मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

हेच ते वादग्रस्त व्यंगचित्र...

शंकर नावाच्या कोणी हरामखोरानी काढलेले हेच ते वादग्रस्त व्यंगचित्र. बाबासाहेबांवर चिखलफेक करण्यास सदैव सज्ज असलेल्या मनूवाद्यानी संधी मिळेल तेंव्हा बाबासाहेबांची बदनामी केली अन स्वत:ला विचारवंत समजणा-यानी मनुवादाला हळूवारपणे उचलुन धरले. तरी भीम सैनिकानी वेळोवेळी मनुवाद्यांचे डाव हाणून पाडले. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरुन मोर्चे काढले. मंत्र्या संत्र्याना घेराव घालत कधी रास्ता रोको तर कधी धरणे आंदोलने देत बाबासाहेबांच्या लेकरानी प्रत्येक वेळी लढा दिला. नुकताच दिलेला लढा म्हणजे बाबासाहेबांचे व्यंगचित्र छापणा-यांचा बंदोबस्त करत शालेय अभ्यासक्रमातून तो भाग वगळायला सरकारला भाग पाडले. अन त्यानंतर लगेच घेतलेल्या The Greatest Indian After Gandhi  च्या पोल मधे बाबासाहेब भारताचे ग्रेटेस्ट इंडीयन ठरले. पण त्यातील आफ्टर गांधी मात्र खटकून जाते. असो.
मागच्या आठवड्यातील आऊटलूकनी अख्ख एडीशन बाबासाहेबांवर काढलं आहे. त्यात त्यानी हळूच त्या वादग्रस्त व्यंगचित्राची बाजू कशी उचलून धरली ते खालील दुव्यावर नक्की वाचा. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा