बुधवार, ८ जून, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २४ (गोलमेज तिसरी)


७ नोव्हे १९३२ रोजी बाबासाहेब तिस-या गोलमेजसाठी  व्हिक्टोरीया आगबोटीनी प्रस्थान केले. या प्रवासात कित्येकांशी बाबासाहेबांच्या ओळख्या झाल्या. १७ नोव्हे १९३२ रोजी गोमजेत-३ चे काम सुरु झाले. या परिषदेस गांधी आले नव्हते. त्यामुळे  इतरही सदस्य आले नव्हते. मुसलमान मात्र सर्व मागण्या पदरात पाडुन घेण्यात यशस्वी झाले होते. तरी सुध्दा एक हेल्दी राजकारणाची मागणी करण्यात त्यांचा पुढाकार नव्हता. आलेल्या हिंदु मध्ये सुद्धा उभी फूट जाणवत होती. तसही गोलमेज-३ एवढी महत्वाची नव्हतीच. गोलमेज-१ व गोलमेज-२ मधिल कामाना पुरक अशी पुरवणी जोडणे एवढच काय ते या तिस-या गोलमेजचं काम होतं. काही दुरस्त्या व सुचना करण्यात आल्या. जात, धर्म, जन्मावर आधारलेली बंधने रद्द करावे अशी विनंती करणारे एक निवेदनपत्र बाबासाहेबानी तयार केल. जयकर, सप्रू,जहांगीर इ. नेत्यानी सह्या करुन ते निवेदन ब्रिटिश पंतप्रधानाना सादर केले. अशा प्रकारे २४ डिसे. १९३२ रोजी गोलमेज-३ चे काम संपते.

गुरुवायूर मंदिर प्रवेशाचा घोळ:
या दरम्यान गांधीने एक बॉंब टाकला. त्याचा स्फोट इतका जोरदार होता की देशभरातील गांधीवादी ढोंगांचे बिंग फुटले. गांधी म्हणाले  होते की, गुरुवायूर येथील मंदिरात अस्पृश्याना प्रवेश मिळावा यासाठी आपण उपोषण करणार आहोत  असा गांधीनी आव आणला होता. ही घोषणा करताच सनातनी गांधी अनुयायानी यास विरोध असल्याचे जागो जागो बोलू लागले. पण गांधीपुढे बोलणार कोण? बर गांधीनी हे केलं ते बरच केलं. त्यामुळे त्यांच्या अवती भवती वावरणा-या  मुखवटाधारी लोकांची गणती बाहेर पडली. पण यातील आजुन गमतीचा भाग असा की गांधीनी वरची घोषणा फक्त ही गणती करण्यासाठीच केली होती. त्याना उपोषण वगैरेला बसायचे नव्हतेच मुळी. काही दिवसातच त्याना आपली जुनी घोषणा फिरविणारी दुसरी घोषणा केली. जर पोनाई तालुक्यातील बहुसंख्य स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या मागणीचा विरोध केला तर मी आपली मागणी मागे घेईन. आत्ता बोला. गांधी खरच होते की नाय नालायक. खर तर एवढ्या महान नेत्याला असे शब्द वापरु नये पण आमच्या बद्दल त्यानी वेळो वेळी घेतलेला दुटप्पीपणा पाहता मला त्यांच्यावर या स्थरला जाऊन टिका करण्याचा अधिकारच मिळतो. अस्पृश्यां बद्द्ल गांधीनी सदैव खालच्या थराला जाऊन भूमिका घेतली.  या वेळेस गांधीना उघडं पाडणारी आजून एक घटना घडते. मंदिर प्रवेशा बद्दल लोकांच मत घेण्यात येतं. अन गंमत अशी होते की बहुसंख्य लोकं मंदिर प्रवेशाच्या बाजूनी कौल देतात. आता मात्र गांधीची खरी पंचायत होते. हे सगळं होऊनही अस्पृश्याना मंदिर प्रवेश मिळालेलं नसतं. गांधी आता बोलल्या प्रमाणे कृती करतील या आशेनी उभा अस्पृय समाज गांधीकडे टक लावून पाहू लागला. अन गांधीनी परत एकदा आपला नालायक पण दाखविला. बोलल्या शब्दाला जागणे त्यांच्या गावचंच नव्हतं. त्यानी शब्द न पाळता समस्त स्पृश्यांचा परत एकदा विश्वास घात केला. गोलमेज दोन मधे लवादाचा निर्णय मान्य असेल अशा निवेदनावर सही करणारे गांधी पुण्यात उपोषण करुन आपल्याच शब्दापासुन पलटी मारली होती. आज गुरुवायूर मंदिराच्या बाबतीत त्यानी दुस-यांदा कोलांटी मारली. या गांधीच्या कोलांट्या आता अस्पृश्यांच्या लक्षात येऊ लागल्या.

बाबासाहेब परतले
२३ जाने १९३३ रोजी  गोलमेज-३ चे काम संपवुन गंगा या आगबोटीने बाबासाहेब मुंबईस  परतले. नेहमी प्रमाणे समता दलाने सलामी देऊन बाबासाहेबांचे धक्यावर स्वागत केले. त्या नंतर लगेचच महाराज्यपालानी गोलमेजच्या प्रतिनिधीना अनौपचारिक बैठकिसाठी दिल्लीला बोलाविले.  या बैठकी नंतर बाबासाहेब गांधीना भेटण्यसाठी पुण्यात येतात.
४ फेब्रू. १९३३ रोजी बाबासाहेब गांधीना भेटावयास येरवडा तुरुंगात जातात. गांधीनी क्रृत्रीम हास्यानी बाबासाहेबांचं स्वागत केलं अन इतर घडामोडींवर बरीच चर्चा रंगते. हे सगळं झाल्यावर मुख्य मुद्याला हात घालत गांधी म्हणतत की, डॉ. माझी तुम्हास अशी विनंती आहे की आपण डॉ. सुब्बारायन व रंगा अय्यर यांच्या मंदिरप्रवेशाच्या विधेयकाला पाठींबा दयावा. या भेटीत हा मुद्दा येणार याची बाबासाहेबाना खात्री होती. त्यानी नेहमी प्रमाणे गांधीच राष्ट्रीय नेत्याचा आव आणणारी प्रतिमा मोडित काढणारी भीम गर्जना केली. रंगा अय्यरांच्या विधेयकाला पाठींबा देण मला कदापी जमणार नाही. कारण या विधेयक अस्पृश्यांच्या अधिकारा बद्दल स्पष्टमत दर्शवीत नाही. सार्वमत झाल्यास अस्पृश्याना मंदिर प्रवेश मिळावा एवढेच दिले आहे. पण त्याना देव दर्शन, त्या मुर्तीची पुजा व स्पर्श या संबंधात या विधेयकानी मौन पाळले आहे. त्यामुळे रंगा अय्यरांचं विधेयक अपुर्ण व दलितांवर अत्याचार करणारं आहे. म्हणुन याला माझा कद्यापी पाठिंबा मिळणार नाही.
गांधीची मला कित्येक वेळा कीव येते. त्याना बाबासाहेब म्हणजे दुधखुळे वाटले होते की काय कोण जाणे. जमेत तितक्या वेळा त्यानी बाबासाहेबांची तटबंदी करण्याचे सर्व युक्त्या आजमावल्या. प्रत्येक वेळी बाबासाहेब त्याना पुरुन उरत तरी सुध्दा तेच रडीचं गाणं. तिकडे नाशिकचे काळाराम मंदिर सत्याग्रह मागच्या साडेतीन चार वर्षापासुन चालू होते. दर वर्षी राम नवमीला मंदिर सत्याग्रह जोर धरत असे.

रंगा अय्यर विधेयकावर निवेदन
१२ फेब्रु १९३३ रोजी बाबासाहेबानी मंदिर प्रवेशाच्या विधेयका संबंधी आपले  निवेदन जाहिर केले. ते म्हणाले, या विधेयकाला अस्पृश्य लोकांचा पाठिंबा नाही. कारण या विधेयकानी मंदिर प्रवेशाचा निर्णय लोकमतावर अवलंबुन ठेवले आहे. अन अस्पृश्यतेला पाप मानत नाही. भलेही माझ्या अस्पृश्य बांधवाना अस्पृश्यता व गुलामी याची जाणीव नसेल. ते मुकाट्याने ही अस्पृश्यता स्विकारुन जगत असतील पण याचा अर्थ ते सुसाह्य आहे असा कदापी नाही. अन याच गोष्टी रंगा अय्यराच्या विधेयकात अधोरेखीत होत नसल्याने  या विधेयकास माझा पाठिंबा नाही.
या निवेदनाची एक प्रत येरवड्यात पाठवून दिली. गांधींनी परत एकदा आगपाखड केली. बाबासाहेबानी गांधीना एक प्रश्न टाकला. मंदिर प्रवेशाचा प्रश मिटल्यावर आम्ही जेंव्हा जाती निर्मुलनाचा व चातुर्वण्य उच्चाटनाचा प्रश्न हाती घेऊ तेंव्हा तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहाला? आमच्या की सनातन्यांच्या? जर उदया तुम्ही  आमच्या पुढे शत्रू म्हणुन उभे ठाकणार असाल तर मग आज उगीच मैत्रीचं सोंग का म्हणुन करायचं?
याच दरम्याना बाबासाहेब बोलू लागले की हिंदु धर्म माझं मानसिक समाधान करु शकत नाही. मला आता या धर्माची आसक्ती तर राहिली नाहिच पण हिंदु म्हणवुन घेताना सुद्धा संकोच भवाना उचल खातात.

