सोमवार, १ एप्रिल, २०१३

लक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मारावे!पदमश्री लक्षमण माने यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. आरोप करणा-या कोण तर त्यांच्या संस्थेत स्वयंपाकी म्हणून काम करणा-या बायका. लक्ष्मण माने ईतक्या खालच्या थराला गेलेत म्हणून उभ्या महाराष्ट्रातील मिडीयानी बोंबा मारायला सुरुवात केली आहे. प्रकरणाची शहनिशा करणे वगैरे तर दूर पण वरील प्रकरण तर्कात तरी बसते का याचेही भान पत्रकाराना नाही.
कसला तर्क हो?
अहो बलात्कार म्हणजे बळजबरीने केलेला शरीर संभॊग.  या बायका २००३ पासून मानेसोबत झोपायच्या अन आज म्हणतात तो बलात्कार होता. ईथे कुठली आली बळजबरी. स्वेच्छेनी सगळं पार पडलं. मग ते बलत्कार कसं? पटत नाही बुवा!!!
तक्रार देणा-या बायकांचं म्हणनं काय आहे तर त्यांच्यावर २००३ पासून बलात्कार होतो आहे म्हणे.  म्हणजे २००३ ते २०१३ पर्यंत बलात्कार चालू आहे असा त्याचा अर्थ निघतो. याला बलात्कार म्हणायचंच झाल तर, त्या स्त्रीयांच्या ईच्छे विरुद्ध हे दहा वर्षापासून चालू आहे असं म्हणावं लागेल. आता मला प्रश्न पडतो की मानेनी दहा वर्ष या बयकाना कोंडून ठेवून त्यांच्याशी शैय्या केली का? अजिबात नाही. त्या स्वतंत्र होत्या. म्हणजेच दहा वर्षा पासूनचा हा शरीर संबंध बलात्कार नसून त्या बायकानी स्वखुषीने तो केला. जर स्वखुषीने झोपल्या तर मग तो बलात्कार कसा काय?  मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की या बायकांनी त्यांच्या खुशीने शरीर-संबंध थोडं थोडकं नाही तर चक्क दहा वर्ष ऐश केलं. कित्येक वर्षे ते बिनबोभाट चालू असताना एका दिवशी शैय्या करुन झाल्यावर त्याना नवा साक्षात्कार झाला. कशाचा? त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा. वा गं बायानो!!!
मिडीया तर उभाच होता काडी लावायला. या बायकाना जर ते शरीर-संबंध मान्य नव्हते तर त्यांनी ते इतकी वर्षे का चालू ठेवले? त्यावेळी त्या नकार देऊ शकत होत्या, का नाही दिला? तेंव्हा हिंमत नव्हती असा युक्तीवाद असेल तर मग त्याचं नाव सांगा ज्याच्यामुळे आज ती हिंमत आली. म्हणजे दूध का दूध व पानी का पानी होईल.  मुळात तो जर बलात्कार होता तर पहिला बलात्कार झाल्यावर दुस-यांदा परत मानेकडे जाण्याचे कारण काय होते. कोणी बाई, बलात्कार करणा-या माणसाकडे परत परत जाईल का हो? अन जात असल्यास याना बलात्कार करवून घेण्याची खोड होती असा अर्थ निघत नाही का? कि तो बलात्कार नव्हताच, या बायका आज उगीच नाटकं करत आहेत हे सिद्ध होत नाही का? शरीर-संबंधाच्या मोबदल्यात मिळणारे सर्व फायदे उपटून झाले की मग या बलात्कार म्हणून बोंब मारायला मोकळ्या.  ही सगळी लबाडी नाही का?

आता हेच प्रकरण शोषण व नैतिकतेच्या कसोटीत तपासूया.
माझ्या एका मित्राचं म्हणन आहे की तो बलात्कार या प्रकारात मोडत नाही पण त्या बायकांना नोकरीची आमिष दाखवून शोषण करण्यात आलं. याला शोषण म्हणावे. अन शोषित समाजातील एका नेत्याने हे केली त्यामूळे फार वाईट वाटते.
मी म्हणतो अजिबात नाही!
याला मी शोषणही मानत नाही. ’तुम्ही मला नोकरी द्या मी तुमच्यासोबत झोपते’ असं म्हणणारी बाई शोषीत कशी काय? शरीराच्या बदल्यात नोकरी या व्यवाहारास तयार होणारी बाई ही मुळात शोषित होऊच शकत नाही. उलट ईतर बायकाना डावलून आपलं शरीर विकत नोकरी मिळविण्यासाठी केलेली ही लबाडी पाहता ती अरोपी ठरावी. म्हणजे नैतिकतेच्या पातळीवर नुसती बोंब! अन या शील विकणा-या बायकाना दाद मागण्याचा नैतिक अधिकार उरतो का? अजिबात नाही.  दोघानी संमतीने शैय्या केली अन मॅटर संपला. शैय्या नंतर मानेनी ठरलेल्या अटी पुर्ण नाही केल्या तरी त्या करणे नैतिकतेच्या पातळीवर बंधनकारक नाहीतच. कारण मुळात हा व्यवहारच नैतिकतेला डावलून सुरु झाला त्यामूळे त्याच्या पुर्णत्वास नैतिकतेच्या कसोट्या लागू पडत नाहीत. या प्रकरणात मानेकडे गुन्हेगार म्हणून बोट दाखविताना त्या स्वत:ही गुन्हेगार आहेत याचा त्याना चक्क विसर पडला. तुमची जर मानेनी फसवणूक केली तर मी म्हणतो तुम्ही समाजाची फसवणूक केली. नोकरीच्या निकषात शरीराची मिसळण करत तुम्ही योग्य उमेदवारांची फसवणूक केली. म्हणजे दोघेही गुन्हेगार. आज माझ्यावर बलत्कार झाला म्हणणा-या या बायका काल पर्यंत स्वार्थासाठी मोठ्या खुषीने माने सोबत झोपायच्या हे त्यांच्या स्टेटमेंटवरुन दिसून येते. हवं ते पदरात पाडून घेता येत नाही हे लक्षात आल्यावर आता बोंबा सुरु झाल्या. म्हणजे हा नियोजीत गुन्हेगारीचा प्रकार झाला. नोकरी नावाची वस्तू मिळविण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करायचा, आज ती वस्तू मिळाली नाही तर त्या मार्गातील आपल्या एका सोबत्याकडे बोट दाखवून ’हा अपराधी’ असं म्हणताना त्या प्रकरणातील त्या स्वत: सुद्धा तेवढ्याच अपराधी आहेत याचा त्याना विसर पडतो, हे कसं काय?. म्हणून म्हणतो या बायका प्रचंड चलाख आहेत. आधी झोपायचं, फायदे उपटायचे अन आज दहा वर्षानी तो बलात्कार होता म्हणायचं. हा काय प्रकार झाला. उलट माझ्या नजरेत तर अशा बायका या समाजावर कलंक आहेत. भर चौकात उभं करुन अशा बायकाना फटके घातले पाहिजे.
