शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

शुभेच्छांच्या बदल्यात शुभेच्छा देता येणार नाही, कारण...


आमची सणं मानवी मुल्य जपणारी आहेत, त्यामूळे ही सर्व सणं शुभेच्छा डिजर्व करतात. पण हिंदू सणं ही मानवी मुल्यांचं अधिपतन करणारी आहेत, म्हणून या सणांच्या निमित्ताने शुभेच्छा देता येणार नाही. 

बौध बांधवाना आवाहन
आज जिकडे तिकडे सणांचा धूमधडाका चालू आहे. अनेक हिंदु बांधवांशी आमचे सौख्याचे संबंधही आहेत. आज शहरी पातळीवर जाती पातींचं ब-यापैकी निर्मूलनही झालेलं आहे. याही पलिकडे जाऊन आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात आंतरजातिय विवाह होत आहेत व दोन संस्कृतीची सरमिसळ होत आहे. बाबासाहेबानी अनेक वेळा आंतरजातीय विवाहाचा आग्रह धरला होता जे आज होताना दिसत आहे ही खरच आनंदाची बाब आहे. एकंदरीत किमान शहरी पातळीवर तरी दोन भिन्न समाजात सलोख्याची नाती तयार होताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून सणावाराना एक मेकाना शुभेच्छा देण्यातही येत आहेत. हा शुभेच्छा देण्याचा प्रकार नुसतं वयक्तीक पातळीवर न राहता अगदी गल्लो गल्ली मोठाले होर्डिंग्स, बॅनर लावून देण्यापर्यंत पोहचला आहे. शुभेच्छा देताना सामाजीक नाती घट्ट व्हावी अशी एक प्रांजळ अपेक्षा. याच बरोबर  सलोख्याच्या नवीन वाटा तयार व्हाव्यात, शेजार पाजराच्या मानसांत वावरताना मानवी मुल्यांचं दर्शन व्हावं, दोन भिन्न समाजातील तेढ कमी होऊन नवे आदर्श निर्माण व्हावे ही त्या मागची भूमिक असते. पण या पवित्र्यामूळे एक  महत्वाची गडबड होत आहे. मानवी मुल्ये वृद्दिंगत करणे हा जरी शुभेच्छांचा उद्देश असला तरी एक महत्वाची चूक आपल्या हातून घडून जाते. या शूभेच्छा देताना अजानतेपणाने आपण आपल्या विरोधी मुल्याना मानाचा मूजरा करुन जातो. खरंतर वर वर पाहता तसं काही असेल हे लक्षात येत नाही पण वास्तविकता अशी आहे की जेंव्हा जेंव्हा आम्ही एखाद्या हिंदू बांधवाला त्यांच्या हिंदू सणाच्या शुभेच्छा देतो तेंव्हा तेंव्हा अप्रत्यक्षपणे आपण आपल्या मानवी मुल्याच्या विचारधारेला विरोध करणा-या संस्कृतीला प्रोत्साहीत करीत असतो.
आम्ही हिंदुना शुभेच्छा का देतो?
हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की आम्ही हिंदूना शुभेच्छा का देतो? याचं साधं उत्तर आहे की ते आम्हाला भीम जयंतीच्या शुभेच्छा देतात, ते आम्हाला बौद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतात ते आम्हाला ईतर बौद्ध सणांच्या वेळी सदभावना व्यक्त करतात. म्हणजे आज जातपात सोडून ते मैत्रीसाठी तयार आहेत. जागो जागी त्याची प्रचितीही येत आहेत त्यामूळे आम्ही सुद्धा त्याना दसरा, दिवाळी होळी किंवा गणपतीच्या शुभेच्छा देतो. असं साधं उत्तर आहे. अन आज सलोखा कुणाला नको आहे?. आम्हा सर्वाना सामाजीक सलोखा हवाच आहे. म्हणून वरील युक्तिवाद सुसंगत आहे. ज्या समाजात आम्ही राहतो आहे त्यांच्याशी आमचे संबंध चांगले असने अत्यंत गरजेचे आहेत व त्या मूळे आम्ही परस्परांच्या सणावारांना शुभेच्छा देणे अपरिहार्य आहे, ती सामाजीक गरज आहे किंबहून ते नैतिक कर्तव्य आहे. अशा प्रकारे दोन समाजातील दरी कमी करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. नुसतं एकमेकांच्या खोड्या काढत राहण्यापेक्शा सलोख्यानी, सौख्यानी राहता येतील का यावर विचार होणे गरजेचे आहे. त्यातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे परस्पराना त्यांच्या सणावरांच्या निमित्ताने शुभेच्छा देणे होय.
बाबासाहेब व बुद्ध जयंतीला हिंदूच्या शुभेच्छा
बाबासाहेबांच्या जयंतीला व बुद्ध जयंतीला वयक्तीक पातळीवर लोकं आम्हाला शुभेच्छा देऊ लागली आहेत. धम्म चक्रप्रवर्तन दिना निमित्यही आम्हाला बौद्धेत्तरांकडुन शुभेच्छा मिळतात. या सर्व सणांमधेय जेंव्हा हिंदू आम्हाला शुभेच्छा देतात तेंव्हा सहाजिकच आमचं मन भरून येतं. आतातरी या लोकांशी वादावादी नको, आता ते आम्हाला या नव्या रुपात स्विकारत आहेत, त्यामूळे आता हा सलोखा टिकावा यासाठी माझ्याकडुनही प्रतिक्रियात्मक वागणूक व्यक्त व्हावी अशी भावना तयार होते. अन हिंदूंना त्यांच्या सणावाराला मी ही शुभेच्छा देऊन या सौख्याच्या गाठी अधिक घट्ट कराव्या अशी भावना उसडी मारुन जाते. आपण भाऊक होऊन असा निर्णय घेऊन टाकतो. अगदी याच धर्तीवर राजकीय पक्ष देखील आम्हाला ईमोशनल पातळीवर भावूक करुन जातात. जयंतीला जागो जागो शुभेच्छांचे बॅनर झडकतात. सर्व राजकीय व सामाजीक पक्ष मोठ्या मनाने जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी पुढे सरसावतात. एकंदरी आमच्या आनंदाला वृद्दिंगत करण्यास ते हातभार लावतात. याचा परिणाम असा होतो की आमच्या मनात या सर्व लोकांच्या बद्दल थोडीफार का होईना सदभावना जागी होते. मनातील कुठलातरी कप्पा त्यांच्यासाठी आम्ही उघडतो अन आजच, ईथेच निर्णय घेऊन मोकळे होतो की या पुढच्या सर्व हिंदू सणाना आपणही शुभेच्छा दयायच्या. अन गणपती, दसरा दिवाळीच्या शुभेच्छा देणारे निळे बॅनर झडकतात. खरं पाहता वरील हिंदूच्या सदभानापूर्ण वागणूकीवर  प्रतिक्रियात्मग वागणी या पेक्षा वेगळी असूच नये. आम्ही सुद्धा हिंदूना त्यांच्या सणांवारांच्या निमित्ताने शुभेच्छा दयावा हाच एकमेव व सर्वोत्तम पर्याय होय. अन आपली लोकं तसं करतात ते अगदी तार्किक आहे. पण हे असे करणे जरी तर्क सुसंगत असले तरी अजाणतेपणाने घडणारी ही एक घोडचूक आहे.
बौद्ध सण व हिंदू सण ही दोन टोकं आहेत.
बौद्ध सण ही मानवी मुल्य रुजविणारी सणं आहेत. याच्या अगदी उलट हिंदू सणाचा इतिहास, तत्वज्ञान व उद्देश हा मानवी मुल्याचं अध:पतन करणारं आहे. त्यांचं तत्वज्ञान हे असमतेचा पुरस्कार करणारं आहे. या सणांचा इतिहास हा बजूनांच्या रक्ताचे पाट वाहविणारं आहे. या सर्व सणांची स्फूर्ती, मध्यवर्ती भूमिका प्रेरणास्त्रॊत हे बहुजनांचं श्रेष्ठत्व नकारणारं आहे. त्यामूळे सदभावना म्हणूनही या सणांच्या निमित्ताने आम्ही हिंदूना शुभेच्छा देऊ नये. ज्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्व बहुजन समाज जलोषात बुडून जातो तो गणेश उत्सव टिळकानी शिवजयंतीला पर्याय म्हणून उभं केलं. मा. फुलेनी शिवाजी  महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उस्तव सुरु केला. महाराष्ट्राच्या काना कोप-यातून जनसामान्यातुन या उत्सवाला मिळालेला प्रतिसाद डोळे दीपवून टाकणारा होता. आज पर्यंतच्या सर्व स्थरातून साज-या केल्या जाणा-या अनेक कार्यक्रमाना मिळालेलं हे सडेतोड उत्तर होतं. बहुजनाना सत्याकडे नेणारी ही भावी चळवळ होती हे टिळकानी ओळखले व शिवजयंतीला पायाबंद घालण्यासाठी गणेश उत्सव सुरु केला. मग ज्या उत्सवानी बहुजनांच्या अत्यंत महत्वाच्या लोकोत्सवाला पायाबंद केला, तिलांजली दिली अशा गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देणे खरच योग्य असेल का? अजिबात नाही.
