बुधवार, ११ जानेवारी, २०१२

पठ्ठे बापूराव


१९२७ साली महाडचा सत्याग्रह करण्याचे ठरले. पण सत्याग्रहासाठी लागणारा पैस उभा करण्याचे आव्हान उभे ठाकले होते.  बाबासाहेब तेंव्हा हायकोर्टात बॅरिस्टर म्हणून काम करत. चवदार तळ्याच्या सत्याग्रहास निधी मिळविण्यासाठी कोर्टातीला ओळखी पाळखीच्या बॅरिस्टर लोकाना भेटून आर्थिक मदत करण्यास विनंती करत पण कुणी या कामासाठी पैसेच देईनात. हताश झालेले बाबासाहेब हायकोर्टाच्या लायब्ररीत एका कोप-यातल्या टेबलावर बसून चिंतामग्न झाले होते.  त्यांच्या सोबत रोज गप्पा मारणारे एक सहकारी श्री. मोतीराम तळपदे बाबासाहेबांची ही अवस्था पाहून चकीत होतात नि चिंतेचे कारण विचारतात. बाबासाहेब आपली अडचण बोलुन दाखविल्यावर तळपदे आपल्या एका मित्राशी बोलून सायंकाळी भेट घडवून आणतात.
ठाकूरदास येथील विविधवृत्त च्या ऑफिसात ठरल्या प्रमाणे ज्या मित्राची ओळख करुन देतात त्याचे नाव श्री. रामचंद्र काशीनाथ तटणीस. बाबासाहेबांच्या उदात्त कार्यास हातभार लागलाच पाहिजे म्हणून तटणीस लगेच कित्येकाना फोन लावतात व मदत मिळू शकेल का याची चाचपणी करतात. पण सगळीकडून नकार मिळतो.
हार न मानता तटणीसानी ओळखितील नाटक कंपन्यांशी संपर्क केला. ललित कलादर्शनचे श्री. बापूराव पेंढारकर (व्यंकटेश बळवंत) यानी मदत देण्यास तय्यारी दर्शविली. पण त्यानी अशी अट घातली की आम्ही जे पैसे देणार ते सत्याग्रहासाठी देतोय हे बाहेर सांगु नका. समाज आमच्यावर पेटून उठेल. तुमच्या शैक्षणीक संस्थाना दान देतोय असे कागदो पत्री दाखवा. म्हणजे आमची अडचण होणार नाही. बाबासाहेबानी पेंढारकरांची ही अट मान्य केली व त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली.
त्या नंतर पेंढारकरांचा कित्ता गिरवत नाटक कंपन्यातील अनेक मान्यवर मदत देण्यास पुढे सरसावले. सखाराम नारायन काजरोळकर यानी नाटकाचा एक खेळ बहिष्कृत हितकारणीसाठी केला व रु. १००/- मिळालेले उत्पन्न बाबासाहेबाना दिले. श्री. निर्मळ लिंबाजी गंगावणे यानीही एक खेळ आर्थिक मदतीसाठी दिला. रु. १५०/- त्यांच्याकडून मिळाले. अशा प्रकारे कलाकार मंडळीनी बाबासाहेबाना मदत करण्यास पुढाकार घेतला.
हा हा म्हणता ही बातमी पठ्ठे बापूराव (श्रीधर कृष्ण कुलकर्णी) यांच्या कानावर गेली. हे त्याकाळातले नावाजलेले तमासगीर होत. यांच्या तमाशात महारांच्या देखण्या बायका काम करत. त्यांच्या तमाशातील पवळाबाई नावाची महारीन (गाव-हिवरगाव, संगमनेर) अत्यंत प्रसिद्ध होती. ती तबाजी महाराची मुलगी होती. अशा प्रकारचे अनेक महारीनी त्यांच्या तमाशात काम करुन नाव लौकिकास गेल्या होत्या. बाबासाहेबाना मदत करण्यासाठी १० सप्टे १९२७ रोजी पठ्ठे बापूराव त्यांच्या ऑफिसात येतो. सोबतीला दोन सुंदर ललना, दोघींच्याही पायांत तोडे, अंगावर दागिने. या दोन बाया बापूरावच्या दोन बाजूला व हा मधे अशी वरात बाबासाहेबांसमोर उभी होते. बापूरावांचा वेषही मोठा थाटाबाटाचा होता. खांद्यावर रेशीम धोतर, लांब दाढी, पायात पंप शू, डोक्याला जरतारी कोल्हापूरी फेटा, हातात व गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असा एकंदरीत वैभवी थाट होता.
पठ्ठे म्हणतो, “बॅरिस्टर, मी तुम्हाला पुर्ण चार खेळाचे पैसे मदत म्हणून देण्यास आलो आहे. आपण माझ्या मदतीचा स्विकार करावा.”  बाबासाहेब मदत घेण्याचे नाकारतात. "कलेच्या नावाखाली बायका नाचविणा-या माणसाचा पैसा माझ्या उदात्त कार्यास नको" असे बोलून त्याना जाण्यास सांगतात. हिरमुसलेले पठ्ठे बापूराव निघून जातात.
अत्यंत अडचणीच्या वेळी चालून आलेली मदत नाकारल्यामूळे सोबत असलेले कार्यकर्ते बाबासाहेबांवर नाराज होतात व तसे बोलून दाखवितात.  बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांवर खवळून उठतात, त्यांचा चेहरा रागाने लालबूंद होतो, नजरेत आग उतरुन येते, संताप्त बाबासाहेब घोग-या आवाजात म्हणतात, “तुम्हा लोकाना लाज नाही वाटत? नितीमत्ता व स्वाभीमान नावाची चीज तुमच्यात आहे की नाही? महाराच्या बायका नाचवून हा बामण पैसे कमवतो व तुम्ही मला असे पैसे घेण्यास सांगता? माझे सत्याग्रही उपासी झोपले तरी बेहत्तर मी असा पैसा घेणार नाही.”
अशा  प्रकारे चालून आलेली मदत नाकारणारे बाबासाहेब आजच्या राजकीय दासाना आठवले असते तर भरून पावलो असतो.  

