सोमवार, १ एप्रिल, २०१३

मिनरल वॉटर - पाण्याची नासाडी

जिथे हे मिनरल वॉटर तयार केल्या जातं तिथे बोअरचं किंवा टॅंकरनी पाणी आणलं जातं. ईथे प्रचंड मोठं R.O.  (रिव्हर्स ऒस्मोसीस )नावाचा मशीन बसवलेलं असतं जो तासाला १०,००० लिं ते ५०,००० लि. किंवा त्यापेक्षाही जास्त क्षमतेने मिनरल वॉटर तयार करु शकते.  या टेक्नोलोजीचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो मेंब्रेन. या मेंब्रेनला एक इनलेट व दोन आऊटलेट असतात. मेंब्रेन मधे समजा तुम्ही १०० लिटर पाणी ओतलात तर त्यातला २५ लिटर पाणि (product outlet) मिनरल वॉटर म्हणून बाटलित बंद होतं अन उरलेलं ७५ लिटर पाणि (Reject outlet) म्हणजे खराब पाणी म्हणून बाहेर फेकल्या जातं. या reject च्या पाण्याचं काहिही होत नाही. ते थेट फेकून दिल्या जातं. म्हणजे आपल्याकडे आज जर हजार पाण्याच्या बाटल्या आल्या तर समजून घ्या की तीन हजार बाटल्या पाणी फेकून दिल्या गेलं. एवढया मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी करुन मिनरल वॉटरचं उत्पादन होतं. अन हे मिनरल वॉटर पिणारे कोण आहेत ते सगळ्यानाच माहित आहे. एक बाटली पाणी पिण्यासाठी तीन बाटल्याची नासाडी करणे या दुष्काळाच्या काळात परवड्तं का? जर वरील उत्पादन प्रक्रिया पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलचं की ते अजिबात परवडणारं नाही. मग अशा या दुष्काळात आम्हा सगळ्य़ाना डोस पाजणारे हे राजकारणी व मिडीया कधीतरी या मिनरलच्या बाटल्यावाल्याना म्हणणार का “अरे बाबानो दुष्काळ आहे, पाण्याची नासाडी करु नका!” जर नाही तर मग हा डोस आम्हालाच का बरं पाजता. 
या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याचा जेवढा कांगावा केला जात आहे तेवढा खरच दुष्काळ पडला का असं अनेक वेळा वाटून जातय. म्हणजे दुष्काळ पडला हे मला माहित आहे पण ज्या पद्धातिने त्या दुष्काळाचं प्रमोशन केलं जात आहे ते पाहता दुष्काळाच्या नावाने केंद्रातून निधी मिळवून स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी हा सगळा आटापिटातर चालू नाही ना अशी शंका येते आहे.
दुष्काळ पडला नि त्यात उभा महाराष्ट्र/मराठवाडा कसा होरपडून जात आहे हे सांगताना त्यावर उपाय मात्र केले जात नाहित हे स्पष्ट दिसत आहे. याचाच अर्थ या दुष्काळाचं मार्केटिंग करायचं अन पैसे खो-यानी ओढायचे. खरच जर या राजकारण्याना या दुष्काळाजी काळजी वाटली असते तर या वर्षीचं आयपीएल थांबवलं जायला पाहिजे होतं. पण कोणी त्या बद्दल चकार एक शब्द बोलताना दिसत नाही. म्हणजे दुष्काळ व पाणी बचतीचा आणलेला आव हा निव्वड बनाव आहे. आता आसारामला त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या मिडीयानी बडवबडव बडवून काढलं अन आसारामच्या शिष्यानी रामदासाच्या पोराना बदडून काढलं.
त्या नंतर आली होळी...
फेसबुकवर तर सुचनांचा पूर वाहू लागला होता. त्याच बरोबर अनेक वृत्तपत्रानी तर चक्क आठवडाभर पहिल्या पानावर मोहीम राबवत होळीच्या वेळी पाण्याची नासाडी करु नका म्हणून डोस पाजले. हे सगळं वर वर पाहता असे वाटते की "किती संवेदनशील आहेत हे मिडीयावाले" पण हा निव्वड दिखावा आहे. या समस्येच भांडवल करुन राजकारणी निधी लाटणार व मिडीया पाठ थोपटवून घेणार. पण प्रश्न निकाली काढण्यासाठी मात्र कुणीच पुढे सरसावताना दिसत नाही.
आता तुम्हीच बघा ना... मिनरल वॉटर नावाखाली बाटलीत पाणी भरुन विकले जाते. या बाटलितल्या पाण्यामुळे हजारो लिटर पाणी वाया घालविला जात आहे पण त्यावर कुणी चकार शब्द बोलत नाहीत. या वर्षी तेवढ मिनरल वॉटर बंद केलं तर काय फरक पडणार? पण नाही.
अगदी याच धर्तीवर पाण्याची प्रचंड नासाडी करणारा दुसरा प्रोडक्ट म्हणजे कोल्डड्रिंक. या वर्षी महाराष्ट्रात कोणीही कोल्डिंक पीऊ नये असे आवाहन जर केल्या गेले व ते जर पाळले तर मला वाटते आपण दुष्काळावर ब-यापैकी मात करु. मग हे वृत्तपत्र व राजकारणी पुढाकार घेणार का? अजिबात नाही.
का? कारण या दोघानाही पाण्याचा प्रश्न थोडीच सोडवायचाय, ते तर आपल्याला शेंड्या लावत आहेत. म्हणून राजकारणी व मिडीया या दोघांचाही निषेध!!!

मी काल पासून आंघोळीला शॉवर घ्यायला सुरुवात केली आहे. का माहिते का, चिडचिड झालीय माझी नुसती. कारण पाण्याची एवढी अडचण असताना समस्या सोडवायला त्यातले कोणीच पुढे सरसावत नाहीयेत ज्यांच्याकडे अधिकार आहे. जे हा प्रश्न निकाली काढू शकतात असे सगळे नुसत्या बनवा बनवी करत आहेत. राजकारणी व मिडीया आपल्याला शेंड्या लावत आहे याचं आजूनच वाईट वाटत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा