सोमवार, ९ जानेवारी, २०१२

“बाबासाहेब” उपनाव असे रुजले.


१९२७ ची गोष्ट आहे. अस्पृश्य चळवळीतील एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर. हे नाव १९२७ पर्यंत बरेच लोकप्रिय झाले होते. तेंव्हा बाबासाहेबांचे कार्यालय दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे होते. बाबासाहेबाना भेटायला येणारी सर्व मंडळी त्याना डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर साहेब वा साहेब असे संबोधत. तेंव्हा बाबासाहेब बहिष्कृत भारत (ब.भा.) नावाचे पाक्षिक चालवत असत.  पोयबावाडीतील  कावाराणा बिल्डिंग मधील दुस-या माळ्यावर ब.भा. चे कार्यालय होते. चळवळीसाठी काम करणारे व ब. भा. साठी लेखन करणारे बाबासाहेबांचे काही अनुयायी व विद्यार्थी ईथे मुक्कामी राहात.
सप्टे १९२७ च्या एका रविवारी मोकळ्या वेळेत जेंव्हा ही चळवळीतील तरुण मुले गप्पा टप्पा मारत बसली तेंव्हा त्यांच्यातील चांगदेव भवानराव खैरमोडे या तरुण मुलाने असे सुचविले की, आपल्या साहेबांची किर्ती जगभर पसरत चालली आहे. तसेच ते आपल्या सर्व अस्पृश्य समाजाचे मोठे उध्दारक असून त्यांच्या धर्मपत्नी आम्हा सर्व पोरांस मातेसमान पाहतात. जन्माने आमचे आईबाप वेगवेगळे आहेत, पण आम्हाला या मानवी मुल्ये बहाल करणारे आपण सर्वांचे एकच बाप आहेत ते म्हणजे आंबेडकर साहेब व आपली सर्वांची एकच आई ती म्हणजे रमाई. म्हणून या पुढे आपण आंबेडकर साहेबाना ’बाबासाहेब’ व रमाईना ’आईसाहेब’ म्हणण्याचा प्रघात सुरु करु या. 
उपस्थीत सर्व बांधवाना ही उपनावाची युक्ती आवडली. त्यांच्या त्यांच्यातील चर्चेत व संवादात ती आंबेडकरांचा बाबासाहेब असा उल्लेख करु लागली व रमाईस आईसाहेब म्हणने सुरु झाले. पण हा प्रघात सर्वत्र रुजवायचा होता. मग बाबासाहेबांच्या सभांमधून बोलताना वरिल प्रस्तावातील वक्ते प्रत्येक सभेतून बोलताना ठासून बाबासाहेबआईसाहेब असा उल्लेख करु लागली. सुरुवातीला बाबासाहेबानाही कळले नाही हे काय चाललं. तसही त्याना कळू न देताच ही उपनावं रुजवायची होती. मुख्यत्वे मोरे नि वडवळकर या दोन खंद्या वक्त्यानी बाबासाहेब व माईसाहेब ही उपनावं रुजविण्यात सिंहाचा वाटा उचलाला. हा हा म्हणतार महाराष्ट्रातील प्रत्येक सभेतून या दोन वक्त्यानी वरील उपनावांचा वारंवार उच्चार करुन लोकांच्या मनात ही नावं रुजविली.
१९३० पर्यंत ही दोन्ही उपनावं सर्वत्र ईतक्या आत्मियतेने स्विकारली गेली की आता चळवळीतील लोकं त्याना फक्त बाबासाहेब एवढच म्हणू लागली. नंतर मात्र विरोधकही कित्येक वेळा त्याना बाबासाहेब म्हणू लागले व रमाईस आईसाहेब.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा