शनिवार, १४ मे, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )

भागवतधर्मी संतांचे बंड
चातुर्वर्ण्य मिटविण्याच्या दृष्टिने महाराष्ट्रात भागवतधर्मी संताने ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बंड केले होते. पण या बंडाचा पायाच मुळात चुकीचा होता. इतर सर्व माणसांप्रमाणे माणुस असलेला ब्राह्मण श्रेष्ठ की ईश्वरभक्त श्रेष्ठ असा तो विचित्रसा लढा होता. सुरुवातीला या लढ्याकडे अस्पृश्यानी मोठ्या आशेनी पाहिले. हा लढा शेवटी भागवतधर्मीयानी जिंकला व ब्राह्मणापेक्षा ईश्वरभक्त श्रेष्ठ असा सर्वमान्य निकाल आला पण या सगळ्या निकालातुन अस्पृश्य निर्मूलनाला पाठबळ मिळेल असं काहीच निघालं नाही. ब्राह्मण श्रेष्ठ कि शुद्र हा प्रश्न निकाली निघालाच नाही. किंवा या दोहोतील ना ब्राह्मण श्रेष्ठ ना शूद्र, दोघेई समान आहेत हे सत्य अलगद बाजुला पडलं. उलट या भागवतधर्मीयांच्या लढ्याच्या निर्णयामूले ब्राह्मणाच्या हाति शूद्रांचे शोषण करण्यासाठी एक नविन मुद्दा आला. तुम्ही ईश्वर भक्त आहात हे आधी सिद्ध करा अन तदनंतरच ब्राह्मणांच्या बरोबरीच्या बाता करा. आता ईश्वरभक्ती सिद्ध करण्याचं नविन आव्हाहन परत एकदा अस्पृश्यांच्या प्रगतीत अडचण बनुन उभं होतं. चोखामेळासारखे भक्त व्हा अन आपली भक्ती सिद्ध करा तेंव्हा आम्ही तुम्हाला मान्यता देऊ अन्यथा तुम्ही विटाळाच्याच लायकिचे आहात हे मुकाटपणे मान्य करा अशी वंचना करण्याची नविन युक्ती ब्राह्मण व ईतर संवर्णानी चालविली. हि युक्ती ईतकी बेजोड होती की महारांच्या पाचावर धारण बसले अन कुरकुरणारी तोंड कायमची बंद झाली. चोखोबाच्या तोडीची भक्ती सिद्ध करणे अशक्यप्राय होते म्हणुन ओघानेच अस्पृश्याना माघार घ्यावी लागली व परत एकदा संवर्णांची सरशी झाली.

१९२८ च्या सुरुवातीस आजुन एक जातीयवादी किस्सा उभ्या महाराष्ट्रात गाजला. इंदुरचे महाराज श्री. तुकोजीराव यांच एक आंग्ल ललनेवर मन जळलं, जाती पातीच्या सगळ्या बेळ्या तोडुन उभयतानी विवाह करण्याचा घाट घातला पण ही सनातन्यांची भुमी होती. ईथे कुणालाच जातियबंधनं झुगारुन मनस्वी वागणुकीस परवानगी नव्हती. महारांनीतर थेट गो-या मुलीशी लग्नाचा घाट घातला. उभ्या महाराष्ट्रातुन सनातन्यानी आकाश दुमदुमवुन सोडलं. जिकडे तिकदे गगनभिदे आरोळ्यानी महाराजांचा विरोध होऊ लागला. धर्मबुडव्या म्हणून नाशिकच्या ब्राह्मणानी महाराजांवर ठपका ठेवला. हे सगळं चालु असताना, सगळा विरोध झुगारुन देत महाराजानी एकदाचं लग्न करायचं ठरवलं अन बाबासाहेबानी या लग्नास शुभेच्छा देण्यासाठी जातीने हाजरी लावली. एक परधर्मिय मूलिनी त्या हिंदु धर्मात प्रवेश करावा ज्याचा बाबासाहेबानी नेहमी तिरस्कार केला याचं ते समर्थन होतं की एका प्रेमीयुगलाना  होतं हे न उलगडणारं कोळं.
या वादग्रस्त विवाहानंतर त्याच रात्री  रावबहाद्दुर बोली यानी बारामतीत बाबासाहेबांचा सत्कार समारंभ ठेवला.  या समारंभात आजुन एक दलिताचा सत्कार झाला. श्री. मा. क. जाधव. हे जाधव दलित वर्गातील उच्च शिक्षित गृहस्थ. मुंबई सरकारच्या सेवेत होते. बाबासाहेबाना आधिपासुन यांच्या गुणवत्तेची जाण होती. किंबहुन असे कित्येक गुणवाण दलित हरहुन्नरी फक्त जातीमुळे बढतीपासुन वंचित होते. त्या वेळेस बाबासाहेब मुंबई विधिमंडळात होते त्यानी मुंबईचे राज्यपाल सर लेस्ली यांच्याशी जंगी वाद घातला. उभयतांमधे चांगले खडगे उडाले. दलिताच्या अंगभुत गुणांकडे दुर्लक्ष करण्याच्या सरकारच्या रवय्यावर बाबासाहेबानी झोड उठवली. इंग्रजांची नाराजी ओढवुन सुद्धा वेळी वेळी त्यानी दलितांच्या बढतीचा मुद्दा लावुन धरला अन याची फलश्रूती म्हणुन जाधवांची उपजिल्हाधिकारी म्हणुन बढती झाली होती. आज बारामतीत याच पहल्या वहिल्या दलित उपजिल्ह्याधिका-याचं अभिनंदन खुद्द बाबासाहेबांच्या समक्ष करण्यात येत होतं. सगळी जनता आपल्या जातीतील पहिल्या अधिका-याला पाहुन भारावुन गेली होती. बाबासाहेबांच्या तळमळीचं पहिलं फळ बघणारी ती जनताही धन्य अन तो अधिकारीही. आज कोटी कोटी पिढीतांच्या नजरेत एक विलक्षण तेज चमकुन गेलं. कित्येकानी पुढच्या काळात असच यश संपादन करण्याचा शपथा मनोमन घेतल्या अन त्याचा प्रतिध्वनी आज मी जिकडे तिकडे उठलेला बघतोय हे माझं सौभाग्य. आज आमच्या अवती भवती दिसणारी हि उच्च पदस्त अधिका-यांची लाट १९२८ ला बारामती येथे उसळली अन भारताच्या कानाकोप-यात जाऊन धडकली. सनातन्यांच्या मनुवादी वृत्तिला धकड देण्यासाठी शासकीय पातळीवर बाबासाहेबानी शिलादारांची केलेली पायभरणी आज आभाला चिरून ब्राम्हांडाला गवसनी घालतेय. आज बाबासाहेब असते तर आमची हि प्रगती बघुन कृत कृत झाले असते.

सायमन कमिशन:
गोव्हर्मेंट ऒफ इंडीया अक्ट  १९१९ मधे असा कयादा करुन ब्रिटिश सरकारला दहा वर्षानंतर राज्यघटनेच्या कार्यपद्दतीची तपासणी करण्यासाठी एक रॉयल कमिशनची नेमणूक करणे बंधनकारक होते. हे कमिशन घटनेतील आवश्यक त्या संशोधनासाठी आपला अहवाल सादर करेल. त्याप्रमाणे १९२८ मधे सर जॉन सायमन यांच्या अधिकाराखाली रॉयल कमिशनची नेमणूक झाली.  या कमिशनमधे आपल्यालाहि समावुन घेतील अशी भारतीयांची आशा होती पण लॉर्ड  बर्किनहेड तत्कालिन स्टेट फार इंडियाचे सेक्रेटरी यानी भारतीयांना हेतुपुरस्सर फाटा दिला व फक्त गो-यांची नियुक्ती केली. यावरुन भारतातील कानाकोप-यातुन इंग्रजांवर असंतोषाची झोड उठविण्यात आली, कडाडुन विरोध करण्यात आला व या कमिशनला सहकार्य न करण्याचा आदेश देशबर काढण्यात आला. गांधिना हे अजिबात आवडलं नाही की, या कमिशनवर एकही भारतीयांची निवड केली नव्हती. गांधिना हा त्यांचा अपमान वाटला. जिकडे तिकडे असंतोषाचे वारे वाहु लागले. भारतभर आंदोलन छेडण्यात आले व कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आले. सगळी परिस्थीती बघुन ब्रिटीशानी गांधींपुढे जरा नमते घेऊन असे आश्वासन दिले की हे कमिशन भारतातील विविध प्रांतांची व इतर पुढा-यांची प्राथमिक मत नोंदवुन घेईल व नविन कायदा लागु करण्या आधी महत्वाच्या सर्व पुढा-याना लंडनला पाचारण करण्यात येईल. तिथे गोलमेज परिषद घेऊन तुमच्या देशाचा नविन कायदयाचा आराखडा तयार करण्यात येईल. या अश्वासनांतर गांधी जरासे नरमले पण त्यांचा विरोध चालुच होता. अखेर ३ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन कमिशन भारतात (मुंबईत) उतरले. उभा देश धुसफुसत होता. जिकडे तिकडे असंतोष होता. जागो जागी गो बॅक सायमनचे नारे दणाणु जाऊ लागले. देशातील काना कोप-यात त्यांच्या विरोधात प्रदर्शने होऊ लागली अशाच एका विरोध प्रदर्शनात पंजाबचे अत्यंत लोकप्रिय नेता श्री. लाला लचपतराय यांचे पोलिसांच्या लाठिमारात निधन झाले. यामुळे ब्रिटीशांचे धाबे दणाणले. कमिशनला ईथे काम करु न देण्यात आता देश एकवटुन गगनभेडी आरोळ्या देऊ लागला. लालाच्या मृत्युने उभा देश सुन्न झाला होता. ब्रिटीशानी सगळी ताकत झोकुन दिली, तिकडे भारतीयानीपण सगळं बळ एकवटुन निदर्शने सुरु केले. जागो जागी लाठीमार चालु झाले हा संघर्ष कित्येक दिवस चालला अन शेवटी ब्रिटीशांची सरशी होऊन सायमन कमिशन कामाला लागले. लालांच्या मृत्यु नंतर उभा भारत पेटत असताना बाबासाहेबानी मुंबईत एक सभा घेऊन ब्रिटिशांचा निषेध केला. पण आता लाला गेले होते हे स्विकारुन पुढच्या कामाला लागण्यातच खरी हुशारी होती अन बाबासाहेबानी वेळ न दवडता झालं गेलं विसरुन सायमन कमिशनला सहकार्य करण्याचा अचुक निर्णय घेतला. अचुकवेळी, योग्य जागी कसा प्रहार करायचा या बाबतीत बाबासाहेब स्वयंसिद्ध होते. या बाबतीत ते कधीच चुक करत नसतं. कमिशनचा विरोध करीत उभा भारत पेटला असताना एक व्यक्ती मात्र खुष होती. सगळी काम बाजुला सारुन चालुन आलेल्या संधिचे सोने करण्याच्या दृष्टिने कामकाच चालु झाले. डेटाबेस तयार केला जाऊ लागला. संख्या व इतिहासाच्या सहाय्याने एक बेजोड अहवाल ईकडे बाबासाहेबांच्या घरी आकार घेऊ लागला. ज्या अहवाल्याच्या आधारे अस्पृश्यांची ईथली संख्या, त्यांच्या वेदना, त्यांचं दारिद्र्य व गुलामी याचं एक अजोड मिश्रण तयार करुन इंग्रजांच्या कठोर हृदयाला सुरुंग लावण्याची तय्यारी सुरु होती. बाबासाहेबांच्या लिखानातुन तयार झालेलं अस्पृश्यांच्या वेदनांचा बॉम्ब इतका शक्तीशाली होता की त्याच्या प्रतिध्वनीनी ब्रिटनच्या सभेतील गो-यांच्या हृदयाच्या कानठळ्या बसल्या. पुढे गोलमेज परिषदेतील प्रत्येक सभासाद धायमोकलुन अबोल रडला.
३ आगष्ट १९२८ रोजी सायमन कमिशनला सहकार्य देण्यासाठी  केंद्र सरकारने समिती नेमली. या समितीत मुंबई विधिमंडळातुन बाबासाहेबांची नेमणूक झाली. ज्या क्षणाची कित्येक वर्षे अस्पृश्यानी वाट पाहली असावी तो क्षण आज आला होता. ज्याना गा-हाणी मांडण्याची संधीतर सोडाच पण मत आहे हे सुद्धा जिथे कधीच मान्य नव्हतं त्या मातीत आज चक्क काय वरदान मागायचे ते माग, जमेल तितकं नक्की देऊ अशी राणीच्या देशातुन हाक ऐकु आली होती. या हाकेनी सगळा अस्पृश्यवर्ग कृतकृत झाला होता, अंग अंग शहारलं होतं. पण हजारो वर्षाच्या गुलामगिरीमुळे मागताना सुद्धा स्वरात कंप होता, घेताना हातात बळ नव्हतं. सगळं सगळं या सनातन्यानी मधल्या काळात लुटुन नेलं होतं. शरीरं कृश झाले होते, मंनातील उल्हास जिरुन गेला होता. देणारे तयार उभे होते पण मागायचं काय हेच माहित नव्हतं. तेंव्हा सगळा समाज एकत्र उभा होतो अन हे काम बाबासाहेबांवर सोपवतो. तुच आमचा कर्ता धर्ता. आम्हाला काय हवे ते आम्हालाच माहित नाही. तु मागशील ते मान्य असा देशाच्या कानाकोप-यातुन आवाज गुंजतो व बाबासाहेब कार्य सिद्धिस नेण्याची तयारी करतात.
दलित वर्गाच्या एकुन १८ संस्था तेंव्हा अस्तित्वात होत्या. त्यातिल बाबासाहेबांची एक संस्था होती. तीचे नाव होती बहिष्कृत हितकारिणी सभा. १८ पैकी १६ संस्थानी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. ब.हि.स. च्या वतीने बाबासाहेबानी संयुक्त मतदारसंघ व दलितांसाठी राखीव जागा मागितल्या. मुंबई विधीमंडळात एकुण १४० पैकी २२ जागा मागितल्या. एवढ्यावरच दलितांचं भागणार नाही याची जाण होती म्हणुन मंत्रीमंडळात दलितांसाठी प्रतिनिधीत्व मागितलं.  या  व्यतिरीक्त दोन खास मागण्या होत्य़ा. १) प्रांताच्या उत्पन्नावर दलितांच्या शिक्षणाचा हक्क २) लष्कर, आरमार व पोलिसात दलात दलितांची भरती करण्यात यावी. निवडक हिंदुंचा सज्जनपणा बघुन आम्हाच्या विकासाची सुत्रे त्यांच्या हातात कधापि देऊ नका. चांगले हिंदु आमच्या हिताचं चिंततील पण वाईट हिंदुंच्या संख्याबळातुन निघणारी जातियवादाची लाट आमचं अस्तीत्व जातीयवादाच्या काळ्या दगडावर आपटुन उध्वस्त करेल. त्यामुळे निवडक सज्जन हिंदुच्या मोजपट्टीने इतराना मोजु नका असा सायमनाना बाबासाहेबानी इशारा दिला. निर्बंधाची गरज चांगल्या हिंदुसाठी नसुन वाईट हिंदुसाठी आहे व वाईटाची संख्या ईतकी मोठी आहे की त्याला निर्बंध करुन आटोक्यात आणतानासुद्धा सारी शक्ती पणाला लागणार आहे. हे सगळं ऐकताना सायमन साहेब अत्यंत अस्वस्थ झाले. एक माणुस दुस-या माणसाला वाईट वागवतो हे त्यांच्याही ठायी होतं, पण कुत्र्या मांजरांपेक्शा वाईट वागविणा-या हिंदुबद्दल मनात एक संतापाची लकीर उमटुन गेली. बाबासाहेबांच्या तिक्ष्ण नजरेनी त्या रेषेची लांबी रुंदी क्षणात मोजली व पुढचा फासा टाकला. दलिताना लोकसंखेच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व दयावे अशीही मागणी करुन टाकली.
मद्रासमधील आदिद्रविडानी अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारनी नेमावे अशी मागणी केली.  मुस्लिम लीगने संध प्रांत स्वतंत्र करावा, वायव्य सरहदीवर नविन प्रांताची निर्मीती करावी, मुस्लीमाना स्वतंत्र मतदार संघ दयावे व संघराज्याच्या राज्यघटनेत प्रांताना शेषाधिकार दयावे अशी मागणी सायमन कमिशनपुढे ठेवली.

२३ ऒक्टोबर १९२८ रोजी पुण्यात बाबासाहेबानी केंद्रिय समिती, मुंबई प्रांतिक समिती व सायमन कमिशनपुढे साक्ष दिली. या साक्षीला पुण्यात येण्याआधी बाबासाहेबानी एक अत्य़ंत बिकट व चॅंलेंजीग काम फत्ते केले. ती घटना अशी आहे की, बाबासाहेबानी पुण्यात सायमन कमिशच्या पुढे साक्ष दयावयाची होती अन त्याच दिवशी ठाण्यात त्यांच्या एका महत्वाच्या केसची अंतिम लढत होती. बाबासाहेब ज्या आरोपिंकडुन केस लढत होते त्यांच्या विरुध वकीलानी आधी न्यायाधीशांपुढे फिर्याद मांडायची व नंतर बाबासाहेबानी आरोपीना सोडविण्यासाठी युक्तीवाद करायचा होता. पण प्रसंगा बाका होता. तिकडे पुण्यात दलितांची बाजुही आजच मांडायची होती, व ईकडे आरोपीना सोडविण्यासाठी बचावाचे भाषणही आजच करायचे होते. दोन्ही कामं अत्यंत महत्वाची होती. शेवटी न्यायाधीशाना भेटुन त्यानी एक विनंती केली की, जरी फिर्यादी पक्षाचे भाषण झाल्यावर बचावाचे भाषण करायचे असते पण ६ कोटी दलितांचा प्रश्न उभा ठाकला असल्यामुळे मला आधी बचावाचे भाषण करायची परवानगी दयावी. योग योग असा की त्या न्यायाधीशानी तशी परवानगी दिली व बाबासाहेब आरोप ऐकल्या शिवायचं बचावाचे भाषण करुन पुण्याला निघुण जातात. नंतर फिर्यादीचे भाषण होते. पण बाबासाहेबांनी ते ऐकण्या आधीच मांडलेली बचावाची बाजु ईतकी भक्क्म होती की या खटल्यातील बहुतेक आरोपी निर्दोष सुटतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा