मंगळवार 28 फेब्रुवारी 2012

बोधिसत्व कसे प्राप्त होते


आपण सर्व बाबासाहेबाना बोधिसत्व बाबासाहेब असे संबोधतो. परवाच्या रविवारी विहारात चक्क एका स्त्रीने हा प्रश्न विचारला होता कि बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते?. तिथल्या धम्मचा-यानी त्याचे उत्तर दिले. हाच प्रश्न इतराना पडत असल्यास त्याचे उत्तर म्हणून बोधिसत्वाचा अर्थ व प्राप्त होण्याचे टप्पे ईथे देत आहे.
बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. दहा पारिमितांचे पालन करताना बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होते.
१० पारमिता
१)   शील:- शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे.
२)  दान:- म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे.
३) उपेक्षा:- म्हणजे आप्तिता, अनासक्ति, आवड-नावड नसणे, फलप्राप्तिने विचलीत न होणे, निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.
४) नैष्क्रम्य:- म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५) वीर्य:- योग्य प्रयत्न करणेहाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.
६) शांती:- म्हणजे क्षमाशीलतात, द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.
७) सत्य:- कधीही खोटे न बोलणे, कोणाचीही चुगली न करणे, कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.
८) अधिष्ठान:- ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.
९) करुणा:- समस्त प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.
१०) मैत्री:- प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.

वरील दहा पारिमितांचा सराव करता करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते. ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था. एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की मग जी अवस्था प्राप्त होते तीला बुद्धत्व म्हणतात. तर दहा पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते पाहू या.
पायरी: १) मुदिता:-  आनंदर प्राप्त करुन घेतो,  सर्व पाणिमात्रांच्या कल्याणाची तळमळ लागते.
पायरी: २) विमलता:- कामवासनेचे सर्व विचार काढून टाकणे आणि दयाशील बनने.
पायरी: ३) प्रभाकारी:- अनात्म व अनित्याचे आकलन होते, बुद्धी सतेज होऊन सर्वोच्च ज्ञानाची ईच्छा होते, तो कशाचाही त्याग करण्यास तयार होतो.
पायरी: ४) अर्चिस्मती:- अग्नी प्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता मिळवतो, अष्टांग मार्गाचे अनुसरण करतो, चतुर्विध ध्यान व व्यायाम करुन इच्चाशक्तीच्या बळावर पंचशिलेचे अनुकरण करतो.
पायरी: ५) सुदुर्जया:- त्याला सापेक्ष व निरपेक्ष याचे ज्ञान प्राप्त होते.
पायरी: ६) अभिमुखी:- अविद्येने अंध असलेल्या व्यक्ती विषयी अगाध करुणा बाळगणे.
 पायरी: ७) दूरगमा:- अनंताशी एकरुप होतो. मोह, माया, तृष्णेपासून अलिप्त होऊन परोपकार, सहनशीलता व व्यवहार चातुर्य मिळवितो. शक्ती, शांती, बुद्धी(प्रज्ञा) चा संपुर्ण अभ्यास व धर्माचे ज्ञान होते.
पायरी: ८) अचलावस्था:- जे जे चांगले आहे ते सर्व स्वाभाविकताच करतो. जी जी गोष्ट करेल त्यात यशस्वी होतो.
पायरी: ९) साधुमती:- ही स्थीती अत्यंत महत्वाची असून, या स्थीतीत उपासकास धर्म, शास्त्र, दिशा  जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
पायरी: १०) धर्ममेथ:- या स्थीतीत बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टि प्राप्त होते.
अशा प्रकारे दहा पारिमितांचे पालन करता करता साधक बोधिसत्वाच्या एक एक पाय-या चढायला सुरुवात करतो. एक एक टप्पा पार करायला कित्येक वर्षे जावी लागतात. दहा पारिमिताचा पाया जेवढा भक्कत तेवढी बोधिसत्वाच्या पाय-या ओलांडण्याची गती जास्त.
बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर दहा पारिमितांचे पालन करत करत बोधिसत्व बनले. ते आजून काही वर्ष जगल्यास त्याना बुध्दत्व प्रात झाल्यावाचून राहिले नसते.

१० पारमिता

बाबासाहेबानी धर्मांतराच्या वेळेस २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या होत्या. त्या २२ प्रतिज्ञा अत्यंत महत्वच्या असून त्यातील १२ प्रतिज्ञा दहा पारिमितांचे पालन करण्यास सांगते. पण कित्येकाना त्या दहा पारिमिता काय आहेत हेच माहीत नसल्यामूळे त्यांची अडचण होते. त्या दहा पारिमिता खालील प्रमाणे आहेत.
१० पारमिता
१)   शील:- शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे.
२)  दान:- म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे.
३) उपेक्षा:- म्हणजे आप्तिता, अनासक्ति, आवड-नावड नसणे, फलप्राप्तिने विचलीत न होणे, निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.
४) नैष्क्रम्य:- म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५) वीर्य:- योग्य प्रयत्न करणे,  हाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.
६) शांती:- म्हणजे क्षमाशीलतात, द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.
७) सत्य:- कधीही खोटे न बोलणे, कोणाचीही चुगली न करणे, कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.
८) अधिष्ठान:- ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.
९) करुणा:- समस्त प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.
१०) मैत्री:- प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.

