्रम घडवून आणलाच अन अस्पृश्यांबद्दल त्यांच्या मनात असलेली तळमळ दाखवुन दिली. श्रीधरपंतांच्या या धैर्याचे कौतुक करण्याचे ठरले. पुण्यात अभिनंदनपर सभा घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुण्याच्या पापी भुमित ज्योतिरावा नंतर आज परत एक क्रांतिकारी समाजोद्धारक ईथली पापे धुवुन काढण्यासाठी उभा ठाकला होता. हीच ती नालायक लोकांची नगरी जिथे अस्पृश्यांचा सगळ्यात जास्त छळ झाला होता. पण या भुमीचं वैशिष्ट्य असं की इथेच ती पापं धुवून काढणारी उद्धारकही वेळोवेळी जन्मास आला होता. यावेळी इथे श्रीधरपंतांच्या रुपाने एक नवे नाव उदयास आले होते. पुण्याच्या पापी इतिहासाला नेहमीच पुण्याचा इतिहास भारी पडला होता. तो आजही पडणार होताच, इतिहासात एक नवे पान लिहले जाणार होतेच. पण दुर्दैवाने तो लढा खूप दूरवर जाणार नव्हता एवढएच. तर ईथल्या सनातनवाद्यांचा या थोर पुरुषाच्या कार्याला विरोध होता. त्यानी हीन पातळीवर जाऊन श्रीधरपंतांचा छळ चालविला. नको नको ते आरोप सुरु झाले. अस्पृश्यांच्या बाजूने उभे राहण्याची किंमत मोजताना अनेक  आरोप व सामाजाती हल्ले सहन करावे लागले. जिवाला सळो की पळो करुन टाकणारा ब्राह्मण द्वेष पंताच्या मागे लागले. सर्वत्र त्यांची अवहेलना सुरु झाली. जातीतून प्रखर विरोध होऊ लागला. आपले दुपले सगळेच दुरावू लागले. एकूण त्यांचं जगण तिथे हराम करुन सोडण्यात आलं. हे सगळं सहन न झाल्याने शेवटी त्यानी आत्महत्या केली व आशेची एक किरण उगवण्या आधीच मावळली. हा भारतीय अस्पृश्य लढ्याला एक हादरा होता. 
पण ते मरण्याआधी बाबासाहेबाना एक पत्र लिहतात. त्यात ते म्हणतात हे पत्र तुमच्या हाती लागले तेंव्हा बहुतेक मी हे जग सोडलेले असेल. पण तुम्ही काळजी करु नका. मी मरत नाहिये. मी तुमची गा-हानी सांगण्यास मी कृष्णाच्या दरबारी जात आहे. येथील लोकानी, संवर्णानी अस्पृश्याची चालविलेल प्रतारणा बघवत नाही. तुम्ही लढा दया. पण तुमच्या लढ्याला यश आलच पाहिजे अशी विनविनी करण्यासाठी त्या वासुदेवाचे पाय धरयाला मी पुढे जात आहे. हे पत्र वाचुन बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले. एक चांगला मित्र आणि पुरोगामी विचारांचा नेता हरविल्याचं दु:ख त्याना आवरेना.
या सगळ्या प्रकारामुळे ते आजुन संतापले अन महाडचा सत्याग्रह अधिक तीव्र कसा होईल या दिशेने मोर्चेबांधणी सुरु झाली. आता अस्पृश्यांचा लढा उभा हिंदुस्थानाला गदागदा हलविणार होता. त्याची सुरुवात झाली.