मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

... आणि “भारतरत्न पुरस्कार” कृतार्थ झाला.


भारताला स्वातंत्र्य मिळाले. राज्यकर्ते बदलले अन मायभूमितील विविध क्षेत्रातील त्या लेकराना सन्मानीत करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यांच्या उत्तूग कर्तुत्वानी ही भूमी कृतकृत झाली, पावन झाली. या भूमित अशा लेकरानी जन्म घेतला की त्यांचं नाव घेताना भारतीय म्हणून आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. विज्ञान, कला, राजकारण, समाज सेवा, साहित्य, संगित पासून जागतिक पातळीवर भारतीयत्वाच्या पाऊलखूणा उमटविणारे पूत या मातीनी घडविले अन अशा अलौकीक कर्तुत्वानी देशाचं नाव उंचविणा-या कर्तुत्ववान लोकांना सर्वोच्च सन्मानानी सन्मानित करण्याचा  निर्णय १९५४ मध्ये घेण्यात आला. या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराला नाव देण्यात आलं भारतरत्न. देशासाठी सर्वोच्च त्याग करणा-या, देशाची किर्ती जगभर पसरविणा-या, विधायक व भरीव कामगिरी करणा-या विविध क्षेत्रातील लोकाना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कारे देण्याचे ठरले.
भारत रत्न सन्मान देण्याची संकल्पना जरी उदात्त हेतूने जन्मास आली तरी तो बहाल करणा-या समितीत बसलेल्या लोकांवर जो जातीयवादी संस्कृतीचा प्रभाव होता तो विविध रुपात पहिल्या पुरस्कारापासून आज पर्यंतच्या सर्व पुरस्कारांतून वेळोवेळी डोकावून गेला. आपल्या अलौकीक कर्तुत्वानी अपूर्व कार्य करणा-या या महान लोकांना सन्मानीत करताना कर्तुत्व या कसोटीच्या जोडीला जातीची मोजपट्टी होतीच, फक्त ती सूप्त रुपात होती एवढाच काय तो फरक. प्रत्येक पुरस्काराचं एक मूल्य असतं, एक वजन असतं ज्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो ती व्यक्ती  पुरस्काराच्या मूल्याच्या तोलामोलाची असावी लागते. तेंव्हाकुठे पुरस्कार भरुन पावतो. पण भारत रत्न या पुरस्काराच्या बाबतीत असे झाले नाही असे माझे वयक्तीक मत आहे. सरकारनी तावा तावात लोकाना भारत रत्न पुरस्कारानी सन्मानीत केलं पण लोकं मात्र या सन्मानीत रत्नाना  भारतरत्न म्हणून नाकारतात. भारतातील जनमानसाचा हा कृतीमय  निकाल निवड समितीच्या अगदी विरोधात जाणारा आहे.
जनतेनी नाकारलेले भारत रत्न:
पहिला भारतरत्न पुरस्कार  १९५४ मधेय १)डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन २) चक्रवर्ती राजगोपालचारी ३) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण. या तीन व्यक्तीना देण्यात आला. या नंतर पुढचं अर्ध शतक झालं भारत रत्न या पुरस्कारानी विविध क्षेत्रातील ४१ दिग्गजाना सन्मानीत करण्यात आले. राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेहरू, इंदिरा गांधी ते राजीव गांधी, सामाजीक क्षेत्रातील मदर टेरेसा ते नेल्सन मंडेला. चित्रपट क्षेत्रातील एम.जी.आर. सत्यजीत रे, संगित क्षेत्रातील लता मंगेशकर, रवी शंकर, सुब्बलक्ष्मी ते भीमसेन जोशी पर्यंत त्या त्या क्षेत्रात उत्तूंग कामगिरी बजावणारी ही सर्व ती माणसं आहेत ज्यानी भारताचं नाव, किर्ती जगभर पसरविण्याचं अभूतपूर्व कार्य केलं. पण यातील एकही व्यक्तीला आपण भारत रत्न म्हणून संबोधित नाही. जसे की एखाद्या बालकदिनाच्या भाषणात नेहरु बद्दल बोलताना भारतरत्न पंडीत नेहरू असं कधि कोणी म्हटल्याचं माझ्या ऐकिवात नाही. किंवा भारताच्या मर्दानी पंतप्रधान इंदिरा गांधीचा संदर्भ देताना भारतरत्न ईंदिरा गांधी म्हटल्या जात नाही. अगदी याच धर्तीवर लता मंगेशकर, भिमसेन जोशी, एमजीआर, सत्यजीत रे पासून तर अगदि पहिला भारत रत्न मिळविणारे सर्वपल्ली वा व्यंकट रमण यापैकी कुणालाच चार चौघातील संवादामधे आपण भारत रत्न म्हणून संबोधित नाही. याचं कारण काय? याचं एकचं कारण असु शकतं. जरी ते कागदो पत्री भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत असले तरी जनता मात्र त्याना भारत रत्न म्हणून स्विकारत नाही असाच अर्थ निघतो. अन्यथा त्याना संबोधताना भारतरत्न  या सन्मानासकट संबोधल्या गेलं असतं. विरोधकानी तर सोडाच पण यांच्या सख्या रक्तातल्या लोकानीही याना कधी भारतरत्न म्हणताना मी ऐकले नाही.  कॉंग्रेस नावाच्या राजकीय पार्टिने कधि राजीव गांधी, ईंदिरा गांधी वा नेहरू ला भारत रत्न म्हणताना मी ऐकले नाही. या सर्वानी जाणीव पूर्वक वरील लोकाना भारत रत्न संबोधण्याचे टाळले. याचा अर्थ असा निघतो की वरील दिग्गज जरी अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती होते, त्यांचे कार्य अलौकीक होते, पण भारत रत्न म्हणावं एवढ्या तोलामोलाचे नव्हते. हीच गोष्ट कला क्षेत्रातील लोकांबद्दल दिसते. हिंदि सिनेजगतातील दिग्गजांचा वेळोवेळी सन्मान होतो. आजवर कित्येक कार्यक्रमातून भारत रत्न सन्मानानी सन्मानीत झालेल्या लताबाई, सुब्बलक्ष्मी ते भिमसेन जोशी पर्यंत सर्वाना बघितले आहे. पण वरील व्यक्तीला कुठल्याच कार्यक्रमातून (किमान औपचारीकता म्हणून तरी) भारत रत्न म्हणून संबोधल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. याचा अर्थ असा निघतो की वरील कलावंताना जरी सरकारनी भारत रत्न पुरस्कारानी सन्मानीत केले तरी जनतेनी त्याना भारत रत्न म्हणून नाकरले आहे. अन  वेळो वेळी त्यांच्या लोकानी प्रत्यक्ष कृतीतून हा धिक्कार दाखवून दिला. पुरस्कार देणे हे जरी निवड समितीच्या हाती असले तरी पुरस्कृत व्यक्तीला नाकारण्याचा अधिकार जनता बजावू शकते याचं हे मूर्तिमंत उदाहरण होय. म्हणून मी असे म्हणतो की वरील सर्व भारत रत्न जरी सरकारनी सन्मानीत केले तरी या सर्व रत्नाना जनतेनी नाकारले हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच त्यांना संबोधताना कधीच, कुणीच भारत रत्न अमूक तमूक असे संबोधित नाही.

जनतेनी स्विकारलेला भारतरत्न:
सन १९५४ मध्ये भारत रत्न नावाचा सर्वोच्च नागरी सन्मान उदयास आला. त्याच वर्षी तीन लोकाना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ही परंपरा पुढे तशीच चालू होती. दर वर्षी पुरस्कार जाहीर होऊ लागले. लोकं या पुरस्कारानी सन्मानीत होऊ लागली. निवडी समिती आपले काम चोख(?)पणे बजावू लागली. विविध क्षेत्रातील लोकांचा हा गौरव काहीना सुखावून जाऊ लागला तसाच काहीना दुखावून. हा हा म्हणता तीन दशकं उलटली. १९९० साल उजाडला. आत्ता पर्यत एकून २१ जणाना  भारत रत्न पुरस्कार देण्यात आला होता. या सन्माननीय व्यक्तीना भारत रत्न म्हणन्याचं औदार्य न जनतेनी दाखविलं ना त्यांच्या स्वत:च्या कंपुतील लोकानी दाखविलं. अन याच दरम्यान एक अत्यंत महत्वाची घटना घडते. दलितांचे कैवारी, बहुजननायक, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार भारतरत्न हा सन्मान बहाल करण्यात आला.
दलित जनसमुदायात विजेच्या वेगानी नवीन उत्साह संचारला. जिकडे तिकडे जल्लोष उडाला. बाबासाहेबाना मरणोत्तर प्रदान करण्या आलेला हा सन्मान एक अभूतपूर्व घटना होती. जेवढा बाबासाहेबांचा सन्मान होता तेवढाचा त्या पुरस्काराचाही सन्मान होता. आजवर ज्याना ज्याना हा पुरस्कार देण्यात आला त्या सर्व रत्नांपेक्षा बाबासाहेब नावाचं रत्न जरा वेगळ्या चकाकीचा धनी होता. आजवर कित्येकाना भारतरत्न नावाचा पुरस्कार आहे हे माहितही नव्हतं. पण या पुरस्काराला बाबासाहेबांच्या नावाचं स्पर्श होताच भारतरत्न पुरस्कार पावन झाला. बाबासाहेबांच्या नामोस्पर्शाने भारतरत्न धन्य झाला. भारत भूमीवर आज पहिल्यांदा अशी घटना घडली होती की एक सर्वोच्च पुरस्काराला त्याच्या तोलामोलाच्या रत्नानी जडल्या गेलं, अन ते रत्न म्हणजे बाबासाहेब होय.  बाबासाहेबरुपी रत्न जेंव्हा या पुरस्काराला जोडल्या गेलं तेंव्हा हा पुरस्कार आजून  उठून दिसू लागला, न भूतो न भविष्य असा हा सोहळा त्या पुरस्काराचं महत्व वाढवून गेला. आज पर्यंत अनेक दिग्गजाना(?) हा पुरस्कार बहाल करण्यात आला होता पण पुरस्काराला हव तितकं वजन निर्माण झालं नव्हतं. पण बाबासाहेबांच्या नामोर्स्पर्शाने या पुरस्काराचं वजन वाढलं. याची दुसरी बाजू अशी आहे की बाबासाहेबांच्या  अनूयायानी भारत रत्न  या पुरस्काराला सदैव योग्य तो मान सन्मान दिला. भारताच्या काना कोप-यात बाबासाहेबांच्या नावा आधि भारतरत्न अशी उपमा लावणे सुरु झाले. आजवर कित्येकाना हा सन्मान मिळाला होता पण ही पहिलीच वेळ होती की जिथे या पुरस्काराचा योग्य सन्मान होऊ लागला.  आजवर आपण हे बघत आलो की एखाद्या व्यक्तीचा  पुरस्कारामूळे सन्मान वाढतो पण भारतरत्न पुरस्कार मात्र बाबासाहेबांमूळे सन्मानित झाला, या पुरस्काराला एक वेगळं स्थान मिळालं. बाबासाहेब असे एकमेव रत्न आहेत ज्यांच्या सोबत भारतरत्न हा शब्द उच्चारला जातो. बाबासाहेब भारतरत्न म्हणून डिजर्व करतात हे ही तेवढच खरं आहे. बाबासाहेबा नंतरही कित्येकाना भारतरत्न पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आलं पण त्यातला कोणीच भारत रत्न म्हणून आपली ओळख तयार करु शकला नाही. आज पर्यंतच्या सर्व भारतरत्नांमध्ये बाबासाहेब हे एकमेव असे रत्न आहेत ज्याना उभं जग भारतरत्न म्हणून ओळखतं. ईतर सर्व भारत रत्न कागदोपत्रीचे रत्न आहेत. जनमानसानी स्विकारलेला भारत रत्न म्हणजे फक्त आणि फक्त बाबासाहेब होय. म्हणून म्हणतो या पुरस्कारा मुळे बाबासाहेबांचा मान तर वाढलाच पण बाबासाहेबांची थोरवी ईतकी की या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार बाबासाहेबांमूळे धन्य झाला. आज पर्यंत कित्येक भारत रत्न आले अन कित्येक येतीलही पण ते सर्व कागदोपत्रीचे भारत रत्न असतील. फक्त एक आणि एकच व्यक्ती सदैव भारत रत्न म्हणून ओळखल्या जाईल ती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
जयभीम

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

बामसेफकडे आदर्श विचार नाहीत तर सत्तेचा व्यवहार आहे

आपण आता बघू की बामसेफचे आदर्श कोण, व काय आहे. बामसेफच्या वेबसाईटवर बघा तिथे बुद्धाची प्रतिमा नाही.  सम्राट अशोकांचीही नाही. बाबासाहेबांची चळवळ अन बुद्ध नाही तर मग ती चळवळ खरच आंबेड्करी चळवळ असू शकते का? असा हा साधा प्रश्न आहे. जिथे बुद्ध नाही ती आंबेडकरी चळवल असूच शकत नाही. या मोजपट्टीने बामसेफ आंबेडकर चळवळ नाही हे सिद्ध होते. पण या पुढे जाऊन बामसेफच्या आदर्शांचा नीट विचार केल्यास असे दिसून येईल की ही आंबेड्करी चळवळ तर नाहीच पण आंबेड्कर द्वेषी चळवळ मात्र नक्कीच आहे. बाबासाहेबानी बुद्ध, कबीर व फुले याना आपले गुरु मानले. समता, शील, श्वाभिमान अन विद्या ही सामाजीक मुल्ये  स्विकारली. आयूष्यभर या मानवी मुल्यांसाठी ते झगडत राहीले. याच्या अगदी उलट बामसेफनी समता नाकरली व जातींचा टिकाव कसा दिर्घकाळ टिकवून ठेवता येईल यावर भर दिला. मग जाती टिकवायची म्हटल्यास समतेचा विचार मांडुन चालणार नाही. जाती निर्मूलनाचा विचार मांडुन चालणार नाही. मग काय चालणार होतं, तर आहे त्या जाती तश्याच ठेवून जातींसकट संघटन चालवायचे होते. याचाच अर्थ बाबासाहेबानी ज्या जातिंच्या निर्मूलनासाठी उभं आयूष्य पेटवलं त्या जाती तश्याचा ठेवण्याचा हा आग्रह म्हणजे बाबासाहेबांच्या सिध्दांताला छेद देणे होय. भगवान बुद्ध सोडून ईतर सर्व दुनियाभरच्या संतांचे, बाबाबुवांचे फोटो स्वत:च्या वेबसाईटवर लावताना या बामसेफनी किमान एवढाही विचार केला नाही की यातील एकाही संताला, बाबाबूवाला बाबासाहेबानी भीक घातली नाही मग आंबेडकर चळवळीत या सा-यांचे फोटो अन विचार आदर्श म्हणून सामावून घेणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचार प्रणालीशी केलेली ही गद्दारी आहे. बाबासाहेबानी नाकारलेले सर्व बुबा-बाबांना स्विकारणे म्हणजे आंबेडकरी विचारांशी केलाला बंड होय. मग हा बंड कोणाला पोषक ठरत आहे तर जाती टिकविण्यासाठी जे आग्रही आहेत त्याना. मग ते कोण? तर उघड आहे, संघ (RSS) आज बसपा उघडपने भाजपाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. उदया बामसेफनी संघाच्या खांद्याला खांदा लावून उभे झाल्यास नवल वाटुन घेऊ नका. हे होणार अन निश्चित होणार.  बामसेफच्या आदर्शांची एक लांबलचक यादी आहे. एखाद्या बामसेफीला गाठून ती यादी वाचायला लावल्यास तोही चक्रावून पडेल कारण एवढी मोठी आदर्शांची यादी बाळगणारा बामसेफ ही एकमेव संघटना आहे. शिवाज महाराज , तुकाराम ते कुठल्यातरी लिंगायत संतापर्यंची ती यादी आहे. या सर्वानी कोणता विचार दिला याची तपासणी केल्यास असे दिसून येईल की बाबसेफ ज्याना आदर्श म्हणून पुढे केले ते सर्व देवा धर्माच्या पायात लोळणारे होते. होम हवनात धन्यता मानणारे होते. देव देवीच्या चमत्कारापुढे मान तुकविणारे होते. अन वेदिक धर्माचे प्रचारक व प्रसारक होते. अगदी शिवाजी महाराजाणच  उदाहरण घ्यावयाचे म्ह्टल्यास महाराज  देवभक्त होते हे जगजाहीर आहे. अष्टप्रधान मंडळात आठ पैकी ७ ब्राह्मणाची नेमणूक करणारे ब्राह्मण प्रतिपालक होते. क्षत्रियाचा शिक्कामोर्तब करवून घेण्यासाठी चक्क खोटी यादी पेश करणारे यांचे आदर्श आहेत. संत तुकारामांबद्दल बोलायचे झाल्यास जो माणूस आयुष्यभर विठठलाच्या चरणी नतमस्तक होता असा वेदिक, वैष्णव संत बामसेफचा आदर्श आहे. अशा प्रकारे लिंगायतांमधील लिंग पूजा करणारे संत बामसेफचे आदर्श आहेत. हा सगळा पसारा जो बाबासाहेबानी थेट नाकारला तो बामसेफ गोळा करुन परत एकदा लोकांमधे रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे.  
बामसेफचं प्रत्येक गणित हे संख्याबळाचं गणित आहे. लोकांच्या आदर्शांशी त्याना काही देण घेणं नाहिये. ज्या जाती जश्या आहेत तश्याच ठेवून तो संख्याबळ स्वत:कडे वळवायचा आहे. राजकीय सत्ता हस्तगत करायची आहे. सत्ता मिळविण्याचं समर्थन करताना बामसेफवाले नेहमी एक उदाहरण देतात की बाबासाहेबानी म्हटले आहे शासनकर्ती/राज्यकर्ती जमात बना. अरे हो, पण सत्ता मिळविण्याचा मार्ग कसा असावा हे नाही का सांगितलं बाबासाहेबानी. निश्चितच सांगितलं आहे. बाबासाहेबानी नैतिकतेच्या परिघात राहून जे जे मिळविता येईल ते मिळवावे असे स्पष्ट सांगितले आहे. सामाजिक मुल्ये धाबावर बसवून लोकांची फवणूक करुन समतेच्या आदर्शांचा खेळखंडोबा करुन मिलविलेली सत्ता बाबासाहेबाना तरी अपेक्शित होती का? अजिबात नाही. उलटपक्षी अशा मार्गाने मिळविलेल्या सत्तेला आंबेडकरी मुल्यांकनातुन तपासल्यास मिळविलेली सत्ता आंबेडकर द्रोह ठरेल. आंबेडकरी नितीमुल्ये सत्ता मिळविन्याच्या विरोधात नाहीत पण ती मिळविण्याचा मार्ग हा नैतीक असावा. पण बामसेफचा व नैतिकतेचा दूर दूरचा संबंध नाही. त्यामूले बामसेफकडुन नैतिक मार्गाची अपेक्षा केल्यास उपेक्शा ठरलेली आहे. ज्यांची आदर्शेच चूकीची आहेत किंवा ज्याना आदर्श म्हणून पुढे केले जाते त्यातील सोयीच्या गोष्टी उचलल्या गेल्यात अन अशा प्रकारे आदर्शांची एक लांब लचक यादी तयार करुन जी संगठना चालविली जात आहे अशा संघटनेकडुन नैतिकतेची अपेक्शा करनेच मुळात चूकिचे आहे. बामसेफचे प्रत्येक पाऊल हे आदर्शांच्या ऐवजी सत्ताव्यवहाराच्या गणितानूसार पडत असते. म्हणून बामसेफ ही आदर्शांवर चालणारी संघटना नसून सत्तेचा व्यवहार आहे.

बामसेफ ही जातींची संघटना आहे, जाती निर्मूलनाची नाही.


बामसेफची स्थापना कधी व कुठे झाली या बाबत संस्थापकांमधे मतभिन्नता आहे. डी.के. खापर्डे म्हणतात की बामसेफची स्थापना १९७३ मधे पुण्यात  झाली.  तर बामसेफचे दुसरे संस्थापक सी. पी. थोरात म्हणतात की ६ डिसेंबर १९७३ रोजी करोलबाग, दिल्ली येथे बामसेफची स्थापना झाली.  या स्थापनेच्या कार्यासाठी पुण्याहून ७० लोकं दिल्लीत हाजर झाली होती व दिल्लीतला एक जण म्हणजेच एकून ७१ जणांच्या उपस्थीतीत बामसेफची स्थापना झाली असे थोरातांचे मत आहे. खर काय ते त्यानाच माहित. म्हणजे अगदी स्थापना या विषयापासून बामसेफचा खोटारडेपणा सुरु होतो. म्हणून पुढच्या लोकाना लबाडी व खोटे बोलण्या बद्दल दोषी धरता येणार नाही. कारण त्यानी खोटे बोलण्याचा, वाक्य फिरविण्याचा वसा संस्थापक मंडळीकडुनच उचलला आहे तेंव्हा समस्त बामसेफिना खोटे बोलण्या बद्दल आपण क्षमा करु या.
६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आहे
६ डिसेंबरला देशाच्या काना कोप-यातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील चैत्यभूमित  दाखल होतात. बाबासाहेबाना आदरांजली वाहण्यासाठी लोकांच्या अलोट गर्दी मुंबईतील रस्त्या रस्त्यातून वाहत असते. याच ६ डिसेंबरला बदनाम करण्यासाठी किंवा याचं महत्व कमी करण्यासाठी आर. एस. एस. नी बाबरी मशीद पाडली व आंबेडकरी जनतेच्या एक महान दिवशी मानवी मुल्याना गालबोट लावणारे दुष्कृत्य घडवून आणले. अगदि याच धर्तीवर आंबेडकरी समाजाला चैत्यभूमीपासून दूर नेण्यासाठी बामसेफनी याच दिवशी आपली संघटना स्थापन केली अन महापरिनिर्वाण दिनाला पर्यायी दिवस उभा केला व त्याला नाव दिले निर्धार दिन.  याच्यावरुन तुमच्या लक्शात येईल की बामसेफ बहुजनांची संघटना नसून आर. एस. एस. ला आड मार्गाने मदत करणारी मनूवादी संघटना आहे. आमच्या महापरिनिर्वाणदिनाला निर्धार दिनानी रिप्लेस करु पाहणारी हि बामसेफ संघटना आंबेडरी जनतेची फसवून करत आहे.
१९७३ ते १९७८ दरम्यानच्या काळात बामसेफची पाळ मुळं रुजविण्याचे काम चालविले गेले. त्या नंतर ६ डिसेंबर  १९७८ रोजी बामसेफची अधिकृतरित्या स्थापना करण्यात आली. नंतर डी. एस. फोर चीही स्थापना झाली.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला निर्धारदिन म्हणताना बाबासाहेबानी कशाचा निर्धार केला? जातिनिर्मुलनाचा, बौध्दमय भारताचा, समतेचा यातल्या एकातरी गोष्टीचा निर्धार केला का? अजिबात नाही. तसं असतं तर ते बौद्ध झाले असते. म्हणजे त्यानी बौद्धमय भारताचा निर्धार केला नाही. त्यानी जाती निर्मूलनाचा निर्धार केला का? नाही. अन्यथा त्यानी जातींची संघटना म्हणजेच बामसेफ तयार केली नसती.  मग काय समतेचा निर्धार केला काय? मूळीच नाही. अन्यथा त्यानी बामसेफद्वार असमतेची नवीन चळवळ उभी केली नसती. म्हणजेच कांशिराम यांचा निर्धारदिन हा बाबासाहेबांच्या चळवळीशी काळीमात्र संबंधित नाही. म्हणून हा निर्धार कशाचा होता ते गुपितच आहे.
मग या बामसेफनी निर्धार कशाचा केला होता. बामणाला शिव्या घालून बामणांच्याच जातीत राहण्याचा. कांशिराम स्वत: याचं मुर्तिमंत उदाहरण आहेत. सहा हजार जातीना एकत्र करुन जांतीची संघटना उभारण्याचा. अन्यथा जातीनिर्मूलनाचे काम हाती घेण्यात आले असते. लोकाना शिव्या शाप देण्याचा. अन्यथा विधायक काम हाथी घेण्यात आले असते. असा होता एकंदरीत बामसेफचा निर्धार. विषमतावादी धर्म व जातींची व्यवस्था यातच राहून जनसामान्याना दिशाभूल करण्याचा निर्धार करण्यात आला. मनूच्या धर्मात, जातिव्यवस्थेत राहण्याचा निर्धार करण्यात आला. जातींचं निर्मूलन होऊ नये म्हणून बौद्ध धर्माचा स्विकार न करण्याचा निर्धार करण्यात आला. तसा हा आहे बामसेफचा निर्धार.
बामसेफ ही आर. एस. एस. चा पिल्लू आहे
कांशिराम हा आर. एस. एस. नी  प्रभावीत झालेलं व्यक्तीमत्व होतं. यांच्या पुढे संघाचा(RSS) आदर्श होता. संघचे ध्येय काय आहे तर हिंदू राष्ट्र होय. पण संघाला हिंदू राष्ट्र उभं करताना एक अडचण जाणवू लागली होती. संघातील एकंदरीत कार्यकर्ते व मुख्य अधिकारी हे सवर्ण असल्यामूळे हिंदू धर्मातील ईतर जातीतील लोकं संघाकडे पाठ फिरवू लागली होती. सवर्णांचे नेतृत्व ब्राह्मणेत्तर लोकानी नाकारले त्यामूळे संघाची हिंदू राष्ट्र ही संकल्पना पुर्णत्वास नेण्यात बाधा येत होती. यावर तोडगा काढण्यासाठी हिंदू धर्मातील ब्राह्मणेत्तर जातीना एकत्रीत आणणारी एक संघटना संघाला हवी होती. खालच्या जातीतील लोकं वरच्या जातीचे नेतृत्व स्विकारत नाही यावर उत्तम तोडगा म्हणजे खालच्या जातींची एक स्वतंत्र संघटना उभारणे होय. अन बामसेफ म्हणजे संघाच्या गरजेतून निर्माण झालेली हिंदुच्या खालच्या जातींची संघटना होय. बामसेफ व संघाने संगनमताने असे ठरविले की संघाने वरच्या जातीचे नेतृत्व करायचे अन बामसेफनी खालच्या जातीचे.  अन या दोन्ही संघटनानी मिळून जातीव्यवस्था तशीच कायम राहील याचे भान राखूनच चळवळ चालवायची. अन यातून हिंदू राष्ट्र हि संकल्पना पुर्णत्वास न्यायचे. म्हणून जाती त्याग हा बामसेफचा अजेंडा नाही, समता हा बामसेफचा अजेंडा नाही. बौद्ध धम्म हा बामसेफचा अजेंडा नाही. म्हणूनच तर बामसेफ वर वर पाहता मनूला शिव्या देते पण मनूच्या वर्णव्यवस्थेतच राहते आहे.
भाजपाशी गठबंधन करुन केंद्रात सत्ता उपभोगली. सुरुवातील लोकाना हे पटायचंच नाही की बामसेफ ही संघाशी संबंधित  आहे. पण जेंव्हा कांशीरामनी संघाची राजकीय पार्टी भाजप केंद्रात व उत्तर प्रदेशात सत्तेवर विराजमान झाली तेंव्हा बामसेफची  राजकीय पार्टी बी.एस.पी. नी आपला पाठिंबा दिला. तेंव्हा हे उघड झाले की संघ हिंदुच्या सवर्णाची भाजपा चालविते तर बामसेफ ईतर जातींची बी.एस.पी. चालविते. अन सत्ता उपभोगताना दोघेही एकत्र येतात व लोकांच्या पैशावर डल्ला मारतात. वरील घटनांवरुन हे सिद्ध होते की बामसेफ ही समतेसाठी स्थापन झालेली संघटना नसून हिंदू राष्ट्र उभ करण्यासाठी संघानी तयार केलेला पिल्लू आहे.  भाजपाला राजकीय लाभ मिळावा या साठी बसपाने जागोजागी (क्षमता नसतानाही) आपले उमेदवार उभे केले अन दलितांच्या मताची विभाजनी केली. याचा फायदा भाजपाला व्हावा ही बामसेफची व बसपाची चलाखी. आता बामसेफवाले आजकाल असेह म्हणतात की आमचा व बसपाचा काही संबंध नाही. पण हे सत्य नाही. बसपानी उघड उघड भाजपाशी असलेले नाते स्विकारल्यामूळे आंबेडकरी जनता बामसेफला जाब विचारु लागली. आता मात्र बसपाशी फारकत घेण्याचं सोंग केल्याशिवाय तग धरणे कठीण होते हे जाणलेल्या बामसेफनी वरवर हे नाटक केले खरे पण आजही आतून ते संबंध घट्ट आहेत. म्हणूनच तर बामसेफ संघ, बसपा व भाजप यांच्या विरोधात भ्र शब्द उच्चारत नाही.
क्रमश:

शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

पुणे कराराचा धिक्कार म्हणजे बाबासाहेबांचा धिक्कार

२४ सप्टे १९३२ रोजी बाबासाहेबानी पुणे करारावर सही केली. पुणे कराराचा ड्राफ्ट बाबासाहेबानी तयार केला होता.  अशा या पुणे कराराचा बामसेफ धिक्कार करते. असं का करते तर पुणे करारामुळे आज आपल्याम्वर गुलामी आली म्हणे. अरे आज पुणे करार अस्तित्वात तरी आहे का? आजची निवडणूक पद्धती पुणे कराराला वा-याला उभं करत नाही. ती ब्रिटीश इंडियातील प्रोव्हिजन होती. आजचे संविधान वेगळे आहे. तेंव्हा जो पुणे करार आज लागू नाही त्याचा संदर्भ देऊन लोकांची दिशाभूल करणारी बामसेफ ही आर. एस. एस. ची संघटना नाही का? मलातर बामसेफ म्हणजे आर. एस. एस. आहे असेच वाटते.  पुणे कराराची ईत्यंभूत माहिती माझ्या ब्लोगवर आधिच दिली आहे. ईथे पुणे कराराचे मुख्य मुद्दे(संक्षिप्त) परत परत देतो.
पुणे करार (संक्षिप्त मसूदा)
 १)     प्रांतीय  विधानसभामध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणेप्रमाणे मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मधप्रदेश-२० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.
२)     या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे  प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील ४ अमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
३)     केंद्रिय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.
४)     केंद्रिय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल
५)     उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.
६)     प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिनीमध्ये  दलितांच्या जागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे.  तो पर्यंत अमलात असेल जो पर्यंत  दोन्ही संबंधीत पक्षांद्वारा आपसात समझौता होऊन त्यास हटविण्याची सर्वसंमत निर्णय होत नाही.
७)     केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.
८)     दलिताना स्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
९)     सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.
असा होता पुणे करार.
 या व्यतिरिक्त एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे वरील राखिव जागांचा कालावधी. राखिव जागांच्या कालावधीवरुन प्रचंड खडाजंगी होते अन शेवटी कालावधी न ठरवताच पुणे कराराचा मसुदा तयार करण्यात आला.  
बामसेफ नावाची जातीयवादी संघटना पुणे कराराचा धिक्कार करत हिंडते. पुणे कराराचा धिक्कार म्हणजे नेमकं कशाचा धिक्कार हे मात्र बामसेफला सांगता येत नाही. त्यामुळे ही खोटारडी बामसेफ काहिही बरळत सुटते. बामसेफचे म्हणने आहे की पुणे करारामुळे दलितांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले. पण हे सत्य नाही. मूळात पुणे करार आज लागू आहे का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आधी विचारात घ्यायला पाहिजे. जर पुणे करार आज लागू होत नसेल, आजच्या निवडणूक प्रक्रियेत पुणे कराराचा प्रभाव नसेल तर मग आजच्या दलितांवरील राजकीय अत्याचारासाठी पुणे कराराला जबाबदार धरता येईल का? अजिबात नाही. मग जो करार आज लागू नाही. ज्याचा आजच्या दलितांच्या राजकीय अस्तित्वाशी काही संबंध नाही त्याचा संदर्भ देऊन लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयोजन काय?
बाबासाहेबानी पुणे कराराच्या विरोधात कधी सत्याग्रह केलाच नाही.
बामसेफनी पुणे कराराचा धिक्कार करताना प्रेत्येक वेळी ठासून सांगितले की बाबासाहेबानी स्वत: १९४६ मध्ये पुणे कराराच्या विरोधात आंदोलन केले होते. पण ही या खोटारड्या बामसेफची  आरोळी आहे. ज्या सत्याग्रहाचा बामसेफ संदर्भ देते तो सत्याग्रह मुळात पुणे कराराच्या विरोधात नव्हताच. वामन मेश्राम म्हणतात, "उच्च न्या. रिटायर्ड जज आर. आर. भोळे के अगूवाईमे पुना पॅक्त के विरोधमे जे भरो आंदोलन किया गया था. उस आंदोलन के दौरान भोळे को जेल भी हुई थी." (पुना पॅक्ट के दुष्परीणाम, लेखक वामन मेश्राम, पान नं. २) हा संदर्भ संपुर्णता खोटा आहे. १५ जुलैन १९४६ रोजी मुंबई विधिमंडळाचे अधिविशन पुण्यात भरणार होते. या अधिवेशनात अस्पृश्यांसाठी काही मागण्या मंजूर करुन घेण्यासाच्या उद्देशाने आंदोलन करण्यात आले होते.. हा सत्याग्रह ज्यानी चालविला त्या व्यक्तीचे नाव होते श्री. आर. आर. भोळे.  हे भॊळे नावाचे इसम १९४६ मधे जज नव्हतेच मुळात. १९५५ साली ते जिल्हा न्यायाधिश झाले. १९६७ साली ते मुंबई हायकोर्टाचे जज झाले. १९७४ साली ते सेवानिवृत्त झाले. वामन बेश्रम नावाचा हरामखोर म्हणतो की हा सत्याग्रह चालविणारी व्यक्ती रिटायर्ड जज श्री भोळे होते व त्याना या आंदोलनात शिक्षाही झाली होती. आता बोला, अरे मग जर भोळेला ईथे शिक्शा झाली तर त्याना परत सेवेत घेण्यासाठी तुनी काय  सुपारी देऊन पुन: नियुक्ती करवुन दिली होती काहा वामन बेश्रम अभ्यासाच्या नावाने नुसता शंख आहे. वाचतो काय, याला कळतं कायत्यातनं हा पठ्ठा तर्क काढतो काय अन लिहतो काय याचा परस्पर काही संबंध नसतो. तर्का नावाची गोष्टतर याच्या गाविच नाही. किमान अशा माणसानी लिहायच्या फंदात पडु नये.  नुसतं ऐकीव गोष्टींवर लिखान करणारा हा वामन माझ्या मते बामण आहे. अरे ज्या भोळेंचा तुम्ही संदर्भ देता ते १९४६ मध्ये जर रिटायर्ड जज होते तर मग त्या नंतर ते जज कसे काय बनले बुवा?. बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर ते जज असल्याचे पुरावे आहेत. १९६० नंतर त्यांची परत एकदा जज म्हणून नियूक्ती कशी काय झाली. किमान एवढा तर्क तरी लावायचा ना. वामन मेश्रामाना मी आव्हान करतो की त्यानी हा मुद्दा खोडून दाखवावा. पण मला माहीत आहे, वामन मेश्राम हा एक खोटारडा माणूस आहे. तो कधीच या मुद्द्यावर उत्तर देण्यास पुढे सरसावणार नाही. बाबासाहेबानी पुणे कराराच्या विरोधात कधीच सत्याग्रह केला नव्हता तरी तसा खोटा प्रचार करणारे बामसेफी हे आर. एस. एस. चे पोशिंदे आहेत. बाबासाहेबानी न केलेल्या आंदोलनाचा प्रचार करणारे हे मेश्राम व बामसेफी आंबेडकरी जनतेचे आरोपी आहेत, तसेच बाबासाहेबांचेही आरोपी आहेत.
पुणे करार हा बाबासाहेबानी केलेला राजकीय समझौता होता. राजकीय आघाड्यांवर मर्दुमकी गाजविताना असे समझौते करावे लागतात. हा समझौता म्हणजे बाबासाहेबांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचा एक माईलस्टोन आहे. अन या हरामखोर बामसेफीनी अशा या अत्यंत महत्वाच्या घटनेचा बहिष्कार / धिक्कार करताना आपण आपल्या बापाचा अपमान करत  आहोत याचं भान ठेवलं नाही.  आपण नेमकं कशाचं  धिक्कार करतोय ह्याचा विचार करण्याची या  लोकांची लायकी नाही, कारण त्यासाठी अभ्यासाचि जोड असावी लागते.  पुणे कराराच्या माध्यमातून बाबासाहेबानी अत्यंत कष्टाने अस्पृश्यांसाठी जास्तीत जास्त जागा मिळविण्यात यश मिळविले. पण नंतर भारताची घटना लिहण्याचे काम बाबासाहेबांवरच पडले तेंव्हा ही कसर भरुन काढण्याचि एकहि संधी बाबासाहेबानी सोडली नाही.  त्या नंतर नवीन घटाना अस्तित्वात आली व पुणे करार हद्दपार झाला. आजच्या तारखेला पुणे करार लागू पडतच नाही. आपण नवीन घटनेच्या आधारे निवड्नूका लढवितो. पण बामसेफचा आरोप आहे की पुणे करारामूळे दलित संसद पटुना संसदेत गप्प बसावे लागते.  पुणे करारात असं कुठे लिहलं आहे की दलितानी संसदेत गप्प बसावं. ही प्रथा त्या काशीरामनी चालू  केली. काशीराम संसदेत अजिबात बोलत नसे. त्याची दोन कारणं अशू शकतात. एकतर काशीरामचा अभ्यास नसावा किंवा तो बोलायला घाबरत असावा. यात पुणे कराराचा काय संबंध.  तुमची लायकी नाही बोलायची अन खापर फोडताय पुणे करारावर.त्या पेक्षा बामसेफनी अभ्यास शिबिरं सुरु करुन जरा ज्ञानार्जन करावं. म्हणजे पुढच्या काळात किमान तर्कसुसंग संवाद तरी करता येईल. नाहीतर असेच शंख म्हणूनच मरतील.
पुणे कराराचा धिक्कार म्हणजे बाबासाहेबांचाच धिक्कार होय
पुणे करार म्हणजे बाबासाहेबांच्या मुत्सद्दीपणाचा माईलस्टोन आहे. अत्यंत विपरीत परीस्थीतीतही न डगमगता आपल्या बांधवांसाठी खेचून आणलेल्या यशाची गाथा म्हणजे पुणे करार होय. पुढे मातब्बर सेनानी उभे असताना नुसतं हिमतीच्या बळावर लढलेला तो लढा होता. विजयश्री खेचून आणणारा तो अपूर्व सोहळा म्हणजे बाबासाहेबांच्या हिमतीचा व निर्भेडपणे भिडण्याच्या चतूरस्त्र व्यक्तीमत्वाचं दर्शन घडविणारा विजय सोहळा होय. गांधीसारखा अनभिषिक्त राजा पुढे उभा असताना त्याच्या विरोधात दंड थोपटणारे बाबासाहेब कुठल्याच दडपणाला  न जुमानता पुणे करारात आपल्या बांधवांसाठी जमेल तेवढं यश खेऊन आणतात. त्या बद्दल आम्ही बाबासाहेबांचे आभार मानायला पाहिजे. पुणे करार म्हणजे आमच्या बापानी गांधीच्या विरोधात लढविलेली खिंड होय. त्यामूळे कुठल्याही कसोट्या लावल्या तरी याचा धिक्कार करणे अजिबात पटणारं नाही.  पुणे कराराचा मसूदा कोणी तयार केला? बाबासाहेबानी. मिळालेल्या मागण्या कोणी मागितल्या? बाबासाहेबानी. पुणे करारासाठी लढा कुणी दिला? बाबासाहेबानी. अन सर्वात महत्वाच म्हणजे पुणे करारावर बाबासाहेबांची सही आहे. गांधीची सही नाही. याचा अर्थ त्या करारातील अतीमहत्वाची स्वाक्षरी करणारी व्यक्ती गांधी नसून बाबासाहेब आहेत.  म्हणजेच गांधीच्या कावेबाज चालिंवर बाबासाहेबानी मुत्सद्दीपणे केलेली मात म्हणजे पुणे करार होय. तेंव्हा पुणे कराराचा धिक्कार करताना तुम्ही गांधीचा धिक्कार करत नसून त्या करारावर सही करणा-या बाबासाहेबांचा धिक्कार करताय. जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की बाबासाहेबानी घाबरून ती सही केली तर हे मला मान्य नाही. आमचा बाप असल्या कोल्ह्या लांडग्याना घाबरणारा नव्हता. ती सही करताना संपुर्ण विचार विनिमय करुनच निर्णय घेण्यात आला. तेंव्हा पुणे कराराचा धिक्कार म्हणजे गांधिचा धिक्कार नसून बाबासाहेबांचा धिक्कार होतो.
बाबासाहेबानी पी.एच. डी. साठी लंडन मधे सादर केलेला प्रबंध विध्यापिठाने अस्विकार केला. गो-या साहेबांच्या राष्ट्रीय बाण्याला झोंबनारा निष्कर्ष काढणा-या बाबासाहेबांचं प्रबंध अस्विकृत होतो. बदल सुचविण्यात येतात. तिखटपणा कमी करण्याचे आदेश मिळतात. बाबासाहेब भारतात परत येऊन पुढचे ९ महिने मोठ्या कष्टानी तो प्रबंध सुधारुन लंडना पाठवतात अन त्याना डॉक्टरेट मिळते. आता बोला मग काय त्यांच्या डॉक्टरेटचाही निषेध करनार काय? बाबासाहेबांचा पी.एच.डी. चा प्रबंध व पुणे करार दोनीची कथा बरीच साम्य आहे. दोन्हीमधे बाबासाहेबांवर दबाव आणण्यात येतो. दोन्ही मधेय मुख्य मुद्दे बदलविण्यास/सौम्य करण्यास भाग पाडण्यात आले. दोन्हीमधे दबावतंत्र वापरण्यात आले. दोन्ही मध्ये बाबासाहेबाना धोरनात्मक पातळीवर ईच्छे विरुध भूमिका पार पाडावी लागली. दोन्ही मधे शत्रूला झूकतं माप देऊन सुचविलेले बदल करावे लागले. ही शोकांतीका होती हे जरी सत्य असले तरी बाबासाहेबानी या दोन्ही लढाया अत्यंत बिकट परिस्थीती मोठ्या धैर्याने लढविल्या अन जमेल तितकं पदरी पाडुन घेतलं. तेंव्हा त्यांच्या त्या धिरोदात्त व धिरगंभिरपणाला सलाम करायला शिका. धिक्कार करायला नाही
बामसेफनी हे निट ध्यानात ठेवावं की ते जेंव्हा जेंव्हा पुणे कराराचा धिक्कार करतात तेंव्हा तेंव्हा बाबासाहेबांचा अपमान होत असतो. म्हणून त्या बामन बेश्रामनी जरा सुधरावं अन असले चाळे थांबवावे.
जयभीम.
टिप: बाबासाहेब म्हणाले होते की संविधान जाळायचे असल्यास तो सर्वप्रथम मीच जाळेन कारण जरी मी संविधान लिहले असले तरी मी फक्त भाडोत्री लेखक होतो. (या बाबासाहेबांच्या वाक्याला धरुन उद्या बामसेफ संविधानाचा धिक्कार केल्यास नवल वाटुन घेऊ नका. अन आज गप्प बसलात तर उदया हे पाहण्याचं भाग्य नक्की लाभेल. )

रविवार, ४ सप्टेंबर, २०११

लव-जिहाद- भविष्यातील एक समस्या.

माझे मित्र श्री. संजय सोनवणी यांच्या या ब्लोगवरुन   साभार. 
संजय साहेब डिटेक्टीव एजेन्सी चालवितात. त्याना येत असलेल्या विविध अनूभवाचे ते नेहमीच कथन करत असतात. आम्ही जेंव्हा भेटतो तेंव्हा अशा प्रकारचे अनूभव ते नेहमीच सांगत असतात. मी त्यांच्या या क्षेत्रातील अनूभव फार चवीने ऐकतो. पण हा अनूभव मात्र हृदयाचा ठोका चुकविणारा ठरला. हा प्रकार जास्तीत जास्त लोकांना कळावा या उद्देशाने त्यांचा लेख ईथे टाकत आहे.
------------------------------------------------------------------ 

लव जिहाद हा भविष्यातील महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याची बीजे वर्तमानात रोवली जात आहेत. याबद्दल शक्यतो कोणी बोलत नाही. हा हिंसक दहशतवाद नसुन सांस्क्रुतीक दहशतवाद असतो. त्याची परिमाने हिंसक दहशतवादापेक्षा भयंकर असु शकतात. पण त्याचे गांभिर्य समजावुन घेतले पाहिजे. जिहाद हा शब्द येथे इस्लामी सांस्क्रुतीक दहशतवादापुरता मर्यादित नाही, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.
    मी साधारनपने एका वर्षापुर्वी एका उच्चवर्णीय आणि उच्चशिक्षित तरुणीच्या पित्याने हतबल होवुन दिलेली केस स्वीकारली होती. त्यात त्या तरुणीने हिंदु असण्याशी बंड करत एका मुस्लिम अल्पशिक्षित आणि गरीब मुलाशी नुसता विवाह केला असे नाही तर धर्मही बदललला. ही बाब तिने किमान दोन वर्ष आपल्या माता-पित्यापासुन लपवुन ठेवली आणि संधी मिळताच घर सोडले. यात वरकरणी काहीही वातनार नाही. प्रेमात सर्व माफ असते. आणि तो प्रत्येक जीवाचा आपल्याला प्रिय वाटना-या जोडीदाराशी विवाह करण्याचा हक्कच आहे आणि तो मानलाच पाहिजे.
    पण या प्रेमामागील हेतुच गैर असतील तर?
    मी सांगतो त्या केसमद्धे असेच झाले. त्या मुलीची ससेहोलपट झाली. मुलाची पार्श्वभुमी चांगली नव्हती हे तोवर सिद्ध झालेले होते. पुणे सोडुन तो मुलगा तिला हैद्राबादला घेवुन गेला. आम्ही पोलिस कमिशनरांना भेटलो. त्यांनी यात काहीही कायद्याने करु शकण्यात असहमती दर्शवली. मग मी माझ्या एका हिंदुत्ववादी मित्राला फोन केला. त्याने तर मला उडवुनच लावले. त्याचे म्हनने होते कि सोनवणी साहेब, ही प्रकरणे वाढत आहेत आणि त्यात काहीच होवु शकत नाही.
    मला गेल्याच आठवड्यात त्याच मुलीबद्दल समजले कि तिचा आता तलाक झाला आहे आणि ती आता महिन्याभरच्या मुलाची आई आहे. तिला बाप घरात घेईना आणि एवढ्या लहान बाळाला घेवुन ती कोनती नोकरी करणार?
    समजा ही एखादी दुर्दैवी घटना आहे तर त्याकडेही उभयपक्षी मुर्खपणाचा दोष देवुन स्वता:हुन दुर्दैव ऒढवुन घेतले याबाबत मौन पाळता येईल. परंतु या घटनेमुळे मी असे प्रकार का होतात कसे होतात आणि त्याची परिनती कशात होते याचा जो अल्प अभ्यास केला त्यावरुन दिसलेल्या काही बाबी अशा:
    १. लव जिहाद हा भ्रम नव्हे तर वास्तव आहे.
    २. या जिहादाची प्रेरणा सिमी ही आहे.
    ३. शाहरुखखान आणि गौरी हे आयडोल अत्यंत पद्धतशीरपने हिंदु मुलींमद्धे निर्माण केले जात आहे. (या दोघा बिचा-यांना हे माहितही नसेल.)
    ४. हिंदु-मुस्लिम द्वेष हे एका मानसिक प्रतिक्रियावादी बंडाचे कारण ठरत आहे. मुली स्वता:हुन त्या बंडात भाग घेत आहेत, पण अत्यंत उलट अर्थाने. एके काळी ब्राह्मण मुलींनी दलितांशी फार मोठ्या प्रमाणावर विवाह करण्याची सुरुवात केली होती. आता दलितांऐवजी मुस्लिम तरुणांना प्राधान्य दिले जात आहे.
    ६. त्याउलट दलित मुलींशी सवर्णांनी विवाह करणे वा मुस्लिम स्त्रीयांशी विवाह करणे हे प्रमाण नगण्य राहिलेले आहे.
    ७. अतीव प्रेमाने परस्परानुरुप होत कोणीही कोणाशी विवाह करणे अत्यंत स्वाभाविक आहे व त्याला सामाजिक समर्थन असायलाच हवे. परंत लव जिहाद मात्र जाणीवपुर्वक अन्य धर्मीय मुलींना आपल्या धर्मात प्रथम घेत, विवाह करत नंतर त्यांना सोडने या मुलभुत तत्वद्न्यानावर आधारीत आहे. जर प्रेम आहे, सहजीवन जगायचे तर मग धर्मांतर कशाला हवे? परंतु लव जिहादाची पहिली अट मुलीच्या धर्मांतराची आहे.
    ८. या धर्मांतरीत मुली वा-यावर सोडल्या गेल्या तर त्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याची, त्यांचे पुनर्वसन करण्याची सोय मुळात हिंदु धर्मात नाही आणि हे त्यांना चांगले माहित आहे.
    याबाबत मी नक्कीच पुढेही विवेचन करेल. येथे मी फक्त महत्वाच्या मुद्द्यांकडे सर्वच समाजाचे लक्ष आकर्षित करु इच्छितो. प्रेम करणे-विवाह करने यातील नैसर्गिक आणि कायदेशीर स्वातंत्र्य मान्य आहेच आणि असलेच पाहिजे...मग वधु-वर कोणत्याही जातीधर्मातील असोत.
    परंतु एक सांस्क्रुतीक दहशतवादाचे, एखाद्या समाजाला खिळखिळे करण्याच्या द्रुष्टीने जाणीवपुर्वक, प्रत्यक्ष शारीरिक हिंसा न करता, मानसिक हिंसा घडवण्याचे असे काही कारस्थान जर आहे तर त्याचा प्रबोधनानेच प्रतिकार केला पाहिजे. याबाबत एक पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे...मित्रांनी जर म्ला अधिक अनुभव (सत्य) पुरवले तर मी त्यांचा आभारी राहील. अशा तब्बल ३७ केसेस... संभाजीनगर मध्ये घडल्या आहेत... आंध्र प्रदेश आणि केरळ या भागात याचे प्रमाण सर्वाधिक आहे... जवळपास ८४ प्रकाराने घडली १८ प्रकरणांची पोलीस दप्तरी नोंद झाली व केवळ ४ लोकांवर कारवाई झाली... हे वास्तव आणि आणि तेही भयावह आहे.