सर्व बौद्ध बांधवानी या दहा पारिमितांचे पालन करण्याचा प्रयत्न करावा.

२२ प्रतिज्ञा अभियान आणि शब्दप्रामाण्यवाद

बाबासाहेबानी आंबेडकरी समाजाला बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या होत्या. त्या २२ प्रतिज्ञा नागपूरच्या पवित्र भूमित बाबासाहेबानी समस्त पददलिताना हिंदू धर्माच्या दलदलीतून कायमचे खेचून बाहेर कढण्यासाठी नि सदैव बौद्ध आचरणास कटिबद्द करण्याच्या हेतूने वधवून घेतल्या होत्या. हिंदु समाजातील अस्पृश्य लोकांची बौद्धत्वाशी नाळ जोडताना तोडणारा घावही तेवढाच  प्रभावी असावा याची खबरदारी घेत २२ प्रतिज्ञाची सोय केली. हिंदुत्व नाकारणा-या प्रतिज्ञा देत बौद्ध तत्वज्ञानाशी नवे नाते जोडण्याचा तो आगळा वेगळा प्रयोग होता. हिंदुत्व झुगारुन बौद्ध धम्म स्विकारणा-याना त्या तंतोतंत लागू होत्या. आज त्या घटनेला अर्ध शतक उलटुन गेले. बाबासाहेबानंतर ही तिसरी पिढी सुरु आहे. आमचे  आजोबा, वडील हे बौद्ध होते. बौद्ध म्हणून जन्मलेली ही आमची तीसरी पिढी आहे. आमचा हिंदू धर्माशी काहीएक संबंध नाही. कोणेकाळी आमचे पुर्वज हिंदू होते ही गोष्ट आज इतिहासजमा झाली असून हिंदुत्वाशी आज आमचे काही देणे घेणे नाही.
बाबासाहेबानी १९५६ मधे हिंदू असलेल्या महाराना बौद्ध बनविताना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या तेंव्हाच्या लोकाना लागू होत्या. पण आज मात्र त्या २२ प्रतिज्ञा सरसकट लागू पडत नाहीत, त्यातील काहीच प्रतिज्ञा आम्हाला लागू पडतात. तरी सुद्धा स्वत:ला आंबेडकरवादी समजणा-या महामुर्ख लोकानी २२ प्रतिज्ञा अभियान मोहीम उघडून २२च्या २२ प्रतिज्ञा बौद्ध बांधवांकडून वधवून घेत आहेत. २२ प्रतिज्ञा या मूळात कुठल्याही बौद्ध माणसास लागूच पडत नाही. त्या जर कुणास लागू पडत असतील हिंदूस लागू पडतात ही साधी गोष्ट या अभियान कर्त्यांच्या लक्षात येत नाही.  
अरविंद सोनटक्के यानी ६ डिसेंबरला चैत्यभूमीत २२ प्रतिज्ञा अभियान  मोहीमे अंतर्गत बौद्ध लोकाना धरुन धरुन २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या. कित्येक बौद्ध बांधवाना त्या बद्द्ल निषेधही नोंदवीला होता. त्याच प्रकारे अनेक वृत्तपत्रातून व प्रत्येक विहारातून आता २२ प्रतिज्ञा वधवून घेणे सुरु झाले आहे.  काही वर्षा आधी विहारांतून बुद्ध पुजा-पाट केला जाई. पण आता मात्र त्याच्या जोडीला २२ प्रतिज्ञाही दाखल झाल्यात. प्रत्येक विहारातून व सार्वजनीक पुजापाठ, धार्मिक विधी नि ईतर कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात  २२ प्रतिज्ञांचा प्रचार व प्रसार चालू आहे. त्याच बरोबर नेटाने त्या २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या जात आहेत. पण या प्रतिज्ञा आपल्याला लागू पडतात  का असा कुणी विचार सुद्धा करत नाही. बाबासाहेबानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा डोळे बंद करुन व बुद्धी गहान टाकून म्हटल्या जाण्यामागचे कारण हिंदू द्वेष की बाबासाहेबांच्या प्रति असलेली एकनिष्ठता हे ठरविणे अवघड होऊन बसले आहे. तरी जरा खोलात जाऊन पाहिल्यास  हेच सिद्ध होते की या २२ प्रतिज्ञांच्या मागे हिंदू द्वेषच जास्त आहे. अन्यथा बाबासाहेबांच्या प्रति निष्टा असती तर २२ प्रतिज्ञा मधून दिलेल्या १० पारमितांचे पालन सुरु झाले असते. २२ प्रतिज्ञा म्हणणा-यानी दारु सोडली असती. सर्वांना समान लेखले असते. खोटे बोलणे सोडले असते. यातलं काहीच होताना दिसत नाही. म्हणजे त्या प्रतिज्ञातील समाजोध्दारक तत्वज्ञा नको आहे. हिंदू द्वेषापुर्ती त्या प्रतिज्ञा हव्या आहेत. २२ प्रतिज्ञा म्हणणे हा आंबेडकरवाद्यांचा एक नवा ढोंग आहे. २२ प्रतिज्ञातील मतीतार्थ समजून घेण्यातही कुणाला रस नाही. २२ प्रतिज्ञामधील हिंदुत्व नाकारणा-या व त्याचा विरोध करणा-या प्रतिज्ञावर सगळा भर असतो. पण उरलेल्या ईतर प्रतिज्ञा मात्र नुसत म्हणायचं म्हणून म्हटल्या जातात. तर चला आपण २२ प्रतिज्ञा काय आहेत, त्या म्हणण्याची मानसीकता व उद्देश काय आहे ते सविस्तर पाहू या.

हिंदुत्व नाकारणा-या पहिल्या सहा प्रतिज्ञा येणेप्रमाणे आहेत.
प्रतिज्ञा क्र. १:-  मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. २:- राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. ३:- मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. ४:- देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
प्रतिज्ञा क्र. ५:- गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. ६:- मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
वरील  प्रतिज्ञा हिंदूत्व नाकारणा-या आहेत. आम्ही जन्माने बौद्ध असल्यामूळे हिंदूत्व नाकारण्याचा प्रश्नच नाही. म्हणून बाबासाहेबांच्या त्या सहा प्रतिज्ञा माझ्यासारख्या Buddhist by Birth माणसला लागू पडत नाही. त्यामुळे मी या सहा प्रतिज्ञां कधीच म्हणत नाही. जे आजही स्वत:ला हिंदू मानतात त्यानी नक्की म्हणावे. आम्ही हिंदू धर्म सोडून अर्धा शतक उलटले. जन्माने बौद्ध असल्यामूळे आम्ही बुद्धाची उपासना करीत वाढलो. ब्रह्मा, विष्णू  व महेश यांच्याशी तीन पिढ्य़ा आधीच नाते तोडण्यात आले. बौद्ध म्हणून जन्मलेले आम्ही तरुण मुलं हिंदू धर्माची दिक्षा घेऊन वरील देवतांचा स्विकार केला नाही, ते आमचे दैवत नाहीत वा त्यांचा आमचा काही संबंधही नाही. त्यामूळे त्याना नाकरण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याना आम्ही स्विकारलेच नाही. जे आमचे देव नाही त्याना नाकारण्याची प्रतिज्ञा कशी काय घेता येईल. म्हणून वरील १ ते ६ या सर्व प्रतिज्ञा आम्हाला गैरलागू आहेत.
प्रतिज्ञा क्र. ७:-  मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
सातवी प्रतिज्ञा मात्र मला लागू पडते.  कारण मी बुद्धाच्या शिकवणनुसार वागण्यास कटिबद्द असून तसा प्रयत्न करतो आहे.
प्रतिज्ञा क्र. ८:-  मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. 
मी जन्माने बौद्ध असल्यामूळे वरील प्रतिज्ञा मला गैरलागू पडते.
प्रतिज्ञा क्र. ९:-  सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. १०:-  मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
प्रतिज्ञा क्र. ११:-  मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
प्रतिज्ञा क्र. १२:-  तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
प्रतिज्ञा क्र. १३:-  मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
प्रतिज्ञा क्र. १४:-  मी चोरी करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १५:-  मी व्याभिचार करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १६:-  मी खोटे बोलणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १७:-  मी दारू पिणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १८:-  ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
९ ते १८ सर्व प्रतिज्ञा मला बंधनकारक असून मी त्या पालन करण्याचा प्रयत्न करतो. नवबौद्धांकडून वरील प्रतिज्ञा नुसतं वधवून न घेता त्याचे पालन होत आहे का, याची फेरतपासणीही केली जावी. ही तपासणी कुणी त्रयस्थाने न करता प्रत्येक बौद्धाने आत्मचिंतनाने तपासून पहावे की आपण ९ ते १८ प्रतिज्ञाचे पालन करतोय का? किंबहूना तसा प्रयत्न तरी करतोय का?
प्रतिज्ञा क्र. १९:-  माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणा-याक व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणा-या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
ही प्रतिज्ञा म्हणताना खुद्द बाबासाहेब दोन क्षण थांबले, त्या दोन क्षणात बाबासाहेबांच्या डोळ्यापुढून अडीच हजार वर्षाचा काळ झरझर सरकला. ज्या धर्माने शतकानू शतके आपल्या बांधवांचा अतोनात छळ केला त्याची आठवण होऊन त्यांचे डोळे भरुन आले. अन दुस-याच क्षणात  मात्र त्यांच्या चेह-यावरील मुद्रा बदलली. अशा या नीच धर्माचा त्याग करताना त्याना आनंद होत होता. ती गुलामी झुगारण्याचा हा दिवस मोठ्या कष्टाने प्राप्त झाला होता. लगेच स्वत:ला सावरत बाबासाहेब ही प्रतिज्ञा पुर्ण करतात. उपस्थीत महार समाजातील सर्व बांधव हिंदू धर्माचा त्याग करणारी ही प्रतिज्ञा दाटलेल्या कंठानी पुर्ण करत  नव्या धम्मात प्रवेश करतात.  ही घटना आहे १९५६ ची. आज त्या घटनेला पाच दशकं उलटलून गेलीत. मधल्या काळात आंबेडकर चळवळीची राजकीय आघाडी जरी खिळखिळी झाली तरी सामाजीक व धार्मिक आघाडी मात्र प्रबळ होत गेली. त्याचा परिपाक म्हणजे पन्नास वर्षात झालेली बौद्ध धम्माची वृद्धी.  
आजच्या घटकेला २२ प्रतिज्ञा मधील ही १९ वी प्रतिज्ञा आपल्याला लागू पडते का हा महत्वाचा प्रश्न आहे? काय सांगते १९वी प्रतिज्ञा? ही प्रतिज्ञा हिंदू धर्माचा त्याग करायला सांगते. मी तर बौद्ध आहे, मग मी हिंदु धर्माचा कसा काय त्याग करु शकतो? करुच शकत नाही, म्हणून १९ प्रतिज्ञा मला गैरलागू पडते. मी ज्या धर्माचा कधीच नव्हतो (by birth / by choice) तेंव्हा त्या धर्माचा त्याग करतो असे म्हणने म्हणजे केवळ मुर्खपणा ठरेल. आजचे नवबौद्ध (आंबेडकरी) मात्र जाहीरपणे ही १९वी प्रतिज्ञा प्रत्येक कार्यक्रमात म्हणत असतात.  बरं एखादी व्यक्ती पहिल्यांदा ही प्रतिज्ञा म्हणत असल्यास असे गृहित धरायला हरकत नाही की ती व्यक्ती हिंदू आहे, त्या धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माचा स्विकार करत आहे. पण ईथे तसं होत नाही. दर रविवारी ही प्रतिज्ञा म्हटली जाते. म्हणजे मधल्या काळात हे घरी जाऊन परत हिंदू धर्माची दिक्षा घेतात की काय? म्हणून त्याना तो परत त्यागावा लागतो. जर तसे नसेल तर मग ते हिंदू नसतानाही हिंदू धर्माचा त्याग करण्याची खोटी प्रतिज्ञा घेत असतात की कसे? याचाच अर्थ जाहीरपणे ते खोटे बोलत असतात. म्हणजे बौद्ध धम्माचा अपमानच करत असतात. एखादी व्यक्ती हिंदू नसताना हिंदू असल्याचा आव आणत तो धर्म त्यागन्याची प्रतिज्ञा घेत असेल तर हा खोटारेडपणा आहे. जर हिंदू असेल तर मग तो धर्म वारंवार कसं काय त्यागता येतो? एकदा १९वी प्रतिज्ञा म्हटली की झालं, त्यागला तो हिंदू धर्म. पण  काही दिवसानी परत तो त्यागण्याची प्रतिज्ञा म्हणजे मधल्या काळात बौद्ध धम्म त्यागल्याचा पुरावा नव्हे काय? याचा अर्थ सरळ आहे की ही आंबेडकरी म्हणवून घेणारी लोकं एकतर दर आठवड्याला धर्म बदलत असतात किंवा याना ती प्रतिज्ञा कळतच नाही. जर दर आठवड्या धर्म बदलून परत परत तीच ती धरसोड करत असतील तर नैतिक पातळीवर त्याना बौद्ध म्हणवून घेण्याचा अधिकारच राहत नाही. किंवा दुसरी शक्यता म्हणजे ती प्रतिज्ञा त्याना कळतच नाहीये. पण न कळावं असं काय आहे त्या प्रतिज्ञेत. साधी, सोपी प्रतिज्ञा आहे. ’मी हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्विकार करतो.’ यात न कळण्यासारखं काय आहे? १९वी प्रतिज्ञा दुस-यांदा म्हणणारे समस्त आंबेडकरवादी हे आंबेडकरद्रोही, धम्मद्रोही नि खोटारडे ठरतात. तसेच हे ही सिद्ध होते की मधल्या काळात त्यानी वेळोवेळी बौद्ध धम्माचा त्याग करुन हिंदू धर्म स्विकारला अन प्रत्येक वेळी तो १९व्या प्रतिज्ञेद्वारे त्यागला. म्हणजे २२ प्रतिज्ञा मधील १९वी प्रतिज्ञा म्हणणारा प्रत्येक आंबेडकरी हा खोटारडा, फसवा नि धम्मद्रोही आहे.
प्रतिज्ञा क्र. २०:-   तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
प्रतिज्ञा क्र. २१:-   आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. २२:-   इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
२०,२१ व २२ या प्रतिज्ञा सर्वकाळ लागू पडतात. म्हणजेच बाबासाहेबानी धर्मांतराच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पैंकी आज आपल्याला लागू पडणा-या प्रतिज्ञा कोणत्या, तर ७, ९, १०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,२०,२१,२२ अशा एकून १४ प्रतिज्ञा आपल्याला लागू पडतात. १ ते ६ प्रतिज्ञा हिंदू धर्म नाकारणा-या आहेत व आपण हिंदू नसल्यामूळे त्या गैरलागू आहेत. ८ वी प्रतिज्ञा ब्राह्मणाच्या हातून क्रियाकर्म करण्याचे नाकारणारी आहे व १९ वी हिंदू धर्माचा त्याग करणारी. 
प्रश्न असा आहे की वरील २२ प्रतिज्ञा कुठे घेतल्या  जातात ? बुद्ध विहारात. मग सांगा जो माणूस बुद्ध विहारात येतो तो ब्राह्मणाकरवी विधी करवून घेत असेल का? अजिबात नाही. तेंव्हा ८वी प्रतिज्ञा म्हणण्याची खरच गरज आहे का?

