शनिवार, २८ मे, २०११

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०

१९५५ पर्यंतच्या प्रवासात बाबासाहेबांच्या लेटरहेड्सनी कसा प्रवास केला याचा आपण धावता आढावा घेतला आहे. माझ्याकडे सुमारे १५० पेक्षा जास्त अस्सल हस्तलिखीत पत्रे उपलब्ध आहेत. बाबासाहेबांच्या नावानी कुणी काहिही बरळत सुटले आहेत. आमच्या पुढेच त्यांच्या चरित्रात विपर्यास करण्याचा कट चालविला जात आहे. ज्याना कुणाला बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही असली कागदपत्रांची खात्री करुन घ्यावयाची आहे त्यानी मला संपर्क साधावा. मी तसे कागदपत्र उपलब्ध करुन बाबासाहेबांबद्दल निर्माण केला जाणारा संभ्रम दुर करण्याचे माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न करीन.
सगळ्याना एकच विनंती आहे. संभाजी ब्रिगेड वा मराठा सेवा संघ जर बाबासाहेबांबद्दल काही सांगत वा लिहत असेल तेंव्हा त्यावर विश्वास ठेवू नका. हि लोकं आपल्या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम करीत आहे. बाबासाहेबांना चख्ख शिवाजी व भवानीचा अनुयायी बनविन्याचे षडयंत्र चालविले जात आहे.
ज्या तुकाराम महाराजाना नाकारुन बाबासाहेबानी कबिराना गुरु मानले त्या तुकाराम महाराजाला बौद्ध मंचावर जगतगुरु म्हणुन घुसडण्याचा कट ब्रिगेड व मराठा सेवा संघाने चालविला आहे.
तेंव्हा सर्व बौद्ध बांधवाना परत एकदा विनंती करतो की त्यानी ब्रिगेड वा मराठा सेवा संघाकडून होणा-या बाबासाहेबांच्या विपर्यास परतवुन लावण्यास सज्ज व्हावे.
जयभीम.

1 टिप्पणी:

  1. आयु.मधुकर रामटेके यांनी अस्सल दस्तावेजांच्या आधारे मौलिक सत्यावर प्रकाशझोत टाकला आहे. अपप्रचार आणि दांभिकता यांच्या सापळ्यात पकडून आंबेडकरी चळवळीला एक भुरळ पाडली गेली आहे.हा आधुनिक हातचलाखीचा खेळ उघडा पाडण्याचे अर्थात बुवाबाजीचा बुरखा फ़ाडण्याचे फ़ार मोठे काम ते करीत आहेत. धन्यवाद. जय भीम..

    उत्तर द्याहटवा