गुरुवार, १० जानेवारी, २०१३

आठवले... संघाची चड्डी घाला!

रामदास आठवले हे आंबेडकरी चळवळीच्या राजकीय आघाडिचे एक नेते आहेत. म्हणजे ते आंबेडकर चळवळीचे नेते नाहित तर एका आघाडिचे नेते असून ती आघाडी म्हणझे निळा झेंडा दाखवून भीक मागत फिरणारी आघाडी आहे. त्या आघाडिचे नाव आहे आर.पी.आय(अ). पण गंमत बघा या आघाडिच्या  नेत्याला वाटतं की सगळी आंबेडकरी चळवळ त्याच्या पाठिमागे आहे. शिवसेनेला पण असाच गैरसमज झाला अन आठवलेला आपल्या कंपूत जागा दिली.
खर तर आठवलेची काहिच लायकी नसताना पवार साहेबांच्या आशिर्वादाने तो नेता बनला व चार पदं उपभोगली. अन अचानक या आठवलेला असं वाटू लागलं की आपण साला आपून तो शेर हाये. जणू काही पवार हे आपल्यामुळेच सत्तेत आहेत असाही एक समज झाला अन आठवलेनी पवाराना जयभीम ठोकला.
तिकडे सेनेकडे जाऊन आठवलेनी मोठ मोठ्ठाल्या थापा मारल्या "अमूक एवढे नि तेवढे भीम सैनिक माझ्या पाठिशी आहेत" सेनेला वाटलं "अरेच्चा म्हणजे आता या पुढे सत्ता आपलीच" अन आपल्या वाट्याच्या काही जागा आठवलेला देऊन टाकल्या. पण जास्त वाट पहावी लागली नाही. हा आठवले ’मै भीम का शेर हूं’ म्हणत सेनेत शिरला खरा पण झालेल्या निवडणूकित दाणादाण उडाल्यावर लगेच ’अरे ये तो शेर नही बिल्ली है’  म्हणत सेनेनी लाथा घातल्या.  मग काय डरकळी ते म्यॅंऊ असा प्रवास व्हायला फार काळ लागला नाही. हा होता भीमसैनिकांचा पहिला दणका. त्या नंतर बरेच दणके बसले व सर्वानी पाहिले.
या घायाळा शेरला (छे बिल्ली) हवी होती एक संधी अन मराठी साहित्य संमेलनावरुन जो वाद उठला त्यात याला ती दिसली. बहती गंगामे हात धुवून घ्यायला आठवले विसरले नाहीत. बाळ (साहेब नाही बरं का) ठाकरेच्या नावावरुन जो वाद उठला त्या वादात पड्ण्याचं काही कारण नसताना आठवले मात्र परत एकदा हरवलेली डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करत म्हणतात ’बाळूचं नाव बदलल्यास संमेलन उधळून लावू!’ 
अरे व्वा... हे काय आठवले? तुम्ही ईतकी मोठी कोलांट उडी मारलित व्हय. नाही तसं तुम्ही कोलांटऊडी बहाद्दुरच आहात हे माहित होतं पण .... एवढी मोठी उडी. च्यायला आता काय बोलावं.

थोडातरी भीम तुझ्यात असेल असे वाटले होते

खंत वाटते मला ते तसे उगीच वाटले होते.
नामांतर लढ्याच्या वेळी “घरात नाही खायला पीठ, कशाला पाहिजे विद्यापिठ?” ही ज्यांच्या प्रचाराची(प्रतिप्रचाराची?) पंचलाईन होती त्या ठाकरेच्या बाजूने कालचा भीमसैनिक आज उभा होतो याची खरच लाज वाट्ते.
आता काय, आठवलेएवढ्यावर थांबतील असे वाटते का? अजिबात नाही. उद्या ते राष्ट्रिय स्वयंसेव संघाचं सदस्यत्व स्विकारतील. त्या नंतर त्यांची हाप चड्डी घालून फिरतील. अन संविधान व आंबेडकरी चळवळिच्या विरोधात निळाझेंडा फडकवतील. हे सगळं लवकरच पाहायला मिळणार. आज पर्यंत जोकर सारखे कपडे घालून फिरणारा हा आठवले उद्या हाफ चड्डिवाल्यांच्या गटात चड्डिघालून बसलेला दिसल्यास नवल वाटून घेऊ नका.  कारण आठवलेचा प्रवास ऑलरेडी त्या दिशेनी सुरु झाला आहे.
मी तर म्हणतो, आठवले आता लवकरात लवकर संघाची चड्डी घाला...

1 टिप्पणी:

  1. फुकट मेले का आमचे भिमसैनिक.? युती करताना नामांतर लढ्याचे बलिदान "आठवले" नाही..!

    उत्तर द्याहटवा