मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

पॅस्सीव्ह अराष्ट्रियवाद

या पेक्षा मोठा राष्ट्रद्रोह कोणता असेल

या वर्षिचा रमजान अनेक अर्थाने शापित रमजान ठरला आहे. ब्रह्मदेश आगीच्या लाटात ढवळून निघत होता तर ईशान्य भारतात कत्तलीच्या कत्तली चालू होत्या. वरुन हे सगळं बाहेर पडु नये म्हणून सरकारनी जमेल तितकी प्रकरणं दाबुन ठेवली. स्वत:ला पुरोगामी समजणा-या बहुतेक सर्व सामाजिक संस्था मूग गिळून बसल्या होत्या.  या देशात आंबेडकरवादी संघटना अत्यंत वेगवान हालचाली करुन रस्त्यावर उतात हे सर्वज्ञात आहे. पण उभा ईशान्य भारत जळताना एकही आंबेडकरी निळा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरल्याचे दिसले नाही. म्हणजे आंबेडकरवाद्यांची हालचाल ही फक्त ब्राह्मणविरोधातच दिसते अन्य मुद्यांवर आंबेडकरावादी फार उदासिन आहेत हे जाहिर झाले. किंबहुन देशाचे काय व्हायचे ते होवो त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. आमचं भांडण ठरलेलं आहे मग नसते वाद उकरुन उकरुन आम्ही भांड्णं कारु असा एकंदरीत पवित्रा दिसतो. राष्ट्रप्रेम वगैरे अगदी दुय्यम झाले आहे. अंतर्गत वादावादीत आंबेडकरी समाज ईतका गुरफटून गेला की त्याला लढण्यासाठी मिळणारं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानानी दिलं याचाही विसर पडलेला दिसतो. किंबहुना घुसखोरीचा परिणाम एक दिवस या संविधानाला घातक ठरेल याचाही कधी विचार आंबेडकरी लोकाना शिवत नाही याची कमाल वाटते.  बंगाल मार्गे घुसणा-यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणारे आंबेडकरवादी उद्या देश परक्यांच्या हातात गेल्यास काय करतील? हे जर असच चालू राहिलं ना, तर ज्या संविधानामूळे रस्त्यावर उतरुन निदर्शने करण्याचा आधिकार आहे तो फार टिकणार नाही हे याद राखावे.  हा देशच जर उरला नाही तर संविधान व त्यानी दिलेले अधिकार तरी उरणार आहेत का?
आम्ही, आंबेडकरवादी, हिंदु आणि ब्राह्मनांचा द्वेष करण्याच्या नादात एक नवा अराष्ट्रीयवाद जन्मास घालत आहोत याची लाज वाटते. ईशान्यातीळ घुसखोरीवर भ्र शब्द न काढणे कशाचं द्योतक आहे? हा तर Passive सपोर्टच आहे. तिकडची घुसखोरी ईतक्या मुकाट्याने सहन करणारा आंबेडकरवादी ईतका बेजबाबदार कसा काय झाला? की आंबेकरवाद्याना असं वाटतय "मरु द्या आमचं काय जातय. ते बांग्लादेशी येऊन हिंदूचा नाश करतायेत... करु दया" असं वाटत असावं बहुतेक. हा प्रश्न मुळात हिंदू मुस्लिम प्रश्न नसून तो राष्ट्रद्रोही मुस्लिमांचा व घुसखोरांचा आहे हे समजून घेतले पाहिजे.

भीतीने गावाकडे परतणारे ईशान्य भारतीय
कोण आहेत ईशान्य भारतीय? ते आमचे बांधव नाहीत का? की ते हिंदू आहेत म्हणून आंबेडकरवाद्याना हायसं वाटत आहे? बांग्लादेशी जेंव्हा घुसतात तेंव्हा त्याचा फटका असाम मधिल दलिताना बसत नसेल का? नक्कीच बसतो. त्यांचा धर्म कोणताही असो पण ते आमचे बांधव आहेत असा विचार का येत नाही आमच्या(आंबेडकरवाद्यांच्या) मनात?. अंतर्गत वाद असतीलही, याचा अर्थ बाहेरच्यांची घुसखोरी खपवून घ्यायची का? ती खपवून घेणे म्हणजे अराष्ट्रियवाद नव्हे का? या देशावर कुठल्याही मुस्लिमापेक्शा ईशान्य भारतीय नागरीक जास्त प्रेम करतो हे मोठ्या आत्मविश्वासाने सांगता येईल. एवढा आत्मविश्वास हजारो वर्षा पासून ईथे राहणा-या एखाद्या मुस्लिमा बद्दल नक्कीच दाखविता येणार नाही. १९४० मधे हा विश्वास बाबासाहेबानाही वाटत नव्हता. “Thoughts on Pakistan”  ग्रंथात बाबासाहेब सुद्धा म्हणतात की भारतीय सैन्यात खदखदणार मुस्लिम आमचा रक्षक म्हणून उभा करण्यापेक्षा त्याना स्वतंत्र देश देऊन टाका व सीमेच्या पार उभा करा. त्यामूळे किमान कुणाशी लढावं हे ठरवताना गल्लत होणार नाही. अशा अर्थाचं लिखान बाबासाहेबानी करुन ठेवलं ते उगीच नव्हे.
रजा अकादमीनी मुंबईत केवढा घोळ घातला. आठवले ते गवई (ज्यांची नावं घ्यायला मला अजिबात आवडत नाही. मी शक्य तो ही नावं माझ्या ब्लोगवर येऊ नये याची नेहमीच काळजी घेतो) अनेक जण मुंबईत होते पण एकानेही निषेध नोंदविणारा साधा मोर्चा तर सोडाच पण दोन शब्दही बोलले नाहीत. काल रमजान साजरा करताना मोठ्या तो-यात फिरणारे मुस्लिम व त्याना शुभेच्छा देणारे रस्तोतस्तीचे बॅनर पाहून मन हळहळलं. का तर काल ईकडॆ ईदा-ईदी चालू असताना तिकडे चेन्नई, बंगलूर, हैद्राबाद व संपुर्ण भारत भरातून ईशान्य भारतीय हजारोच्या लोंढ्यानी गावाकडे परतत होते. कोणी घडवुन आणलं हे सगळं? ज्यानी कुणी घडविलं त्याच्या मागे आमच्या राजकारण्याची उदासिन वृत्ती ही Passively हातभारच लावत आली आहे. प्रचंड तणावात असलेल्या बिचा-या आसामी बांधवाना उगीच त्याना गोंजारल्यासारखे करुन राजकारणी लोकं ईफ्तार पार्ट्यावर तुटून पडले. नसत्या केल्या ईफ्तार पार्ट्या या वर्षी तर काय हे मेले असते का?  उभा ईशान्य अशांततेत असताना व अर्धे देशबांधव भयभीम होऊन गावाकडे रवाना होत असताना शुभेच्छांचे बॅनरं लावताना लाजा कशा नाही वाटल्या या राजकारण्याना.
घुसखोरी करणा-या मुस्लिमांच्या वोट साठी कुठल्या पातळीवर जाणार आहेत आपले राजकारणी कळत नाही. महागाई वाढते, रोजगार मिळत नाही, हे सगळं घडण्यामागे घुसखोरीचा वाटा नाही का? नक्कीच आहे.  पाकिस्तान जेंव्हा मॅच जिंकते तेंव्हा फटाके वाजविणा-या धरुन वाजविलं असतं तर त्याचा धसका घेऊन पुढचे अनेक अनर्थ टळले असते. पण त्याना म्हटलं वाजवा... वाजवा... काही होत नाही वाजवा. मग काय, त्यानी वाजवलं आमच्या ईशान्यातल्या बांधवाना. तेवढ्यावर न थांबता रजा अकादमीनी मुंबईतल्या पोलिस-पोलिसीनीनाही वाजवलं. राजकारण्यांची स्वार्थबुद्धी  व सामाजीक संघटनांची सूळ भावना नि पुर्वग्रह दुषीत भाव यातून जे जन्मास येत आहे तो एक नवा अराष्टीयवाद  नाही का? हा अराष्ट्रीय़वाद एक दिवस असा घात करेल की नंतर सावरता सावरणार नाही.
शेजारच्याचे घर जळताना शांत बसून पाहण्याची विकृत मनोवृत्ती आज पर्यंत नेहमीच समाजाला व राष्ट्राला घातक ठरली आहे. आता ही वृत्ती टाकून दिली पाहिजे. राजकारण्याना जनतेनी जाब विचारला पाहिजे नि वेळ प्रसंगी अत्यंत कठोर बनत दबाव निर्माण करत सरकारला निर्णायक पाऊल उचलायला भाग पाडले पाहिजे. त्याच बरोबर ब्राह्मण द्वेषानी बुरसटलेल्या आंबेडकरी संघटनाना बाबासाहेबांच्या सच्चा लेकरानी ठणकावले पाहिजे. मुस्लिमांसोबत बसून बिर्यानी खाता खाता त्या रजा अकादमी सारख्याना आवर घालण्याचे सल्लेही दिले पाहिजे. तेंव्हाच हा देश वाचेल व बाबासाहेबांचे संविधानही.
हे सगळं न करता आंबेडकरवादी संघटना बघ्याची भूमिका घेत आहेत. साधा निषेध नोंदविणे तर सोडाच पण ईथला मुस्लिम दुखावू नये म्हणून तिथल्या(बांगलादेशी/पाकिस्तानी) मुस्लिमांच्या घुसखो-यावर मौन बाळगूण आहेत. या भूमिकेला माझ्या शब्दात सांगायचे तर आंबेडकरवाद्यांचा पॅस्सिव्ह अराष्टियवाद असेच म्हणावे लागेल.

३ टिप्पण्या:

  1. Mr Madhukar Saheb, you are missing a point. The act of Athavale, etc. of giving no reactions to the provocations of the protests of Muslims in Mumbai and Lucknow is something that we must appreciate. The whole protests look like part of bigger conspiracy to draw a wedge between Ambedkarites and Muslims. By not reacting to these protests, Ambedkarites have exhihibited an immense maturity and have been successful in failing the enemies of Dalit-Bahujans who wanted to create enemity between Dalits and Muslims.

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. टेके, तुझा आयडी हॅक झालाय. इतकं समजूतदार तू लिहिणं शक्यच नाही !!

    प्रत्युत्तर द्याहटवा
  3. Herambya, Majha ID Jagat Konich hack karu shaknar naahi. khot vatlyas ekda try karun tar pahaa. tula kalel....

    प्रत्युत्तर द्याहटवा