शब्दप्रामाण्यवाद
वरील संपूर्ण युक्तीवाद ज्या  एका शब्दानी खलास होतो तो शब्द म्हणजे शब्दप्रामाण्यवाद. मलातरी हे अभियानवाले शब्दप्रामाण्यवादी आहेत की काय अशी शंका येते. प्रतिज्ञांचा अर्थ काहिही असो, त्या आज लागू पडो अथवा न पडो. पण त्या बाबासाहेबानी दिल्या आहेत म्हणून आम्ही म्हणतो. मग मी हिंदू नसलो तरी बाबासाहेबानी म्हटलं म्हणून मी ही असेच म्हणतो की ’मी हिंदू धर्माचा त्याग करतो’ असा हा शब्दप्रामाण्यवाद असण्याची शक्यताही आहे. पण आंबेडकरवादी माणसला शब्दप्रामाण्यवाद करण्याचा अधिकारच नाही. कारण बाबासाहेबानी व बुद्धानी स्पष्ट्पणे सांगून ठेवले आहे की ’मी सांगतो म्हणून मानू नका, तर्कावर तपासून बुद्धीस पटल्यास ते स्विकारा’ हे वाक्य बाबासाहेबानी त्यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात नमूद करुन ठेवले आहे. स्वत: हिंदू नसताना हिंदू धर्माचा त्याग करतो असे म्हणणा-या शब्दप्रामाण्य वाद्यांचा बाबासाहेबानी आधीच बंदोबस्त केला आहे. तरी सुद्धा जर शब्दप्रामाण्यवाद रुजत असेल तर ही आंबेडकर चळवळीची हार आहे. २२ प्रतिज्ञा अभियान मोहिमेतून तर शब्दप्रामाण्यवाद ठळकपणे दिसून येतो. बाबासाहेबानी जसे म्हटले आम्हिही तसेच म्हणू, मग त्यातील काही भाग कालबाह्य झालेला का असेना? म्हणजेच शब्दप्रामाण्यवाद. हा शब्दप्रामाण्यवाद समाजाला कुठल्या दिशेनी घेऊन जातोय? विनाशाच्या दिशेनी. हे जर असेच चालू राहिले तर काही वर्षानी ईथे आंबेडकरवादयांचा नवीन आंबेडकर-अपौरुष्येय असा नवा ग्रंथ जन्मास यायला वेळ लागणार नाही.  ज्या अपौरुष्यय तत्वज्ञानाशी झगडा करुन बाबासाहेबानी बुद्धाचे तत्वज्ञान दिले, ते पडले बाजूला व शब्दप्रामाण्यवादातून प्रवास करत आंबेडकरी समाज नव्या अपौरुष्येय च्या दिशेनी चालला आहे.  
२२ प्रतिज्ञा अभियान वाल्यानी वरील सर्व गोष्टीचा विचार करावा, त्या प्रतिज्ञा कुठे लागू पडतात, कितपत लागू पडतात याच विचार करुनच त्या वधवून घ्याव्यात. आजून ५० वर्ष जर त्या २२ प्रतिज्ञा जशाच्या तशा रेटल्या तर या शब्दप्रामाण्यवादाचा परिपाक म्हणून कालबाह्य गोष्टीना नाकारण्याची वृत्ती कमी होत जाईल. त्याच बरोबर नवे न स्विकारण्याची वृत्ती बळावत जाईल आणि यातून जे नवे तत्वज्ञान आकार घेईल ते अपौरुष्येय पेक्षा फार वेगळे नसणार.
जयभीम.

गुरुवार 9 फेब्रुवारी 2012

"मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?" - डा. बालाजी जाधव

मी डा. बालाजी जाधव यांचे "मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?" ही पुस्तिका वाचली. डा. जाधव बहुदा तरुण असावेत आणि तरुणांमद्धे जो एक स्वाभाविक उद्रेक आणि संताप असतो त्याचे दर्शन त्यांचा या पुस्तिकेत दिसते. परंतु असे लेखन करत असतांना आपणच आपल्या मुळ विचारांशी प्रतारणा करत जातो याचे भान उद्रेकी तरुणांनी ठेवले पाहिजे असे वाटले म्हणुन हे परिक्षणवजा विचारमंथन मी मांडत आहे. उदाहरनार्थ जाधवांना धर्मवीर ही संद्न्या नको आहे...पण क्षात्रवीर म्हटलेले चालते. (प्रुष्ठ २९-३०). याचा अर्थ ते नकळत चातुर्वर्ण्य मान्य करतात. संभाजी महाराज हे ना क्षात्रवीर होते, ना धर्मवीर...ते राष्ट्रवीर होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक राहील. परंतु यात लेखकाची चुक नसुन जे संस्कार जाणीवपुर्वक काही हिंदुत्ववादी संघटना घडवत आले आहेत त्याची ही अन्याय्य परिणती आहे.

तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले नसुन त्यांची हत्त्या झाली असे डा. जाधव म्हणतात आणि ते तार्किकद्रुष्ट्या बरोबरही आहे. किंबहुना मी एकमेव चित्रकार आहे ज्याने तुकारामांच्या खुनाचे चित्र काढले आहे. परंतु याच तुकारामांचे दशावतारी स्वरुपात जेंव्हा देहुत शिल्पे उभारली जातात तेंव्हा मात्र मराठावादी संघटना काय करतात हा प्रश्न आहे. "मराठा ही एक लढवैय्यी जात आहे..." असे ते आपल्या पहिल्याच प्रकरणात लिहितात. ते खरे असेल एके काळी, परंतु सध्या तरी मराठा ही सत्तेसठी हपापलेली आणि स्व-बांधवांना, स्वजातेयांना वापरुन घेत त्यांना पायतळी तुडवत वाट्टेल त्या तडजोडी करत स्वनाशाकडे वाटचाल करणारे जात बनली आहे हे दुर्दैवाने नमुद करावे लागते.

दुसरे असे कि गोतिये नामक रास्ववादी, जन्माने फ्रेंच माणसाने अलीकडेच पुण्यात लोहगांवात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले. मी त्या विरोधात तीन महिन्यांपुर्वी एकामागोमाग तीन लेख लिहिले. निवडनुक आचारसंहिता वगैरे त्या मधल्या दोन महिन्यांच्या काळातही एकाहे मराठा संघटनेने त्या दैवत्वीकरणाचा निषेध केला नाही. उलट अलीकडेच या मंदिराचे उद्घाटन झाले. त्या महान कार्यक्रमात राष्ज्ट्रवादीच्या महान नेत्याची पत्नी सुहास्य हजर होती...हे राजकारण आहे असा युक्तिवाद मला नंतर याच चळवळीतल्याच काही मराठा बांधवांनी ऐकवला. परंतु तुम्ही करता ते राजकारण...बाकी मात्र ब्राह्मणांचे हस्तक असा युक्तिवाद करतांना आपणच आपली घोर फसवणुक करुन घेत आहोत याचे भान असायला नको काय? राजकारण जेंव्हा समाजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे असा आभास होवु लागतो त्यातच त्या-त्या समाजाच्या अवमुल्यणाची बीजे रोवली गेलेली असतात हे भान मराठ्यांनी करुन घ्यायला हवे असे मला या पुस्तकाच्या निमिताने वाटते.

मराठा समाज हा एका दलदलीत अडकला आहे. सत्ताकारणाचा हव्यास हा मराठा समाजाचा मुलमंत्र बनला आहे. सर्वसामान्य मराठे या वातावरणात एवढे मश्गुल आहेत कि स्वत:ची लाजीरवाणी स्थिती त्यांच्या लक्षातच येत नाहीय. म्हणुन ते इतिहासाचे मुडदे उखडण्याच्या मागे लावले गेले आहेत. इतिहास हा अफुची गोळी बनवला जात आहे. इतिहासाचे तटस्थ विश्लेषन करणे व त्या इतिहासापासुन शिकणे व चुका दुरुस्त करणे हे वेगळे, परंतु प्रतिइतिहास लिहिण्याच्या नादात आपण वर्तमानाच्या बेड्या मात्र घट्ट करत नेत आहोत याचे भान यायला हवे. खरे तर ब्राह्मणांनी गतकालात जी पापे केली असतील ती केली, परंतु वर्तमानात मात्र
प्रत्यक्षात मराठा नेतेच त्यांचे पाय-पंख कापत चालले आहेत याचे भान त्यांना नाही. मराठे आणि ब्राह्मण समाज यांचे साटेलोटे आजचे नाही. कार्यकर्त्यांना ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात अदकावुन द्यायचे आणि नेत्यांनी मात्र ब्राह्मनी संस्था-पक्षांशी आतुन सौदेबाजी करायची ही बाब या भाबड्या मराठा तरुणांच्या लक्षात येत नाही हे एक दुर्दैव आहे. राष्ट्रवादीने अक्षरश: वेदाचार्य (म्हणजे सध्या तरी एवढा कर्मठ माणुस सापडणार नाही) मोरेश्वरशास्त्री घैसासांच्या पत्नीला तिकिट दिले याचा निषेध या मराठ्यांनी (म्हणजे मराठावादी संघटनांनी) का केला नाही याचे उत्तर जर "राजकारण" हे असेल तर मराठा हे षंढ आहेत हे बालाजी जाधव यांचे मत योग्य आहे असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

ब्राह्मणशाही कि मराठाशाही यात कोणाला निवडायचे हा प्रश्न आता उद्भवु लागला आहे याचे कारण मराठा राजकारणात आहे. गोतिये शिवाजी महाराजांचे मंदिर बनवतोय...वाईट वाटते...पण मतदार राजा दुखवायचा नाही...मग असुद्यात कि ते...काय बिघडले...हे मराठेच म्हणनार...मग लेखकाच्या पुस्तकाचे शिर्षक योग्यच आहे असे म्हणने भाग आहे.

