बुधवार, १० एप्रिल, २०१३

लक्ष्मण माने प्रकरण:- रेणके खूश हुवा और हुवी...!!!!

लक्ष्मण माने प्रकरणाच काय होईल ते होईल पण या प्रकरणात जर कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर त्या बाळकृष्ण रेणके व पल्लवी रेणके या दोघाना... हे मी कशाच्याही शपथीवर सांगू शकतो. काल-परवा पल्लवी रेणकेचा एक लेख आला जो नरके सरानी फेसबुकवर शेअर केला होता(आज जाऊन तो कुठल्या वृत्तपत्रात होता ते शोधावं लागेल) त्यात पल्लवी रेणके काहिशा अशा म्हणतात...
 “...भटक्या विमुक्तांची चळवळ माझे वडील रेणके व इतरानी मोठ्या कष्टाने उभी केली. ती चळवळ पळविण्यात आली. लक्ष्मण माने हे उपरा पुस्तकामुळे रातोरात स्टार झाले अन प्रकाशझोतात आले. त्या नंतर दोनदा आमदारकी मिळवीत ते राजकारणातही महत्वाची जाग पटकावत आपले वजन निर्माण करु शकले. या प्रकाशझोताच्या व नावलौकिकाच्या बळावर त्यानी भटक्या विमुक्तांची चळवळ पळविली...” अशा अर्थाचं लेखन त्यानी प्रिंट मिडीयातून केलं आहे. नरके सरानी तो लेख शेअर केल्यामूळे जवळपास त्यांच्या लिस्टमधील सगळ्यानी तो लेख वाचला खरा पण त्यातून निघणारा धूर मात्र कित्येकाना दिसलाच नाही. माने प्रकरणाला एक नवे वळण देण्याची ताकद या पल्लवी रेणके लिखीत लेखात दडलेली आहे. या लेखातील खास करुन दोन शब्द पल्लवीचा घात करुन जातात... ते शब्द म्हणजे "चळवळ पळविली". मनातील शल्य अधोरेखीत करणारे हे ते शब्द.
   
याचा अर्थ काय निघतो?
पल्लवी रेणकेला असे वाटते की त्यांच्या हातून चळवळ पळविली जात आहे. याचाच दुसरा अर्थ असा निघतो की चळवळीतील त्यांचे महत्व कमी होत चालले आहे. याला आजून पुढे जाऊन विस्तृतपणे जर मांडायचे म्हटल्यास...

पल्लवी रेणके व बाळकृष्ण रेणके यांच्या उरात धडकी भरली आहे.  ती धडकी कशाची आहे तर चळवळ हातून जाण्याची व त्यातून फायदे लाटायचा जो काही त्यानी आराखडा तयार केला होता तो उध्वस्थ होताना दिसत आहे. त्यामूळे हे रेणके कुटूंब अस्वस्थ झाले असून पल्लवीनी चक्क वृत्तपत्रातून असे लिहले आहे की ही चळवळ प्रकाशझोताच्या बळावर मानेनी पळविली. अरेच्चा... तसं असेल तर मग प्रत्येक तो जो प्रकाश झोतात आहे त्यानी अशा चळवळी पळविल्या असत्या. आहे का शक्य?
पल्लवीच्या वरील वाक्यातील ’चळवळ पळविली’ या दोन शब्दावर माझा तीव्र आक्षेप आहे. पळविली या शब्दातून काय अर्थ निघतो? चळवळ एखादा पळवतो म्हणजे तुम्ही चळवळीचे राखणदार होता की कसे? अन पळविली हे जर तुम्हीच म्हणत असाल तर मग तुम्ही अकार्यक्षम राखणदार होतात... अशा राखणदारानी चळवळीत राहणे तर दूर त्याचं नावही घेऊ नये. असा युक्तिवाद हा पळविणे या शब्दाला धरुन करता येऊ शकतो जो ईथे गैरलागू आहे.

मग काय लागू आहे?
अहो चलवळ ही ना कोणाची वयक्तीक संपत्ती असते ना कुणी त्याला राखण राहू शकत. म्हणून ती पळविलीही जाऊ शकत नाही. तरी पल्लवी ज्या अर्थी म्हणतात की पळविली त्यावरुन त्याना चळवळीवर मालकी हक्क असल्याचे वाटत असावे. म्हणजे पल्लवी रेणकेनी त्या लेखात जो काही आटापिटा केला तो कुठली तरी मालकी हक्क सांगण्याचा होता. तो कसला मालकी हक्क असेल हे सांगायची गरज नाही... अगदी क्रिस्टल क्लिअर आहे... रेणके कुटुंबाला असे वाटू लागले होते की भटक्यांची चळवळ म्हणजे त्यांच्या मालकी हक्काची चळवळ आहे... अन्यथा पल्लविनी चळवळ पळविल्याचा अरोप केलाच नसता.

चळवळ खरच पळविली जाऊ शकते का?
अजिबात नाही!

वर मी म्ह्टलेच आहे की ती संपत्ती नाही. चळवळ हा एक विद्रोह असतो, अन्यायाच्या विरोधात एकवटून लढण्याची ती प्रक्रिया असते. अत्याचाराच्या विरोधातली ती सामूहिक गर्जना असते. अन ती ना पळविल्या जाऊ शकत ना उधारीवर आणल्या जाऊ शकत. जिथे त्याची गरज आहे तिथे ती आकार घेते अन ज्याच्यात धमक आहे तो त्या विद्रोहावर स्वार होऊन उभ रान पेटवून सोड्तो. अन ज्याच्यात धमक नाही असे या विद्रोहरुपी अश्वावरुन बाहेर फेकले जातात अन नंतर ईतराना दोष देत बसतात. यानी पळविला नि त्यानी पळविला. रेणकेंचं तेच झालं.
लक्ष्मण मानेनी ही चळवळ पळविली नाही तर आपल्यात असलेल्या अंगभूत कौशल्यावर त्यानी ती खेचून नेली. पल्लवी रेणकेच्या वडिलांकडे ती टिकविण्याची ताकद नव्हती. यात मानेंचा काय दोष? जेंव्हा पल्लवीचा हा संदर्भ वाचला तेंव्हाच पाल चुकचुकली पण आजून मानेंची प्रतिक्रिया यायची होती(तेंव्हा) म्हणून मी गप्प बसलो होतो. आता मात्र चित्र बरचस स्पष्ट झालय. याच सूळाच्या भावनेतून मानेंच्या विरोधात रेणकेनी कट रचला नसेल कशावरुन?

पुरावा आणि मोटो:
म्हणजे पल्लवी रेणकेचा तो लेख व त्यातील चळवळ पळविल्याचा तीचा अरोप रेणकेनी मानेंच्या विरोधात कट केला असल्याचा पुरावा म्हणून नाही पण कटाचा मोटो म्हणून सादर करता येऊ शकतो. म्हणजे रेणकेंची झडती घ्यायचा मार्ग मोकळा होतो. जर हा मोटो असेल तर मग या मोटोतून निपजलेलं कृत्य म्हणजे मानेंवरचं आरोप आहे काय? अशा दिशेनी तपास चालवायला हरकत नाही. किंबहून पल्लवीला व श्री. रेणकेना पोलिसाना या मोटोच्या आधारे तपासासाठी ताब्यात घ्यावे. बरच काही बाहेर येईल. पोलिसानी या दिशेनी तपास यंत्रणा नक्की फिरवावी. 

दुसरा मोटो तर जगाला माहीत आहे की रेणके आयोगावर मानेनी सडकून टीका करताना रेणकेंच्या नेतृत्वावर सवाल उठविला होता. रेणके अहवाल जेंव्हा सादर झाला तेंव्हा भटक्या विमुक्तातील एका थोर विचारवंताने दाखविलेल्या उणिवा रेणकेना झोंबल्या व त्याचा राग धरुन हे कारस्तान रचले असावे. कारण या कारस्तानातील आजून एक खेळाडू म्हणजे व्येंकप्पा भोसले जे रेणकेंशी जवळीक साधून आहेत. ते मानेंच्या संस्थेत मागच्या १५ वर्षापासून पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

रेणके कंपूचा कारस्थान म्हणण्याचे कारण:
साता-यातल्या या घटनेतील सर्वात महत्वाचा मुद्दा असा की जर हा बलात्कार २००३ पासून सुरु आहे व तेंव्हा त्या बायाना तक्रार करण्याची हिंमत होत नव्हती अन ती आज मात्र दहा वर्षा नंतर झाली तर सहाजिकच हा प्रश्न उठतो की “वो कौन है... जिसकी वजहसे आज ये हिंमत आयी है?” हा प्रश्न सर्वाना पडायला हवा. अन तो पडद्यामागचा जो कोणी हिंमतदाता असेल त्याचा शोध व्हायला पाहिजे. अत्याचार झाला का? मग तो कुठे झाला? किती झाला? कसा झाला वगैरे पोलिस शोधतील. हिंमतदाता पडद्याआड राहता कामा नये  या हिंमतीची प्रेरणा कोण? कोणाच्या प्रेरणेने ही हिंमत आली? याचा का एकदा शोध लागला की आजून बरच काही बाहेर येईल.

यातली आजून गंमतीदार गोष्ट अशी की या बायकानी नुसती तक्रार दाखल केल्या केल्या विद्या बाळ व पल्लवी रेणेके धावत धावत गेल्या साता-याला. कशासाठी? 
तर संस्थेतील लोकाना भेटून चौकशी व विचापूस करायला. अरे तुम्ही काय पोलिस अधिकारी आहात का? किंवा शासनानी तुम्हाला तपासाचा अधिकार दिला आहे का? कुठल्या अधिकारानी तुम्ही तपासाला धावलात? अन ते ही प्रकरण पोलिसांकडॆ गेले असताना व पोलिसांचा तपास चालू असताना तुम्ही तिथे जाऊन कसं काय तपास करु शकता? मुळात तुम्हाला तो अधिकार तरी आहे का? अन संस्थेतील लोकानी नकार दिल्यावर तिथल्या पोलिस अधिका-याकडुन (प्रसन्न नावाचा कोणी अधिकारी आहे म्हणे) दट्ट्या आणून संस्थेत प्रवेश केला. हे करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? नसेल तर मग हे का बरं केले? ते पोलिसांचे काम आहे की तुमचे? एवढा आततायीपण करण्याचे कारण काय? वरील चित्र काय सांगते? काही झाले तरी माने अडकलेच पाहिजे ही तुमची भावना अधोरेखीत होते. पिढीत महिलांची विचारपूस नको का करायला? असे जर म्हणत असाल तर मग एवढा रोष दाखवत संस्था दणाणून सोड्ण्याचे कारण नव्हतेच. चुपचाप पिढीत महिलांच्या घरी जाऊन भेटता आले असते. पण तुम्ही लोकाने तसे केले नाही. माने व संस्थेतील अधिका-यांमधे दहशत फैलविण्याचे कार्य बजावून आलात... आम्हाला कळू नये एवढे दुधखुळे आहोत असे वाटते का?

आता तुम्ही म्हणाला... नाही हो आम्ही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून धावलो!!
अस्स का... मागच्या दहा वर्षात महाराष्ट्रात झालेल्या बलात्काराची यादी देतो... मला सांगा तिथे तुम्ही असेच धावलात का? अहो जिथे बायकांचे गुप्तांग कापून फेकण्यात आले अशा बातम्या दर आढवड्याला ’पोलिस टाईम्स’ नावाच्या वृत्तपत्रातून येत असतात. तिथे तुम्ही जात का? नाही. तुमचं उत्तर हो असेल तर मी मागच्या सहा महिन्यातल्या ’पोलिस टाईम्सच्या’ बातम्या याच ब्लोगवर टाकतो... मग तुम्ही तिथे गेल्याचे पुरावे द्या. हव तर हे मी उद्याच करायला तयार आहे... बघू तुमची सामाजीक तळमळ.  पल्लवी रेणके व विद्या बाळला माझं हे ओपन चॅलेंज आहे. परत एकदा शपथीवर सांगतो तुम्ही हे चॅलेंज घेणार नाही. माने प्रकरनात दाखविलेली स्फूर्ती तुम्ही ईतर प्रकरणात दाखवत नाहीत हे सगळेच जाणतात.
 ईथे नुसती तक्रार दाखल झाली रे झाली या दोन महामाया धावून गेल्या... का? तर म्हणे स्त्रीयांचा, दलितांचा व पिढीतांचा प्रश्न... व्वा रे तुमची समाज सेवा!!! व्यक्ती पाहून तुमच्या समाजसेवाला ऊत येतं... हे खरच दुर्दैवी आहे. विद्या बाळ बद्दल मी काहीच लिहले नाही. लिहायची ईच्छाही नाही व लिहावं असं कार्यही नाही. असले ब्लॅकमेलींगचे धंधे विद्याबाळनी थांबवावे एवढचं म्हणेन.

निसटच्या नेतृत्वाच्या भितीतून व चळवळ पळविल्याच्या सूड बुद्धितून हे कुंभाड रचल्या गेल्याची शंका आहे...!!!
सत्य कळेलच असे नाही... अशी कित्येक सत्य आहेत जी कायमची गाडल्या गेलीत. बघू याचं काय होतं ते...

उद्या समजा मानेवर आरोप सिद्ध झालेच(जे अशक्य वाटते) तर त्याना काय शिक्षा व्हायची ती होईलच पण सध्यातरी रेणके खूश हुवा और हुवी...!!!
*** 
टिप:-  निनावी किंवा खोट्या नावाने लिहलेल्या प्रतिक्रीया प्रकाशित केल्या जाणार नाही याची दखल घ्यावी.

1 टिप्पणी:

  1. विद्या बाळ आणि पल्लवी रेनकेंचा दृष्टीकोन कळला.आणि हरी नरके यांना पण आनंदाच्या उकळ्या फुटत असणार यात शंका नाही. पण यात सर्वात पुढे होते लोकसत्ता स्वतःला निर्भीड निपक्ष म्हणवणारे त्यांच्या संपादकीयातून आपली सगळी सगळी मळमळ ( साडेतीन टक्के)म्हणून जिव्हारी लागलेली बाहेर आली आहे. याचाही उल्लेख आला असता तर बर झाल असत. पण तरीही छान विश्लेषण केल आहे. या गोष्टी दाखवल्या म्हणजे तुम्ही मानेंच्या बाजूने म्हणजे अन्याय करणार्यांच्या बाजूचे असा ठपका लावला जाऊ शकतो.

    उत्तर द्याहटवा