हरिजन साप्ताहिक
११ फेब्रू १९३३ रोजी गांधीनी आजुन एक फासा टाकला. अस्पृश्याचा खरा नेता मीच आहे असा पुरावा उभा करण्याच्या हेतूने अन बाबासाहेबाना वेळ प्रसंगी अस्पृश्यांपासुन दुर करण्याच्या सुळ बुद्धिने गांधीनी हरिजन नावाचा साप्ताहिक सुरु केला.   आपल्या साप्ताहिकाच्या पहिल्याच अंकात गांधीनी आपली लायकी दाखविली. ते म्हणतात, अस्पृश्यता पाळणे हे पाप असले तरी जाती व्यवस्था राखणे हे पाप नाही. १३ फेब्रू. १९३३ रोजी राजगोपालाचारी याना लिहलेल्या पत्रात ते म्हणतात की बाबासाहेबांसोबत झालेली मुलाखत असमाधानकारक राहिली पण मी त्याना आता चांगलं ओळखू लागलो. गांधीनी हरिजन नावानी सुरु केलेली ही रणनीती अस्पृश्यांना अंधारात ढकलणारी होती. पण बाबासाहेबांचा समाज जागरुक झाला होता. त्यानी गांधीच्या असल्या फसव्या गोष्टीना कौल दिला नाही किंवा तिकडे आकृष्ट होऊन बाबासाहेबांपुढे अडचण निर्माण होईल असे वागलेही नाही.

राज्यघटना जाहीर:
मार्च १९३३ मधे राज्यघटना जाहीर करणारी श्वेतपत्रीका ब्रिटिश सरकारने प्रसिद्ध केली. भारतातील जवळ जवळ सर्वच राजकीय पुढा-यानी या श्वेतपत्रीकेचा निषेध केला. सर्वच पक्ष असमाधानी व नाराजीच्या सुरानी बोलू लागले. संयुक्तसमीतीवर लोकांची निवड झाली. जयकर, मिर्झा, आगाखान व सर अकबर यांच्या समवेत बाबासाहेबांची या समितीवर निवड झाली. निवड झालेली सर्व सभासद मंडळी लवकरच लंडनला रवाना होणार होती. त्या आधी बाबासाहेबानी जागो जागी जंगी सभा घेतल्या.  याच दरम्याना बाबासाहेबांच्या पुढे एक अडचण उभी ठाकते. पनवेल येथे एका ज्यू च्या घरात बाबासाहे अस्पृश्यांसाठी एक वसती गृह चालवित. पण सनातन्यानी त्या ज्यू चे कान भरले व त्यानी त्रास दयायला सुरुवात केली.  समितीच्या कामावर निघण्यापुर्वी आगाखानना विनंती करुन त्यांच्या  ठाण्यातील बंगल्यात हे वसतीगृह ४ एप्रिल १९३३ रोजी हलविण्यात आले.

संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला रवाना:
२४ एप्रिल १९३३ रोजी बाबासाहेब संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला रवाना होतात. ६ मे १९३३ रोजी बाबासाहेब लंडनला पोहचतात. श्वेतपत्रीकेच्या उणिवा दाखविण्यासाठी एक समिती नेमली. या परिषदेत बाबासाहेब म्हणतात, मी निराशजनक स्थितीत सापडल्यामुळे स्वतंत्र मतदार संघ मागितला. जर स्पृश्य हिंदुनी एकसंघ राहण्यासाठी अस्पृश्यांसी माणूसकिने वागण्याचे ठरविले तर अस्पृश्य समाज त्यांच्या पाठिशी राहिल.  या भाषणानी राजा-मुंजे करार घडवून आणणारे मुंजे ईतके भारावून जातात की त्यानी बाबासाहेबाना थेट हिंदु महासभेचे अध्यक्षपद देऊ केले.  बाबासाहेबानी चर्चिल साहेबांच्या लोकसभेतील भाषणाचा धागा धरून एक भाषण दिले. चर्चिल साहेबाना त्यांच्याच घरात घुसून सळो की पळो करणारे हे भाषण एक अत्यंत महत्वाचे भाषण ठरले. नोव्हे १९३३ ला शेवटी समितीचे काम संपते.  ८ जाने १९३४ रोजी बाबासाहेब मुंबईस परत येतात. संयुक्त समितीचे काम समाधानकार झाले याची चिन्हे त्यांच्या आनंदी चिह-यावर उमटलेली दिसतं.  काम फत्ते झाल्याचा आनंद बाबासाहेबाना लपविता येईना.


विश्रांती
१९३० ते १९३४ पर्यंत सतत काम केल्यामुळे आता बाबासाहेबाना विश्रांतीची नितांत गरज होती. जे जे करायला पाहिजे ते सर्व बाबासाहेबानी केले होते. आता अंतिम निकाल आल्यावर परत लढा देण्यास सज्ज व्हायचे होते. तत्पुर्वी थोडी विश्रांती गरजेची होती. मार्च १९३४ मधे बाबासाहेब बोर्डी येथे विश्रांती घेण्यासाठी गेले. येथे त्यानी आयुर्वेदिक उपाचर वगैरे घेतला. मे १९३४ च्या दरम्यान कोल्हापूर नजीक पन्हाळ गडावर बाबासाहेब विश्रांती घेतात. येथील वास्तव्यात बाबासाहेब अगदी ताजे तवाने होऊन निघतात. दत्तोबानी बजावलेली चोख व्यवस्था त्याना आवडते. त्या नंतर ते मुंबईस परततात.

राजगृह
याच दरम्याना बाबासाहेबाना आपल्या ग्रंथासाठी एक बंगला बांधण्याची ईच्छा झाली. दादरच्या हिंदु  कॉलनीत बाबासाहेबानी एक भव्य बंगला बांधला. हे घर बांधण्यासाठी त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं वाढलं पण त्यांच्या आवडत्या ग्रंथाना मात्र एक डौलदार जागा लाभली. खालच्या मजल्यावर कुटूंब राहात असे तर वरच्या मजल्यावर बाबासाहेब आपल्या ग्रंथासमवेत वेळ घालवित असत.
या कालावधित बाबासाहेबानी आपल्या वकिली व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. त्याच दरम्यान दौलताबदला त्यांचा तेजोभंग करणारी एक घटना घड्ते. तळ्याचे पाणि बाटविल्याचा ओरडा करुन दौलताबादेतील मुसलमान अंगावर धावतात. तेंव्हा मी जर ईस्लाम स्विकारला तर हे तळे बाटले नसते ना.. मग तुझ्या धर्माची शिकवण तु पाळतोय का? असा प्रतिप्रश्न करुन वाद मिटविला.
याच साली डिसेंबर १९३४  मधे बाबासाहेब सिंहगडावर आराम करत असताना एके दिवशी जवळपासचे सनातनी हातात लाठ्या काठ्या घेऊन गडावर येतात. बाबासाहेबांच्या अंगावर कित्येका जण धावून जातात. गड बाटविल्याचा आरोप ठेवून बाबासाहेबांचा अपमन केला जातो. परंतु बाबासाहेबानी हा भ्याड व बिनबुडाच्या लोकांचा ह्ल्ला नुसतं शब्दाच्या धारेनी परतवुन लावला.

संयुक्त समितीचे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले
याच दरम्यान संयुक्त समितीचे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले १९ डिसे १९३४ रोजी भारतीय राज्यघटनेचे विधेयक ब्रिटिश लोकसभेत विचारासाठी मांड्ण्यात आले. बाबासाहेबांनी या समितीच्या प्रतिवृत्ताचा निषेध नोंदविला.  हे प्रतिवृत्त प्रतिगामी व भारताच्या प्रगतीस बाधा ठरणार असल्याचे बोलून नाराजी व्यक्त केली. तिकडे ब्रिटिश लोकसभेत संयुक्त समितीच्या सुचनेनूसार तयार केलेल्या भारत विधेयक यावर सभासदांची तुडुंब जुंपली जाई. ए. डब्ल्यू गुडमॅन या हुज्रूरपक्षीय सभासदानी सभागृहात एक स्फोटक व अस्पृश्यांच्या बाजुने जाणारं वक्तव्य केलं. अस्पृश्याना मिळणारं प्रतिनिधित्व दोन्ही मध्यवर्ती व प्रांतिक या विधीमंडळात अपूरं व अन्यायकारक आहे, त्याना जादा अधिकार मिळायला पाहिजे. अन  बाबासाहेब मात्र या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. 
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा