मंगळवार, २४ मे, २०११

आर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.

आजकाल जिकडे तिकडे आरक्षणाचे वारे वाहत आहेत. आज पर्यंत जो समाज सत्ताधारी होता तो ही गरीबीला पुढे करुन आरक्षण मागतो आहे. कित्येक ब्राह्मणांचे असे म्हणणे आहे की ब्राह्मणातही गरीबांची बरीच मोठी संख्या आहे त्यामुळे ब्राह्मणाना सुद्धा आरक्षण दयावे. आजचा सुशिक्शित पण बिन अकली वर्ग मोठ्या प्रमाणात या गोष्टीचं समर्थन करतो की आरक्षण हे जातीवार न देता आर्थीक निकषावर दयावा. पण मुळात बाबासाहेबानी आरक्षण देण्याचे कारण काय होते याचा कोणी विचारच करत नाही. लोकांचं साधारण असं मत बनलं आहे की आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम आहे. ज्यांची आर्थीक परिस्थीती हालाकीची आहे त्यांच्यासाठी आरक्षण असावं असा मतप्रवाह दिसतो. पण बाबासाहेबांच्या मते आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नसुन सत्ते पासुन वंचित वर्गाला राजकीय्,सामाजीक व शैक्षणिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेला संविधानिक अधिकार होय. जो मराठा समाज हजारो वर्षापासुन सत्तेचा भागिदार होता त्याने आरक्षण मागुन स्वाभिमान गहान टाकल्याचा दाखला दिला. मराठे हे नेहमी सत्ताधारी होते. मग ते सातवाहनांच राज्य असो, यादवांच असो वा मुघलांचं असो. मराठा समाज ब्राह्मणाच्या मांडीला मांडी लावुण सदैव सत्तास्थानी विराजमान होता. अशा समाजाला आरक्शण देणे म्हणजे दांभिकपणाच ठरेल.  कारण आरक्षणाचं परिमाण हे गरीबी नसुन शोषण होय.
मराठा व ब्राह्मणांचा आर्थीक मागासलेपणा अकार्यक्षमतेचं द्योतक आहे.
मराठा व ब्राह्मणांचा आर्थीक मागासले पणा शोषणातुन आला नसुन अकार्यक्षमतेतुन आला. मराठा वा ब्राह्मण याना विकासाचे सर्व मार्ग सर्वकाळ खुले होते. तो समाज सदैव राज्यकर्त्या घटकाचा भाग होता. तरी सुद्धा आज मराठा ब्राह्मण समाजात गरीब लोकं दिसतात. कित्येक ब्राह्मण असे आहेत ज्यांचं उत्पन्न जेमतेच आहे. कित्येक मराठेही असे आहेत जे गरीब आहेत अन हे सगळं मला मान्य आहे. पण  यांच्या गरीबीचं कारण शोषण नव्हतं किंवा नाही. याना प्रगती साधण्यात कुठलाच सामाजीक व राजकीय अटकाव कधीच नव्हता. त्याना प्रगतीचे सर्व मार्ग सदा खुले होते. मग तरी हे ब्राह्मण व मराठे गरीब कसे काय? याचं एकच उत्तर असु शकतं ते म्हणजे यांच्यात स्वत:चा विकास करण्यासाठी लागणा-या अंगभूत गुणाचा अभाव. बास.......... मग हे असे लोकं कितीही अनुकूल परिस्थीती लाभली तरी विकास करुन घेणार नाही. त्यांच्यातील अंगभूत अकार्यक्षमतेची हि फलश्रूती होय. अशी लोकं जगात सगळीकडे सापडतात. प्रत्येक देशात गरीबी आहेच. अगदी अमेरीकेत सुद्धा गरीब लोकं आहेत. म्हणजेच गरीबी हि तुमच्या आकार्यक्षमतेचा प्रतिबिंब आह हे सर्वमान्य सत्य आहे.  याला अकार्यक्षम राज्यकर्त्यांची जोड लाभल्यावर त्यांच्या  धोरणात्मक कमकुवतीतून अशा गरीबीला वाव मिळतो. आपल्या देशातील राज्यकर्ते मराठे व ब्राह्मण असल्यामूळे  या धोरणात्मक चुकांतुन फोफावलेल्या गरीबीचं खापर सुद्धा त्यांच्याच माथी फुटतं. म्हणजे काय तर राज्यकर्ते तुम्हीच, धोरणात्मक दिवाळे वाजविणारे तुम्हीच, त्यामुळे येणारी गरीबी हे सुद्धा तुमचच पाप. अन वरुन ओरड काय तर गरीब मराठ्याना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते गरीब आहेत. अरे पण त्याना गरीब बनविण्यात ते स्वत: व तुम्ही कारणीभूत आहात, याचं काय करायचं? म्हणजेच याचा एकंदरीत सार असा निघतो की जे जे मराठे व ब्राह्मण गरीब आहेत हे राजकारण्याचां धोरणांचा तेवढा प्रभाव सोडला तर त्यांच्या स्वत:च्या कमकूवतपामुळेच गरीब आहेत. त्यांच्या गरीबीचं कारण कधीच शोषण हे नव्हतं. फक्त आळस अन ऐतखाऊपणामुळे हे मराठे आर्थीकमागासलेले आहेत. यांनी मिळालेल्या हक्कांची अमलबजावणी करण्यात जो काही कामचुकारपणा व आळस दाखविला त्यामूळे ते मागे राहिले. म्हणुन गरीब मराठ्याना किंवा ब्राह्मणाना आरक्षण देण्यात येऊ नये. त्यांची गरीबी हि शोषणातून आलेली नसुन अकार्यक्षमता व आळसातून आली. आशा आळशी लोकाना आरक्षण देण्याचे काहीच कारण नाही.

