कवी ग्रेस मागच्या आठवडाभरापासून ज्याच्या नावाची भरपूर
चर्चा सुरु आहे तो कवी ग्रेस म्हणजे माणिक
सिताराम गोडघाटे, माझ्या भाषेत मण्या महार. या इसमाच्या काही कविता शालेय अभ्यासक्रमातही होत्या.
कालच्या लोकमतला ग्रेसची मुलाखत होती. ग्रेस म्हणतात, “मी महार, पण ब्राह्मणाळलेला म्हणून महार मला लाथा मारतात. आणि माझी छाती फोडली तरी जाणवे
दिसत नाही, म्हणून ब्राम्हणही लाथा मारतात. आय बिलाँग्ज टू ग्रेस!
डॉ. आंबेडकर हा प्रयोग करण्यात चुकले. त्यांना शांतता लाभली नाही. पण मी कवी असल्यामुळे
माझी सहनशीलता मोठी आहे. मी कुठल्याच धर्माचा त्याग केला नाही. पण कवीच्या धर्मातच
मी हिंदू धर्मात राहिलेलो आहे. आता तुमची संस्कृती! आंबेडकरांप्रमाणे तुम्ही मलाही
धर्मांतर करायला सांगता की माझ्या कवी धर्माला सलाम करता?”
संपूर्ण मुलाखत खालील धाग्यावर वाचा.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-24-12-2011-83e8e&ndate=2011-12-25&editionname=main
पुढे असेही म्हणतात की त्यांच्यावर अत्याचार झालाय.
संपूर्ण मुलाखत खालील धाग्यावर वाचा.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-24-12-2011-83e8e&ndate=2011-12-25&editionname=main
पुढे असेही म्हणतात की त्यांच्यावर अत्याचार झालाय.
मुळात या ग्रेसवर अत्याचार झाला
हे मी मानतच नाही, उलट त्यानी आ बैल मार मुझे उक्तीला शोभेलसे वर्तन केले. कवी
ग्रेस हा जातीने महार. नागपूरच्या वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालयात (मॉरिस
कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. नागपूर ही बौद्धांची क्रांतीभूमी. दारिद्र्य नि
गुलामीत खितपत पडलेल्या व महार म्हणून सदैव हिंदूद्वारे तुच्छतेने वागविण्यात
आलेल्या या महार समाजाला बाबासाहेबानी याच भूमित बौद्ध धम्माची दिक्षा देऊन आत्मसन्मानाच्या
मार्गावर नेऊन उभे केले. नव्या धम्माच्या कवेत देऊन आत्मसन्मान बहाल केला. बाबासाहेबांच्या या परोपकारी व समाजोद्धारक कार्याची
समस्त बौद्ध जणांस मोठी जाणीव आहे व हा समाज बाबासाहेबांच्या प्रती अत्यंत
कृतज्ञतेने वागतो. पण बाबासाहेबांच्या या सामाजीक क्रांतीला नाकारुन हिंदूंची
गुलामी स्विकारण्यात काहीजणाना धन्यता वाटते असे. अशा काही लोकांपैकी एक अत्यंत
प्रसिद्ध नाव म्हणजे माणिक सिताराम गोडघाटे.
माणिक गोडघाटे यानी अगदी
सुरुवातीपासूनच ठरवून टाकले होते की जात लपवून ठेवायची व सनातन वाद्यांशी जवळीक साधून स्वहीत साधायचे. पण मुख्य अडचण
होती ती नावाची. गोडघाटे हे आडनाव नागपूर व विदर्भात बौद्ध चळवळीतील एक प्रसिद्ध
आडनाव आहे. खुद्द माणिक गोडघाटेचे सख्खे
बंधू अशोक गोडघाटे हे आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. बाबासाहेबांच्या
साहित्य प्रकाशनातील एक प्रसिद्ध नाव आहे. माणिक नावाच्या या कविला हे आडनाव अडसर
वाटू लागले. समाजात आपली ओळख लपविण्यासाठी आता नवीन नाव धारण करणे गरजेचे होते.
त्यामूळे त्यानी आपले नाव ग्रेस असे ठेवले व गोडघाटे पासून दूर जाण्याचा प्रयत्न
केला. समस्त महार समाज जुनी जात टाकून देऊन, गुलामगिरी झूगारुन देऊन, हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची
दिक्शा घेतली व एक तेजस्वी वाटचाल सुरु केली. पण हा जात चोरणारा ग्रेस मात्र स्वेच्छेनी
गुलामगिरी स्विकारतो. उभं आयूष्य सनातन्यांचे पाय चाटण्यात घालवितो. मंगेशकर
घरण्याशी जवळीक वाढवून वैद्यकीय सेवा मुफ्त मिळवितो व महारकीला चिकटून राहतो.
समाजाशी फारकत घेतल्यामूळे
बौद्ध समाजानी ग्रेसला कधी दारीही उभं केले नाही.
बाबासाहेबांच्या मार्गाचा अवलंब न केल्यामूळे ग्रेस कायमचा स्वत:च्या
समाजापासून दूरावल्या गेला. अन ग्रेसला
ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यानीही महार म्हणून सदैव पृष्ठभागावर फटके घालून
दारातून हाकलून दिले. आता मात्र ग्रेसची अवस्था धोबीच्या कुत्र्यागत झाली. हा
ग्रेस नावाचा कुत्रा ना घरचा राहिला ना घाटाचा (सनातन्यांचा). दोन्ही समाज या
ग्रेस नावाच्या कुत्र्याला मागच्या तीन दशका पासून बडवतच आला आहे. ब्राह्मण समाजाच्या कंपूत शिरण्याचे अनेक
प्रयत्न केले पण ब्राह्मणानी ग्रेसला कधी कंपूत शिरूच दिले नाही. त्यामूळे आता
मरता मरता ग्रेसला आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला असावा म्हणून म्हणतो की मला
दोन्हीकडून बडविल्या जाते. पण सत्य असे आहे की यानी समाजाशी स्वत:च फारकत घेऊन
ब्राह्मण कंपूत शिरण्याचा प्रयत्न केला. आज तो प्रयत्न सपेशल फसल्याचे जाणवल्यामूळे हा
पश्चाताप होतोय. पण काही उपाय नाही, बौद्ध समाजाची दारं या कृतघ्न मण्या महारासाठी
कायमची बंद झालीत.
ग्रेस लोकमतच्या मुलाखतीत
म्हणतो की मी दोन्ही समाजाकडून झोडपलो गेलो. पण हे होणारच होते.
जो माणूस स्वत:चा आत्मसन्मान
गहाण टाकतो त्याची गत या पेक्षा वेगळी काय होणार? किंवा त्यानी समाजाशी एवढीमोठी
दगाबाजी केली, जात चोरून महारकी व गुलामी स्विकारली त्यानी समाजाकडून अपेक्षा का बरं ठेवावी. त्यांच्या प्रत्येक
वाक्यातून जाणवते की त्यांच्या जात बांधवानी दिलेली वागणूक ग्रेसना दुखवून गेली.
पण हे अपरिहार्यच होते. ग्रेस हा स्वत:च्या समाजाशी कृतघ्न राहिला. त्यामुळे
त्याचा समाज त्याला लाथा घालणार हे अटळच.
दुसरं असं की हा ग्रेस म्हणतो
की, मी बाबासाहेबांसारखा धर्मांतर न करता हिंदू म्हणूनच जगतो. कवीधर्म म्हणजे हिंदू धर्म होय (आहे की नाही कमाल याची, म्हणजे दूर तिकडे कूणी चीनी, जपानी मधे कविता रचली तरी मण्याच्या कसोट्या लावल्यास तो हिंदू ठरतो.) बाबासाहेबानी धर्मांतर
करुनही त्याना शांतता लाभली नाही. त्यानी माझ्या सारखं याच धर्मात राहायला पाहिजे होते. त्यांचा मार्ग चुकला. माझा मार्ग बरोबर आहे. अशी काहीच्या काही मुक्तफळं उधळली गेली. स्वत: ब्राह्मणं कंपूत घेत नाही म्हणून रडायचही अन महार म्हणून जगतो हाच मार्ग बरोबर आहे असे विसंगत विधानही करायचे. मला वाटते आता हा ग्रेस खरोखरच वेडा झाला आहे.
ज्या माणसाला बाबासाहेबाच्या क्रांतीचा परिणाम
मोजता येत नाही, ज्याला धम्मक्रांतीनंतरचा सामाजिक बदल जाणवत नाही. महार म्हणून
जगणा-या गुलामांची अवस्था व आजची तेजस्वी जिवनशैली यातला फरक कळत नाही. अशा माणसला
लाथा नाही घालणार तर काय करणार. ग्रेसला महार म्हणून जगायचे असेल व हिंदू धर्मात
राहायचे असेल तर त्यानी खुशाल रहावं. पण बाबासाहेबांच्या धर्मांतरावर बोट
उचलल्यामूळे मी व समस्त बौद्ध समाज या ग्रेस नावाच्या मण्या महाराचा निषेध करतो आहे.
gun dosh saglyach jati dhramat astat aani aaplya dharmatil hey dosh chalwali karun sudharayche astat. maharanni kelele dharmantar ha niwwal palputepana hota yaat kahi wadach nahi.
प्रत्युत्तर द्याहटवारामटेके , कोणाचाही जातीवाचक उल्लेख करणे चुकीचे आहे तो तुमच्या जातीचा असला तरी. एखाद्या उच्च्वार्नियाने माणिक गोडघाटे यांना जातीवाचक उद्गारले असते तर ते आपल्याला आवडले असते काय ? त्यांचा जातीवाचक उल्लेख करून तसे करण्याची पद्धत नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आपण अडसर करीत आहात. जसे तुम्ही कोणाचा जातीवाचक उद्धार करू शकता तसेच उद्या कोणी तुमचाही करू शकेल व हे योग्य नाही एवडेच सांगू इच्छितो
प्रत्युत्तर द्याहटवाच्या मारी हा ग्रेस महार आहे हे आता समजले !!!
प्रत्युत्तर द्याहटवाARUN KHARATE
keval jatiyvadi...ani kilasavane vichar ahet ramtekenche
प्रत्युत्तर द्याहटवारामटेके काही गोष्टींचा उलगडा,
प्रत्युत्तर द्याहटवा१) कवी ग्रेस यांचे नाव परवा त्यांना पुरस्कार मिळाल्यावर बऱ्याच लोकांना कळले. आणि त्याच्या असंख्य चाहत्यांमध्ये कोणत्या जातीचे लोकं जास्त आहेत हे स्वताचा मनाला विचारून पहा.
२) त्यांच्या गाण्यांना चाली देवून ती गाणी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम कोणत्या जातीच्या लोकांनी केले ते तुम्हाला तपासले तर कळेल की तू जेवढ्या जातीयवादी चष्म्यातून पाहतोस त्यातून सगळे जग बघतेच असे नाही.
आणि तू एकदा ठरव तू हिंदू महार आहेस की बौद्ध आहे केवढा वैचारिक गोंधळ आहे तुझ्याकडे?
ग्रेस जी जात काढून काय मिळाले भावा तुला. ते महार आहेत हे मला केवळ या लेखा मुळे कळाले. त्यांची जात सांगण्याचा तुला अधिकार कुणी दिला? असो. खपल्या उकरु उकरु काढून जातीयवाद जिवंत ठेवणारी तुझ्यासारखी लोकंच जातीयवादाला कारणीभूत आहेत.
प्रत्युत्तर द्याहटवाRavi Shankar yanchya comment shi sahamat ahe. jatibhed nashta karayacha ahe tar parat parat jat ka kadhata tumhi ramteke?
प्रत्युत्तर द्याहटवासाहित्य, संगीत, कला या माणसाला माणसाशी जोडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला जात धर्माची चाड नसते. मर्यादा नसतात. कवी ग्रेस जातीने कोण याचा आपणच प्रथम गौप्यस्फोट केला आहे, असा तुझा गैरसमज आहे, किंबहुना त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी तुझ्यापेक्षा जरा जास्तच माहिती आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या चाहत्यांवर याचा परिणाम होणार नाही.
प्रत्युत्तर द्याहटवाजग कुठे निघाले आहे आणि तुम्ही जात जात करत राहा. आणि कारण काय? तर शोषण झाले. अबे गेला तो जमाना. आता बस करा कि! उगाच स्वतःला अस्पृश्य समजू नका, इतर लोक नाही पण तुम्ही मात्र जातीवाद सोडत नाहीच! दिवसभरात एकदा तरी "शोषण झाले, शोषण झाले" अशी शब्दांची पिचकारी टाकल्याशिवाय तुझा दिवस जात नसेल. कुठल्याही दलिताला आम्ही वेगळी वागणूक देत नाही मात्र आम्हाला हे लोक नाव वगैरे अगदी यथासांग विचारून काय तो निष्कर्ष काढतात! कोणाला जातीवादी म्हणावे? तुम्ही ब्राह्मण, मराठ्यांना बिनबोभाट जातीवाचक बोलावे, आणि तुमच्या जातीचा नुसता उल्लेख केला तरी तो जातीवाद ठरतो, तुम्हीच तुमच्या अपयाशेचे मानकरी ठरता आहात. प्रवाहात या. इथे जातीपेक्षा समस्त मानवजातीच्या भल्याचा विचार करू यात का?
प्रत्युत्तर द्याहटवा