मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

... आणि “भारतरत्न पुरस्कार” कृतार्थ झाला.


भारताला स्वातंत्र्य मिळाले. राज्यकर्ते बदलले अन मायभूमितील विविध क्षेत्रातील त्या लेकराना सन्मानीत करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यांच्या उत्तूग कर्तुत्वानी ही भूमी कृतकृत झाली, पावन झाली. या भूमित अशा लेकरानी जन्म घेतला की त्यांचं नाव घेताना भारतीय म्हणून आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. विज्ञान, कला, राजकारण, समाज सेवा, साहित्य, संगित पासून जागतिक पातळीवर भारतीयत्वाच्या पाऊलखूणा उमटविणारे पूत या मातीनी घडविले अन अशा अलौकीक कर्तुत्वानी देशाचं नाव उंचविणा-या कर्तुत्ववान लोकांना सर्वोच्च सन्मानानी सन्मानित करण्याचा  निर्णय १९५४ मध्ये घेण्यात आला. या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराला नाव देण्यात आलं भारतरत्न. देशासाठी सर्वोच्च त्याग करणा-या, देशाची किर्ती जगभर पसरविणा-या, विधायक व भरीव कामगिरी करणा-या विविध क्षेत्रातील लोकाना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कारे देण्याचे ठरले.
भारत रत्न सन्मान देण्याची संकल्पना जरी उदात्त हेतूने जन्मास आली तरी तो बहाल करणा-या समितीत बसलेल्या लोकांवर जो जातीयवादी संस्कृतीचा प्रभाव होता तो विविध रुपात पहिल्या पुरस्कारापासून आज पर्यंतच्या सर्व पुरस्कारांतून वेळोवेळी डोकावून गेला. आपल्या अलौकीक कर्तुत्वानी अपूर्व कार्य करणा-या या महान लोकांना सन्मानीत करताना कर्तुत्व या कसोटीच्या जोडीला जातीची मोजपट्टी होतीच, फक्त ती सूप्त रुपात होती एवढाच काय तो फरक. प्रत्येक पुरस्काराचं एक मूल्य असतं, एक वजन असतं ज्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो ती व्यक्ती  पुरस्काराच्या मूल्याच्या तोलामोलाची असावी लागते. तेंव्हाकुठे पुरस्कार भरुन पावतो. पण भारत रत्न या पुरस्काराच्या बाबतीत असे झाले नाही असे माझे वयक्तीक मत आहे. सरकारनी तावा तावात लोकाना भारत रत्न पुरस्कारानी सन्मानीत केलं पण लोकं मात्र या सन्मानीत रत्नाना  भारतरत्न म्हणून नाकारतात. भारतातील जनमानसाचा हा कृतीमय  निकाल निवड समितीच्या अगदी विरोधात जाणारा आहे.
जनतेनी नाकारलेले भारत रत्न:
पहिला भारतरत्न पुरस्कार  १९५४ मधेय १)डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन २) चक्रवर्ती राजगोपालचारी ३) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण. या तीन व्यक्तीना देण्यात आला. या नंतर पुढचं अर्ध शतक झालं भारत रत्न या पुरस्कारानी विविध क्षेत्रातील ४१ दिग्गजाना सन्मानीत करण्यात आले. राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेहरू, इंदिरा गांधी ते राजीव गांधी, सामाजीक क्षेत्रातील मदर टेरेसा ते नेल्सन मंडेला. चित्रपट क्षेत्रातील एम.जी.आर. सत्यजीत रे, संगित क्षेत्रातील लता मंगेशकर, रवी शंकर, सुब्बलक्ष्मी ते भीमसेन जोशी पर्यंत त्या त्या क्षेत्रात उत्तूंग कामगिरी बजावणारी ही सर्व ती माणसं आहेत ज्यानी भारताचं नाव, किर्ती जगभर पसरविण्याचं अभूतपूर्व कार्य केलं. पण यातील एकही व्यक्तीला आपण भारत रत्न म्हणून संबोधित नाही. जसे की एखाद्या बालकदिनाच्या भाषणात नेहरु बद्दल बोलताना भारतरत्न पंडीत नेहरू असं कधि कोणी म्हटल्याचं माझ्या ऐकिवात नाही. किंवा भारताच्या मर्दानी पंतप्रधान इंदिरा गांधीचा संदर्भ देताना भारतरत्न ईंदिरा गांधी म्हटल्या जात नाही. अगदी याच धर्तीवर लता मंगेशकर, भिमसेन जोशी, एमजीआर, सत्यजीत रे पासून तर अगदि पहिला भारत रत्न मिळविणारे सर्वपल्ली वा व्यंकट रमण यापैकी कुणालाच चार चौघातील संवादामधे आपण भारत रत्न म्हणून संबोधित नाही. याचं कारण काय? याचं एकचं कारण असु शकतं. जरी ते कागदो पत्री भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत असले तरी जनता मात्र त्याना भारत रत्न म्हणून स्विकारत नाही असाच अर्थ निघतो. अन्यथा त्याना संबोधताना भारतरत्न  या सन्मानासकट संबोधल्या गेलं असतं. विरोधकानी तर सोडाच पण यांच्या सख्या रक्तातल्या लोकानीही याना कधी भारतरत्न म्हणताना मी ऐकले नाही.  कॉंग्रेस नावाच्या राजकीय पार्टिने कधि राजीव गांधी, ईंदिरा गांधी वा नेहरू ला भारत रत्न म्हणताना मी ऐकले नाही. या सर्वानी जाणीव पूर्वक वरील लोकाना भारत रत्न संबोधण्याचे टाळले. याचा अर्थ असा निघतो की वरील दिग्गज जरी अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती होते, त्यांचे कार्य अलौकीक होते, पण भारत रत्न म्हणावं एवढ्या तोलामोलाचे नव्हते. हीच गोष्ट कला क्षेत्रातील लोकांबद्दल दिसते. हिंदि सिनेजगतातील दिग्गजांचा वेळोवेळी सन्मान होतो. आजवर कित्येक कार्यक्रमातून भारत रत्न सन्मानानी सन्मानीत झालेल्या लताबाई, सुब्बलक्ष्मी ते भिमसेन जोशी पर्यंत सर्वाना बघितले आहे. पण वरील व्यक्तीला कुठल्याच कार्यक्रमातून (किमान औपचारीकता म्हणून तरी) भारत रत्न म्हणून संबोधल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. याचा अर्थ असा निघतो की वरील कलावंताना जरी सरकारनी भारत रत्न पुरस्कारानी सन्मानीत केले तरी जनतेनी त्याना भारत रत्न म्हणून नाकरले आहे. अन  वेळो वेळी त्यांच्या लोकानी प्रत्यक्ष कृतीतून हा धिक्कार दाखवून दिला. पुरस्कार देणे हे जरी निवड समितीच्या हाती असले तरी पुरस्कृत व्यक्तीला नाकारण्याचा अधिकार जनता बजावू शकते याचं हे मूर्तिमंत उदाहरण होय. म्हणून मी असे म्हणतो की वरील सर्व भारत रत्न जरी सरकारनी सन्मानीत केले तरी या सर्व रत्नाना जनतेनी नाकारले हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच त्यांना संबोधताना कधीच, कुणीच भारत रत्न अमूक तमूक असे संबोधित नाही.

जनतेनी स्विकारलेला भारतरत्न:
सन १९५४ मध्ये भारत रत्न नावाचा सर्वोच्च नागरी सन्मान उदयास आला. त्याच वर्षी तीन लोकाना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ही परंपरा पुढे तशीच चालू होती. दर वर्षी पुरस्कार जाहीर होऊ लागले. लोकं या पुरस्कारानी सन्मानीत होऊ लागली. निवडी समिती आपले काम चोख(?)पणे बजावू लागली. विविध क्षेत्रातील लोकांचा हा गौरव काहीना सुखावून जाऊ लागला तसाच काहीना दुखावून. हा हा म्हणता तीन दशकं उलटली. १९९० साल उजाडला. आत्ता पर्यत एकून २१ जणाना  भारत रत्न पुरस्कार देण्यात आला होता. या सन्माननीय व्यक्तीना भारत रत्न म्हणन्याचं औदार्य न जनतेनी दाखविलं ना त्यांच्या स्वत:च्या कंपुतील लोकानी दाखविलं. अन याच दरम्यान एक अत्यंत महत्वाची घटना घडते. दलितांचे कैवारी, बहुजननायक, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार भारतरत्न हा सन्मान बहाल करण्यात आला.
दलित जनसमुदायात विजेच्या वेगानी नवीन उत्साह संचारला. जिकडे तिकडे जल्लोष उडाला. बाबासाहेबाना मरणोत्तर प्रदान करण्या आलेला हा सन्मान एक अभूतपूर्व घटना होती. जेवढा बाबासाहेबांचा सन्मान होता तेवढाचा त्या पुरस्काराचाही सन्मान होता. आजवर ज्याना ज्याना हा पुरस्कार देण्यात आला त्या सर्व रत्नांपेक्षा बाबासाहेब नावाचं रत्न जरा वेगळ्या चकाकीचा धनी होता. आजवर कित्येकाना भारतरत्न नावाचा पुरस्कार आहे हे माहितही नव्हतं. पण या पुरस्काराला बाबासाहेबांच्या नावाचं स्पर्श होताच भारतरत्न पुरस्कार पावन झाला. बाबासाहेबांच्या नामोस्पर्शाने भारतरत्न धन्य झाला. भारत भूमीवर आज पहिल्यांदा अशी घटना घडली होती की एक सर्वोच्च पुरस्काराला त्याच्या तोलामोलाच्या रत्नानी जडल्या गेलं, अन ते रत्न म्हणजे बाबासाहेब होय.  बाबासाहेबरुपी रत्न जेंव्हा या पुरस्काराला जोडल्या गेलं तेंव्हा हा पुरस्कार आजून  उठून दिसू लागला, न भूतो न भविष्य असा हा सोहळा त्या पुरस्काराचं महत्व वाढवून गेला. आज पर्यंत अनेक दिग्गजाना(?) हा पुरस्कार बहाल करण्यात आला होता पण पुरस्काराला हव तितकं वजन निर्माण झालं नव्हतं. पण बाबासाहेबांच्या नामोर्स्पर्शाने या पुरस्काराचं वजन वाढलं. याची दुसरी बाजू अशी आहे की बाबासाहेबांच्या  अनूयायानी भारत रत्न  या पुरस्काराला सदैव योग्य तो मान सन्मान दिला. भारताच्या काना कोप-यात बाबासाहेबांच्या नावा आधि भारतरत्न अशी उपमा लावणे सुरु झाले. आजवर कित्येकाना हा सन्मान मिळाला होता पण ही पहिलीच वेळ होती की जिथे या पुरस्काराचा योग्य सन्मान होऊ लागला.  आजवर आपण हे बघत आलो की एखाद्या व्यक्तीचा  पुरस्कारामूळे सन्मान वाढतो पण भारतरत्न पुरस्कार मात्र बाबासाहेबांमूळे सन्मानित झाला, या पुरस्काराला एक वेगळं स्थान मिळालं. बाबासाहेब असे एकमेव रत्न आहेत ज्यांच्या सोबत भारतरत्न हा शब्द उच्चारला जातो. बाबासाहेब भारतरत्न म्हणून डिजर्व करतात हे ही तेवढच खरं आहे. बाबासाहेबा नंतरही कित्येकाना भारतरत्न पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आलं पण त्यातला कोणीच भारत रत्न म्हणून आपली ओळख तयार करु शकला नाही. आज पर्यंतच्या सर्व भारतरत्नांमध्ये बाबासाहेब हे एकमेव असे रत्न आहेत ज्याना उभं जग भारतरत्न म्हणून ओळखतं. ईतर सर्व भारत रत्न कागदोपत्रीचे रत्न आहेत. जनमानसानी स्विकारलेला भारत रत्न म्हणजे फक्त आणि फक्त बाबासाहेब होय. म्हणून म्हणतो या पुरस्कारा मुळे बाबासाहेबांचा मान तर वाढलाच पण बाबासाहेबांची थोरवी ईतकी की या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार बाबासाहेबांमूळे धन्य झाला. आज पर्यंत कित्येक भारत रत्न आले अन कित्येक येतीलही पण ते सर्व कागदोपत्रीचे भारत रत्न असतील. फक्त एक आणि एकच व्यक्ती सदैव भारत रत्न म्हणून ओळखल्या जाईल ती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
जयभीम

1 टिप्पणी:

 1. रामटेकेसाहेब पद्म अवार्ड मध्ये पद्मश्री पद्मभूषण पद्माविभूषण आणि यातील सर्वोच्च अवार्ड म्हणून भारतरत्न दिले जाते भारताच्या घटनेनुसार यातील कोणत्याही अवार्ड मिळविण्यारया माणसाला हि पदवी स्वतःला नावाच्या पाठीमागे किंवा नावापुढे लावता येत नाही हि पदवी ज्यांना मिळते त्यांना कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही फक्त भारत रत्न मिळविण्याऱ्या लोकांना प्रोटोकॉल मध्ये सातवा नंबर दिला जातो राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यांचे राज्यपाल निवृत्त राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि त्यानंतर सातवा नंबर भारतरत्न अवार्ड दिलेल्यांचा लागतो
  पु ल देशपांडे यांना १९६६ साली पद्मश्री व १९९० साली पद्मभूषण अवार्ड मिळाली पण त्यांचा उल्लेख करताना कोणीही
  पद्मभूषण असा करत नाही वसंतदादा पाटील यांना १९६५ साली पद्मभूषण अवार्ड मिळाले पण त्यांचा उलॆख करताना कोणीही
  पद्मभूषण असा करत नाही याला अपवाद फक्त दोनच ते म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील यांनी पद्मश्री असे संबोधतात आणि बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न म्हणून या दोनी बाबी चुकीच्या आहेत बाबासाहेबांना विश्वरत्न म्हणून संबोधावे ते या पात्रतेचे आहेत
  आणि राहता राहिला हे अवार्ड उशिरा मिळाले आणि बऱ्याच जणांना हे लवकर मिळाले याबद्दल लोक टीका करतात वास्तविक साधा पुतळा उभा करायचा असेल तरी तो त्या माणसाच्या मृत्युनंतर ५० वर्षांनी उभा करावा आणि अशा पदव्या द्यावयाच्या असतील तर मृत्युनतर १०० वर्षांनी दिल्या जाव्यात असे राम मनोहर लोहिया यांनी सांगितले होते अगदी बरोबर आहे आज भगवान दास बिधानचंद्र राय पुरुशोतामदास टंडन हि नवे कोणाला माहित आहेत पण हे सर्व भारतरत्न आहेत एम जी रामचंद्रन व के कामराज या दोघांना भारतरत्न केवळ राजकीय कारणासाठी दिले गेले असावे असा संशय येत आहे from Vidyadhar Joshi mobile no 9423809761

  प्रत्युत्तर द्याहटवा