मंगळवार, ८ जानेवारी, २०१३

कु-हाड आली रे आली....

मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाची कु-हाड छापून जातीयवाद्यानी परत एकदा आपला नीचपणा सिद्ध केला. ज्या परशुरामाचा इतिहास सांगताना असे सांगितले जाते की परशूरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली. हे सांगताना असेही सांगितले जाते की नुसतं जिवंत क्षत्रीयांचीच नाही तर आईच्या पोटातील अर्भकांची सुद्धा कत्तल करत परशूरामानी ही पृथ्वी निक्षत्रीय केली. अशा प्रकारे शूर परशुरामाने क्षत्रीयांचा नायनाट केला, निप:त केला वगैरे वगैरे सांगितले जाते. हे सगळं किती खोटं व थोतांड आहे  हे सांगण्याची गरज नाही. पण गंमत बघा, या थोतांडाची व अशा क्रुर हत्तेची जिथे लाज वाटायला हवी होती तिथे तोंड वरं करुन मोठ्या थाटात परशुरामाचे गुणगाण तर गायले जातेच पण चक्क साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर अशा क्रुरकर्म्या कु-हाड छापली जाते, याला काय म्हणावं? कशाचं द्योतक आहे हे? परशूरामाचा या पातळीवर जाऊन समर्थन करणारा समाज कशा मनोवृत्तीचा आहे? का बरं एखादा क्षत्रीय द्वेष्टा यात मातितल्या दुस-या एखाद्या समाजाला पुजनिय वाटतो? का बरं एखादा समाज क्रुर हत्याकांडाचं एवढं समर्थन करतो? हा सगळा विचार केल्यावर हा सनातनी समाज किती घातकी व समाजद्रोही आहे हे परत एकदा अधोरेखित होते. आज जातियवादाचे राजकारण खेळले जात आहे, वोटबॅंकसाठी राजकारणी जात  टिकून राहावी म्हणून प्रयत्न करतात वगैरे गप्पा हाणल्या जातात. पण निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाची कु-हाड काहितरी वेगळच सांगते. सनातनी समाज कसा बहुजन विरोधी आहे याचा हा पुरावा आहे. जेंव्हा बहुजन समाज रस्त्यावर उतरतो व निदर्शने करतो तेंव्हा हिच लोकं नाकं मुरडतात. वेळ प्रसंगी ही निदर्शन उग्र स्वरुप धारण केल्यास तर पुढचे कित्येक महिने त्या घटनांचे रवंथ केले जाते. पण मुळात निदर्शने का होतात ते तपासल्यास असे दिसेल की  जातीयवाद्यांच्या जातीयवादी वृत्तीच्या एखाद्या कावेबाज घटनेच्या विरोधात आलेली ती बहुजनांची एक उत्स्फूर्त प्रक्रिया असते. काहीवेळा राजकारणानी प्रेरीत असेलही पण बहुतेक वेळा ती सनातन्यांच्या विकृत वृत्तीच्या विरोधातील सच्ची प्रतिक्रियाच असते. बहुजन ईथे सुरक्षित नाही याचा संकेत देणा-या घटना आसपास घडत असतात व त्यातून बहुजन त्यांला योग्य वाटेल त्या रुपात गर्जत असतो. एकवटून लढत असतो. जर तो थांबला तर उद्या हीच परशूरामाची कु-हाड पत्रीके ऐवजी बहुजनांच्या मानेवर घाव घालताना दिसेल.
सनातनी लोकं अत्यंत क्रुर व समाजद्रोही असल्याचे इतिहासात अनेक पुरावे आहेत पण ते आजही तेवढेच क्रुर व समाजघातकी आहेत याचा ताजा पुरावा म्हणजे निमंत्रणपत्रिकेवरील कु-हाड होय. जर यांच्या हातात उद्या सत्ताच आलिच तर परत एकदा परशुरामाची (आधूनिक) कु-हाड बहुजन समाजाच्या मानेवर घाव घालेल यात तिळमात्र शंका नाही. 
संभाजी ब्रिगेडनी घेतलेला पवित्रा मला आवडला. खर तर मी ब्रिगेड समर्थक नाही. पण यावळचा सनातन्यांचा माज पाहता ब्रिगेड सारखी एखादी संघटना असणे गरजेचे असते असेच वाटूल गेले. आंबेडकरी संघटना निदर्शने देत सौम्यपणे विरोध दर्शवते व ब्रिगेड मात्र तुडविण्याची भाषा करते हा या दोन संघटनातील मुख्य फरक, अन मी तुडविण्याच्या भाषेचा अजिबात समर्थक नाही. पण सनातन्यांचा रंग पाहता ब्रिगेड हे त्यावरील समर्पक उत्तर आहे असेच वाटुन गेले. ब्रिगेडनी जाहिरपणे म्हटले आहे की लवकरात लवकर ती कु-हाट हटवा अन्यथा आम्ही संमेलन उधळुन लावू. बघुया आतातरी ती कु-हाड हटविली जाते, की मग ब्रिगेडच्या लाथा खाल्यावरच हटविली जाते ते पाहुया.
आता पुर्ता तरी एवढच म्हणेन "परशूरामाची कु-हाड आली रे आली...."

३ टिप्पण्या:

 1. रामटेके सर (वयाने मोठे आहात), बाकी जाउदे, एवढा विचार करा कि परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय कशी केली?
  एकदा करणे ठीक, पण पुन्हा करायला क्षत्रिय आले कुठून? प्रश्नातच उत्तर आहे. पपरशुरामांनी एकदाही "निःक्षत्रिय" केलीच नाही. उपद्रवी अथवा माजलेले म्हणा, क्षत्रिय मारले.
  बाकी आपल्या कुठल्याही प्रश्नांना नेटवरही उत्तरे मिळतील, जर जाणून घ्यायची गरज असेल तर. आपण ते वाचूनही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. सोंग घेतलेल्याला उठवता येत नाहीच.
  ब्रीगेडींना विचारशक्ती आणि कुवत नाही. आपण विचार करा. विचार बदलले तर आधीचे विचार का तुमच्या डोक्यात आले अथवा भरवले गेले ह्याचाही विचार करा. मग प्रतिक्रिया द्या. वाट बघतोय.

  उत्तर द्याहटवा
 2. parshuram puran katha aahe aapan ti nit vachun ghene, kathetil keval aaplya soyicha bhag vaprun badnami karne hach kahi lokancha karyakram aahe..parshuram obeyed the order of his angry father and beheaded the renuka his own mother, after that rishi jamdangni asked parshuram any vardan then he prayed that the mata renuka be reborn and forgive his all other brothers who disobeyed the father.
  secondly about the killings of the kshatriyas about 21 times.. its proper meaning is he has killed the those kings who bacame tyranical and oppressive 21 times. lastly after that he gift the all territory which he has won to the sage kashyap and left to the new territory, which is the aprant or konkan.. can you show me the parralel ? and if you don't believe in mythological stories then don't hurt others feelings... everybody can found something wrong about each worshipped god/goddess or about any religion as no religion is 100% perfect..
  sambhaji brigrae aani sahitya sammelan yancha kay sabamdh aasa prasna aaplyala ka padla nahi yachech vishesh vatate..

  उत्तर द्याहटवा
 3. pratrikriya wachli .... changli aahe ... i mean there was no need for any kurhad .... but how come you did not mention anything about hamid dalwai incident?

  उत्तर द्याहटवा