बुधवार, १६ जानेवारी, २०१३

भारताचा सैनिकी इतिहास म्हणजे अखंड पराजयाची मालिका..बाबासाहेब नेहमी म्हणायचे “भारताचा सैनिकी इतिहास म्हणजे अखंड पराजयाची मालिका...” या वाक्यावर हिंदू मात्र चवताळून उठायचे. सावरकरानीतर चक्क सहा पानं लिहून टाकलीत. खरच भारताचा इतिहास असा होता का याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केल्यावर मला ते खरच आढ्ळून आले.  सावरकरांचा मुख्य आरोप असा आहे की बौद्धानी घात केल्यामुळे व शत्रूला साथ दिल्यामूळे भारताचा वेळोवेळी पराजय झाला. किंवा भारताच्या पराजयात बौद्धांचा मुख्य वाटा होता. मग मी बुद्धपुर्व काळात जाऊन भारतीय सैनिकी इतिहास तपासून पाहिला.  असे आढळले की तेंव्हाही भारतीय सैन्य हारतच होते. म्हणजे भारतीय सैनिकाना हारण्याची खोडच आहे. त्यात बुद्धाचा काही संबंध नाही. बुद्धपुर्व काळात असो वा बुद्धा नंतरच्या काळात असो. भारतीय सैन्य हे नेहमी पराजीतच होत राहिले आहे. कसे ते पाहू या.
बुद्धा नंतरच्या काळातील भारतीय सैन्याची दाणादाण सर्वत्र नोंदलेली आहे ते सांगायची गरज नाही. बुद्ध पुर्व काळातही भारतीय सैन्याची काशी दाणादाण उडाली ते पाहू या. हा इतिहास दोन प्रकारे तपासता येईल.
१) इतिहास व पुराव्यांच्या आधारे
२) वेद, पुराणे व अनैतिहासिक पुरावे ग्राह्य धरुन.

इतिहास व पुराव्यांच्या आधारे

पहिल्या प्रकारातील उत्तर असे असेल की हल्ले झाले नाही किंवा झाले याचा पुरावा देणारा ग्रंथ/संदर्भ उपलब्ध नाही. त्यामूळे ठामपणे मत मांडत हल्ले झालेच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. बुद्धपुर्व काळाचा इतिहास उपलब्ध नाही. इतिहास लिहायचा म्हटल्यास स्थल-काल देणे अनिवार्य असते. हे बुद्धपुर्व काळाच्या बाबतीत आजतरी अशक्य आहे. उद्या काही नवीन पुरावे पुढे आल्यास ते शक्य होईलही. अन वेद-पुराणातले संदर्भ ऐतिहासिक नाहीत. त्यामूळे भारताचा इतिहास लिहताना बुद्ध पुर्व काळात जाताच येत नाही. म्हणजे बुद्धपुर्व काळात भारतीय सैनिकानी काय दिवे लावले हे तपासायला फारसा स्कोप नाही. शक, कुशाण व हूणांचे हल्ले बुद्ध काळा नंतरचे. सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे इस्लाम, अन या इस्लामची स्थापनाच सहाव्या शतकातली. म्हणजे इस्लामानी हिंदुना माती चारली ते बुद्धा नंतरच. या सगळ्याचा एक आरोप काय तर हा पराजया मागे बौद्ध धम्म होता. तशी ही कल्पना व अरोपच मुळात विनोदी आहे पण उत्तर देणे गरजेचे आहे. त्यामुळे बुद्धपुर्व काळातील हिंदुचे पराजय तपासावे लागले. मग काय इतिहास तर उपलब्ध नाही. जे काही आहे ते वेद व पुराणांत. वेद तपासल्यावर हिंदुच्या पराजयाचे एक एक किस्से बाहेर पडले ते कसे पाहू या. 

आता वेद-पुराणाच्या पातळीवर पाहू या.

