मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

फेसबुकवरील भीमपुत्रांचं स्नेहसंमेलन


सभागृहात ठेवण्यात आलेली बुद्ध मुर्ती व बहुजन नायकांचे फोटो.


स्नेह भेटीची पाटी
बाबासाहेबांच्या लेकरांचं फेसबूकवरील वावर चळवळीत परावर्तीत करण्याच्या दिशेनी पडलेलं पहिलं वहिलं पाऊल. अमोल गायकवाडनी भीमांच्या लेकराना आवाज दिला अन महाराष्ट्राच्या काना कोप-यातून अडीच शे बांधव धावून आले. फेसबुकवरील बौद्ध बांधवांचं पहिल स्नेहसंम्मेलन मुंबईत घेण्याचं ठरलं. सुरुवातीला असा अंदाज बांधण्यात आला की फार फार तर मुंबईच्या जवळपासची व मुंबईतली वीस पंचवीस पोरं येतील. त्या प्रमाणे कार्यक्रम आखन्यात आला. निळ्या स्नेहसंमेलनाची दवंडी पिट्ण्यात आली. ९ ऑक्टोबर २०११ ला मुंबईत बौद्ध बांधवांचा सस्नेह मेळावा घेण्यात येत असल्याचं इव्हेंट फेसबुकवर टाकण्यात आलं. हा हा म्हणतात दोनशेच्या वर लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. येणारी  मंडळी कुठली आहेत ते तपासून पाहिल्यावर महाराष्ट्राच्या काना कोप-यातून मिळालेला हा अपूर्व प्रतिसाद होता. सुरुवातील असं वाटलं की ईतक्या दुरुन लोकं येणार नाही. पण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण ते खानदेश पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोप-यातून बौद्ध बांधव मुंबईत थडकले. बौद्ध बांधवानी दिलेला हा प्रतिसाद इतका अनपेक्षित  होता की आम्हाला आमची मतं बदलावी लागली.  शनिवार पर्यंत हा आकडा अडीचशे पार करुन गेला. रविवारचा दिवस उजाडला. अमोल गायकवाड व त्याचे सोबती ज्यानी सर्व व्यवस्था एक हाती  पाहिली हे सकाळीच सभागृहात दाखल झाले. आमचा वैभव मात्र आजून पोहचायचा होता. पाहता पाहता सभागृह तुडूंब भरलं. दोन वाजे पर्यंत बांधव येतच होते. लोकांची गर्दि ईतकी वाढली की सभागृहात जाग उरली नव्हती. येणा-या लोकांची जी संख्या मनात धरुन सभागृह बूक केला होता त्याच्या अगदी विरुद्ध घडलं. तो लहानसा सभागॄह ओरडून सांगू लागला की आंबेडकरी कार्यक्रमाना असले लहान सहान सभागृह पुरत नसतात. आता मोठ्या सभागृगांची तयारी करा असा तो संदेश होता. कित्येक बांधव सभागृहाच्या बाहेर थांबली.
त्रिसरण पंचशील ग्रहन करताना
अमोल गायकवाडनी सुत्र संचलनाचं काम अत्यंत कुशलतेनी बजावलं. पाहता पाहता कार्यक्रमाची सुरुवात झाली. सभागृहात मोठं बॅनर लावलं, त्यावर लिहलं होतं, “ फेसबूकवरील समविचारी मित्रांची संपर्क आणि स्नेह भेट”
भगवान बुद्ध, शिवाजी महाराज, बाबासाहेब, ज्योतीबा फूले व शाहू महाराजांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. सर्वानी या बहुजन पुरुषांच्या प्रतिमाना अभिवादन करुन त्रीसरण पंचशील ग्रहण केलं.  अत्यंत पवित्र वातावरण निर्मीती झाली. सर्व बौद्ध बांधव या पवित्र व बौद्धमय वातावरणात अगदी न्हाऊन निघालीत. प्रत्येकाच्या चेह-यावर प्रसन्नता व एक पवित्र तेज उजाळून गेलं. अशा   प्रकारे हायटेक बौद्ध बांधवांच्या स्नेह सोहळ्याची सुरुवात झाली.
अरविंद सोनटक्के, धनंजय आदित्य पासुन सर्व मान्यवरानी बौद्ध धम्म व आंबेडकरी चळवळी बद्दल  आपले व्यक्त केलेत. बाबासाहेबांची चळवळ नव्या रुपात कशी उभी होते आहे याचं प्रत्यक्ष दर्शन घेताना येथे उपस्थीत सर्व बौद्ध बांधव कृत कृत झालित. प्रत्येकाच्या नजरेतून या अभूतपूर्व सोहळ्याचं कौतूक सांडत होतं. निळ्या रंगावर जीव ओवाळून टाकणारी ही नवी पिठी ईथे एका हाकेला धावून आली होती. बाबासाहेबांच्या प्रती निष्ठावान व  बुद्धाच्या प्रती श्रद्धा बाळगणारे बौद्ध एका हाकेला मुंबईच्या दिशेनी झेपावले होते. बाबासाहेबांच्या स्वप्नाना मातीत मिसळणारे असतिल शेकडो, पण त्या स्वप्नाना तळहातावर जपणारे गणतीच्या पलिकडे आहेत याचं साक्षात्कार देणारी ही उपस्थीती गगन भारारीचा नवा उत्साह भरुन गेली.
संजय खोब्रागडे मेणबत्ती पेटवताना
या कार्यक्रमाला संभजी भगतनी एका शब्दात हजेरी लावली. बाबासाहेबांच्या कार्यक्रमांवर जीव ओवाळून टाकणारे शाहीर संभाजी भगत योगायोगाने मुंबईत होते अन या कार्यक्रमाला हजेरी लावली. संभाजी भगतांची शाहिरी ऐकण्याची ही संधी म्हणजे काहीना तुपात साखर तर माझ्यासारख्याना मटन थाळीत दम बिर्याणी मोफत. अत्यंत प्रहारी, नसानसातून नवंचैतन्य दौडवणारी, चळवळीचा वेध घेणारी, आम्हा सारख्याना बोध देनारी, रक्ताला लावा बनविणारी भगतांची शाहिरी म्हणजे  उपस्थीत बांधवांसाठी मेजवानी होती. भगतांच्या शाहिरी नंतर आजून काही बौद्ध बांधवांचे कार्यक्रम पार पडले. जोडीला अमोल गायकवाडांचं अप्रतिम  निवेदन होतच. अशा प्रकारे

धनंजय आदित्य

विविध कार्यक्रम घेऊन हा सोहळा संपन्न झाला.
शिरिष पवार
दूर दुरुन आलेल्या बांधवाची गैरसोय होऊ नये म्हणून भोजनाचीही व्यवस्था केली होती. बौद्ध धम्म व आंबेडकर चळवळ दिवसेंदिवस कशी बळकट करता येईल यावर यथासांग चर्चा झाली. यापुढे असे कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून घेण्याचा ठराव करण्यात आला. अन अत्यंत पवित्र व मंगल वातावरणात अशी ही बौद्ध बांधवाची स्नेहभेट संपन्न झाली.
आता ही भेट म्हणजे नुसतं मौज-मजा करण्याठी ठेवण्यात आलेली भेट नव्हती. बाबासाहेबांच्या विचारांना मानणा-या समविचारी बौद्ध बांधवाना आणण्यासाठी ठेवण्यात आलेली ही स्नेह भेट होती. या नंतर प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून अशा समविचारी लोकाना जोडण्याचं काम घाती घेतल्या जाणार आहे. आज काल जो तो उठतो व राजकारण करतो. पण नॉन पोलिटिकल चळवळ अत्यंत गरजेची आहे हे जाणणा-या आजच्या तरुणाला जोडण्याचा संकल्प आहे. आजच्या तरुणाला बाबासाहेबांबद्दल अत्यंत आदर आहे. पण आस पासचं राजकीय वातावरण बघता आंबेडकरी चळवळीकडे बघण्याचा दृष्टीकोन तितकास सकारात्मक नाही. आंबेडकर चळवळीची राजकीय आघाडी पार गहान पडली आहे. याच राजकीय आघाडीच्या मोजपट्टीने आंबेडकरी चळवळीला मोजण्याचं काम आजचा तरुण करतो. अन चळवळीपासून दूर जातो. आंबेडकर चळवळ म्हणजे बुद्धाच्या दिशेनी जाणारी चळवळ होय. समतेची चळवळ होय. बुद्धीजीवी लोकांची चळवळ होय. बाबासाहेबांचा अंतिम संदेश बुद्धाकडे जा असा होता. हा अंतिम संदेश माणसाचा उद्धार करणारा आहे. १९५६ मधेय बाबासाहेब स्वत: म्हणाले होते की माझं या पुढचं सर्व आयुष्य मी बौद्ध धम्मासाठी खर्ची घालणार आहे. दुर्दैवाने त्याना धम्म क्रांती नंतर आयुष्य लाभलच नाही. पण बौद्धमय भारताची जबाबदारी आमच्यावर टाकून ते निघून गेले. आता त्यांचं बौद्धमय भारताचं अपूर स्वप्न पुर्ण करण्यासाठी आजच्या तरुणानी झोकून देऊन काम करायचे आहे. जो जिथे आहे, ज्या गावात, शहरात, नगरात आहे तिथे बौद्ध धम्माचं काम प्रत्येकानी जमेल तसं करायचं आहे. यासाठी मंगल कार्यासाठी सर्वाना शुभेच्छा.
 
संभाजी भगत

   


बौद्ध बांधवांचा गृप फोटो.
 
तळटीप: आता लवकरच पुण्यात होणा-या स्नेह भेटीच्या तयारीला लागा. आपण या भेटीत बरचं काही ठरविणार आहोत.
जयभीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा