रविवार, ३१ जुलै, २०११

... अन महारानी संभाजी महाराजांचा अंतिम विधी केला.

संभाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे मराठी साहित्यिकांची मेजवानी. त्यावर कित्येक मराठी साहित्यिकानी विस्तॄत लिखान केलं. त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगानीतर उभा महाराष्ट्र थरथरतो असे लिहान साहित्यिकानी उतरवून ठेवले. यातील खरं किती खोटं किती माहीत नाही. पण औरंगजेबानी त्यांचे हाल हाल करुन अत्य़ंत क्रूरपणे जीव घेतला हे सर्वमान्य आहे. यावरुन काहिनी त्याना चक्क धर्मवीर ठरवून टाकले तर काहिनी मृत्य़ूशी लढणारा वीर. एकंदरीत संभाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा, धोरनात्मक वृत्ती अन लहान वयातच लिलया पेलणारं सेनापती पद या सर्व गोष्टींपेक्षा सर्वात जास्त चर्चेत राहिलेली गोष्ट कुठली तर त्यांचं मृत्यू. याला कारणीभूत कोण तर या मृत्य़ूला रंगविणारे  लेखक-कादंबरीकार. ते औरंगजेबाच्या पुढे पेश केल्या नंतर कसे स्वाभिमानाने बोलले, मग औरंग्यानी त्याना कसे मारले या सर्व गोष्टी ईतक्या ईतक्या रंगविण्यात आल्या की मराठी मातीतील शेंबडया पोरालाही संभाजीचा मृत्यू माहित आहे. पण हे सर्व करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट जाणिवपूर्व अनफोकस ठेवण्यात आली.
ती म्हणजे संभाजीच्या मृत्यू नंतर त्यांची उत्तरक्रिया महार समाजानी केली. संभाजी व संभाजीच्या गुरुची (कवी कलशची) समाधी वढू गावातील महार वाड्याला लागून आहेत हे सांगताना लेखक लोकानी शक्य तितक्या कमी शब्दात वा कित्येकानी तर हा संदर्भ थेट गाडून औरंग्याच्या दहशतीला न जुमानता आपल्या प्रिय राजाचा अंतिम संस्कार पार पाडणा-या धीरोदात्त अशा महार समाजाचं कर्तूत्व लपविण्याचा प्रयत्न केला.
संभाजी महाराजांना औरंग्या मृत्यूदंड देतो ते मुळातच अत्यंत क्रुर पद्धतीच असतं. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करुन वढू गावाच्या शेजारी फेकण्यात आले. त्या नंतर अशी दवंडी पिटण्यात येते की जो कोणी संभाजी वा त्याच्या गुरुची अंतिम क्रिया करेल त्याची धडगत होणार नाही. औरंग्याच्या या धमकीला गावकरी घाबरतात.  आज जे मराठे वीरतेच्या व शूरतेच्या टिमक्या मारतात ते औरंग्यापुढे मान तूकविण्याच्या पलिकडे काही करत नाही. मराठ्यांचा राजा मरुन पडला असता एकही मराठा सिंहगर्जना करुन किमान अंतीम संस्कार करण्याची हिम्मंत दाखवत नाही.  जो राजा आपल्या प्रजेसाठी लढता लढता कैद होतो व शत्रूच्या पुढे शरणागती न पत्कारता मरण स्विकारतो त्याच्या वीरतेला अंतीम सलामी देण्यासाठी एकही मराठा पुढे येत नाही.  यावरुन मराठे किती वीर असतात हे तुम्हीच ठरवा. ते स्वार्थापायी औरंग्याच्या ताटाखालची मांजर बनून काही आर्थीक फायदा मिळविता येतो का यात गढून गेले होते. आपल्या प्रिय राजाचा अंतिम संस्कार करण्यात कुठल्या मराठ्यानी मुत्सद्दीपणा दाखविला नाही. आता कुणी म्हणेल शिवले उत्तर क्रिया करतात व ते मराठा होते. पण मग जर मराठ्यानी उत्तक्रिया केली तर ते महारवाड्यात कशी काय केली बुवा?  असा साधा प्रश्न पडतो. संभाजी व कवी कलशाचा अंतीम विधी गावक-यानी व मराठ्यानी केला असता तर त्यांची समाधी ईतर कुठेही असती पण ती आहे चक्क महारवड्याला लागून. याचाच अर्थ संभाजी महाराजांचा अंतिम विधी करण्यात मराठा समाजानी काडीचा पुढाकार घेतला नाही वा त्याना स्वारस्यही नव्हतं हे सत्य आहे. आज जो मराठा संभाजीचे गुणगाण गात बढाया मारतो तोच समाज नेमक्या गरजेच्या वेळी मूग गिळून बसला होता. औरंग्याच्या आदेशाच्या विरोधात जाऊन संभाजी महाराजांचा अंतिम विधी करण्याची हिम्मत नसलेला हा मराठा समाज कृतघ्न होऊन बसला होता.  अन वढू गावाच्या बाहेर विखुरलेलेल संभाजीच्या शरिराचे तुकडे आपल्या वंशजाना व जात बांधवाना अंतीम विधीसाठी हाक देत होते पण ओ येईना.
वीर महारांचा धाडसीपणा
संभाजीच्या शरीराच्या तुकड्यांची दशा पाहून एक समाज खवळून उठतो. औरंगजेबाच्या धमक्याना न जूमानता थेट घराच्या बाहेर पडतो व आपला प्रिय राजा संभाजीच्या शरिराचे तुकडे गोळा करतो. हिंदुस्थानच्या शहंशाहच्या विरोधात जाऊन महाराजांची अंतीमक्रिया करण्याचं अस धाडसं दाखविणारा समाज दुसरा तीसरा कुणी नसून निधड्या छातीचा माझा महार समाज होता. संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यात येतात. त्याच बरोबर कवी कलशाचेही तुकडे गोळा करण्यात येतात. वढू गाव अत्यंत दहशतीखाली जगत असताना असं धाडस करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. पण महारांची शूरता काय असते ते आजून औरंग्याला माहित नव्हतं. महार जेंव्हा पेटून उठतो तेंव्हा वादळ स्वत:ची दिशा बदलतो. याचे इतिहासातील कित्येक पुरावे जरी सनातन्यानी लपविले तरी ते अधून मधून डोकावतातच. महारानी अत्यंत नियोजनपुर्वक कामगिरी पार पाडण्याचे ठरविले. शरीराचे तुकडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडताना महारानी तृतीयपंथीयाचा वेष धारण केला. महार जात मुळात विविध कला गुणानी संपन्न होतीच. पण या कलेचा वेळ प्रसंगी देशासाठी वापर करण्याचा निधडेपणाही माझ्या बांधवांच्या ठायी होता. त्याचा प्रत्यय संभाजीच्या मृत्यू नंतर येतो. औरंग्याच्या आदेशामुळे सर्व रथी महाराथी नपुसक होऊन बसले अन तेंव्हा महार पुढे सरसावतो. वेषांतर करुन घरा बाहेर पडतो अन संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचे काम रात्रभर चालू असते. त्या वेळी औरंग्याच्या सैनिकांकडुन हल्ला होण्याची भीतीही असते पण भीतीला जुमानण्याचा आपला वारसा नव्हेच. ज्याच्या रक्तात वीरतेचा वारसा धावत होता तो समाज पुढे सरसावला होता. तेंव्हा मोहीम फत्ते होणार यात तिळमात्र शंका नव्हते. कारण आज मोहीमेवर निघालेले शूर सैनीक महार होते....... मराठे नाही.  अन या महारानी रात्रभर शोधून शोधून संभाजी महाराजांच्या शरिराचे तुकडे गोळा केले. त्या नंतर या तुकड्यांना एकत्र करुन धर्मविधी प्रमाणे अंतिम क्रियाक्रम उरकण्यात आला. अन त्याच महारवाड्याच्या शेजारी संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाध्या बांधण्यात आल्या. वढू गावातील संभाजी महाराजांची समाधी महारांच्या वीरतेची गाथा सांगत आजही उभी आहे.

३ टिप्पण्या:

 1. namaskar...! jai bhim..

  mi swata brahman aslo tari mi tumchya matashi SAHAMAT AAHE.
  brahman samajane je anyan kele, jati bhed kela tyala babasahebani chokh uttar dile.

  Mi swata ambedkar vachto.. aani mi aapnas ashi vinnati karto ki aapan " Dr. babasahebanchya chalvalit bhrahanamche sahakary" he pustak jarur vachave.

  Jai bhi...

  Aapla Prasad Kulkarni
  9130751702

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. Sir pratham ...........!!! Jai Bhim,!!
  Mi Swata 96 Kuli Maratha asun Khed watoy ki kuni MARATHA tya veli Jinda navta Mahnje melyache song karun Zopla hota, mharatyana fakt MARATHI mahnvnyat jast Ras Ahe
  pan sir Hyasathi sudhha Punya lagatay te tatkalin Boudhha samjala milale dhyan te Bandhav ani dhyan to diwas.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. Saheb Maratha Etkehi Nistej navhata ki to aplya Rajyacha Antysanskar karnar nahi Mhtartanchyach eka Vrudhane pratham Budhannche Pahilwan tyar kele hote he hi dadvnyat ale ahe

  प्रत्युत्तर द्याहटवा