बुधवार, २४ एप्रिल, २०१३

शरद पवार : भाग-०५ शुभ मंगल सावधान!!!मुलगा लग्नाचा झाला नि कमवता असला की स्थळांचा पाऊस पडतो. याला पवार तरी कसे अपवाद राहणार? आता पवारांच्याही घरी स्थळं घेऊन येणा-यांची वर्दळ वाढली होती. मराठा समाजात मान मरतब, देणे-घेणे व ईतर ब-याच गोष्टीना स्थळ जुळवताना अत्यंत महत्व असते. पवाराना एकसे बढकर घराण्यातले स्थळ येऊ लागले. पण शारदाबाई पवार व गोविंदराव पवार हे मुळात सत्यशोधक चळवळीतले सक्रीय कार्यकर्ते. त्याना यातलं काहीच नको होत. जर काही हवं होतं तर ते आपल्या मुलाला अनुरूप अशी जोडीदार... बास!
बड्या बड्या घराण्यातले प्रस्ताव झुगारुन टाकत पवार दांपत्यानी पुण्यातील एका साधारण घराण्यातल्या स्थळाला पसंदी दिली. सदाशिव उर्फ सदू शिंदे नावाचे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू यांची थोरली कन्या प्रतिभा शिंदे यांचं स्थळ कुणीतरी सुचवलं. पवार कुटूंब शिंदेच्या मुलिला पाहायाला आले अन त्याना हे स्थळ पसंद पडलं. सदू शिंदे पुरोगामी विचाराचे होते व त्यानी आपल्या मुलिंवर तसे संस्कार केले होते. पण १९५५ साली अल्पशा आजाराने सदू शिंदेचे निधन झाले अन सदू शिंदेच्या पत्नी निर्मलाताई शिंदे यांच्यावर चारही मुलिंची जबाबदारी येऊन पडली. पण निर्मलाताईही भक्कम होत्या. त्यांचा जन्म बडोद्याचा. निर्मलाताईचे वडील ब्रिगेडीयर अरविंद राणे हे कडक शिस्तीचे भोक्ते तर होतेच पण सयाजीराव गायकवाड सारख्या पुरोगामी संस्थानिकाच्या राज्यात आयुष्य गेल्यामुले ते ही प्रखर परिवर्तनवादी नि पुरोगामी वृत्तीचे होते. निवृत्तीनंतर ब्रिगेडियर राणे हे पुण्यातच राहायला आहे व त्यांच्या देखरेखीत शिंदे कुटूंबातल्या मुलींची जडणघड्ण झाली. प्रतिभाताईनी मात्र आजोळी बडोद्याला, नंतर पुण्यातील भावे हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एम.ई.एस. कॉलेजातून केले. दोन्ही कुटूंब पुरोगामी विचाराचे असल्यामुळे लग्न जुळवताना अजिबात रुसवे फुगवे झाले नाही. पण तरी सुद्धा मुलीची आई म्हणून निर्मलाताईना धाकधूक होतीच. तेंव्हा त्यानी हळूच शारदाबाईकडे विचारण केली “देण्या घेण्याचं काही बोललात नाही?” अन शारदाबाईनी हसून म्हटलं “नुसतं नेसल्या साडीवर मुलगी पाठवा. बाकीचं आम्ही बघून घेऊ” अन निर्मलाताईंच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. जसं हवं होतं तसं स्थळ मिळाल्यामुळे शिंदे-राणे कुटूंब सुखावून गेले. लग्न पक्के झाले.
पण थोड्याच दिवसात शरद पवार एकटेच थेट पुण्यात आले व राणेना भेटून म्हणाले “मला मुलिशी काही महत्वाचं बोलायचं आहे... एकांतात भेट हवी” राणे दोन मिनटं गोंधळले खरे पण स्वत:ला सावरत होकार दिला. काय बोलले असतील पवार या एकांत भेटीत? पुढचं आयूष्य राष्ट्रासाठी व समाजासाठी वाहून देणार आहे. संसारासाठी फार वेळ देणार नाही हे सगळं तर आहेच पण त्याही पेक्षा एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी एक राष्ट्रव्रत घेतला आहे ते सांगण्यासाठीच ईथे आलो आहे. “आता काय परत राहिलं यांचं राष्ट्रव्रत??? आयुष्यतर म्हणे समाजासाठी वाहणार तेंव्हा आजून काय उरलं” म्हणत त्या पवारांकडे पाहात होत्या.
एक अपत्य, एक राष्ट्रव्रत:
अन पवार बोलू लागले ते काहीसं असं. “आपल्या देशाची परिस्थीत फार हालाखीची आहे हे समजावून सांगताना त्याचं मुख्य कारण ईथली लोकसंख्या आहे. लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी लोकानी स्वत:हून पुढाकार घेत एक किंवा दोन अपत्यावरच थांबावे मी या विचारसरणीचा आहे. ईतराना हा विचार सांगण्याचा व भावी पिढ्यात तो रुजविण्याचा माझा विचार आहे. पण मी जेंव्हा लोकांपुढे तो प्रस्ताव ठेवेण वा विचार मांडॆन तेंव्हा लोकं मला विचारतील. त्यावेळी मला तो विचार मी आधीच कृतीतून उतरविला आहे हे सांगायचे आहे. माझा आदर्श घेत ईथला समाजही अपत्य जन्मावर नियंत्रण घालेल. यातून राष्ट्राची लोकसंख्या आटोक्यात येईल व देशाची भरभराटी होण्यास मोठी मदत होईल. पुढच्या पिढ्यामधे ही जागृती निर्माण करण्यासाठी मी एक अपत्य ठेवण्याचं राष्ट्रव्रत घेतलं आहे. मग ते अपत्य मुलगा असो वा मुलगी असो मला ते पहायचं नाहीये. पहिल्याच बाळावर आपल्याला थांबायचे आहे नि मला यात तुझी साथ हवी आहे...”  प्रतिभाताईची अवस्था काय झाली असेल विचार करा. पण शेवटी पुरोगामी रक्त ते... पुरोगामित्वाच्याच वाटेवर जाणार. “चालेल...” मनोधैर्य एकवटून प्रतिभाताईही  बोलल्या अन पवारांच्या एक अपत्याच्याराष्ट्रव्रतातील चळवळीच्या त्या पहिल्या अनुयायी ठरल्या.
१ ऑगष्ट १९६७ रोजी बारामतीच्या शाहू हायस्कूलच्या पटांगणात प्रतिभाताई व शरद पवारांचा विवाह संपन्न झाला. देणे घेणे नाही, हुंडा नाही, रुसवे फुगवे नाही... वा मानपान नाही. असा तो साधासुधा लग्नसोहळा होता.
३० जून १९६९ रोजी पवाराना कन्यारत्न झाले. ठरल्याप्रमाणे कुटूंब नियोजन करुन एका अपत्यावर थांबण्याच्या त्या संकल्पाला मुर्त रुप देण्याची वेळ आली. खरं तर त्या काळात एका मुलीवर कुटुंब नियोजन करणे हे धाड्साचे काम होते. पण पवारानी ते राष्ट्रव्रत घेतले होते. मागे हटणे त्यांच्या गावी नव्हते. एका मुलीवर कुटुंब नियोजन करत पवारानी उभ्या देशाला एक नवा आदर्श घालून दिला. पवारानी जे १९६९ ला केले ते करण्याची आजही कित्येकाची हिंमत होत नाही. त्यासाठी लागते पुरोगामित्वाची भक्कम पायाभरणी...
कुणी पवाराना काहिही म्हणो... पण एक अपत्याच्या राष्ट्रव्रतात पवारांसारखे फक्त पवारच... म्हणून म्हणतो. पवार म्हणजे नुसता नेता नाही तर ते आहेत पुरोगामी पर्व...!!!

४ टिप्पण्या:

 1. Ramteke sir aaj prathamch mala aaplyablog madhe kahi khatkalya lagle aahet.. pawarani hunda n ghene he yekvel many karu shakto pan he “yek aptya, rashtrvat“ he jara pachayala avghad jatay. karan tya kalat garibi, bhukmari, naisrgik dushkal ( sadhyachya kalatala krutrim nahve ), berojgari he gambhir prashn hote aani loksankhyavadi ha prashn tya kalat astitvat navhata karan tya kali bharatachi loksankhya hi 40 te 45 kotichya aaspas hoti. aani mazhya mahiti nusar navadchya dashkat loksankhya vadichya virodhat janjagruti suru zali hoti.
  Aani jar tyani kharach kutumb niyojan kele asel tar ti khup moti yethasik ghatana tharli asel aani tyachi dakhal tatkalin print mediane ghetleli asnarach mag to sandarbh kuthe vachyla milel?
  Kinva tatkalin sandrbh purava mhanun dila tar jara lavakar pachel. jar milat nasel hi ghatana brigedi itihaskarani rangveleli gosht samjavi lagel.
  Hundabandi, kutumbniyojan hya sarv zalya bolayachya goshti! Pan vastvik jivnath asle kathith purogami sarvat jast hunda ghetat, bhrushtachar kartatc pan paddyamage lapun...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. Aani mi anek jodpi pahilit ki tyana yek apatyanantar kutumbniyojan n karatasudha dusare mul hot nahi.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. Brigedini lihlekya itihasik ghatanacha sandarbh n
  gheta aapan tatasthpane lihilela itihas mala vachayla milel ashi aasha karto...

  प्रत्युत्तर द्याहटवा