शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

कार्ला लेण्यांवर एकवीरा देवीचे अतिक्रमण

फोटो नं. १


कार्ल्याच्या लेण्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. पण एकवीरा नावाच्या देवीने ईथे घूसखोरी केलेली आहे. आमच्या या बौद्ध लेण्यांच्या मुख्य़ द्वारातच एकवीरा देवीनी आपलं बस्तान बसवलं. कार्ल्याच्या लेण्यातील मुख्य बौद्ध स्तूपाच्या अगदी दारातच उजव्या कोप-यात एकवीरा देवीचं हे मंदीर म्हणजे बौद्ध धर्मीयांचा हिंदूनी केलेला जातीयवादी छळ होय. मंदिर बनवायचंच होतं तर संबंध डोंगर पडलं होतं. किंवा दुसरीकडेही मोकळी जागा होती. पण मंदिर उभं करण्या मागचा हेतू जातीयवादी असल्यामूळे बौद्ध स्तूपाच्या अगदी दारातच हे मंदीर उभं करण्यात आलं. या मंदिरामूळे आत जाण्याचा अर्धा मार्ग हिंदूनी गिळंकृत केला. आपल्याला आत जाण्यासाठी अर्धाच रस्ता सोडण्यात आला.फोटो नं. २
या फोटोट देवीचं मंदिर थोडसं दिसतं. त्या उजव्या कोप-तात निट बघा. अन तिकडे मागे जे दिसत आहे ते बौद्ध स्तूपाच्या मूख्य द्वाराचा भाग आहे. अगदी या मूख्य द्वारातच देवीला बसायची ईच्छा झाली. ती देवी आहे, कुठेही बसू शकते. फोटो नं. ३
या फोटोत मधोमध जे  शेंदूरी रंगाचा मंदिर दिसतेय ते एकवीरा देवीचं मंदिर आहे. आत जाणा-या मूख्य वाटेतील हे मंदिर बौद्ध स्तूपावरील अतिक्रमण होय हे सांगण्याची गरज नाही ईतकी बोलकी परिस्थीत असुनही आम्हाला ब्र शब्द बोलण्याची परवानगी नाही.फोटो नं. ४
हा फोटो बघा. बौद्ध स्तूपात जाणारा हा एकमेव रस्ता. समोर दिसतय ते भव्य बौद्ध स्तूपाचं प्रवेश द्वार. डाव्या बाजूल दिसणारा भव्य स्तंभ हा अशोक स्तंभ होय. चउजव्या हाताला दिसणारा पसारा/बांधकाम हे एकवीरा देवीने स्तूपाच्या प्रवेशद्वारावर केलेलं अतिक्रमण होय. पायत चपला नघालता चालणारी जी लोकं दिसतायत ती सर्व देवभक्त होतं. अगदी प्रवेशद्वारावर होम-हवन घालण्यात आला आहे.  या होम-हवनामूळे बौद्ध बांधवाना स्तूपात जाण्यासाठीचा मार्ग बंद करण्यात आला. जो पर्यंत होम हवन चालू होतं तो पर्यंत बौद्ध स्तूपात जाण्यास बंधी घालण्यात आली. त्या नंतरही कित्येक तास लोकांनी होम हवनातील राख  पवित्र राख म्हणून उचलण्याचा कार्यक्रम चालविला.
फोटो नं. ५
हा त्या प्रवेशद्वारातील डाव्या हातावरील भव्य अशोकस्तंभ होय. चार दिशांवर नजर ठेवणारे हे चार सिंह म्हणजे शत्रूच्या उरात धडकी बसविणारं प्रतीक. पण आज आमची अवस्था ईतकी बिकट व दुर्बल झाली की, सिंहांच्या पायथ्याशीच एकवीरेनी बस्तान मांडलं. वरुन स्तूपात जाण्याचा रस्ता अडविला.फोटो नं. ६
या फोटोत बघा, कसं स्तूपाचं मुख्य़ दरवाजा एकवीरेनी हडपलाय. मुख्य दाराला थेटून बांधलेलं हे एकवीरेचं मंदिर बौद्धाना अव्हान देणारं आहे. या मंदिरात दर्शन घेणारे भक्त नुसतं दर्शन घेत नाहीत. तर प्रचंड प्रमाणात आरडा ओरडा चालू असतो. आत स्तूपात शांत पणे स्तूप दर्शन घेणा-या लोकाना याचा प्रचंड त्रास होतो. एवढयावरच थांबले तर ते हिंदू कसले. मंदिरावर लावलेलं लाऊडस्पिकर बघा. या लाऊड स्पिकर जोर जोरात वाजवून, एकवेरेची गाणी लावून बौद्ध बांधवाना भंडावून सोडविण्याचं काम भक्तगण करत असतात.


 
फोटो नं. ७ 
होम-हवन संपल्यावर सुद्धा स्तूपात जाणारी वाट मोकळी करण्यात आली नाही. उलट भक्तीभावाने होमचे दर्शन घेणारी लोकं अनवाणी पायानी कशी राख उचलण्यात मग्न झालित ते बघा. होम संपल्यावर सुद्धा आम्हाला प्रवेशा साठी आडकाठी आणणारी हि लोकं दांभिक नाहीत काय? तरी सुद्धा आम्ही शांत पणे प्रवेशासाठी संयमाचे धडे गिरवित होतो.

फोटो नं. ८
या फोटोत होम मधली राख उचलणारी बायी बघा. अन अगदी तीच्या मागे जे मंदिराचं दार आहे त्यातून भक्तांची उडालेली झुंबड बघा. बौद्ध स्तूपात जाण्यासाठी मार्ग कशा प्रकारे बंद करण्यात आला होता हे या फोटो अगदी स्पष्टपणे दिसत आहे.फोटो नं. ९
स्तूपाचं मुख्य दार होम टाकून अडविल्यावर मनसोक्तपणे पूजा पाठ करणारे एकवीरा भक्त हे विसरलेत की आपण स्तूपाचं द्वार अडवून बसलो आहोत. याना स्तूपात जाणा-यांची गैरसोय होते यांशी काही देणे घेणे नाही.फोटो नं. १०
या फोटोतील लोकांच्या पायाकडे बघा. सर्व लोकं (एक सोडून) अनवानी पायानी होम दर्शनासाठी जमली आहेत. स्तूपात जाणारा रस्ता रोखून धरण्यात आला आहे. स्तूपात जाणा-याना दम भरण्याचं काम चालू होतं. उलट पक्षि होम जवळून चपला घालून चालू नका म्हणून आंगावर धावणारी लोकही होती. मूळात आमच्या रस्त्याव होम घातलाच कशाला असे विचारल्यावर उलटं आम्हालाच दम भरण्यात आला.

फोटो नं. ११
हा बघा बौद्ध स्तूपाचा भव्य असा मुख्य प्रवेशद्वार. अन त्या प्रवेश द्वारावरील अतिक्रमणरुपी एकवीरा मंदिर.

 

फोटो नं. १२
स्तूपाच्या प्रवेश द्वारातीवरील होम, अन या होमचे दर्शन घेऊन मंदिराच्या आत डोकावणारी हि लोकं. खरंतर फोटोत दिसणारं बौद्ध स्तूपाच्या दिशेनी उघडणारं हे दार बंद होतं. तरी सुद्धा भक्तानी त्या दारात गर्दी केली व स्तूपाचा रस्ता रोखून धरला. स्तूपात जायला पुर्णपणे अडवणूक केली गेली होती.फोटो नं. १३
हा बघा मंदिराचा तो दरवाजा जो बौद्ध स्तूपाकडे उघडतो. या दरवाजातून देवीचे दर्शन घेणा-यांची अधून मधून उडणारी झुंबड बौद्ध स्तूपाच्या वाटेत थेट अडथडा निर्माण तर करतेच पण वरुन त्या वाटेत घातलेल्या होम-हवनानी आज बौद्ध बांधवांची पार वाट लावली.


फोटो नं. १४ लोकांनी स्तूपाच्या दिशेला उघडणा-या दारातून दर्शनासाठी कशी गर्दी केली ते बघा.


फोटो नं. १५
या फोटोत बघा. दोन माणसं होमातील राख उचल आहेत. त्याच बरोबर देवभक्त देवीच्या दारात उभं राहून दर्शन घेत आहेत. पाय-या व होम मधिल अंतर बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे स्तूपाची वाट रोखण्यात आली होती. त्याच बरोबर वाटेत उभी माणसही बघा, ती सर्व देवीचे भक्त आहेत. एकाच्याही पायात चपला दिसत नाहीत.फोटो नं. १६,
पूजेचं ताट घेऊन थाटात मिरवणारे भक्तगण. पण या भक्ताना एवढं सुद्धा भान नाही की ते जिथे वावरत आहेत ती जागा बौद्धांची आहे. व मागे जे दिसत आहे ते पवित्र स्तूप आहे.

फोटो नं. १७,
ईथेतर लिटरली होमच्या दर्शनासाठी लोकांची झूंबड उडाली. स्तूपाचा रस्ता पुर्णपणे रोखण्यात आला. याला काय म्हणावे तेच कळत नाही.  

फोटो नं. १८,
होम-हवनाचं दर्शन घेणारे हे सर्व भाविक बौद्धांचे मारेकरी आहेत असे मी मानतो. बौद्धांच्या पवित्र स्तूपावरील आक्रमणाचा हा नजारा तळपायाची आग मस्तकात नेणारा आहे. मी स्वत: हे सर्व पाहताना अस्वस्थ होऊन गेलो.


फोटो नं. १९
होम संपल्यावर ही स्थीती आहे तेंव्हा होम चालू असताना काय तमाशा चलला असेल जरा विचार करा. हजारो लोकांच्या अलोट गर्दिने या ठिकाणी होम हवनाच्या निमित्ताने स्तूपात जाणारा मार्ग अडवून धरला. या होमला आमदार अनंत तेरे आले होते. त्या सर्वानी मिळून बौद्ध स्तूपाच्या मुख्य दरवाजात जातीयवादी कृत्य रचले. मी अनंत तेरे याना फोन लावून या बद्दल विचारना केली. ते म्हणाले तुम्हाला हवं ते करा आम्ही तिथेच होम लावणार. हवं तर तुम्ही बौद्ध स्तूपात येऊ नका. एवढी मूजोरी करणारे जातीयवादी लोकं बौद्धांच्या संस्कृतीला एक दिवस मिटवूनच दम घेणार. यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.फोटो नं. २०
पुजेचं ताट धरुन फिरणारा हा पांढ-या शर्टातील माणूस बघा. अन त्याच्या शेजार पाजारची सर्व माणसं देवीची भक्त आहेत. ते सर्व अनवानी पायानी होमचे दर्शन घेत आहेत. या सगळ्यानी स्तूपाची वाट कशी रोखून धरली ते बघा.
फोटो नं. २१
हा दूरुन घेतलेला फोटो बघा. यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की कशा प्रकारे भव्य अशा बौद्ध स्तूपाच्या मुख्य दरवाज्यात देवीचं मंदिर बांधून बौद्धांच्या पवित्र स्थानांवर आक्रमण करण्यात आलं. डाव्या बाजूला दिसणारं बौद्ध स्तूपाचं भव्य प्रवेश द्वार बघा अन त्याच्या शेजारीचा जातीयवादी मंदिर बघा.  राम मंदिराचं निमित्य करुन मुस्लिमांवर अतिक्रमणाचा अरोप करणार हिंदू व त्याच्या मदतीला धावणारा मिडीया हे दोघं मिळून अयोध्या प्रकरणावरुन देश पेटवून देतात. पण याच्या अगदी उलट हिंदूनी  ईथे बौधांच्या स्तूपांवर केलेल्या अतिक्रमणा बद्दल मात्र हाच मिडीया मूग गिळून बसतो. किंबहून बौद्धाना दामदाटी करुन पिटाळून लावण्यात येते. काल अशोक विजयादशमीच्या शूभदिनी धम्मकच्रपर्वतनाच्या निमित्तानी मी सहकुटुंब या ठिकाणी गेलो. तेंव्हा हा प्रकार बघून थक्क झालो. मी विरोध केला, पण मला दम भरण्यात आलं. मी थेट आमदाराना फोन लावून विचारणा केल्यावर त्यानी सुध्दा मलाच दम भरला. उपस्थीत पोलिसांना भेटुन या बद्दल विचारल्यावर त्यानी हात झटकले. अशा वेळी आम्ही काय करावं? कुणाकडे जावं? मुस्लिमांच्या नावानी धर्मिक अतिक्रमणाचे खडे फोडनारे बौद्ध स्तूपावर अतिक्रमण करतात तेंव्हा कायदाही मदतीला येत नाही. आपण सर्वानी एकवटून या देवीला कार्ल्यातून पिटाळून लावता येईल का यावर विचार करु या. डॉ. परम आनंदनी ही मोहिम आधिच हाती घेतली आहे. आता गरज आहे ती आपण सर्वानी त्यांच्या या लेनी बचाव चळवळीला हातभार लावण्याची.हा बौद्ध स्तूपाचा आत मधला फोटो

हा स्तूपाचा मुख्य भागतर असा आहे आतमधे आपला बौद्ध स्तूप.

११ टिप्पण्या:

 1. तुमच्या आडनावात राम आहे तर असे म्हणावे कि तुम्ही रामावर घुसखोरी केली ??? नाही ना ?

  महादेव , बुद्ध , महावीर , अल्लाह , जीसस, झेउस, फरो इ.
  आपल्या दैवतांनी आणि संस्कृतींनी त्यावेळीच एकत्र नांदण्याची शिकवण दिली आहे
  याचेच हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे....

  ती तुमच्या सारख्या अडाण्यास नाही समजले आणि याने भेदभाव चालू झाले .....
  याचाच गैरफायदा घेऊन ब्रिटीश, मोघल आणि सध्याचे राज्यकर्ते
  तुम्हा आम्हावर कुरघोडी करत आहेत....

  तुम्ही त्या कुरघोडीला प्रोत्साहन देऊन शककर्ते शिवछत्रपती आणि संविधान रचिते आंबेडकर यांच्या तत्वांचे विटंबनच करीत आहात....
  स्वताला "आबेंडकरवादी आहे" म्हणणे शोभत नाही तुम्हाला .....

  त्याहून दैवता बद्दल घुसखोरीची भाषा करून खात्या थाळीतच छेद करणे पेक्षा ...
  जे घुसखोरी करून जनसामान्यांचे अस्तिव भंग करू पाहत आहेत त्यांच्या विरोधी आवाज उठवा ....
  अन्यथा स्वताला त्यांचेच पंथकरी म्हणून मोजणे सुरु करा....

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. tumchya bolnyawarun tumchi layaki samajate ki tumhala knowledge wa tumache wachan kami aahe

   हटवा
  2. tumchya bolnyawarun tumache buddhimatta wa wachan kami asalyache janavate .........va asha vyaktinmulech Bharat desh sadaiv mage rahil kadhihi pudhe jau shaknar nahi ......tumchya watchalis shubhechha.

   हटवा
 2. tu fakt mandirala haat laaoon dakhv mag aamhi pun dakhvto aagri koli kaay chij haay jivant bghaych aasel tar blog kadhun taak naytr gath aagri kolyanshi haay aai ekveerechi shpt gheoon sangtaav tula sodnarnay . mi ghansolicha kattr aagri haav ... jay aagri ekveera mate ki jay

  उत्तर द्याहटवा
 3. Aai maulicha udo udo..
  Sarv agri koli bandhvan tarfe majhe Ekveera aaila manacha ujara..

  उत्तर द्याहटवा
 4. कार्ले :
  महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध लेण्यांचे सुप्रसिद्ध स्थळ. ही लेणी पुणे-मुंबई रस्त्यांवरील मळवली रेल्वे स्नकापासून उत्तरेस सु.पाच किमी. वर एका डोंगरात खोदलेली आहेत. येथील बौद्ध भिक्षूंच्या अनेक विहारांवरुन त्यास विहारगाव असेही म्हणतात. ही लेणी इ.स.पू. पहिल्या शतकात खोदलेली असावीत येथील अवशिष्ट लेख, शैली व शिल्पे यांवरुन ही सर्व लेणी एकाच वेळी खोदलेली नसावीत असे दिसते. त्यांतील चैत्यगृह इ.स.पू. पहिल्या शतकात खोदले गेले असावे; दर्शनी भिंतींवरील दंपतिशिल्पे व बौद्धशिल्पे मात्र तत्कालीन नसावीत, सिंहस्तंभादी शिल्पे दुसऱ्या शतकातील आहेत.
  सातवाहनकालीन मिथुनशिल्प, इ. स. पू. पहिले शतक, कार्ले.
  येथील मुख्य गुंफा म्हणजे चैत्यगृह असून ते विस्तीर्ण आहे. तेथील सभामंडप सु.38 मी. लांब, 11.5 मी.रुंद व 11 मी. उंच आहे. सभामंडपात अनेक स्तंभ असून त्यांवर सुंदर शिल्पे आहेत. उत्कीर्ण शिल्पवास्तूच्या दृष्टीने कार्ल्याचे चैत्यगृह आकाराची भव्यता आणि शैलीची प्रौढता दर्शविते. उत्कृष्ट चैत्यगवाक्ष, सरळ स्तंभ, रसरशीत शिल्पाकृती आणि लेण्यासमोरील उत्तुंग सिंहस्तंभ ही येथील काही ठळक वैशिष्टये मानता येतील. ह्याशिवाय सभामंडपाच्या ओवऱ्यांच्या स्तंभांवर घोडेस्वारांच्या मूर्ती आणि विविध प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. एका भिंतीवर तीन गजराज उभे असून त्यांच्या वरखाली जाळीदार नक्षी कोरलेली आहे. येथील लेण्यांत बुध्दाच्या अनेक मूर्ती आहेत;तसेच भिंतीवर स्त्रीपुरुष नर्तकांची युगुले कोरलेली आहेत. दर्शनी भागावरील महाव्दारावर मिथुनशिल्प काढलेले आहे. चैत्यगृहाच्या छपराच्या आतील भागावर काष्ठकाम, काही स्तंभ आणि भिंतीवर पुसट भितिचित्रे आढळतात. हयांवरुन पूर्वी येथे भरपूर काष्ठशिल्पे व भित्तिचित्रे असावीत.
  हया लेण्यांत भिन्नभिन्न काळातील सु. बावीस शिलालेख उपलब्ध झाले आहेत. त्यांतील एका लेखानुसार हे चैत्यगृह म्हणजे `जम्बुव्दीपातील अव्दितीय लेणे' असे म्हटले आहे आणि ते वैजयंतीच्या भूतपाल श्रेष्ठीने खोदविले, असा त्यात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे सिंहस्तभांवरील लेखानुसार हा स्तभ महाराथी अग्निमित्राने दान म्हणून उभा केल्याची माहिती मिळते. तसेच नहपान क्षत्रपाचा जावई उषवदात ;सु. 120 द्ध व पुळुमावी सातवाहन हयांचेही येथे लेख आहेत.

  संदर्भ : 1.Burgess, James, Report on the Buddhist Cave Temples & Their Inscriptions. Varanasi, 1964. 2.Fergusson, James; Burgess, James, Cave Temples of India, London, 1880

  उत्तर द्याहटवा
 5. कार्ल्याच्या एकवीरा आई (रेणुका माता):

  एकवीरादेवी. मुंबई-पुणे मार्गावर लोणावळ्यापासून ११ किमी अंतरावर कार्ल्याच्या डोंगरावर एकवीरा देवीचे स्थान आहे. हे मंदिर प्राचीन नसून खूपच अलीकडचे आहे. देवीच्या दर्शनासाठी पाय-यांनी डोंगर चढून जावे लागते. पण डोंगर चढताना दिसणारा इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर , लोहगड , तुंग असे गडकिल्ले हा सारा परिसर मन मोहून घेतो. हिवाळ्यात वा पावसाळ्यात हिरवाकंच असलेला हा परिसर अगदी वेडावून टाकतो. डोंगर चढायचा त्रास घ्यायचा नसेल तर मंदिरापासून काही अंतरापर्यंत थेट गाडीनेही पोहोचता येते.

  या एकवीरा देवीची एक अख्यायिका अशी की , आदितीने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने तिला वर दिला की इश्वाकू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल. तुला होणा-या पाच पुत्रांत एक पुत्र महावीर (?) असेल. त्याच्या पराक्रमामुळे तू एकवीरा म्हणून ओळखली जाशील. ती क्षत्रिय राजाची मुलगी होती तर तिचा पती हा ब्राह्मण होता. परशुरामानेच त्याच्या आईची म्हणजेच एकवीरा मातेची मुंडके उडवून हत्या केली होती.

  कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे. सीकेपी किंवा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचीही ही देवता असल्याचे मानतात. एकवीरा देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी आई (?) म्हणून ती ओळखली जाते. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याआधी एकवीरा आईचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. लग्न असो वा मंगल कार्य , कोळी बांधव सर्वात आधी एकवीरा आईला आमंत्रण देतात. अगदी मासेमारीचा मोसम सुरु होण्याआधी एकवीरा आईची आराधना केली जाते. एकवीरा आई प्रसन्न झाली की , तिचा नवस फेडण्यासाठी कोंबडा कापण्याची प्रथा (अंधश्रद्धा) आजही कोळी समाजात आहे. बुद्ध लेण्या जवळ हिंसा हा एक अजब प्रकारच म्हणावा लागेल!
  सह्याद्रीच्या डोंगरद-यात शिवरायांच्या स्फूर्तीदायक इतिहासाच्या पाऊलखुणा जशा अद्याप कायम आहेत त्याचप्रमाणे बौद्धकालीन युगाच्या खुणाही अनेक लेण्यांमध्ये विसावल्या आहेत. श्री एकवीरा देवीच्या मंदिराशेजारीच जगप्रसिद्ध कार्ला लेणीही आहेत. बौध्द भिख्खूंनी बांधलेली ही पुरातन लेणी वास्तुकलेचा अजरामर इतिहास जोपासत आहे. ख्रिस्तपूर्व दुस-या शतकात ती बांधलेली असावीत , असा अंदाज आहे.

  उत्तर द्याहटवा
 6. मुस्लिमांनी अनेक हिन्दू मंदिरे पाडून त्याजागी मशीदी बांधल्या असा हिंदुत्ववाद्यांचा उर्फ वैदिकांचा एक लाडका सिद्धांत आहे. बाबरी मशिदीच्या जागी आधी राम मंदिर होते, व बाबराने ते पाडून तिथे बाबरी मशीद बांधली असेही हे लोक छातीठोक पणे सांगत असतात.
  भारतात आपण कोणत्याही ठिकाणी उभे राहिलात आणि ५० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पाहिलेत, तर तुम्हाला सगळ्यात जूने अवशेष हे बौद्धांचेच दिसतील. महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या किल्ल्यांवर बौद्ध लेणी दिसतात. खुद्द पुणे जिल्ह्यातच कार्ले, भाजे, जुन्नर, लेण्याद्री या ठिकाणी तुम्हाला प्राचीन बौद्ध लेणी दिसतील. याउलट हिंदूंची जी कांही 'जूनी' धार्मिक ठिकाणे आहेत, ती फार नंतरची आहेत, आणि तीही बौद्धान्च्या लेण्यात घूसखोरी करून बनवण्यात आली आहेत. याची कांही उदाहरणे म्हणजे खुद्द पुण्यातील पातालेश्वर लेणी, कार्ल्याची एकवीरा देवी आणि लेन्याद्रीचा गणपती ही आहेत. अगदी अशीच स्थिती महाराष्ट्रभर आणि देशभर आहे.
  पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर मूळ बौद्ध मंदिर असावे याचे अनेक पुरावे आहेत.
  बौद्ध गयेचे प्रसिद्द मंदिर बौद्धांचे असुनही आज देखील ब्राम्हणांच्या ताब्यात आहे व ते त्यावरील आपला ताबा सोडायला तयार नाहीत.
  बाबरी मशीद येथे अगोदर राम मंदिर होते याचे पुरावे हिंदुत्ववादी देवू शकले नाहीत. भाजप सरकारने कोर्टात जे पुरावे दिले ते तेथे बौद्ध मंदिर होते याचे दिले! पुढे तेथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले, बौद्ध मंदिरांचे रूपान्तर हिन्दू मंदिरांत कसे झाले याच्या सुरस कथा आपल्याला शिवलीलामृत या पोथीत वाचायला मिळतील.
  पांडव लेणी हा शब्द आपण ब-याचदा ऐकला-वाचला असेल. कांही पांडव लेणी आपण स्वत: बघितलीही असतील. ही पांडव लेणी पांडवांनी एका रात्रीत बनवली अशी एक भाकड कथा सांगितली जाते. त्या भाकडकथेचा अर्थ एवढाच की कोणीतरी एक रात्रीत त्या मूळच्या बौद्ध लेण्यात घुसखोरी करून ती आपल्या ताब्यात घेतली, आणि तिथे आपले देव बसवले.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. tumhi buddh adharmachya bajune bolnya aadhi he lakshat theva ki tumche purvaj ani tumche kul he muli hinduch ahe....ani he fakta sudachya bhavaneche bolne ahe..

   हटवा
 7. mulat ha lekhach jatiyata aani jativad nirman karnara aahe..............aamchya magil kititari pidhya ya mandirat jat aahet pan bauddha athava hindu bandhavani kadhihi ek mekan baddal harkat nai ghetali sagle anandat chalu astana tumchya sarkhi haran khor manse lokanmadhe aag bhadkavtat............he hijade panache lakshan aahe

  उत्तर द्याहटवा