बुधवार, १६ जानेवारी, २०१३

भारताचा सैनिकी इतिहास म्हणजे अखंड पराजयाची मालिका..बाबासाहेब नेहमी म्हणायचे “भारताचा सैनिकी इतिहास म्हणजे अखंड पराजयाची मालिका...” या वाक्यावर हिंदू मात्र चवताळून उठायचे. सावरकरानीतर चक्क सहा पानं लिहून टाकलीत. खरच भारताचा इतिहास असा होता का याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केल्यावर मला ते खरच आढ्ळून आले.  सावरकरांचा मुख्य आरोप असा आहे की बौद्धानी घात केल्यामुळे व शत्रूला साथ दिल्यामूळे भारताचा वेळोवेळी पराजय झाला. किंवा भारताच्या पराजयात बौद्धांचा मुख्य वाटा होता. मग मी बुद्धपुर्व काळात जाऊन भारतीय सैनिकी इतिहास तपासून पाहिला.  असे आढळले की तेंव्हाही भारतीय सैन्य हारतच होते. म्हणजे भारतीय सैनिकाना हारण्याची खोडच आहे. त्यात बुद्धाचा काही संबंध नाही. बुद्धपुर्व काळात असो वा बुद्धा नंतरच्या काळात असो. भारतीय सैन्य हे नेहमी पराजीतच होत राहिले आहे. कसे ते पाहू या.
बुद्धा नंतरच्या काळातील भारतीय सैन्याची दाणादाण सर्वत्र नोंदलेली आहे ते सांगायची गरज नाही. बुद्ध पुर्व काळातही भारतीय सैन्याची काशी दाणादाण उडाली ते पाहू या. हा इतिहास दोन प्रकारे तपासता येईल.
१) इतिहास व पुराव्यांच्या आधारे
२) वेद, पुराणे व अनैतिहासिक पुरावे ग्राह्य धरुन.

इतिहास व पुराव्यांच्या आधारे

पहिल्या प्रकारातील उत्तर असे असेल की हल्ले झाले नाही किंवा झाले याचा पुरावा देणारा ग्रंथ/संदर्भ उपलब्ध नाही. त्यामूळे ठामपणे मत मांडत हल्ले झालेच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. बुद्धपुर्व काळाचा इतिहास उपलब्ध नाही. इतिहास लिहायचा म्हटल्यास स्थल-काल देणे अनिवार्य असते. हे बुद्धपुर्व काळाच्या बाबतीत आजतरी अशक्य आहे. उद्या काही नवीन पुरावे पुढे आल्यास ते शक्य होईलही. अन वेद-पुराणातले संदर्भ ऐतिहासिक नाहीत. त्यामूळे भारताचा इतिहास लिहताना बुद्ध पुर्व काळात जाताच येत नाही. म्हणजे बुद्धपुर्व काळात भारतीय सैनिकानी काय दिवे लावले हे तपासायला फारसा स्कोप नाही. शक, कुशाण व हूणांचे हल्ले बुद्ध काळा नंतरचे. सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे इस्लाम, अन या इस्लामची स्थापनाच सहाव्या शतकातली. म्हणजे इस्लामानी हिंदुना माती चारली ते बुद्धा नंतरच. या सगळ्याचा एक आरोप काय तर हा पराजया मागे बौद्ध धम्म होता. तशी ही कल्पना व अरोपच मुळात विनोदी आहे पण उत्तर देणे गरजेचे आहे. त्यामुळे बुद्धपुर्व काळातील हिंदुचे पराजय तपासावे लागले. मग काय इतिहास तर उपलब्ध नाही. जे काही आहे ते वेद व पुराणांत. वेद तपासल्यावर हिंदुच्या पराजयाचे एक एक किस्से बाहेर पडले ते कसे पाहू या. 

आता वेद-पुराणाच्या पातळीवर पाहू या.

वेदांची निर्मिती ही सनपुर्व १७०० ते २३०० च्या दरम्यानची आहे. वेदांची निर्मिती करणारा कोण? त्याचे नाव आहे राजा सुदास. हा सुदास सरस्वती नदीच्या काठी राज्य करत होता. म्हणजे आजचा अफगाण-इराण सिमेलगतचा भाग. म्हणजे चॅन्सेस असे आहेत की तो मूळ भारतीय नसावाच. ईराणी-ग्रीक वगैरे संकरीत वगैरे असावा. किंवा अगदी टिळक म्हणतात तसं अगदी रशियाच्या वरच्या भागातला कुठला तरी आर्य असावा.  मग काय? या सरस्वती नदीकाठच्या राजानी भारतीय राजांशी युद्ध पुकारले त्या युध्दाचा रुग्वेदात संदर्भ येतो. या युद्धाला दाशराज्ञ युद्धा असे म्हणतात.  सरस्वती काठचा सुदास विरुद्ध भारतीय दहा असे हे युद्ध होते म्हणून त्या युद्धाला दाशराज्ञ युद्ध असे म्हटले जाते. मग काय भारतीय सैन्य हे युद्ध हारते.  अन सुदास मात्र हे युद्ध जिंकतो. हा आहे रुग्वेदीय पुरावा.(खरं तर रुग्वेदाला मी मानत नाही पण जे मानतात त्याना भारतीय सैन्याची अखंड पराजयाची मालिकाही मान्य करावे लागेल.)  अन रुग्वेदातील  दाशराज्ञ युद्धात जे हरले ते कोण होते तर ईथले आपल्या मातीतले दहा विराट साम्राज्य असणारे. म्हणजे एका इराण्याने(किंवा आर्याने) रुग्वेद काळात दहा हिंदुना(किंवा मुळ भारतीय राजाना) हरवले. याचाच अर्थ रुग्वेद काळापासून जेंव्हा बुद्धाचा जन्म व्हायला आजून दोन हजार वर्षे होती तेंव्हा पासून भारतीयाना हारण्याचा रोग होता.
कोण होते हे दहा राजे १)शिव २) पख्त ३) भलनस ४) द्रह्यू ५) अनू ६) मत्स्य ७) भृगू ८) अलिन ९) विषाणिन व १० ) पुरु वरील हारणा-यांची नाव पाहून तुमच्या लक्षात येईल की हे दहा राजे कोण असतील. भृगू म्हणजे परशूरामाचे वंशज. शिव म्हणजे लिंगपुजक म्हणजे शिव शंकरवाले. अन ईतर सगळेही आजच्या हिंदूचे पुर्वज होते हे नावातून दिसतेच आहे. म्हणजे हिंदुंची हारण्याची खोड ही बुद्धपुर्व २००० वर्षाची आहे. असे रुग्वेदातून सिद्ध होते.

ग्रीकांचा इतिहास व संदर्भ:

हिरोडोटस नावाचा एक ग्रीक इतिहासकार आहे ज्यानी सनपुर्व १२०० च्या काही नोंदी लिहून ठेवल्या. त्या नोंदिप्रमाणे असे सिद्ध होते की सनपुर्व १२०० मधे तुर्कस्तानातील हट्टी साम्राज्य कोसळले व पराजीत झालेले तुर्की तुर्कस्तान सोडून पुर्वेकडे सरकले. आता प्रश्न असा पडतो की हे पराजीत तुर्क गेले कुठे?  नक्कीच ते इराण अफगाण मार्गे भारतात आले. म्हणजे शक, कुशाण व हूण जसे आले तसे, अगदी त्यांच्या एक दीड हजार वर्षापुर्वी हट्टी साम्राज्य कोसळल्यावर पराजीत झालेले तुर्कही आले.  हे ’फ्र्गु-फ्रिजीया’ या नावाने ओळखले जात. हेच फ्रिजीयी(पराजीत लोकं) पुर्वेकडे सरकत सरकत भारतात येऊन धडकले व ईथल्या लोकाना पराजीत करुन ईथले राजे बनले. पुढे याच फ्रिजीयांचे बिग्रस व बीग्री असे झाले.  म्हणजे काय तर रुग्वेद काळातसुद्ध ईथला सैनिक हारायचा. हट्टी साम्राज्याच्या काळातही ईथला सैनिका हारायचा. अन बुद्ध काळा नंतर म्हणजे शक, कुशाण व हूण वगैरे ज्या टोळ्या ईथे घुसल्या त्या ईथल्या सैनिकांचा धुव्वा उडवून व पराजय करुन घुसल्या.  ज्याचं खापर बौद्धांवर फोडण्याचा काहिनी प्रयत्न केला आहे. पण बौद्धपुर्व संदर्भ तपासल्यास हेच सिद्ध होते की तो तर हिंदुचा वारसाच होता. सैनिकी पराजय हे हिंदुच्या रक्तातच आहे.  म्हणून बाबासाहेब म्हणायचे “भारताचा सैनिकी इतिहास म्हणजे अखंड पराजयाची मालिका...” ती मालिका रुग्वेद काळापासून सुरु होते अन आज पर्यंत चालू आहे.
आजून एक महत्वाची घटाना म्हणजे हडप्पा व मेहंजोदडॊ चा पराजय. (हा पराजय होता की नैसर्गिक आपत्ती हे आजून सिद्ध व्हायचे आहे. पण आर्यांच्या हल्ल्यात ते शहर बुडाल्याचा प्राथमिक तर्क आहे) जर हे खरे निघालेच तर भारतीय सैन्याची हारण्याची खोड ही ३००० वर्ष जुनी होती हे सिद्ध होईल.
थोडक्यात काय तर बुद्ध पुर्व ३००० पासून हिंदूना हारण्याची खोड आहे. यात बुद्धाचा काय दोष.

गुरुवार, १० जानेवारी, २०१३

आठवले... संघाची चड्डी घाला!

रामदास आठवले हे आंबेडकरी चळवळीच्या राजकीय आघाडिचे एक नेते आहेत. म्हणजे ते आंबेडकर चळवळीचे नेते नाहित तर एका आघाडिचे नेते असून ती आघाडी म्हणझे निळा झेंडा दाखवून भीक मागत फिरणारी आघाडी आहे. त्या आघाडिचे नाव आहे आर.पी.आय(अ). पण गंमत बघा या आघाडिच्या  नेत्याला वाटतं की सगळी आंबेडकरी चळवळ त्याच्या पाठिमागे आहे. शिवसेनेला पण असाच गैरसमज झाला अन आठवलेला आपल्या कंपूत जागा दिली.
खर तर आठवलेची काहिच लायकी नसताना पवार साहेबांच्या आशिर्वादाने तो नेता बनला व चार पदं उपभोगली. अन अचानक या आठवलेला असं वाटू लागलं की आपण साला आपून तो शेर हाये. जणू काही पवार हे आपल्यामुळेच सत्तेत आहेत असाही एक समज झाला अन आठवलेनी पवाराना जयभीम ठोकला.
तिकडे सेनेकडे जाऊन आठवलेनी मोठ मोठ्ठाल्या थापा मारल्या "अमूक एवढे नि तेवढे भीम सैनिक माझ्या पाठिशी आहेत" सेनेला वाटलं "अरेच्चा म्हणजे आता या पुढे सत्ता आपलीच" अन आपल्या वाट्याच्या काही जागा आठवलेला देऊन टाकल्या. पण जास्त वाट पहावी लागली नाही. हा आठवले ’मै भीम का शेर हूं’ म्हणत सेनेत शिरला खरा पण झालेल्या निवडणूकित दाणादाण उडाल्यावर लगेच ’अरे ये तो शेर नही बिल्ली है’  म्हणत सेनेनी लाथा घातल्या.  मग काय डरकळी ते म्यॅंऊ असा प्रवास व्हायला फार काळ लागला नाही. हा होता भीमसैनिकांचा पहिला दणका. त्या नंतर बरेच दणके बसले व सर्वानी पाहिले.
या घायाळा शेरला (छे बिल्ली) हवी होती एक संधी अन मराठी साहित्य संमेलनावरुन जो वाद उठला त्यात याला ती दिसली. बहती गंगामे हात धुवून घ्यायला आठवले विसरले नाहीत. बाळ (साहेब नाही बरं का) ठाकरेच्या नावावरुन जो वाद उठला त्या वादात पड्ण्याचं काही कारण नसताना आठवले मात्र परत एकदा हरवलेली डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करत म्हणतात ’बाळूचं नाव बदलल्यास संमेलन उधळून लावू!’ 
अरे व्वा... हे काय आठवले? तुम्ही ईतकी मोठी कोलांट उडी मारलित व्हय. नाही तसं तुम्ही कोलांटऊडी बहाद्दुरच आहात हे माहित होतं पण .... एवढी मोठी उडी. च्यायला आता काय बोलावं.

थोडातरी भीम तुझ्यात असेल असे वाटले होते

खंत वाटते मला ते तसे उगीच वाटले होते.
नामांतर लढ्याच्या वेळी “घरात नाही खायला पीठ, कशाला पाहिजे विद्यापिठ?” ही ज्यांच्या प्रचाराची(प्रतिप्रचाराची?) पंचलाईन होती त्या ठाकरेच्या बाजूने कालचा भीमसैनिक आज उभा होतो याची खरच लाज वाट्ते.
आता काय, आठवलेएवढ्यावर थांबतील असे वाटते का? अजिबात नाही. उद्या ते राष्ट्रिय स्वयंसेव संघाचं सदस्यत्व स्विकारतील. त्या नंतर त्यांची हाप चड्डी घालून फिरतील. अन संविधान व आंबेडकरी चळवळिच्या विरोधात निळाझेंडा फडकवतील. हे सगळं लवकरच पाहायला मिळणार. आज पर्यंत जोकर सारखे कपडे घालून फिरणारा हा आठवले उद्या हाफ चड्डिवाल्यांच्या गटात चड्डिघालून बसलेला दिसल्यास नवल वाटून घेऊ नका.  कारण आठवलेचा प्रवास ऑलरेडी त्या दिशेनी सुरु झाला आहे.
मी तर म्हणतो, आठवले आता लवकरात लवकर संघाची चड्डी घाला...

मंगळवार, ८ जानेवारी, २०१३

कु-हाड आली रे आली....

मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाची कु-हाड छापून जातीयवाद्यानी परत एकदा आपला नीचपणा सिद्ध केला. ज्या परशुरामाचा इतिहास सांगताना असे सांगितले जाते की परशूरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली. हे सांगताना असेही सांगितले जाते की नुसतं जिवंत क्षत्रीयांचीच नाही तर आईच्या पोटातील अर्भकांची सुद्धा कत्तल करत परशूरामानी ही पृथ्वी निक्षत्रीय केली. अशा प्रकारे शूर परशुरामाने क्षत्रीयांचा नायनाट केला, निप:त केला वगैरे वगैरे सांगितले जाते. हे सगळं किती खोटं व थोतांड आहे  हे सांगण्याची गरज नाही. पण गंमत बघा, या थोतांडाची व अशा क्रुर हत्तेची जिथे लाज वाटायला हवी होती तिथे तोंड वरं करुन मोठ्या थाटात परशुरामाचे गुणगाण तर गायले जातेच पण चक्क साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर अशा क्रुरकर्म्या कु-हाड छापली जाते, याला काय म्हणावं? कशाचं द्योतक आहे हे? परशूरामाचा या पातळीवर जाऊन समर्थन करणारा समाज कशा मनोवृत्तीचा आहे? का बरं एखादा क्षत्रीय द्वेष्टा यात मातितल्या दुस-या एखाद्या समाजाला पुजनिय वाटतो? का बरं एखादा समाज क्रुर हत्याकांडाचं एवढं समर्थन करतो? हा सगळा विचार केल्यावर हा सनातनी समाज किती घातकी व समाजद्रोही आहे हे परत एकदा अधोरेखित होते. आज जातियवादाचे राजकारण खेळले जात आहे, वोटबॅंकसाठी राजकारणी जात  टिकून राहावी म्हणून प्रयत्न करतात वगैरे गप्पा हाणल्या जातात. पण निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाची कु-हाड काहितरी वेगळच सांगते. सनातनी समाज कसा बहुजन विरोधी आहे याचा हा पुरावा आहे. जेंव्हा बहुजन समाज रस्त्यावर उतरतो व निदर्शने करतो तेंव्हा हिच लोकं नाकं मुरडतात. वेळ प्रसंगी ही निदर्शन उग्र स्वरुप धारण केल्यास तर पुढचे कित्येक महिने त्या घटनांचे रवंथ केले जाते. पण मुळात निदर्शने का होतात ते तपासल्यास असे दिसेल की  जातीयवाद्यांच्या जातीयवादी वृत्तीच्या एखाद्या कावेबाज घटनेच्या विरोधात आलेली ती बहुजनांची एक उत्स्फूर्त प्रक्रिया असते. काहीवेळा राजकारणानी प्रेरीत असेलही पण बहुतेक वेळा ती सनातन्यांच्या विकृत वृत्तीच्या विरोधातील सच्ची प्रतिक्रियाच असते. बहुजन ईथे सुरक्षित नाही याचा संकेत देणा-या घटना आसपास घडत असतात व त्यातून बहुजन त्यांला योग्य वाटेल त्या रुपात गर्जत असतो. एकवटून लढत असतो. जर तो थांबला तर उद्या हीच परशूरामाची कु-हाड पत्रीके ऐवजी बहुजनांच्या मानेवर घाव घालताना दिसेल.
सनातनी लोकं अत्यंत क्रुर व समाजद्रोही असल्याचे इतिहासात अनेक पुरावे आहेत पण ते आजही तेवढेच क्रुर व समाजघातकी आहेत याचा ताजा पुरावा म्हणजे निमंत्रणपत्रिकेवरील कु-हाड होय. जर यांच्या हातात उद्या सत्ताच आलिच तर परत एकदा परशुरामाची (आधूनिक) कु-हाड बहुजन समाजाच्या मानेवर घाव घालेल यात तिळमात्र शंका नाही. 
संभाजी ब्रिगेडनी घेतलेला पवित्रा मला आवडला. खर तर मी ब्रिगेड समर्थक नाही. पण यावळचा सनातन्यांचा माज पाहता ब्रिगेड सारखी एखादी संघटना असणे गरजेचे असते असेच वाटूल गेले. आंबेडकरी संघटना निदर्शने देत सौम्यपणे विरोध दर्शवते व ब्रिगेड मात्र तुडविण्याची भाषा करते हा या दोन संघटनातील मुख्य फरक, अन मी तुडविण्याच्या भाषेचा अजिबात समर्थक नाही. पण सनातन्यांचा रंग पाहता ब्रिगेड हे त्यावरील समर्पक उत्तर आहे असेच वाटुन गेले. ब्रिगेडनी जाहिरपणे म्हटले आहे की लवकरात लवकर ती कु-हाट हटवा अन्यथा आम्ही संमेलन उधळुन लावू. बघुया आतातरी ती कु-हाड हटविली जाते, की मग ब्रिगेडच्या लाथा खाल्यावरच हटविली जाते ते पाहुया.
आता पुर्ता तरी एवढच म्हणेन "परशूरामाची कु-हाड आली रे आली...."