शनिवार, २८ मे, २०११

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३

१९३१ च्या शेवट पर्यंत बाबासाहेबानी आपल्या लेटरहेड मधे केलेला बदल अत्यंत उल्लेखनीय आहे. आज पर्यंत जे बाबासाहेब जय भवानीच्या लेटरडवरुन सर्व पत्रव्यवहार चलवित त्यानी १९३१ च्या शेवटी तो लेटरहेड बाद केला. या नंतर कधीच त्यानी जयभवानी वा आपल्या कुलदेवीच्या नावाचं लेटरहेड वापरलं नाही. यापुढील सर्व पत्र हे त्यांच्या नावानी छापलेल्या लेटरहेडवरच दिसतील.
बाबासाहेबांच्य पुढील सर्व पत्रव्यहारातील लेटरहेडवर त्यांच्या नावाखाली त्यांचे शिक्षण व पदव्या छापलेल्या दिसतात. खरं तर १९३० च्या आधिच त्यानी या सगळ्या पदव्या मिळविल्या होत्या. पण आता पर्यंत त्यानी त्या पदव्यांच्या ऐवजी भवानीला स्थान दिले होते. परंतू महाड सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या विचारांमधे अमुलाग्रह बदल घडून आला.
त्यानी प्रत्येक गोष्टीला चिकित्सकपणे पाहणे सुरु केले. किंवा आपण जे करणार त्याचं अनुकरण माझा भोळा समाज करतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बाबासाहेबानी प्रत्येक कृती करताना ती पुढे अनुयायांद्वारे अनुकरण करण्यात येणार आहे तेंव्हा ती अत्यंत विचारपुर्वक केली जावी यावर कटाक्षाने लक्ष दिले. अन्यथा माझा बांधव भरकडला जाऊ शकतो याची त्याना जाण होती.
याचाच परिणाम म्हणुन बाबासाहेबानी आपल्या कृतून भवानी देवीला बगल दिली अन दलिताना निरिश्वरवादाच्या दिशेनी पाऊल टाकण्याचा संकेत दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा