रविवार 4 सप्टेंबर 2011

लव-जिहाद- भविष्यातील एक समस्या.

माझे मित्र श्री. संजय सोनवणी यांच्या या ब्लोगवरुन   साभार. 
संजय साहेब डिटेक्टीव एजेन्सी चालवितात. त्याना येत असलेल्या विविध अनूभवाचे ते नेहमीच कथन करत असतात. आम्ही जेंव्हा भेटतो तेंव्हा अशा प्रकारचे अनूभव ते नेहमीच सांगत असतात. मी त्यांच्या या क्षेत्रातील अनूभव फार चवीने ऐकतो. पण हा अनूभव मात्र हृदयाचा ठोका चुकविणारा ठरला. हा प्रकार जास्तीत जास्त लोकांना कळावा या उद्देशाने त्यांचा लेख ईथे टाकत आहे.
------------------------------------------------------------------ 

लव जिहाद हा भविष्यातील महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याची बीजे वर्तमानात रोवली जात आहेत. याबद्दल शक्यतो कोणी बोलत नाही. हा हिंसक दहशतवाद नसुन सांस्क्रुतीक दहशतवाद असतो. त्याची परिमाने हिंसक दहशतवादापेक्षा भयंकर असु शकतात. पण त्याचे गांभिर्य समजावुन घेतले पाहिजे. जिहाद हा शब्द येथे इस्लामी सांस्क्रुतीक दहशतवादापुरता मर्यादित नाही, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.
    मी साधारनपने एका वर्षापुर्वी एका उच्चवर्णीय आणि उच्चशिक्षित तरुणीच्या पित्याने हतबल होवुन दिलेली केस स्वीकारली होती. त्यात त्या तरुणीने हिंदु असण्याशी बंड करत एका मुस्लिम अल्पशिक्षित आणि गरीब मुलाशी नुसता विवाह केला असे नाही तर धर्मही बदललला. ही बाब तिने किमान दोन वर्ष आपल्या माता-पित्यापासुन लपवुन ठेवली आणि संधी मिळताच घर सोडले. यात वरकरणी काहीही वातनार नाही. प्रेमात सर्व माफ असते. आणि तो प्रत्येक जीवाचा आपल्याला प्रिय वाटना-या जोडीदाराशी विवाह करण्याचा हक्कच आहे आणि तो मानलाच पाहिजे.
    पण या प्रेमामागील हेतुच गैर असतील तर?
    मी सांगतो त्या केसमद्धे असेच झाले. त्या मुलीची ससेहोलपट झाली. मुलाची पार्श्वभुमी चांगली नव्हती हे तोवर सिद्ध झालेले होते. पुणे सोडुन तो मुलगा तिला हैद्राबादला घेवुन गेला. आम्ही पोलिस कमिशनरांना भेटलो. त्यांनी यात काहीही कायद्याने करु शकण्यात असहमती दर्शवली. मग मी माझ्या एका हिंदुत्ववादी मित्राला फोन केला. त्याने तर मला उडवुनच लावले. त्याचे म्हनने होते कि सोनवणी साहेब, ही प्रकरणे वाढत आहेत आणि त्यात काहीच होवु शकत नाही.
    मला गेल्याच आठवड्यात त्याच मुलीबद्दल समजले कि तिचा आता तलाक झाला आहे आणि ती आता महिन्याभरच्या मुलाची आई आहे. तिला बाप घरात घेईना आणि एवढ्या लहान बाळाला घेवुन ती कोनती नोकरी करणार?
    समजा ही एखादी दुर्दैवी घटना आहे तर त्याकडेही उभयपक्षी मुर्खपणाचा दोष देवुन स्वता:हुन दुर्दैव ऒढवुन घेतले याबाबत मौन पाळता येईल. परंतु या घटनेमुळे मी असे प्रकार का होतात कसे होतात आणि त्याची परिनती कशात होते याचा जो अल्प अभ्यास केला त्यावरुन दिसलेल्या काही बाबी अशा:
    १. लव जिहाद हा भ्रम नव्हे तर वास्तव आहे.
    २. या जिहादाची प्रेरणा सिमी ही आहे.
    ३. शाहरुखखान आणि गौरी हे आयडोल अत्यंत पद्धतशीरपने हिंदु मुलींमद्धे निर्माण केले जात आहे. (या दोघा बिचा-यांना हे माहितही नसेल.)
    ४. हिंदु-मुस्लिम द्वेष हे एका मानसिक प्रतिक्रियावादी बंडाचे कारण ठरत आहे. मुली स्वता:हुन त्या बंडात भाग घेत आहेत, पण अत्यंत उलट अर्थाने. एके काळी ब्राह्मण मुलींनी दलितांशी फार मोठ्या प्रमाणावर विवाह करण्याची सुरुवात केली होती. आता दलितांऐवजी मुस्लिम तरुणांना प्राधान्य दिले जात आहे.
    ६. त्याउलट दलित मुलींशी सवर्णांनी विवाह करणे वा मुस्लिम स्त्रीयांशी विवाह करणे हे प्रमाण नगण्य राहिलेले आहे.
    ७. अतीव प्रेमाने परस्परानुरुप होत कोणीही कोणाशी विवाह करणे अत्यंत स्वाभाविक आहे व त्याला सामाजिक समर्थन असायलाच हवे. परंत लव जिहाद मात्र जाणीवपुर्वक अन्य धर्मीय मुलींना आपल्या धर्मात प्रथम घेत, विवाह करत नंतर त्यांना सोडने या मुलभुत तत्वद्न्यानावर आधारीत आहे. जर प्रेम आहे, सहजीवन जगायचे तर मग धर्मांतर कशाला हवे? परंतु लव जिहादाची पहिली अट मुलीच्या धर्मांतराची आहे.
    ८. या धर्मांतरीत मुली वा-यावर सोडल्या गेल्या तर त्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याची, त्यांचे पुनर्वसन करण्याची सोय मुळात हिंदु धर्मात नाही आणि हे त्यांना चांगले माहित आहे.
    याबाबत मी नक्कीच पुढेही विवेचन करेल. येथे मी फक्त महत्वाच्या मुद्द्यांकडे सर्वच समाजाचे लक्ष आकर्षित करु इच्छितो. प्रेम करणे-विवाह करने यातील नैसर्गिक आणि कायदेशीर स्वातंत्र्य मान्य आहेच आणि असलेच पाहिजे...मग वधु-वर कोणत्याही जातीधर्मातील असोत.
    परंतु एक सांस्क्रुतीक दहशतवादाचे, एखाद्या समाजाला खिळखिळे करण्याच्या द्रुष्टीने जाणीवपुर्वक, प्रत्यक्ष शारीरिक हिंसा न करता, मानसिक हिंसा घडवण्याचे असे काही कारस्थान जर आहे तर त्याचा प्रबोधनानेच प्रतिकार केला पाहिजे. याबाबत एक पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे...मित्रांनी जर म्ला अधिक अनुभव (सत्य) पुरवले तर मी त्यांचा आभारी राहील. अशा तब्बल ३७ केसेस... संभाजीनगर मध्ये घडल्या आहेत... आंध्र प्रदेश आणि केरळ या भागात याचे प्रमाण सर्वाधिक आहे... जवळपास ८४ प्रकाराने घडली १८ प्रकरणांची पोलीस दप्तरी नोंद झाली व केवळ ४ लोकांवर कारवाई झाली... हे वास्तव आणि आणि तेही भयावह आहे.

1 comments:

  1. u r right,sir.in this matter one ips from kerala cadre tried to make inquiry but he was transferred.
    he found that from gulf country financial support provided. kozikode was main center.in this matter i found one book by an organization. im from aurangabad i can assure u that luv jihad exist & exist beyond our imagination. these group even teaches muslim boys how to communicate with girls & one more thing girls must avoid e-recharge cause their number recorded by shopkeeper & provided to such boys.instead they must ask 4 recharge coupon.

    प्रत्युत्तर द्याहटवा