शनिवार, २८ मे, २०११

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०

१९५५ पर्यंतच्या प्रवासात बाबासाहेबांच्या लेटरहेड्सनी कसा प्रवास केला याचा आपण धावता आढावा घेतला आहे. माझ्याकडे सुमारे १५० पेक्षा जास्त अस्सल हस्तलिखीत पत्रे उपलब्ध आहेत. बाबासाहेबांच्या नावानी कुणी काहिही बरळत सुटले आहेत. आमच्या पुढेच त्यांच्या चरित्रात विपर्यास करण्याचा कट चालविला जात आहे. ज्याना कुणाला बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही असली कागदपत्रांची खात्री करुन घ्यावयाची आहे त्यानी मला संपर्क साधावा. मी तसे कागदपत्र उपलब्ध करुन बाबासाहेबांबद्दल निर्माण केला जाणारा संभ्रम दुर करण्याचे माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न करीन.
सगळ्याना एकच विनंती आहे. संभाजी ब्रिगेड वा मराठा सेवा संघ जर बाबासाहेबांबद्दल काही सांगत वा लिहत असेल तेंव्हा त्यावर विश्वास ठेवू नका. हि लोकं आपल्या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम करीत आहे. बाबासाहेबांना चख्ख शिवाजी व भवानीचा अनुयायी बनविन्याचे षडयंत्र चालविले जात आहे.
ज्या तुकाराम महाराजाना नाकारुन बाबासाहेबानी कबिराना गुरु मानले त्या तुकाराम महाराजाला बौद्ध मंचावर जगतगुरु म्हणुन घुसडण्याचा कट ब्रिगेड व मराठा सेवा संघाने चालविला आहे.
तेंव्हा सर्व बौद्ध बांधवाना परत एकदा विनंती करतो की त्यानी ब्रिगेड वा मराठा सेवा संघाकडून होणा-या बाबासाहेबांच्या विपर्यास परतवुन लावण्यास सज्ज व्हावे.
जयभीम.

बाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०८


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३

१९३१ च्या शेवट पर्यंत बाबासाहेबानी आपल्या लेटरहेड मधे केलेला बदल अत्यंत उल्लेखनीय आहे. आज पर्यंत जे बाबासाहेब जय भवानीच्या लेटरडवरुन सर्व पत्रव्यवहार चलवित त्यानी १९३१ च्या शेवटी तो लेटरहेड बाद केला. या नंतर कधीच त्यानी जयभवानी वा आपल्या कुलदेवीच्या नावाचं लेटरहेड वापरलं नाही. यापुढील सर्व पत्र हे त्यांच्या नावानी छापलेल्या लेटरहेडवरच दिसतील.
बाबासाहेबांच्य पुढील सर्व पत्रव्यहारातील लेटरहेडवर त्यांच्या नावाखाली त्यांचे शिक्षण व पदव्या छापलेल्या दिसतात. खरं तर १९३० च्या आधिच त्यानी या सगळ्या पदव्या मिळविल्या होत्या. पण आता पर्यंत त्यानी त्या पदव्यांच्या ऐवजी भवानीला स्थान दिले होते. परंतू महाड सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या विचारांमधे अमुलाग्रह बदल घडून आला.
त्यानी प्रत्येक गोष्टीला चिकित्सकपणे पाहणे सुरु केले. किंवा आपण जे करणार त्याचं अनुकरण माझा भोळा समाज करतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बाबासाहेबानी प्रत्येक कृती करताना ती पुढे अनुयायांद्वारे अनुकरण करण्यात येणार आहे तेंव्हा ती अत्यंत विचारपुर्वक केली जावी यावर कटाक्षाने लक्ष दिले. अन्यथा माझा बांधव भरकडला जाऊ शकतो याची त्याना जाण होती.
याचाच परिणाम म्हणुन बाबासाहेबानी आपल्या कृतून भवानी देवीला बगल दिली अन दलिताना निरिश्वरवादाच्या दिशेनी पाऊल टाकण्याचा संकेत दिला.

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२

मे १९३१ मधले पत्र जिथे भवानी नाही.
हे बघा मित्रानो,
१९३१ मधिल हे पत्र व त्या लेटरहेड वरील चित्रातील बदल हे सांगते की बाबासाहेबानी भवानीला जयभीम ठोकला अन आपल्या लेटरहेडवर आता फक्त तलवार व लेखनी एवढचं ठेवलं. 
पहिल्या पत्रात तलावर अन लेखनी सोबत तो-यात दिसणारी भवानी माता ईथे बाबासाहेबानी सन्मानपुर्वक बाजूला सारून आपण त्या विचारधारेपेक्शा वेगळ्या विचारधारेचे आहोत याचा पुरावा दिला. आपल्या हजारो पिढ्यानी ज्या भवानीला कुलदैवत म्हणुन जोपासले त्या देवीचा सुरुवातीला बाबासाहेबानाही अभिमान वाटे हे पहिल्या लेटरहेडवरुन खुलासा होतो. पण आता मात्र ती देवी माझ्या वा माझ्या बांधवांच्या दु:खाचे निवारण करणार नाही व नुसती फसवी अन आभासी आदर्श बाबासाहेबानी ओळखली अन लगोलगो त्याना आपल्या आयुष्यात काहिच स्थान नाही हे सिद्ध करणारा पुरावा म्हणजे या दोन लेटरहेडमधील बदल होय.
बाबासाहेबांच्या जीवनात एक एक गोष्ट कशी बदलत गेली. त्यानी एकदम धर्मांतर केला नसुन तो विचार हळू हळु कसा आकार घेत गेला याचा अंदाज तुम्हाला या अस्सल पत्रांच्या लेखमालिकेतुन येईलच. बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातील अन शेवटच्या काळातील परस्पर टोकाचे वाटणारे धार्मिक विचार मधल्या काळातील एकंदरीत जुलमी अन जातियभेदाच्या समर्थन करणा-या हिंदूमुळे आकार घेत गेले. बाबासाहेबानी स्वत: आपल्यातील हिंदुला विसर्जीत करायला सुरुवात केली. बाबासाहेबांचे वडील अत्यंत धार्मिक हिंदु गृहस्थ होते. लहानपणी त्याना श्लोक व स्त्रोते म्हटल्याशिवाय सायंकाळचे जेवण मिळत नसे. अशा धार्मिक वातावरणात ज्याची जडण घडण झाली त्या बाबासाहेबानी आतल्या हिंदूचे विसर्जन करायला बराच वेळ लागेल हे ताळले होते. अन वरील पत्रांतील नमुन्यातुन ती आतमधल्या हिंदुच्या विसर्जनाची श्रुंखला आपल्याला बघता येईल.

जयभीम

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१

                                                              जयभीम मित्रहो.
भवानीचं चित्र असलेलं पत्र.
संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघानी बाबासाहेबांच्या नावानी जी काही चळवळ रुपी विपर्यासाची विकृती चालविली आहे ती आता थेट बाबासाहेबांवर घाला घालण्याच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. नेटवर अन सर्वत्र या लोकानी असा प्रचार चालविला आहे की बाबासाहेब हे शिवाजी महाराजांचे भक्त होते वा भवानी देवीचे ते भक्त होते. अन पुरावा म्हणुन त्यांचे अगदी सुरुवाते पत्र पुढे केले जाते ज्यावर जय भवानी असे लिहले आहे. तेंव्हा सर्व बौद्धाना सुद्धा शिवाजी महाराज पुज्यस्थानी आहे. तसेच भवानी माताही आहे. एवढ्यावरच न थांबता या लोकानी असाही प्रचार चालविला आहे की संत तुकाराम हे बाबासाहेबाना अत्यंत पुज्य स्थानी होते. म्हणुन आपल्या मंचावरुन तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करण्यात येत आहे. प्रतिप्रश्न केल्यास ते असे उत्तर देतात की बाबासाहेबानी स्वत: त्यांच्या पाक्षिकांमधून तसे लिहले आहे. पण हे लोकं एक साधी गोष्ट विसरतात की तसे असल्यास मग बाबासाहेबानी कबीरा ऐवजी तुकारामानांच आपले गुरु मानले नसते का? बाबासाहेबानी तुकारांमाचे काही कोट्स कुठल्या संदर्भात वापरले व त्याचा विपर्यास ब्रिगेडी लोकानी कसा चालविला आहे यावर मी लवकरच लेखमालीका (अस्सल पुराव्यांसकट) चालु करणार आहे. पण तत्पूर्वी हे शिवाजी व भवानीचा विपर्यास परतवून लावण्यासाठी आधी अस्सल पत्रांचे नमूने टाकतो आहे.
अगदी सुरुवातीला बाबासाहेबानी आपल्या लेटरहेडवर भवानीचे चित्र व तलवार अन पेन छापून घेतले होते. त्याचे कारण असे आहे की बाबासाहेबांचे मुळ आडनाव सपकाळ अन देवी भवानी ही सपकाळांची कुलदेवता. म्हणुन बाबासाहेबानी तसे चित्र छापून घेतले. पण नंतर हळू हळू त्यानी या देवताना हद्दपार करुन निरिश्वरवादी बौद्ध धर्माला आदर्श मानुन समतेची मुल्ये स्विकारली. पण ब्रिगेडी लोकांनी बाबासाहेबांच्या अगदी सुरुवातीच्या ( व नंतर टाकुन दिलेल्या) या भवानीचं भांडवल करुन बाबासाहेबांच्या चरित्रात शिवाजी घुसडविण्याचा चंग बांधला आहे. पण सुदैवाने बाबासाहेबांच्या एकून वाटचालीत कसा बदल झाला हे दर्शविणार सगळे अस्सल पत्र व लेटरहेट माझ्याकडे असल्यामुळे मी ते सर्व पत्र ईथे कालक्रमानूसार मांडणार आहे. आपल्या लोकांनी आता जागं व्हावं अन ब्रिगेडच्या विपर्यासाला विरोध करावा. आज जर आपण गाफिल बसलो तर उदया ब्रिगेडी बाबासाहेबांच्या चरित्रात दैवतांची घुसखोरी करवून इतिहास विकृत केल्या शिवाय थांबणार नाहीत.

जयभीम.

शुक्रवार, २७ मे, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुसरी)

लंडनला आगमन
२९ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब लंडनला पोहचले. या प्रवासात बाबासाहेबांची तब्बेत खालवली अन तिथे पोहचताच ते आजारी पडले. ताप, उलटी व जुलाबानी प्रकृती ढासळली. शिवतरकराना लिहलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात, प्रकृतीच्या बाबतीत मी सध्या आणीबाणीच्या प्रसंगातून जात आहे. ७ सप्टे १९३१ पासुन त्याना आराम वाटू लागले पण कमालीचा अशक्तपणा आला होता. ईकडे विधायक काम पुढे उभं ठाकलेलं अन प्रकृतीने मधेच घोळ घातला. त्याना मनातून वाटे की जरा आराम करावा पण हा आराम आपल्या समाज बांधवाना नडू नये म्हणून स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करुन कामाला सुरुवात केली.
या परिषदेत मुस्लिम लीगचे प्रतिनिधी अध्यक्ष सर मो. इक्बाल, ख्रिश्चनांचे डॉ. ह्स. के. दत्त, उद्योग मंडळाचे जी.डी. बिर्ला इत्यादी मंडळी हजर होती. या परिषदेचे आकर्षण, अन भारताचे अनभिषिक्त राजे श्री. गांधी मात्र आजून तिकडे घोड घालून बसले होते. त्यानी गोलमेजला येण्याचा ईरादा अद्याप जाहीर केला नव्हता. ईकडे सर्व सदस्य लंड्नात पोहचले होते. शेवटी २९ ऑगस्ट १९३१ ला गांधी महाशय मुंबईहुन लंडनसाठी रवाना होतात. ते १२ सप्टे १९३१ रोजी लंडनला पोहचतात पण तोवर गोलमेज-२ सुरु झाली होती.
 ७ सप्टे १९३१ रोजी दुस-या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेत घटना समितीअल्पसंख्यांक समिती अशा या दोन समित्यानी गोलमेज-२  चे प्रमुख कार्य करावयाचे होते. गोलमेज-१ मधे ठरलेल्या ब-याच गोष्टीना मुर्तरुप देण्याचे काम वरील दोन समित्यांवर सोपविण्यात आले होते. गोलमेज-१ च्या वेळी केलेल्या अहवालाची फेरतपासणी, विस्तार अन विवरण हे या परिषदेचे मुख्य कार्य होते. आता गांधी लंडनमधे आले होते. त्यानी १५ सप्टे १९३१ रोजी आपले पहिले वहिले भाषण गोलमेज-२ मधे झाडले. ते म्हणतात, कॉंग्रेस हि संस्था कोणत्याही एक जातीच्या, धर्माच्या किंवा वर्गाची प्रतिनीधी नसून सर्व धर्म, जाती अन वर्गाच्या लोकांची एकमेव प्रतिनीधी आहे. कॉंगेसचे मुख्य दोन ध्येय आहेत १) हिंदु-मुस्लिम ऐक्य २) अस्पृश्यता निवारण, अन अशा संस्थेचा मे एकमेव लोकनियुक्त प्रतिनीधी आहे. थोडक्यात मी अन फक्त मीच खरा भारताचा प्रतिनीधी आहे.
एवढे बोलून गांधी पुढे म्हणतात, कॉंगेस ही केवळ ब्रिटीश हिंदुस्थानातीलच नव्हे तर संस्थांनी जनतेतीलही ९५% लोकांची प्रतिनीधी आहे असा मी छातीठोकपणे दाव करतो आहे.

त्यावर हजरजवाबी बाबासाहेब लगेच प्रश्न टाकतात, ज्या ५% लोकांचं आपण प्रतिनिधीत्व करत नाही ते कोण आहेत जरा कळेल का हो गांधीजी?’

गांधी लगेच म्हणतात, डॉक्टर साहेब, कॉंगेस अस्पृश्यांचाह प्रतिनीधी आहे हे तुम्ही याद राखा.

बाबासाहेबाना काय कळायच ते कळलं. या गांधीनी आपण अस्पृश्यांचे प्रतिनीधी आहोत असा आव आणुन आमचे अधिकार विसर्जीत करण्याची पुर्ण तयारी केली आहे याच अंदाज आला. आता मोर्चेबांधणीचे काम जोमाने चालविल्या शिवाय गत्यंतर नाही याची जाण झाली.

या परिषदेतील गंमत अशी की याच दिवशी म्हणजे १५ सप्टे १९३१ रोजी बाबासाहेबाना समिती समोर भाषण करण्याची संधी मिळाली. ते उठुन उभे होतात अन भाषणास सुरवात करतात.
संस्थानीकांच्या मागण्या सरसकट वा आंधळेपणाने समितीनी मान्य करु नये. एखादया संस्थानीकाने संघराज्यात सामील होण्यापूर्वी आपल्या प्रजेचे समाजजीवन सुसंस्कृत करण्यास आपण समर्थ आहो हे सिद्ध केले पाहिजे. जमीनदार म्हणतात कि आपल्याला विशेष अधिकाराचे प्रतिनिधीत्व दयावे.  पण असा अधिकार जमीनदाराना दिल्यास स्वातंत्र्याचा अन प्रगतीचा हेतू निष्फळ ठरेल. कारण जमीनदार नेहमी क्रांतीविरोधी सनातन्यांच्याच पक्षाला झुकतं माप देतात.
जनतेच्या हक्काचे अन लोकांच्या कल्याणाचे हे तेजस्वी भाषण सभागृहातील संस्थानीकांचे अन जमीनदारांचे तोंड्चे पाणी पळविणारे भाषण ठरले. या जहाल मतामुळे जहागीरदार अन संस्थानीक हादरले. बाबासाहेबानी आपल्या धिकारावर पाणी फिरविणारे मत मांडण्याची काहीच गरज नव्हती असे त्यांचे मत झाले. बाबासाहेबांच्या या भाषणामूले त्या नंतर प्रत्येक संस्थानीक व जमीनदाराला वरील भाषणाचा धागा धरून आपले मत मांडणे अपरिहार्य होऊन बसले.  अशा प्रकारे १५ सप्टे चा दिवस संपला.

१६ सप्टे १९३१ रोजी सभागृहात जमीनदारांच्या चेह-याव नाराजीच्या लकीरा उमटलेल्या दिसत होत्या. बाबासाहेबांच्या भाषणाचा तो परिणाम आजुन ओसरला नव्हता. तेवढ्यात गांधी उठून भाषणास सुरुवात करतात.  परिषदेतील पुढारी लोक नियुक्त नसून सरकार नियुक्त आहेत. आंबेडकरांच्या मताला माझी सहानुभूती आहे. पण मी जमीनदारांच्याच बाजूने आहे. संस्थानीकानी आपल्या संस्थानामधे काय करावे हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही. या वाक्यानी गांधीचा नालायकपण जगजाहिर झाला. त्यानी गेव्हिंग जोन्स अन सुल्तान अहमद यांच्या मताचे समर्थन करुन सामान्य लोकांपेक्षा जमीनदार व संस्थानिकाना झुकतं माप दिलं.
आता गांधी परिषदेतील मुख्य मुद्याला हात घालतात, हिंदु, मुसलमान व शिख यांच्या स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास मी तयार आहे. तसं त्याना मिळायलाही पाहिजे. पण ऐतिहासिक कारण पुढे करुन आंबेडकरानी अस्पृश्यांसाठी जे प्रतिनिधित्व मागितले ते मला कदापी मान्य नाही. अस्पृश्याना विशेष अधिकार वा वेगळे प्रतिनिधित्व देण्यात येऊ नये असे मी आज  परिषदेला बजावुन सांगतो. परिषदेने तसे प्रतिनिधित्व अस्पृश्यांच्या ओटीत टाकल्यास मी कडाळुन विरोध करेन. मणिभवन मधेल डागलेल्या तोफेला दिलेले हे प्रतिउत्तर होय. गांधीना खरं तर ईथे यायचंच नव्हतं. पण बाबासाहेबांचा विरोध करुन अस्पृश्यांच्या हाती काहीच पडु दयायचे नाही या कपटबुद्धिने ग्रासलेल्या गांधीने फक्त कट कारस्तानं करण्यासाठी परिषदेस हजेरी लावली. आता अल्पसंख्यांक समितीपुढे गांधी काय घोळ घालणार हे चित्र स्पष्ट झालं होतं.
  
फेडरल स्ट्रक्चर कमिटी:
१८ सप्टे रोजी घटना समितीची (फेडरल स्ट्रक्चर कमिटी) बैठक सुरु झाली. बाबासाहेबानी गांधीना एक महत्वाचा प्रश्न विचारला. संघराज्याच्या विधिमंडळाचे अन संघराज्याच्या कार्यकारी मंडळाचे स्वरुप कसे असावे ह्यासंबंधी गांधीजीनी मांडलेले विचार हे त्यांचे स्वत:चे आहेत की कॉंगेसचे?
संघराज्याच्या घटने बद्दल विचार विनिमय चालू होता पण संघराज्याची स्थापना केंव्हा करावी यावर कोणीच बोलत नव्हते. शेवटी बाबासाहेबानी विषयाला हात घातला. अशा विविध विषयावर जंगी चर्चा रंगत असे. भांड्ण होत असत. वाद विवादाचा महापुर ओसंडुन वाहत असे. कित्येकांमधे चकमकी उडत असत. स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र राज्यघटनेचा उहापोह रंगुन जाई. घटना शास्त्राच्या इतिहासाची उजळणी होई.  या सगळ्या धामधुमीत एक व्यक्ती मात्र सर्वाना पुरुन उरत असे ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. कारण देशाची घटना बनविण्याच्या कामाची हि प्राथमिक फेरी होती. ईथी नुसतं बोलण्याला अर्थ नव्हता. त्याला अभ्यासाची जोड, अन आकडेवारीनी विश्लेषणाची गरज लागे. अन या बाबतीत बाबासाहेबांच्या तोडीचा कोणीच नव्हता. अत्यंत अभ्यास व विद्येचा सच्चा उपासक असलेल्या या महामानवानी आपल्या तेजानी वेळी वेळी हे सभागृल झळाळून सोडले. त्यांची भाषणे माहितीपुर्ण, इतिहासातील संदर्भासहित भविष्याचा वेध घेणारे असत. त्याच सोबत प्रत्येक भाषणांमध्ये उपयुक्त सुचनांचा भडिमार असे ज्याचं भान राखल्यास देशाची घटना एक परिपुर्ण घट्ना म्हणुन नावारुपाला येण्याचे सगळे अंगभूत गुण त्यात अंतर्भूत केलेले असत. अशा प्रकारे विविध क्षेत्रात लिलया वावरणारे अन चतुरस्त्र दांडगाई करणारे बाबासाहेब या परिषदेत आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून जातात. अशा प्रकारे जंगी चर्चा अन वाद विवादानी रंगलेली हे फेडरल स्ट्रक्चर समितीची बैठ्क सप्टेबरच्या तिस-या आठवड्या पर्यंत चालते.

आता लवकरच अल्पसंख्यांक समितीचे काम सुरु होणार होते. या मधल्या काळात गांधीजीचे पुत्र देवदास यानी बाबासाहेबांची अन गांधीजींची भेट सरोजीनी नायडू यांच्या निवासस्थानी घडवून आणली. तेंव्हा गांधी म्हणतात, सभागृहातील इतर सभासदानी जर तुमच्या अस्पृश्यांच्या प्रतिनिधीत्वास मान्यता दिल्यास आपणही देऊ. असा गांधी घोळ घालतात.  बाबासाहेबाना काय कळायचे ते कळले.

अल्पसंख्यांक समिती:
२८ सप्टे १९३१ रोजी अल्पसंख्यांक समितीचे कामकाज सुरु झाले. या समितीच्या पुढे खरी आव्हाहन होती. राज्यघटनेपेक्षा ईथे खुप खटके उडणार होते. प्रत्येक संघटना जास्तीत जास्त मागण्या पदरी पाडण्याचे प्रयत्न करणार होती. त्यावरुन खुप वादावादी व खडाजंगी होणार हे गृहितच होते. एवढे कमी की काय म्हणुन घोड घालायला गांधी होतेच. पहिल्याच दिवशी प्रतिनिधींमध्ये अपेक्षेप्रमाणे एकमत होण्याची कुठलीच चिन्हे दिसत नव्हती. आगाखान यानी सुचना केली की आज रात्री गांधी मुसलमान नेत्याना भेटुन काहितरी मार्ग काढतील त्यामुळे ही सभा स्थगीत करावी.
गांधी मुसलमानांशी जे काही गुप्त खलबते चालविले होते त्याची पुर्ण जाण बाबासाहेबाना होते. आगाखानच्या सुचने नंतर लगेच ते भाषण करायला उठले. बाबासाहेब म्हणतात अस्पृश्य वर्गाच्या सर्व मागण्या आम्ही गेल्या वेळेसच अल्पसंख्यांक समितीस सादर केल्या आहेत. आता आम्ही एकच गोष्ट विचाराधीन ठेवणार आहोत ती म्हणजे, आम्हाला प्रत्येक प्रांतात प्रतिनिधींच्या संख्येचे प्रमाण किती असावे ही होय. बाकी तुमच्या वाटाघाटी चालू दया. फक्त एकच लक्षात ठेवावे, विशेष सवलती मागणारे अन देणारे यानी आमच्या वाट्यातील काहीच कुणाला देता कामा नये.
यावर परिषदेचे अध्यक्ष रॅम्से मॅक्डोनाल्ड म्हणतात, बाबासाहेबानी आपले म्हणणे नेहमी प्रमाणे अत्यंत आकर्षक व अचूक शब्दात मांडले आहे.

१ ऑक्टो १९३१ रोजी गांधीनी समितीपुढे परत एक आठवड्याची मुदत वाढवून मागितली.  मुसलमान पुढा-यांशी आपली बोलणी चालु आहे अन ती अत्यंत निर्णायक वळणावर आली आहे. यावर बाबासाहेब गांधीना विचारतात की या निर्णायक बोलणीत कोणी अस्पृश्य प्रतिनिधी असणार की नाही? गांधीनी होकारर्थी मान हलविली. आभार माणुन बाबासाहेब पुढे म्हणतात, पहिल्या अधिवेशनात समितीने जसे अस्पृश्यांचे स्थान राज्यघटनेत मान्य केले होते ते कुठल्याही परिस्थीत कोणाच्याही दबावाला न जुमानता तसेच अबाधित ठेवावे. जर भावी राज्यघटनेत अस्पृश्याना स्थान मिळणार नसेल तर अशा समितीत आपण भाग घेणार नाही. किंवा गांधीच्या तहकुबीच्या ठरावाला पाठिंबा देणार नाही. अशा प्रकारे बाबासाहेबानी आपली अट पुढे करुनच सभा तहकुबीला मान्यता दिली. सभा आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली. आता गांधी सर्व नेत्यांमधे समेट घड्वून आणण्यासाठी युद्ध पातळीवर लढणार होते.

मुसलमानांशी वाटाघाटीचे प्रयत्न
गांधी अन मुसलमान पुढा-यां मधे आठवडाभर वाटाघाटी चालू होत्या. सकारात्मक परिणा येणार अशा बातम्या वृत्तपत्रातून छापून येऊ लागल्या. गांधीनी मुसलमानांच्या १४ मागण्या मान्य केल्याचेही बोलल्या जाऊ लागले. घटक राज्याना शेषाधिकार असावे अन मुसलमानांना पंजाब आणि बंगाल या दोन प्रांतात त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे बहुसंख्य प्रतिनिधीत्व दयावे या मागण्याना गांधीजीनी मान्यता दिली. शिवाय वरून मुसलमानाना कोरा चेक देण्याचे वरदान गांधीनी देऊन टाकले. ज्याचा परिणाम स्वातंत्र्याच्या वेळी आपणास भोगावा लागला. या सगळ्या मागण्या गांधीनी मान्य केल्या पण पंजाबच्या मागणीतुन शिख-मुसलमान यांच्यात एकमत होईना. यावर गांधीनी शिख व मुसलमान नेत्यामध्ये समेट घड्वून आणण्याचे सर्व प्रयत्न केले पण दोन्ही कडचे नेते हट्टाला पेटले होते. शेवटी आठवडाभरची मेहनत पाण्यात गेली अन हा समेट घडवून आणण्यात गांधी अपयशी ठरले.

८ ऑक्टो १९३१ रोजी गांधीजी बैठकीस आले व समेट घडवून आणण्यात अपयशी ठरल्याचे अल्पसंख्यांक समितीपुढे कबूल केले. हे अपयश आवश्यकच होते, त्यामुळे गांधीचा खरा चेहरा पुढे आला  ते म्हणाले, परिषदेस आलेले प्रतिनिधी हे त्या त्या समाजाचे वा वर्गाचे खरे प्रतिनिधी नाहित. म्हणुन समेट घडवून आणता आले नाही. त्यामुळे सरकारनी ही समिती व सभा बेमूदत तहकूब करावी. काम न जमल्यास अत्यंत खालच्या स्थराला जाऊन आरोप करण्याचा गांधीचा स्वभाव ईथे उघड पडला.

यावर बाबासाहेबानी गांधीना धारेवर धरले. ते म्हणाले, गांधीनी कराराचा भंग केला आहे. कोणत्याही प्रतिनिधीला प्रक्षोभ निर्माण होईल असे न बोलण्याचे ठरले असताना गांधीनी आमच्यावर शिंतोळे उडविले आहेत. त्यानी नुसती सभातहकूबीची सुचना करायला हवी होती. पण परिषदेस आलेले प्रतिनिधी खोटे आहेत हा आरोप गंभीर व संतापजनक आहे. आम्ही सरकार नियूक्त प्रतिनिधी आहोत हे मान्य आहे पण अस्पृश्यांचा प्रतिनिधी माझ्या शिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही हे गांधीनी ध्यानात ठेवावे. अशा प्रकारे अत्यंत प्रखर व खरमरीत समाचार घेऊन बाबासाहेब गांधीवर भीमरूपी तोफ डागतात. बाबासाहेब नावाची तोफ गोलमेजच्या सभागृहात वेळोवेळी धडाडु लागली. ज्ञानाच्या मिश्रणातून तयार होणारा दारुगोळा कधी ब्रिटीशांवर आग ओकत असे तर कधी गांधींवर.

यानंतर ब्रिटीश पंतप्रधानानी गांधीला उद्देशून एक भाषण केले. कोण प्रतिनिधी कसा निवडून आला यावर उगीच वेळ वाया दवडण्यापेक्षा विधायक कामात प्रतिनिधीनी लक्ष घालावे असा टोला हाणला.

गांधीचे समेट विषयीचे अपयश अन त्यामुळे आलेली निराशा यातून आता गांधीचा संयमाचा ढोंग सुटत चाललेला होता व खरा गांधी दिसु लागला. गांधीशी झालेली झटापटी सगळ्याना कळावी म्हणुन बाबासाहेबानी देश विदेशातील पत्रकाराना हा संपुर्ण प्रकार जशाच तसं सांगितला अन त्यानी केलेले आरोप कसे बिनबुडाचे व अपयशातून आलेली विकृती दर्शविणारे आहेत हे सिद्ध केले.  
१२ ऑक्टो १९३१ च्या पत्रात ते म्हणतात, मुसलमानांच्या १४ मागण्या मान्य करताना गांधीजीनी अशी अट घाटली की अस्पृश्य वर्गाच्या मागण्याना सभागृहात मुसलमानानी विरोध करावा. म्हणजे सरोजीनी नायडुच्या निवासस्थानी टाकलेला फासा काम करेल. गांधी अस्पृश्यांच्या तोंडचे पाणी पडविण्यास अशी अक्कल हुशारी वापर होते. आपण प्रतिसवाल केल्यास मुसलमानांकडे बोट दाखवुन हात झटकण्याचा हा डाव होता. तुमच्या मागण्या मान्य केल्या असे उघड उघड म्हणायचे अन दुस-या मार्फत त्या न मिळण्याचा बंदोबस्त करायाचे. तयार न होणा-या प्रतिनिधीना वेळप्रसंगी विकत घ्यायचे असा हा महात्म्याला न शोभणारा प्रकार गांधीनी केला आहे. हि गांधीची भूमिका मित्राची तर नाहीच पण छातीठोकपणे पुढे येणा-या मर्दाचीपण नाही.
बाबासाहेबांच्या मागण्याना गांधीजीनी अशा प्रकारे विरोध अन भेदनितीने जाती जाती मध्ये भडका  उडविण्याचे कट कारस्थान केल्यामुळे भारतातील अस्पृश्य पेटून उठले. याचा निषेध करण्यासाठी रावबहाद्दुर एम. सी. राजा यानी विशाल सभा भरविली. या परिषदेत अस्पृश्यानी गांधीचे नेतृत्व नाकारण्याचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव तारेनी बाबासाहेबाना कळविण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्याचे नेते फक्त अन फक्त बाबासाहेब आंबेडकरच आहेत याचा पुरावा देण्यासाठी भारताच्या कानाकोप-यातून लंडनमधे बाबासाहेबांवर तारांचा वर्षाव करण्यात आला. गांधीनी बाबासाहेबांवर सरकार नियुक्त प्रतिनिधी म्हणुन लावलेल्या आरोपाचे हे सणसणीत उत्तर होते. उभ्या भारतातून अस्पृश्यानी फोडलेल्या भीम गर्जनेच्या गगनभेदी आरोळ्याचा हा प्रतिध्वनी गो-यांच्या देशात असा गुंजून गेला की जागो जागी गांधीला तोंड लपवून पळावे लागे. लंडनमधील सभांमधून, चर्चातून, मुलाखतीतून गांधीना अस्पृश्यां बद्दल विचारणा करण्यात येई. प्रतिउत्तरादाखल देण्यासारखे गांधीकडे काहीच नसायचे अन गांधी नंग्या अवस्थेत पुन्हा नंगा केला जाऊ लागला.  भरीत भर म्हणुन नाशिकची चळवळ जोर धरली. सत्याग्रहाला उधाण आले होते. नाशिकात अस्पृश्याना कसे मंदिर प्रवेशासाठी तीन वर्षापासुन लढावे लागत आहे याची इत्यंभूत माहीती ब्रिटनच्या London Times मधे प्रसिद्ध होई. त्यामुळे गोरे लोकं गांधीला गाठून पाणी पाजत अन बाबासाहेबांकडे सहानुभूतीपुर्ण नजरेनी पाहत. नाशिकच्या स्त्याग्रहामुळे गांधीची लंडनमधे पुरेवाट लागली होती. तुमच्या सारख्या महात्म्याच्या देशात मंदिर प्रवेशासाठी अशी चळवळ उभी राहते हे तुमच्या माहात्म्याला न शोभणारी बाब आहे असा प्रतिसावा होई. यावर उत्तर नसल्यामुळे गांधी अक्षरशा पळ काढता.

म्युरायल लेक्टर नावाची फ्रेंच बाई जिच्याकडे गांधी या परिषदेच्या दरम्यान मुक्कामास होते तीला गांधीचा ईथे चाललेला उपहास सहन झाला नाही. ब्रिटीश पत्रकारानी व अमेरीकन मिडीयानी गांधीला सळो की पळॊ करुन सोडले होते. बाबासाहेबानी अहोरात्र कष्ट करुननिवेदने प्रसिद्ध केलीत. प्रतिकूल मतांचा परामर्श घेतला. वजनदाव व्यक्तीना भेटून आपले मत पटवून दिले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की गांधीवर मिडीयानी फास आवळायला सुरुवात केली. या सर्व घडामोडीमुळे लेक्टर बाईनी बाबासाहेबांची भेट घेण्याचे ठरविले. कोण हा अतिशहाना गांधीच्या विरोधात मोहिम चालवतो आहे या अविर्भावात त्या बाई भेटायला आल्या ख-या पण पुढे उभा ठाकलेला तेजस्वी पुरुष अत्यंत विदारक सत्य तिला उलगडुन सांगतो. तेंव्हा लेक्टर बाई अंतर्मुख होऊन मूक रडतात. अस्पृश्यांची बाजू मांडण्याची बाबासाहेबांची हातोटी अत्यंत परिणामकारक, विदारक अन पुढच्या व्यक्तीच्या काळजाला छेदुन जाणारी असे. बाबासाहेब अन गांधी दोघांचेही मित्र असलेल्या कित्येक लोकानी दोघात समेट घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले पण यश आले नाही. कारण गांधीचा हरिजन कार्याचा पाया भूतदयावर अधिष्ठित होता. याच दरम्यान ऑक्टो १९३१ च्या अखेरीस ब्रिटनमधे निवडणुका होतात अन मजूर पक्षाची दाणदाण उडते.

गांधीजीवरील कठोर हल्यामुळे ईकडे भारतातील वृत्तपत्रानी मात्र उलट प्रकार चालविला होता. उभ्या जागातील पत्रकारानी गांधीला वेठीस धरून भंडावून सोडले असता भारतीय पत्रकारीता बाबासाहेबांवर शिंतोळे उडविण्यात मग्न होती. गांधीच्या प्रेमापोटी पत्रकाराना बाबासाहेब देशद्रोही वाटू लागले, ब्रिटिशांचे बगलबच्चे वाटू लागले. हिंदूंचा वैरी अन देश बुडव्या अशा विविध अपमानकारक अन अशोभनीय मथळ्याखाली बाबासाहेबांवर देशभरात टिका चालू होती.
गांधीजी म्हणत, आपण अस्पृश्यांचे स्वाभाविक पालक आहोत, तर बाबासाहेब म्हणत आपण अस्पृश्यवर्गाचे जन्मजात अन स्वयंसिद्ध नेते आहोत. गांधीजीचे नेतृत्व हे भूतदयेवर आधारीत , भावनाप्रधान व कृत्रीम होते तर बाबासाहेबांचे नेतृत्व निसर्गसिद्ध, वास्तववादी अन व्यवहारनिष्ठ होते. बाबासाहेबानी अजोड अन अतुल्य अशा हिंदु नेत्याची सत्ता व नेतृत्व झुगारून देली.  तर तिकडे गांधीमधील अजिंक्य अहंकाराने स्वत:मधील सतपुरुषावर मात करुन आंबेडकरांपुढे दंड थोपटून उभे ठाकण्यास भाग पाडले. सदैव स्तूती-स्त्रोत्रे ऐकण्याची सवय असलेला हा कृत्रीम देव आज स्वामिनिष्ठ भक्तांपासून साता समुद्रापार जगाच्या व्यवहारातील निष्ठुरपणाला पहिल्यांदाच समोर जात होता. राजकारणातील मुरब्बी अन सडेतोड पुरुषांशी पहिल्यांदाच गाठ पडल्यामुळे आपल्या बलस्थानांची टिंगल टवाळी होताना हताशपणे पाहण्या पलिकडे काहीच करू शकत नव्हता. भारतीय वृत्तपत्रे अन भक्तांचा घोळका यांच्या स्तुतीसुमना ऐवजी इंग्रजी पत्रकारांचा विच्छेदनयुक्त प्रश्नांचा भडीमार ईतका भेदक असे की आजवर उभी केलेली गांधीजींची आभासी प्रतीमा धडाधड कोसळू लागली. याच्या अगदी उलट बाबासाहेब मात्र कॉंग्रेसच्या भाडोत्री पत्रकारांपासुन हजारो मैल दूर राणीच्या देशात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक मुत्सद्दी म्हणुन मान्यता पावत होते. कुठलाही धनसंपदेचा पाठिंबा नसताना केवळ बुद्धीवैभावाच्या जोरावर नवीन इतिहास रचत होते. अलौकिक बुद्धिमत्ता, अंगभूत गुणवत्ता अन धैर्यशाली व न्यायप्रिय वृत्तीमुळे जगाच्या इतिहासात नविन पानं रंगविण्यात गढून गेले.

मुसलमान प्रतिनिधींचा निर्णय गांधीना नडला
गांधीनी मोठ्या शिताफिने मुसलमानांच्या १४ मागण्या मान्य केल्या व त्यानी अस्पृश्य व इतर अल्पसंख्यांकाच्या मागण्याला पाठिंबा देऊ नये असा कूटनीतीपुर्ण प्रस्ताव ठेवला. पण मुसलमानानी इतर अल्पसंख्यांकाचा घात न करण्याचे जाहिर केले व गांधीच्या पाचावर धारण बसली. याला एक दुसरी बाजू सुद्धा होती. मुसलमानांची एक ठरलेली नीती होती. आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी इतर प्रतिनिधींशी समेटाचे  बोलणे चालवायचे. हिंदु पुढा-यांशी बोलताना अनेक मागण्या लावून धरायच्या. अत्यंत टोकाची भूमिका घेत त्यातील अधिकाधिक मागण्या मान्य करवून घ्यायच्या अन शेवटच्या घडीला ब्रिटीशांकडे दुसरा फासा फेकायचा की, हे बघा एवढ्या मागण्या हिंदु पुढारी देण्यास तयार आहेत. तुम्ही या पेक्षा जास्त काय देणार ते बोला. स्वतंत्र मतदार संघ मिळावा म्हणुन मुसलमान आकाश पाताळ एक करत होते. सर्व शक्ती झोकून देऊन ते स्वतंत्र मतदार संघ मिळविण्यास एकवटले होते. त्यामूळे गांधीचे ऐकुन जर त्यानी इतर अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ देऊ नका असे सभागृहात म्हटल्यास ते स्वत:साठीही स्वतंत्र मतदारसंघ मागण्याचा अधिकार गमावून बसतील याचा त्याना अंदाज होता. मुर्ख जर कोणी होते तर ते गांधी. कारण त्याना असे वाटे की मुसलमान इतरांच्या विरोधात जाऊन स्वत:च्याही पायावर धोंडा मारुन घेतील. आहे की नाही गंमत. ईतकी बेसिक गोष्ट ज्या माणसाला कळत नव्हती तो भारताचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेजला आला होता हे आपले दुर्दैव.

गुप्त निवेदन सादर
गांधीनी मुसलमानाना सोबत घेऊन बाबासाहेबांची नाकेबंदी करण्याचा घाट घातला होता. त्यानी कित्येक डावपेचही आखले. आता मात्र डावपेचाला डावपेचानेच उत्तर देणे गरजेचे होते. बाबासाहेबानी सर्वाना पुरुन उरणारा डावपेच आखला. अहोरात्र झटुन एक अजोड निवेदन तयार केले. स्पृश्य हिंदुच्या विरोधात आपण केलेल्या भाषणाचा मुसलमान पुढारी स्वार्थासाठी वापर करतात व हिंदु पुढारी मात्र सत्य बाजू निट मांडत नाही. एकंदरीत परिस्थीतीचा मुसलमानानी सदैव धुर्तपणे वापर केला व हिंदुंच्या  व अस्पृश्यांच्या अहिताचे नित्य चिंतले. तरी हिंदुंच्या मतांचे खरे दर्शन ब्रिटिशाना व्हावे म्हणुन तयार केलेले हे निवेदन बाबासाहेबानी गुप्त पणे मुख्य प्रधान मॅक्डोनाल्ड याना सादर केले.


दुहेरी गुलामगिरी
खरं तर स्पृश्य हिंद हा फक्त राजकीय गुलाम होता. फक्त सव्वाशे वर्षाची गुलामगिरी झुगारुन देण्यासाठी तो इंग्रजांच्या विरोधात पेटुन उठला होता. अत्यंत निष्ठुर व टोकाची भुमीका घेऊन तो इंग्रजांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरला होता. पण अस्पृश्यांची व्यथा मात्र अत्यंत निराळी होती. इंग्रजांची गुलामगिरीतर त्यांच्यावर लादली गेली होतीच. पण त्याही आधी आपल्याच धर्मबांधवांकडून सामाजीक गुलामगिरी हजारो वर्षापासुन लादली गेली होती. आज बाबासाहेबांच्या रुपाने एक युगपुरुष आमच्या मदतिला उभा ठकाल होता. आज दोन दोन गुलामगि-यातुन मुक्त होण्यासाठी एकाच वेळी लढा दयायचा होता. स्वातंत्र्य, समता व बंधुता हि मुल्ये आधारभूत माणुन खरंतर गांधीनी अस्पृश्याना संयुक्त मतदारसंघ  व राखिव जागा देऊन एक पवित्र कार्यास हातभार लावायला हवे होते. पण त्यानी तसे न करुन एक नवीन अडचण ओढवुन घेतली. या उलट ज्या मुसलमानानी नेहमी धुर्तपणा केला त्याना मात्र गांधीनी वरील सर्व मागण्या मान्य केल्या. आहे की दिवाळे निघालेली अक्कल.
यामुळे बाबासाहेबांपुढे अत्यंत बिकट व आव्हाहनात्मक परिस्थीती येऊन ठेपली होती. आता त्यांच्या पुढे प्रश्न होता ब्रिटिश की गांधी. गांधीकडुन उभे झाल्यास हा माणूस निव्वड आशिर्वाद देऊन रिकाम्या हाती पाठवेल. संयुक्त मतदारसंघ व राखिव जागा गांधीनी आधिच अमान्य केल्या होत्या. त्यामुळे ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या ठेवून त्या मान्य करवुन घेणे हा एकमेव पर्याय बाबासाहेबांपुढे राहिला होता. गत्यंतर नव्हते. गांधीनी मुसलमान व इतर धर्मियाना दिलेले अधिकार अस्पृश्याना देण्याचे साफ नकारले होते.

अल्पसंख्यांक समितीपुढे निवेदन सादर
मुसलमान, ख्रिश्चन, एंग्लो-इंडियन, युरोपियन व अस्पृश्यानी अखेर अल्पसंख्यांक समितीपुढे एक निवेदन सादर केले. त्या निवेदनात असे म्हटले होते की, कोणाही मनुष्याला नोकरी, अधिकारपद, नाकरिकाचे हक्क, धंदा किंवा व्यापार करण्याचा हक्क हा निर्विवाद देण्यात यावा. धर्म, जात, पंथ व कुळ या गोष्टीनी वरील कामात अडथळा निर्माण करु नये. अस्पृश्याना सरकारी कचे-यात नोकरी करण्याचा अधिकार असावा. सैनिक दलात व पोलिस खात्यात अस्पृश्यांची भर्ती करावी. त्याना न्याय दयावा. पंजाबमधिल अस्पृश्याना पंजाब लॅंड एलिनिएशन एक्टचा लाभ मिळावा. अस्पृश्यांच्या गा-हाण्या ऐकण्यात कार्यकारी मंडळानी पक्षपात केल्यास राज्यपालांकडे  किंवा महाराज्यपालांकडे न्याय मागण्याची अस्पृश्याना अधिकार व मोकळीक असावी. हे मुख्य निवेदन समितीला सादर करण्यात आले.
पुरवणी निवेदन
बाबासाहेब दलितांच्या बाबतीत नेहमी अपेक्षेपेक्षा दोन पाऊल पुढे जाऊन कर्तुत्व बजावत. वरील निवेदना व्यतिरिक्त बाबासाहेबानी समितिला एक पुरवणी निवेदन सादर केले. त्यात बाबासाहेबानी खालील प्रमाणे मागण्य़ा केल्या.
१)  सर्व केंद्रिय व प्रांतिक मंडळात अस्पृश्यवर्गाच्या लोकाना खास प्रतिनिधीत्व म्हणुन जागा मिळाव्यात.
२)  त्याच सोबत अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावे.
३) जर संयुक्त मतदार संघ नि राखिव जागा ठेवायचे असल्यास वीस वर्षा नंतर अस्पृश्य मतदारांचे सार्वमत घेऊनच निर्णय घ्यावा.
४) अस्पृश्य वर्गास अवर्ण हिंदु असे म्हणावे.
बाबासाहेबांच्या पुरवणी निवेदनानी अस्पृश्यांच्या बाजुने अत्यंत महत्वाची भुमीका बजावली. अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ दयावा अशी अल्पसंख्यांकाच्या करारात नोंद झाली. हे बाबासाहेबांच्या कष्टाचं फळ होतं.

अल्पसंख्यांक समितीपुढे गांधीचे तांडव
अल्पसंख्यांक समितीच्या करारात अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ देण्याची नोदं होताच गांधी चवताळून उठतात. त्याना हा स्वत:चा पराजय वाटु लागतो. अस्पृश्याना खितपत ठेवण्याच्या त्यांच्या स्वप्नावंर पाणी फिरल्याचे त्याना वाटले. गुलामाना स्वतंत्र मतदार संघ देऊन स्पृश्य हिंदुंच्या बरोबरीत उभे करण्यासाठी समितीने घेतलेला हा निर्णय गांधीना अस्वस्थ करुन जातो. ते गरजतात, हिंदु, मुसलमान व शिख यांच्या मध्ये जो निर्णय घेतला जाईल तो मान्य होईल, पण अस्पृश्याना दिलेलं प्रतिनिधीत्व अन स्वतंत्र मतदार संघ कदापी मान्य होणार नाही. मी पुन्हा सांगतो, अस्पृश्यांना दिलेले प्रतिनिधीत्व मला मुळीच मान्य नाही. अस्पृश्यांच्या वतिने मांडलेल्या मागण्या व त्याना समितीने दिलेली संमती हि अत्यंत चुकीची व आम्हाला मुळीच पसंद न पडलेली गोष्ट आहे. मी अस्पृश्यांच्या या मागण्याचा निषेध करतो व त्या मला अमान्य असल्याचे ईथेच जाहिर करतो.
गांधीनी शेवटी नालायकपणाचा कळस गाठला. आपल्या नीच वृत्तीचा उभ्या सभागृहात दर्शन  दिले. गांधी हा माणूस वरवर दिसतो त्या पेक्षा किती धुर्त, अमानूष व कपटी आहे हे सर्व सभासदानी तिथेच बघितले. आपल्याच समाजातील एका वर्गाला तुडवित ठेवण्यावर अडून बसलेला हा नेता या पुढे जेंव्हा जेंव्हा ब्रिटिशांपुढे स्वातंत्र्याची मागणी करेल तेंव्हा तेंव्हा तो स्वातंत्र्य मागत नसून सवर्णांसाठी हलकटपणे राजकीय सत्ता मागत आहे याची आठवण होईल. गांधी हा खरा स्वातंत्र्यलढ्याचा नेता नव्हता ते उभ्या सभागृहानी आजमावले. हा खोटारडे व भामटा नेता होता हे पुराव्यानिशी जाहिर झाले.

एवढ्यावर थांबले असते तर ते कसले गांधी, त्यानी आवेशात येऊन असे म्हटले की, अस्पृश्य मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारुन हिंदु धर्मातून बाहेर पडत असतील तर पडु दया. मला त्याची अजीबात पर्वा नाही. पण जोवर ते हिंदु धर्माचा भाग आहेत तो वर त्यांच्या या मागण्याना मी कदापी मान्यता देणार नाही.

लवाद नियुक्तीला मान्यता व गांधीची स्वाक्षरी
अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांवरुन गांधीनी सभागृह डोक्यावर घेतले. प्रतिनिधींचे एकमत होत नाही हे पाहून ब्रिटिश मुख्यप्रधानानी प्रतिनिधीना एक सुचना केली. अल्पसंख्यांक प्रश्नांसंबंधी निर्णय देण्यासाठी सर्व प्रतिनिधीनी मुख्य प्रधानास लवाद म्हणुन नेमावे. या लवादानी दिलेला निर्णय बंधनकारक राहील असे निवेदन सादर करावे. अन लवादाने निर्णय दयावा अशी लेखी मागणी सर्व सभासदाने मिळुन स्वेच्छेने करावे नि सर्व प्रतिनिधीनी त्या निवेदनावर स्वाक्ष-या कराव्यात. या युक्ती काम करुन गेली. सर्वाना लवाद नेमुण मिळणार निर्णय  मान्य झाला. सर्व प्रतिनिधीनी तसे निवेदन तयार करुन स्वाक्ष-या केल्या. महत्वाचं म्हणजे गांधीनाही लवादाने निर्णय दयावा असे वाटले व त्यानी सही केली. अशा प्रकारे गोलमेज-२ संपन्न झाली व १ डिसेंबर १९३१ रोजी परिषदेचा समारोप झाला.

२८ जाने १९३२ रोजी गांधींचे मुंबईत अगमन झाले. भारताच्या कानाकोप-यातुन अस्पृश्य मुंबईत दाखल झाले. बंदरातच गांधींचा निषेध व विरोध करण्यात आला. गांधी समर्थकही थडकले. लाठ्या, काठ्या, विटा व सोडा बॉटल्सची बरसात झाली. आज महात्मा या नावाचा अस्पृश्यानी मनातच दफनविधी आटोपला अन अनंतकाळासाठी गांधीनी अस्पृश्यांचे वैर ओढवुन घेतले.

बुधवार, २५ मे, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांधीशी भेट)

जुलै १९३१ मधे सरकारनी गोलमेज परिषद (दुसरी) साठी निवडलेल्या प्रतिनिधींची नावे जाहीर केली. पहिल्या गोलमेजमध्ये मर्दुमकी गाजवून सा-या जगाला गदागदा हालवून सोडणा-या निर्भेड व बाणेदार व्यक्तीमत्व, म्हणजेच बाबासाहेबांचे नाव त्या यादीत होते. सप्रू, जयकर, सेटलवाड, मालवीय, सरोजिनी नायडू, मिर्झा इस्माईल, जीना, रामस्वामी मुदलियार अशा एकसे बढकर एक दिग्गजांची दुस-या गोलमेजसाठी निवड झाली होती. ह्या वेळी नुसती परिषद नव्हती तर या परिषदेत भावी हिंदुस्थानाची घटना बनविण्याचे प्राथमिक स्वरुपाचे काम करण्याचे ठरले होते. बाबासाहेबांची मागच्या वेळेस या समितीवर निवड झाली नव्हती. त्यांचा बाणेदारपणा व देशप्रेमाने झपाटलेल्या छटा गो-या साहेबांच्या राष्ट्रिय बाण्याला खोलवर झोंबल्या होत्या. तरी या वेळी त्यांच्या बुद्धिमत्तेपुढे शरणागती पत्कारून घटना समितीवर निवड करावी लागली. या निवडीमुळे बाबासाहेबांवर देशाच्या कानाकोप-यातुन अभिनंदनाचा वर्षाव झाला. तिकडे ब्रिटनमधील लोकानीसुध्दा बाबासाहेबांच्या निवडी बद्दल समाधान व्यक्त केले.
उभ्या भारतात जिकडे तिकडे अभिनंदनांचा वर्षाव चालु असताना बाबासाहेबांच्याच मातृभूमित व त्यांच्याच शहरात दूर गावदेवितील मणिभवन येथे गांधीजीने मोठा घोळ घालून ठेवला. ते दुस-या गोलमेजला जाणार की नाही यावर गूढता निर्माण करुन लोकांना बुचकळ्यात टाकले. एखादे काम करणार, नाही करणार, कधी करणार वगैरे बाबी अधिकाधिक गूढ करत जाऊन लोकांना तंगवत ठेवणे त्यांचा आवडता छंद, ते इथेही तेच करत होते. मणिभवन मधुन कधी एकदा गांधी आपली गूढता बाजूला सारुन मत जाहिर करतील याची सा-यानाच काळजी होती. ऐन वेळी बहिष्कार-बिहिष्कार घातल्याचे जाहिर केल्यास पंचायत होईल म्हणुन गांधीचे मत येइस्तोवर इतर कॉंग्रेसी नेत्यानी मौन बाळगणे सोयीचे समजले. लोकांच्या मनाचे वेध घेणे अन स्वत: मात्र गूढ व्यक्तीमत्व बनून लोकांची, कार्यकर्त्यांची धादल उडविणे नेमही प्रमाणे आताही सुरु होतेच. गांधीजी गोलमेजला जाणार की नाही हा एकमेव प्रश्न सगळ्यांना तंगवत होता.
९ ऑगस्ट १९३१ रोजी या गूढ व्यक्तीमत्वानी बाबासाहेबांच्या मागण्या काय असतील याची चाचपनी करण्यासाठी एक  पत्र पाठविले. वरुन फुशारकी बघा.... त्यानी पत्रात लिहले की मला आजच रात्री ८ वाजता भेट हवी आहे. त्या दिवशी बाबासाहेब सांगलिहून नुकतेच आले होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती. आंगात १०६ अंश ताप होता. आपली तब्बेत सुधारल्यावर आम्ही स्वत: आपल्या भेटिस येऊ असे प्रतिउत्तर पाठवून बाबासाहेबांनी त्या दिवशी भेटण्याचे टाळले.
१४ ऑगस्ट १९३१ रोजी दिलेल्या शब्दाप्रमाणे बाबासाहेब मणिभवनात पोहले. दुपारी दोन वाजता भेटण्याचे ठरले होते. सोबत शिवतरकर, भाऊसाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे, कद्रेकर, काणेकर असे सात आठ कार्यकर्ते सोबतीला होते. बाबासाहेब मणिभवनाच्या तिस-या मजल्यावर गांधीच्या दिवानखाण्यात पोहचतात तेंव्हा गांधीजी पक्षातील लोकांशी चर्चेत गुंतलेले होते. खास कार्यकर्त्यांसोबत फराळ वगैरे चालू होते ते पाहून बाबासाहेबानी गांधीजिनी नमस्कार केला व एका बाजुला जाऊन बसले.
या दिवसाची खाशीयत ही की आज भारतातील दोन दिग्गज नेते आमने सामने आले होते. एक महान राजकीय व्यक्तिमत्व ज्याच्या नावाचा डंका जगभर वाजला ते गांधी. तर दुसरे समाजानी वेळोवेळी तेजोभंग केला तरी अखंड व अविश्रांत परिश्रमाने सा-या देशाला नवीन सामाजीक नितीमुल्ये शिकविणारे महान विद्वान बाबासाहेब आंबेडकर. एक अत्यंत गूढ व्यक्तीमत्व, शेवट पर्यंत घोळ घालून ठेवणारा तर दुसरा रोकठोक बोलून निमिशात प्रश्न निकाली काढणारा. एक महाकपटी तर दुसरा महादयाळू आई सदृस्य. एक अत्यंत शक्तीशाली, बलशाली, धनाढ्य व तमाम भारतीयांचा टोकाचा पाठिंबा लाभलेला तर दुसरा दारिद्र्याचे चटके आजुनही सहन करणारा, धन कमविण्याची कुवत असुनही धनाच्या वाटेला न जाणारा युग पूरुष अन रंजल्या गांजल्यांच्या सेवेत स्वत:ला वाहुन घेणारा यूगप्रवर्तक. खरतर धनाच्या बाबतीत कंगाल लोकांचा सेनापती. तसं पाहता दोघांची तुलनाच नाही होऊ शकत. कारण बाबासाहेब हे संपुर्ण स्वातंत्र्याचे खरे समर्थक होते तर गांधी हे फक्त राजकीय स्वातंत्र्यालाच संपुर्ण स्वातंत्र्य मानणारे एक अल्पज्ञानी होते. गांधीना इंग्रजांची गुलामगिरी नको होती पण त्यानी अस्पृश्यांवर लादलेली हिंदूची गुलामगिरी कायम असावी अशा निर्लज्ज मताचा हा माणूस होता. त्याना स्वातंत्र्य म्हणजे काय हेच कळले नव्हते तरी ते स्वातंत्र्याच्या बाता करत हिंडत होते. त्यानी आपल्या स्वभावातील हा नीचपणा मणिभवनात दाखविलाच. तिकडे युगपुरुष त्यांच्या भेटीसाठी डोळे लावून बसला होता तर ईथे हे गूढ व्यक्तीमत्व मिस्स स्लेड या बाईशी हसत खिदळत गप्पा हाणत होते. एकंदरीत वातावरण व गांधीचा हा असा स्वभाव पाहून बाबासाहेब संतापलेत. कर्मयोगी माणसला असला आचरटपणा सहन होणे शक्य नव्हते. बाबासाहेबांचा संताप लवकरच भडका घेऊन दोघात खडाजंगी होण्याची चिन्हे दिसताच बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यानी गांधीच्या सहका-याना याची कल्पना दिली. एक कार्यकर्ता गांधीच्या कानात जाऊन कुजबुजला तेंव्हा गांधीनी आपलं खिदळण आवर्ती घेतलं अन बाबासाहेबाना भेटीस बोलावले. दोघांची नजरानजर झाली.  दोघेही एक दुस-याना प्रथमच भेटत होते. औपचारिक प्रश्नोत्तरानंतर गांधीनी मुद्यात हात घातला.

गांधी- डॉक्टर आपले काय म्हणणे आहे?
बाबासाहेब-माझे नाही, आपले. कारण आपणच मला बोलविलात तेंव्हा मी ऐकायला आलो आहे. आपणच आपले मत सांगावे.
गांधी- माझ्या व कॉंग्रेस विरुद्ध आपल्या काही तक्रारी असल्याचे माझ्या कानावर आले. मी माझ्या लहान पणापासून अस्पृश्यांचा विचार करित आलो आहे. तेंव्हा तुमचे जन्मही झाले नसावे (ईथे खवचटपणा केलाच) अस्पृश्यांचा प्रश्न मी अधिक जिव्हाळ्याचा मानतो. आज पर्यंत अस्पृश्यांसाठी कॉंग्रेसने २० लाख रुपये खर्च केले. ही सगळी सेवा मी मनोभावे चालविली असता तुमची माझ्या व कॉंगेसवर तक्रार असण्याचे कारण काय?
बाबासाहेब- माझा जेंव्हा जन्मही झाला नसेल तेंव्हापासुन आपण हे कार्य करत आहात हे सत्य आहे. अन वडिलकीचा मुद्दा अशा प्रकारे पुढे आणण्याची आपली रीत आहे तेंव्हा आपली वडिलकी मला मान्य आहे.  पण त्या तुमच्या सेवेचे मात्र तीन तेरा वाजले. ती केवळ औपचारीक अस्पृश्य सेवा राहिली आहे. तुमचे सर्व वीस लाख रुपये पाण्यात गेले हे मी ठामपणे तुम्हास सांगतो. एवढीमोठी रक्कम जर माझ्या हाती आली असती तर अस्पृश्यतेच्या या कार्यात मी मोठे परिवर्तन घडविले असते. जे तुम्हाला अजिबात जमले नाही अन जमणारही नाही. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे तुम्हाला अस्पृश्यता हा जर कळीचा मुद्दा वाटला असता तर आज जसे कॉंगेसचे सदस्यत्व स्विकारताना खादीचे कपडे वापरण्याची अट आपण घातली अगदी तसचं अस्पृश्याना समान माना अशी दुसरी अटही ठेवली असती. पण तुम्ही तसे करत नाही.
या वाक्यामुळे गांधी आतून खवळले, जणू त्यांचे सारे मुखवटे टराटरा फाडल्या गेले असा तो संवाद होता. त्याच्या खोट्या नितीला आज एक विद्वानानी शब्दाच्या तलवारीने सपासप कापून काढले. गांधीचे सर्व शस्त्र बुद्दीच्या शस्त्रापुढे कुचकामी ठरले. अत्यंत बलाढ्य सेनापती गांधी आज बुद्दीच्या महाबलीपुढे निश:स्त्र होऊन लोळत होता. हतबल झालेल्या या गांधीला बाबासाहेब आजून लोळविताना ते पुढे म्हणतात...
कॉंग्रेसचे सदस्यत्व घेताना किमान एका अस्पृश्य मुलाला घरी ठेवुन शिक्षणाची सोय करावी अशीही अट घालता येऊ शकते. पण तुम्ही तेही करत नाही. कारण तुम्ही अस्पृश्याचे जे काही बोल बोलत आहेत ते शुद्ध सोंग आहे.
गांधी गोरेमोरे होऊन बाबासाहेबांकडे लज्जीत झालेल्या चोर नजरेने बघत होते. अंगावर कपडे नसलेल्या माणसालाही नागड करता येऊ शकतं याचा अपूर्व सोहळा चालु होता, सारे कार्यकर्ते  आवाक होऊन याचा अनुभव घेत होते. बाबासाहेब पुढे म्हणतात.
एवढेही न जमल्यास तुमच्या प्रत्येक सदस्यानी आपल्या घरी एखादी अस्पृश्य बाई नोकर ठेवून अस्पृश्यांची जबाबदारी उचलावी, पण तुम्ही हे सुद्धा करायला तयार नाही
किती लहान अपेक्शा होत्या आमच्या. मागतो काय तर अरे किमान आम्हाला नोकर तरी ठेवा, धुनं भांड्यांचं काम तरी दया. अन हे धुणं भांड्यांच काम कोण मागतय तर सदीचा महाविद्वान......... काय ती अवस्था, अन तरी म्हणे गांधी अस्पृश्यांची सेवा करित होते. ज्यानी ईतकी लहान गोश्टही करायची तयारी नाही दाखविली तो अस्पृश्य निवारणाचे कार्य कसे काय करत होता तोच जाणे.
यातलं काहीच न जमल्यास एखादया अस्पृश्य मुलाला शिक्शणासाठी आपल्या घरी ठेवण्याचे आपल्या कार्यकर्त्याना सुचवा, म्हणजे तुमचे कार्य सिद्धिस जाईल.  कृतीप्रधान अट किती महत्वाची अन निर्णायक ठरेल याचं नेमक्या शब्दात बाबासाहेबानी विश्लेषण केलं. विधायक काम कसे करावे हे गांधीनी बाबासाहेबांकडून शिकवणी लावून शिकायला हवे याचा खुलासा करणारा हा संवाद सत्र. पण वरवर शांततेचा आव आणणारा गांधी वरिल संवादातून शिकण्यापेक्षा अंहकार दुखावल्यानी अस्वस्थ झाला.  बाबासाहेब पुढे बोलतात.
महात्मे हे धावत्या आभासासारखे असतात. त्यांच्या धामधुमीमुळे धूर उंच उंच उडतो, पण समाजाची पातळी उंचावायची राहून जाते. तुमचे अगदी तसेच आहे.
हे निर्भेड व्यक्तिमत्व ईथेच न थांबता पुढे म्हणते.
गांधीजी मला मायभूमी नाही. ज्या देशात कुत्र्याचेही जगणे आम्हाला जगता येत नाही. कुत्र्या मांजराना जेवढ्या सवलती मिळतात त्या सुद्धा आम्हाला माणूस असुन मिळत नाही. त्या भूमीला आपली मातृभूमी व तेथील धर्माला आपला धर्म मी तर काय कोणीही ज्याला माणुसकीची जाण आहे व ज्याचा स्वाभिमान जागा आहे असा पुरुष म्हणणार नाही.

गांधी मधेच बोलतात, डॉक्टर तुम्ही एक महान देशभक्त आहात. ब्रिटिशांच्या भूमीत उभे राहुन निर्भेडपणे स्वातंत्र्याची मागणी करणारे तुम्हीच खरे देशभक्त आहात. तुमच्या गोलमेज (पहिली) मधील या वृत्तांताने मी सुखावून गेलो. त्यांना मधेच काटत बाबासाहेब पुढे बोलतात....

नाही गांधीजी........ या देशाने आपच्या बाबतीत इतका अक्षम्य गुन्हा आहे की, ऊभा देश जरी मी पेटवुन दिला तरी मी देशद्रोही वा गुन्हेगार ठरणार नाही. त्याचे सगळे पाप तुम्हा लोकानाच लागतील. मला मायभूमी नाही परंतू सद्सदविवेकबुद्धी आहे. मी या राष्ट्राचा वा राष्ट्रधर्माचा उपासक मुळीच नाही. मला राष्ट्राशी काही देणेघेणे नाही. परंतू माझ्यात असलेल्या सदसदविवेकबुद्धीचा मी अनन्य उपासक आहे. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे माझ्या हातून काही राष्ट्रभक्ती म्हणविणारे कार्य जर घडले असेल तर ती माझी राष्ट्रसेवा नसून सदसदविवेक बुद्दीचा सन्मान आहे. जिथे आम्हाला कुत्र्यासारखे तुडविले जात आहे त्या राष्ट्राचा कुठल्याही टोकाला जाऊन मी नुकसान केले तरी ते पुन्यकार्यच ठरेल. पण तसे न करण्याचे श्रेय माझा विवेकाला जाते. मी देशी परदेशी भेद न करता माणुसकीचे हक्क मिळविण्यावर भर देत आहे. देशी-विदेशी मुद्या पेक्षा मानवी मुल्ये जास्त महत्वाची आहेत हे माझा विवेक मला सांगतो.
वातावरण तापत चालले होते. बाबासाहेबानी एकहाती मिटींगचा सगळा ताबा स्वत:कडे घेतला होता. नुसतंच लिडर म्हणुन मिरविणा-या गांधीचे आज बाबासाहेबांनी वाभाडे काढले होते. बाबासाहेबांच्या शब्दवैभवाच्या महासागरातील एक एक लाट गांधीला धुवून काढत होती. त्यांच्या आजपर्यंतच्या जी हुजूरी करणा-यानी तयार केलेल्या प्रतिमेला बाबासाहेबानी खडे चारले, सारे मुखवटे उतरविले. शब्दाच्या तलवारीला जेव्हा ज्ञानाची जोड लाभते तेंव्हा अंहकार सपासप कापुन काढला जातो. आज ईथे हे अत्यंत मोठ्या प्रमाणात चालु होते. गांधीजी नुसतं बघत राहिले होते. बाबासाहेबांचा विविध विषात चतुरस्त्र वावरण्याचं कौशल्य पाहून गांधी स्तब्ध झाले. मोठ मोठी आव्हानं लिलया पेलण्याची अमर्याद क्षमता मणिभवनाच्या खिडक्या, दरवाजातून आज ओसंडून वाहत होती. तिथेल्या लोकांसाठी हा ज्ञानाचा अपूर्व सोहळा दिपून टाकत होता. अन बाबासाहेबानी गांधीच्या पुढे आजुन एक महाभयंकर प्रश्न ठेवला.

मुसलमान, शिख, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्यांक अस्पृश्यांच्या तुलनेत बराच पुढारलेला व सुधारलेला आहे. त्या तुलनेत अस्पृश्य अत्यंत मागासलेला आहे. या इतर समाजाचे राजकीयदृष्ट्या स्वतंत्र अस्तीत्व पहिल्या गोलमेजने मान्य केले आहे. त्याच प्रमाणे अस्पृश्यांनाही अल्पसंख्यांकात अंतर्भूत करण्यात आले आहे.  आता राजकीय दृष्टा हे अस्पृश्यही मुसलमान व शिखा प्रमाणे स्वतंत्र अस्तित्व मिळवून बसले आहेत. आम्हाला सवलती व पुरेशे प्रतिनिधीत्व मिळावे याची शिफारस केली आहे. या विषयी आपल्याला काय वाटते?
बाबासाहेबानी गांधीच्या डोक्यावर हा अनुबॉंम्ब टाकला. खरं तर हे डिवचण्याचं काम होतं. पण यावर गांधीची प्रतिक्रिया काय येते हे बघण्याची हि सर्वोत्तम वेळ होती. हा प्रश्न टाकुन बाबासाहेबानी गांधीच्या मुद्रेवरील भाव हेरण्याचा प्रयत्न केला. पण गूढ ते गूढ...... कसली मुद्रा न कसले हाव भाव........ सगळं निश्चल.
गांधीजी- अस्पृश्य समाज हा हिंदु समाजाचा अभिन्न अंग असल्यामुळे मी त्याना वेगळं समजत नाही. मी त्याना हिंदुपासुन वेगळे करण्याच्या विरोधात आहे. त्याना राखीव जागा देण्यालाही मी अनुकूल नाही.

गांधीना अंदाज नव्हता ते काय बोलत होते. अन बाबासाहेबांचे काम झाले होते. गांधीजे हेच मत आजमावण्यासाठी बाबासाहेबानी तो प्रस्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटाने गांधीची घालमेल झाली अन त्यानी विरोधाचा निर्णय सुनावुन टाकला. हे ऐकल्यावर बाबसाहेब तडक उठतात अन गांधीच्या नजरेस नजर भिडवुन निर्भेडपणे म्हणतात, बरे झाले खुद्द तुमच्या तोंडुन मला हे कळाले. आता तुमच्या सोबत एक शब्दही बोलण्यासारखे काही राहिले नाही. रजा घेतो.” 

गांधी हे त्या वेळचे हिंदी राजकारणातील एक बलवान, मुत्सद्दी, अत्यंत शक्तिमान अन सर्वात मोठा जनाधार लाभलेले अनभिषिक्त राजे होते. अशा नेत्याशी आज बाबासाहेबानी युद्धाची घोषणा केली. मणिभवन ईथे बाबासाहेबानी गांधी-आंबेडकर युद्धाची सलामी तोफ डागली होती. या तोफेचा प्रतिध्वनी लंडनच्या दुस-या गोलमेज मधे उमटणार होता. आता हे युद्ध अनंतकाळापर्यंत चालणार होते. चमचेगिरी करणा-यांच्या गराड्यात वावरणा-या गांधीनी निर्भेड व्यक्तिमत्व अन बाणेदारपणाचा असा नमुना गांधीनी उभ्या जन्मात बघितला नव्हता. बाबासाहेबाच्या रुपात उभं ठाकलेलं हे आव्हाहन गांधीला उभ्या आयुष्यात पुरुन उरणार होतं.
१५ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब एस. एस. मुलतान या बोटीने दुस-या गोलमेज परिषदेसाठी रवाना झाले. बोटीत सर प्रभाशंकर पट्टणी भेटले. त्यानी काल गांधीशी झालेल्या चर्चेतील बाबासाहेबांच्या संवादाचे संदर्भ देऊन असे म्हटले की महान विभूतींशी अनादराने बोलणा-यांची जिभ छाटावी असे आमचे हिंदु शास्त्र सांगते अन तुम्ही जेंव्हा काल गांधीशी बोलत होतात तेंव्हा तुमची जिभ छाटावी असे वाटले. पट्टणींचे हे तेजोभंग करणारे वाक्य ऐकुन बाबासाहेब रागावण्या ऐवजी हासतात अन उलट प्रश्न विचारतात.

काय हो सर..... तुमच्या या धर्माप्रमाणे ढोंग्याचे व खुशमस्क-याचे काय छाटावे असे सांगितले आहे ते कळेल का?

खवचटपणाला अतीखवचटपणे उत्तर देण्यात बाबासाहेबांचा हतखंडा होता. सर साहेब आडवेच झाले अन पुन्हा कधी वाट्याला गेले नाही.

जवळपास भारतातील सर्वच प्रतिनिधी गोलमेजसाठी रवाना झाली होती. पण गांधी मात्र आजुन गूढ वलयांची उंची वाढवुन कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढवित होते.

मंगळवार, २४ मे, २०११

आर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.

आजकाल जिकडे तिकडे आरक्षणाचे वारे वाहत आहेत. आज पर्यंत जो समाज सत्ताधारी होता तो ही गरीबीला पुढे करुन आरक्षण मागतो आहे. कित्येक ब्राह्मणांचे असे म्हणणे आहे की ब्राह्मणातही गरीबांची बरीच मोठी संख्या आहे त्यामुळे ब्राह्मणाना सुद्धा आरक्षण दयावे. आजचा सुशिक्शित पण बिन अकली वर्ग मोठ्या प्रमाणात या गोष्टीचं समर्थन करतो की आरक्षण हे जातीवार न देता आर्थीक निकषावर दयावा. पण मुळात बाबासाहेबानी आरक्षण देण्याचे कारण काय होते याचा कोणी विचारच करत नाही. लोकांचं साधारण असं मत बनलं आहे की आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम आहे. ज्यांची आर्थीक परिस्थीती हालाकीची आहे त्यांच्यासाठी आरक्षण असावं असा मतप्रवाह दिसतो. पण बाबासाहेबांच्या मते आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नसुन सत्ते पासुन वंचित वर्गाला राजकीय्,सामाजीक व शैक्षणिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेला संविधानिक अधिकार होय. जो मराठा समाज हजारो वर्षापासुन सत्तेचा भागिदार होता त्याने आरक्षण मागुन स्वाभिमान गहान टाकल्याचा दाखला दिला. मराठे हे नेहमी सत्ताधारी होते. मग ते सातवाहनांच राज्य असो, यादवांच असो वा मुघलांचं असो. मराठा समाज ब्राह्मणाच्या मांडीला मांडी लावुण सदैव सत्तास्थानी विराजमान होता. अशा समाजाला आरक्शण देणे म्हणजे दांभिकपणाच ठरेल.  कारण आरक्षणाचं परिमाण हे गरीबी नसुन शोषण होय.
मराठा व ब्राह्मणांचा आर्थीक मागासलेपणा अकार्यक्षमतेचं द्योतक आहे.
मराठा व ब्राह्मणांचा आर्थीक मागासले पणा शोषणातुन आला नसुन अकार्यक्षमतेतुन आला. मराठा वा ब्राह्मण याना विकासाचे सर्व मार्ग सर्वकाळ खुले होते. तो समाज सदैव राज्यकर्त्या घटकाचा भाग होता. तरी सुद्धा आज मराठा ब्राह्मण समाजात गरीब लोकं दिसतात. कित्येक ब्राह्मण असे आहेत ज्यांचं उत्पन्न जेमतेच आहे. कित्येक मराठेही असे आहेत जे गरीब आहेत अन हे सगळं मला मान्य आहे. पण  यांच्या गरीबीचं कारण शोषण नव्हतं किंवा नाही. याना प्रगती साधण्यात कुठलाच सामाजीक व राजकीय अटकाव कधीच नव्हता. त्याना प्रगतीचे सर्व मार्ग सदा खुले होते. मग तरी हे ब्राह्मण व मराठे गरीब कसे काय? याचं एकच उत्तर असु शकतं ते म्हणजे यांच्यात स्वत:चा विकास करण्यासाठी लागणा-या अंगभूत गुणाचा अभाव. बास.......... मग हे असे लोकं कितीही अनुकूल परिस्थीती लाभली तरी विकास करुन घेणार नाही. त्यांच्यातील अंगभूत अकार्यक्षमतेची हि फलश्रूती होय. अशी लोकं जगात सगळीकडे सापडतात. प्रत्येक देशात गरीबी आहेच. अगदी अमेरीकेत सुद्धा गरीब लोकं आहेत. म्हणजेच गरीबी हि तुमच्या आकार्यक्षमतेचा प्रतिबिंब आह हे सर्वमान्य सत्य आहे.  याला अकार्यक्षम राज्यकर्त्यांची जोड लाभल्यावर त्यांच्या  धोरणात्मक कमकुवतीतून अशा गरीबीला वाव मिळतो. आपल्या देशातील राज्यकर्ते मराठे व ब्राह्मण असल्यामूळे  या धोरणात्मक चुकांतुन फोफावलेल्या गरीबीचं खापर सुद्धा त्यांच्याच माथी फुटतं. म्हणजे काय तर राज्यकर्ते तुम्हीच, धोरणात्मक दिवाळे वाजविणारे तुम्हीच, त्यामुळे येणारी गरीबी हे सुद्धा तुमचच पाप. अन वरुन ओरड काय तर गरीब मराठ्याना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते गरीब आहेत. अरे पण त्याना गरीब बनविण्यात ते स्वत: व तुम्ही कारणीभूत आहात, याचं काय करायचं? म्हणजेच याचा एकंदरीत सार असा निघतो की जे जे मराठे व ब्राह्मण गरीब आहेत हे राजकारण्याचां धोरणांचा तेवढा प्रभाव सोडला तर त्यांच्या स्वत:च्या कमकूवतपामुळेच गरीब आहेत. त्यांच्या गरीबीचं कारण कधीच शोषण हे नव्हतं. फक्त आळस अन ऐतखाऊपणामुळे हे मराठे आर्थीकमागासलेले आहेत. यांनी मिळालेल्या हक्कांची अमलबजावणी करण्यात जो काही कामचुकारपणा व आळस दाखविला त्यामूळे ते मागे राहिले. म्हणुन गरीब मराठ्याना किंवा ब्राह्मणाना आरक्षण देण्यात येऊ नये. त्यांची गरीबी हि शोषणातून आलेली नसुन अकार्यक्षमता व आळसातून आली. आशा आळशी लोकाना आरक्षण देण्याचे काहीच कारण नाही.

दलितांची गरीबी हा शोषणाचा भाग आहे.
मराठे व ब्राह्मणांच्या गरीबीच्या अगदी उलट दलितांच्या गरीबीची कहाणी आहे. दलिताला ईथल्या समाजाने जन्माने अस्पृश्य ठरविले होते. हजारो वर्ष सर्व  हक्कातुन वंचीत ठेवण्यात आले. गुलामगिरी लादली गेली. व्यवसाय करण्यास, शिक्षण घेण्यास बंदी होती. अर्थार्जनाचे सर्व मार्ग बंद होते. आमच्या लोकाना मराठे व ब्राह्मण या दोन मुख्य कार्यकारी समाजाने सदैव खितपत ठेवण्याचे काम अखंड चालविले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की दलितांच्या पुढच्या पिढ्या गुलाम म्हणुन राबु लागल्या. आत्मसन्मान काय असतो याची आम्हाला भणकही नव्हती. महारकी करुन जगणे, मराठ्यानी फेकलेले तुकडे खाणे व त्या मोबदल्यात आयुष्यभर यांची गुलामी करणे यातच आमच्या कित्येक पिढ्या खपल्या. त्यामुळे आमच्या लोकांकडे ना विद्या होती, ना धन होते ना जमीन जुमला होता.  आमच्या सर्व समाजावर गरीबीने फास आवळला. आमच्या अंगभूत गुणांना वाव देणारी योजनाच नसल्यामुळे माझ्या समाजातून विद्वानांची उत्पत्ती झालीच नाही. याचा अर्थ माझ्या समाजात विद्वान जन्मलेच नसतील असा नाही. समकालीन उच्च वर्णियाना पायी तुडविण्याची क्षमता बाळगणारे कित्येक विद्वान जन्मलेही असतील पण समाजाच्या रुढी परंपरेच्या नावाखाली ब्राह्मण व मराठा या सत्ताधिशानी आम्हाला तिथेच संपवलं. आमच्या पिढयान पिढ्या या मनुवादी परंपरेच्या बळी चढल्या अन या शोषणातून आमचा समाज गरीब व अज्ञानी राहिला. मराठे व आमच्या गरीबीतील हा मुख्य फरक अधोरेखीत करणे फार गरजेचं आहे. मराठे आरक्षण मागताना गरीबीला पुढे करतात पण मुळात त्यांची गरीबी हि शोषणातून आलेली नसुन अनकष्टीपणा आहे. उलट आम्ही अत्यंट कष्टाळू, प्रामाणीक व चिकाटीनी काम करणारी माणसं आहोत.
आमचं शोषण कित्येक आघाड्यावर  करण्यात आलं. आमच्या शोषणात सर्वात आघाडीवर जो समाज होता व आजही आहे तो म्हणजे मराठा समाज. मग अचानक आज हाच मराठासमाज उठतो व आरक्षाणाची मागणी करतो. अन त्या साठी गरीबीची लंगडी सबब पुढे करतो. या मागणीला जोर मिळावा म्हणुन जयभीमही म्हणतो. पण माझा प्रश्न असा आहे जो समजा स्वत: शोषणकर्ता होता व आहे त्याला शोषीतांची सोय कशी काय मिळवावीशी वाटते? आरक्षण हि शोषीतांची सोय आहे ती आता शोषणकर्ता समाज मागु लागतो म्हणजे परत एकदा आमची नाकेबंदी करण्याचा हा प्रकार नव्हे का? आजवर जो स्वत: आमचे शोषण करत आला आहे तोच आमच्या गोटात घुसून ब्राह्मणांच्या नावाने खडे फोडु लागला.  आजवर ब्राह्मणांच्या सहाय्याने जेंव्हा राज्य करावयास मिळाले तेंव्हा हे ब्राह्मण कसे यान गोड वाटत होते. आज अचानक तिकडे दलितांच्या गोटात मलाई दिसल्यावर लगेच ब्राह्मण कडू वाटु लागले. हि मराठ्यांची कूटनीती न समजण्या ईतके आम्ही दुधखुळे नाही हे याद राखावे.  ब्राह्मण व मराठे हे सत्तेतील परम मित्र, आजवर त्यांच्यासोबत सत्ता उपभोगली ते कमी पडलं की काय म्हणुन आता ईकडून आरक्षणातही वाटा मिळवू पाहात आहेत. केवढा हा दांभीकपणा........
शेवटी एवढच म्हणेन आरक्षण हे गरीबी हटाव कार्यक्रम नसुन सत्तेपासुन वंचीत अशा शोषीतांसाठी बाबासाहेबानी दिलेले वरदान आहे.  ईथे शोषणकर्त्या समाजाचं  काहिच काम नाही. गरीबी हे आरक्षण मिळविण्याच मापदंड होऊच नाही शकत. आरक्षणाचं एकच मापदंड अन ते म्हणजे शोषितपणा.
जयभीम.
तळटीप: वरिल दोन्ही सत्याधा-यातील फक्त आरक्षण मागणा-या समाजालाच हा लेख लागू पडतो.

शुक्रवार, २० मे, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पहिली)

सायमन कमिशनचा प्रतिवृत्तांत आला:
ईकडे नाशीकात जरी काळाराम मंदिराचा सत्याग्रह जोरात चालु होता तरी राजकीय पातळीव घडणा-या घडामोडींवर बाबासाहेब नजर ठेवुन होते. सायमन समिती लवकरच आपला प्रतिवृत्त सादर करणार होती व त्या मधे अस्पृश्यांच्या पदरात काय पडले हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेब अत्यंत आतुर झाले होते. अखेर मे १९३० सायमन समितीने आपला प्रतिवृत्त जाहिर केला. भारतातील निवडणुकीमध्ये जातवार मतदार संघ ठेवण्याची शिफारस केली. हिंदुना  मध्यवर्ती विधीमंडळात २५० पैकी १५० जागा मिळणार होत्या. अस्पृश्य हिंदुना संयुक्त मतदार संघात राखीव जागा देण्यात आल्या. परंत अस्पृश्य वर्गातील उमेदवारांची निवडणुकीस उभे राहण्याची पात्रता ठरविण्याचा अधिकार राज्यपालाना देण्याचा मुर्खपणा या सायमन समितीनी केला होता.
८ ऑगस्ट १९३० रोजी नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषद भरली. या परिषदेचे अध्यक्षपद बाबासाहेबानी भूषविले. ब्रिटिशांवर कडाडुन टिका केली. ब्रिटिशांमुळे स्वातंत्र्य, समता व बंधुता रुजविण्यात जरी मदत होत असली तरी स्वराज्य हवेच आहे. कारण ब्रिटिशांच्या काळात सगळ्यात जास्त म्हणजेच मागच्या एका शतकात ३७ दुष्काळ पडले व तीन कोटीहुन अधिक लोकं भुकेनी मेलीत. आपला व्यापार ईथे अनंतकाळ चालु ठेवण्यासाठी भारतात औद्योगीक क्रांती होऊ न देण्याची ब्रिटिशांची निती आपल्या पदरी दारिद्र्य टाकुन जात आहे. त्यांचा माल ईथे खपावा म्हणुन ईथली बाजारपेठ कायम इंग्लडच्या उत्पादनावर निर्भर राहिल अशी निती राबविण्यात येत आहे. ब्रिटिशांच्या दोन मुख्य देणग्या आपल्याला लाभल्या आहेत. एक विधीपद्दत व दुसरी सुव्यवस्था. पण जगण्यासाठी या पलिकडेही काही गरजा असतात हे ब्रिटिश सरकार विसरले दिसते किंवा हेतुपुरस्सरपणे त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. माणसाला जगण्यासाठी अन्न लागते व त्याचे बळकट नियोजन फक्त स्वराज्यानेच शक्य आहे. ईथले दारिद्र्य नको असल्यस स्वराज्य मिळविणे गरजेचे आहे. अशा प्रकारे ब्रिटिशांवर ताशेरे ओढुन सायमन कमिशनच्या मुर्खपणाचे वाभाडे काढले. आज पर्यंत बाबासाहेबांचा असाच आग्रह होता की ब्रिटिशानी स्वातंत्र्य समता व बंधुभाव राबविण्याआधी सनातन्यांच्या हाती सत्त्ता देऊ नये. कारण एकदा का सत्ता सनातन्यांच्या हाती पडली की अस्पृश्यांच्या वाट्याला काहिच येणार नाही हे उघड होते. सायमन कमिशनमुळे नाराज होऊन बाबासाहेबानी स्वराज्याची भाषा बोलुन गेले. या परिषदेत बाबासाहेबानी आजुन एक आरोळी फोडली, काही झाले तरी हिंदु सोडणार नाही. बाबासाहेबानी ब्रिटिसांचा समाचार घेतल्याचे पाहुन ’केसरी’ ने टोमणा मारला की सिझरवर त्याचा मित्र बृटश उलटला तसे बाबासाहेब आपल्या मित्रावर (ब्रिटिशांवर) उलटले.
सायमन कमिशनने केलेल्या शिफारशी नुसार भारतातील विविध पुढा-याना इंग्लडमधे भारतीय कायद्या विषयी विचार विनिमय करण्यासाठी बोलावण्यात आले. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणुन बाबासाहेब व रावबहाद्दुर श्रीनीवासन याना आमंत्रण देण्यात आले. ६ सप्टेबर १९३० रोजी गव्हर्नर जनरल कडुन गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे अधिकृत आमंत्रण मिळाले. आज सोनियाचा दिनु होता. ज्या अस्पृश्याना हिंदु लोकांनी सदैव दास्यात खितपत ठेवले त्यांच्या प्रतिनिधीला ब्रिटिश सरकारकडुन मिळालेलं आमंत्रण हि एक अपूर्व अशी ऐतिहासिक घटना होती. आता ब्रिटनच्या गोलमेज परिषदेच अस्पृश्यांच्या किंकाळ्यांचा प्रतिध्वनी गुंजणार होता. अत्यंत टोकाला जाऊन अस्पृश्यांच्य व्यथा मांडण्यासाठी सर्व आघाड्यांवर शत्रुला पुरुन उरेल असा महानायक एका ऐतिहासीक कामाची सिद्धता करु लागला.  अस्पृश्यांना गुलामगिरीतुन मुक्त करण्याच्या दिशेने राणीच्या देशातुन आलेल्या या हाकेला ओ देऊन दलितांचा पुढारी युद्धास युद्धास सज्ज झाला.
४ ऑक्टो १९३० रोजी बाबासाहेब ’व्हॉइसरॉय ऑफ इंडिया  या बोटीने मुंबईहुन लंडनला निघाले. याच काळात भारतात गांधीजीनी असहकारतेची चळवळ संपुर्ण ताकत लावुन उभी केली. ब्रिटिशाना सळो की पळो करणारी असहकारतेची चळवळ  अत्यंत प्रखरतेने चालविण्यात सर्व शक्ती एकवटुन कामाला लागल्या मुळे व सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्यामुळे गांधी या गोलमेज परिषदेस गेले नाही. कॉंग्रेसी पुढा-यानी गोलमेजवर बहिष्कार टाकला होता. असहकाराचा वणवा देशभर पसरत होता अन अशा वेळी कॉंग्रेसेत्तर, मुस्लिम व अस्पृश्य पुढा-यानी ब्रिटिशाशी सहकार्य करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे गांधीवादी आजुन भडकले. गांधीवादी सोडता इतर सगळे गो-यांचे हस्तक असल्याचं बोललं जाऊ लागलं.  यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा आपल्या ’इंडियन स्ट्रगल’ नावाच्या ग्रंथात बाबासाहेबाना ब्रिटिसांचा हस्तक म्हणतात. १८ ऑक्टो १९३० रोजी बाबासाहेब लंडनला पोहचतात. परिषद सुरु व्हायला आजुन २४ दिवस बाकी होते. तो पर्यंत बाबासाहेबानी तेथील पुढा-यांच्या, पत्रकारांच्या भेटी गाठी घेऊन अस्पृश्यांची इंत्यंभूत माहिती दिली. अस्पृश्याच्या बाजुने सगळ्या ब्रिटिशाना झुकतं माप देण्यास भाग पाडणारी सगळी युक्ती लढवुन आपली बाजु भक्कम केली. प्राथमिक पातळीवर दलितांची बाजु मांडताना मिडीया व सभागृहातील नामी सदस्यांना प्रत्यक्ष भेटून विनवण्या केल्या, वेळप्रसंगी कित्येकांची मनधरणी केली. पराकोटीचे कष्ट उपसुन दलितांची बाजू मांडण्याचे सर्व प्रयत्न केले, परिषदे पुर्वी दलितांच्या बाजुने एकुणच झुकतं माप मिळणार याची भक्कम पायभरणी बाबासाहेबानी करुन ठेवली.
१२ नोव्हे. १९३० रोजी गोलमेज परिषद (पहिली) सुरु झाली.  ब्रिटिशानी या परिषदे बद्द्ल दाखविलेल्या अत्यंत कुतुहलाचे व उत्सुकते परिणाम असे झाले की परिषदेकडे जाणा-या सर्व रस्त्यांवर ब्रिटिश नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दोन्ही कडेनी ब्रिटिशानी तुफान गर्दी करुन परिषदेच्या मार्गावर आपली उपस्थीती दाखवुन उत्सुकता प्रकट केली. परिषदेचे उदघाटन करताना इंग्लडचे महाराजे पंचम जॉर्ज म्हणाले, हि परिषद अपूर्व अशी असुन त्यातिल प्रतिनिधींची नावे भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरानी नोंदली जातील.   रॅम्से मॅकडोनाल्ड यांची परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड होते अन परिषदेस सुरुवात होते.
गोलमेज परिषद म्हणजे म्हणजे भारतीय घटना तयार करण्यासाठी नेमलेली घट्ना समिती नव्हती. भारतीय पुढा-यांचे, संस्थानिकांचे मत आजमावण्यासाठी व त्यावर ब्रिटिशांच्या प्रतिनिधी मंडळाने योग्य निर्णय देण्यासाठी विविध प्रश्नांवर साधक बाधक चर्चा करावयास बोलाविण्यात आलेली परिषद होती.  परिषदेत सप्रु, जयकर, मुंजे, जिना, बिकानेरचे महाराज  अशा अनेक भारतीय मुत्सद्यांचे तडाखेबंद अन कळकळीचे भाषण केले.  एका मागुन एक भारतीय पुढारी व संस्थानीक उभे राहुन आपले मत मांडु लागले. अन तेवढ्यात एक तरुण उठुन उभा राहतो. सुदृढ बांधा, दणकट अंगकाठीचा, सर्वोत्तम पेहराव अन चेह-यावर झडकणार तेज ज्यात सारी सभा न्हाऊन निघाली असा त्या शतकाचा महान विद्वान आता भाषणासाठी उभा झाला होता. अख्ख्या सभागृहात अर्थशास्त्रत, राज्यशास्त्र, समाज शास्त्र अशा अनेक विषयात ज्याच्या तोडीचा कोणीच नव्हता अशा या महामानवाचं नाव होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बुद्धी वैभवानी झडाडलेली मुद्रा बघुन सभेतील सर्व सदस्यांचे डोळे दिपून गेले. नजरेतील आत्वविश्वास असा काही अबोल गरजत होता, ज्याचा प्रतिध्वनी प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवुन गेला. अखंड विद्यार्जन व अविश्रांत परिश्रमाने बुद्धिची कांती ईतकी सतेज झाली होती की नजरेच्या टप्प्यात आलेले दगड धोंडे सुद्धा लख्ख लख्ख झडाडुन निघाले. ज्याचा जन्म टाकुन दिलेल्या समाजात झाला त्याने केवळ बुद्धीच्या बळावर आज चिखलातुन उठुन ब्रिटिशांच्या गावी, हिंदुंच्या मांडिला मांडी लावुन बसण्याची गुणवत्ता खेचून आणली. अन ते भाषणास सुरुवात करतात.
ज्या लोकांची स्थिती गुलामांपेक्षा वाईट आहे, आणी ज्यांची लोकंसंख्या फ्रान्स या देशातील लोकसंखेएवढी आहे.  भारतातील या एकपंचमांश लोकांची गा-हाणी मी परिषदेपुढे मांडत आहे. अन बाबासाहेब बॉंम्ब टाकतात. भारतातील सरकार हे लोकानी लोकांसाठी चालविलेले सरकार असावे. (सर्व सभा अवाक होते, बाबासाहेबाना ब्रिटिशांचा बगलबच्चा म्हणणारे आश्चर्याने बघु लागता, सारा सभागृह स्तब्ध होऊन हे काय मागितलं म्हणुन आश्चर्यानी बाबासाहेबांवर नजर रोखतो. हा देशभक्तीचा असा नमुना होता ज्याच्या पुढे स्वत:ला देशभक्त म्हणुन मिरविणा-या सर्व नेत्यानी एक मताने बाबासाहेबांच्या हाती सत्ता सुपुर्द करुन मुत्सद्दीपणाचे नमुणे पाहायला हवे होते.)  ते पुढे म्हणाले, अस्पृश्य वर्गामधे हे आश्चर्यकारक स्थित्यांतर घडून येण्यास ब्रिटिश सरकारच जबाबदार आहे. ब्रिटिश राज्य येण्या आधी माझ्या समाजाची जी परिस्थीती होती त्यात काडिमात्र बदल झालेला नाही. आज तुमच्या राज्याला सव्वाशे वर्ष उलटुन गेली तरी आमची गुलामी तशीच आहे. पुर्वी आम्हाला विहिरीवर पाणी भरायला मनाई होती, आजही आहे. पुर्वी आम्हाला मंदिर प्रवेश बंदी होती, आजही आहे. पुर्वी आम्हाला पोलिस दलात प्रवेश नव्हता, आजही नाही. पुर्वी आम्हाला सेनेत घेत नव्हते, आजही नाही. अशा अनेक मुलभूत प्रश्नाची उत्तरे मी आजही नकारात्मक देतो. याचा अर्थ असा आहे की ब्रिटिशानी समतेचा जो तोरा मिरविण्याची सोंग दाखविली आहेत ती साफ खोटी व फसवी आहेत. म्हणुन आज अस्पृश्यांला वाटु लागले आहे की स्वराज्य मिळायला हवे. ब्रिटिशांपेक्षा लोकानी लोकांसाठी चालविलेले राज्य यायला हवे. हि मागणी मुळात आकार घेण्याचे कारणच आहे ब्रिटिशांचा पक्षपाती राजकिय धोरण अन समतेचा सोंग. असे हे निष्क्रिय सरकार काय कामाचे, ज्याना सव्वाशे वर्षात इतका मुलभुत प्रश्न हाती घ्यावा असे वाटले नाही त्याना राज्य करण्याचा खरच नैतीक अधिकार आहे का याचं त्यानी आत्मचिंतन करुन बघावं. (हिंदु प्रतिनिधिंची चुळबुळ सुरु झाली, बाबासाहेबानी गो-याचा समाचार घेताना जो विषय पुढे केला त्यावर सरकारची तारांबळ उडाली) भारतातील भांडवलदार किमान वेतन कामगाराना देत नाही. जमिनी शेतक-याना मिळत नाही, जमिनदारांचे शेतक-यांच्या जमिनीवर हक्क प्रस्थापित होत आहेत. या आर्थीक पिळवणुकतुन मुक्त करण्यासाठी कायद्यात बदल करुन लोकाना दिलासा देण्याचा अधिकार सरकारला असुन सुद्धा तो वापरला जात नाही. अन हे सगळं का होत नाही तर हस्तक्षेपा नंतर होणा-या प्रतिकाराला घाबरुन........ असे भ्याड सरकार काय कामाचे. (सगळ्या गो-या साहेबांच्या माना आता खाली गेल्या होत्या, सगळ्यानी नजर जमिनीवर रोखुन बाबासाहेबांकडुन होणारा उद्धार झेलत होते) सध्या देशात तप्त वातावरण असल्यामुळे बळाचा वापर योग्य ठरणार नाही. स्वार्थी राज्यघटना मान्य होणार नाही. तुम्ही ठरवावे अन हिंदी लोकानी ऐकावे असा हा काळ नाही. आता काळानुरुप लोकांमधे बरीच जागरुकता झाली किंवा क्षणोक्षणी ती घडवून आणली जात आहे. याचा एकंदरीत परिणाम तुम्हाला माघार घेणारा असेल, त्यापेक्षा मोठ्या मनानी जनकल्याणाचे निर्णय घेऊन समता रुजविण्याचे काम करावे. (आज पर्यंत ज्या हिंदुनी फक्त महार म्हणुन बाबासाहेबाना हीन नजरेनी बघितले, त्याना बाबासाहेबांची खरी योग्यता आज दिसली. देशभक्तीचा असा हा उच्च कोटीचा नमुना पाहुन गांधीची चळवळ कवडीमोलाची वाटली असावी) ’इंडियन डेली मेल’ने असे प्रसिद्ध केले कि बाबासाहेबांचे हे भाषण म्हणजे वक्तुत्वाचा एक उत्कृष्ट नमुना होय. (Ref: Indian Round Table Conference, p 123-29)

या सभेत हिंदु लोकांमधे एक व्यक्ती मात्र कृतकृत झाली होती. चेह-यावर प्रसन्नता दाटुन आली. डोळे भरुन आले, आपल्या  हातुन एक महान विद्वान घडविला गेल्याचा पुरावा मिळाल्यामुळे जन्म सार्थकी लागले अन डोळ्यातुन आनंदश्रू वाहू लागले. समाधान व कौतुकानी यांचे हृदय ओसंडून वाहु लागले. ते व्यक्ती होते बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड.  बाबासाहेबाना विदेशात पाठविण्यासाठी मदत करणार हेच ते राजे. आज बाबासाहेबांचा भीमपराक्रम पाहुन  ते धन्य झाले होते. बाबासाहेबाना शुभेच्छा देऊन जेंव्हा तिथल्या राजवैभवी निवासस्थानी जातात, तेंव्हा राणीला हि शुभवार्ता सांगुन महाराज म्हणतात, आपले सारे प्रयत्न आणी पैसा सार्थकी लागला आहे. कार्य सिद्धिस गेले, या डोळ्यानी एका विद्वानाची वैभवशाली वाटचाल बघितली. हि माझ्या अयुष्यातील  एक अपूर्व घट्ना होती. अन याच खुषीत महाराजानी लगेच तिथेच बाबासाहेब व मित्रपरिवाराला एक मोठी मेजवाणी देतात अन मधल्या काळातील वियोग एकदाचा संपतो.

ईकडे २४ नोव्हे १९३० रोजी बाबासाहेबांच्या पुर्व आदेशानुसार बंद पडलेले बहिष्कृत भारत कात टाकुन ’जनता’ असे नाव धारण करते अन परत एकदा चळवळ लढविण्यास सज्ज होते. देवराव नाईक संपादक  व भास्करराव कद्रेकर हे प्रकाशक व व्यवस्थापक म्हणुन काम पाहु लागतात. बंद पडलेल्या बहिष्कृत भारत व समता या दोन्ही पाक्षिकाच्या वर्गणीधारकाना वर्गणीचे पैसे फिटेस्तोवर जनताचा अंक देण्याचे ठरते. बाबासाहेब जरी विदेशात बसले होते तरी त्यांचे संपुर्ण लक्ष ईथे होते. गांधीवादयानी इंग्रजांच्या विरोधात लढा तीव्र केला होता. गोलमेजला गेलेल्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा गांधीवादयानी देशाच्या कान्याकोप-यातुन निषेध नोंदविला होता. या हेकट लोकांपासुन कसे सुरक्षित राहावे, लवकर घरी जावे, एकटे फिरू नये किंवा रात्री घरा बाहेर पडु नये अशा सुचनांचे अनेक पत्र बाबासाहेबानी शिवतरकर व कार्यकर्त्याना पाठविले होते.

ब्रिटन व अमेरीकी वृत्तपत्रांमधुन अस्पृश्यतेचा प्रश्न चव्हाटयावर ठेवला
बाबासाहेबांच्या भाषणातील अनेक मुद्दे इंग्लड व अमेरीकी पत्रकारानी छापले. खरं तर या पत्रकाराना सुद्धा हा मुद्दा निट माहित नव्हता. पण बाबासाहेबांच्या मुद्देसुद व सखोल अभ्यासाच्या बिनतोड मिश्रणाने आकार घेतलेली हि भाषणे अगद्या काही शब्दात अस्पृश्यांच्या गुलामीची गाथा अचुकपणे जगाच्या समोर मांडली जाऊ लागली. बाबासाहेबानी हि व्यथा मांडाताना मिळेल त्या मार्गाचा अचुक वापर केला. सुरुवातीला जे पत्रकार  बेकींग न्युज म्हणुन बातमी घेत आता त्यांच्यातील मानवी मुल्ये त्याना बाबासाहेबांकडे खेचून आणु लागली. पत्रकारांच्या संवेदनशील मनाला बाबासाहेबांच्या थोरवीची ओळख होताच कर्त्यव्य बजावण्यासाठी कित्येक पत्रकारानी बाबासाहेबांच्या अस्पृश्य सेवेच्या कार्यात जमेल त्या परिने योगदान देण्याचा अखंड यज्ञ केला. सगळ्या वृत्तपत्रातुन, मासिकातुन, एकच चर्चा उडाली. अस्पृश्य नावाचा अमानुष प्रकार भारतात चालु आहे अन इंग्रजानी त्यावर उपाय योजना न योजल्यामुळे ब्रिटिश जनता लज्जीत झाली. सा-या जगातुन या अस्पृश्यतेचा धिकार करणा-या प्रतिक्रिया येऊ लागल्या. जिकडे तिकडे अस्पृश्यातेचा प्रश्न भारतीय संस्कृतीचे मुखवटे फाडत पसरत होता. कित्येक हिंदुना तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. संस्कृतीचा तोरा मिरविणा-या सनातन्यांचे चेहरे अता उघडे पडले होते.  आता संपुर्ण जगाला कळुन चुकले की अस्पृश्य म्हणजे नेमका काय प्रकार आहे.
आपले ध्येय गाठण्यासाठी बाबासाहेबानी अस्पृश्यांसाठी मुलभूत हक्काची मागणी करणारा एक जाहिरनामा प्रसिद्ध केला.  या जाहिरनाम्याचे नाव होते, ’हिंदुस्थानची भावी राज्य घटना आणी अस्पृश्य निवारणाची योजना’. देशातील प्रांतिक व मध्यवर्ती विधीमंडळात अस्पृश्याना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळण्याचा हक्क असावा. सार्वत्रीक मतदान पद्दती असावी.  पहिली १० वर्षे स्वतंत्र मतदार पद्दतीने व नंतर सामुहिक मतदार पद्दतीने परंतू राखीव जागेच्या व्यवस्थेनुसार आपली माणसे प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा हक्क अस्पृश्य वर्गीयाना असावा. सरकारी नोकरीत प्रमानशीर भर्ती करण्यासाठी लोकसेवा आयोग नेमावे. निर्बंधात व व्यवहारा कुठलिही जातपात पाळू नये. अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी एक खास खाते निर्माण करावे. प्रांतिक व स्थानीक सरकारने अस्पृश्यांच्या हिताकडे दुर्लक्ष वा कानाडोळा केल्यास त्या विरोधात हिंदुस्थान सरकारकडे किंवा भारतमंत्र्याकडे तक्रार करण्याचा अधिकार अस्पृश्य प्रतिनिधीना वा संस्थेना देण्यात यावा. मुलभूत हक्काची मागणी करणारा हा जाहिरनामा म्हणजे पाचावर धारण होता. जातुन सर्व लोकानी या जाहिरनाम्याच्या बाजुन केल दिला. ब्रिटिशांची तारांबळ उडाली. ईकडे हिंदु नेत्यांचा तिळपापड होत होता.
मुसलमान प्रतिनिधीनी सिंध प्रांत, स्वतंत्र मतदार संघ व वायव्य प्रांत वेगळा करुन दयावा अशा मागण्या लावुन धरल्या. अस्पृश्यवर्गाच्या मागणीला ते पाठिंबा देत नव्हते. कारण अस्पृश्य हे शेवटि हिंदुच होते. त्यांच्या मताप्रमाणे उद्या हे दोघे एकत्र होतील व आपल्या हक्कावर गदा आणतील असे त्याना वाटे. त्यांच्या संयुक्त बळापुढे आपला टिकाव लागणार नाही अशी त्याना भीती वाटत असे.

भारतातील अस्पृस्य कशी युगानुयुगे असाह्य वेदना सहन करतोय, अपमान कारक व अंखंड दु:ख भोगतो आहे याकडे जगाचे लक्ष वेधण्याचे काम अहोरात्र चालु होते. अस्पृश्यांची परिस्थीती अमेरीकेतील निग्रोंपेक्षा कशी वाईट आहे हे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी कित्येका ठिकाणाहुन भाषणे, पत्रके व लिखान करुन बाबासाहेबानी सा-या जगाला या प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडले.  बाबासाहेबांच्या या प्रयत्नाना ब-यापैकी यश आले. मिस एलिनॉर, मिस. एलेन, नॉर्मन ऍन्जेल इत्यादी लोकसभेतील सभासदांनी लॉर्ड सॅंकी यांची भेट घेतली. अस्पृश्य वर्गाला सरसकट मतदानाचा अधिकार दयावा अन त्यांच्या गा-हाण्यांचे निवारण करावे अशी विनंती केली. हि बाबासाहेबांची पहिली विजयी मुसंडी होती. गो-या लोकानी आता हा प्रश्न सोडविण्यात यावा यावर आपले मत देणे सुरु केले.  लॉर्ड सॅंकी यानी अस्पृश्याना त्यांचे मुलभूत अधिकार मिळतील असे आश्वासन दिले. हि मुसंडीची फलश्रूती होती.
याच्या अगदी उलट भारतीय मिडीयानी मोहिम हाती घेतली होती. बाबासाहेबांवर उभ्या जगातुन मदतीच्या वर्षाव होत होता. त्यांच्या तर्कशुध्द व वस्तुनिष्ठ प्रश्नानी जगाला गदागदा हालवुन सोडले होते. सारा मिडीया त्याना या विधायक कामात सहाय्य करत होता. भारतीय मिडीयानी मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. बाबासाहेबांवर टीका होताना बघुन ईथल्या दलितांच्या हृदयात संतापाची लाट उसळत असे पण आपला राजा तिथे एकेकाला तुडवित आहे याचं मनात समाधान होतं. बाबासाहेबांच्या उद्योगशिलतेने आणि बुद्दिवादाने परिषदेतील कित्येक प्रतिनिधी भारावुन गेले. बाबासाहेबांबद्दल त्याना अत्यंत आदर वाटु लागला. एक महान विद्वान त्या परिषदेला लाभल्यामुळे ते स्वत: कृतकृत झाले होते. बाबासाहेब ईथे परिषदेत व्यस्त असताना त्याना एक आनंदाची बातमी देणारी तार मिळाली. महाड सत्याग्रहाच्या  खटल्याचा निकाल लागला. अस्पृश्यांचा विजय झाला अशी तार होती. हि तार वाचुन बाबासाहेबांच्या डोळ्यांतुन आनंदाश्रू वाहु लागले. पाणी मिळविण्यासाठी लढा उभारावा लागतो ईथुन सुरु होणारा लढा समता गाठेस्तोवर लढायचे म्हणजे महा कठीण काम, पण ही तार मात्र पुढे विजयश्री वाढुन ठेवल्याचं सांगत होती.
विविध उपसमित्यांचा अहवाल संमत करुन गोलमेज परिषद १९ जाने १९३१ साली स्थगित झाली.  त्यानंतर लगोलगो हिंदी प्रश्नावर ब्रिटिश लोकसभेच चर्चा अन वादावादी सुरु झाली. परिषदेत ठरलेल्या तत्वांवर भावी भारताची राज्यघट्ना तयार केली जाईल व त्यामधे अस्पृश्यांचा मुद्दा निकाली काढण्यात येईल. त्याना मुलभूत अधिकार बहाल केले जातील असे रॅम्से मॅक्डोनाल्ड साहेबानी लोकसभेत भाषण केले. या वादविवादाच्या वेळी आयझॅक फूट नामक सदस्यानी अस्पृश्यांच्या बाजुने आवाज उठविला. अस्पृश्यांची बाजु मांडताना ते सदग्रुहस्थ म्हणतात जर आज आपण अस्पृश्यांचा प्रश्न सोडविला नाही तर आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याना हयाचे पाप भोगावे लागतील. यापुढे भारतात जाणा-या भावी राज्यपालानी अस्पृश्याना सहाय्य  व सहानुभूतीचा हात दयावा अन त्याना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे सर्व प्रयत्न करणे हेच आपले ध्येय आहे ठेवले पाहिजे अशी मी त्याना ताकिद देतो.फूट साहेबांचे हे वाक्य म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याचे प्रशस्तीपत्र होय.

१३ फेब्रु. १९३१ रोजी बाबासाहेब भारताच्या प्रवासासाठी एस. एस. मुलतान नावाच्या बोटीवर चढतात. गोलमेज परिषदेत विविध विषयावर सखोल चर्चा घड्वुन आणण्याचे अत्यंत जबाबदारीचे काम पुर्ण करुन आज बाबासाहेब मायदेशीच्या वाटेवर होते. त्यातल्या त्यात अस्पृश्यांच्या प्रश्नावर सारं जग हालवुन सोडल्यामुळे आता काहितरी निर्णायक निकाल हाती लागेल अशी खात्री वाटे. २७ फेब्रु. १९३१ रोजी ते मुंबई बंदरात उतरतात. शंकरराव वडवळकरा यांच्या नेतृत्वाखाली समाज समता दलाच्या दोन हजार स्वयंसेवकानी मुंबई बंदरात बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले. एका वार्ताहाराला उत्तर देतात, गोलमेज परिषद हि मुत्सद्देगिरीचा विजय आहे. जरी नियोजीत राज्य घटनेत काही दोष असले तरी ते फार महत्वाचे नाहीत. आपल्याला ते नंतरही दूर करता येतील. अन त्यानी असे स्पष्ट केले की भावी राज्यघटनेत अस्पृश्यांचे हित साधले जाईल व हाल अपेष्टा संपुष्टात येतील.” अशा प्रकारे पहिली गोलमेज परिषद पुर्ण होते.