रविवार, ३१ जुलै, २०११

... अन महारानी संभाजी महाराजांचा अंतिम विधी केला.

संभाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे मराठी साहित्यिकांची मेजवानी. त्यावर कित्येक मराठी साहित्यिकानी विस्तॄत लिखान केलं. त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगानीतर उभा महाराष्ट्र थरथरला असे लिखाण साहित्यिकांनी करुन ठेवले आहे. यातील खरं किती खोटं किती माहीत नाही. पण औरंगजेबानी त्यांचे हाल हाल करुन अत्य़ंत क्रूरपणे जीव घेतला हे सर्वमान्य आहे. यावरुन काहिंनी त्याना चक्क धर्मवीर ठरवून टाकले, तर काहिनी मृत्य़ूशी लढणारा एक जिगरी लढवैय्या. एकंदरीत संभाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा, धोरनात्मक वृत्ती अन लहान वयातच लिलया पेलणारं सेनापती पद या सर्व गोष्टींपेक्षा सर्वात जास्त चर्चेत राहिलेली गोष्ट कुठली तर त्यांचं मृत्यू. याला कारणीभूत कोण तर या मृत्य़ूला रंगविणारे  लेखक-कादंबरीकार. संभाजीना दगाफटग्याने धरुन औरंगजेबाच्या पुढे पेश केल्या नंतर ते कसे स्वाभिमानाने बोलले, मग औरंग्यानी त्याना कसे मारले या सर्व गोष्टी इतक्या इतक्या रंगविण्यात आल्या की मराठी मातीतील शेंबडया पोरालाही संभाजीचा मृत्यू माहित आहे. पण हे सर्व करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट जाणिवपूर्व अनफोकस्ड ठेवण्यात आली, ती म्हणजे महाराजांचा अंतिविधी कोणी केला ते...
संभाजीच्या मृत्यू नंतर त्यांची उत्तरक्रिया महार समाजानी केली हे दडवून ठेवलेलं वास्तव आहे. संभाजी व संभाजीच्या गुरुची(कवी कलशची) समाधी वढू गावातील महार वाड्याला लागून आहेत हे सांगताना लेखक लोकानी शक्य तितक्या कमी शब्दात संदर्भ रेखाटला. बहुतांश लेखकांनी तर हा संदर्भ थेट गाडूनच टाकला. पण औरंग्याच्या दहशतीला न जुमानता आपल्या प्रिय राजाचा अंतिम संस्कार पार पाडणा-या शूर अशा महार समाजाचं कर्तूत्व अशा प्रकारे जवळपास सर्वानीच लपविण्याचा प्रयत्न केला.
संभाजी महाराजांना औरंग्या मृत्यूदंड देतो ते मुळातच अत्यंत क्रुर पद्धतीच होतं. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करुन वढू गावाच्या शेजारी फेकण्यात आले होते. त्यानंतर अशी दवंडी पिटण्यात आली की जो कोणी संभाजी वा त्याच्या गुरुची अंतिम क्रिया करेल त्याचीही अशीच गत केल्या जाईल. औरंग्याच्या या धमकीला गावकरी घाबरतात व कोणीच पुढे येत नाही. आज जे मराठे वीरतेच्या व शूरतेच्या टिमक्या मारतात ते औरंग्यापुढे मान तूकविण्याच्या पलिकडे काही करत नाहीत हा इतिहास संभाजीच्या मृत्युनंतर अधोरेखीत होतो. मराठ्यांचा राजा मरुन पडला असता एकही मराठा किमान अंतीम संस्कार करण्याची हिम्मंत दाखवत नाही. जो राजा आपल्या प्रजेसाठी लढता लढता कैद झाला व शत्रूच्या पुढे शरणागती न पत्कारता मरण स्विकारतो त्याच्या वीरतेला अंतीम सलामी देण्यासाठी एकही मराठा पुढे येण्याची हिंमत दाखवत नाही. यावरुन मराठे किती वीर असतात व त्यांचा वीरपणा कसा प्रासंगिक असतो हे तुम्हीच ठरवा. इकडे राजा मरुन पडला असताना तिकडे तमाम मराठे मात्र औरंग्याच्या ताटाखालची मांजर बनून काही आर्थीक फायदा मिळविता येतो का यात गढून गेले होते. आपल्या प्रिय राजाचा अंतिम संस्कार करण्याचा मुत्सद्दीपणा एकाही मराठा सरदाराने दाखविला नाही. आता कुणी म्हणेल ’शिवले’ यांनी उत्तर क्रिया केली व ते मराठा होते. पण मग जर मराठ्यानी उत्तक्रिया केली तर ते महारवाड्यात कशी काय केली असा प्रश्न पडतो. संभाजी व कवी कलशाचा अंतीम विधी गावक-यानी व मराठ्यानी केला असता तर त्यांची समाधी ईतर कुठेही असती पण महारवाड्या लगत नसती. पण ती आहे चक्क महारवड्याला लागून. याचाच अर्थ संभाजी महाराजांचा अंतिम विधी करण्यात मराठा समाजानी अजिबात पुढाकार घेतला नाही वा त्याना स्वारस्यही नव्हतं हे  कटू सत्य आहे. आज जो मराठा संभाजीचे गुणगाण गात बढाया मारतो तोच समाज नेमक्या गरजेच्या वेळी मूग गिळून बसला होता. औरंग्याच्या आदेशाच्या विरोधात जाऊन संभाजी महाराजांचा अंतिम विधी करण्याची हिम्मत मराठ्यांनी दाखविलेली नाही. लाभार्थी बणून बसलेला तमाम मराठा संभाजीचा खरा द्रोही ठरतो, कारण नेमक्या वेळी हा मराठा समाज कृतघ्न होऊन बसला होता.  अन वढू गावाच्या बाहेर विखुरलेल्या संभाजीच्या शरिराचे तुकडे आपल्या वंशजाना व जात बांधवाना अंतीम विधीसाठी हाक देत होते पण मराठ्यांच्या बाजूने ओ येईना अशी सुन्न करणारी अवस्था होऊन गेली.
वीर महारांचा धाडसीपणा
संभाजीच्या शरीराच्या तुकड्यांची दशा पाहून एक समाज मात्र खवळून उठला तो समाज म्हणजे महार समाज. संभाजी महाराजांची कत्तल करुन त्यांच्या शरिराचे तुकडे करण्यात आले होते. हे शरीराचे तुकडे वढू गावाच्या जवळ फेकण्यात आले होते. कोणीच उत्तरक्रिया करु नये म्हणून तशा धमक्याही देण्यात आल्या होत्या. अशा वेळी तमाम मराठे औरंग्याला घाबरुन दडून बसले होते. कोणीच पुढाकार घेऊन अंतीमविधी करण्याचं धाडस दाखवत नव्हता. पडलेल्या शरीरांच्या तुकड्यांना कुत्रे मांजर खाण्याची शक्यता होतीच. तसे झाल्यास हा महाराजांचा मोठा अपमान झाला असता. एकूण वेळ अटितटीची होती व रातोरात हे सगळे तुकडे गोळा करुन अंतीमविधी उरकायचे होते. मग तिथे पुढाकरतो घेतो माझा महार समाज व हे काम मोठ्या खुबीने पार पाडतो. हे वास्तव इतिहासकारांनी तेवढ्याच खुबीने लपविले असले तरी आज तिथे असलेल्या सामाध्या या वास्तवाचे कथन करतात. 
महार समाज मुळातच कलाकार. गायन, वादन नि सोंग-सजविणे या कला त्यांच्या ठायी होत्याच. मग या कलेचा अशा बाक्या प्रसंगी उपयोग करण्याची वेळ येऊन ठेपली होती. महारांची एक टीम या मोहिमासाठी तयार केली गेली व तृतीयपंथीयाचं वेष धारण करुन ही टीम रात्री घराबाहेर पडली. म्हणजे कोणी धरलच तर तृतीयपंथीय म्हणून सोडून देईल वा फारसं लक्ष देणार नाही असा त्यामागील हेतू होता. तृतीयपंथीयाच्या वेशात घरा बाहेर पडलेले महार बांधव संभाजी महाराजांची कत्तल झालेल्या जागी पोहचतात. तिथे सर्वत्र पडलेले शरीराचे तुकडे गोळा करतात. त्याच बरोबर कवी कलशाचे तुकडेही गोळा करतात. हे सगळं काम रात्रीच्या अंधारातच करायचे होते. सकाळ झाल्यास वा जरासा उजेळ झाल्यास औरंग्याच्या सैनिकांना वा त्याच्या जासूसांना वास्तव कळण्याची भिती होतीच. अत्यंत जोखीमेच्या कामात जीव झोकून देऊन काही महार बांधव तिथे उतरले होते. सगळी सावटासावट उजेळायच्या आत उरकायची होती. ती उरकन्यात आली व गोळा केलेले तुकडे घेऊन ही टीम महारवाड्यात किर्र किट्ट अंधारतच परतली.  त्या नंतर इतर कोणालाही कळायच्या आता महारवाड्या शेजारीच संभाजी महाराज व त्यांचे गुरु कवि कलश यांचा अंतीम संस्कार पार पडला.
अन काही कालांतराने त्याच महारवाड्याच्या शेजारी संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाध्या बांधण्यात आल्या. वढू गावातील संभाजी महाराजांची समाधी महारांच्या वीरतेची गाथा सांगत आजही उभी आहे. 
ज्यांना शंका आहे त्यानी वढूला जावुन खात्री करुन घ्यावी.

-जयभीम

बोरगावातील मराठ्यांचा बौद्धांवर हल्ला

आज भारत स्वतंत्र होऊन तब्बल अर्ध शतक उलटलं तरीसुद्धा इथून जातीयवाद जाताना दिसत नाहीये. जागतिकीकरणाचे वारे एकीकडे देशाला नविन स्वप्ने रंगविण्यास सांगत आहेत तर दुसरीकडे जातीयवाद आमच्या देशातील विकासाला पायाबंद करण्याचे काम करत आहे. आजचा तरुण स्वकर्तुत्वावर जागतीक पातळीवर आपली ओळख तयार करत आहे. आपल्या कुवतीच्या बळावर भारतातील तरुणानी जगभर भारतीय पाऊलखुणा उमटविल्या असताना त्याच वेळी दुसरीकडे आमचा समाज जातीयवादाचे नवनवीन रेकॉर्ड बनवित आहे. जातीयवादात आजवर सर्व लोकानी ब्राह्मणाच्या नावानी जरी खळे फोडले तरी ब्राह्मण समाज आज त्याच्यातून बाहेर पडताना दिसतो आहे. मात्र मराठा समाज आजुनही जातीयवादातून बाहेर पडण्याच्या मनस्थीतीत नाही हे वेळोवेळी सिद्ध होत आहे.
१५ सप्टे १९९८ रोजी बोरगाव, ता. कवठेमहंकाळ जि. सांगली येथील बौद्ध वस्तीवर मराठा समाजानी हल्ला चढविला.  कारण काय तर एक मराठा मुलगी बौद्ध मुलासोबत पळून गेली. बास....... जातीयवाद्यानी याचा बदला घेण्याचे ठरविले. ५०० ते ६०० जातियवादी मराठ्यानी गावातील बौद्धाना शोधून शोधून मारले. बायका, पोरी, मुलं व पुरुष मंड्ळीना हाल हाल करुन मारण्यात आले. कित्येक बौद्ध बांधव मराठ्यांच्या दहशतीपायी गावातून पळून गेले. जातियवाद्यांच्या क्रुरपणाला घाबरुन गावातील लोकं जिकडे लपून बसलीत. बौद्ध बांधवांच्या एकून ४८ घराना जातियवाद्यानी आग लावली. उभी वस्ती पेटवून देण्यात आली. डोळ्याच्या पुढे आपली घरं जळताना बघून बौद्ध बांधव काहीच करु शकत नव्हती एवढी ती दहशत. मराठ्यांच्या पुढे  आपलं एक न चालणार याची जाण असल्यामूळे सगळे जीव मुठीत घेऊन पळून गेले. अन मस्तावलेल्या जातीयवाद्यानी रात्रभर हौदोस घातला. त्यानंतर उभ्या जिल्ह्यात हाहाकार माजला. नेहमी प्रमाणे पोलिसानी जातियवाद्यांची बाजू घेत परत एकदा असंवेदनशीलता दाखविली. नंतर तमाम महाराष्ट्रातुन बौद्ध समाजानी निदर्शने करत प्रतिक्रिया नोंदविल्यावर १२८ जातियवाद्याना अटक करण्यात आले. त्यांच्यावर एट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अन आज तब्बल १३ वर्षा नंतर २८ जुलै २०११ ला या खटल्याचा निकाल लागला. सरकार तर्फे ऍड. ए. डी. मधाळे व झेड. यू. सांगलीकर यानी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फे एड. जयसिंगराव पाटिलएड. पुरोहितानी काम पाहिले.