म्हनजे शिवाजी महाराजांचे दैवतीकरण कसल्याही स्थितीत होता कामा नये यासाठी संघर्ष करणारे, नवे नवे शत्रु अंगावर ओढुन घेणारे आम्ही मर्द महामुर्खच कि!

शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नांव घेत वारंवार ब्राह्मणी कथा जशा येतात तशा विरोधी अर्थाने नव्या बनवत आणि प्रचार करत समाज एकत्र येईल आणि मराठ्यांचे नव सांस्क्रुतीक वर्चस्व स्वीकारेल असा भ्रम या नव-विचारवंतांना झाला आहे कि काय असा प्रश्न उपस्थित होतो. डा. बालाजी जाधव हे एन्याय्य व्यवस्थेविरुद्ध पोटतिडिकेने लिहितात, परंतु अभ्यास आणि अधिक चिंतनाची आवश्यकता आहे. मराठा समाजात वानवा आहे ती तटस्थ चिंतकांची. रा.स्व.वाद्यांनी मुस्लिमांना टार्गेट करायचे, पण घातपातांसाठी त्यांचीच मदत घ्यायची हे नाटक देशपातळीवर जसे सुरु आहे तसेच येथे ब्राह्मनांना जाहीरपणे शिव्या द्यायच्या आणि आतुन त्यांचीच मदत घ्यायची आणि बहुजनांना ठकवायचे हा उद्योग तरुणांच्या तरी ध्यानी यायला हवा. "प्रुथ्वी नि:ब्राह्मण करा..." असे डा. जाधव एका प्रकरणात (प्रुष्ठ २१) म्हणतात. रा.स्व. वाले मुस्लिमांच्या कत्तलीची भाषा करतात तसेच हे विधान आहे. मुस्लिम विरोध केला तर हिंदु एकत्र येतील आणि ब्राह्मण विरोध केला तर मराठेतर बहुजन मराठ्यांच्या मागे येतील हे समजने हे सत्ताकेंद्रित भावनेपोटीचे राजकारण आहे. रास्ववाद्यांना या घोषणेचा फायदा जसा झाला नाही तसाच तो मराठावादी संघटना व पक्षालाही होत नाही. द्वेषाच्या पायावर कोनतेही राजकारण किमान या देशात तरी यशस्वी होत नाही...होनार नाही हा बोध किमान विचारवंतांनी तरी घ्यावा ही या लेखामागील तळमळ आहे.

बरे इतिहासाचे पुनर्लेखन करतांना शिवाजी महाराजांपुर्वीचा इतिहास आणि संभाजी महाराजांनंतरचा इतिहास सांगायला का टाळाटाळ केली जाते? ताराराणी, राजाराम महाराज यांबाबत किती लेखन आहे बरे? शिवपुर्व काळातील इतिहासाबद्दल का लेखन होत नाही? याचे कारण आहे जिजाऊ, शिवाजी व संभाजी यांच्या नांवाचा वर्तमानात राजकारंणासाठी, भावना पेटवण्यासाठी उपयोग सहजी करता येतो म्हणुन कि काय?

संत तुकारामांबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण मराठ्यांना तो अलीकडेच वाटु लागला. तोही केंव्हा तर मराठा हे कुणबी आहेत असा जावईशोध त्यांनी लावला तेंव्हा. तुकोबा हे कुणबी होते आणि त्यांनी त्यांच्या अभंगात अभिमानाने म्हटलेच आहे. परंतु तुकोबांनी कोठेही आपण मराठा असल्याचा उल्लेख केलेला नाही हे का विसरले जाते? मराठा आणि कुणबी या सर्वस्वी वेगळ्या जाती आहेत. अभिप्रायार्थचे हे पुस्तक सरळ मराठा जातीबद्दल असल्याने मी हे स्पष्ट करत आहे. काही मराठा संघटना आपण बहुजनवादी आहोत असा आव आणत होत्या परंतु आरक्षणाच्या लढाईत उतरत त्यांनी आपला खरा चेहरा दाखवला यावरही व्यापक चिंतन व्हायला हवे. मराठ्यांनी आपले हित पाहु नये कि काय? मी म्हणतो अवश्य पाहिलेच पाहिजे, त्यासाठी बहुजनवादी बुरखा घेण्याची मुळीच आवश्यकता नाही.

बालाजी जाधव यांच्या लेखनात मराठ्यांच्या हलाखीची वर्णने आहेत. ती खरीच आहेत. मी सहमत आहे. महाराष्ट्रातील दीड-दोनशे मराठा घराणी सोडली तर उर्वरीत मराठे हे पुर्ण-ते अर्धवेळ बेरोजगार आहेत. राजकारण्यांच्या-राजकारणाच्या नादी लागत कसलीही सर्जनात्मकता (अपवाद आहेत) न दाखवता, स्व प्रगतीचे मार्ग न धुंडाळता आपापली आयुष्ये सत्तेच्या स्वप्नात वाया घालवत आहेत. परंतु प्रत्येक राजकीय घराण्यांनी (यात मराठाच नव्हे तर अन्यही आले) त्यांची भावी पिढ्यांचीही सोय लावुन ठेवली आहे. अशा स्थितीत इतरांना तर सोडाच खुद्द मराठा नव-नेत्यांना हुजरेगिरी केल्याखेरीज संधी नाही हे उघड आहे. आणि ही हुजरेगिरी म्हणजे समाजाला अलेली षंढता आहे हेच जाधवांचे म्हणने खरे करते.

त्याच वेळीस जेथे जमेनींचे भाव चढे आहेत तेथे बापजाद्यांच्या जमीनी गुंठेवारीत विकुन रातोरात कोट्याधीष होत तेच पैसे वारांगणांवर, वारुणीवर ते लगोलग नगरसेवक ते ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी तयार आहेतच! भिकारी व्हायला किती वेळ लागतो? मग हेच "भुमीपुत्र" म्हणत ज्या जमीनी कारखान्यांना विकल्या तेथे ठिय्या मांडुन नोक-यांची भीक मागायला तयारच कि! लग्नावळेंवरचा मराठा समाजातील खर्च हा अचाट वाढला आहे. जेथे स्वत: खर्च करने शक्य नाही तेथे खोटी कर्जे काढत हे उद्योग पार पाडले जातात, हे काय मराठा तरुणांना समजत नाही? मी मला स्वत:लाच माहित असलेली शेकडा उदाहरने तरी देवु शकतो. शिक्षण, द्न्यान, उद्यमशीलता आणि कष्ट यांना प्रतिष्ठा देत प्रगती साध्य करण्या ऐवजी मराठा तरुनांना दास करण्याचे या नव-सरंजामदारी नेत्यांचे लांगुलचालन करण्यात जर मराठा तरुणांना धन्यता वाटत असेल तर शिवशंकर त्यांचे भले करो एवढेच मी म्हणु शकतो.

हे प्रबोधन कोणतीही मराठा संघट्ना करत नाही. उलट मराठ्यांना आरक्षणाचे गाजर दाखवत आपल्या स्वार्थासाठे पुढे रेटत नेतात आणि हे मेंढरांसारखे त्याच वावटळीत आपले भविष्य शोधतात. शेवटी त्यांचा कडेलोट अपरिहार्यपणे होतो हे वास्तव डा. जाधवांसारख्या तरुणांनी मांडायला हवे असे मला कळकळीने वाटते.

मी "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तिकेतुन मी जो अन्वयार्थ काढतो तो असा कि अरे मराठ्यांनो षंढ होवु नका. राजकारणापेक्षा ख-या अर्थकारणाकडे अधिक लक्ष द्या. सत्ता ही सर्वांना मिळु शकत नाही. ज्या घराण्यांच्या , मग ते कोणत्याही जातीचे असोत, ताब्यात ती आहे ते अन्य कोणाला शक्यतो त्यात प्रवेशु देनार नाहीत. सत्ता ते आपल्याच आणि फक्त आपल्याच भावी पिढ्यांसाठी आरक्षित करुन ठेवनार. मराठ्यांना आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल...पण त्याची वाट पाहण्यात स्वत:चीच ससेहोलपट आहे हे लक्षात घ्यावे लागेल. हे सरंजामदार तुमचा वापरच करुन घेणार. आणि जे आपला वापर करु देतात ते षंढच असतात याबाबत शंका असण्याचे काहीएक कारण नाही. मराठ्यांनी मराठ्यांचे अहितच केले आहे हे तरी समजावुन घ्या. तुमचे नेते...मग ते सामाजिक असोत कि राजकीय...त्यांची युती धर्मसत्तेच्या प्रतिनिधींशी...बळकट होत चालली आहे...मग तुमच्या या ब्राह्मण द्वेषाला काडीइतकाही अर्थ रहात नाही.

उलट आज आपण काय घालवत चाललो आहोत यावर विचार करायला हवा. बालाजी जाधवांचा संतप्त उद्गार हा बंव्हंशी अन्यायाच्या जाणीवेपोटी आहे...पण अन्यायाची रुपे सर्वांगीनपणे त्यांनी पहावीत तरच त्यांचा विचार हा खरा स्वागतार्ह ठरेल. त्यांचे पुढील लेखन हे अधिक व्यापक सामाजिक विचारांवर आधारित असेल आणि ते समाजाला पुढे नेण्यासाठी अधिक विचार मांडतील अशी अपेक्षा त्यांच्याकडुन ठेवावी असेच त्यांचे मुलभुत विचार आहेत.

मराठ्यांनो षंढ झालात काय?
लेखक: डा. बालाजी जाधव
प्रकाशक: पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद
मुल्य: रु.३०/-

--- by Sanjay Sanwani