वेदांची निर्मिती ही सनपुर्व १७०० ते २३०० च्या दरम्यानची आहे. वेदांची निर्मिती करणारा कोण? त्याचे नाव आहे राजा सुदास. हा सुदास सरस्वती नदीच्या काठी राज्य करत होता. म्हणजे आजचा अफगाण-इराण सिमेलगतचा भाग. म्हणजे चॅन्सेस असे आहेत की तो मूळ भारतीय नसावाच. ईराणी-ग्रीक वगैरे संकरीत वगैरे असावा. किंवा अगदी टिळक म्हणतात तसं अगदी रशियाच्या वरच्या भागातला कुठला तरी आर्य असावा.  मग काय? या सरस्वती नदीकाठच्या राजानी भारतीय राजांशी युद्ध पुकारले त्या युध्दाचा रुग्वेदात संदर्भ येतो. या युद्धाला दाशराज्ञ युद्धा असे म्हणतात.  सरस्वती काठचा सुदास विरुद्ध भारतीय दहा असे हे युद्ध होते म्हणून त्या युद्धाला दाशराज्ञ युद्ध असे म्हटले जाते. मग काय भारतीय सैन्य हे युद्ध हारते.  अन सुदास मात्र हे युद्ध जिंकतो. हा आहे रुग्वेदीय पुरावा.(खरं तर रुग्वेदाला मी मानत नाही पण जे मानतात त्याना भारतीय सैन्याची अखंड पराजयाची मालिकाही मान्य करावे लागेल.)  अन रुग्वेदातील  दाशराज्ञ युद्धात जे हरले ते कोण होते तर ईथले आपल्या मातीतले दहा विराट साम्राज्य असणारे. म्हणजे एका इराण्याने(किंवा आर्याने) रुग्वेद काळात दहा हिंदुना(किंवा मुळ भारतीय राजाना) हरवले. याचाच अर्थ रुग्वेद काळापासून जेंव्हा बुद्धाचा जन्म व्हायला आजून दोन हजार वर्षे होती तेंव्हा पासून भारतीयाना हारण्याचा रोग होता.
कोण होते हे दहा राजे १)शिव २) पख्त ३) भलनस ४) द्रह्यू ५) अनू ६) मत्स्य ७) भृगू ८) अलिन ९) विषाणिन व १० ) पुरु वरील हारणा-यांची नाव पाहून तुमच्या लक्षात येईल की हे दहा राजे कोण असतील. भृगू म्हणजे परशूरामाचे वंशज. शिव म्हणजे लिंगपुजक म्हणजे शिव शंकरवाले. अन ईतर सगळेही आजच्या हिंदूचे पुर्वज होते हे नावातून दिसतेच आहे. म्हणजे हिंदुंची हारण्याची खोड ही बुद्धपुर्व २००० वर्षाची आहे. असे रुग्वेदातून सिद्ध होते.

ग्रीकांचा इतिहास व संदर्भ:

हिरोडोटस नावाचा एक ग्रीक इतिहासकार आहे ज्यानी सनपुर्व १२०० च्या काही नोंदी लिहून ठेवल्या. त्या नोंदिप्रमाणे असे सिद्ध होते की सनपुर्व १२०० मधे तुर्कस्तानातील हट्टी साम्राज्य कोसळले व पराजीत झालेले तुर्की तुर्कस्तान सोडून पुर्वेकडे सरकले. आता प्रश्न असा पडतो की हे पराजीत तुर्क गेले कुठे?  नक्कीच ते इराण अफगाण मार्गे भारतात आले. म्हणजे शक, कुशाण व हूण जसे आले तसे, अगदी त्यांच्या एक दीड हजार वर्षापुर्वी हट्टी साम्राज्य कोसळल्यावर पराजीत झालेले तुर्कही आले.  हे ’फ्र्गु-फ्रिजीया’ या नावाने ओळखले जात. हेच फ्रिजीयी(पराजीत लोकं) पुर्वेकडे सरकत सरकत भारतात येऊन धडकले व ईथल्या लोकाना पराजीत करुन ईथले राजे बनले. पुढे याच फ्रिजीयांचे बिग्रस व बीग्री असे झाले.  म्हणजे काय तर रुग्वेद काळातसुद्ध ईथला सैनिक हारायचा. हट्टी साम्राज्याच्या काळातही ईथला सैनिका हारायचा. अन बुद्ध काळा नंतर म्हणजे शक, कुशाण व हूण वगैरे ज्या टोळ्या ईथे घुसल्या त्या ईथल्या सैनिकांचा धुव्वा उडवून व पराजय करुन घुसल्या.  ज्याचं खापर बौद्धांवर फोडण्याचा काहिनी प्रयत्न केला आहे. पण बौद्धपुर्व संदर्भ तपासल्यास हेच सिद्ध होते की तो तर हिंदुचा वारसाच होता. सैनिकी पराजय हे हिंदुच्या रक्तातच आहे.  म्हणून बाबासाहेब म्हणायचे “भारताचा सैनिकी इतिहास म्हणजे अखंड पराजयाची मालिका...” ती मालिका रुग्वेद काळापासून सुरु होते अन आज पर्यंत चालू आहे.
आजून एक महत्वाची घटाना म्हणजे हडप्पा व मेहंजोदडॊ चा पराजय. (हा पराजय होता की नैसर्गिक आपत्ती हे आजून सिद्ध व्हायचे आहे. पण आर्यांच्या हल्ल्यात ते शहर बुडाल्याचा प्राथमिक तर्क आहे) जर हे खरे निघालेच तर भारतीय सैन्याची हारण्याची खोड ही ३००० वर्ष जुनी होती हे सिद्ध होईल.
थोडक्यात काय तर बुद्ध पुर्व ३००० पासून हिंदूना हारण्याची खोड आहे. यात बुद्धाचा काय दोष.

६ टिप्पण्या:

 1. chandragupta mourya aani samrat ashoka he hi yach maletil kay? maharaj shivaji, harshavardhan , chandragupt,samudragupt he hi yach parajayache ? please read the history of india from ancient period carefully..

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. Dr. Ambedkaranni kadhalela inference ha purna chuk nahi ani barobar pan nahi. Ithe mothya kalacha vichar hoto evadya kala madhe ek group/tribe satta theu shakat nahi. Agadi Chengiz Khanachya udaharana varun apalyala he siddha zalele disate. Ambedkar ani Savarkaran var thet tika nahi karanar pan jevha doghanni ha abhyas mandala tevha doghannahi Political Agenda hota tya mule tyanchya kadun ase analysis pudhe yene sahajik ahe. Jya kalachi charcha hot ahe tya kala madhe Hindu mhanun asa kahi astitvat navate Hindu samaj ha faar nantaracha vishay ahe.. apala jeevan he bhartiya upakhanda madhil sagalya sanskrutinni ani ghatannani prabhavit zalele ahe. Bharata var barach kaal satta gajavanara Afagan samaj gelya 200 varsha pasun rasa talala gela ahe ani saddhya to jagatil sarvat jasta parabhut samaj ahe. Pan mhanun tyanchi gananaa kayam haranare ashi keli jau shakat nahi. Tumacha ha lekh thoda politically motivated vatato. I hope there is still room for more discussion :-)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. माझयामते तुमचा इतिहास संपूर्ण कच्‍चा आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. रामटेके साहेब .... माझी एक कळकळीची विनंती आहे .... आपल्या इतिहास ... धर्म, भाषा, राष्ट्रीयता यांच्या संकल्पना बऱ्याच प्रमाणात गोंधळलेल्या आहेत .... आणि पुरेसे वाचन आपण स्वतः केलेले दिसत नाही ... मागच्या वेळेला कादंबरी बरून शिवाजी महाराजांवर बादरायण संबंध जोडून केलेली टीका तुमच्या लक्षात आणून दिली होती .... आपण सोनेरी पानांचा उल्लेख केलात .... असे दिसत आहे की दुसऱ्याच कोणी केलेला दावा आपण संदर्भाशिवाय इथे वापरत आहात ... कारण सोनेरी पानांमध्ये बुद्धाला किंवा बौद्ध धर्माला सैनिकी पराभवासाठी जबाबदार धरलेले नाही .... अगदी सन्यस्तखड्ग या त्यांच्या नाटकातही नाही ....शिवाय तुम्ही हिंदू आणि भारतीय या दोन गोष्टींची सरमिसळ करत आहात .... तेव्हा उथळपणास लगाम द्या आणि सखोल वाचन ... वस्तुनिष्ठ वृत्तीने करायला शिका

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. Kay rao fukatacha blog lihayala milato manun kahihi lahyache kay ? Toch vel kahi tari karech kaam karyala ghalva. :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. संस्कृत भाषा व त्यात असलेले वाङ्मय हे भारतीय संकृतीचे उगमस्थान आहे हे सर्वपरिचित आहेच. वेद हे जगातील प्राचीनतम ग्रंथांपैकी प्रमुख ग्रंथ आहेत. मात्र वेदांच्या काळासंबंधी बरेच मतभेद आहेत. युरोपीय पंडित वेदरचनेचा काळ इ. स. पूर्व एक ते दोन हजार वर्षांच्या दरम्यान असावा असे मानतात तर जुन्या विचारसरणीचे भारतीय विद्वान वेद हे अनादि आणि अपौरुषेय आहेत असे मानतात.
  abhijeet bhagat.

  प्रत्युत्तर द्याहटवा