शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

राज ठाकरेचा राज्यात सर्वत्र निषेधबाबासाहेबांच्या स्मारका बद्दल बेताल वक्तव्य करणा-या राज ठाकरेच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून निदर्शने करण्यात आली. बहुजन विद्यार्थी परिषद विद्यार्थी भारती या दोन संघटनानी काल राज ठाकरेच्या कृष्णकुंजवर थेट मोर्चा नेऊन धडकविला. राज ठाकरे नावाचा विषारी साप परवा आजाद मैदानात जे काही विष फुत्कारला त्याचा जबाब देणे गरजेचे होते.
ज्या बाबासाहेबाच्या संविधानामुळे राज ठाकरे आजाद मैदानात सभा भरवू शकले त्याच बाबासाहेबांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत बाबासाहेबांच्या स्मारकास ’बंगला’ असे संबोधण्याचा खोडसाळपणा राज ठाकरेनी केला होता.
बाबासाहेबांचा व आंबेडकरी समाजाचा राज ठाकरेनी अपमान केला होता. राज नावाचा हा माणूस अत्यंत टोकाचा आंबेडकरद्वेषी आहे हे त्यांच्या वक्तव्या वरुन सिद्ध झाले. तसही ठाकरे घराणे आपल्या आजोबाच्या (प्रबोधनकाराच्या) अगदी विरुद्ध मतप्रवाहाचे आहेत. किंबहून प्रबोधनकारांचे नावही घेण्याची यांची लायकी नाही.
ज्या प्रबोधनकारानी समतेसाठी उभं आयुष्य वाहून दिलं त्यांच्या घरात असे करंटे जन्मास आले याची खंत वाटते. जिथे राज ठाकरेच्या बाबाचा बापही आमच्या बापापुढे बोलत नव्हता तिथे हे करंटे मात्र वाट्टेल ते बरळत सुटले आहेत. तो बाळ्य़ा ठाकरे नामांतर चळवळीच्यावेळी म्हणायचा “घरात नाही खायला पीठ, कशाला पाहिजे विद्यापिठ?” अन अगदी त्याच धरतीवर आता राज ठाकरे म्हणतो की “इंदू मील मध्ये काय बांगला बांधायचा आहे का?” आहे की नाही कमाल यांची.
यावर उत्तर देताना जागो जागो निदर्शन करत महाराष्ट्रभरातून राजचा निषेध करण्यात आला. अनेक ठिकाणी राजचे पुतळे जाळण्यात आले.
राज ठाकरे आता तरी सुधरा. तुमच्या अंगात खरच जर प्रबोधनकारांच रक्त असेल तर बाबासाहेबांची कदर करायला शिका.

मुंबई पोलिसांचा निषेध:
पोलिसांनी मात्र नेहमी प्रमाणे बायस भूमिका घेतली. आंबेडकरी विद्यार्थ्यांचा मोर्चा कृष्णकुंजवर धडकताच मनसेवाले आमच्या लोकांवर तुटून  पडले. दिसेल त्याला लाथा बुक्यानी मारायला सुरुवात केली. घटनेच्या ठिकाणी उपस्थीत असलेल्या पोलिसानी या वेळी(नेहमी प्रमाणे) बघ्याची भूमिका घेत आंबेडकरी विद्यार्थ्यांची मारहाण होऊ दिले. एवढेच नकरता मारणा-याना अटक करण्या ऐवजी पोलिसानी निदर्शने करणा-या आंबेडकरी बांधवानाच अटक केली. महाराष्ट्र पोलिसांची ही कारवाई अत्यंत लज्जास्पद असून मी पोलिसांचाही निषेध करतो. रजा अकादमिने पोलिसाना झोडपले तेंव्हा फार वाईट वाटले होते. पण कालची पोलिसांची भूमिका पाहता रजा अकादमीने अशा पोलिसाना झोडपून चांगलच केलं. अगदी घाटकोपर प्रकरणापासून ते खैरलांजी ते कालच्या प्रकरणा पर्यंत पोलिसांचा आमच्या बद्दलचा पॅटर्न सेम  राहिला आहे. त्यामूळे या देशातील पोलिस यंत्रणेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
 
जयभीम.

२ टिप्पण्या:

 1. राज ठाकरे यांचा जाहिर व तीव्र निषेध !!!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. जय भीम

  आत्ता यावर एकच उपाय आहे !
  आपल्यासाठी स्वतंत्र देशाची मागणी ...... त्या शिवाय आपल्यावरचा अन्याय थांबणार नाही !
  एकदाचे आपण स्वतंत्र देश झाल्यावर आपल्या सारख्यांचे असले फुकटे श्रम तरी वाचतील!

  प्रत्युत्तर द्याहटवा