शनिवार, १३ एप्रिल, २०१३

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपुढल्या वर्षी लोकसभा व विधानसाभा दोन्ही निवडणूका आहेत. त्यासाठी सर्व पक्ष आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. कॉंग्रेस-राष्टवादी हे दोन पक्ष मागच्या कित्येक वर्षापासून सत्तेत आहेत. त्याना सत्तेत धाडण्याचे अत्यंत मोलाचे कार्य बजावत आलेला मतदार म्हणजे आंबेडकरी मतदार.  शरद पवार आणि ईतर कॉंगेसी नेते  नेहमीच बौद्धांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. नामांतर लढा व तो सोहळा याच लोकांच्या कृपेने साजरा झाला. तेंव्हापासून बौद्ध व पवार यांच्यात एक अतूट नाते बनले. त्याचा परिणाम असा झाला की मागच्या कित्येक वर्षापासून या पक्षाने विजय घोडदौड सुरु ठेवली. दीड फूट छातीच्या सेनापतीला एकदा अपवाद म्हणून सत्ता मिळाली खरी पण त्या नंतर भगव्या लोकाना ती कधीच मिळविता आली नाही. याचे मुख्य़ कारण हेच आहे की आंबेडकरी मतदाता पंजा किंवा घड्याळ यानाच मत देतो. ईतर सगळे लबाड आहेत जे या मतदाराला चांगलं माहित आहे.या वेळी मात्र पवारांच्या या विजयाचे गमक भगव्यानी शोधून काढले. भगव्या लोकांनी प्रचंड चिंतन-मनन करुन एक कार्यक्रम आखला. तो म्हणजे बौद्धाना पवारांपासून व कॉंगेस पासून तोडणे व भगव्यांच्या छावणीत उभे करणे. त्यानंतर एक डाव खेळला गेला. त्या डावाचा पहिला बळी ठरला रामदास आठवले. निळा झेंडा घेऊन आठवले हालत डुलत भगव्या छावणीत दाखल झाले. हा झेंडा भगव्याच्या छावणीत लहरायला लागला खरा पण त्याच्या पलिकडे काहीच घडले नाही. लगेच झालेल्या मुंबईतील महापालिकेच्या निवडणूकित बौद्ध समाजानी आठवलेला जागा दाखवत आपला रोष व्यक्त केला. दारूण झालेला पराभव पचवता पचवात आठवलेच्या तोंडाला फेस आला.
भगव्याना डाव फसल्याचं कळताच त्यानी दुसरा डाव खेळायचे ठरविले. तो म्हणजे बौद्ध मतदार पवार व कॉंग्रेस यांच्यापासून तोडण्याचा. त्याची आखणीही पद्धतशीरपणे केल्या गेली. या डावाचा पहिला भाग म्हणजे बौद्ध विचारवंताची बदनामी करणे. त्यांच्यावर नसते आरोप करायचे अन चौफेर हल्ला चढवायचा. अरोप करण्यासाठी थेट भगवे पुढे न येता बहुजनातीलच काही शेपूट हलवे निवडल्या गेले. त्याना पुढे करुन हा लढा लढणे सुरु झाले. लक्षमण माने या हल्ल्याचे पहिले बळी ठरले. लोकसत्ता-विद्याबाळ-रेणके नावाची एक टोळी नेमण्यात आली. ही टोळी आपलं सर्वस्व झोकून देत कामाला लागली. पहिला वार साता-यातील बौद्ध विचारवंत लक्षमण माने यांच्यावर झाला. मानेवरील आरोप सिद्ध झाल्यास न्यायालय जी शिक्षा देईल ती भोगायला ते तयार आहेत. त्यासाठी निवाडा येईस्तोवर वाट पहायला हवे. पण लोकसत्ता-विद्याबाळ-रेणके कंपूला तेवढा धीर कुठे आहे? ते तर भगव्याच्या प्लॅनवर काम करत आहेत. मग काय हे सुसाट सुटले. चर्चा काय?  एकावर एक अग्रलेख काय, संपादकीय मधून काय अन आजून कशातनं काय असा प्रचंड मारा सुरु झाला. हा सगळा प्रकार पाहता हा नियोजित हल्ला असून एक एक करुन बौद्धांची बदनामी करायची व चळवळीतल्या नेत्याना तुरुंगात डांबायचे. म्हणजे बौद्ध समाज बिथरुन जाईल. कणखर नेत्याना एकदा डांबले की मग हळूच आपल्या छावणीतील पायचाटे नेते उभे करायचे. चपला वाहणारे व शेपूट हलविणा-याना(आठवले वगैरे) घेऊन तिथे सभा भरविल्या जातील व मतांची भीक मागितल्या जाईल. मानेच्या दारात आठवलेला उतरवण्याचा हा डाव होता. हा डाव न्यायालयाच्या निकाला नंतर उधळुन लावल्या जाईल याची मला खात्री आहेच...पण आजमितीला मात्र शिंमगा सुरु आहे...!

याच डावाची आजून एक बाजू म्हणजे कॉंग्रेस-राष्टवादीच्या नेत्याना शुल्लक कारणावरुन बदनाम करत झूंडशाहिने राजिनामा मागायचा. सध्या गाजत असलेले अजित पवार प्रकरण त्याचाच भाग आहे. हाग-या, मुत-या गोष्टीला राष्ट्रीय समस्येचे स्वरुप देऊन रंगवायचे अन लोकांमधे संभ्रम निर्माण करत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करायची. वृत्तपत्रांतून स्तंभच्या स्तंभ लिहायचे. किती नाही म्हटलं तरी लेखनाचा मतदारावर परिणाम होणार व ही मतं फिरणार. म्हणजे एकीकडे बौद्ध नेत्यांच्या नाकेबंदी करायची व दुसरीकडे मराठा-बहुजन नेंत्यांच्या लहान सहान गोष्टीला राष्टीय समस्येचे रुप देत बदनामी करायची... त्याच बरोबर राजीव गांधी कुठला तरी एजंट होता व इंदिरा गांधी यांच्या घरी कोणी आंतरराष्ट्रिय दलाल होता अशा बोंबा मारत कॉंग्रेस-राष्टवादीची जमेल तेवढी बदनामी करायची. हे सगळं आत्ताच का? उत्तर सोपं आहे. पुढच्या निवडणूकीत सत्ताधा-यांशी थेट भिडण्याची धमक नसल्यामुळे अशा प्रकारे सत्ताधा-यांची बदनामी करत स्वत:साठी अनूकुल परिस्थीती निर्माण करायची. पण असं दुस-याची बदनामी करुन कधी सत्ता मिळते का? अजिबात नाही!
बदनामी करणे हा एक कलमी आर्यक्रम जोरात सुरु झाला आहे. तिकडे माने, आजितदा, राजीव गांधी व इंदिरा गांधी या सगळ्यांच्या बदनामीची ही साखळी एक संदेश देते तो म्हणजे हे सगळं आखून-रेखून चालविल्या जात  आहे.  
अजितदादानी दोन्ही सभागृहात जाऊन माफी मागितल्यावर खरंतर प्रकरण मिटायला हवं होतं. पण ते लावून धरायचं अन एकेक करुन ते सगळे हद्दपार करायचे जे बहुजनांचा विचार जपतात. लाल महालातून दादोजी हटल्या पासून अजित पवारांवर मिडीया कमालीची नाराज दिसते. त्यांच्यावर सडकून टिका करताना लहान सहान गोष्टीला राष्ट्रिय समस्या असल्यासारखे रंगवून लोकांसमोर मांडले जाते. हा सुनियोजीत खेळ खेळणारे खरे खिलाडे भगवे आहेत... 

टीप:- वरील लेखाचा मराठा आरक्षणाशी काही संबंध नाही. मराठा आरक्षणाला माझा विरोध होता, आहे व राहील.
---------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा