धनगर समाजासाठी
एक वाईट बातमी. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधिच्या शेजारी तुकोजीराव होळकर यानी
पैसे खर्च करुन वाघ्या कुत्र्याची समाधी बांधली होती. मधे ही वाघ्याची समाधी तोडण्यासाठी
ब्रिगेड निघाली होती. पण आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला. आता मात्र या समाधीच्या विरोधात
विलास खरातने एक पुस्तक लिहले असून ती समाधी ब्राह्मणानी बांधली असा अपप्रचार चालविला
आहे. ब्राह्मणांचे नाव पुढे करुन वाघ्याची समाधी हटवुन धनगरांचा इतिहास रायगडावरुन नामशेष करण्याचा हा प्रयत्न आहे. धनगरांच्या विरोधात ही शिस्तबद्ध चाल असून विलास खरातला धडा शिकवणे आता गरजेचे
आहे. या पुस्तकाचे नाव आहे "सयीबाई यांच्या समाधीवर कुत्र्याचा पुतळा बसविणारे
बदमाश ब्राम्हण कोण?" खरंतर तिथे सईबाईची समाधी होती हे ब्रिगेडी लोकाना वा बामसेफिना सिद्धच करता आले नाही, तरी यांची काव काव सुरु आहे. रायगडावरच्या वाघ्याची समाधी ही धनगर राजा तुकोजी होळकरानी बांधली असून तो धनगरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. समस्त धनगरानी विलास खरातचा निषेध करत हे पुस्तक मागे घ्यायला
लावावे. हा धनगरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अन्यथा काही वर्षात आपल्याच डोळ्यापुढे
ब्राह्मणांचे नाव पुढे करुन ही धनगरांची ओळख रायगडावरुन उखडून फेकली जाईल.
विलास खरातच्या पुस्तका बद्दल अधिक माहिती खालिल धाग्यावर वाचा
या विषयावर संजय सोनवणी साहेबानी एक माहितीपूर्ण लेख लिहला होता तो खाली देत आहे.
इमानी, रक्षक मानल्या गेलेल्या एका कुत्र्याचे स्मारक हे एका संघर्षाचे
कारण बनु शकेल असे कोणालाही वाटले नसते पण ते तसे झाले आहे खरे. संभाजी ब्रिगेडने ६
जुनपुर्वी शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवले नाही तर ते आम्ही उद्द्वस्त
करू असा इशारा दिला अणि एरवी राखणासाठी कुत्रे पाळण्याची सवय असलेल्या मराठी समाजाला
वाघ्याच्याच स्मारकाच्या रक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाण्याची घटना पहावी लागली.
का तर ब्रिगेडी इतिहासकारांचे दावे!
काय होते
हे दावे?
तर दावा १) शिवचरित्रात कोणत्याही कुत्र्याचे स्थान नाही, तसे लिखित पुरावे नाहीत. २) वाघ्या कुत्रा हा नाटककार राम गणेश
गडकरींच्या कल्पनेतुन निर्माण झालेले पात्र असून त्यांनी राजसंन्यास या त्यांच्या अपुर्ण
नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा प्रथम उल्लेख केला आहे. ही गडकरींची विक्रुती आहे. ३.
शिवस्मारकासमोरील ज्या चौथ-यावर वाघ्याचा पुतळा बसवला गेला आहे तेथे सईबाई, पुतळाबाई वा सोयराबाईंची मुळ समाधी असली पाहिजे. त्यांचा अवमान
करण्यासाठी ब्राह्मणांनी (म्हणजे श्री. न.चिं.केळकरादि) मुद्दाम तेथे कुत्र्याला आणले.
४. वाघ्या कुत्रा हा विलायती कुत्र्यासारखा दिसतो म्हणुन तो शिवकालीन असू शकत नाही.
५. वाघ्या या कुत्र्याचे स्मारक असलेच तर ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा छोटे असायला
हवे होते,
पण प्रत्यक्षात ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा उंच आहे, सबब हा जाणीवपुर्वक केला गेलेला शिवरायांचा अवमान आहे. हे सारे
मुद्दे लक्षात घेता हे वाघ्याचे स्मारक हटवणे आवश्यक आहे, ते न हटवले गेल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या "पद्धतीने"
ते उद्ध्वस्त करेल असा इशारा दिला गेला. त्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एक नवे वादळ
उठले.
येथे या
वादळांत वा विवादांत न जाता, मी व माझे मित्र
श्री. हरी नरके यांनी या संदर्भात सखोल संशोधन करून जे पुरावे मिळवले ते सर्वच ब्रिगेडी
दाव्यांना धुडकावून लावणारे आहेत हे सिद्ध केले. शिवचरित्रात वाघ्या कुत्राचे स्थान
नाही हा दावा निखालस खोटा असल्याचेही पुढे सामोरे आले. एवढेच नव्हे तर या स्मारकासाठी
व शिवस्मारकासाठीसुद्धा मुळात सवाई तुकोजीमहाराज होळकर यांनी देणगी दिली असल्याने, हे स्मारक हटवणे हा होळकरांचा व पर्यायाने धनगर समाजाचा अवमान
असल्याचे सत्य पुढे आल्याने धनगर समाजही अस्वस्थ झाला व श्री महादेव जानकर यांनी संभाजी
ब्रिगेडला त्यांच्याच भाषेत इषारा दिला. शेवटी ब्रिगेडने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित
केले. कदाचित ब्रिगेडला मिळालेला हा पहिलाच घरचा आहेर असावा.
पुरावे
सांगतात कि,
सईबाईंची समाधी ही राजगडावर आहे, म्हणजे ती रायगडावर असू शकत नाही. कारण त्यांचा म्रुत्यु सन
१६५९ मद्ध्ये झाला होता. आजही त्यांचे स्मारक राजगडावर आहे. वाघ्याचे स्मारक जेथे आहे
तेथे पुतळाबाईंची समाधी असू शकत नाही कारण सतीची समाधी बांधण्याचा मुळात प्रघात नाही.
त्यांची सती-स्मारक शीला रायगडावर आजही अस्तित्वात आहे. सोयराबाईंचे ते स्मारक असल्याचा
कसलाही पुरावा आस्तित्वात नाही. मुळात सोयराबाईंचा म्रुत्यु कसा आणि कधी झाला याबद्दल
इतिहासात मतैक्य नाही.
राहिला
प्रश्न वाघ्याचा. तो इतिहासात होता कि नाही याचा. वाघ्या ही एक दंतकथा आहे असे मानण्याकडे
कल आहे. कै. राम गणेश गडकरींनी आपल्या राजसंन्यास या नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा
उल्लेख केला आहे व ती दंतकथा आजही वाघ्याच्या स्मारकावर कोरलेली आहे. पण राजसंन्यासपुर्वीच
१९०५ साली "महाराष्ट्रातील किल्ले" या पुस्तकात श्री. चिं. ग. गोगटे यांनीही
वाघ्याची दंतकथा नोंदलेली आहे. त्यात महाराजांची पालखी परततांना मोकळी जात असलेले पाहुन
वाघ्याने अस्वस्थ होवून जळत्या चीतेत उडीघेवून प्राणार्पण केले असे नोंदलेले आहे. म्हणजे
त्यांनीही वाघ्याची दंतकथा कोठे तरी ऐकलेली होती. दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे असे मानले
तरी दंतकथांना सत्याचा काहीएक तरी आधार हा असतोच. लोकस्म्रुती या पीढ्यानुपीड्या इतिहास
संक्रमित करत राहतात. कालौघात त्यात अतिशयोक्तीही होत जाते. रामायण-महाभारतातही अशी
अतिशयोक्ति आपण पाहू शकतो. ही अतिशयोक्ति वगळुन इतिहास पहाता येवू शकतो. म्हणजे वाघ्या
नव्हताच असे म्हनता येणे अशक्यप्राय होते. भले त्याने चीतेत उडी घेतली नसेल...
| त्या गढीतील हा पुरावा |
ही आठवण
कायमस्वरुपी रहावी म्हणुन सावित्रीबाईंनी शिवरायांची अनेक पाषाणशिल्पे बनवली. त्यांत
वरील भागात शिवराय अश्वारोही असून दोन मावळे अब्दागि-या घेवून आहेत तर एक कुत्रा त्यांच्या
बाजुनेच झेपावत निघालेला आहे.
हे शिल्प
बोलके आहे. शिवरायांच्या जीवनात कुत्रा होता, तो त्यांना प्रिय होता हे उघड आहे. अन्यथा त्याचे त्या छोट्या शिल्पात स्थान असण्याचे
कारण नव्हते.
शेवटी असे
कि,
मुळात शिवरायांच्या स्मारकाकडे लक्ष द्यायला खुद्द त्यांच्याच
वंशजांकडे वेळ नव्हता. महात्मा फुले यांनी शिवसमाधी प्रयत्नपुर्वक शोधली, एवढी तिची विटंबना झाली होती. भोसले नामक कोणा एका ग्रुहस्थाने
१८७५ साली धनलोभाने महाराजांच्या समाधीत खोदकाम करण्याचा उपक्रम केला होता. अशा स्थीतित
पुढे शिवस्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला तो लो. टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी.
टिळक-शाहु वादामुळे शाहू महाराजांनी टिळकांच्या या प्रयत्नांना दाद दिली नाही. पुढे
मदतीला आले ते सवाई तुकोजी होळकर. त्यांनी रु. ५०००/- ची शिवस्मारकासाठी मदत दिली व
उर्वरीत पैशांतुन शिवस्मारकासमोरील उध्वस्त चौथ-यावर वाघ्या कुत्र्याचे स्मारक बनवले
गेले.
हा झाला
इतिहास. आता शिवरायांच्या इतिहासात कुत्रा होता हे स्पष्ट आहे. आता वाघ्याचे स्मारक
जेथे आहे तेथे शिवरायांच्या एकाही पत्नीचे स्मारक असल्याचा एकही पुरावा, अगदी ब्रिगेडकडेही, नाही. या स्मारकाला दान देणारे तुकोजी होळकर. गेली ८५ वर्ष वाघ्या उन्हा-तान्हात
तेथे इमान आणि स्वामीनिष्ठेचे प्रतीक म्हणुन आहे. धनगर समाजाला कुत्रा हा देवासमान
आहे आणि म्हणुनच तुकोजींनी वाघ्याचेही स्मारक करायचे घाटले. यात कोणता ब्राह्मणी कावा
आहे?
यात शिवरायांचा अवमान कसा होतो? बरे वाघ्याच्या स्मारकाची उंची शिवस्मारकापेक्षा मोठी आहे हा
आरोप तर अत्यंत चुकिचा आहे.

Waril mahiti purnpane wachali ahe.
प्रत्युत्तर द्याहटवाYamadhey Kharat sahebanni swatachya manane maghar ghenyas kahihi harkat nahi.
AAAAAAAAAAANNNNNNNNNNIIIIIIIIIIII Shree M.D.Ramteke Sir, Shree sanjay sonawani Sir, Ani Mananiy Shree jankar Saheb Yanchya Samaj Sahakaryas Manaacha Salam.