शनिवार, २८ मे, २०११

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१

                                                              जयभीम मित्रहो.
भवानीचं चित्र असलेलं पत्र.
संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघानी बाबासाहेबांच्या नावानी जी काही चळवळ रुपी विपर्यासाची विकृती चालविली आहे ती आता थेट बाबासाहेबांवर घाला घालण्याच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. नेटवर अन सर्वत्र या लोकानी असा प्रचार चालविला आहे की बाबासाहेब हे शिवाजी महाराजांचे भक्त होते वा भवानी देवीचे ते भक्त होते. अन पुरावा म्हणुन त्यांचे अगदी सुरुवाते पत्र पुढे केले जाते ज्यावर जय भवानी असे लिहले आहे. तेंव्हा सर्व बौद्धाना सुद्धा शिवाजी महाराज पुज्यस्थानी आहे. तसेच भवानी माताही आहे. एवढ्यावरच न थांबता या लोकानी असाही प्रचार चालविला आहे की संत तुकाराम हे बाबासाहेबाना अत्यंत पुज्य स्थानी होते. म्हणुन आपल्या मंचावरुन तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करण्यात येत आहे. प्रतिप्रश्न केल्यास ते असे उत्तर देतात की बाबासाहेबानी स्वत: त्यांच्या पाक्षिकांमधून तसे लिहले आहे. पण हे लोकं एक साधी गोष्ट विसरतात की तसे असल्यास मग बाबासाहेबानी कबीरा ऐवजी तुकारामानांच आपले गुरु मानले नसते का? बाबासाहेबानी तुकारांमाचे काही कोट्स कुठल्या संदर्भात वापरले व त्याचा विपर्यास ब्रिगेडी लोकानी कसा चालविला आहे यावर मी लवकरच लेखमालीका (अस्सल पुराव्यांसकट) चालु करणार आहे. पण तत्पूर्वी हे शिवाजी व भवानीचा विपर्यास परतवून लावण्यासाठी आधी अस्सल पत्रांचे नमूने टाकतो आहे.
अगदी सुरुवातीला बाबासाहेबानी आपल्या लेटरहेडवर भवानीचे चित्र व तलवार अन पेन छापून घेतले होते. त्याचे कारण असे आहे की बाबासाहेबांचे मुळ आडनाव सपकाळ अन देवी भवानी ही सपकाळांची कुलदेवता. म्हणुन बाबासाहेबानी तसे चित्र छापून घेतले. पण नंतर हळू हळू त्यानी या देवताना हद्दपार करुन निरिश्वरवादी बौद्ध धर्माला आदर्श मानुन समतेची मुल्ये स्विकारली. पण ब्रिगेडी लोकांनी बाबासाहेबांच्या अगदी सुरुवातीच्या ( व नंतर टाकुन दिलेल्या) या भवानीचं भांडवल करुन बाबासाहेबांच्या चरित्रात शिवाजी घुसडविण्याचा चंग बांधला आहे. पण सुदैवाने बाबासाहेबांच्या एकून वाटचालीत कसा बदल झाला हे दर्शविणार सगळे अस्सल पत्र व लेटरहेट माझ्याकडे असल्यामुळे मी ते सर्व पत्र ईथे कालक्रमानूसार मांडणार आहे. आपल्या लोकांनी आता जागं व्हावं अन ब्रिगेडच्या विपर्यासाला विरोध करावा. आज जर आपण गाफिल बसलो तर उदया ब्रिगेडी बाबासाहेबांच्या चरित्रात दैवतांची घुसखोरी करवून इतिहास विकृत केल्या शिवाय थांबणार नाहीत.

जयभीम.

२ टिप्पण्या:

  1. ब्रिगेडी लोकांना बाबासाहे, शिवाजी महाराज, भगवान बुद्ध, संत तुकाराम या सर्व महापुरुषांच्या नावाचा वापर करुन स्वत:ची पोली भाजुन घ्यायची आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. मधुकर रामटेके तु जेवढा हिंदु महापुरुष, देवदेवता, चालीरिती याविरोधात लिहत जाशील तेवढेच हिंदु अधीक कट्टर होत जातील आणि तुमच्या लोकांमधे हिंदुंबद्दल किती पराकोटीचा द्वेष आहे, हेही लोकांना कळत जाईल. So, keep it up.

    उत्तर द्याहटवा