२७ आरोपीना ७ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ती नावे खालील प्रमाणे आहेत.
1)       १)बालासाहेब वासुदेव लिगाडे २)     पोपट पांडुरंग भोसले. ३)     अप्पासाहेब गोपाळ पाटिल ४)     वैभव शंकर पाटिल ५)     पांडुरंग विष्णू पाटिल ६)     बाळासाहेब बजरंग पाटिल ७)     नंदकुमार मधुकर पाटिल ८)     बाळासाहेब बापूसाहेब पाटिल९)     सुर्यकांत आप्पासाहेब पाटिल १ ०)   बसंत विष्णू पाटिल ११)  वसंत विठ्ठल पाटिल १२)    गोपाल दिनकर पाटिल १३)   शिवाजी एकनाथ पाटिल १४)   दिनकर विनायक पवार १५)    जनार्दन पांडुरंग देसाई १६)    मारुती शंकर पवार १७)      जगन्नाथ शंकर पवार १८)      राजेश शंकर लिगाडे १९)     विलास गोविंद माने २०)    अनिल शंकर परिट २१)     विलास आनंदराव पाटिल २२)        नारायण रंगा मंडले २३)     वसंत विनायक पवार २४)    विजय जगन्नाथ पाटिल २५)           बाळासाहेब शामराव पाटिल  २६)      पांडुरंग नारायण सुतार २७)     किरण बाळासाहेब पाटिल
वरील यादी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की खेड्या पाड्यात जातीयवादी कारवाया कोण करत आहे.  ब्राह्मणांकडॆ बोट दाखविणारे मराठे बौद्धांच्या वस्त्या पेटवून देतात. तेही आबा पाटलाच्या मतदार संघात ही घटना घड्ते. आज बौद्धाना खरा धोका ब्राह्मणांपासून नसून मराठ्यांपासून आहे याचा हा पुरावा. ब्राह्मणानी भूतकाळत अत्याचार केले पण मराठा मात्र आज वर्तमानात हे सगळं करत आहे. अन खापर फोडलं जात बामणांच्या नावानी. संभाजी ब्रिगेडनी वरील यादी नीट तपासून बघावी अन ठरवावं की बौद्धांवर अत्याचार करणारे ब्राह्मण आहेत की मराठा. अन संभाजी ब्रिगेड सोबत जाणा-या बौद्ध समाजानेही जर डोळसपणे बघायला शिकावं.

भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने याने राजकीय पक्षांच्या दबावाला न जुमानता हा मुद्दा लावुन धरला. आरोपीमधे सेना, कॉंग्रेस व रा. कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्यामूळे मानेंवर प्रचंड दबाव टाकण्यात आला. तरीसुद्धा माने यानी ही केस शेवट पर्यंत लढली. ईतर आरोपीनाही शिक्षा व्हावी यासाठी माने उच्च न्यायालयात जाणार आहेत.
एवढ्या महत्वाच्या केसचा निकाल  कुठल्याच वृत्तपत्रानी छापला नाही. हा सुद्धा जातीयवादाचाच प्रकार आहे. आबा पाटलाच्या मतदार संघातील ही घटना कानाडोळा करण्यासारखी नक्कीच नाही. बौद्धानो सावध व्हा.

शुक्रवार, ८ जुलै, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २५ (रमाईला शेवटचा निरोप)


बाबासाहेबांच्या आयूषातील एक अर्थवट प्रवास........ रमाई
अडचणी अन बाबासाहेब हे समिकरण आता बाबासाहेबांच्या शेवट पर्यंत चालणार हे बाबासाहेब जाणून चुकले होते. अत्यंत सोपं काम सुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणानी आव्हान बनुन उभं ठाकायचं. नंतर बाबासाहेबानी भीम शस्त्र उपसायचे अन त्या आव्हानाला सामोर जायचं. आपली सर्व शक्ती पणाला लावून अशा आव्हानाना लोळवायचं अन विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध करायचं याची मालिका आता अखंडपणे चालू होती. सामोर आलेल्या सर्व अडचणींवर मात करण्याची अंगभूत क्षमता अन आव्हान स्विकारण्याच्या वृत्तीमूळे जागोजागी बाबासाहेबांचा जयजकार होई. हे सर्व चालू असताना एक अत्यंत महत्वाची घट्ना घडते. बाबासाहेबाना पूरुन उरणारी ही घटाना मात्र बाबासाहेबांचं पुरतं नामोहरम करून सोडते. प्रत्येक ठिकाणी विजय खेचून आणणारा हा वीर ईथे मात्र हताशपणे पराजय पत्कारतो. ती घटना म्हणजे बाबासाहेबांची जिवनसंगिनी रमाई बाबासाहेबानी आयूष्याच्या प्रवासात अर्ध्या वाटेत सोडून जाते अन बाबासाहेब त्याना थांबविण्यात सर्वस्वी अपयशी ठरतात. केवळ हताश होऊन आपल्या परमप्रिय पत्नीला जाताना पाहण्या पलिकडे बाबासाहेब काहीच करु शकत नाही.

डिसेंबर १९३४  मध्ये बाबासाहेब जेंव्हा सिंहगडावर विश्रांती घेत होते तेंव्हा आमचा सिंहगड महारानी बाटवला म्हणून शेजारपाजरचे सनातनी सिंहगडावर मुक्कामी असलेल्या बाबासाहेबांवर चालून जातात. बाबासाहेबानी मोठ्या धैर्याने तो हल्ला परतवून लावला. हि बातमी रमाईला कळते तेंव्हा त्यांच्या मनात धस्स होतं. बाबासाहेबांवरील या हल्ल्याचा त्यानी असा धसका घेतला की शेवट पर्यत त्या उठतच नाहीत. रमाई अत्यंत धार्मि वृत्तीच्या, व्रतवैकल्य करणा-या, होत्या. शनिवारचा उपवास कधीच चुकत नसे. आपल्या लढवैय्या पतीचा रक्षणकर्ता ईश्वर त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहो यासाठी त्या पराकोटीची ईश्वरभक्ती करीत.   संवेदनशील मन, आत्मयज्ञ करण्याच्या नैसर्गिक वृत्ती अन कुटूंब वत्सल रमाईनी बाबासाहेबांच्या व्यस्त जीवनात कधिच अडथडा न आणता स्वत: त्यांच्या संसाराचा डोलारा आजवर सांभाळला. पण सिंहगडच्या घटने नंतर त्या हादरुन गेल्या.
याच दरम्यान बाबासाहेबानी मुंडन केले होते. ते हवापालटासाठी म्हणून वसईचे डॉ. सदानंद गाळवणकर यांच्याकडे राहावयास गेले होते. रमाईची तब्बेत डिसेंबरात बिघड्ली तेंव्हा पासून आता मे १९३५ चा तिसरा आठवडा सुरु झाला तरी सुधारलीच नव्हती. एकंदरीत हा आजार सहा महिन्याहून अधिककाळ टिकला होता. बाबासाहेब वसईला निघून गेल्यावर रमाई अधिकच हताश झाल्या.  मुलगा यशवंत व पुतण्या मुकूंद यानी आईच्या खुषी खातर तीच्या परिने पुजा पाठ व ईतर व्रतवैकल्याची दैनंदिनी सांभाळायसा सुरुवात केली. आता तर रमाईल उठून साधी पुजा करणेही जमेनासे झाले होते. काळ जवळ आला याची रमाईला जाणिव होऊ लागली होती. त्या दिवशी रात्री त्याना खूप ताप आला. त्या अक्षरश: तापानी फणफणू लागल्या, शरीराची लाही लाही झाली. शंकरमामा (रमाईचे बंधू) डॉक्टरांकडे धावले. रात्रीच डॉक्तराना बोलावून आणलं. ईंजेक्षन देऊन काही गोळ्या घ्यायची सुचना दिली व डॉक्टर निघून गेले. बाबासाहेबाना बोलावून घ्या असं शंकरमामाना हळूच सांगितलं. डॉक्टरांच्या या सल्ल्यानी मामा पुरता हादरुन गेला. बाबासाहेब नेमकं कुठं गेले होते याची माहिती नव्ह्ती. काहिंच्या मते ते वसईला गेले होते तर काहिंच्या मते ते पनवेलला. त्या काळात संपर्काची साधनं नव्हती. दुस-या दिवशीच्या सायंकाळ पर्यंत कळलं की बाबासाहेब वसईला आहेत.