दलितांची गरीबी हा शोषणाचा भाग आहे.
मराठे व ब्राह्मणांच्या गरीबीच्या अगदी उलट दलितांच्या गरीबीची कहाणी आहे. दलिताला ईथल्या समाजाने जन्माने अस्पृश्य ठरविले होते. हजारो वर्ष सर्व  हक्कातुन वंचीत ठेवण्यात आले. गुलामगिरी लादली गेली. व्यवसाय करण्यास, शिक्षण घेण्यास बंदी होती. अर्थार्जनाचे सर्व मार्ग बंद होते. आमच्या लोकाना मराठे व ब्राह्मण या दोन मुख्य कार्यकारी समाजाने सदैव खितपत ठेवण्याचे काम अखंड चालविले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की दलितांच्या पुढच्या पिढ्या गुलाम म्हणुन राबु लागल्या. आत्मसन्मान काय असतो याची आम्हाला भणकही नव्हती. महारकी करुन जगणे, मराठ्यानी फेकलेले तुकडे खाणे व त्या मोबदल्यात आयुष्यभर यांची गुलामी करणे यातच आमच्या कित्येक पिढ्या खपल्या. त्यामुळे आमच्या लोकांकडे ना विद्या होती, ना धन होते ना जमीन जुमला होता.  आमच्या सर्व समाजावर गरीबीने फास आवळला. आमच्या अंगभूत गुणांना वाव देणारी योजनाच नसल्यामुळे माझ्या समाजातून विद्वानांची उत्पत्ती झालीच नाही. याचा अर्थ माझ्या समाजात विद्वान जन्मलेच नसतील असा नाही. समकालीन उच्च वर्णियाना पायी तुडविण्याची क्षमता बाळगणारे कित्येक विद्वान जन्मलेही असतील पण समाजाच्या रुढी परंपरेच्या नावाखाली ब्राह्मण व मराठा या सत्ताधिशानी आम्हाला तिथेच संपवलं. आमच्या पिढयान पिढ्या या मनुवादी परंपरेच्या बळी चढल्या अन या शोषणातून आमचा समाज गरीब व अज्ञानी राहिला. मराठे व आमच्या गरीबीतील हा मुख्य फरक अधोरेखीत करणे फार गरजेचं आहे. मराठे आरक्षण मागताना गरीबीला पुढे करतात पण मुळात त्यांची गरीबी हि शोषणातून आलेली नसुन अनकष्टीपणा आहे. उलट आम्ही अत्यंट कष्टाळू, प्रामाणीक व चिकाटीनी काम करणारी माणसं आहोत.
आमचं शोषण कित्येक आघाड्यावर  करण्यात आलं. आमच्या शोषणात सर्वात आघाडीवर जो समाज होता व आजही आहे तो म्हणजे मराठा समाज. मग अचानक आज हाच मराठासमाज उठतो व आरक्षाणाची मागणी करतो. अन त्या साठी गरीबीची लंगडी सबब पुढे करतो. या मागणीला जोर मिळावा म्हणुन जयभीमही म्हणतो. पण माझा प्रश्न असा आहे जो समजा स्वत: शोषणकर्ता होता व आहे त्याला शोषीतांची सोय कशी काय मिळवावीशी वाटते? आरक्षण हि शोषीतांची सोय आहे ती आता शोषणकर्ता समाज मागु लागतो म्हणजे परत एकदा आमची नाकेबंदी करण्याचा हा प्रकार नव्हे का? आजवर जो स्वत: आमचे शोषण करत आला आहे तोच आमच्या गोटात घुसून ब्राह्मणांच्या नावाने खडे फोडु लागला.  आजवर ब्राह्मणांच्या सहाय्याने जेंव्हा राज्य करावयास मिळाले तेंव्हा हे ब्राह्मण कसे यान गोड वाटत होते. आज अचानक तिकडे दलितांच्या गोटात मलाई दिसल्यावर लगेच ब्राह्मण कडू वाटु लागले. हि मराठ्यांची कूटनीती न समजण्या ईतके आम्ही दुधखुळे नाही हे याद राखावे.  ब्राह्मण व मराठे हे सत्तेतील परम मित्र, आजवर त्यांच्यासोबत सत्ता उपभोगली ते कमी पडलं की काय म्हणुन आता ईकडून आरक्षणातही वाटा मिळवू पाहात आहेत. केवढा हा दांभीकपणा........
शेवटी एवढच म्हणेन आरक्षण हे गरीबी हटाव कार्यक्रम नसुन सत्तेपासुन वंचीत अशा शोषीतांसाठी बाबासाहेबानी दिलेले वरदान आहे.  ईथे शोषणकर्त्या समाजाचं  काहिच काम नाही. गरीबी हे आरक्षण मिळविण्याच मापदंड होऊच नाही शकत. आरक्षणाचं एकच मापदंड अन ते म्हणजे शोषितपणा.
जयभीम.
तळटीप: वरिल दोन्ही सत्याधा-यातील फक्त आरक्षण मागणा-या समाजालाच हा लेख लागू पडतो.

1 टिप्पणी:

 1. चिन्मय अनिरूद्ध भावे२६ मे, २०११ रोजी ८:३८ म.उ.

  याच गोष्टीवर मी श्री हरी नरके यांना शंका विचारली होती ... त्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही ... बघा तुम्हाला तरी देण्याची इच्छा वाटली तर -


  नरके साहेब काही शंका !

  मी चित्पावन ब्राम्हण आहे हे (जन्माने पण मी जातीची उतरंड मानीत नाही किंवा उच्च-नीच भाव मनात नाही )सर्वात आधी नमूद करतो ... अर्थात व्यक्तीसापेक्ष मते वेगळी असतात तेव्हा जातीच्या लेबलापेक्षा विचार महत्त्वाचा ....

  मी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर करतो आणि ते विचार माझ्या आचरणातदेखील आहेत ... सामाजिक न्यायाच्या दृष्टीने मी आरक्षणाचा समर्थकही आहे ... आजवर इतर ब्राम्हण कुटुंबीय तसेच परिचितांशी त्याबद्दल आक्रमकपणे वादही घातले आहेत ... पण काही प्रश्नांची मला समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत ... समाजशास्त्राचा विद्यार्थी या वस्तुनिष्ठ भूमिकेतून जाणून घ्यायला आवडेल ...

  १. ओबीसी म्हणजे काय ? कारण सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्रात (निदान मोठ्या शहरांत तरी) ओबीसी असणारे अनेक सत्ता, संपत्ती, अनेक पिढ्यांचा शिक्षणाचा वारसा उपभोगून आहेत ? सोनार-माळी मागास कसा बुवा ? ओबीसी श्रेणीत सगळ्या जातींना घुसवत राहिलो तर खरोखर मागासलेले ... अस्पृश्यता झेललेले चांभार, महार, मांग त्यांचा घास ओढून घेतल्या सारखे नाही का ?

  २. क्रिमी लेयर तत्त्वाला आपला विरोध का ? एक उदाहरण देतो ... माझ्या दोन परिचित मागासवर्गीय मुली आहेत ... दोघी विदर्भाच्या ... विमुक्त जातीच्या ... एकीचे वडील मजूर आहेत ...आर्थिक परिस्थिती बेताची ... त्यात तिने फ़िजिओथेरपीचे शिक्षण घेऊन मुंबईत नोकरी घेतली आहे ... पदव्युत्तर परीक्षेत एकदा अनुत्तीर्ण झाली पण हार मानली नाही ... शिक्षण पूर्ण केले ... झगडा ... पक्की नोकरी शोधणे ... पेशंट शोध सुरु आहे ... तिचा प्रियकर उत्तर प्रदेशी ब्राम्हण ... पण लग्नास साफ नकार .... माझ्यामते आरक्षणाच्या पाठिंब्यास मेहनतीची जोड देऊन ही मुलगी घरच्या परिस्थितीवर मात करून वर येत आहे ...

  आता दुसरे उदाहरण देतो ... एक मुंबईकर मुलगी .. दंतवैद्य आहे .. वडील आयकर विभागात अधिकारी आहेत ... घरी पैसे, महागड्या वस्तू यांची रेलचेल ... मुंबईत दोन-मजली घर ... नागपूरला जमीनजुमला ... हल्लीच मुलाला म्हाडाची सदनिका मिळवून दिली आहे ... चार चार महागड्या ट्युशन लावूनही मुलीला मार्क यथातथाच ... बारावीत आरक्षणाच्या जोरावर मुंबई मधील सर्वोत्तम ठिकाणी प्रवेश मिळाला ... तरीही सुधारणा नाही ... अनेक वेळा परीक्षा देऊन हळू हळू कशीबशी उत्तीर्ण ... उच्चवर्णीय बिहारी मुलाशी विवाह ... पदव्युत्तर शिक्षण घेतले नाही ... सध्या दंतवैद्य असूनही घरी बसून आहे ...

  मला सांगा अशा कुटुंबांनी मागास नसूनही आरक्षणाच्या आधारावर आयता ताव मारून कोणाचे भले झाले ? सरकारी सीट वाया गेलीच ... शिवाय एका विमुक्त जातीच्या मुलीला प्रवेश नाकारला गेला ... तेव्हा क्रिमी लेयर का असू नये ?

  हल्ली परिस्थिती अशी आहे की उत्तर भारताला लाज वाटेल अशा उत्साहात महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरु आहे ... कधी ब्राम्हण-ब्राम्हणेतर .... कधी मराठा-मराठेतर ? आणि सगळ्या जातीय-राजकीय पुढाऱ्यांच्या भूमिका बदलत असतात ...

  जातीचा चष्मा लावून इतिहासाची सोयीप्रमाणे विल्हेवाट लावण्याचे नवे तंत्र आता सुरु झाले आहे ....

  माझ्या लेखी माणसे चांगली किंवा वाईट असतात .... सक्षम किंवा कुवत नसलेली असतात ... जबाबदार किंवा बेमुर्वत असतात ... लोकांच्या जाती पाहून बरीवाईट उदाहरणे शोधून सगळ्या जातीला आरोपी करायचे आणि विष पसरवीत राहायचे ही किती दिवस चालणार ?

  इतिहासाची पाने चाळली तर ब्राम्हण, मराठा, दलित, सगळ्या समाजात चांगली वाईट उदाहरणे कमी अधिक प्रमाणात सापडतील ... टिळक-आगरकर-फुले-शिवाजी महाराज असे मोठे लोकही कधी कधी आज चुकीचे वाटू शकेल असे वागले आहेत ... पण त्याचे समर्थन-किंवा-विखारी टीका करण्यापेक्षा फक्त इतिहासाचे शास्त्रीय विश्लेषण करावे ... जातीपातींच्या भांडणात त्यांना ओढून का आणावे ?

  मी दलित समाजाच्या अनेक bloggers चे वाचन करतो ... तिथे सध्या खूप वेगाने तालिबानी प्रवृत्ती वाढत आहे ... जन्माने जो ब्राम्हण किंवा मराठा तो वाईटच असा सूर लावणारे वाढत चालले आहेत ... आमच्या पूर्वजांनी ज्या चुका करून सगळी विषमता आणि फूट करून ठेवली आहे ... तशाच अविवेकाने बदला घेण्याच्या चढाओढी करून काय मिळणार आहे ... दलिताला/मराठ्याला/कायास्थाला/ब्राम्हणाला ?

  उत्तर द्याहटवा