दसरा: दसरा हा हिंदूचा गणेश उत्सवा नंतरचा दुसरा महत्वाचा सण. या सणात लोकं एकमेकाना सोन (झाडाचं पान) शुभेच्छा देतात. असं म्हणतात की आजचा दिवस हा शत्रूत्व मिटवून मैत्री करण्याचा दिवस होय. आज पासून मागचे सर्व हेवे दावे, राग द्वेष टाकून देऊन मैत्रीने वागण्याचा संकल्प सोडण्याचा हा दिवस होय. पण ही वस्तूस्थीती नाही, आपली दिशाभूल करण्यासाठी हा खोटा सिद्धांत मांडण्यात आला. दसरा या सणाची दुसरी बाजू अशी आहे की शंबूकाचं मुंडकं उडविणारा राम, सिताहरणाचं आरोप ठेवून बिभीषणाच्या संगनमताने कपटकौशल्याने बहूजन नायक बोधिसत्व रावणाचा खूण करतो. या आधी रामाची लढाई वालीशी होते. वाली हा युद्धकौशल्यनिपून योद्धा होता. अत्यंत शूर, पराक्रमी अशा वालीशी रामाची लढायी सुरु होते, हे युद्ध कित्येक दिवस चालते. दिवसागणीक रामाचा पराजय पक्का होत जातो. हा हा म्हणतत युद्धभूमीवर वालीचा दरारा ईतका वाढतो की कित्येक वेळा राम युद्धभूमीवरुन पळून जातो. मग शेवटी वालीचा भाऊ सुग्रीव याला हाताशी धरून राज्याचा लोभ दाखवून राम वालीचा खूण करतो. हा आहे रामाच्या भ्य़ाड व कपटनितीचा पुरावा. या पुराव्या वरून हे सिद्ध होते की राम हा महान योद्धातर नव्हताच पण तो कपटाने व पाठीमागून बायकी हल्ले करणार धोकेबाज होता.  याच धर्तीवर राम रावणाचाही खून करतो. रामायणातील हे सर्व संदर्भ पाहता राम हा कधीच रावणाच्या तोलामोलाचा नव्हता हे जाहीर आहे. रावणाचा पराक्रम जगजाहीर होता. रामाचा टिकाव लागणे अशक्यप्राय होते. रावणाचं काहीच वाकडं करु शकत नाही याची जागोजागी प्रचिती आल्यामूळे रामानी रावणाच्या बहिणीची विटंबना केली. तरी सुद्धा रावणानी रागाच्या भारात सिता हरण केलं असलं तरी तीची विटंबना न करत तीला सन्मानानी ठेवलं. रावणाचा हा सभ्यपण रामात मात्र दिसत नाही. कपटी रामानी बिभीषणाला राज्याचा मोह दाखवून रावणाचा काटा काढला. अशा प्रकारे रावण नावाच्या बहूजन नायकाचा अतं करण्यात आला. रावण कोण व कसा होता? तर प्रत्यक्ष बुद्धाच्या हस्ते दिक्शा घेणारा बोधिसत्व रावण होता. लंकावतार सुत्त नावाचं बौद्ध धर्मातील अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ हेच सांगतं की रावण हा प्रत्यक्श बुद्धाच्या हातून दिक्शा घेणारा बोधिसत्व होता. अशा शूर रावणाच्या खूनाच्या दिवशी रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा सुरु करण्यात आली. एक बहुजन नायकाचं विकृतीकरण करणारी प्रथा राबविण्यात आली.  रावण दहन हा दस-यातील सर्वात विधी आहे. म्हणजेच दसरा हा सण बहुजन नायकांच्या रक्तानी रंगलेला आहे. मग अशा सणाच्या शुभेच्छा देणे म्हणजे नेमकं काय करतो आपण? तर आपण बहुजन नायकाच्या खूनाचं समर्थन करतो. रावण नावाच्या बहुजन नायकाच्या वधाच्या निमित्ताने उत्सव करणे खरच समर्थनीय असेल का? अजिबात नाही. आमच्या माणसाची फसवणूक करुन रामानी त्याचा धोक्यानी खून केला या कारणास्तव खरं तर राम दहन व्हायला पाहिजे. पण आम्ही मोठ्या मनानी सलोख्याची नितांत गरज लक्षात ठेवून ते करत नाही. पण याचा अर्थ असं नाही की सलोखा पाहिजे म्हणून बहुजन नायकाच्या खूनाचा उत्सव साजरा करावा. दसरा हा सण म्हणून मानवी मुल्याचं अधिपतन करणारी आठवण होय. त्या मूळे नैतीकतेच्या कसोट्या लावल्यास दसरा या सणाला शुभेच्छा देणे मुळातच अनैतीक ठरेल.
दिवाळी:
अगदी याच धर्तीवर दिवाळीचीही कथा आहे. दिवाळीला लक्ष्मीपूजन केल्या जातं. ही लक्ष्मी धन संपत्ती देते अशी धारणा आहे. आम्हा सर्वाना हे माहीत आहे की जिथे लक्ष्मीची पूजा होत नाही अशा सर्व देशात(अमेरीका, इंग्लड, जपान ते अरब) धनाचा वर्षाव होतो, याचा अर्थ धनसंपत्ती प्राप्तीशी लक्ष्मीचा काहिही संबंध नाही. पण दृष्टांतापुर्ती हे सत्य मानले तरी लक्ष्मी नावाची देवी आरोपीच्या पिंज-यात उभी होते. कारण आजवर या देवीने आम्हा बहुजनाना, अस्पृश्याना सदैव दारिद्र्यात खितपत ठेवले. याचाच अर्थ जर लक्ष्मी आहे म्हणून तीचे अस्तित्व स्विकारले तर ती जातीयवादी ठरते. पक्षपाती ठरते. मग अशा पक्षपाती बायीच्या नावानी सण साजरा करताना दिलेली शुभेच्छा म्हणजे शंकराचार्याला बहुजन प्रतिपालक म्हणून डोक्यावर घेतल्या सारखं नाही का होणार. याच दिवाळीच्या वेळेस बलीप्रतिपदा नावाचाही सण साजरा केल्या जातो. बळी राजाला वामन नावाच्या ब्राह्मणानी(?) धोक्यानी डोक्यात वार करुन मारले. बळी हा जनतेच्या हितासाठी काम करणार जनसामान्यांची काळजी घेणारा राजा होता. अशा बहुजन प्रतिपालक राजाच्या खूनाच्या प्रित्यार्थ साजरी होणारी दिवाळी व बलिप्रतिपदा साजरी करणे, त्याच्या शुभेच्छा देणे हे अजिबात न पटणारं आहे. आम्हाला आजच्या लोकांशी या मुद्यांवरुन भांडनं उकरून काढायची नाहीत. पण किमान बहुजनांच्या रक्तानी लिहल्या गेलेल्या या अमानवी दिनांच्या शुभेच्छातर नक्कीच देता येणार नाही.  आम्हाला सामाजीक सलोखा हवा आहे पण त्याच बरोबर बहुजनांचा मान सन्मानही हवा आहे. अपमान नाही.
होळी:
होळी हा सण भारताच्या कानाकोप-यात साजरा करण्यात येतो. या सणात देशातील सर्व स्थारातून लोकं भाग घेतात. त्यातल्या त्यात रंगपंचमी/धूलिवंदनातर तरुणाना अधिकच आकिर्षित करते. एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता आजच्या तरुणाना अत्यंत आकिष्रित करणारं सण म्हणजे होळी/रंगपंचही होय. ’बुरा न मानो होली है’ म्हणत नसले चाळे केले जातात. या सर्व गोष्टीना जर सोडलं तरी या होळी सणाचा मुख्य  गाभा म्हणजे होळी दहन होय. होळी दहनाशिवाय धूलिवंदन होऊच शकत नाही. मग या होळी दहनाची कथा काय आहे. ही सुद्धा बहुजन नायकांच्या अत्याचाराची कथा आहे. भक्त प्रल्हाद नावाचा एक पातळयंत्री मुलगा असतो. वेदिक लोकांच्या नादि लागून वाईट मार्गानी जातो. दारु पिणे, मित्रांसाबत बसून लोकांची खोड काढणे, चाळे करणे हे त्या भक्त प्रल्हादाचे उद्योग. या प्रल्हादाची आत्या होळीका हिचं लग्न ठरतं. होळीकाच्या लग्नाच्या आधल्या दिवशी प्रल्हाद व त्याच्या मित्रानी होळीकाचा बलात्कार केला. त्या नंतर तीला जाळून मारलं. हा सर्व प्रकार काय होता? तर हिरण्यकश्यपाचा विरोध करण्यासाठी त्याच्या बहिणीची प्रल्हादाने केलेली हत्या होय. थोडक्यात ईथेही तेच. हिरण्य कस्यप नावाचा बहूजन राजा ब्राह्मणाना भीक घालत नाही, व थेत त्याच्यावर हल्ला करता येत नाही म्हणून त्याची प्राणप्रिय बहिण होळीका हिला गाठून तीचा बलात्कार करुन जिवंत पेटवून देण्यात आले. अन तेंव्हा पासून वेदीक लोकानी हिरण्य कश्यपाच्या विरोधातील लढाईतील हा पहिला विजय म्हणून त्याच्या बहिणीच्या खूनाचा दिवस सण म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरु करण्यात आली. तर असा आहे या हिंदूंच्या सर्व सणांचा इतिहास.

तरी आम्हाला सामाजीक सलोखा हवा, पण तो असा नको.
वरील सर्व घटनांतून काय सिद्ध होते? तर प्रत्येक हिंदू सण हा बहुजनांच्या रक्तानी माखलेला आहे. प्रत्येक हिंदू सणाची निर्मिती ही बहुजन नायकांच्या अध:पतनातून सुरु करण्यात आली आहे. हा खरंतर आमचा अपमान आहे पण आम्ही माणसं भूतकाळात जगणारी नाही.  हा भूतकाळातील इतिहास विसरुन हिंदूशी सलोख्याने वागणे आज गरजेचे आहे. ही आजच्या समाजाची गरजही आहे. आज ब्राह्मणेत्तर हिंदू बदलताना दिसतो आहे त्यामूळे वाद वाढविण्यात आम्हालाही स्वारस्य नाही. सलोखा ही काळाजी गरज आहे. पण या सलोख्याच्या नावाखाली बहुजन नायकांच्या रक्तरंजीत घटनाना सण म्हणून आम्ही कधीच स्विकारणार नाही. किंबहून आमच्या शूर वीराना धोक्याने मारण्यात आलेला कुठलाच दिवस हिंदूनीही सण म्हणून साजरा करु नये. याला हिंदू समाजानी सलोख्याच्या दिशेनी टाकलेलं पाऊल म्हणता येईल. आमच्या सर्व सणाचा गाभा मानवी मुल्य रुजविण्यावर भर देतो. बुद्ध पौर्णिमेतून आम्ही समतेचा विचार मांडणा-या मार्गदात्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो पण दस-याच्या निमित्त्ताने रावणाच्या खूनाला विजय दिन म्हणून साजरा करताना समस्त हिंदू समाज मानवी मुल्य़ांच्या विरुद्ध दिशेनी एक पाऊल टाकते आहे. बौद्ध पौर्निमेतून जाणारा संदेश हा मानवाच्या उद्धाराचा आहे तर दसरा सणातून जाणारा संदेश हा समाजातील दरी रुंदाविणारा आहे.  दिवाळी या सणाची व्यथाही अशीच आहे. दिवाळी सण लक्ष्मीच्या नावानी बहूजनांची चालविलेली लूट होय, अन बळीराजा सारख्या अत्यंत लोकप्रिय राजाचा केलेला खून सणाच्या रुपाने साजरं करणे म्हणजे मनूष्य म्हणून जन्माला येऊन सुद्धा सर्व नैतिक बाबी झटक्णे होय. अत्यंत असंवेदनशील जीवन शैलीचं हे दर्शन होय.  कुणाच्या मृत्यूला सण म्हणून साजरे करणे ही संकल्पनाच मानवाला न शोभणारी आहे. वरुन अशा सणाच्या वेळी, “तुमच्या जयंतीला आम्ही शुभेच्छा देतो, आता दिवाळीला तुम्ही आम्हाला शुभेच्छा दया.” हा पवित्रा घेणे म्हणजे आमच्या बहुजन नायकांच्या खुनाच्या प्रित्यार्थ साजरा केल्या जाणा-या उत्सवात आम्हाला सामिल करुन घेणे होय.  हे कुठल्याही सुज्ञ बहुजनाला न पटणारा प्रकार आहे. अगदी होळीचिही हिच गाथा आहे. ज्या होळीकेला जाळून मारुन टाकण्यात आले, तिच्या मृत्यूच्या निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या या सणाचा आम्ही अंतकरणातून निषेध करतो. व्यक्ती म्हणून तुम्हीही त्याचा निषेधच करायला पाहिजे. पण ते करण्याचं धाडस नसल्यास किमान उत्सव तरी करु नका.
आम्ही ज्या काळात जगतो आहे त्या काळात खरं तर दोन समाजातील दरी दूर करुन नवीन सामाजीक मुल्ये रुजविण्याची अत्यंत गरज आहे. त्यामूळे आम्ही समाजीक सलोख्यासाठी आग्रही आहोत. आज हिंदू धर्मातील सर्व आघाड्यातून काही प्रमाणात का असेना पण त्याला प्रतिसाद मिळतो आहे. आज हिंदू धर्मातील ती लोकं जी २० वर्षापुर्वी रिड्ल्स जाळण्याच्या दृष्कृत्यात सक्रियपणे सहभागी होते आज रिडल्सचं महत्व पटवून देऊ लागली आहे. हा बदल अत्यंत मोलाचा व स्वागतार्ह आहे. त्यामूळे हजारो वर्षापासून रुंदावत गेलेली ही समाजीक दरी आता कमी होण्याची चिन्ह दिसत आहे. हा सर्व बदल जादूच्या कांडीने घडुन आला नसून अनेक संघटनांचा, सामाजीक कार्यकर्त्यांचा व फुले-शाहू-आंबेडकर चाळवळीच्या कष्टाचं परीपाक होय. पण हे सर्व करताना आपण हिंदूना दिवाळी, दसरा व होळीच्या शुभेच्छा अजिबात देऊ नये. कारण ही सगळी सण बहुजन नायकांचा अपमान करणारी आहेत. बहुजनांचा तेजोभंग करणारी आहेत. समतेच्या विचाराच्या विरोधात जाणारी आहे. म्हणून ह्या सर्व सणांपासून आपण तर दूर राहावेच पण शुभेच्छाही देऊ नये.
मग आम्ही हिंदूंचे शूभचिंतक नाही का?
वरील प्रश्न हमखास उठेल. आम्ही कुठे म्हणतो आम्ही हिंदूंचे हितचिंतक नाही. आपण सर्व या मातीतले आहोत. तुम्ही काही कारणास्तव आमच्या महामानवांच्या, बहुजन नायकांच्या रक्तपाताला सण म्हणून साजरा करण्याची प्रथा राबवित आलात हे काहिंच्या वर्चस्ववादि धोरणाचं व तुमच्या अज्ञानाचं परिपाक होय. मागे पुढे तुम्हाला त्याची जाणीव झाल्यावर तुम्हीही या अनिष्ट प्रथा सोडुन दयाल. पण आजचं काय? तर आजचं असं आहे की आम्ही तुम्हाला या सणांच्या व्यतिरीक्त अशा सर्व गोष्टींसाठी शुभेच्छा देतो, जसे की तुमचं समाजीक, आर्थीक व कौटूंबिक जिवन भरभराटी व खौख्याचं जावो. तुम्ही आम्हाला जयंती व पौर्णिमेच्या शुभेच्छा देता अन सामाजीक सलोख्यासाठी एक पाऊल टाकता तेंव्हा आम्ही दोन पाऊल टाकू. तुमच्या आयुष्यात सर्व आघाड्यावर भरभराटी होवो. येणारं प्रत्येक दिवस हे नवीन अनुभवानी व सुखसमाधानानी जावो. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो. मुलाबाळांची प्रगती होवो. अशा सर्व शुभेच्छा आम्ही अगदी मनापासून देतो. पण जयंतीच्या शुभेच्छांच्या बदल्यात दसरा दिवाळीच्या शुभेच्छा मात्र अशक्य आहे. कारण आमची सणं मानवी मुल्ये वृद्दिंगत करणारी आहेत म्हणून ती सर्व सणं शुभेच्छां डिजर्व करतात. पण तूमची सण मानवी मुल्यांचं खच्चिकरण करणारी असल्या कारणास्तव अशा सणाना शुभेच्छा देणे म्हणजे मानवी मुल्यं नाकारणे होय.

जयभीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा