मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

राडापर्व संपले


राडा-पर्वाचा धावता आढावा
३० आक्टो १९६६ शिवसेनेचा दसरा मेळावा भरला. शिवसैनिकाना मद्राश्यांच्या विरोधात पेटवून दिल्यावर मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात आली. ही होती राडा पर्वाची सुरुवात जी अनेकांचा जीव घेत आज पर्यंतचा करून महाराष्ट्रभर पसरली. बाळ ठाकरे या राडा-संस्कृतीचे प्रवर्तक होते.
१९६७ च्या दरम्यान दक्षिण भारतीय निर्मात्यांद्वारे निर्मित चित्रपटांवर बाळ ठाकरेनी बंदी घालण्याची घोषणा केली. मग काय राडाबहाद्दूरानी जागो जागो राडे सुरु केले. सिनेमागुहा फोडणे, काय लोकाना मारणे काय तर रस्तो रस्ती राडा चालू झाला अन बाळ ठाकरे याला मराठी अस्मिता असं नाव देऊन हा वनवा पेटवत ठेवला.
फेब्रूवारे १९६९, ठाकरेनी कानडी लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले. या लढ्यात मराठी विरुद्ध कानडी अशी बत्ती पेटवून सामान्यांच्या जिवाची होळी केली.  एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा मृत्यू व २७४ लोकं जखमी झालीत.
६ जून १९७० ला घडवून आणलेला एक प्रसिद्ध युनियन लिडरचा खून ज्यानी उभा महाराष्ट्र हादरला. हा सुद्धा राडाबहाद्दूरांचा उपदव्याप होता.
जाने १९७४ ला दलित नेता भागवत जाधव यांचा राडेबहाद्दराने खून केला अन आंबेडकरी समाजात प्रचंड दहशत पसरविण्यात आली.
त्या नंतर विदर्भातील दलितांवर राडा बहाद्दरांचे हल्ले चालू झाले अन त्या हल्ल्यात कित्येक दलित कुटूंब उध्वस्त झालीत.
मराठी अस्मितेचा ठेका घेतल्याची आवई उठवत १९७४ ला बिगरमराठीना महाराष्ट्रातून हाकलण्याची घोषणा केली. जी एक ढोंग होती हे लवकरच लोकाना कळलं.
१९८८ मध्ये बाळ ठाकरेनी शिखांच्या विरोधात आवाज उठविला. सुरुवात मद्रास्यांपासून केली ती वाया कानडी शिखांपर्यंत येऊन पोहचली. शिखांच्या व्यवसायावर बंदी टाकण्याचा हा डाव मराठी अस्मितेचा होता असं बिच्चा-या मुंबईकराना वाटला पण त्या मागे खंडणीचं गणीत होतं याचा कूणाला सुगावाही लागला नाही.
१९८९ ला मंडल आयोगानी जे वादळ उठलं ते मात्र ठाकरेला खूप लागलं. ओबीसी आरक्षणासाठी तरून रस्त्यावर उतरला अन ठाकरे मात्र ईथे जातियवाद दाखवायला चुकले नाही. त्याचा परिणाम त्यांचा एक खंबीर व बलाढ्य असा नेता श्री. छगन भुजबळानी ठाकरेना जय महाराष्ट्र म्हटले.
याच दरम्यान तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे असं वक्तव्य करत ठाकरेनी अकलेचे तारे तोडले. किंवा ते कसे राडेबहाद्दर आहेत हे दाखवून दिलं.

१९९१ मध्ये दोपहरका सामनात, अत्यंत खालच्या पातळीवर जात  देशातील स्त्री पत्रकाराना ठाकरेनी ** शी कंपेअर केले. त्या नंतर त्यांचा सर्वत्र विरोध झाला.
१९९७ च्या देश गणतंत्रदिन साजरा करत होता व ईकडे राडा बहाद्दरानी तलसारी या गावी दोन आदीवासींची हत्या केली व स्त्रीयांची अब्रू लुटली.
११ जुलै १९९७ ला रमाबाई आंबेडकर नगर येथे १० आंबेडकरी लोकांची हत्या व ३० जणाना जबर जखमी करणारा तो हत्याकांड शिवसेनेच्या काळातील एक काळी आठवण ठरली आहे. कदम नावाच्या पोलिस अधिका-या एवढा हत्याकांड घडवायचं बळ कुठून आलं. जाहीर आहे राडे बहाद्दरांच्या आशिर्वादातूनच...
नव्वदीच्या शेवटी शेवटी सेना-भाजपानी मराठवाड्यातील ११०० अट्रोसीटीची केसेस काढून घेतले. हा राडे बहाद्दरांना सेनेनी दिलेला अभय तर होताच पण दलितांमध्ये दहशत पसरविण्याचा एक डाव होता.
वरील मुख्य घटनांच्या व्यतिरिकत किनी प्रकरण, मुंबईतील दंगल ते अनेक घटना आहेत जे राडा संस्कृतीचे जनक बाळ ठाकरे यानी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे घडवून आणल्या गेले. मद्रास्यांच्या विरोधात रान पेटवले, त्या नंतर कानडी लोकांच्या विरोधात मराठी माणसाला उभं केलं. त्या नंतर मात्र अचानक हिंदूत्वाचा झेंडा घेत या सगळ्याना भगव्या खाली उभं केलं अन मुसलमानांकडे बोट दाखवत आता तुमचा शत्रू तो असं नवीन समिकरण रुजविलं. त्या नंतर मंडल आयोगाच्या निमित्ताने ओबिसीच्याही विरोधात यानी रणशिंग फूंकले. ईथेच न थांबता बाबासाहेबांच्या रिडल्सच्याही विरोधात लोकाना पेटवलं. मुबईतल्या दंगलीच्या वेळी तेल ओतण्याचं काम केलं अशा अनेक उत्पाताचे जनक म्हणजे बाळ ठाकरे. फक्त राडा करणे हा त्यांचा अयुष्यभराचा एक-कलमी कार्यक्रम होता.
 त्याचा परिणाम असा झाला की फूले-शाहू-आंबेडकरांनी अत्यंत कष्टाने या मातीला पुरोगामी लोकांची भूमी अशी जी ओळख मिळवून दिली होती ती ठाकरेच्या काळाता काही प्रमाणात मलीन होत गेली.  पुरोगामीत्वाची आमची प्रतीमा या काळात डगमगायला लागली होती. ती आता त्यांच्या पिल्लानी चालविली आहे. मनसेचा मागच्या पाच वर्षातला धुमाकूळ म्हणजे तो वारसा आता ईकडे जपला जाणारा याची नांदी होय. असो.
बाळ ठाकरेच्या निधनाने एक पर्व संपले. हो एक पर्व संपले.
एक राडा पर्व संपले.


मरणांतानि न वैराणि...
मागच्या दोन दिवसात माझा मोबाईल कधी नाही एवढा खणाणला. त्यातला प्रत्येक फोन मला अक्कल शिकविण्यासाठी आला होता अन प्रत्येकाच्या तोंडात एक वाक्य हमखास होतं...

मरणांतानि न वैराणि...
 
अरेच्चा... हे काय आता. म्हणे एखादा माणूस मेला की लगेच तो सदगृहस्थ बनतो म्हणे. कोणाचा आहे हा सिद्धांत? हिंदूंचा. बाळ ठाकरे गेल्यावर मी त्यांच्या राडा-संस्कृती बद्धल लेख लिहला व सैनिकांचे(?) धडाधड फोन येऊ लागले. त्याना अंदाज नव्हता ते ज्याच्याशी बोलत आहेत तो त्यांचाही बाप निघेल. एकेकाला फोनवरच असे फटके घातले की काहिनी पार क्षमा वगैरे मागून फोन ठेवला. काही मात्र शेवट पर्यंत भूंकत होते. काहिनी तर घरी येऊन मुडदा पाडण्याचा वगैरे आग्रह धरला. हे सगळं ठिक आहे पण सगळ्यांच्या म्हणण्यातील एक गोष्ट मात्र कॉमन होती ती म्हणजे माणूस गेल्यावर त्याच्या बद्दल वाईट बोलू नये. अगदी माझे मित्र संजय सोनवणी यांनी सुद्धा या अर्थाची पोस्ट फेबूवर टाकली.
आता मला सांगा हे जर खर असेल तर हा न्याय ईतराना पण लागू व्हायला हवा कि नाही? पण तसं काही झालेलं दिसत नाही.
दर वरषी दस-याला रावण दहन होतो. कोण होता हा रावण? अस्सल ऐतिहासिक पुरावे तपासल्यास लंकावतार सुत्तातून रावण बौद्ध असल्याचे सिद्ध होते. तरी आपण रावण बौद्ध होता की नव्हता हा मुद्दा बाजुला ठेवू या. फॉर द सेक ऒफ अर्गुमेंट तो वाईट होता हे जरी गृहीत धरलं, तरी वरचा निमय रावणाला लागू केल्याचे दिसत नाही. मग प्रश्न असा पडतो की मेल्या नंतर शत्रूत्व संपतो हा नियम रावणाच्या बाबतीत का लागू होत नाहिये. का बर हजारो वर्षाआधी मेलेल्या रावणाचं आजही दहन होतं? का बरं बहूजन माणसाला तो न्याय लागू केला जात नाही. अभिजनातला गेला की मेल्या नंतर वैर संपतो पण बहूजनातला मरुन शतकं उलटली तरी वैराची वात धगधगती ठेवली जाते.
अगदी याच धर्तीवर आजून काही संदर्भ पाहिल्यास हा नियम बहूजनाना कधीच लागू केल्या गेला नाही हे सिद्ध होते. उलट बहूजन व्यक्ती मरून कित्येक शतकं उलटली तरी त्याचा द्वेष केला जातो. त्याच्या नावाने अपप्रचार करण्यासाठी एक यंत्रणाच उभी केली जाते. एवढ्यावरच न थांबता बहूजन नायकाचा अपमान करण्यासाठी काही सण ठेवण्यात आले अन दर वर्षी त्या दिवशी त्यांच्या नावाने किंवा पुतळ्याचा अपमान करत अभिजन सण साजरा करतो.
कंस हा एक अत्यंत कार्यक्षम राजा होता. त्याला मारण्यात आले. त्या नंतर ग्रंथाचे ढीगच्या ढीग रचून व संत महंतां द्वारे प्रवचनाचे अनेक कार्यक्रम राबवत कंसाची सातत्याने बदनामी केली जाते. हे का बरं थांबत नाही. तो वाईट होता हे सांगण्याची प्रथा का बरं पाडली जाते.
त्याच बरोबर दुर्योधनालाही सातत्याने बदनाम करण्यात आले आहे. तो मरून शतकं उलटली तरी आजही दुर्योधनाच्या नावानी साहित्याच्या माध्यमातून का बर बदनामीच्या मोहीमी चालविल्या जातात. कारण ते बहूजन होते म्हणून. बास.
बडी राजाचा खून करून व त्यांच्या मुलांची कत्तल करून राज्य बळकावणा-या वामनाची पूजा व दिवाळीच्या दिवशी बलिप्रतिपदा... व्वा रे हिंदूनो... अरे तुमचा तो मुत्यू नंतर वैर संपतोवाला नियम ह्या वरील लोकाना का बरं लावला गेला नाही.
मरणांतानि न वैराणि...
हे एक कावेबाज वाक्य असून त्याचा प्रचार करणारे हे खोटारडे व समाजकंटक लोकं आहेत.  
हे वाक्य बहूजनांच्या बाबतीत कधीच लागू केले गेले नाही. अभिजनांचे पाप झाकण्यासाठी मात्र हे वाक्य नेहमीच उपयोगी पडले आहे. 
शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

एका बहूजन द्वेष्ट्याचा अंत

आज दि. १७ नोव्ह २०१२ एक द्वेषपर्व संपले. बाळ ठाकरे संपले.  ख-या अर्थाने पूरोगामी महाराष्ट्राला हिंदुत्वाचा चेहरा देण्याचा प्रयत्न करणा-या, मुस्लिम व दलितांचा सद्वैव तिरस्कार करणा-या एका बलाढ्य पण जातीयवादी नेत्याचे द्वेषपर्व आज संपले.

घरात नाही खायला पीठ! कशाला पाहीजे विद्यापीठ!

वरिल वाक्य ज्याने अत्यंत हीन पातळीवर जात आंबेडकरवाद्यांच्या विरोधात रान उभं करण्यासाठी मुख्य स्लोगन म्हणून वापरले त्या आंबेडकर द्वेष्टयाचा मृत्यू खरच सूखावून गेला.

आता काही लोकं तत्वज्ञान सांगायला येतील की गेलेल्या माणसा बद्दल तुम्ही असं कसं लिहू शकता. पण यावर आधीच उत्तर देऊन ठेवतो.
गेलेल्या बद्दल चांगले बोलणे हे हिंदू तत्वज्ञान आहे, आमचं नाही.  माझं तत्वज्ञान अगदी साधं व सोपं आहे. जो माणूस जिवंत होता तोवर चांगला नव्हता तो गेल्यावरही चांगला नाहीच. ठाकरे बद्दलही माझं मत हेच आहे. जो ठाकरे मला जिवंतपणी चांगला वाटला नाही तो आज गेल्यावर अचानक चांगला कसा काय वाटेल? अजिबात नाही. जिवंत ठाकरेचाही मी राग करतो अन आज गेल्यावरही मी त्याचा रागच करतो. गेल्या गेल्या त्याची अचानक प्रतिमा बदलण्याचं काही एक कारण नाही.

ठाकरे हे मुळात तत्वज्ञानी किंवा विद्वान नव्हतेच, ते होते एक कार्टूनिस्ट. पुढे मद्रासी लोकांच्या विरोधात एक कार्टूनपणा केला अन अचानक मुंबईकरांचे ह्रीरो बनले.  गंमत बघा. मद्रासी लोकांच्या विरोधात रान उठवताना ठाकरेनी असा खोटा आव आणला जसं काही ते मराठी माणसासाठी लढत आहेत. मद्रासी विरोधात त्यांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती असं लोकाना वाटलं अन बिचारे मुंबईकर मात्र खरोखरच उत्स्फूर्तपणे या मद्रासी विरोधाच्या लढ्यात उभा ठाकला.
काही वर्षात लगेच मुंबईकरांच्या लक्षात आले की ठाकरे नंबर एकचे खोटारडे व फसवे आहेत. कारण जस जशी ठाकरेंची मुंबईवरील पकड पक्की होत गेली तस तसं मद्रासी लोकांचा वावर खूद्द ठाकरेच्या दारबारी दिवसेंदिवस वाढत गेला.  याता मात्र मुंबईकर भांभावून गेले. खरं काय अन खोट काय त्याना कळेनासे झाले.
ठाकरेच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आपली बनवेगीरी लोकांच्या लक्षात येत आहे हे कळल्यावर ठाकरेनी दुसरा डाव टाकला तो म्हणजे मुसलमानांच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली.  मराठी अस्मिता ते हिंदू अस्मिता व हिंदू हृदय सम्राट असा हा प्रवास सुरु झाला. मुसलमानाच्या विरोधात आवई उठवायला सुरुवात केल्यावर बिचार मुंबईकर मद्रासी द्वेष पार विसरून गेली. आता मात्र मद्रासी व मराठी एकत्र येऊन मुसलमानांच्या विरोधात  दंड थोपटून उभे झाले. ठाकरेनी परत एकदा खोटा डाव स्वत:च्या बाजूने उलटविण्यात यश मिळविले होते. अन त्या नंतर मुंबईतील दंगलीत काय काय झालं हे उभ्या जगानी पाहिलं.

नामांतर लढ्यातील मुख्य विलन
हे सगळं चालू असताना ठाकरेनी आजून एक डाव खेळला. मुस्लिमांच्या विरोधात हिंदूना उभं करून लोकांचं रिक्त पिणे सुरु झालं पण ठाक्रे नावाच्या रक्तपिसासूची तहान ईथे भागली नाही. मुस्लिमांच्या रक्ता व्यतिरिक्त आजून एक समाजाचं रक्त पिण्याचं नियोजन सुरु झालं, समाज म्हणजे आंबेडकरी समाज.  
दलित पॅंथरची चळवळ सत्तरच्या दशकात मुंबईत अत्यंत प्रभावी व बलाढ्य झाली होती. अन त्या नंतर लगेचच नामांतराचा लढा सुरु झाला.  
हजारो वर्ष दारिद्र्यात नि अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला तिथून खेचून बाहेर काढण्याचं कार्य करणा-या बाबासाहेबांच्या स्मरनार्थ मराठवाडा विद्यापिठाचे नामांतर व्हावे यासाठी आंबेडकरी समाजाने नामांतर चळवळ चालविली होती.
अन ठाकरे नावाच्या या जातियवाद्याला हे अजिबात नको होतं. त्यानां बाबासाहेबांचं नाव नको होत. त्याना दलितांची प्रगती नको होती. त्याना तळागळातल्या लोकांचा उत्कर्ष नको होता. मग काय ठाक्रेनी घोषण केली की या लढ्याच्या विरोधात आपण उभे ठाकलो आहे. अन ठाकरेच्या राडेबहाद्दूर लोकानी उत्पात सुरु केला. हा हा म्हणता मराठवाड्यात दंगली-सुरु झाल्या. आंबेडकरी समाजाच्या लोकाना वेचून वेचून मारणे सुरु झाले. दलित वस्तीला आगी लावल्या जात होत्या. आंदोलन कर्त्याना धरून मारल्ल्या जाऊ लागलं. अन एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे पोच्या कांबळेची जालीम पद्धतीने कत्तल करण्यात आली.  
जिकडे तिकडे हाहाकार उडाला होता. ठाकरेची पिल्ल आता ठाकरेची डायलॉग मारत फिरत होती

घरात नाही खायला पीठ, कशाला पाहिजे विद्यापीठ!
घरात नाही खायला पीठ, कशाला पाहिजे विद्यापीठ!
घरात नाही खायला पीठ, कशाला पाहिजे विद्यापीठ!
घरात नाही खायला पीठ, कशाला पाहिजे विद्यापीठ!

हे सगळं घडत होतं ठाकरेच्या आंबेडकरद्वेषामूळे. पण सुदैवानी शरद पवार साहेबांसारखी माणसं त्या वेळी सत्तेत होती म्हणून शेवटी नामांतर झाले.

ईथेच ठाकरेंचा द्वेष थाबला तर नवल. त्यांचा आंबेडकरद्वेष वाढतच गेला.  त्यानंतर रमाबाई नगर मधली घटना घडली अन कदम नावाच्या एका पोलिस अधिका-याने बेछून गोळीबार करत आंबेडकरवाद्यांची कत्तल केली. या कदमांना ठाकरेच्या पिल्लानी अभयदान देत परत एकदा ठाकरे म्हणजे पूरोगामी महाराष्ट्राला नेत्याच्या रुपात मिळालेला शाप होय हे अधोरेखीत केले. अशा महाराष्ट्राला शाप ठरलेल्या ठाकरेंचा आज मृत्यू झाला.
हा माणूस जिवंत होता तेंव्हा आयुष्यभर आंबेडकरवाद्यांचा व मुसलमानांचा द्वेष करत फिरला. त्यामुळे ठाकरे  बद्दल माझ्या मनात कधीच आदर नव्हता. आजही तो नाहीच.
उलट हा माणूस जिवंत होता तो पर्यंत महाराष्टात अनेक दंगली झाल्या, कित्तेकांचे जीव गेले अन जातियवाद फोफावला. त्यामुळे ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या पूरोगामित्वावर एक शाप होता. आज त्यांचा मृत्यू म्हणजे तो शाप संपला असे म्हणायला हरकत नाही.