रमाईची तब्बेत अत्यंत खालावली ही बातमी त्यांच्या सर्व ईष्टमित्रांमध्ये पसरली. राजगृहात अचानक लोकांची वर्दळ वाढली. रमाईला पंढरीला घेऊन जाणारे ग्यानबुवा महाराज व त्यांचे दोन भजनी शिष्य सर्वप्रथम राजगृहात धावून आले. ग्यानबुवा रमाईच्या शेजारी खाली बसले व त्यांची काळजी करु लागले. काही वेळानी रमाईनी डोळे उघडले तेंव्हा ग्यानबुवाना बघून रमाईच्या चेह-यावर आनंदाची लकीर उमटली. बुवा आपण कधी आलात असं विचारल्यावर बुवा उत्तर देतात....... आईसाहेब आपली तब्बेत बरी नाही कळल्यावर त्या पांडूरंगाला साकळं घालून लगेच ईकडे धाव घेतली.

“बरं केलात महाराज आपण आलात........... हळू हळू देवाचं भजन म्हणत चला....... तेवढंच देवाचं नाव ऐकून जिवाला बरं वाटेल.”
काही झालं तरी शेवटी धार्मिक पिंड असलेली एक श्रद्धावानी स्त्री होती आमची रमाई. ग्यानबुवाच्या भजनांच्या आवाजात त्या रात्री रमाईचा डोळा लागला. ईकडे बाबासाहेबाना परत बोलावण्याचे काम युद्ध पातळीवर चालू झाले. रात्री बारा नंतर रमाईचं अंग खूप तापल्यासारखं जाणवल्यावर शंकरमामानी थर्मा मिटर लावून पाहिले. ताप १०४ च्या पुढे सरकला होता. लक्ष्मीबाई व घरातील ईतर सदस्यानी कोलन वाटरच्या पट्ट्या ठेवण्याचे काम अखंडपणे चालविले होते. शंकर मामा अधून मधून गोळ्या व औषधी देत होता. ग्यानबुवा अन शिष्यगणांचा नामस्मरणाचा सोहळाही अखंडपणे चालू होता. अन एक अत्यंत महत्वाची घटाना घडते.
रमाई ताडकन उठतात अन सासरे बुवा (रामजी सपकाळ) आले असं बोलू लागतात. त्या म्हणतात, “मामंजी, मी तुम्हाला दिलेला शब्द पाडला बरं का. साहेबाना तुमच्या म्हणन्या प्रमाणे खूप शिकण्यास मदत केली. मी बायको म्हणून त्यांच्या शिक्षणात कधिच अडथळा आणला नाही.  संसाराचा सारा भार मी पेलला अन त्याना मुक्तभरारी घेण्यास वाट दिली. मी त्याना संसारात अडकून ठेवलं नाही. त्याना संसाराची काळजी करु दिली नाही. आता मात्र मी थकले ओ मामंजी. आता या तुमच्या सेवेत येण्याची ईच्छा आहे.”
अत्यंत धार्मिक वृत्तीमुळे  शेवटच्या घडीला असा संवाद होणे वा घडून येणे अगदी शक्य आहे. रमाई ज्या प्रकारच्या धार्मिक होत्या त्यांची देवा प्रती जी श्रद्धा होती ते बघता कोणी स्विकारो वा न स्विकारो पण रमाईचे हे वाक्य मी मात्र स्विकारतो.
