मंगळवार, १७ मे, २०११

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.

जयभीम मित्रहो. आज तथागत भगवान बुद्ध यांची जयंती............ खरं तर भगवान बुद्धांची जयंती व निर्वाण याच पौर्णिमेला झाले. म्हणुन त्यांच्या निर्वाणाचे दु:ख आहेच पण याच दिवशी त्यांचे आगमन झाले हे निर्वाणापेक्षा जास्त महत्वाचे म्हणुन उभ्या जगात जयंती साजरी केली जाते.  बुद्ध धर्माचा पाया समता व बंधुता आहे. अडीच हजार वर्षापुर्वी ईथे समतेचं रोपटं लावणारं हे महान व्यक्तीमत्व आपल्या भुमीत जन्माला आलं हे आपलं सगळ्यांच सौभाग्य. भगवान बुद्धानी जो समतेचा व बंधुत्वतेचा विचार ईथे रुजविला त्यांच्या शिष्यानी पुढे भारतभर व भारता बाहेरही त्याचा प्रचार व प्रसार केला. भारताच्या आसपासच्या देशात हा मोलाचा संदेश पोहचविण्यासाठी कित्येक लोकानी अखंड प्ररिश्रम केला. अत्यंत चिकाटी व अविश्रांत कष्टानी बुध्दाचा समतेचा संदेश पसरविणा-या त्या बुद्धाच्या संघाला सुद्धा कोटी कोटी प्रणाम. पण मधल्या काळात या धर्माला अवकळा आली. काही कारणास्त हा समतेचा पुरस्कर्ता धर्म ईथुन बाद झाला. पण मुलभुत तत्वे अजोड असल्यामुळे ईथल्या शत्रुच्या नाकावर टिच्चुन जगभर पसरला. दिड हजार वर्षाचा वनवास भोगुन झाल्यावर मायभुमीत परत येण्याची दिवस जवळ येऊ लागले. या धर्माला परत ईथे पुन:स्थापित करण्यासाठी या मातीत एक धर्मवीर जन्माला आला. त्या धर्मवीराचं स्वप्न होतं ईथे परत एकदा बुद्ध धर्माला गतवैभव प्राप्त करुन देणे. यासाठी लागणारं परिश्रम, अभ्यास व निष्ठा या सगळ्या गोष्टी त्या महामानवाच्या ठायी ओतप्रोत होत्या. त्या महामानवाचं नाव आहे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबानी मोठ्या मान सन्मानानी या परागंदा झालेल्या बौद्ध धर्माला ईथे पुन:स्थापीत केलं. १९५६ ला मोठ्या थाटामाटात बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन व आपल्या लाखो अनुयायाना हा धर्म स्विकारायला लावुन बौद्ध धर्माला गतवैभव प्राप्त करुन दिलं.

भगवान म्हणजे काय?
ब-याच लोकाना असे वाटते की भगवान म्हणजे देव अन हा शब्द आपण हिंदुंकडुन उसने घेतला आहे. पण भगवान शब्दाचा वापर सर्वप्रथम बुद्ध धर्मात केला गेला. भग= भग्न,  अन वान=वासना. सा-या वासना भग्न करणारा म्हणजे भगवान, देव नाही बरं का. बुद्ध कालापर्यंत वेदिक धर्माच्या कुठल्याच वेदात, रुचात किंवा उपनिषदात भगवान हा शब्द सापडत नाही. बुद्धा नंतर कित्येक शतकानी हा शब्द ईतर धर्मीयानी उचलला.  तर भगवान बुद्ध म्हणजे देव-बुद्ध नसुन वासना भग्न करुन दु:ख-मुक्त जिवन कसे जागावे हे तत्वज्ञान शिकविणारा सर्वोत्तम भुमीपुत्र.

बुद्ध धर्म हा हिंदु धर्माची शाखा आहे काय? 
माझ्या ब्लोगवर कित्येकानी मला वरिल प्रश्न विचारला. ईतर धर्मियांकडुन तसा शेरा मारल्यावर माझे बौद्ध बांधव निरुत्तर होतात. बुद्ध धर्म हा हिंदु धर्माचीच शाखा आहे यावर त्याना युक्तिवाद करता येत नाही. युक्तीवाद करायची गरजही नाही. कारण बुद्ध धर्म हा इ.स. ५०० वर्षा पुर्वी उदयास आला. अन हिंदु धर्म ७-८ व्या शतकात. त्या आधि हिंदु नावाचा धर्म असल्याचे कुठेच पुरावे नाहित. विविध वेदिक धर्माचे, शैव अन वैष्णवांचे वेगवेगळे पंथ होते. पंथ म्हणजे धर्म नव्हे. अगदी अलिकडे हे सगळे पंथ एकत्र येऊन  स्वत:ला हिंदु म्हणवुन घेऊ लागले.  हिंदु म्हणजे अनेक पंथांचा संच होय. याचाच अर्थ असा की बुद्ध धर्म हा हिंदु धर्मापेक्षा किमान हजार वर्ष जुना आहे. त्यामुळे बुद्ध धर्म हिंदु धर्माची शाखा असण्याचा प्रश्नच येत नाही. तो स्वतंत्र धर्म आहे अन त्याचा मुलभुत तत्व समता व बंधुता आहे.
 
अशा महान भुमीपुत्रानी दिलेल्या समतेवर आधारीत धम्माचा यापुढे  प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी आपली आहे. ब-याच लोकाना असं वाटतं की बुद्ध धर्म आचरणात आणायला फार कठिण आहे. पण ज्याना असं वाटतं त्याच्यासाठी बुद्धाचा एक अत्यंत महत्वाचा संदेश ईथे देतो.
"माझा धर्म म्हणजे नदी पार करण्यासाठी लागणारी होडी प्रमाणे आहे. तुम्ही दु:खाच्या नदीला पार करण्यासाठी बुद्ध धम्माचा होडी प्रमाणे वापर करा. होडी तिथेच टाकुन पुढचा प्रवास सुखाचा करा.  पण त्या होडील खांदयावर घेऊन प्रावस केल्यास तुमचा प्रवास त्रासदायक होईल. मी म्हणतो म्हणुन तुम्ही बुद्ध धर्माचे पालन करु नका. त्यातील मुद्दे तुम्हाला बुद्धीच्या कसोटीवर पटत असतील तरच ते पालन करा. या जागात काहीच नित्य नाही, सगळं अनित्य आहे. म्हणुन बुद्ध शब्दम प्रमाणम करु नका."
उभ्या जगात ईतकं महत्वाचं संदेश कुठल्याच धर्मात नाही. म्हणुन हा धर्म सर्वोत्त धर्म आहे अन असा धर्म आम्हाला दिल्या बद्दल बाबासाहेबांचे आभार अन हे विचार सर्वप्रथम ईथे मांडणा-या त्या सर्वोत्तम भुमीपुत्रास (बुद्धास) शतश: वंदन.
साधु...... साधु...... साधु......

1 टिप्पणी:

  1. बुद्ध धर्मातील तत्व ज्ञान या मुळे हाधर्म खुप देशातप्रसार झाला
    समानता हे तत्व फार महत्वाचे आहे
    सुंदर माहिती दिली

    उत्तर द्याहटवा