रविवार, २५ सप्टेंबर, २०११

बामसेफकडे आदर्श विचार नाहीत तर सत्तेचा व्यवहार आहे

आपण आता बघू की बामसेफचे आदर्श कोण, व काय आहे. बामसेफच्या वेबसाईटवर बघा तिथे बुद्धाची प्रतिमा नाही.  सम्राट अशोकांचीही नाही. बाबासाहेबांची चळवळ अन बुद्ध नाही तर मग ती चळवळ खरच आंबेड्करी चळवळ असू शकते का? असा हा साधा प्रश्न आहे. जिथे बुद्ध नाही ती आंबेडकरी चळवल असूच शकत नाही. या मोजपट्टीने बामसेफ आंबेडकर चळवळ नाही हे सिद्ध होते. पण या पुढे जाऊन बामसेफच्या आदर्शांचा नीट विचार केल्यास असे दिसून येईल की ही आंबेड्करी चळवळ तर नाहीच पण आंबेड्कर द्वेषी चळवळ मात्र नक्कीच आहे. बाबासाहेबानी बुद्ध, कबीर व फुले याना आपले गुरु मानले. समता, शील, श्वाभिमान अन विद्या ही सामाजीक मुल्ये  स्विकारली. आयूष्यभर या मानवी मुल्यांसाठी ते झगडत राहीले. याच्या अगदी उलट बामसेफनी समता नाकरली व जातींचा टिकाव कसा दिर्घकाळ टिकवून ठेवता येईल यावर भर दिला. मग जाती टिकवायची म्हटल्यास समतेचा विचार मांडुन चालणार नाही. जाती निर्मूलनाचा विचार मांडुन चालणार नाही. मग काय चालणार होतं, तर आहे त्या जाती तश्याच ठेवून जातींसकट संघटन चालवायचे होते. याचाच अर्थ बाबासाहेबानी ज्या जातिंच्या निर्मूलनासाठी उभं आयूष्य पेटवलं त्या जाती तश्याचा ठेवण्याचा हा आग्रह म्हणजे बाबासाहेबांच्या सिध्दांताला छेद देणे होय. भगवान बुद्ध सोडून ईतर सर्व दुनियाभरच्या संतांचे, बाबाबुवांचे फोटो स्वत:च्या वेबसाईटवर लावताना या बामसेफनी किमान एवढाही विचार केला नाही की यातील एकाही संताला, बाबाबूवाला बाबासाहेबानी भीक घातली नाही मग आंबेडकर चळवळीत या सा-यांचे फोटो अन विचार आदर्श म्हणून सामावून घेणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचार प्रणालीशी केलेली ही गद्दारी आहे. बाबासाहेबानी नाकारलेले सर्व बुबा-बाबांना स्विकारणे म्हणजे आंबेडकरी विचारांशी केलाला बंड होय. मग हा बंड कोणाला पोषक ठरत आहे तर जाती टिकविण्यासाठी जे आग्रही आहेत त्याना. मग ते कोण? तर उघड आहे, संघ (RSS) आज बसपा उघडपने भाजपाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. उदया बामसेफनी संघाच्या खांद्याला खांदा लावून उभे झाल्यास नवल वाटुन घेऊ नका. हे होणार अन निश्चित होणार.  बामसेफच्या आदर्शांची एक लांबलचक यादी आहे. एखाद्या बामसेफीला गाठून ती यादी वाचायला लावल्यास तोही चक्रावून पडेल कारण एवढी मोठी आदर्शांची यादी बाळगणारा बामसेफ ही एकमेव संघटना आहे. शिवाज महाराज , तुकाराम ते कुठल्यातरी लिंगायत संतापर्यंची ती यादी आहे. या सर्वानी कोणता विचार दिला याची तपासणी केल्यास असे दिसून येईल की बाबसेफ ज्याना आदर्श म्हणून पुढे केले ते सर्व देवा धर्माच्या पायात लोळणारे होते. होम हवनात धन्यता मानणारे होते. देव देवीच्या चमत्कारापुढे मान तुकविणारे होते. अन वेदिक धर्माचे प्रचारक व प्रसारक होते. अगदी शिवाजी महाराजाणच  उदाहरण घ्यावयाचे म्ह्टल्यास महाराज  देवभक्त होते हे जगजाहीर आहे. अष्टप्रधान मंडळात आठ पैकी ७ ब्राह्मणाची नेमणूक करणारे ब्राह्मण प्रतिपालक होते. क्षत्रियाचा शिक्कामोर्तब करवून घेण्यासाठी चक्क खोटी यादी पेश करणारे यांचे आदर्श आहेत. संत तुकारामांबद्दल बोलायचे झाल्यास जो माणूस आयुष्यभर विठठलाच्या चरणी नतमस्तक होता असा वेदिक, वैष्णव संत बामसेफचा आदर्श आहे. अशा प्रकारे लिंगायतांमधील लिंग पूजा करणारे संत बामसेफचे आदर्श आहेत. हा सगळा पसारा जो बाबासाहेबानी थेट नाकारला तो बामसेफ गोळा करुन परत एकदा लोकांमधे रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे.  
बामसेफचं प्रत्येक गणित हे संख्याबळाचं गणित आहे. लोकांच्या आदर्शांशी त्याना काही देण घेणं नाहिये. ज्या जाती जश्या आहेत तश्याच ठेवून तो संख्याबळ स्वत:कडे वळवायचा आहे. राजकीय सत्ता हस्तगत करायची आहे. सत्ता मिळविण्याचं समर्थन करताना बामसेफवाले नेहमी एक उदाहरण देतात की बाबासाहेबानी म्हटले आहे शासनकर्ती/राज्यकर्ती जमात बना. अरे हो, पण सत्ता मिळविण्याचा मार्ग कसा असावा हे नाही का सांगितलं बाबासाहेबानी. निश्चितच सांगितलं आहे. बाबासाहेबानी नैतिकतेच्या परिघात राहून जे जे मिळविता येईल ते मिळवावे असे स्पष्ट सांगितले आहे. सामाजिक मुल्ये धाबावर बसवून लोकांची फवणूक करुन समतेच्या आदर्शांचा खेळखंडोबा करुन मिलविलेली सत्ता बाबासाहेबाना तरी अपेक्शित होती का? अजिबात नाही. उलटपक्षी अशा मार्गाने मिळविलेल्या सत्तेला आंबेडकरी मुल्यांकनातुन तपासल्यास मिळविलेली सत्ता आंबेडकर द्रोह ठरेल. आंबेडकरी नितीमुल्ये सत्ता मिळविन्याच्या विरोधात नाहीत पण ती मिळविण्याचा मार्ग हा नैतीक असावा. पण बामसेफचा व नैतिकतेचा दूर दूरचा संबंध नाही. त्यामूले बामसेफकडुन नैतिक मार्गाची अपेक्षा केल्यास उपेक्शा ठरलेली आहे. ज्यांची आदर्शेच चूकीची आहेत किंवा ज्याना आदर्श म्हणून पुढे केले जाते त्यातील सोयीच्या गोष्टी उचलल्या गेल्यात अन अशा प्रकारे आदर्शांची एक लांब लचक यादी तयार करुन जी संगठना चालविली जात आहे अशा संघटनेकडुन नैतिकतेची अपेक्शा करनेच मुळात चूकिचे आहे. बामसेफचे प्रत्येक पाऊल हे आदर्शांच्या ऐवजी सत्ताव्यवहाराच्या गणितानूसार पडत असते. म्हणून बामसेफ ही आदर्शांवर चालणारी संघटना नसून सत्तेचा व्यवहार आहे.

७ टिप्पण्या:

 1. jar BJP ani BSP ek aahe mhanje khandyala khanda lavun kam karat ahe.ase astana BJP+BSP sarkar fakt 6 mahine ka rahili.jar BSP bramhanwadi ahe tar tyanni Babasahebanche ani other bahujan leader che smarak ka banwale.district che nav tyanusar ka change kele.tyanni mandir ka nahi bandhalit.

  उत्तर द्याहटवा
 2. jar BJP ani BSP ek aahe mhanje khandyala khanda lavun kam karat ahe.ase astana BJP+BSP sarkar fakt 6 mahine ka rahili.jar BSP bramhanwadi ahe tar tyanni Babasahebanche ani other bahujan leader che smarak ka banwale.district che nav tyanusar ka change kele.tyanni mandir ka nahi bandhalit.

  उत्तर द्याहटवा
 3. kanshira yanni banvalel bamsef sanghatan kahi lokanni todl as khudd kanshiraji sangayche he khar vatat nahi....bsp pasun bamsef dur theun bahujananna ambedkarwad patvun sangayacha ani parti majbut karayachi ha tyancha manas asava...pan RSS shi samband astil as vatat nahi...

  vikas ghugare..mo.7350321072

  उत्तर द्याहटवा
 4. kanshira yanni banvalel bamsef sanghatan kahi lokanni todl as khudd kanshiraji sangayche he khar vatat nahi....bsp pasun bamsef dur theun bahujananna ambedkarwad patvun sangayacha ani parti majbut karayachi ha tyancha manas asava...pan RSS shi samband astil as vatat nahi...

  vikas ghugare..mo.7350321072

  उत्तर द्याहटवा
 5. bahutek tumhi congress ani ra congrss che karyakarte aahat mag tumhala bsp ani bamsef patelch kas..babasaheb mhanale congress he jalat ghar aahe mag tumhi congress madhe kase..ans pls

  उत्तर द्याहटवा