पहाटे पाच वाजता शंकरमामा डॉक्टरांकडे गेले. रात्रभर तापात चाललेली बडबड सांगुन लगेच त्याना सोबत घेऊनच मामा घरी आले. डॉक्टरानी परत एकदा रमाईची तपासणी केली व औषध सुरु ठेवायचा सल्ला दिला. जाताना परत एकदा शंकर मामाना डॉक्टर म्हणाले. लवकरात लवकर आंबेडकर साहेबाना बोलवा.  आता मात्र अवसान गळाले. सर्व हतबुद्ध होऊन डॉक्तरांकडे पाहू लागले. बाबासाहेबाना बोलाविण्यासाठी वसईला बातमी धाडली होतीच.  ईकडे रामाई डोळ्यात जिव आणून बाबासाहेबांची वाट बघू लागली. मधेच शंकरमामाना बोलावून रमाई रागावू लागल्या. साहेब आजून का आले नाही याचा जाब विचारुन परत अस्वस्थतेमुळे बेशुद्ध अवस्थेत जाऊ लागल्या. एकंदरीत शेवटच्या घटका सुरु झाल्या होत्या. फक्त बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी तितका जिव अडकून पडला होता.
२६ मे १९३५ रोजी संध्याकाळी दारात मोटारीचा आवाज आला. बाबासाहेबानी वसई वरुन यायला खूप उशीर केला होता. पण रमाईनी मात्र सर्व शक्ती पणाला लावून जिव एकवटून धरला होता. बाबासाहेबाना पाहून रामाईनी चेह-यावर समाधान व्यक्त केले. ज्या व्यक्तीसाठी मागच्या दोन तीन दिवसापासून एवढा त्रास सहन करुन धीर धरला होता ती व्यक्ती आता पुढे उभी होती. बाबासाहेब रमाईच्या बिछान्याच्या शेजारी खुर्ची टाकून बसले व डॉक्टरानी दिलेल्या औषधपाण्याचा डोस घ्यावयास लावला. रमाईची ही अवस्था पाहून त्यानाही भरुन आलं. ते पहिल्यांदा ओक्साबोक्सी रडले. त्याना रडताना पाहून घरातील सर्व सदस्याना अवघडल्यासारखे होत होते. ज्या बाबासाहेबाना देशातील सर्व वृत्तपत्रे लोखंडी काळजाचा निष्ठूर म्हणून उल्लेख करीत त्यांचा हा असा आगळा वेगळा चेहरा बघून सर्व थक्क झाले. आज लोकाना कळलं की आतले बाबासाहेब किती मृदू व हळवे आहेत. बाहेर जे कठोर दिसतात ते परिस्थीतीशी सामना करण्यासाठी सिद्ध झालेले कृत्रीम वा लढवय्ये बाबासाहेब हे खरे बाबासाहेब नसून गरज म्हणून निर्माण झालेले बाबासाहेब होतं. खरे बाबासाहेब तर अत्यंत भावूक, प्रेमळ व हळवे आहेत. पण सनातनी समाजाच्या निर्दयी प्रवॄत्तीला उत्तर देता देता खरे बाबासाहेब कधी बाहेरच आले नाहित. पण आज मात्र ईतक्या दिवस लपून बसलेल्या बाबासाहेबांचं दर्शन घडत होतं. रमाईच्या डोक्यावर व पाठीवरुन हात फिरवीत बाबासाहेबानी ती अख्खी रात्र जागून काढली.
सकाळ झाली तरी बाबासाहेब तिथेच बसुन रमाईला न्याहाळत होते. सर्व जिवन पट झरझर डोळ्यासमोरुन सरकत होते. रमाईनी किती कष्ट उपसून दिवस काढले याचा आढावा डोळ्यापुढे सरकत होतं. ते सर्व आठवून बाबासाहेब अत्यंत भावविवश होतात अन त्यांच्या डोळ्यातून गळालेले अश्रूचे थेंब थेट रमाईच्या चेह-यावर पडतात. रमाई जाग्या होतात व बाबासाहेबांचे अश्रू पाहून त्याही व्याकूळ होतात. तेवढ्यात त्यांच्या छातीत एकदम जोराची कळ येते व त्या ओरडू लागतात. बाबासाहेबानी शंकर मामाला हाक मारली. लक्ष्मी, शंकरमामा, मुकूंद व ग्यानबुवा सकट सगळे धावले. रमाई शेवटच्या घटका मोजू लागल्या. तेवढ्यात बाबासाहेबानी रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. अन अक्ष्मीबाईनी गौराबाईना सांगितलं, “गौराबाई....... रमाला कुंकु लावा........... करंडा तिथेच असेल बघा.......... सुवासीनीचा मान द्यायची वेळ हाय ही.”
गौराबाईनी करंडा घेतला, आधी स्वत:ला कुंकु लावला व नंतर रमाईला कुंकु लावला. बाबासाहेब मात्र रडात होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. रमाईनी आपला एक हात उचलून बाबासाहेबांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तो हात मधुन खाडकन खाली पडला अन ज्योत मालवली. घड्याळात बरोबर साडेनऊ वाजले होते. दिवस होता २७ मे १९३५. रमाईनी बाबासाहेबांचा निरोप घेतला. या वेळी राजगृहात ज्या किंकाळ्या उठल्या त्या रेखाटना पलिकडच्या आहेत.
--------------------
रमाईच्या निधनाची बातमी वा-या सारखी शहरात पसरली. गिरणी कामगारानी ताबडतोब काम बंद केले. सर्व कामगार राजगृहाकडे धावले. बाबासाहेबांची अवस्था पाहण्यासारखी नव्हतीच. हा हा म्हणता १०,००० च्या वर माणसं जमली. आज राजगृहा समोरा सारा अस्पृश्य समाज पोरका झाल्याच्या भावनेने राजगृहा समोर टाहो फोडत होता. अन ईकडे आत रमाईच्या अंतिम यात्रेची तयारी चालू होती. बाबासाहेब म्हणतात, “रमाला पांढरे पातळ आवडत असे, तीला पांढरे पातळ नेसवा.” काय ती काळजी. अशा अवस्थेतही त्याना बायकोच्या आवडी निवडीचं बरोबर भान होतं. पण लोकानी तसे करण्यास नकार दिला. सौभाग्यवतीला शेवटच्या प्रवासाह हिरवा चुळाच नेसवायचा असतो, अन रमाईचा या प्रवासात हिरव्या चुळ्यावरचा अधिकार बनतोच बनतो. त्यावर बाबासाहेबानी माघार घेतली व हिरवा चुळा नेसविण्यात आला.

राजगृह ते वरळी हिंदू स्मशानभूमी पर्यंत निघालेल्या या प्रेतयात्रेत हजारो बांधव सामिल झाले. स्वत: बाबासाहेब, डॉ. पी. जी. सोळंकी, देवराव नाईक हे एका मोटारीत तर दुस-या मोटारीत त्यांचे खास सहकारी शिवतरकर, कमलाकांत चित्रे, दत्ता प्रधान सारखी मंडळी होती. ईतर तीन-चार मोटारीतून घरची व नात्यातील सर्व मंडळी होती. समता सैनिक दल अफाट जनमुदायाला ओरडून ओरडून वाट देण्याच्या कामात लागला होता. ग्यानबुवा, मडकेबुवा सोबत चालले होते तर चिरंजीव यशवंत हाती शिंकोळी घेऊन रडत रडत पुढे सरकत होते.

प्रेतयात्रा वरळीत पोहचली, अलोट गर्दीमूळे वरळी नगरीत पाय ठेवायला जागा उरली नव्हती. एका बाजूला चिता रचली गेली. दुस-या बाजूला शोकसभा आयोजीत करण्यात आली. या शोकसभेत सर्वप्रथम श्री. देवराव नाईक बोलले. त्या नंतर सिताराम शिवतरकरही बोलले. तेंव्हा रमाईला अगदी जवळून ओळखणारे ग्यानबुवा मधेच बोलले. त्यानी आपल्या भोळ्या भाबळ्या भावना व्यक्त केल्या. तिकडे चिरंजीव यशवंतनी आईच्या चितेला अग्नी दिला. बाबासाहेबानी हंबरडा फोडला व अशा प्रकारे सहजिवनाचा हा  अध्याय ईथे बंद पडतो अन बाबासाहेब या पुढे कायमचे एकाकी पडतात.