आज काल जो तो उठतो बाबासाहेबांचं नाव घेतो, भगवान बुद्धावर
एखादं पुस्तक लिहतो बौद्ध धम्माचं गुणगाण गातो व नेम अन्ड फेम मिळवून स्वत:चं
फावल्यावर या धम्माला व आंबेडकरी चळवळीला खिळखिळ करुन निघून जातो. आजच्या तारखेला झटपट
प्रसिद्धि मिळवून पुढे जाण्याचा सर्वात उत्तम अन वेगवान मार्ग म्हणजे बौद्ध धम्म व
आंबेडकर चळवळ होय. आंबेडकर चळवळीचा मुळ गाभा काय आहे हे जाणून घेण्याच्या फंदात न पडता कित्येक
लोकं वरवर आंबेडकरी बनल्याचा आव आणतात, चळवळीत शिरतात व आमच्याच डोक्यावर पाय
ठेवून वरच्या पायरीवर चढतात. अन अशा लोकांद्वारे आमच्या बौद्ध साहित्यात व
आंबेडकरी विचारात विपर्यास करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालविले जात आहे. अशा
लोकांतील सर्वात वरच्या क्रमांकावरील नाव म्हणजे डॉ. आ. ह. साळुंखे.
डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात की बौद्ध धम्म स्विकारणे
महत्वाचे नाही. धम्माचे आचरण करणे महत्वाचे. अन आमचे बापुर्डे हे पटकन मान्य करुन
घेतात. खरं तर वरील वाक्य साळुंख्यानी
स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळोवेळी वापरावे अन आंबेडकरी जनतेची दिशाभूल करावी, तरी
आम्हाला ही फसवणूक कळू नये ही खरच खेदाची बाब आहे. पण हे सत्य आहे. साळुंखेच्या साहित्याला आंबेडकरी जनतेशिवाय कोणी
काळं कुत्रही ढुंकत नाही. त्यांचा साहित्यलिखानाचा जेवढं योगदान असेल तेवढचं योगदान
आंबेडकरी जनतेचं त्याना साहित्यिक बनविण्यात आहे. मी नेहमी हे सांगतो की साळुंखेला आंबेडकरी
जनतेनी मोठं केलं. आजही त्यांचं साहित्य
सर्वात जास्त प्रमाणात आंबेडकरी जनतेमधेच विकलं जातं. अशा प्रकारे आंबेडकरी
जनतेच्या पाठिंब्यानी मोठा झालेला हा माणूस काय म्हणतो तर... बुद्धाची शिकवण
महत्वाची, आचरण महत्वाचं, त्यासाठी धम्म दिक्शा घेणे जरूरी नाही...आता बोला... आहे
की नाही मज्जा.... स्वत: बुद्धाचं नाव
घेऊन मोठं व्हायचं अन आज तो धम्म का नाही स्विकारत असं विचारल्यावर अशी कोलांट उडी
मारायची. त्यांच्या मताप्रमाणे जायचं म्हटलं तर मग बाबासाहेबाना धम्म दिक्षा
घेण्याची गरज नव्हतीच. मग बाबासाहेब मुर्ख होते का धम्म दिक्शा घ्यायला.
धम्मदिक्षा घेणे बाबासाहेबही बंधनकारक मानतात
बाबासाहेबांचं आचरण अन विचार बौद्ध तत्वज्ञाना प्रमाणे
तंतोतंत होतं. अत्यंत करुणामय हृदयानी जगणारे ते महामानव होते. प्राणि मात्रावर
प्रेम करणारे दयावान होते. समतेसाठी आयुष्य लोटून देणारे महान त्यागी, समतावादी होते. दु:खात
खितपत पडलेल्या लोकांना दु:खमुक्त करणारे ते मुक्तीदाता, समाज क्रांतिकारक होते. एकंदरीत
बाबासाहेबांचं आचरण तर उच्च कोटीच्या बौद्ध सिद्धांतानुरुप होतच, पण त्यानी ज्या
बौद्धिक अवस्था प्राप्त केल्या त्या ही बुद्धाच्या मार्गातील फार पुढच्या अवस्था होत्या. मग
साळुंख्याची मोजपट्टी लावायची म्हटल्यास बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दिक्शा
घेण्याचं कारणच नव्हतं. पण बाबासाहेब तर धम्म दिक्षा घेतात. याचाच अर्थ असा निघतो
की नुसतं धम्माचं आचरण केल्याने भागत नाही, किंवा धम्मातील बौद्धिक अवस्था प्राप्त
करुनही भागत नाही तर धम्माची अधिकृतरित्या दिक्षा घेणेही अपरिहार्य आहे. बाबासाहेब स्वत: आचरणाने बोधिसत्व होते.
त्यांचं उभं आयुष्य बुद्धाच्या चरणी अर्पित होतं. त्यांच्या प्रत्येक कृतीतून
बौद्ध आचारण ओसंडत असे. त्यांच्या वाणितील प्रत्येक शब्द बौद्ध विचारांचा
प्रतिध्वनी होता. बाबासाहेबांचं उभं आयुष्य प्रतिबुद्धच होतं तरी सुद्धा
बाबासाहेबानी बौद्ध धम्माची दिक्षा घेणे स्वत:चं कर्त्यव्य मानलं. बुद्धाच्या
प्रती नुसतं आदर असणे पुरेसं नाही हे बाबासाहेबानी जाणलं. त्या महान बुद्धाच्या
धम्माचे नुसते गोडवे गाण्यात काही अर्थ नाही हे त्याना ठाऊक होतं. बौद्ध धमाच्या
कक्षेच्या बाहेर उभं राहून बुद्धाची स्तूती केल्याने बौद्ध धम्माचा प्रसार होत
नसतो, हे काम ढोंगी लोकं करतात. बौद्ध
धम्माची रितसर दिक्षा घेण्याची प्रथा भगवान बुद्धाने सुरु केली व ती प्रथा मानने
बाबासाहेब स्वत:साठीही बंधनकारक समजतात म्हणून बाबासाहेब स्वत: बौद्ध धम्माची
दिक्षा घेतात व बौद्ध धम्माचं कार्य करतात. धम्मदिक्षेतून बाबासाहेबांसारखा
बोधिसत्व सुट मागत नाही. तेंव्हा ईतर कुणालाही धम्म दिक्षातेनू सुट मागण्याचा
अधिकारच नाही. पण ही सुट मात्र साळूंखे मागतात. याचाच अर्थ साळूंखे बाबासाहेब नाकारतात. एखादा माणूस बौद्ध विचाराचा आव आणून तशी सुट मागत असल्यास तो
भोंदू आहे हे सिद्ध होते.
डॉ. आ. ह. साळुंखेचा युक्तिवाद त्यांचा भोंदूपणा सिद्ध
करतो.
साळुंखे म्हणतात, “बौद्ध
धम्माची दिक्षा घेणे गरजेचे नाही, धम्माचं आचरण करणे महत्वाचं. बुद्धानी धम्म
दिक्षा घेण्या बद्दल कुठेच सांगितलं नाही.” याचा अर्थ असा निघतो की बाबासाहेबानी जी धम्म
दिक्षा घेतली ती गरजेची नव्हती. त्यांच्या मते बाबासाहेबानीही साळुंख्या सरखं
नुसतं धम्माचा पाढा वाचायचा असता अन हिंदू म्हणून पडून राहायला हवं होतं. अन याला
खरं बुद्धिजम म्हणायला पाहिजे. हिंदु
धर्मात राहून बुद्धाचं दुरून गुणगाण गाणं म्हणजे साळुंखेला अभिप्रेत बुद्धिजम होय.
पण बोधिसत्व म्हणून ज्याची ख्याती आहे ते बाबासाहेब मात्र
नुसतं बुद्धाचं गुणगण गाऊन थांबत नाही तर ते स्वत: धम्म दिक्शा घेतात. बौद्ध आचरण
तर असायलाच पाहिजे पण त्याच बरोबर या आचरणाला अधिकृततेचा लेबल लागणे अत्यंत गरजेचं
आहे. अनधिकृत बुद्धिस्टांचा काही उपयोग नाही. बौद्ध धम्माचा जाहीर रित्या स्विकार करण्याचा
पाया बुद्धानी रचून दिला आहे अन बाबासाहेबानी १९५६ मध्ये आपल्या लाखो अनुयायांसकट
बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन धम्म-दिक्षा घेणे अनिवार्य आहे हे सिद्ध केले.
पण साळुंखे मात्र बाबासाहेबांच्या विरोधात जाणारी कृती तर
करतातच वरुन त्या कृतीचं समर्थन करताना जो युक्तिवाद (धम्मदिक्शा गरजेची नाही) करतात
तो बाबासाहेबांच्या आचरणाच्या विरोधात जाणारा आहे. बाबासाहेबांच्या
मार्गदर्शनाच्या विरोधात जाणारा आहे. बाबासाहेबांच्या धम्मकार्याच्या विरोधात
जाणारा आहे. याचाच अर्थ साळुंखेला
बाबासाहेब मान्य नाही हे सिद्ध होतं. स्वत:ला बौद्ध तत्वज्ञानाचा उपासक भासवून वैचारीक,
सामाजीक व धार्मिक स्वैरपणासाठी मोकळीक राखून ठेवण्यासाठी साळुंख्यानी हा सगळा
आटापिटा केला आहे. साळुंखेनी धम्म-दिक्षा नकारणे यातून दोन अर्थ निघतात. एक तर
ते बाबासाहेबाना नाकारत आहेत व दुसरं त्याना अधिकृत बौद्ध बनण्यात काळीचं स्वारस्य
नाही.
थोडक्यात बौद्ध धम्मात धम्माच्या बाहेर राहून बाता करण्याला काही अर्थ नाही. त्यासाठी धम्म दिक्षा घेणे अनिवार्य आहे.
थोडक्यात बौद्ध धम्मात धम्माच्या बाहेर राहून बाता करण्याला काही अर्थ नाही. त्यासाठी धम्म दिक्षा घेणे अनिवार्य आहे.
सुंदर विवेचन डोळ्यात अंजन घालणारा लेख
प्रत्युत्तर द्याहटवाहाच नियम प्रा.(?) हरी नरके यांना लागू का होत नाही?
प्रत्युत्तर द्याहटवाहाच नियम प्रा.(?) हरी नरके यांना लागू का होत नाही?
प्रत्युत्तर द्याहटवा++++++++++++++++++११११११११