का?  कारण बाबासाहेबानी शील या गोष्टिला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. महाड्च्या भाषणात बाबासाहेबानी शील जपण्याचा सल्ला देताना हे सांगितले की माझ्या समाजातील बायका अर्ध लुगडं नेसतात पण शीलवान आहेत याचा अभिमान वाटतो. त्याच बरोबर मुंबईच्या एका सभेत ग्रंट रोडच्या वैश्या संघटनानी बाबासाहेबाना समर्थन देण्यासाठी आपला मोर्चा आणला होता, तेंव्हा बासाहेबानी त्या वेश्याना उभ्या सभेतून हाकलून लावले. त्यावेळी ते म्हणाले की ज्या स्त्रीया शीलवान नाही, स्वार्थासाठी शरीर विकतात त्यांचे ईथे काहीच काम नाही. म्हणजे आंबेडकरी कसोटी लावली तर स्त्री ने शिलवान असणे किती महत्वाचे आहे ते वरील दोन उदाहरणावरुन दिसून येते. अन ईथे काय तर आधी बिस्तर गरम करायचा, फायदे लाटायचे अन आता काय तर बलात्कार झाला म्हणे. च्यायला, वरुन काय तर आम्ही आंबेडकरी  विचारधारेचे अन शोषित... शोषिताना नोकरीसाठी शरीर विकायची सनद मिळालेली नाही, परिस्थीती काहिही असो.
अहो उलट आंबेड्करी विचारधारेतील स्त्रीयाना तर हे अजिबात शोभत नाही. जेंव्हा खायचे वांदे होते तेंव्हा सुद्धा आमच्या आया-बहिणिनी शील सांभाळले. तुम्ही बिस्तर गरम करणा-या(२००३ पासून) बायका त्या मानाने कित्येक पटीने चांगल्या परिस्थीतीत जगत आहात. कष्ट करायची तयारी असल्यास सर्वत्र संध्या आहेत. शरीर विकावं एवढी बिकट परिस्थीती तर नक्कीच नाही. शरीर विकणे म्हणजे अत्यंत लालसी, लोभी व अनकष्टीपणाचे द्योतक आहे. बिस्तर गरम करुन नोकरी मिळविण्याचा तुम्ही चालविलेला प्रयत्न अत्यंत लज्जास्पद व हिनकस आहे. शील विकून नोकरी मिळवने हे आंबेडकरी तत्वात अजिबात बसत नाही.
माने प्रकरणात आंबेडकरी कसोट्या लावल्यास बायकाच दोषी ठरतात. या बायका २००३ पासून २०१३ पर्यंत माने सोबत झोपत आहेत अन आज त्याना मानेनी परमनंट केलं नाही म्हणून ते झोपणं बलत्कार वा शोषण झालं अशी बोंब मारत आहेत. मुळात नोकरीसाठी झोपणारी बाई ही ’शील’ विकणारी पाताळयंत्री तर ठरतेच पण नोकरी मिळविण्यासाठी अनैतिक मार्ग वापरल्यामुळे तीला शिक्षा व्हायला हवी. या बायकानी शोषित असण्याचा कितीही आव आणला तरी त्या शोषीत नसून चलाख, लोभी व व्यभिचारी बायका आहेत. शरीराची आमिष दाखवून पुरुषाना फसविणा-या लबाड वृत्त्तीच्या बायकाना मी तर भर चौकात उभं करुन चाबकाचे फटके मारावे असे म्हणतो.

कारण आंबेडकरी विचारधारेच्या नैतिक कसोट्या लावल्यास या बायका *** ठरतात.

८ टिप्पण्या:

 1. या सगळ्यात लक्ष्मण माने यांचा काहीच दोष नाही ???

  उत्तर द्याहटवा
 2. फक्त बायकाच दोषी ?? मग १९९८ साली एका पिडीत स्त्रीने सुद्धा तक्रार केली होती मानेन विरुद्ध पण मानेनी ती तक्रार आपल्या राजकीय बळावर दाबून टाकली त्याचे काय ??तुम्ही तर फक्त स्त्रियांनाच दोष दिला आहे ,हे खूपच एकतर्फी लिखाण आहे. माने जर दोषी नाहीत तर इतक्यादिवस ते का बरे तोंड लपवत फिरत होते ??

  उत्तर द्याहटवा
 3. आयुष्मान मधुकर रामटेके ..... तुम्हाला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या डोळ्याला लावलेले पूर्वग्रहांचे चष्मे काढून टाका ... आजूबाजूला होत असलेल्या गोष्टींना संवेदनशील आणि वस्तुनिष्ठ वृत्तीने पाहण्यास शिका .... तुमच्या आपले ते खरे आणि आपला तो बाब्या या आकसाने तुम्ही तुमच्याच चळवळीचे नुकसान करीत आहात .... बलात्कार या घृणास्पद गुन्ह्याबद्दल लिहीत असताना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या माणसाने इतकी उथळ प्रतिक्रिया द्यावी यापेक्षा दुर्दैव नाही ... अर्थातच शील महत्त्वाचे आहे आणि बाबासाहेबांनी केवळ स्त्रियाच काय त्या शीलवान असाव्यात असली भूमिका घेतलेली नाही ... एक तर तपास सुरु असताना आरोपीची बाजू तुम्ही इतक्या आंधळ्या अभिनिवेशी विश्वासाने घेत आहात की पूर्णतः तर्कहीन आणि बेजबाबदार विधाने तुमच्या लेखनात येत आहेत ... बलात्काराची व्याख्या भारतीय दंडविधानात काय आहे नित जाऊन आधी वाचा .... शिवाय आरोपी एका संस्थेचा पदाधिकारी होता आणि त्यांच्या प्रतिभेवर आणि कर्तृत्त्वावर विश्वास ठेऊन ते स्थान त्यांना दिले गेले होते अशा परिस्थितीत कायदेशीर आणि नैतिक अशा दोन्ही पातळीवर मानेंची जबाबदारी पुष्कळ मोठी होती ... निष्कलंक चारित्र्य असायला हवे ही अपेक्षा फिर्यादी महिला आणि आरोपी दोघांकडून असली तरीदेखील अधिकाराच्या पातळीवर माने बसले होते हे विसरता येणार नाही ... कदाचित आरोप चुकीचे असतील तर योग्य तो न्याय त्यांना मिळेलच ... परंतु बायकांना चाबकाचे फटके मारा वगैरे सांगणारे तुम्ही कोण? विद्या बाळ पोलीस नाहीत तसे तुम्ही पण न्यायाधीश नाहीत हे विसरू नका .... माझे नाव चिन्मय भावे आहे ... आणि जातीने मी ब्राम्हण आहे वृत्तीने नाही ... पण या प्रतिक्रियेकडे तुम्ही नेहमीच्या कलुषित नजरेनेच पाहाल ...तीच वैचारिक दादागिरी तुमच्या विचारातून नेहमी झळकत आलेली आहे ... ब्राम्हणी कर्मकांडांचा विरोध मी माझ्या घरात करतो .... आणि गौतम बुद्धाने सांगितलेले विचार मला अत्यंत आदरणीय आहेत ... तुम्ही बुद्ध आणि आंबेडकरांचे अनुयायी .... पण तुमच्या लिखाणात विचारापेक्षा बौद्ध धर्माशी निगडीत कर्मकांडे आणि रुढींचाच आग्रह जास्त दिसतो ... माणूस तोच राहतो .... त्याला श्री म्हणा आयुष्मान म्हणा किंवा मिस्टर म्हणा ....

  उत्तर द्याहटवा
 4. Dear Ramteke,
  If your argument is accepted then Mane like people are set free to exploit any numbers of woman using government money and post. Why not he should be barred from holding any post in future? Even admitting the fault on the part of woman, Mane like person too should be removed from educational institutes. Your scale of Sheel is insulting to Ambedkari thoughts. It is against your own victimized woman.. Only one sadist can use such type of argument...

  उत्तर द्याहटवा
 5. स्त्रियांनी शील विकणे आंबेडकरवादाच्या विरोधात असेल तर स्त्रियांना भर चौकात फटके मारण्याची भाषा कोणत्या आंबेडकर वादात बसते...उगीच सोयीचा आंबेडकरवाद मांडू नका. आणि आपल्या मांडणीत कुठेतरी स्त्रियांना फटके मारताना एक झापड लक्ष्मण मानेंना मारली असतीत, तर विचारात प्रामाणिकपणा आहे, असा आभास तरी निर्माण झाला असता...तुम्ही वारंवार स्त्रिया झोपल्या, स्त्रिया झोपल्या असा उल्लेख केला आहे..स्त्रिया एकट्याच झोपल्या का..कि त्यांनी मानेंवर बलात्कार केला असे तुम्हाला म्हणायचे आहे...?

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. उपरा"कार लक्ष्मण माने यांची निर्दोष मुक्तता

   जेष्ठ विचारवंत, माजी आमदार "उपरा"कार पद्मश्री लक्ष्मण माने यांची आज सातारा न्यायालयामार्फत सर्व सहा महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता कर‍ण्‍यात आली आहे.

   संबंध महाराष्ट्रातील विचारवंतांचे आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेल्या या महिला अत्याचार खटला प्रकरणी अखेर आज सातारा न्यायालयाने निकाल जाहीर केला. या निकालामध्ये लक्ष्मण माने यांना निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचा निकाल सातारा न्यायालयाच्या न्यायमूर्ती वर्षा मोहिते यांनी दिला.

   पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच शिक्षण संस्थेतील काही महिलांनी अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर आपण पूर्णपणे निर्दोष आहोत, आपली नार्को चाचणी करा व दोषी आढळल्यास भर चौकात फाशी द्या, असे म्हणणाऱ्या पद्मश्री लक्ष्मण माने यांची निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे.

   लक्ष्मण माने यांच्यातर्फे ॲड. मोहन यादव यांनी बाजू मांडली.

   अखेर सत्य हे लपत नसते ते सूर्यापेक्षाही तेज असते आणि आज सत्याचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण माने यांच्या कन्या प्रा. समता माने आणि भारतीय भटके विमुक्त शिक्षण संशोधन संस्थेचे संचालक प्रा. भाई शैलेन्द्र माने यांनी दिली आहे.

   हटवा
 6. १) सर्वात प्रथम रामटेके ला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, त्याचे आतापर्यंतचे बहुतेक लिखाण
  वादग्रस्त आणि चुकीचे सिद्ध झाले आहेत. बाबासाहेबांनी कुणाला हाकलून वगैरे दिलेले नाही,
  देवदासी प्रथेतून केले जाणारे शोषण आणि मुंबईमधील वेश्यांच्या समस्या, पोलिसांचा त्रास यावर
  बाबासाहेब उपाय काढतील म्हणून या स्त्रियांनी बाबासाहेबांच्या भेटीचा प्रस्ताव मांडला आणि
  तो स्वीकारून दामोदर हॉल ला सभा घेण्यात आली. त्यात बाबासाहेबांनी त्यांना असा
  अपमानकारक आणि उपेक्षित धंदा सोडून द्यावा आणि चांगला मार्ग अवलंबावा, इतकेच बाबासाहेब
  चारित्र्य,शील आणि स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते होते
  २) विषय निघालाय म्हणून सांगतो कि या ठिकाणी मी माने यांनाच दोष देईन, ते या साठी कि
  योग्य उमेदवार डावलून शारीरिक भूक भागवण्यासाठी नोकरीची आमिष दिली हे एक आणि ते आमिष
  पूर्ण केले नाही हे दुसरे महत्वाचे कारण
  ३) चाबकाचे फटके वगैरे बोलणे म्हणजे पराकोटीचा पुरुषी अहंकार आहे आणि एकाबाजूला स्वतःला
  आंबेडकरी अनुयायी म्हणायचे आणि लगेच त्यांच्याच विचाराची प्रतारणा करायची असा हा रामटेके
  सरडा आहे
  ४) या ठिकाणी फसवणूक आणि बलात्कार हे दोन्ही सिद्ध होत असताना माने च्या अपराधाची
  तीव्रता कमी करण्यासाठी स्त्रियांना सुद्धा दोषी धरले आहे यावरून या मह्शायांची खालावलेली
  वैचारिक पातळी दिसून येते

  उत्तर द्याहटवा