रविवार, २५ सप्टेंबर, २०११

बामसेफ ही जातींची संघटना आहे, जाती निर्मूलनाची नाही.


बामसेफची स्थापना कधी व कुठे झाली या बाबत संस्थापकांमधे मतभिन्नता आहे. डी.के. खापर्डे म्हणतात की बामसेफची स्थापना १९७३ मधे पुण्यात  झाली.  तर बामसेफचे दुसरे संस्थापक सी. पी. थोरात म्हणतात की ६ डिसेंबर १९७३ रोजी करोलबाग, दिल्ली येथे बामसेफची स्थापना झाली.  या स्थापनेच्या कार्यासाठी पुण्याहून ७० लोकं दिल्लीत हाजर झाली होती व दिल्लीतला एक जण म्हणजेच एकून ७१ जणांच्या उपस्थीतीत बामसेफची स्थापना झाली असे थोरातांचे मत आहे. खर काय ते त्यानाच माहित. म्हणजे अगदी स्थापना या विषयापासून बामसेफचा खोटारडेपणा सुरु होतो. म्हणून पुढच्या लोकाना लबाडी व खोटे बोलण्या बद्दल दोषी धरता येणार नाही. कारण त्यानी खोटे बोलण्याचा, वाक्य फिरविण्याचा वसा संस्थापक मंडळीकडुनच उचलला आहे तेंव्हा समस्त बामसेफिना खोटे बोलण्या बद्दल आपण क्षमा करु या.
६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आहे
६ डिसेंबरला देशाच्या काना कोप-यातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील चैत्यभूमित  दाखल होतात. बाबासाहेबाना आदरांजली वाहण्यासाठी लोकांच्या अलोट गर्दी मुंबईतील रस्त्या रस्त्यातून वाहत असते. याच ६ डिसेंबरला बदनाम करण्यासाठी किंवा याचं महत्व कमी करण्यासाठी आर. एस. एस. नी बाबरी मशीद पाडली व आंबेडकरी जनतेच्या एक महान दिवशी मानवी मुल्याना गालबोट लावणारे दुष्कृत्य घडवून आणले. अगदि याच धर्तीवर आंबेडकरी समाजाला चैत्यभूमीपासून दूर नेण्यासाठी बामसेफनी याच दिवशी आपली संघटना स्थापन केली अन महापरिनिर्वाण दिनाला पर्यायी दिवस उभा केला व त्याला नाव दिले निर्धार दिन.  याच्यावरुन तुमच्या लक्शात येईल की बामसेफ बहुजनांची संघटना नसून आर. एस. एस. ला आड मार्गाने मदत करणारी मनूवादी संघटना आहे. आमच्या महापरिनिर्वाणदिनाला निर्धार दिनानी रिप्लेस करु पाहणारी हि बामसेफ संघटना आंबेडरी जनतेची फसवून करत आहे.
१९७३ ते १९७८ दरम्यानच्या काळात बामसेफची पाळ मुळं रुजविण्याचे काम चालविले गेले. त्या नंतर ६ डिसेंबर  १९७८ रोजी बामसेफची अधिकृतरित्या स्थापना करण्यात आली. नंतर डी. एस. फोर चीही स्थापना झाली.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला निर्धारदिन म्हणताना बाबासाहेबानी कशाचा निर्धार केला? जातिनिर्मुलनाचा, बौध्दमय भारताचा, समतेचा यातल्या एकातरी गोष्टीचा निर्धार केला का? अजिबात नाही. तसं असतं तर ते बौद्ध झाले असते. म्हणजे त्यानी बौद्धमय भारताचा निर्धार केला नाही. त्यानी जाती निर्मूलनाचा निर्धार केला का? नाही. अन्यथा त्यानी जातींची संघटना म्हणजेच बामसेफ तयार केली नसती.  मग काय समतेचा निर्धार केला काय? मूळीच नाही. अन्यथा त्यानी बामसेफद्वार असमतेची नवीन चळवळ उभी केली नसती. म्हणजेच कांशिराम यांचा निर्धारदिन हा बाबासाहेबांच्या चळवळीशी काळीमात्र संबंधित नाही. म्हणून हा निर्धार कशाचा होता ते गुपितच आहे.
मग या बामसेफनी निर्धार कशाचा केला होता. बामणाला शिव्या घालून बामणांच्याच जातीत राहण्याचा. कांशिराम स्वत: याचं मुर्तिमंत उदाहरण आहेत. सहा हजार जातीना एकत्र करुन जांतीची संघटना उभारण्याचा. अन्यथा जातीनिर्मूलनाचे काम हाती घेण्यात आले असते. लोकाना शिव्या शाप देण्याचा. अन्यथा विधायक काम हाथी घेण्यात आले असते. असा होता एकंदरीत बामसेफचा निर्धार. विषमतावादी धर्म व जातींची व्यवस्था यातच राहून जनसामान्याना दिशाभूल करण्याचा निर्धार करण्यात आला. मनूच्या धर्मात, जातिव्यवस्थेत राहण्याचा निर्धार करण्यात आला. जातींचं निर्मूलन होऊ नये म्हणून बौद्ध धर्माचा स्विकार न करण्याचा निर्धार करण्यात आला. तसा हा आहे बामसेफचा निर्धार.