शिवजयंती बदलापूरची - १९२७ सालची


बाबासाहेब नावाचं वादळी नेतूत्व स्पृश्य नि सवर्ण वर्गात मोठी खळबळ उडवून देत असे. सनातनी लोकांना सळो की पळो करुन सोडणारं हे व्यक्तिमत्व जाती पातीच्या बेड्या तोडून नवी समाज रचना उभी करण्यासाठी मोठा झगडा चालविला होता.
१९२७ साली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ३ मे रोजी शिवजयंती उस्तव दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पार पडणार होता. पण उत्सव समितीने या वर्षी अध्यक्ष म्हणून कुणास बोलवावे हे ठरविण्यासाठी मिटिंगावर मिटींगा घेतल्या. अनेक नावाची चर्चा झाली पण काही ना काही कारणास्तव ही सर्व नावं नकारली गेली. शेवटी सर्वानूमते असे ठरले की डॉ. भीमराव आंबेडकर याना या उत्सवाचे अध्यक्ष म्हणून बोलवावे. मग प्रश्न असा पडला की बाबासाहेबाना निमंत्रण देण्यास जाणार कोण? पालेय शास्त्री नावाच्या भिक्षूकावर (ब्राह्मण) ही जबाबदारी टाकण्यात आली.
हे भिक्षूक ब्राह्मण मुंबईस आले , पण थेट बाबासाहेबाना भेटण्याची हिंमत होईना. ’ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर’चे संपादक नाईक याना जाऊन भेटले. आपला मानस त्यांच्याकडे बोलून दाखविला. भिक्षूकाचा प्रस्ताव ऐकून नाईकाना फार आनंद झाला. नाईकानी या भिक्षूकाची बाबासाहेबांशी भेट घडवून आणली. पालेय शास्त्र्यानी आपला परीचय दिला व गावात भिक्षूकीचा व्यवसाय करतो असे सांगितले. या वर्षीच्या शिवजयंतीच्या उत्सवास आपण अध्यक्ष म्हणून लाभावे अशी ईच्छा व्यक्ती केली. बाबासाहेब मोठ्या आनंदाने हे निमंत्रण स्विकारतात.  हे ब्राह्मण गृहस्थ खूश होऊन निघून जातात.
ठरलेल्या तारखेप्रमाणे बाबासाहेब बदलापूरला येतात. अध्यक्ष स्थान स्विकारुन एक तेजस्वी भाषण देतात. बाबासाहेबांची खाण्या पिण्याची सर्व व्यवस्था या भिक्षूकाच्या घरी केली जाते. जेंव्हा महाराला शिवने सुद्धा विटाळ मानल्या जाई अशा काळात एका भिक्षूकाने बाबासाहेबाना आपल्या राहत्या घरी मुक्कामी ठेवून केलेला आदरातित्य पाहता  त्यांच्या मनाच्या मोठेपणाला सलाम करावयाची ईच्छा होते. त्या दिवशी मोठ्या जल्लोशात शिवजयंती साजरी होते. दुस-या दिवशी बाबासाहेब परत जातात. बाबासाहेबानी आपल्या आयूष्यात साजरी केलेली(? सहभाग घेतलेली) ही एकमेव शिवजयंती होय. 
पण...
पण ही झाली पडद्या पुढची घटना.
या एकंदरीत कार्यात पडद्या मागे जे घडले ते ही फार ईंटरेस्टींग आहे. मुळात या कार्यक्रमास बाबासाहेबानाच का बोलावले? प्रदिर्घ चर्चे नंतर यानाच बोलावण्याचे कारण काय? तर याचे उत्तर आहे, ईथे या दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंदू-मुस्लिमांच्या दंगली झाल्या होत्या. हिंदूंची ताकद कमी पडू लागली होती. त्यातल्या त्यात अस्पृश्य समाज मोठ्या प्रमाणात ख्रीस्ती धर्म स्विकारू लागला होता. मुसलमानांची कु-हाड सतत आभाळात दिसे, कधी कोसळणार नेम नाही. त्याच दरम्यान बाबासाहेब नावाचा अस्पृश्यांचा मसीहा उदयास आला होता. त्याना वाटले असावे बाबासाहेबांच्या मदतीने अस्पृश्यांची ताकत आपल्या पाठीशी उभी करता येईल. त्याच बरोबर धर्मांतरही रोखता येईल. ही होती एक बाजू. दुसरी बाजू अशी होती की सुधारणेचे वारे वाहू लागले होते. बाबासाहेब व ईतर पुरोगामी मताचे नेते सामाजीक बदल घडवून आणन्यास मोठ्या जोमाने कामास लागले होते. याचा एकंदरीत  परिणाम असा झाला की आपल्याही गावात बाबासाहेबांसारख्या थोर पुरुषाचे पाय लागावेत असे वाटून त्यानी बाबासाहेबाना जयंती उत्सवाचे निमंत्रण दिले. ठरल्या प्रमाणे बिचा-या ब्राह्मणाने जाऊन बाबासाहेबांशी तसे बोलून निमंत्रण देऊनही टाकले.
त्या नंतर सुरु झाली खरी गंमत.
बाबासाहेब येणार हे पक्क झाल्यावर खरा प्रश्न उभा ठाकला, तो म्हणजे बाबासाहेब थांबणार कुणाकडे? मराठा व ईतर बहुजन समाज बाबासाहेबाना आपल्या घरची पायरी चढू देण्यास तयार नव्हता. सुधारणा बिधारणा त्या काय भानगडी असतात त्या घराच्या बाहेर. एक महार घराची पायरी चढून आता यावा हे त्याना अजिबात मान्य नव्हते. महाराच्या पदस्पर्शाने गाव पावन होणार होता पण तोच महार घरात आल्यास मराठ्यांचे घर बाटणार होते. त्यामूळे मोठा पेच निर्माण होतो.
गावची सर्व लोकं परत एकदा एकत्र येतात व मिटिंग घेतात. बाबासाहेबांची राहण्याची सोय कुणाकडे करायची यावरुन मोठा वाद उभा ठाकतो. सुधारणावादी बहुजन वर्गातून एकही माणूस पुढाकार घेण्यास तयार नसतो. शेवटी पंचायत होते ती बिचा-या ब्राह्मणाची. जेंव्हा बहुजन समाज मागे हटतो तेंव्हा पालेय शास्त्री उभे होऊन जाहीर करतात की मी करेन बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था, बॅरिस्टर आंबेडकरांची राहण्याची व खाण्या पिण्याची सर्व सोय मी  माझ्या घरी करण्यास तय्यार आहे.
एका भिक्षुकानी सर्व जबाबदारी स्वत:वर घेतल्यामुळे बहुजन समाज एका मोठ्या संकटातून सुटल्यागत श्वास घेतो. पण भिक्षुकी करुन जगणा-या ब्राह्मणावर आस पासच्या गावची लोकं बहिष्कार टाकणार व त्याचे जगणे मूश्किल करणार हे दिसत होते. त्याच्या भिक्षूकीच्या व्यवसायावर संकट कोसळणार हे उघड होते. तो प्रश्न निकाली काढण्यासाठी आस पासच्या चौदा गावच्या लोकांची दुसरी मिटिंग भरवून तसा बहिष्कार टाकण्यात येऊ नये म्हणून एक ठराव पास करण्यात आला. एवढं करुनही काही चित्पावनानी मराठ्याना या भिक्षूकाच्या विरोधात उठविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. सर्व मराठा (व ईतर बहूजन) समाजानी बाबासाहेबांची जबाबदारी एक भिक्षूकाच्या माथी मारली व शिवजयंतीच्या कार्यक्रमात सुधारणावादी असल्याचा आव आणत मोठ्या तो-यात फिरत होते. पालेय शास्त्री नावाचे ब्राह्मण गृहस्थ मराठ्यांच्या या डबडल स्टॅंडर्डनी अवाक झाले. अन बाबासाहेबांचे आदरातिथ्य करण्यात व्यस्त झाले.

सोमवार, ९ जानेवारी, २०१२

“बाबासाहेब” उपनाव असे रुजले.


१९२७ ची गोष्ट आहे. अस्पृश्य चळवळीतील एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर. हे नाव १९२७ पर्यंत बरेच लोकप्रिय झाले होते. तेंव्हा बाबासाहेबांचे कार्यालय दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे होते. बाबासाहेबाना भेटायला येणारी सर्व मंडळी त्याना डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर साहेब वा साहेब असे संबोधत. तेंव्हा बाबासाहेब बहिष्कृत भारत (ब.भा.) नावाचे पाक्षिक चालवत असत.  पोयबावाडीतील  कावाराणा बिल्डिंग मधील दुस-या माळ्यावर ब.भा. चे कार्यालय होते. चळवळीसाठी काम करणारे व ब. भा. साठी लेखन करणारे बाबासाहेबांचे काही अनुयायी व विद्यार्थी ईथे मुक्कामी राहात.
सप्टे १९२७ च्या एका रविवारी मोकळ्या वेळेत जेंव्हा ही चळवळीतील तरुण मुले गप्पा टप्पा मारत बसली तेंव्हा त्यांच्यातील चांगदेव भवानराव खैरमोडे या तरुण मुलाने असे सुचविले की, आपल्या साहेबांची किर्ती जगभर पसरत चालली आहे. तसेच ते आपल्या सर्व अस्पृश्य समाजाचे मोठे उध्दारक असून त्यांच्या धर्मपत्नी आम्हा सर्व पोरांस मातेसमान पाहतात. जन्माने आमचे आईबाप वेगवेगळे आहेत, पण आम्हाला या मानवी मुल्ये बहाल करणारे आपण सर्वांचे एकच बाप आहेत ते म्हणजे आंबेडकर साहेब व आपली सर्वांची एकच आई ती म्हणजे रमाई. म्हणून या पुढे आपण आंबेडकर साहेबाना ’बाबासाहेब’ व रमाईना ’आईसाहेब’ म्हणण्याचा प्रघात सुरु करु या. 
उपस्थीत सर्व बांधवाना ही उपनावाची युक्ती आवडली. त्यांच्या त्यांच्यातील चर्चेत व संवादात ती आंबेडकरांचा बाबासाहेब असा उल्लेख करु लागली व रमाईस आईसाहेब म्हणने सुरु झाले. पण हा प्रघात सर्वत्र रुजवायचा होता. मग बाबासाहेबांच्या सभांमधून बोलताना वरिल प्रस्तावातील वक्ते प्रत्येक सभेतून बोलताना ठासून बाबासाहेबआईसाहेब असा उल्लेख करु लागली. सुरुवातीला बाबासाहेबानाही कळले नाही हे काय चाललं. तसही त्याना कळू न देताच ही उपनावं रुजवायची होती. मुख्यत्वे मोरे नि वडवळकर या दोन खंद्या वक्त्यानी बाबासाहेब व माईसाहेब ही उपनावं रुजविण्यात सिंहाचा वाटा उचलाला. हा हा म्हणतार महाराष्ट्रातील प्रत्येक सभेतून या दोन वक्त्यानी वरील उपनावांचा वारंवार उच्चार करुन लोकांच्या मनात ही नावं रुजविली.
१९३० पर्यंत ही दोन्ही उपनावं सर्वत्र ईतक्या आत्मियतेने स्विकारली गेली की आता चळवळीतील लोकं त्याना फक्त बाबासाहेब एवढच म्हणू लागली. नंतर मात्र विरोधकही कित्येक वेळा त्याना बाबासाहेब म्हणू लागले व रमाईस आईसाहेब.
.

सोमवार, २ जानेवारी, २०१२

धनगरांच्या विरोधात विलास खरातचे पुस्तक


धनगर समाजासाठी एक वाईट बातमी. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधिच्या शेजारी तुकोजीराव होळकर यानी पैसे खर्च करुन वाघ्या कुत्र्याची समाधी बांधली होती. मधे ही वाघ्याची समाधी तोडण्यासाठी ब्रिगेड निघाली होती. पण आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला. आता मात्र या समाधीच्या विरोधात विलास खरातने एक पुस्तक लिहले असून ती समाधी ब्राह्मणानी बांधली असा अपप्रचार चालविला आहे. ब्राह्मणांचे नाव पुढे करुन वाघ्याची समाधी हटवुन धनगरांचा इतिहास रायगडावरुन नामशेष करण्याचा हा प्रयत्न आहे. धनगरांच्या विरोधात ही शिस्तबद्ध चाल असून विलास खरातला धडा शिकवणे आता गरजेचे आहे. या पुस्तकाचे नाव आहे "सयीबाई यांच्या समाधीवर कुत्र्याचा पुतळा बसविणारे बदमाश ब्राम्हण कोण?" खरंतर तिथे सईबाईची समाधी होती हे ब्रिगेडी लोकाना वा बामसेफिना सिद्धच करता आले नाही, तरी यांची काव काव सुरु आहे. रायगडावरच्या वाघ्याची समाधी ही  धनगर राजा तुकोजी होळकरानी बांधली असून तो धनगरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. समस्त धनगरानी विलास खरातचा निषेध करत हे पुस्तक मागे घ्यायला लावावे. हा धनगरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अन्यथा काही वर्षात आपल्याच डोळ्यापुढे ब्राह्मणांचे नाव पुढे करुन ही धनगरांची ओळख रायगडावरुन उखडून फेकली जाईल.

विलास खरातच्या पुस्तका बद्दल अधिक माहिती खालिल धाग्यावर वाचा 


या विषयावर संजय सोनवणी साहेबानी एक माहितीपूर्ण लेख लिहला होता तो खाली देत आहे.

इमानी, रक्षक मानल्या गेलेल्या एका कुत्र्याचे स्मारक हे एका संघर्षाचे कारण बनु शकेल असे कोणालाही वाटले नसते पण ते तसे झाले आहे खरे. संभाजी ब्रिगेडने ६ जुनपुर्वी शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवले नाही तर ते आम्ही उद्द्वस्त करू असा इशारा दिला अणि एरवी राखणासाठी कुत्रे पाळण्याची सवय असलेल्या मराठी समाजाला वाघ्याच्याच स्मारकाच्या रक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाण्याची घटना पहावी लागली. का तर ब्रिगेडी इतिहासकारांचे दावे!

काय होते हे दावे? तर दावा १) शिवचरित्रात कोणत्याही कुत्र्याचे स्थान नाही, तसे लिखित पुरावे नाहीत. २) वाघ्या कुत्रा हा नाटककार राम गणेश गडकरींच्या कल्पनेतुन निर्माण झालेले पात्र असून त्यांनी राजसंन्यास या त्यांच्या अपुर्ण नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा प्रथम उल्लेख केला आहे. ही गडकरींची विक्रुती आहे. ३. शिवस्मारकासमोरील ज्या चौथ-यावर वाघ्याचा पुतळा बसवला गेला आहे तेथे सईबाई, पुतळाबाई वा सोयराबाईंची मुळ समाधी असली पाहिजे. त्यांचा अवमान करण्यासाठी ब्राह्मणांनी (म्हणजे श्री. न.चिं.केळकरादि) मुद्दाम तेथे कुत्र्याला आणले. ४. वाघ्या कुत्रा हा विलायती कुत्र्यासारखा दिसतो म्हणुन तो शिवकालीन असू शकत नाही. ५. वाघ्या या कुत्र्याचे स्मारक असलेच तर ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा छोटे असायला हवे होते, पण प्रत्यक्षात ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा उंच आहे, सबब हा जाणीवपुर्वक केला गेलेला शिवरायांचा अवमान आहे. हे सारे मुद्दे लक्षात घेता हे वाघ्याचे स्मारक हटवणे आवश्यक आहे, ते न हटवले गेल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या "पद्धतीने" ते उद्ध्वस्त करेल असा इशारा दिला गेला. त्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एक नवे वादळ उठले.

येथे या वादळांत वा विवादांत न जाता, मी व माझे मित्र श्री. हरी नरके यांनी या संदर्भात सखोल संशोधन करून जे पुरावे मिळवले ते सर्वच ब्रिगेडी दाव्यांना धुडकावून लावणारे आहेत हे सिद्ध केले. शिवचरित्रात वाघ्या कुत्राचे स्थान नाही हा दावा निखालस खोटा असल्याचेही पुढे सामोरे आले. एवढेच नव्हे तर या स्मारकासाठी व शिवस्मारकासाठीसुद्धा मुळात सवाई तुकोजीमहाराज होळकर यांनी देणगी दिली असल्याने, हे स्मारक हटवणे हा होळकरांचा व पर्यायाने धनगर समाजाचा अवमान असल्याचे सत्य पुढे आल्याने धनगर समाजही अस्वस्थ झाला व श्री महादेव जानकर यांनी संभाजी ब्रिगेडला त्यांच्याच भाषेत इषारा दिला. शेवटी ब्रिगेडने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. कदाचित ब्रिगेडला मिळालेला हा पहिलाच घरचा आहेर असावा.

पुरावे सांगतात कि, सईबाईंची समाधी ही राजगडावर आहे, म्हणजे ती रायगडावर असू शकत नाही. कारण त्यांचा म्रुत्यु सन १६५९ मद्ध्ये झाला होता. आजही त्यांचे स्मारक राजगडावर आहे. वाघ्याचे स्मारक जेथे आहे तेथे पुतळाबाईंची समाधी असू शकत नाही कारण सतीची समाधी बांधण्याचा मुळात प्रघात नाही. त्यांची सती-स्मारक शीला रायगडावर आजही अस्तित्वात आहे. सोयराबाईंचे ते स्मारक असल्याचा कसलाही पुरावा आस्तित्वात नाही. मुळात सोयराबाईंचा म्रुत्यु कसा आणि कधी झाला याबद्दल इतिहासात मतैक्य नाही.

राहिला प्रश्न वाघ्याचा. तो इतिहासात होता कि नाही याचा. वाघ्या ही एक दंतकथा आहे असे मानण्याकडे कल आहे. कै. राम गणेश गडकरींनी आपल्या राजसंन्यास या नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा उल्लेख केला आहे व ती दंतकथा आजही वाघ्याच्या स्मारकावर कोरलेली आहे. पण राजसंन्यासपुर्वीच १९०५ साली "महाराष्ट्रातील किल्ले" या पुस्तकात श्री. चिं. ग. गोगटे यांनीही वाघ्याची दंतकथा नोंदलेली आहे. त्यात महाराजांची पालखी परततांना मोकळी जात असलेले पाहुन वाघ्याने अस्वस्थ होवून जळत्या चीतेत उडीघेवून प्राणार्पण केले असे नोंदलेले आहे. म्हणजे त्यांनीही वाघ्याची दंतकथा कोठे तरी ऐकलेली होती. दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे असे मानले तरी दंतकथांना सत्याचा काहीएक तरी आधार हा असतोच. लोकस्म्रुती या पीढ्यानुपीड्या इतिहास संक्रमित करत राहतात. कालौघात त्यात अतिशयोक्तीही होत जाते. रामायण-महाभारतातही अशी अतिशयोक्ति आपण पाहू शकतो. ही अतिशयोक्ति वगळुन इतिहास पहाता येवू शकतो. म्हणजे वाघ्या नव्हताच असे म्हनता येणे अशक्यप्राय होते. भले त्याने चीतेत उडी घेतली नसेल...

त्या गढीतील हा पुरावा
पण इतिहास असा सहजी हुलकावण्या देत नाही. छ. शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा होता याचा पुरावा त्यांच्याच हयातीत कोरल्या गेलेल्या एका शिल्पात उपलब्ध झाला. त्याची हकीगत अशी: सन १६७८ मद्धे महाराजांनी दक्षीण दिग्विजय करुन परततांना कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या छोट्या गढीस वेढा घातला होता. तिथला ठाणेदार येसाजी देसाई मराठ्यांकडुन मारला गेला. पण त्याची पत्नी मल्लाबाईने हार न मानता युद्ध सुरुच ठेवले. यात शेवटी तिला तह करावा लागला, पण शिवरायांनी तिचे राज्य तिच्या मुलाच्या दुधभातासाठी परत दिले आणि पतीच्या म्रुत्युनंतरही ती लढली म्हणुन तिला सावित्रीबाई हा किताब दिला.

ही आठवण कायमस्वरुपी रहावी म्हणुन सावित्रीबाईंनी शिवरायांची अनेक पाषाणशिल्पे बनवली. त्यांत वरील भागात शिवराय अश्वारोही असून दोन मावळे अब्दागि-या घेवून आहेत तर एक कुत्रा त्यांच्या बाजुनेच झेपावत निघालेला आहे.

हे शिल्प बोलके आहे. शिवरायांच्या जीवनात कुत्रा होता, तो त्यांना प्रिय होता हे उघड आहे. अन्यथा त्याचे त्या छोट्या शिल्पात स्थान असण्याचे कारण नव्हते.

शेवटी असे कि, मुळात शिवरायांच्या स्मारकाकडे लक्ष द्यायला खुद्द त्यांच्याच वंशजांकडे वेळ नव्हता. महात्मा फुले यांनी शिवसमाधी प्रयत्नपुर्वक शोधली, एवढी तिची विटंबना झाली होती. भोसले नामक कोणा एका ग्रुहस्थाने १८७५ साली धनलोभाने महाराजांच्या समाधीत खोदकाम करण्याचा उपक्रम केला होता. अशा स्थीतित पुढे शिवस्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला तो लो. टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी. टिळक-शाहु वादामुळे शाहू महाराजांनी टिळकांच्या या प्रयत्नांना दाद दिली नाही. पुढे मदतीला आले ते सवाई तुकोजी होळकर. त्यांनी रु. ५०००/- ची शिवस्मारकासाठी मदत दिली व उर्वरीत पैशांतुन शिवस्मारकासमोरील उध्वस्त चौथ-यावर वाघ्या कुत्र्याचे स्मारक बनवले गेले.

हा झाला इतिहास. आता शिवरायांच्या इतिहासात कुत्रा होता हे स्पष्ट आहे. आता वाघ्याचे स्मारक जेथे आहे तेथे शिवरायांच्या एकाही पत्नीचे स्मारक असल्याचा एकही पुरावा, अगदी ब्रिगेडकडेही, नाही. या स्मारकाला दान देणारे तुकोजी होळकर. गेली ८५ वर्ष वाघ्या उन्हा-तान्हात तेथे इमान आणि स्वामीनिष्ठेचे प्रतीक म्हणुन आहे. धनगर समाजाला कुत्रा हा देवासमान आहे आणि म्हणुनच तुकोजींनी वाघ्याचेही स्मारक करायचे घाटले. यात कोणता ब्राह्मणी कावा आहे? यात शिवरायांचा अवमान कसा होतो? बरे वाघ्याच्या स्मारकाची उंची शिवस्मारकापेक्षा मोठी आहे हा आरोप तर अत्यंत चुकिचा आहे.