बामसेफ ही आर. एस. एस. चा पिल्लू आहे
कांशिराम हा आर. एस. एस. नी  प्रभावीत झालेलं व्यक्तीमत्व होतं. यांच्या पुढे संघाचा(RSS) आदर्श होता. संघचे ध्येय काय आहे तर हिंदू राष्ट्र होय. पण संघाला हिंदू राष्ट्र उभं करताना एक अडचण जाणवू लागली होती. संघातील एकंदरीत कार्यकर्ते व मुख्य अधिकारी हे सवर्ण असल्यामूळे हिंदू धर्मातील ईतर जातीतील लोकं संघाकडे पाठ फिरवू लागली होती. सवर्णांचे नेतृत्व ब्राह्मणेत्तर लोकानी नाकारले त्यामूळे संघाची हिंदू राष्ट्र ही संकल्पना पुर्णत्वास नेण्यात बाधा येत होती. यावर तोडगा काढण्यासाठी हिंदू धर्मातील ब्राह्मणेत्तर जातीना एकत्रीत आणणारी एक संघटना संघाला हवी होती. खालच्या जातीतील लोकं वरच्या जातीचे नेतृत्व स्विकारत नाही यावर उत्तम तोडगा म्हणजे खालच्या जातींची एक स्वतंत्र संघटना उभारणे होय. अन बामसेफ म्हणजे संघाच्या गरजेतून निर्माण झालेली हिंदुच्या खालच्या जातींची संघटना होय. बामसेफ व संघाने संगनमताने असे ठरविले की संघाने वरच्या जातीचे नेतृत्व करायचे अन बामसेफनी खालच्या जातीचे.  अन या दोन्ही संघटनानी मिळून जातीव्यवस्था तशीच कायम राहील याचे भान राखूनच चळवळ चालवायची. अन यातून हिंदू राष्ट्र हि संकल्पना पुर्णत्वास न्यायचे. म्हणून जाती त्याग हा बामसेफचा अजेंडा नाही, समता हा बामसेफचा अजेंडा नाही. बौद्ध धम्म हा बामसेफचा अजेंडा नाही. म्हणूनच तर बामसेफ वर वर पाहता मनूला शिव्या देते पण मनूच्या वर्णव्यवस्थेतच राहते आहे.
भाजपाशी गठबंधन करुन केंद्रात सत्ता उपभोगली. सुरुवातील लोकाना हे पटायचंच नाही की बामसेफ ही संघाशी संबंधित  आहे. पण जेंव्हा कांशीरामनी संघाची राजकीय पार्टी भाजप केंद्रात व उत्तर प्रदेशात सत्तेवर विराजमान झाली तेंव्हा बामसेफची  राजकीय पार्टी बी.एस.पी. नी आपला पाठिंबा दिला. तेंव्हा हे उघड झाले की संघ हिंदुच्या सवर्णाची भाजपा चालविते तर बामसेफ ईतर जातींची बी.एस.पी. चालविते. अन सत्ता उपभोगताना दोघेही एकत्र येतात व लोकांच्या पैशावर डल्ला मारतात. वरील घटनांवरुन हे सिद्ध होते की बामसेफ ही समतेसाठी स्थापन झालेली संघटना नसून हिंदू राष्ट्र उभ करण्यासाठी संघानी तयार केलेला पिल्लू आहे.  भाजपाला राजकीय लाभ मिळावा या साठी बसपाने जागोजागी (क्षमता नसतानाही) आपले उमेदवार उभे केले अन दलितांच्या मताची विभाजनी केली. याचा फायदा भाजपाला व्हावा ही बामसेफची व बसपाची चलाखी. आता बामसेफवाले आजकाल असेह म्हणतात की आमचा व बसपाचा काही संबंध नाही. पण हे सत्य नाही. बसपानी उघड उघड भाजपाशी असलेले नाते स्विकारल्यामूळे आंबेडकरी जनता बामसेफला जाब विचारु लागली. आता मात्र बसपाशी फारकत घेण्याचं सोंग केल्याशिवाय तग धरणे कठीण होते हे जाणलेल्या बामसेफनी वरवर हे नाटक केले खरे पण आजही आतून ते संबंध घट्ट आहेत. म्हणूनच तर बामसेफ संघ, बसपा व भाजप यांच्या विरोधात भ्र शब्द उच्चारत नाही.
क्रमश:

३ टिप्पण्या:

  1. अगदी बरोबर आहे साहेब माझ्या गावाशेजारीच भारत मूक्ती मोर्चाची सभा होती त्यात माझ्या एका ओबिसी मित्राने त्यांना प्रश्न विचारला की राम आदर्श घेण्यास पात्र आहे काय ? यावर तो वक्ता म्हणाला की या प्रश्नामुळे इतर समाजातील लोक दुरावले जातील सध्या या विषयावर बोलणे महत्वाचे नाही. त्यांच्या या बोलण्यावरुन लक्षात येत की वर वर हिंदुच्या देवांना शिव्या द्यायच्या आणि स्वतःमात्र देव व जातीच्या चौकटितुन बाहेर पडायचे नाही याचा अर्थ की विचार नाव बुद्धाचे घ्यायचे आणि आदर्श रामाचा घ्यायचा असेच आहे.

    प्रत्युत्तर द्याहटवा